लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in काथ्याकूट
18 Dec 2014 - 1:21 am
गाभा: 

श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.

लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं? "आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे" हे मजेत जगण्यासाठी आहे हे केवळ तत्वज्ञान आहे. स्पष्ट बोलायचं तर सत्य काय आहे हे माहिती नसल्यामुळे दिलेली थुकपट्टी.

नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ. वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.)

आजचे समृद्ध सजीव सृष्टी (ज्यात माणूसही आला) एकपेशीय सुक्ष्मजीवापासून उत्क्रांत झाली हे विज्ञान पुराव्यासह छातीठोकपणे सांगतो. मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही.

मात्र जे आपल्याला माहिती नाही त्याला "क्ष" मानायची ही माणसाची जुनी खोड आहे. उत्क्रांतीचे ज्ञान जेमतेम दिडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहे. (डार्विनबाबाचे आभार त्यासाठी) मात्र त्याच्याआधी हजारो वर्षांपासून हा प्रश्न माणसाला पडला असणार (पृथ्वीचे आयुष्य अंदाजे ४५० कोटी वर्ष आहे. मानवजातीचे आयुष्य सांगणे तसे अवघड आहे. कपीवर्गातून मानव प्राण्यात उत्क्रांत होण्याच्या नेमक्या कुठल्या अवस्थेपासून हे आयुष्य मोजायचं हा प्रश्न आहे.)

तर मुद्दा असा आहे की खुप पूर्वी मनुष्य प्राण्याला मी या भूतलावर का आहे हा प्रश्न पडला असणार. मी ही जी आजूबाजूची सृष्टी पाहतो ती कुणी बनवली या प्रश्नाने डोके भंजाळून गेले असणार त्याचे. उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव". या अवाढव्य पसार्‍याचा, क्षणात आग ओकणार्‍या ज्वालामुखीचा, क्षणात होत्याचे नव्हते करणार्‍या महापुराचा, जंगल जाळणार्‍या आगीचा, महाप्रलयाचा, वावटळीचा निर्माताही तितकाच ताकदवान असणार.

मग माणसानेच ठरवले. देव सर्वव्यापी आहे. देव सर्वशक्तीमान आहे. देव सर्व जाणतो. देवाने हे आयुष्य मला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे.

जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही.

मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल? आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते? की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे?

-----------------------------------------------------------------------
टंकणे बरेचसे विस्कळीत आहे याची जाणिव आहे.

प्रतिक्रिया

याचा अर्थ याच्या आधीही स्वतःला मूर्ख बनवलेले आहे असेच दिसते!

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 9:01 am | सतिश गावडे

माणसाला कर्मविपाकाची कल्पना सुचून तिने समाजमनाची पकड घेतल्यापासून काल परवापर्यंत अगणित वेळा माणसाने स्वतःला मूर्ख बनवले आहे.

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 10:56 am | सतिश गावडे

तुम्हाला हवे असलेले उत्तर देतो: मी हवेत गोळीबार करतो. :)

खटपट्या's picture

18 Dec 2014 - 1:55 am | खटपट्या

वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.)

आपण म्रुत्युला टाळू शकत नाही. आणि ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्याबद्दल दु:ख करत बसण्यात काय हशील?
म्हणून

लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

बघा पटलं तर....

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 9:08 am | सतिश गावडे

आपण म्रुत्युला टाळू शकत नाही. आणि ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्याबद्दल दु:ख करत बसण्यात काय हशील?

हा मुद्दाच नाही. मी या वाक्याच्या आधीचे आणि हे दोन्ही वाक्य सलग लिहिली होती. तुम्ही या एकाच वाक्याचा स्वतंत्र अर्थ लावलामुळे तुमचा असा समज झाला असावा.

या वाक्याचा आधीचे वाक्य होते "नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ." आपण जन्माला का येतो किंवा ही जीवसृष्टी का निर्माण झाली हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे "आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी आहे" हा तत्वज्ञानाचा मुलामा आहे.

