PK च्या प्रतीक्षेत...

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
19 Dec 2014 - 12:59 am
गाभा: 

गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते.

http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664

pk

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Dec 2014 - 1:23 am | मुक्त विहारि

असो,

------

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2015 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला चित्रपट आहे, धन्स. बाकी, चालु द्या.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

19 Dec 2014 - 2:56 am | अर्धवटराव

पण राजु साहेबांचा म्हणुन सिनेमा पहायलाच हवा.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2014 - 7:37 am | अत्रुप्त आत्मा

पांडु मोड ऑन >>>

बरं मssssग!?
.
.
पांडु मोड ऑफ >…> :-D

बॅटमॅन's picture

19 Dec 2014 - 6:42 pm | बॅटमॅन

पांडू मोडमधील डिफॉल्ट कमेंट 'अच्चा, असं जालं तर' ही आहे.

खबो जाप's picture

19 Dec 2014 - 7:45 am | खबो जाप

संजय दत्त सारख्या देश्द्रोह्याने ह्यात काम केले असल्यामुळे चित्रपटावर फुली मारण्यात आली आहे , अगदी डाऊनलोड करून सुद्धा बघणार नाही

याच्या देशद्रोह्याला विस्मृतीते घालवणे यासरखे दुसरे शासन नाही. मी तर टीव्हीवरही तो दिसल्यास च्यानेल बदलतो. आपल्याला जे जमेल ते करावेच. उगीच माझ्या एकट्याकडुन काय होणार असे म्हणू नये. असे सगळ्यांनी केल्यास त्याला कळेल. तुरुंगवास हे त्याच्या साठी लोकप्रियता वाढवण्यचे साधन बनले आहे. तो तिथे काय करतो/नाही याने च्यानेले भरलेली असतात ! आणि आपण प्रेक्षकच ते वाढवतो.

मराठी_माणूस's picture

20 Dec 2014 - 3:16 pm | मराठी_माणूस

सहमत. हेच आपण सलमान च्या चित्रपटांबाबत केले पाहीजे. पण होते काय तर प्रेक्षकच गर्दी करतात ह्यांच्या चित्रपटा साठी. मोठ्या कंपन्या ह्यांचा जाहीराती साठी उपयोग करतात.
समाज परीपक्व होण्याची गरज आहे.

खटपट्या's picture

19 Dec 2014 - 8:16 am | खटपट्या

ज्यांनी फॉरेस्ट गंप बघितला असेल ते लगेच ओळखतील की अमीर खान सरळ सरळ टॉम हँकची नक्कल करतोय.
कोणी नसेल बघीतला तर अवश्य बघा.

http://putlocker.is/watch-forrest-gump-online-free-putlocker.html

योगी९००'s picture

19 Dec 2014 - 9:13 am | योगी९००

माझ्या एका नातेवाईकाने स्पेशल शो कालच पाहिला. त्याची प्रतिक्रिया..
"चित्रपट ठिकठाक आहे. स्टोरी जरा हटके आहे. पण ३ इडीयट किंवा तारे जमीनपर ची सर नाही."

spoileralert (not sure if this is true as message is received on whatsapp).
वॅट्सअ‍ॅप वरून आलेल्या मेसेज मध्ये असे लिहीले आहे. "अमिरखान हा या चित्रपटात एक एलियन आहे आणि त्याचा रिमोट शोधण्याची स्टोरी म्हणजे हा चित्रपट आहे. त्याला तो रिमोट शोधून परत आपल्या जगात जायचे असते.."

प्रसाद१९७१'s picture

19 Dec 2014 - 1:24 pm | प्रसाद१९७१

राजू हीरानी आणि आमीर खान च्या आधीच्या तद्दन सिनेमांप्रमाणे हा पण तितकाच फाल्तू असणार, पण दुर्दैवाने सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून येइल.

सतिश गावडे's picture

21 Dec 2014 - 12:25 pm | सतिश गावडे

चित्रपट पाहिला नसल्यामुळे फालतू आहे की नाही हे माहिती नाही मात्र सगळीकडे ग्रेट सिनेमा असल्याचे छापून मात्र आले आहे. :)

श्रीगुरुजी's picture

19 Dec 2014 - 2:32 pm | श्रीगुरुजी

राजकुमार हिराणीला कमोड व कमोडवर बसलेल्या मंडळींचे खूप आकर्षण आहे. तो बहुतेक कमोडचा अ‍ॅडीक्ट असावा. त्याच्या प्रत्येक चित्रपटात कमोडवर बसलेल्या व्यक्तींचे एक तरी दृश्य असतेच. याही चित्रपटात ते असेल याची खात्री आहे.

हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत कोण बरं असतील ;) =))

प्रचेतस's picture

19 Dec 2014 - 6:51 pm | प्रचेतस

=))

अजया's picture

20 Dec 2014 - 9:29 am | अजया

=))

सामान्यनागरिक's picture

20 Dec 2014 - 2:05 pm | सामान्यनागरिक

त्याणा व्हर्बल/व्हिजुअल डायरिया झालेला असावा त्यामुळे अश्या चित्रपटांची निर्मीती होत असावा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

मिपाच्या लोकप्रियतेबाबतचा गुप्त निर्देश वाचून अभिमानाने उर भरून आला आनि ड्वाळेबिळे पन पान्नाव्ले

मिपावरिल अश्या आयड्या चोरणार्‍यांवर विवक्षित आयड्यांनी आयपीआर चोर्ल्याचा खटला दाखल करावा ;)

सर्वश्रुत आहे ते, प्रश्न पडलाच कसा तुला?? ;)

अरे तो र्‍हेटॉरिकल क्वेश्चन होता. ;)

बोका-ए-आझम's picture

19 Dec 2014 - 5:30 pm | बोका-ए-आझम

आणि तरी आपले समीक्षक म्हणतात की हिंदी चित्रपट वास्तवाला सोडून असतात! कमोड आणि त्यावर बसून केली जाणारी क्रिया या दोन्हीही वास्तवाचा भाग आहेत. बरं, देशद्रोहाचा काय मुद्दा आहे? संजय दत्तने केलेला गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला शिक्षाही झालेली आहे. आपण जर न्यायालयाने शिक्षा दिलेल्या लोकांना मत देऊन विधिमंडळात पाठवू शकतो तर चित्रपट बघायला काय हरकत आहे? शिवाय आपण ज्यांचे चित्रपट पाहतो त्यांच्यापैकी कुणी देशद्रोह केलेलाच नाही असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? माझ्या मते देशद्रोही मानला गेलेला कलाकार आहे म्हणून चित्रपट पाहू नये असं म्हणणं हे जरा मजेशीर आहे. अर्थात, चित्रपट पाहण्याचं आणि न पाहण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे!

खबो जाप's picture

20 Dec 2014 - 6:55 am | खबो जाप

आपल्याला हे विचार पटले त्यामुळे आपण हा चित्रपट बघणार नाही; प्रत्येकाला आपली मते आहेत त्यमुळे मी कुणालाही जावू नका असे म्हणालो नाही. जरूर जा आणि आनंद घ्या.

टवाळ कार्टा's picture

19 Dec 2014 - 11:23 pm | टवाळ कार्टा

आत्ताच पाहुन आलो...अगदी छान चित्रपट आहे...सहकुटुंब बघण्यासारखा

योगी९००'s picture

22 Dec 2014 - 10:02 am | योगी९००

चित्रपट मला आवडला पण सहकुटूंब म्हणणे अवघड आहे. (मुलांना घेऊन जायच्या लायकीचा चित्रपट नाही , कंडोमचा आणि बर्‍याच वेळा दाखवला गेलेला कार हलण्याचे सिन्स मुलांसाठी निश्चितच नाहीत.).

बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात? बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.

क्लिंटन's picture

26 Dec 2014 - 5:58 pm | क्लिंटन

बाकी एक गोष्ट मला कळली नाही की हिंदू नायिका आणि मुसलमान नायक लग्न करण्यासाठी चर्च मध्ये का जातात?

याचे कारण तो सीन बेल्जियममधला दाखवला आहे.तिथे मॅरेज रजिस्ट्रार जर चर्चमध्येच येत असेल तर लग्न तिथेच जाऊन करावे लागत असावे.

माझ्याही नात्यात अमेरिकेत लग्न झाले ते चर्चमध्ये जाऊनच तिथे रजिस्ट्रारच्या रजिस्टरमध्ये सही करून झाले होते. तिथला रजिस्ट्रार हिंदू देवळांमध्ये येत नाही का वगैरे प्रश्न विचारायच्या भानगडीत मी पडलो नव्हतो :)

बर्‍याच हिंदी चित्रपटात (यश चोप्रा/करण जोहर प्रभूतींच्या) नायक/नायिकेंचा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा (भले ते दोघेही हिंदू असले तरीही) एखादा सीन असतोच.

कोण यश चोप्रा? कोण करण जोहर? :)

किल्लेदार's picture

19 Dec 2014 - 11:42 pm | किल्लेदार

तद्दन फालतू चित्रपट....

टवाळ कार्टा's picture

19 Dec 2014 - 11:52 pm | टवाळ कार्टा

काय फाल्तु आहे त्यात? मी आजच बघून आलोय...मला काही फालतू मिळाले नाही
पण तुमची बाजू जाणून घ्यायची आहे

शिद's picture

22 Dec 2014 - 6:34 pm | शिद

कालच पाहीला.

तद्दन फालतू चित्रपट...

१००% सहमत.

किल्लेदार's picture

20 Dec 2014 - 12:04 am | किल्लेदार

ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत (उदा. बॉम्बस्फोटाचा सीन). ओ माय गॉंड सारखा प्लॉट आहे. संकलन करतांना बऱ्याच त्रुटी आहेत.
आणखी एक गंमत वाटली. अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते.

मला स्पष्टपणे वाटतं की राजू ने बिगार टाळली आहे.

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 12:16 am | टवाळ कार्टा

ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत >>

काही ठिकाणी झालेय तसे ... पण कमी वेळा

अनुष्का सोबत जी चर्च मध्ये असते (जिच्यामुळे कन्फ्यूजन होते) ती अजिबात हिंदी वाटत नाही तरीही तिला कोणीतरी हिंदीतून चिठ्ठी पाठवते. >>

ती चिट्।ट्।ई हिंदीत आहे??? अनुश्काकडे पहाताना इतके लक्षात आले नाही ;)

पण तरीही....आजकालचे बाकी खानावळीच्या पिच्चार्पेक्षा खुपच चांगला आहे

तरी पण शेवटी खानावळ ती खानावळच....

येडाफुफाटा's picture

20 Dec 2014 - 1:57 am | येडाफुफाटा

चिठ्ठी english मध्येच आहे फक्त आपल्याला हिंदीत ऐकवले जातै.

येडाफुफाटा's picture

20 Dec 2014 - 2:27 am | येडाफुफाटा

अनुष्काची-सुशांतची love story च फालतु आहे. त्यात पण भारत-पाकिस्तान घुसडवलाय. मुस्लीम धर्मावर ते bomb blast करतात व मूलींना शाळेत पाठवत नाहीत. असली नेहमीची चावून चोथा झालेली टीका आहे. बुरखा, स्त्रियांच्या अधिकार ,polygamy याविषयी काहीही नाही. मदरशातलं शिक्षीण वगैरेंवर टीका नाही. हिंदू वर नेहमीची मंदीर वा बाबा टाईप टीका आहे. ही जशीच्या तशी oh my god मधे होती. Oh my god मध्ये तर मुर्ती तोडतानाचे पण सीन आहेत. Christian missionary च्या conversion वर टीका करणारा एक सीन आहे. बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे? ज्यु आहे बहुधा. जैनांवर टीका नाही. एक श्रवणबेळगोळच्या मुर्तीचा अभिषेक करतानाचा सीन आहे.
जेजुरीचा पण एक सीन आहे. सौरभ शुक्लाच्या बाबापेक्षा oh my god मधील मिथूनचे-गोविंद नामदेवचे महाराज चांगले होते. बाकी socrates type येडा बनून प्रश्न विचारण्याचे तंत्र आवडले. राजूभाईंची हीच तर खासी यत आहे प्रचारकी थाटात उपदेश न करता वेड पांघरुन विचार करायला लावायचा. Alien च्या दृष्टिकोनातून बघणेसुद्धा जाम आवडले.

बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे?

...इस्लाम धर्मात मोहरमच्या वेळेस जुलुस काढतात तेव्हा असे अघोरि उद्योग करतात

ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या अवतारात कशी दिसलेय ते सांगा !

कितीही सुंदर दिसली तरी...

मधुबालेची सर नाही...

येडाफुफाटा's picture

20 Dec 2014 - 3:37 am | येडाफुफाटा

ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी अंग प्रत्यंगाच प्रत्यकारी दर्शन घडविलय. आत्मा तृप्त होईल. पण एखादाच kiss scene आहे. If thats what your looking for.

नाय वो आमास्नी तसलं काय बगाय नाय आवडत !! आमी आपले चेहर्‍याच्या सौंदर्यात समाधानी असतो.

मंदार दिलीप जोशी's picture

22 Dec 2014 - 3:01 pm | मंदार दिलीप जोशी

अनुश्काला ओठ नसून चोच आहे असे वाटले

चार्ली चापलिनचं भूत राजकफुरने नाचवलं आता आणखी एक सुपरस्टार तेच करतोय .

राजु हिराणी कॉपी मारतो.त्याचा 3 इडीयट dead poets socity चा बॉलीवुडी रिमेक आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 Dec 2014 - 4:29 pm | पिंपातला उंदीर

काय बी का जेपी राव . हिराणी इतरांच्या चित्रपटा नि influence होत असला तरी ३ इडिअट्स हा dead poets society वरून नाही ढापलेला काही . आदित्य चोप्राचा मोहोबत्ते ढापला आहे त्या विंग्रजी चित्रपटावरून . बाकी पीके हा K -Pax या चित्रपटावरून उचलला आहे . इच्छुकांनी या चित्रपटाची कथा
आंतरजालावर शोधून बघावी

जेपी's picture

20 Dec 2014 - 5:33 pm | जेपी

हम्म...आवरत घेतो.
पुन्हा मोहब्बते,3 इडीयट,बघा.
मला 3 इडीयट मध्ये dead poets socity दिसला.
चित्रपटाच ग्यान फक्त तुम्हालाच नाही.

पिंपातला उंदीर's picture

20 Dec 2014 - 5:40 pm | पिंपातला उंदीर

अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर

अवो ३ इडियट चेतन भगत च्या five point someone या कादंबरीवर आधारित होता . चित्रपटाच्या credit मध्ये पण त्याला श्रेय दिल होत . आम्ही पण आवरत घेतो तुम्हाला आवडत नसल तर .

बाकी dead poet society -मोहोब्बते साठी हे पण बघून घ्या

http://mtv.in.com/blogs/parent/just-in/9-absolutely-shocking-bollywood-r...

जेपी's picture

20 Dec 2014 - 5:56 pm | जेपी

हम्म...
ते आंतरजालीय मत वाचत नाही.
भग्गु जिथे स्वत:च चोरी करत फिरतो तिथे five point someone च काय घ्या.
( यापेक्षा जास्त न सांगणारा) जेपी

मंदार कात्रे's picture

21 Dec 2014 - 12:12 pm | मंदार कात्रे

चेतन भगत स्वतः आयाआयटी दिल्ली मध्ये शिकत असताना त्याना आलेल्या अनुभवावर आधारित असलेली ती कादंबरी आहे .

प्रसाद१९७१'s picture

22 Dec 2014 - 9:50 am | प्रसाद१९७१

चेतन भगत ज्या प्रकारचे साहीत्य पाडतो, त्यानी आयआयटीच्या निवड आणि शिक्षणपद्धातीच्या दर्जा बद्दल च शंका निर्माण होतात. त्याला आयआयटीने डीग्री काढुन घेउन बेदखल करावे, नाहीतर जगभरात आयआयटीची पत अजुन कमी होइल.

मंदार कात्रे's picture

21 Dec 2014 - 12:18 pm | मंदार कात्रे

मी काल थिएटर मध्ये पाहिला. सुमारे ६००/- रुपये तिकीट होते. बरा वाटला . एकदा पाहण्याच्या लायकीचा आहे.

पण मीच मूळ पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "माइल्स्टोन" वगैरे नाही. एलियन ची स्टोरी अधिक चांगल्या प्रकारे खुलवता आली असती. त्याऐवजी उगाचच देवा-धर्मावर घसरला आहे हिरानी!

एडिटिंग चा गोन्धळ आहेच! पण आमिर आणि इतरांची कामे चांगली झाली आहेत .

माझ्यातर्फे ३ / ५ स्टार्स

अर्धवटराव's picture

21 Dec 2014 - 12:43 pm | अर्धवटराव

किंबहुना कन्सेप्ट सॉलीड गंडला आहे. आमिरभौने अभिनय उत्तम केला आहे मात्र.
पेशावर कांडाचा काहि परिणाम होईल काय क्लायमॅक्सवर ? माहित नाहि.

खटपट्या's picture

21 Dec 2014 - 2:17 pm | खटपट्या

मी अत्ताच सिनेमा पाहून आलो. ओमायगॉड सारखाच आहे. नवीन काहीच नाही. परत हींदू मुस्लीम......
आमीर खाननी हींदू धर्मातल्या अनीष्ट रुढी, परंपरा, बुवाबाजीवर ताशेरे ओढले आहेत. पण मुस्लीम धर्मामधली बुवावाजी पधद्तशीर पणे टाळली आहे.
"मुसलमान धोका नही देता" हे तो ठासून सांगतो. मान्य आहे पण तो मुसलमान पाकीस्तानातील दाखवायची काय गरज होती ? भारतातील दाखवला असता तरी चालले असते. उगाच पाकीस्तानचे उदात्तीकरण कशाला ?
पटला नाही. उगाच सर्वधर्मसमभावाच्या तासाला बसल्यासारखे वाटले.

काळा पहाड's picture

21 Dec 2014 - 11:01 pm | काळा पहाड

१. पाकिस्तानी वकिलातीचे लोक उगाचच प्रेमळ, हसरे, नर्म विनोदी वगैरे दाखवलेत.
२. हिंदू बाबा मात्र व्हिलन दाखवलाय.
३. हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर टीका दाखवलीय. उदा: देवाच्या मूर्तीची बॅटरी लो झाल्यामुळं ती चमत्कार दाखवू शकत नाहीय, हिंदू पुजारी १०० रुपये काढून घेवून मग पर्स परत करतो, हिंदूंच्या मंदीरात चपला चोरीला जातातच, बाबाचे भक्तगण गुंड दाखवणे वगैरे. मुसलमानांचा व ख्रिस्च्नांचा उल्लेख फक्त हिंदूंकडून टीका होवू नये म्हणून वाटतो आणि अगदी तुरळक आहे.
४. "मुसलमान धोका नही देता!". हे कोण सांगतोय? एक एलियन. हिंदुस्तानला. काय जोक आहे.
५. हिंदूं गझनीच्या आक्रमणाचा उल्लेख करतात त्याची थट्टा दाखवलीय.
बाकी आठवलं तर लिहिनच.
या चित्रपटावरून आमीरखान बद्दल मत एकदम वाईट झालं. सेन्सॉर नं याला कसं पास केलं असंही वाटलं.

खटपट्या's picture

21 Dec 2014 - 11:21 pm | खटपट्या

१००% सहमत !!

प्रसाद१९७१'s picture

22 Dec 2014 - 9:52 am | प्रसाद१९७१

असल्या सिनेमांचे फायनांनसिंग कुठुन होते त्याचा शोध घेतला तर असे हिंदूंना खाली दाखवणारे सिनेमे का निघतात त्याचे उत्तर मिळेल.

काळा पहाड's picture

21 Dec 2014 - 11:03 pm | काळा पहाड

आणि हो, त्यात आमिर्खान विचारतो की जर परमेश्वर आकाशात आहे आणि मूर्तीत नाही तर मूर्ती करण्याची गरज काय आहे. अर्थातच हिंदू मूर्तीकार मूर्ख आणि दुष्ट असल्यानं उत्तर देवू शकतच नाहीत.

मंदार दिलीप जोशी's picture

22 Dec 2014 - 2:55 pm | मंदार दिलीप जोशी

जर का अल्लाह सगळीकडे आहे तर मुळात
(१) मशीदी असण्याची गरजच काय
(२) मक्केकडे तोंड करुन नमाज पढण्याची गरज काय? कुठल्याही दिशेकडे तोंड करुन कुठेही उभे/बसून नमाज पढावा.

मंदार दिलीप जोशी's picture

22 Dec 2014 - 2:56 pm | मंदार दिलीप जोशी

ही एक प्रकारची मूर्तीपूजाच नव्हे का? इस्लामला मूर्तीपूजा मान्य नसेल तर मग हे का?

त्यांनी त्यांच्या धर्माचे काहीही करावे, पण टिंगल मात्र आमच्याच धर्माची का करावी ? एखाद्या मशिदीच्या बाबतीत काही दॄष्य असते तर आत्ता पर्यंत फतवा निघाला देखील असता... आमचे हिंदू मूळातच सोशिक { की नेभळट ? } कोणीही या... राम , शंकर, गणपती इं देवतांची घंटी वाजवुन जा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

मंदार दिलीप जोशी's picture

22 Dec 2014 - 3:03 pm | मंदार दिलीप जोशी

संपूर्ण सहमत

सायबांनू, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आहे.. तेव्हा जरा तेवडं बघून टीका करावी.
बाकी आमीरएवजी समजा र्हितिक किंवा तो धाकटा बच्चन असता तर आपण काय त्याला पाखंडी वगैरे म्हणणार होता का?

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 6:11 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

आम्ही तसेही हिंदी सिनेमा बघत नाही....

आणि हे वाचले की, आपला निर्णय किती बरोबर आहे, हे पण समजते.

काळा पहाड's picture

22 Dec 2014 - 10:41 am | काळा पहाड

आमीर खान एका शंकरासारख्या ड्रेस परिधान केलेल्या व्यक्तीला कुल्फी खाताना पहातो आणि त्याला शंकर भगवान समजतो. नंतर शंकर भगवान टॉयलेटमध्ये शिरतो. आमीरखान त्याचा पाठलाग करत टॉयलेटमध्ये जातो आणि आतून कुलूप घालतो. नंतर आपला रिमोट देण्यासाठी शंकराचा पिच्छा पुरवतो. त्याची बखोटी पकडून त्याला जाब विचारतो. शंकर जवळच्या त्रिशूलाने कुलुप तोडतो आणि पळून जातो. नंतरची दृष्ये अशी आहेतः
१. शंकर ज्या स्टेज शो वर 'सर्वशक्तिमान' शंकर भगवान म्हणून जाणार असतो, तिथे तो धडपडत पोचून स्टेज वर साष्टांग नमस्कार घालतो. आमीरखान त्याचा पाठलाग चालू ठेवतो.
२. एका बाबाच्या प्रवचनात शंकर पाठलाग टाळण्यासाठी खुर्च्यांखालून लोकांच्या पायाखालून वाट काढताना दाखवलाय. आणि हा शॉट बराच चवीचवीने घेतल्यासारखा तब्बल मिनिटभर घेतलाय.