खटपट्या's picture

18 Dec 2014 - 9:39 am | खटपट्या

ओके !!

देव नाही हे लोकांना कळाल तर बरेच प्राब्लेम सुटतील.कारण नंतर लोक देवावर हवाला ठेवुन बसण्याऐवजी सगळी प्राब्लेम स्वत: सोडवायचा प्रयत्न करतील.मग रिकाम्या गोष्टी साठी वेळ मिळणार नाही.

(जनरल)जेपी

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:16 am | टवाळ कार्टा

पण त्यामुळे जे लोक देव आहे असे समजून जो काही थोडा प्रामाणिकपअ / पुण्य करतात ते सुध्धा मोकाट सुटतील

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 10:22 am | सतिश गावडे

"देवाला" भिऊन समाजास त्रासदायक होणार्‍या गोष्टी न करणारे खुप कमी आहेत रे. "देवाचा" वापर करुन आपले अजेंडे राबवणार्‍यांचे प्रमाण कितीतरी पटीने जास्त आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:31 am | टवाळ कार्टा

माझा मुद्दा तोच आहे...देव नाही असे एकदा ठरले...की त्रास देणार्या लोकांचीच संख्या वाढणार
जे काहीच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देव ही एक भोळी आशा तरी असते...आंइ आणि आशावाद असेल तरच माणुस बर्याचदा वाईट परिस्थितीतून सांभाळू शकतो

त्यामुळे माझे तरी असेच मत आहे...भारतातल्या लोकांसाठीतरी देव हि संकल्पना असावी....तो देव खरोखर असेल तर ते सिध्ध कसे करायचे हे त्याचे तो बघेल

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 11:08 am | सतिश गावडे

मात्र तू म्हणतोस त्या लोकांची सहज प्रवृत्ती भित्रेपणाची असते. देव हा केवळ बागुलाबोवा असतो. देवाच्या जागी अजून कशाची भीती दाखवली तरी ते घाबरतीलच.

एक्झाटि... टणाटण लो़कांना देवाची गरज नाही.. ते त्यांना हव तेच करणार.. नसलेल्या व्याख्या काढुन ..
लोकाना भिती घालणे अवघड नाही..

जेपी's picture

18 Dec 2014 - 10:29 am | जेपी

सगा ला +1

विटेकर's picture

18 Dec 2014 - 11:43 am | विटेकर

गॄहपाठ :
आत्मनो मोक्षार्थ जगाद हितायच !
या वाक्याचा अर्थ समजावून घ्या. कराच थोडी शोधाशोध !
कष्टेवीण फळ नाही. ज्ञान प्राप्त करणे हे कलफलक बडविण्याइतके सोपे असते तर किती बरे झाले असते

सतिश गावडे's picture

18 Dec 2014 - 11:50 am | सतिश गावडे

आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव नाही. जे अस्तित्वातच नाही त्याला मोक्ष कुठला.

प्रचेतस's picture

18 Dec 2014 - 11:54 am | प्रचेतस

आमचे एक मित्र आहेत आत्मा नावाचे जे वास्तवात अस्तित्वात आहेत.
हा आता त्यांना मोक्षाप्रत जायचे नाहीये कारण ते अत्रुप्त आहेत इतकेच.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 12:16 pm | मुक्त विहारि

ते आजकाल फारच ग्लोबल झाले आहेत.

तरी पण आता आंतर-सुर्यमाला विवाहात आंतरपाट धरायच्या प्रयत्नात आहेत, असे ऐकिवात आहे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 2:09 pm | प्रसाद गोडबोले

आंतर-सुर्यमाला विवाहात आंतरपाट धरायच्या प्रयत्नात आहेत

हा काय प्रकार आहे बे =))

आयुर्हित's picture

18 Dec 2014 - 2:23 pm | आयुर्हित

he will hold intermediate cloth in hand for inter solar system marriage!
(वऱ्हाड निघालय लंडनला फ्यान)

बुवांनी नुकतंच नेपाळी पोरगी आणि लंडनवाला पोरगा ह्यांचं लग्न लावलंय.
आंतरराष्ट्रीय लग्नानंतर आंतर सुर्यमाला विवाह बुवा लावतील च असा विश्वास ह्याठिकानी आम्हाला वाटतो. ;)

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 12:14 pm | मुक्त विहारि

जे अस्तित्वातच नाही त्याला मोक्ष कुठला.