भृशुंडी's picture

23 Dec 2014 - 11:10 pm | भृशुंडी

बरं मग प्रॉब्लेम काय आहे?

काळा पहाड's picture

22 Dec 2014 - 10:48 am | काळा पहाड

शिवाचा पाठलागः
shiva being chased

काळा पहाड's picture

22 Dec 2014 - 10:58 am | काळा पहाड

सर्च करत असताना सापडलेली लिंकः आमीरखान विरूद्ध एफ आय आर.: शिवाला दोन मुसलमान स्त्रियांना बसलेली रिक्षा ओढताना दाखवलं.

http://indiatoday.intoday.in/story/fir-against-aamir-khan-for-hurting-re...

मंदार दिलीप जोशी's picture

22 Dec 2014 - 2:53 pm | मंदार दिलीप जोशी

http://5forty3.in/2014/12/pk-why-is-hinduism-a-blot-on-the-idea-of-india/

“Indian voting rights (given to Hindus) must be reconsidered” – Zoya Hasan, a professor of political science in JNU, had thundered in NDTV studios on the morning of May 16th this year when it was quite apparent that Narendra Modi would be the new Prime Minister of India. These days the only noise one hears from the opposition in Rajya Sabha, since the opposition is absent in Lok Sabha, is on topics concerning some “reconversions” by a vague Hindu outfit or about a stray ruling party MP making some bombastic comments on some trivial religious matters. Over the last month, maximum airtime on various media platforms was allocated to a ‘colloquial’ mis-comment by a junior minister in the central government which was a classic case of making a mountain out of a molehill.

For the last 2-odd years there has been this constant theme running in the background which keeps harping about the “Idea of India”. There have been various subtle, not-so-subtle and in-your-face attempts to constantly remind us that either Hinduism is rogue or that ordinary Hindus need to be apologetic about the supposed ‘excesses’ of their religion on the whole and certain co-religionists in particular. Over the last few years, especially under constant ridicule and persistent attack have been religious figures, Hindu Matths and those termed derisively as ‘Godmen’ by the media.

This continuous messaging is having little impact as urban middle classes have not yet developed a ‘healthy’ distaste towards Hindu religious symbols, especially the so-called ‘Godmen’. Realizing that relentless bombardment on 24/7 news channels against various babas from Nithyanandas to Asharam Bapus to Rampals is not enough to change the Hindu psyche, more creative folks are now getting into this business of dissing Hindu systems. Now the messaging is more subtle, underplayed and laced with humour so that it makes a deeper impact on urban India.

pk_motion_amir_khan_poster

An alien who looks exactly like us humans lands in the deserts of Rajasthan only to be robbed of his “remote”, which connects him to his mother ship. Meanwhile an Indian girl falls in love with who else but a Pakistani boy in Belgium – this is an important template for Bollywood to show its proverbial middle finger to all those ‘silly Hindu fanatics’ who harp about LOVE JIHAD, so every right thinking, no strike that, every Left-thinking Indian woman must dutifully fall in Love with a Pakistani guy. The girl’s father objects to this union because, hold your breath, he is an undying bhakt of a Hindu Godman who keeps lecturing about Mohammad Ghazni’s invasion of India. Our poor Godmen simply refuse to understand that Hindu girls have this ‘inherent craving’ for Pakistani men who are such nice, soft spoken, caring gentlemen without a religiously violent hair on their waxed and tanned bodies. Can’t these Godmen see how we as a nation collectively trend #IndiaWithPakistan when those non-violent Pakistani men murder 150 young kids in a school in Peshawar?

Due to a tragic twist of fate, the unsuspecting Indian girl believes that her Pakistani boyfriend has ditched her at the altar, so she returns back home to the big bad lands of India infested with too many Hindu temples and Hindu Godmen and, well, Hindu men and women (oh why can’t India just be another Pakistan with those nice, non-violent Pakistani men?). Here in India the alien (played by the redoubtable host of Satya Meva Jayate) has started circulating “Missing” pamphlets with pictures of various Hindu Gods because he believes the Hindu Gods are responsible for his missing remote. He even visits Hindu temples but chain locks his slippers at the gates because, you guessed it right, all Hindu devotees are thieves who rob slippers – in the Rajkumar Hirani universe Hinduism is totally infested with thievery and nothing but thievery, everything else is merely the figment of Hindu imagination.

Over the next 2 hours, PK keeps going in circles just to progressively caricaturize Hindu temples, Hindu Gods and Hindu Godmen (to be sure, there are but some fleeting references to other religions too but then you would have missed them by the time you would have blinked and yawned in between). Then, after every aspect of Hinduism is ridiculed and the audience is sufficiently frustrated with the religion to dash out of the cinema hall and race into the nearest church/masjid to immediately get converted, we unhurriedly reach the climax when there is finally a bomb blast and the TV newscaster informs us that some people of an unknown “kaum” (religion) have taken the responsibility for the blast. What religion could that be? Shhh! don’t ask, some questions are best kept under wraps… okay, let’s get back to Hindu bashing then.

So, in the climactic TV studio confrontation between a Hindu Godman and the alien… wait, by the way, did we tell you that the left-thinking woman who returned back from Belgium after her supposedly “failed” love affair with that nice, non-violent Pakistani boy has now joined a TV news channel as an anchor? Oh she has, and, now we know why our TV News anchors have such a tender soft spot for anything that has a Pakistani label on it. Anyway, so, in the climactic TV studio confrontation between a Hindu Godman and the alien, the alien emerges victorious!!! What a relief! In fact, the alien defeats the Godman by telling the whole truth to the girl (who is now the TV news anchor and had fallen in love in Belgium with a soft spoken, nice, non-violent… okay fine, it was Anushka Sharma with her recently acquired shark-like lips, there I said it finally!). The whole but simple truth is this – the Pakistani boy hadn’t ditched her after all, and, has been in fact waiting for 2 years in Lahore with bated breath for a call from her.

Moral of the story? It’s simple you idiots, all Hindu Godmen, Hindu Gods (and Hindu men for that matter) are thugs and thieves, so in Pakistanis we must trust.

पिच्चर च्या धाग्यावर धर्मा ची चर्चा?
जाऊद्या काय बोलायचीपण सोय नाय.

वेल्लाभट's picture

22 Dec 2014 - 3:59 pm | वेल्लाभट

कळतच नाही चायला बघू की नको !

बॅटमॅन's picture

22 Dec 2014 - 6:30 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो. शेवटी आरूनफिरून फक्त हिंदू धर्मावरच टीका असेल तर बघण्यात वट्ट काही प्वाइंट नाही.

सव्यसाची's picture

22 Dec 2014 - 6:44 pm | सव्यसाची

पीके हा चित्रपट परवा पाहिला.
मुळातच या चित्रपटाकडून माझ्या काही खास अश्या अपेक्षा नसल्याकारणाने खूप जास्ती निराशा होणार नव्हती. तरीही थोडीबहुत निराशा झालीच.
मध्यंतरापर्यंतचा चित्रपट उत्तम नसला तरी बरा नक्कीच आहे. पीके उभा करण्यामध्ये यातील बराच वेळ जातो. छोट्या छोट्या गोष्टी आवडत जातात. पण एकंदरीत परिणाम कमीच होतो. मध्यंतरानंतर चित्रपट कोणत्या दिशेला चालला आहे याची जाणीव होतेच. पण त्यातही एवढे नाट्य करायची गरज होती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. Oh! My God आपण परत पाहत तरी नाही ना असा काहीसा फील येत राहतो. चित्रपटाचा climax इतका नाट्यपूर्ण आणि अतिरंजित असेल असे त्या क्षणाला येईपर्यंत सुद्धा वाटत नाही. नंतर कधी एकदा चित्रपट संपतो असे होत राहते.
एकंदरीतच संकलन करताना कमी पडले आहेत असे वाटले. अभिनयाचे बोलायचे झाले तर आमिर खान ने चांगला अभिनय केला आहे. चित्रपटातील गाणी चांगली असली तरी अश्याच चाली आपण राजकुमार हिरानी यांच्या इतर चित्रपटामध्ये ऐकल्या आहेत. झुबी झुबी आणि लव इस भेस्ट ऑफ टाईम याच्या मुखड्या मध्ये खूपच सारखेपणा जाणवतो.
मला अजूनही कळत नाही कि एखाद्या live show मध्ये लोक अगदी बेल्जिअम पासून ते पाकीस्तान पर्यंत एकमेकांना फोन कसे काय करू शकतात? हे सर्व टीवी वरती सुरु असताना सगळ्या शहरांमधून लोक टीवीच्या दुकानाबाहेर हा कार्यक्रम पाहत उभे आहेत. हे तरी का सगळ्या चित्रपटातून दाखवतात? टीवी हे एकच माध्यम आहे का जे चित्रपटामधून दाखवले जाऊ शकते?
आम्ही काही तरी 'वेगळे' करत आहोत असे म्हणणारे दिग्दर्शक शेवटी 'तेच तेच' तर करत नाहीत ना असा एक प्रश्न पडला आहे की वेगळेपणा एक नवा cliche झालाय?

इथली चर्चा वाचून अशा अजून १० चित्रपटांची गरज आहे हे पटतंय.

रेवती's picture

22 Dec 2014 - 9:19 pm | रेवती

का कोणास ठाऊक, हा शिनेमा पहावा असे अजून फारसे वाटत नाहीये. त्यातून पेप्रात ष्टोरी बर्‍यापैकी छापल्याने दोनेक महिन्यांनी पाहिला तरी चालेलसे वाट्टेय.

खटपट्या's picture

22 Dec 2014 - 10:42 pm | खटपट्या

आमीर खान बद्द्ल मत फारसं चांगलं नव्हतंच !!
चित्रपट पाहील्यावर तो पक्का दांभिक आहे यावर शिक्कामोर्तब झालं !!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

@तो पक्का दांभिक आहे >>> ++++++++++११११११११११११११
भारतात अश्या मुस्लिमांना (शबाना आझ्मी..जावेद अख्तर) राजकीय्/सामाजिक दृष्ट्या सुधारणावादी/तरक्कीपसंद असा शब्द वापरला जातो.
आणि असगर अली इंजिनीयर सारख्या (मक्काकालिन डोमकावळ्यांना) मुस्लिमांना "सेक्युलर मुस्लिम(?)" म्हणतात.

शिनेमा पाहून कसं बुवा समजलं? दिग्दर्शक सांगेल तसेच या नट्/नट्यांना करावे लागत असेल ना! आणि नुकताच एक धागा येऊन गेलाय ना, की आपण सगळेच थोडेफार दांभिक असतो म्हणून! मग आमिरलाही आपले म्हणा ना!

खटपट्या's picture

23 Dec 2014 - 6:29 am | खटपट्या

पट्कथा लेखक आणि दिग्दर्शक हिरानी असला तरी या दोन्ही क्षेत्रात आमीर खान बर्यापैकी लूड्बूड करून सोकॉल्ड परफेक्ट्नेस आणायचा प्रयत्न करत असतो.

असाही पटकथा पट्ल्याशीवाय काम करतच नसणार मीस्टर परफेक्ट.
दांभीक या साठी म्हणालो की स्वतःच्या धर्मातले दोष दाखवत नाहीये. त्याच्या धर्मामधे बुवाबाजी आहेच की. तीही दाखावायला हवी होती. आपले ठेवायचं झाकून.....

मला तर सत्यमेव जयतेचा मोठा एपीसोड वाटला.