अरे बापरे...

तुम्ही फारच सिरीयस झालेला दिसताय?

अहो,

प्रत्येकाचा आत्मा वेगळा आणि त्याला खूष ठेवण्याचा मार्ग पण वेगळा.

मला विविध क्षेत्रातल्या आणि य्त्तम विचारसरणीच्या माणसांना भेटायला आवडते.ते भेटले की निदान त्या काळाकरता तरी मन समाधानी राहते.

बायकोने आपणहोवून कोलंबीचा रस्सा केला की आपण त्या दिवशी खूष.

मुलाने रात्री झोपण्यापुर्वी माझे पाय चेपले की आमचा आत्मा खूष.

प्रसंग छोटेच असतात.आपण समाधानी रहायचा प्रयत्न करायचा.

आणि एक सांगायचे म्हणजे...

आपले मन हाच आपला आत्मा. असे माझे ठाम मत आहे.

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 12:33 pm | प्यारे१

>>> आपले मन हाच आपला आत्मा.
:) अम्मळ मौज वाटली.

विटेकर's picture

18 Dec 2014 - 2:29 pm | विटेकर

अम्मळ मौज वाटली.
अफाट कल्पना असतात एकेक ! अभ्यास शून्य , वाद उकरायची हौस !
हिन्दू धर्मात इतके प्रचन्ड साहित्य उपलब्ध असूनदेखील भल्या- भल्यांची संकल्पना पुरेशी स्पष्ट नसते याचे आश्चर्य वाटते !
अहो सतिश साहेब ,
आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा !
अभ्यास वाढवा !
गृहपाठ -२
मोक्ष म्हणजे काय ?
हिन्ट : मोक्ष म्हणजे salvation नव्हे ! नाहीतर गुगलून बघाल आणि याल पुन्हा वाद घालायला !

विटेकर's picture

18 Dec 2014 - 2:30 pm | विटेकर

हलके घ्या हे वेगळे सांगणे न लगे !

स्वर्गाच्या आणि मोक्षपदाच्या कल्पना व्यक्तीगणिक बदलतात.

मोक्षपद किंवा मोक्ष एकदाच कशाला? रोज का नको मिळायला?

उत्तम खाणे, उत्तम विचारी (समविचारी असलेच पाहिजेत, असे नाही.) व्यक्तींबरोबर रंगलेला गप्पांचा फड, ह्यात सरलेला काळ पण निदान तेव्हढ्या काळापुरता तरी आम्हाला मोक्षा सारखाच वाटतो.आणि मला पण तो आवडतो.

घटा घटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे मोक्ष वेगळे

सतिश गावडे's picture

19 Dec 2014 - 12:36 am | सतिश गावडे

विटेकर काका, विरोधी मताची "अभ्यास शुन्य" अशी संभावना तुमच्याकडून अपेक्षित नव्हती.

वयाची जवळपास बावीस तेवीस वर्ष मी ईश्वरवादी होतो. अगदी इथल्या बर्‍याच प्रतिसादकांप्रमाणेच फार सखोल अभ्यास नसला तरीही पुनर्जन्म, आत्मा वगैरे संकल्पनांवर विश्वास होता. एका योगायोगाने या विषयात मी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. जे वाचलं त्यावर चिंतन, मनन केलं. स्वतःशीच पडताळा घेण्याचा प्रयत्न केला. जे वाचलं त्याची प्रातिनिधिक उदाहरणे इथे देतो.