बाकी आमीरला आपला म्हणायल माझी ना नाही :)

रेवती's picture

23 Dec 2014 - 6:57 am | रेवती

हम्म....

बाळ सप्रे's picture

23 Dec 2014 - 11:47 am | बाळ सप्रे

टीका फक्त हिंदू धर्मावर होते अशा विचाराने कंटाळलेल्यांसाठी..
मुख्यतः ख्रिश्चन व मुस्लिम धर्मावरील टीका पहाण्यासाठी काही फेसबुक पेजच्या लिंका..

https://www.facebook.com/faithtoreason
https://www.facebook.com/pages/Nonsense-from-the-Bible/171401609662944
https://www.facebook.com/AtheistRepublic

अवतार's picture

23 Dec 2014 - 7:05 pm | अवतार

प्रबोधन करणे आणि प्रबोधनाचा धंदा करणे ह्यात फरक असणारच !

मात्र फार दिवसांनी फारच क्युट अनुष्का आणि दुसरा मुलगा कोण माहित नाही हा पण फार क्युट त्यांचा फार सुंदर रोमान्स बघितला म्हणजे ते रोमँटिक गाण सुंदर चुंबन बघुन मोहरुन गेलो.
इनोसंट अतिशय इनोसंट रोमान्स क्युट सगळे पैसे वसुल
आणि काहि सुंदर जुनी गाणी
सुंदर सिनेमॅटोग्राफी
बाकी सर्व नेहमीचच
कलाकार नेहमीचेच यशस्वी अशी आपल्याकडे नाटकांची एक खडुस टिपीकल जाहिरात असते.
तस म्हणायच तर
बाकि सगळ नेहमीचंच वेगळ वाटल ते म्हणजे क्युट इनोसंट रोमॅटिक सीन्स इन्क्लुडिंग किस
आणि एक अनुष्का मुळात इतकी सुंदर गोड आहे तिला जो मेकओव्हर करुन दिला तो बहुधा तिला कुरुप करण्याचा
मॅक्सिमम प्रयत्न होता. पण तिच सौंदर्य त्या सर्वांवर मात करुन वरचढ ठरल
ला ग्रँडे बेलेज्झा द ग्रेट ब्युटी

व ते कोरस मध्ये काहि तरी फार क्युट गातात सुरावटी सारख
एकदाच बघितल्याने लक्षात नाही राहिल पण
मन ते परत ऐकण्या बघण्यासाठी आतुर झालय
एकदम ब्युटिफुल ग्रेट
सुं द र

भृशुंडी's picture

23 Dec 2014 - 11:08 pm | भृशुंडी

कसलं जबरदस्त झोडलं आहे प्रतिक्रियेत पीकेला!
त्यातल्या कथा/अभिनय किंवा मूळ कल्पना यावरचे आक्षेप नक्कीच योग्य आहेत.
हिंदू ध्रर्मविरोधी वगैरे म्हणणारे बहुतेक चित्रपट न बघताच किंवा आपला धर्माचा चष्मा लावून चित्रपट पहात असावेत.
नाहीतर त्यातली इतर दृष्यं वगळते ना. आता बाकीच्या धर्मांत असले बुवा/गुरू/माता यांचं पेव फुटलंय आणि त्यांना विरोध करायचाय तर तुम्ही काढा की त्यावर चित्रपट! कोण नाही म्हणतोय? उगाच ठिगळं लावल्यासारखे आरोप बघितले की अति झालं आणि हसू आलं असा प्रकार होतोय.
मुळात ज्यात त्यात हे हिंदू धर्म बिर्म घुसडवायची भयानक सवय लागलीये असं वाटतंय. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे, एवढं आक्षेपार्ह वाटतंय तर बघू नका. पण मुद्दा सोडून वाट्टेल ते खुसपट काढण्यात काय हशील आहे?

असो. त्रागा अस्थानी आहे तेव्हा येंजॉय!

मराठी_माणूस's picture

24 Dec 2014 - 11:47 am | मराठी_माणूस

काही प्रतिक्रिया वाचुन खालील कविता आठवली , त्या धर्तीवर "माझे तर मनोरंजन होते , मला काय त्याचे"

http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5516932522461902735...

तर्री's picture

25 Dec 2014 - 10:34 pm | तर्री

खानावळीचे सिनेमे पाहणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भारताच्या शत्रूंना आणि ड्रग माफियांना मदत करणे हे माझे वैयक्तिक मत आहे तेंव्हा दमड्या मोजून "ह्यांचे" सिनेमे पाहणे ह्या जन्मी होणे नाही.

मंदार दिलीप जोशी's picture

26 Dec 2014 - 12:53 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन

मराठी_माणूस's picture

26 Dec 2014 - 11:52 am | मराठी_माणूस

भारताच्या शत्रूंना आणि ड्रग माफियांना .......

हे तुमचे मत कशावरुन झाले

हे आकलन वाचन , अनुभव आणि विचार ह्यामधून तयार झाले आहे. ते मत सर्वमान्य असावे असे माझे मुळीच म्हणणे नाही.सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत.
उदा . काश्मिरी पंडितांचे काश्मिरात पुनर्वसन आणि निर्भय पणे वावर करण्याविषयी "बुद्धिमान आणि खान" लोकांचे काय मत आहे ? ह्याचा विचार करावा. ह्याचा पी.के. शी काय संबध असा प्रश्न पडला तर माझ्या दोनीही प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे तथा फाट्यावर मारावे.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 10:35 pm | टवाळ कार्टा

काश्मिरी पंडितांचे काश्मिरात पुनर्वसन

मला वाटत नाही यापुढे ते शक्य आहे...आणि कोणी करायचे म्हटले तरी पंडित आता तिथे परत जाणार नाहीत (मी तरी जाउच नये म्हणेन)

तर्री's picture

26 Dec 2014 - 11:05 pm | तर्री

कठीण आहे हे मान्य पण अशक्य काहीही नाही . मोदी पंतप्रधान झाले , क्रूड ओईल ६० रुपयांवर आले ह्या गोष्टी वर्ष्याच्या सुरवातीला अशक्य वाटल्या होत्या.

एखादा धर्म आंतर्विरोधमुळे संपुष्टात येईल का ? हा विचार आज अतिशयोक्ती वाटत असला तरीही अशक्य नाही. एका धर्मामधील नवतरुण स्त्री वर्ग "अभय" मिळाले तर एका रात्रीत धर्मत्याग करेल हे कानोसा घेतल्यास समजून येईल.

पीके मे आमीर ने ये कहा की एक लोटा दुध (किमत २०रु.) अगर शिवजी को चढाने के बजाय किसी गरीब को दे तो उसका पेट भर जाएगा !
इस पर मेरा निवेदन है की आप लोक पीके ही न देखने जाये | १ टिकट का २०० रुपया. सोचो हम सब मिलकर कितने भुखों का पेट भर सकते है |

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:10 pm | टवाळ कार्टा

आपण दोन्हीसुध्धा करु शकतो की

पीके बघणारे लोक संख्येने पिंडीवर दूध ओतणार्यांच्या संख्येपेक्षा कदाचीत ५० पट कमी असतील

धर्मराजमुटके's picture

26 Dec 2014 - 4:15 pm | धर्मराजमुटके

पीके बघणारे लोक संख्येने पिंडीवर दूध ओतणार्यांच्या संख्येपेक्षा कदाचीत ५० पट कमी असतील
पण पीके बघायला तिकिटाचे रु. २०० लागतात. एवढ्या पैशात १० लोक दुध ओतू शकतात.
मी स्वतः कधी दुध ओतले नाहि आणि पीके पण बघीतला नाही. म्हणजे २२० रु. ची बचत. :)

काळा पहाड's picture

26 Dec 2014 - 4:20 pm | काळा पहाड

पुण्यात तिकीट ३०० रुपये आहे. आईसक्रीम, चकणा, समोसा, कोक वगैरे गोष्टीसाठी आणि १००. प्रतिव्यक्ती २० लोक दूध पितील.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:36 pm | टवाळ कार्टा

छानच ना...२२० रु. वाचले...पण http://misalpav.com/comment/reply/29762/644386 इथे लिहिल्याप्रमाणे त्या वाचलेल्या २२० पैकी २० तरी कोणा भुकेल्याला खायला खर्च केलेत का?...उत्तर नाही असेल तर तिथेच आपल्या देशात देवळात दुधा-तुपाचे अभिषेक होताना त्याच देवळाबाहेर भुकेले गरीब लोक का दिसतात याचे उत्तर मिळेल

माझ्यापुरते तरी....माझ्या घरातला कचरा दाखवणारा स्वतः कचर्याच्या ढिगात बसलेला असेल तरी त्याला उपदेश करण्या अगोदर मी माझे घर स्वच्छ करेन आणि त्या नंतर त्याला त्याच्या परिस्थितीबद्दल सुनावेन...नाहितर
त्याच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला

नाही हो. मी सध्या फक्त ब्यांकेवाल्यांची पोटं भरतोय. काय करणार डोक्यावर कर्ज आहे ना. :)
आणि वर दिलेल्या लिंकमधे माझे मत नाहिये हो. विषय मी लिहिलाय की "व्हॉटसअप फिरत आलेला एक मेसेज" म्हणून.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:50 pm | टवाळ कार्टा

वर दिलेल्या लिंकमधे माझे मत नाहिये हो. विषय मी लिहिलाय की "व्हॉटसअप फिरत आलेला एक मेसेज" म्हणून

हे समजले मला.... :)

माझा १कच प्रश्न आहे कि सगळे असे व्हॉटसअप फिरत असलेले मेसेज आरामात दुसर्यांना पाठवतो पण याचा का विचार करत नाही कि तो विचार आपल्याला पटतो की नाही...आणि नसेल पटत तर ती चेन आपल्यापुरती खंडीत करावी

कोणाला माहीत की तो मेसेज खरच इथल्या कोणी बनवलाय की बाजूच्या देशातून आलाय

ते शेजारच्या देशांतले वायझेड लो़क काहिही करू शकतात

नाही. मी असे मेसेज कधीही व्हॉटसपवर फॉरवर्ड करीत नाही. अगदीच भारी विनोद असेल तर तोच दुसर्‍यांना पाठवतो. या धाग्यापुरते बोलायचे झाल्यास आमीर खानने दिलेला पीकेमधील मेसेज आणि व्हॉटसपवर आलेले मेसेज दोन्हीही विनोदीच आहेत म्हणूनच मी ते इथे लिहिलेयत.
आणि "शेवटी काय ? तर हमाम मे सब नंगे आहेत. कुणी कुणाला शिकविण्यात काही अर्थ नाहिये." असेही प्रतिसादात नमूद केले आहेच की.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 5:09 pm | टवाळ कार्टा

आणि "शेवटी काय ? तर हमाम मे सब नंगे आहेत. कुणी कुणाला शिकविण्यात काही अर्थ नाहिये." असेही प्रतिसादात नमूद केले आहेच की.

हे बाकी खरे आहे

धर्मराजमुटके's picture

26 Dec 2014 - 4:28 pm | धर्मराजमुटके

१०० करोडच्या देशात ८०% हिंदू
त्यात शैव संप्रदायवाले अगदी ४०% जरी धरले तरी ती संख्या होते ३-३२ करोड. त्यातील किती % लोक दुधाचा अभिषेक करत असतील ? रोज करत असतील काय ? की फक्त शिवरात्रीला करतात ? की फक्त दर सोमवारी करतात ?
एक लोटा म्हणजे किती ? आमीर च्या डायलॉगप्रमाणे वीस रु. म्हणजे जवळजवळ १/२ लीटर दुध. सगळेजण १/२ लीटर दुध ओतत असतील काय ? की कमीजास्त ?
समजा पीके आणि ओएमजी सारखे (सो कॉल्ड) प्रबोधनात्मक चित्रपट बघून लोक जवळजवळ ३०० करोड वाया घालवितात.