कर्माचा सिद्धांतः हिराभाई ठक्कर या पुस्तकाबद्दल मी काही टंकण्याची आवश्यकता नाही.
Karma and Reincarnation: Paramhansa Yogananda परमहंस योगानंदांनी लिहिलेल्याया पुस्तकावद्दलही काही वेगळं लिहायला नको. पुस्तकाचं नाव बोलकं आहे.
Reincarnation and Karma: Edgar Cayce
From Death To Birth: Understanding Karma And Reincarnation: Pandit Rajmani Tigunait
Many Lives, Many Masters: Brian L. Weiss अमेरिकेतील एका मानसोपचार तज्ञाने संमोहनाच्या साहाय्याने एका पेशंटच्या "मागील" ८६ जन्मांचा उलगडा केला त्यावर आधारीत पुस्तक.
Life Before Life: A Scientific Investigation of Children's Memories of Previous Lives: Jim Tucker अमेरिकितील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कुल ऑफ मेडीसीनच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ इयान स्टीव्हन्सन यांनी चाळीस वर्ष जगभरातील "पुनर्जन्माच्या" घटनांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातील नोंदीवर आधारीत असे हे पुस्तक त्यांचे कनिष्ठ सहाध्यायी जिम टकर यांनी लिहिले.

ही सारी पुस्तकं मी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन वाचली आहेत. ही पुस्तके म्हणजे कथा कादंबर्‍यांप्रमाणे विरंगुळा किंवा करमणूक म्हणून वाचायची पुस्तके नक्कीच नाहीत.

याउपर अजूनही कुणाचे मत असेल की मी हवेत गोळीबार करतोय, माझा अभ्यास शुन्य असून वाद उकरतोय किंवा माझे अज्ञान व्यक्त करतोय असे असेल तर त्याला ते मत असण्याचे स्वातंत्र्य आहे. :)

आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा !

गेली अडीच वर्ष मी मन आणि बुद्धीचा अभ्यास करतोय. त्यामुळे आत्मा, मन आणि बुद्धी यांत गफलत करण्याईतका अडाणी मी नक्कीच नाही.

असो. इति लेखनसीमा.

विटेकर's picture

19 Dec 2014 - 9:50 am | विटेकर

आमची चूक झाली. एक्डाव मापी असावी. पुन्यांदा होनार नाही

सतिश गावडे's picture

19 Dec 2014 - 10:07 am | सतिश गावडे

माफी वगैरे नका बोलू हो काका. एकदा निवांत भेटू आपण सारे. छान गप्पा मारु.

मुक्त विहारि's picture

19 Dec 2014 - 10:31 am | मुक्त विहारि

हम भी आयेंगा...

तसेही विटेकर काकांना एकदा मनापासून भेटायचे आहे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 2:14 pm | प्रसाद गोडबोले

मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल ?

>>

धन्या तुला प्रवचनकार बुवां सारखे व्यामिश्र वादविवादांची समष्टी करायला माहीती पाहिजे की तुला खरेच परमेश्वरला जाणुन घ्यायचे आहे आणि सायुज्य व्हायचे आहे ?

आपण दोन्ही बाबतीत मदत करु शकतो ... डीमांड कळवा तदनुसार सप्लाय करण्यात येईल :D

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 2:21 pm | प्यारे१

प्रगो महाराज,
दोन्ही येऊ द्या.

-सध्या निव्वळ भोचक वाचक प्यारे

विटेकर's picture

18 Dec 2014 - 2:33 pm | विटेकर

काय हे ( भोचक) प्यारे ?
तुम्ही आव्हान दिले आहेच आता चन्द्रकांत खोत स्टाईल ... सेक्सी गॉडेस वगैरे वाचायची तयारी ठेवा...

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 2:35 pm | प्यारे१

नाही हो!
अथातो प्रगोव्याख्यान जिज्ञासा फक्त. आव्हान वगैरे देण्याची आमची ना कुवत ना पात्रता.