सगळीकडून हिशोब केला तर काय हाती लागते ?
अवांतर : हॉटेलमधे जाऊन २०० रु. चे जेवण मागवून त्यातील १०% जेवण वाया घालविणारी मंडळी कित्येक आहेत. मग कोण जास्त गुन्हेगार ?

शेवटी काय ? तर हमाम मे सब नंगे आहेत. कुणी कुणाला शिकविण्यात काही अर्थ नाहिये.

धर्मराजमुटके's picture

26 Dec 2014 - 4:29 pm | धर्मराजमुटके

हे ३० ते ३२ करोड असे वाचावे.

धर्मातील निरुपयोगी गोष्टींची चिकित्सा या विषयात कुणालाच रस नाहिये. कदाचित हिरानीला देखिल नसावा !!

क्लिंटन's picture

26 Dec 2014 - 5:00 pm | क्लिंटन

कालच चित्रपट बघितला. हिंदी (किंवा कुठल्याही भाषेतील) चित्रपट बघणे हे माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष माणसाच्या आवडीचे काम नाही. तरीही हिलरी घेऊन जाते तेव्हा चित्रपट बघणे हे माझे काम. असो.

चित्रपटावरील फेसबुकवर आणि इतर सर्व ठिकाणी केली जाणारी टिका अनाठायी आहे असे माझे मत चित्रपट बघून झाले आहे. देवाला 'फोन' लावताना 'राँग नंबर' म्हणजे थोडक्यात भक्त आणि देव यात कोणी मध्यस्थ नकोत हे आपल्याच समाजातील अनेक धुरीणांनी सांगितले आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक त्या धुरीणांच्या पंगतीत जाऊन बसणारा आहे असल्या वेडगळ कल्पना मी तरी बाळगत नाही तरी त्यात अशा काही गोष्टी दाखविल्या असतील तर इतके हिरवेपिवळे व्हायची गरज आहे असे वाटत नाही. जर हिंदू धर्म (किंवा जीवनपध्दती) गझनीच्या महंमदासारख्यांच्या आक्रमणानंतरही टिकून असेल तर असल्या लहानसहान चित्रपटांमुळे त्यावर किंचितही ओरखडा उठायची सुतराम शक्यता नाही.

दुसरे म्हणजे केवळ दुबळे लोक देवळात जातात हे मत अनेक लोकांचे असते.केवळ दुबळे लोकच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) देवळात जातात असे मला तरी वाटत नाही.तरीही माझ्या मतांविरूध्द असलेले एक मत म्हणून त्या मताविषयी परमतसहिष्णूता नक्कीच आहे. असे काही चित्रपटात म्हटले आहे म्हणजे हिंदू धर्माचा अपमान झाला वगैरे लोक कसे म्हणू शकतात हेच कळत नाही.

तिसरे म्हणजे जर हिंदू संस्कृती इतकी सहिष्णू आहे की चार्वाकासारख्यालाही देवळात बसूनच आपले विचार मांडायची संधी दिली आणि त्या विचारांना हिंदू धर्मातील दर्शनांपैकी एक इतके महत्वाचे स्थान दिले गेले आहे वगैरे एकीकडे म्हणणार्‍या लोकांनी देवाच्या मूर्तीमध्ये ट्रान्स्मिटर कुठे आहे आणि आपण जे काही या मूर्तीकडे मागतो ते देवापर्यंत कसे पोहोचेल असे प्रश्न विचारणार्‍यांना तसे प्रश्न विचारायचा अधिकार आहे हे मान्य करण्याइतका सहिष्णूपणा नक्कीच दाखवावा अशी अपेक्षा केल्यास त्यात फार काही चुकीचे आहे असे वाटत नाही.

चौथे म्हणजे चित्रपटात कुठेही तुम्ही हिंदू धर्म सोडा अशा स्वरूपाचा उल्लेख नाही की तसा संदेशही नाही.किंबहुना हिंदूंचे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करतात त्याविरूध्दच उल्लेख आहे. आणि पीके दारूच्या बाटल्या घेऊन मशीदीत जात असताना त्याच्यावर हल्ला करायला मागे लागलेले मुसलमानही दाखविले आहेतच. इतकेच काय तर धर्माच्या नावावर आणि आपल्या 'कौम' साठी स्टेशनवर बॉम्बस्फोट झालेलाही दाखविला आहे.मग टिकाकारांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? उगीचच आपल्या कल्पनेतून नसलेले प्रश्न निर्माण करायचे आणि तोच त्या चित्रपटाचा उद्देश आहे असे छातीठोकपणे सांगत विनाकारण राळ उठवायची असले प्रकार मला तरी नक्कीच पटत नाहीत.

पाचवे म्हणजे या चित्रपटातून मुळात हिंदू धर्मावर टिका केली आहे असे मला मुळीसुध्दा वाटले नाही.क्षणभर समजून चालू की अशी टिका खरोखरच केली आहे. तरी आपल्याच तुकाराम महाराजांनी 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले आहेच की. एक समाज म्हणून अशा टिकेकडे आपण अधिक प्रगल्भपणे बघू शकत नाही का?

गेले काही दिवस फेसबुकवर या चित्रपटाविरूध्द इतके काही बघितले आहे की विचारूच नका.त्यात सुब्रमण्यम स्वामी सामील झाले यात विशेष आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही पण त्यात फ्रॅन्कॉईस गॉटियरसारखाही सामील झाला याचे आश्चर्य नक्कीच वाटले.

असो. जर का हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे वगैरे वाटत असेल तर ते मनातून काढून टाका ही विनंती आणि खुल्या मनाने हा चित्रपट बघा आणि खरोखरच त्यात हिंदू धर्मविरोधी काही वाटले तर ती तुमची मर्जी.पण इतरांनी सांगितलेल्या, फेसबुकवर कुठेतरी वाचलेल्या मतावर गतानुगतिक होऊन चित्रपट बघायचा निर्णय बदलू नका इतके नक्कीच लिहितो.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 5:11 pm | टवाळ कार्टा

\m/

काळा पहाड's picture

26 Dec 2014 - 10:38 pm | काळा पहाड

जर का हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे वगैरे वाटत असेल तर

हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे याचे सरळ पुरावे देता येणार नाहीत हे तर उघडच आहे. तीच तर हुशारी आहे. काही गोष्टी या अशा प्रकारे दाखवण्यात आल्यात की त्यावर बोट पण ठेवता येणार नाही आणि त्या मागची जळजळ तर व्यक्त होईल. उदाहरणार्थ, शंकराला लोकांच्या पायातून वाट काढताना दाखवलंय. आम्ही हिंदू लोक देवाचं दर्शन घेताना चप्पल काढून दर्शन घेतो. त्याच देवाच्या वेषातल्या व्यक्तीला कशा प्रकारे दाखवलंय ते तुम्ही मी आधी पोस्ट केलेल्या चित्रात पण पाहू शकता.

तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या चित्रपटात असणार्‍या बर्‍याच गोष्टी या बहुधा खर्‍याच आहेत. फक्त हे कोणी सांगावं या बद्दल प्रॉब्लेम आहे. या चित्रपटाचा कर्ता धर्ता आमीरच आहे (वि.वि.चोप्रा आणि हिरानीनं कितिही सांगितलं तरी आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटात लुडबूड करण्याची आणि पटकथा आणि डिटेल्स बदलण्याची त्याला सवय आहे आणि मि. परफेक्शनिस्ट या टॅगखाली तो त्याचं समर्थन ही करतो. मागच्या काही चित्रपटांबाबतीत तर त्याचे निर्माते व दिग्दर्शक या बाबतीत त्याचा अतिरेक सांगतायत आणि या चित्रपटाबद्दल सुद्धा वेगळं काही झालेलं असेल असं नाही). असं असताना मी हा चित्रपट हज यात्रेला जावून आलेला एक खान सांगतोय असं पाहिलं तर नवल काय?

बाकीही बर्‍याच गोष्टी आहेत. लव्ह जिहाद हा इश्श्यू तर आहेच. पण पाकिस्तानी हीरो दाखवायचं काय कारण होतं? की आम्ही भारतीय पाकिस्तानी लोकांवर फार प्रेम करतोय असं आमीर ला वाटतंय? प्रत्येक पाकिस्तानीला ठार करावं असंच बहुतांश भारतीयांचं मत असेल. तेव्हा आमीरला हा चित्रपट पाकिस्तानात रिलिज करायचाय हे उघड आहे. भारतीय येडे लोक कसाही चित्रपट बनवा, पाहणारच. तेव्हा प्रॉफिट मॅक्झीमायझेशन साठी त्याला तिकडचं पण मार्केट टॅप करायचंय हे उघड आहे.

तेव्हा आता आमच्या देवांवर पाकिस्तानी लोक हसणार आहेत.

तुम्हाला याबाबत खंत वाटो न वाटो आम्हाला वाटते.

क्लिंटन's picture

27 Dec 2014 - 10:29 am | क्लिंटन

हा चित्रपट हिंदू धर्मविरोधी आहे याचे सरळ पुरावे देता येणार नाहीत हे तर उघडच आहे. तीच तर हुशारी आहे.

हे वाचून एका गोष्टीची आठवण झाली.नरेंद्र मोदींना एस.आय.टी ने क्लीन चीट दिल्यानंतर मोदीद्वेष्ट्यांनी "मोदी किती हुषार ते पुरावा कसा मागे सोडतील" अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.त्या वक्तव्यात आणि यात मला तरी गुणात्मक काहीच फरक दिसत नाही.म्हणजे हा चित्रपट हिंदू विरोधीच आहे (किंवा मोदींचा दंगलीत हात होताच) अशा स्वरूपाचे अनुमान आपण स्वतः आधीच बांधायचे आणि इतर सर्व गोष्टी त्यात फिट करायचा प्रयत्न करायचा.आणि ते न जमल्यास "तीच तर हुषारी आहे अशा गोष्टींचा पुरावा थोडीच मिळतो" म्हणून पळून जायचे अशा स्वरूपाचे प्रकार दोन्ही ठिकाणी दिसतात. असो.

शंकराला लोकांच्या पायातून वाट काढताना दाखवलंय.

तो खरोखरच शंकर होता असे तुम्हाला वाटत असले तर शिरसाष्टांग प्रणिपात स्विकारा. अहो कुठलाश्या नाटकात शंकराचे काम करणारे पात्र होते ते. त्याने लोकांच्या पायातून वाट काढली म्हणजे खरोखरच्या शंकराने तसे केले का? राम नगरकरांच्या रामनगरी या एकपात्री कार्यक्रमात एक उल्लेख आहे.त्यांच्या ग्रुपमधला नाटकात शिवाजी महाराजांचे काम करणारा माणूस जिरेटोप,तलवार, दाढी वगैरे पेहराव न उतरवता पानवाल्याच्या दुकानावर गेला.म्हणजे खरोखरचे शिवाजी महाराज पानवाल्याच्या दुकानावर जाऊन तिथे टीपी करायचे असा त्याचा अर्थ होतो का? समजा अशा कोणत्यातरी नाटकात शंकराचे काम करणार्‍या पात्रासमोर नाग आला आणि फणा काढून उभा राहिला तर त्याची घाबरगुंडी उडणार नाही का?त्याने स्टेजवरून समजा पळ काढला तर त्याचे काय चुकले?की तुम्ही परत म्हणणार अरे तू तर शंकर आहेस. तुझ्या गळ्यात नाग आहे मग नागाला कसे काय घाबरतोस? बघा कसा शंकराचा अपमान झाला!! या असल्या बोलण्याला काय अर्थ आहे?

तेव्हा आता आमच्या देवांवर पाकिस्तानी लोक हसणार आहेत.
तुम्हाला याबाबत खंत वाटो न वाटो आम्हाला वाटते.

वा काय परिक्षक नेमला आहात.अगदी तुम्हाला अभिप्रेत असतील तसे देव दाखवले तर त्यावर पाकिस्तानी लोक हसणार नाहीत का?या असल्या अडाणी लोकांनी जर आमच्या कोणत्याही गोष्टीचे कौतुक केले तर नक्कीच खंत वाटेल कारण ते लोक अ‍ॅप्रिशिएट करत आहेत याचाच अर्थ काहीतरी चुकत आहे.त्याउलट जर अशा लोकांनी आमच्या गोष्टीवर टिका केली तर आपण योग्य मार्गावर आहोत याची त्यापेक्षा मोठी पावती नसेल. उगीच नसलेल्या गोष्टींचा इश्यू का करता?

टवाळ कार्टा's picture

27 Dec 2014 - 11:13 am | टवाळ कार्टा

हे नाही शिरणार डोक्यात

काळा पहाड's picture

27 Dec 2014 - 6:27 pm | काळा पहाड

तो खरोखरच शंकर होता असे तुम्हाला वाटत असले तर शिरसाष्टांग प्रणिपात स्विकारा.

महाराज, मी काय सांगतोय ते जरा लक्षात घ्या. इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार. मी हे सांगतोय की एक मुसलमान (त्यातही हाजी) हे काँन्टेन्ट त्याच्या फायद्याकरता ट्विस्ट करतोय.

तुमच्या बाकी आक्षेपांबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. मी मोदीभक्त पण नाही आणि आर एस एस मध्ये पण नाही. मी एक साधा हिंदू आहे आणि माझे राग, लोभ इत्यादी त्यानुसार आहे. याआधी मी आमीरखानचे चित्रपट (थोडेसे बोर वाटले तरी आणि तो खान असल्याची बाब इग्नोअर करून) पाहिले आहेत पण या एकाच चित्रपटाने माझा दृष्टीकोन असा बदलला आहे. त्याने उगीच माझ्या धर्मावर हल्ला केला आहे असं माझं मत आहे. त्याचे पुढचे चित्रपट मी आता पहाणार नाही.

जाता जाता, मी स्वतः बाय ब्रेन अथेइस्ट आणि बाय हार्ट हिंदू आहे. मला हे ही माहिती आहे की विश्व आस्तित्वात आलंय तो बहुधा parallel universe मधल्या असंख्य bubbles पैकी एक bubble आहे आणि weak anthropic principle नुसार आपण यात असणं ही बहुदा एक random event आहे आणि बहुधा त्यात देवाचा काहीच भाग नाहिये. पण ते अलाहिदा.

क्लिंटन's picture

27 Dec 2014 - 8:20 pm | क्लिंटन

तुमच्या माझ्यामताविरूध्द असलेल्या मताचा आदर आहेच. मी पण मोदीभक्त नाही तर मोदी समर्थक नक्कीच आहे.(तरीही गेल्या काही महिन्यात अनेकांकडून मोदीभक्त हे बिरूद मिळाल्यामुळे मी पण वरील प्रतिसादात मोदी विरोधक ऐवजी मोदीद्वेष्टे म्हणायचे पोएटिक लायसेन्स घेतले :) ) आणि आर.एस.एस मध्येही नाही.मी बाय ब्रेन माणूस आहे आणि बाय हार्ट बिलिव्हर आहे.मला एकच गोष्ट माहित आहे की माझा ज्या गोष्टीवर विश्वास आहे तो विश्वास आणि ती गोष्टही इतकी लेचीपेची किंवा कचकड्याने बनलेली नाही की असल्या लहानसहान चित्रपटांमुळे त्यावर काही परिणाम व्हावा.असो. तेव्हा let's agree to disagree.

थॉर माणूस's picture

29 Dec 2014 - 3:10 pm | थॉर माणूस

इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार.

Directed by Rajkumar Hirani
Screenplay by Abhijat Joshi
Rajkumar Hirani
Produced by Rajkumar Hirani
Vidhu Vinod Chopra
Siddharth Roy Kapur
Narrated by Anushka Sharma
Music by Ajay Atul
Shantanu Moitra
Ankit Tiwari
Cinematography C. K. Muraleedharan
Edited by Rajkumar Hirani
Production company
Vinod Chopra Films
Rajkumar Hirani Films
UTV Motion Pictures
Starring
Aamir Khan
Anushka Sharma
Sushant Singh Rajput
Boman Irani
Saurabh Shukla
Sanjay Dutt
Distributed by UTV Motion Pictures

:)
मला वाटतं या यादीवरून तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते.

आमिर खान हा एक अभिनेता आहे. त्याला आवडेल ते काम करणं इतकंच तो करू शकतो. त्याचे या चित्रपटातील पात्र हे एका एलिअनचे आहे. पण तरीही चित्रपट पहाताना आपल्याला तिथे पात्र दिसण्याऐवजी आमिर खान (त्यातही मुसलमान वगैरे) दिसत असेल तर ते आमिरचे अपयश तरी आहे किंवा आपले चित्रपट पहातानाचे पुर्वग्रह प्रमाणाबाहेर मधे येतायत.

क्लिंटन's picture

29 Dec 2014 - 4:04 pm | क्लिंटन

इथे जर एखादा हिंदू हे सांगत असता तर मला चाललं असतं. गेलाबाजार एखादा शीख, बौद्ध, जैन, दलित, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट्, अथेइस्ट, अपाथेइस्ट, अ‍ॅग्नोस्टीक, वैष्णव, ज्यू, पारशी बाकी कोणीही असता तरी चालला असता. पण मुसलमान आणि ख्रिस्चन (आणि त्यातही खास करून मुसलमान) नाही चालणार. मी हे सांगतोय की एक मुसलमान (त्यातही हाजी) हे काँन्टेन्ट त्याच्या फायद्याकरता ट्विस्ट करतोय.

अहो देव दगडात नाही, आपल्यात आणि देवात मध्यस्थ नकोत इत्यादी गोष्टी आपल्याच समाजातील अनेक मोठ्या लोकांनी सांगितल्या आहेत. समजा त्याच गोष्टी या चित्रपटात दाखविल्या म्हणून चित्रपट दिग्दर्शक आणि इतर लोक त्या पातळीला जात नाहीत असे म्हणत असाल तर ते अगदी १००% मान्य. दिग्दर्शक पैसे कमवायला हे उद्योग करत आहेत आणि आपण फार मोठी समाजसेवा करत आहोत असा त्यांचाही दावा असल्याचे ऐकिवात नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्याच समाजातील मोठ्या लोकांनी दिलेल्या शिकवणुकीची परत एकदा आठवण होत असेल तर त्यात इतके वाईट काय आहे? हवे तर चित्रपट दिग्दर्शकाला त्याचे क्रेडिट देऊ नका (ते मी पण देत नाही) पण इतके हिरवेपिवळे व्हायची काय गरज आहे हे खरोखरच समजले नाही.

आणि केवळ आमच्यातील दोष का दाखवता त्यांच्यातील का नाही हे एकिकडे म्हणणे आणि दुसरीकडे गेल्या एक-दोन शतकात हिंदू समाजाइतका बदल इतर कोणत्याही समाजात घडून आलेला नाही याचा अभिमान धरणे या दोन गोष्टी विसंगत आहेत हे नम्रपणे नमूद करतो.(तुम्ही यातील दुसरी गोष्ट करत आहात की नाही हे माहित नाही पण चित्रपटाला विरोध करणारे अनेक लोक दोनही गोष्टी करत असतात म्हणून एक जनरल गोष्ट लिहित आहे). कारण असा बदल घडून येण्यासाठी मुळात दोष आहेत हे मान्य करणे गरजेचे असते.असे प्रश्न विचारून त्याच प्रक्रीयेला खीळ बसते. असे प्रश्न सगळ्यांनीच विचारले असते तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षणाला मान्यता आणि इतर अनेक सुधारणा झाल्या त्या होऊ शकल्याच नसत्या.

आमच्यातलेच दोष का दाखवता या प्रश्नामागे "आम्ही आमचे दोष मान्य करतो. आता तसेच दोष इतरांमधलेही दाखवा" या विधायक विरोधापेक्षा "ते त्यांच्यातले दोष दूर करायचा प्रयत्न करत नाहीत ना मग आम्ही पण करणार नाही" हा विघातक विरोध बहुतांश वेळा असतो. असो.

क्लिंटन's picture

26 Dec 2014 - 5:08 pm | क्लिंटन

या चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये लालकृष्ण अडवाणींचेही नाव आहे. त्यांनी काय केले असावे चित्रपटासाठी?

अर्धवटराव's picture

26 Dec 2014 - 7:24 pm | अर्धवटराव

चित्रपट प्रदर्शीत करु दिला म्हणुन ;)

अवतार's picture

26 Dec 2014 - 8:33 pm | अवतार

:))

मदनबाण's picture

27 Dec 2014 - 10:43 am | मदनबाण

@काला पहाड
तुमच्याशी पूर्णपणे सहमत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015

अन्नू's picture

27 Dec 2014 - 5:22 pm | अन्नू

;)

काळा पहाड's picture

27 Dec 2014 - 5:49 pm | काळा पहाड

कुणी तरी हिंदी मध्ये लिहिलंय, पण डकवतोच इथे:

1. अगर गाय को घास खिलाने से धर्म होता हो या नहीं लेकिन उसका पेट जरूर भरता है लेकिन अपने धर्म गुरु के कहने से आप तो बकरे को काटते हैं आपने इसका विरोध क्यों नहीं किया...???
2. अगर माता रानी के दरबार और अमरनाथ जाने से धर्म नहीं होता है..... तो मक्का मदीना जाने से कैसे
हो सकता है ?? आपने मक्का मदीना का विरोध् क्यों नहीं किया..??
3. अगर मंदिर बनाना धर्म नहीं तो आपने मस्जिद बनाने का विरोध क्यों नहीं किया...?? जबकि सर्वे बताते हैं की देश में मंदिर के अनुपात में मस्जिद बनाने में भंयकर तेजी आई है वो भी सरकारी पैसे से ....
4. अगर शीवजी को दूध चढ़ाने से अच्छा किसी भूके को दान देना अच्छा है..... तो देश में लोग ठण्ड से ज्यादा मर रहे है..... आपने मज़ार की चादर का विरोध क्यों नहीं किया....????
5. अगर पैदल तीर्थो पर जाना धर्म नहीं ..... तो या हुसैन करके अपना खून बहाने से कैसे धर्म हुआ ??? जब कि उस खून को धोंने के लिए आप लोग अरबो लीटर साफ़ पानी ढोलते है.... जो किसी प्यासे की प्यास बुझा सकता था ...आपने उसका विरोध क्यों नहीं किया ????
6.अगर क्रिस्चियन लालच देकर धर्म परिवर्तन कर रहे है..... तो आपने इस्लामिक स्टेट का विरोध क्यों नहीं किया...??? जबकि इसमें तो मौत का तांडव हो रहा है.....
7. अमृतसर से कश्मीरीयो को आपदा के समय लाखो लोगो को खाना दिया और आपने उन्ही को खाने के लिए भीख मांगते दिखाया ..... जबकि सबसे ज्यादा गरीब मुस्लिम है....
8. क्या सारे हिन्दू धर्म गुरु पाखंडी होते है ??? जबकि सबसे ज्यादा पाखंडी और धर्म के नाम पर अन्धविश्वास फेलाने में
मुस्लिम धर्म गुरु आगे हैं..... आपने उनका विरोध क्यों नहीं किया..???
9. आपने बताया मुस्लिम लड़के इतने अच्छे और वफादार होते हैं तो 90% आतंकी मुस्लिम लड़के होते हैं .... आपने ये
क्यों नहीं दिखाया ?????
10. अगर आप कहते हैं की धर्म गुरु मंदिर का विरोध करने पर भगवान् की निंदा का डर बताते हैं..... तो आपने इस्लाम में ईश निंदा के जुल्म में मौत की सजा दी जाती है.... इसका विरोध किस डर के कारण नहीं किया...????
11. खान बंधू स्टारर मूवी में नायिका का पात्र हमेशा हिन्दू और नायक हमेशा मुस्लिम क्यों होता है...???