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

नमस्कार बुवा अ‍ॅन्ड बुवा __/\__

ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायचीच होती ... ( तुर्तास जास्त वेळ नाहीये म्हणुन फक्त काडी सारुन जातोय ;) )

http://www.misalpav.com/node/26064

मागील चर्चेच्या निमित्ताने मिपावर शोधाशोध केल्यावर वल्लीचा हा अप्रतिम धागा सापडला होता ... आता ह्यातील आणि अशाच दिसणार्‍या मुर्तीं/सुंदरींना मी सेक्सी म्हणतोय अन तुम्ही गॉडेस म्हणताय... ;)

आपली काही हरकत नाही :D सेक्सी म्हणण्यालाही नाही अन गॉडेस म्हणण्यालाही नाही =))

*man_in_love* => *give_rose* => *angel*

परत तुमच्या भावना बिवना दुखावल्या तर कळवा बरं का !

| चिदानंद रुपः शिवोहम शिवोहम |

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 3:36 pm | प्यारे१

भावना दुखावत वगैरे नाहीत. कल्जि क्रु न्ये.
तरुण स्त्रीला 'आई' म्हणण्यासाठी एकतर लहान बाळ तरी व्हावं लागतं नाहीतर विवेकानंद/ बुद्ध/ तुकाराम तरी!

असो. बाकी आपलं 'काम' झाल्यावर (असं आपलं आपल्याला वाटत असेल तरी) दुसर्‍यांच्या श्रद्धांच्या पुलांना सुरुंग लावून त्यांचा मार्ग बंद करायचा नसतो हे बेसिक आपल्याला समजत असेल असं वाटत होतं. पुन्हा असो!

अ‍ॅडीशनः मी दांभिक असल्यानं मी वरच्या कॅटॅगिरीमध्ये (लहान अथवा खूप मोठे) बसत नसलो तरी नेहमीच आदर्शांची उदाहरणं देणं अप्रस्तुत ठरु नये.

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले

भावना दुखावत वगैरे नाहीत. कल्जि क्रु न्ये.

अशं का ... बलं बलं छाबाश हं !

तरुण स्त्रीला 'आई' म्हणण्यासाठी एकतर लहान बाळ तरी व्हावं लागतं नाहीतर विवेकानंद/ बुद्ध/ तुकाराम तरी!

तरुण स्त्रीला तु सुंदर आहेस म्ह्णायला सामान्य तर्कनिष्ठ माणुस होणे पुरेसे असतं ... आणि जे सामान्यांना जमेल तेच आम्ही प्रवचनांमध्ये प्रतिपादन करतो !

असो. बाकी आपलं 'काम' झाल्यावर (असं आपलं आपल्याला वाटत असेल तरी) दुसर्‍यांच्या श्रद्धांच्या पुलांना सुरुंग लावून त्यांचा मार्ग बंद करायचा नसतो हे बेसिक आपल्याला समजत असेल असं वाटत होतं. पुन्हा असो!

आम्ही आमचे काम झाल्यावर चुकीचे पुल तोडुन टाकतोय जेणे करुन अज्ञ जन भरकटु नयेत बाकी ... तुम्ही 'काम' हा क्वोट्स मधे टाकल्याने तुमच्या मनात जो अर्थ होता तो स्पष्ट होत आहे , अध्यात्माचा बुरखा पांघरुन कोण दांभिकपणा करते हे पुन्हा स्पष्ट झाले ...

नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।। १।। तैसे चित्त शुद्ध नाही। तेथे बोध करील काई ।। ध्रु. ।।

हे मी तुम्हाला सांगुन सांगुन कंटाळलो ... तरीही परत एकदा प्रवच्न करतो नीट जीवाचा कान करुन ऐका ...

उगाच मोठ्यामोठ्या साधुसंताची नावे घेवुन अतार्किक वाटणार्‍या गोष्टी कवटाळण्यापेक्षा माझे नाव घ्या अन जे तार्किक आहे ते स्विकारा . समोर पडलेली दोरी ही दोरी आहे हे समजुन घ्या साप साप म्हणुन तीला घाबरु नका अन सोन्याची चेन सोन्याची चेन म्हणुन कवटाळु नका ...