आमिर खान जी हिन्दू धर्म या अन्य धर्म करने से पुण्य मिलता हो या ना मिलता हो , धर्म होता हो या ना होता हो लेकिन किसी का बुरा तो हरगिज़ नहीं करते लेकिन इस्लाम के नाम पर पूरी दुनिया की क्या हालात है ..... आज सभी जानते है...... अगर आपको वाकई में सिस्टम सुधारना ही था तो आपने शुरुआत वही से क्यों नहीं की..???? क्यों आपने मुस्लिम लड़के को इतना वफादार बताया आपने ये क्यों नहीं बताया की लाखो हिन्दू लडकिया मुस्लिम लड़को से शादी करने के बाद वैश्या वृति में धकेल दी जाती है......????

बाळ सप्रे's picture

29 Dec 2014 - 12:46 pm | बाळ सप्रे

नीट पाहिल्यास पीके मध्ये सर्व धर्मांच्या वाइट बाबींचा उल्लेख आहे.. मुस्लिमांनी केलेला बाँबस्फोट, स्वतःच्या पाठीवर रक्त येइपर्यंत मारणे.. ख्रिश्चनांची धर्मबदल चळवळ, जैनांचा महामस्तकाभिषेक..
कुठल्याही धर्माची पाठराखण केलेली नाही..
आता जर हिंदू चष्म्यातूनच बघायच म्हटलं तर सगळं हिंदूंच वाईट दाखवलय तेच दिसणार म्हणा !!
११ वा मुद्दा तर फारच हास्यास्पद आहे.. कितीतरी ठिकाणी हिंदू नायक मुस्लिम नायिकाही आहेत.. जाणकारांनी खोदकाम करावे..
एक पाकिस्तानी मुलगा चांगला दाखवलाय म्हणजे सर्व पाकिस्तानी युवकांना चांगुलपणाचे सर्टीफिकेट दिलय असं समजायचं असेल तर काय बोलणार आणखी !!

चित्रपट नक्कीच चांगला आहे.. पण ते अमीरच्या तोंडून येणं लोकांना खूपच बोचतय.. हेही विसरतात की चित्रपट हिरानीचा आहे..

पीके एक एलियन दाखवून सर्व बायस बाजूला ठेवायची कल्पना साफ पराभूत झालीये असं वाटतं हे सगळं वाचून.. कारण बहुतांश लोकं धर्माच्या चष्म्याशिवाय एखाद्या व्यक्तिला बघुच शकत नाहीत..

सुधीर's picture

29 Dec 2014 - 5:09 pm | सुधीर

बहुचर्चित पिके चित्रपट पाहिला एकदाचा. चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो हे विसरून या चित्रपटाला अमीर खानमुळे झोडपण्यात काहीच अर्थ नव्हता. तो एक कलावंत आहे आणि त्याने आपलं काम चोख पार पाडलं आहे. चित्रपट राजकुमार हिरानीचा आहे आणि त्याने आपल्या पिंडाला साजेसा चित्रपट दिला आहे.

चित्रपटाचा विषय नक्कीच नाजूक, धाडसी आणि लोकांच्या श्रद्धेशी निगडित असल्याने आणि चित्रपटाने नेमके जे सांगायचे आहे त्यावरच थेट भाष्य केल्यामुळे या चित्रपटावर वेगवेगळ्या स्तरातून उलट-सुलट प्रतिक्रिया येणे दिग्दर्शकालाही अपेक्षितच असावे. काही वर्षांपूर्वी अशाच नाजूक आणि धाडसी विषयाशी निगडित असलेला देऊळ हा मराठी चित्रपट पाहिला होता. पण त्यात खुबी ही आहे की दिग्दर्शकाला (उमेश कुलकर्णी) जे सांगायचं आहे, जे दाखवायचं आहे यावर त्याने संवादातून थेट भाष्य करणे चतुराईने टाळले आहे. पण सर्वसाधारण विचार करणार्‍या प्रेक्षक वर्गाने "देवळांचा बाजार असा चालतो?" असा विचारच केला नाही तर ते त्या दिग्दर्शकाचं, चित्रपटाचं अपयश आहे असं मला वाटतं. इथे तर दिग्दर्शकाने विनोदाच्या अंगाने चित्रपटातले विचार उलगडवताना समाजातल्या प्रथा परंपराच नव्हे तर थेट भगवान वा देव या "श्रद्धेवरच" हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच कदाचित काही जणांना हा चित्रपट बिलकूल रुचला नसावा. या चित्रपटाची तुलना कदाचित ओएमजी या चित्रपटाशी करता येईल. ह्या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना फँटसीवर बेतलेली आहे आणि संपूर्ण चित्रपटाचे सादरीकरण विनोदाच्या अंगाने झाले आहे. "कोर्‍या पाटीच्या" (ही कन्सेप्ट मॅट्रिक्स मध्येही मोठ्या खुबीने वापरली आहे) परग्रहवासीयाला "भगवान" समजवून घेताना जो घोळ उडतो तो घोळ काही व्यक्तींच्या धोतराला नक्कीच हात घालणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट मला जास्त प्रभावी वाटला.

एक नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी तथाकथित आध्यात्मिक गुरु रामपालला हरियाणा मधून अटक करताना दुर्दैवी घटना घडली होती. आजही अगदी शहरातूनसुद्धा स्वामींचे-बाबांचे मठ-आश्रम अगदी तेजीत चालताना दिसतात. मंदिरांमध्ये चेंगरा चेंगरी होईपर्यंत गर्दी असते. अशा परिस्थितीत अशा चित्रपटांची समाजाला गरज आहे असे मला वाटते. विरोध तर होणारच, इतिहासात तो कधी झाला नव्हता? लोकांनी राजा राम मोहन रॉय, फुले दांपत्य, धोंडो कर्वेना इ. नाही सोडलं तर ते आज हिरानीला वा अमीर खानला तरी का सोडतील. हिंदू धर्मच का दिसला? अरे, देशातल्या ८०% लोकांचा धर्म हिंदू आहे. दिग्दर्शकाचं जन्माने मिळालेलं नाव हिंदू आहे. ८०% जनता जेव्हा बुद्धिभेदाने "काही" परंपरांचा "अट्टहास" सोडून देऊन एक पाऊल पुढे टाकेल, तेव्हा उरलेल्या २०% जनतेला पुढे यायला कितीसा वेळ लागेल.

मला मान्य आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा व्यक्तीपरत्वे बदलतात. एकाची श्रद्धा दुसर्‍याची अंधश्रद्धा होऊ शकते. तरी आपल्या श्रद्धेतून आपण कुणाकडून (बाबा-बुवा इ.) फसवले तर जात नाही आहोत ना? दोन सेकंदाच्या दर्शनासाठी आपण चेंगरा-चेंगरीचा भाग तर होत नाही आहोत ना? असा सारासार विचार तरी झाला पाहिजे. जे या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसच्या पालीकडलं यश असेल. लोकांच्या श्रद्धेवर बोट ठेवताना दिग्दर्शकालाही शेवटी श्रद्धेवरच यावे लागते. चित्रपटाच्या शेवटाला एका भावुक प्रसंगात अमीर खानच्या तोंडी "या जगात दोन देव आहेत. एकाने आपल्या सर्वांना बनवलं आणि ज्याच्या बद्दल कुणाला काहीच माहीत नाही आणि दुसर्‍याला माणसाने बनवलं जो माणसासारखाच वागतो" असे संवाद घालावेसे वाटतात. (ईश्वर मानणं वा ईश्वर न मानणं या दोन्ही श्रद्धाच आहेत) धर्माचं मूळ तत्त्वज्ञानही फार वेगळं सांगतं अशातला भाग नाही. पण धर्मातलं तत्त्वज्ञान आणि व्यवहारातला धर्म यामध्ये असलेलं अंतर कमी करण्यासाठी सर्वसामांन्यांच्या श्रद्धांवर प्रश्न उठविणार्‍या विचारांची समाजाला अधून मधून गरज असते असे मला वाटते.
(मत न पटणार्‍यांच्या मताचा आदर आहेच)

इथे तर दिग्दर्शकाने विनोदाच्या अंगाने चित्रपटातले विचार उलगडवताना समाजातल्या प्रथा परंपराच नव्हे तर थेट भगवान वा देव या "श्रद्धेवरच" हल्लाबोल केला आहे.

पीके भगवानाला 'फोन' लावतानाच्या राँग नंबरचा उल्लेख करतो पण भगवानच 'राँग नंबर' आहे असे म्हणत नाही.तसेच तो फोन लावणारा बाबा हा पण राँग नंबर आहे असे म्हणत नाही तर मधले कम्युनिकेशन हा राँग नंबर म्हणतो. तो बाबा हाच एक फ्रॉड आहे हा डायलॉग अनुष्काच्या तोंडात आहे. त्यामुळे चित्रपटात भगवान वा देव या "श्रध्देवरच" हल्लाबोल केला आहे असे मला तरी वाटले नाही. आणि तसे जाणवले असते तर मला तो चित्रपट नक्कीच आवडला नसता. (अवांतरः मुळातल्या श्रध्देवर घाला न घालता वर फुटलेल्या पुटांवर कितीही प्रहार केले तरी मला स्वतःला त्याविषयी काहीच आक्षेप नसतात.नेमक्या याच कारणामुळे स्वतःला फार मोठे विज्ञानवादी आणि अंधश्रध्दा निर्मूलनवाले म्हणविणार्‍यांबरोबर माझे फारसे पटत नाही :) )

काळा पहाड's picture

29 Dec 2014 - 5:50 pm | काळा पहाड

लोकांनी राजा राम मोहन रॉय, फुले दांपत्य, धोंडो कर्वेना इ. नाही सोडलं तर ते आज हिरानीला वा अमीर खानला तरी का सोडतील.

पटलं. आता हेच खालच्यांना पण समजावून सांगा. आणि या फोटोंचं स्पष्टीकरण तुम्ही द्या.
https://pbs.twimg.com/media/B5Xu-0oCQAAeC24.jpg
https://pbs.twimg.com/media/B5pDgJ5CcAAmpLa.jpg

नमाज पढायला मात्र फक्त मशिदीतच जावं लागतं बरं!
http://uwpics.urduwire.com/images_photos/photos/Aamir-Khan-offering-Nama...

थॉर माणूस's picture

30 Dec 2014 - 8:59 am | थॉर माणूस

अत्यंत हास्यास्पद प्रतिवाद...

हे म्हणजे उद्या तुम्ही हेल्मेटसक्तीबद्दलच्या बातमीवर कुठल्यातरी संघटनेच्या सक्तीविरोधी प्रतिक्रीयेची लिंक द्यायला गेलात तर कुणीतरी तुमचा झेब्रा क्रॉसिंगवर चालतानाचा फोटो दाखवून तुम्हाला शिव्या घालण्यासारखं आहे.

जाऊ देत, तुमचंच बरोबर. :)

सुधीर's picture

29 Dec 2014 - 6:22 pm | सुधीर

माझं मत बरोबरच आहे असा आग्रह नाही. त्यामुळे वादात मला पडायचं नाही. मी माझं मतं मांडलं. (चूकीचही असेल, अनुभवातून योग्य अयोग्य कळेल). मत न पटणार्‍यांच्या मताचा आदर आहेच.

राहीली गोष्ट कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या श्रद्धांशी त्याचं स्पष्टीकरण देण्याची मला गरज काय? एकवेळ हिरानीला आपण तसा प्रश्न विचारू शकतो. पण म्हणतात ना "बोले तैसा चाले..." अगदी राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीलाही सती जावं लागलं होतं असं ऐकून आहे.

हा शेवटचा प्रतिसाद....

श्रीगुरुजी's picture

29 Dec 2014 - 7:42 pm | श्रीगुरुजी

पीके प्रदर्शित झाल्यापासून आणि झाल्यानंतर या चित्रपटावर टीका होतेय. खालील चित्रपट बनणार अशी नुसती घोषणा झाल्यावर लगेचच त्याच्यावर बंदी यावी यासाठी काहीजण न्यायालयात गेलेत.

http://indiatoday.intoday.in/story/nathuram-godse-mahatma-gandhi-hindu-m...

थॉर माणूस's picture

30 Dec 2014 - 9:03 am | थॉर माणूस

काय गाढवपणा आहे. आता हे सरळसरळ राजकारण चालू झालंय असंच दिसतंय.

तुमचा नक्की आक्षेप चित्रपटाला किंवा कथेला नसून अमिर खानला आहे हे समजलं. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्याच्याजागी "हिंदू" (किंवा अ-मुसलमान म्हणूया) नट तुम्हाला चालला असता असं तुम्ही म्हणत आहात. गूड गोईंग. तुम्हाला राजकारणात फार स्कोप आहे.

कपिलमुनी's picture

3 Jan 2015 - 10:15 am | कपिलमुनी

PK 720p is available on torrent.

पीके रोज नव्या वादात सापडत आहे !
आमिर खान आणि पीकेची टिम दुबईत झालेल्या एका मार्केटिंग इव्हेंट, ज्याला पाकिस्तानच्या एआरवाय (ARY) डिजीटल या कंपनीने स्पॉन्सर केले होते.
PK
{फोटो जालावरुन घेण्यात आला आहे.}
पाकिस्तान आणि दुबईत या कंपनीचे टीव्ही चॅनलपासून अनेक उद्योगधंदे आहेत. कंपनीचे मालक अब्दुल रज्जाक याकूब यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि तालिबान्यांशी निकटचे संबंध आहेत. तसेच याच एआरवाय (ARY) डिजीटल कंपनीला टेरर फायनान्स केल्यामुळे युके मधे बॅन करण्यात आले होते.
दुवा :- https://archive.today/0tHi2#selection-1871.59-1871.120

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy

अर्धवटराव's picture

7 Jan 2015 - 12:37 am | अर्धवटराव

बॉलीवुडला जे पाकप्रेमाचं भरतं येतय त्यामागे हिच आर्थीक कारणं आहेत.

पिंपातला उंदीर's picture

7 Jan 2015 - 9:07 am | पिंपातला उंदीर

या विशयावर एक समयोचित लेख (प्रतिक्रिया पण वाचनिय)

http://ekregh.blogspot.in/2015/01/blog-post.html

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 1:34 am | खटपट्या

आता अमीर खान पॅरीस हल्याचा नीषेध करत नाहीये. म्हणजे हे सीद्ध होतेय की तो पक्का दांभीक आहे.

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 2:13 am | अर्धवटराव

पिके वरुन एव्हढं वादळ का सुटलय कळत नाहि. त्या बिचार्‍या आमिरखानच्या मागे लागलेत पब्लीक.

पिके हा धार्मीक अंधश्रद्धेवर प्रहार करणारा चित्रपट आहे असं उगाच भासवल्या जातय. खरं म्हणजे हा स्त्रिविरोधी चित्रपट आहे. एका अत्यंत निर्बुद्ध मुलीची हि स्टोरी फार सटल् पद्धतीने स्त्रियांवर एकुणच समजुतदारपणाच्या अभावाचा आरोप करते... आणि त्याविरोधात एकही स्त्रि-उत्कर्षवादी आवज उठत नाहि हेच त्या सिनेमाचं यश आहे.

विकास's picture

9 Jan 2015 - 4:33 am | विकास

एकाच प्रतिसादास +१ आणि =)) असे म्हणणे फारच विरळा असावे. ;)

त्या बिचार्‍या आमिरखानच्या मागे लागलेत पब्लीक.
यातील एक बिचारा हा शब्द सोडल्यास, सहमत. :)

एका अत्यंत निर्बुद्ध मुलीची हि स्टोरी फार सटल् पद्धतीने स्त्रियांवर एकुणच समजुतदारपणाच्या अभावाचा आरोप करते...

खरे आहे.

बाकी मला वाटते, आमिरखान, पिकेची (हिंदू) टिम) आणि पिकेचे (हिंदू) विरोधक यांच्यात एक अलिखित करार झाला असावा. त्यामुळे पिकेला भरपूर प्रसिद्धी लाभून त्याचे बक्कळ पैशात पण रुपांतर होऊ शकले.

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 5:11 am | अर्धवटराव

:)
आमिरला माहित आहे मेख. धुम ३ मधे हाच फॉर्मुला त्याने अभिषेकवर वापरला...

वाकी ते निगेटिव्ह मार्केटिंगचं पण खरं असावं... अन्यथा इतका दबदणीत पैसा बनवण्यालायक चित्रपटात काहि नाहि.

अवांतर : पिके आणि प्रकाश आमटे द रिअल हिरो यांचं महाराष्ट्रात तौलनीक कलेक्शन किती ?

भृशुंडी's picture

9 Jan 2015 - 5:15 am | भृशुंडी

ह्यॅ ह्यॅ.. चित्रपट "कोणावर" काढलाय ते बघून त्याला चांगला म्हणता येत असतं तर .... असो!
प्रकाश आमटे द रिअल हिरो च्या "कलेक्शनचा" ह्यात काय संबंध?

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 7:13 am | अर्धवटराव

सांगा ना कोणावर काढलाय पिच्चर? माझ्यामते एका अत्यंत मूर्ख मुलीची स्टोरी आहे ति.

रिअल हिरोच्या कलेक्शनचं म्हणाल तर बुवाबाजीविरुद्ध सो कॉल्ड कोरडे ओढणार्‍या सो कॉल्ड पुरोगामी महाराष्ट्राला अभिरुची कशाशी खातात याचं परिमाण म्हणजे कलेक्शनचा आकडा.

भृशुंडी's picture

10 Jan 2015 - 12:05 am | भृशुंडी

मी "प्रकाश आमटे द.." बद्दल बोलत होतो.
कसं आहे, चित्रपटाचा विषय कितीही उत्तम असला, तरी कलाकृतीचा दर्जा त्यावरून ठरवणे हे असंबंद्ध आहे.

प्रकाश आमटेंच्या कार्याबद्दल किती लोकांना माहीती आहे? हा कदाचित महाराष्ट्राची अभिरूची वगैरे ठरवण्यासाठी योग्य प्रश्न असू शकेल. पण ज्यांनी "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट पाहिला त्यांची अभिरूची श्रेष्ठ- हे अगदीच चुकीचे विधान आहे! तथाकथित उच्च अभिरूचीवाल्यांना आमट्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी जर हा चित्रपट पहाण्यापर्यंत थांबावं लागत असेल तर...कठीण आहे, नाही का?
तेव्हा "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट बघणे ह्याचा अभिरूचीशी काहीच संबंध नाही!

आणि पीके- एक चित्रपट म्हणून तो लोकांना आवडला, त्यांनी पाहिला! रेडी,किक वगैरे चित्रपटही लोकांना आवडलेच होते की!
मोठा वितरक आहे, स्टारपट आहे तेव्हा कलेक्शनही जास्तच असेल.

मी त्या अनुषंगानेच पिके बद्दल मत मांडलं. असो.

पण ज्यांनी "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट पाहिला त्यांची अभिरूची श्रेष्ठ- हे अगदीच चुकीचे विधान आहे!

अभिरुची कलाकृतीवरुन नाहि तर चित्रपट विषयाबद्दल म्हणतोय मी.

तथाकथित उच्च अभिरूचीवाल्यांना आमट्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी जर हा चित्रपट पहाण्यापर्यंत थांबावं लागत असेल तर...कठीण आहे, नाही का?

तद्वत धार्मीक अंधश्रद्धांवर जनजागृती करायला आमिरखानचा ३०० करोड गल्ला जमवणारा चित्रपट यावा लागतो तर आणखी कठीण नाहि का?

तेव्हा "प्रकाश आमटे द.." हा चित्रपट बघणे ह्याचा अभिरूचीशी काहीच संबंध नाही!

अंधश्रद्धा निर्मुलनाकरता पिके ची गरज पडत असेल तर निश्चित संबंध आहे.

आणि पीके- एक चित्रपट म्हणून तो लोकांना आवडला, त्यांनी पाहिला! रेडी,किक वगैरे चित्रपटही लोकांना आवडलेच होते की!

रेडी, किक आदि गल्लाभरु चित्रपट म्हणुन पिके बघितला जात असेल तर काहिच म्हणणं नाहि आपलं. पण त्याकडे अंधश्रद्धा निर्मुलन प्रयोजन म्हणुन विचारवंतांचं बघणं डोक्यात जातय.

मोठा वितरक आहे, स्टारपट आहे तेव्हा कलेक्शनही जास्तच असेल.

म्हणुनच मी केवळ महाराष्ट्राचा विचार केलाय.

भृशुंडी's picture

10 Jan 2015 - 5:08 am | भृशुंडी

एकदम मान्य.
चित्रपटांकडून (किंवा सत्यमेव जयते सारख्या मालिकेकडून्) असल्या अपेक्षा अगदीच अवाजवी आहेत.
आणि आपल्याकडे तर असल्या घाऊक अपेक्षा बरेचदा ठेवल्या जातात. उ.दा. लगे रहो मुन्नाभाई आला तेव्हा लोकांना गांधीवादाचं पुनरुज्जीवन वगैरे झाल्याची स्वप्नं पडायला लागली होती !

विकास's picture

9 Jan 2015 - 10:58 pm | विकास

प्रकाश आमट्यांच्या अगदी चित्रपटाची देखील तुलना मला आमिर अथवा पिकेशी करवत नाही. पण "दि इंटरव्ह्यू"ला आत्ता पर्यंत कसेबसे $२० मिलियन्स मिळालेले असताना, भारतातील+आंतर्राष्ट्रीय गल्ला (केवळ चित्रपट बघणे यावर आधारीत) धरून पिकेला साधारण $६३ मिलियन्स मिळाले आहेत.

मंदार कात्रे's picture

9 Jan 2015 - 8:39 pm | मंदार कात्रे

पीकी पाहुन केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून "बेबी" http://en.wikipedia.org/wiki/Baby_%282015_film%29 किंवा "लोकमान्य -एक युगपुरुष "हे चित्रपट देशभक्त भारतीयानी पहावेत अशी एक पोस्ट फेसबुक व व्हाट्सॅप वर फिरत आहे

;)

काळा पहाड's picture

9 Jan 2015 - 11:29 pm | काळा पहाड

नक्की पाहू. धन्यवाद.