जेव्हा ती दोरी आहे हे तुम्हाला पुर्ण पणे उमगेल तेव्हा सारे बेगडी ज्ञान अन त्यातुन उत्पन्न होणारी व्यामिश्र दांभिकता नष्ट होईल. जे जसे आहे ते तसे स्विकारले की माया काय अन ब्रह्म काय .... सत्य काय अन मिथ्या काय हे व्यवस्थित कळेल आणि मग तुम्ही तुमचेच प्रतिसाद वाचुन स्वतःवरच हसाल .

तोवर मौन पाळा . कारण बोलण्याने ज्ञानप्राप्ती होत नसते ती श्रवणाने अर्थात ऐकण्याने मननाने आणि निधिध्यासनाने अर्थात एकांतात बसुन चिंतन करण्याने होत असते ...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः " ||

काळजी करु नका मी तुमच्या पाठीशी आहे , अगदीच काही नाही जमलं तर मी तुम्हाला सोडवीन ह्या सगळ्यातुन :)

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 5:35 pm | प्यारे१

>>> तुम्ही 'काम' हा क्वोट्स मधे टाकल्याने

काम कोट करण्याचं कारण तुम्हाला काहीही वाटलेलं असू दे . तो तुमचा प्रश्न आहे.
मी काम झालं म्हणजे मोक्ष मिळाला, ब्रह्मानुभव आला, वस्तुसिद्धी झाली अशा अर्थे शब्द वापरला आहे.
बाकी चालू दे.

साधना विविध अंगांनी करता येते. त्यातल्या भक्तीमार्गाचा वापर करताना मूर्तीपूजा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्या संदर्भानं जर तुमचं 'काम झालं' असं वाटत असेल तरी बाकीच्यांनी मूर्तीपूजा करताना त्यांचा बुद्धीभेद करु नये अशा अर्थानं वरील 'पूल तोडू नये' अशा शब्द समूहाचा वापर मी केला होता.

योग्य अर्थ आपल्यापर्यंत न पोचवल्याबद्दल क्षमस्व.

बाकी आपल्या चरणी लीन आहोतच. ___/\___

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले

प्रगती आहे ... अभिनंदन :)

भक्तीमार्गाचा वापर करताना मूर्तीपूजा हा एक महत्त्वाचा पैलू आहे

मी कधीच मुर्तीपुजे विरुध्द बोललो नाहीये अन बोलणारही नाही मग लोकांचा बुध्दी भेद करण्याचा प्रश्नच येत नाही .
मी जी मुर्ती जशी जिसते तशी स्विकारावी असेच बोललो आहे , हेच मागल्या चर्चेतही बोललो होतो . गडावरची अंग्लाई देवेची , कोल्हापुरला अंबाबाईची मुर्ती पाहुन मातृभाव जागृत होतो तिथे आईच आठवते ,
अन खजुराहोला मुर्तीपाहुन किंव्वा तश्शाच दिसणार्‍या इतर मुर्ती पाहुन गर्लफ्रेंडभाव जागृत होतो तिथे गर्लफ्रेन्डच आठवते ... आणि गर्लफ्रेंडच आठवली पाहिजे ;)

तिथेही मातृभावच जागृत व्हावा अशी जी तुमची अपेक्षा आहे तोच दांभिकपणा... तीच माया जेकी बंधनाचे कारण आहे .

मी म्हणतो तसे एकदा जे जसे आहे ते तसे स्विकारा ( बेशर्त स्विकारा हवे तर ;) ) म्हणजे
सद्गुरुवचन अंजन ल्याला ।माया भयानक न दिसे त्याला । अभिन्नपणें आत्मयाला ।सर्वत्र देखे || ही काय अवस्था आहे हे तुमच्या लक्षात येईल :)

बाकी आपल्या चरणी लीन आहोतच. ___/\___

!! ॐ नमो नारायणाय् !!
तुजप्रत कल्याण असो वत्सा !!

नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥
नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती ।
नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥

तात्काळ प्रचीती आली की नै प्यारेबुवा मग म्हणुन तर म्हणतोय माझ्यावर विस्वास ठेव मी सोडवीन रे तुजला !!

साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथे ने‍ऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥

जय जय रघुवीर समर्थ !!

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 5:59 pm | प्यारे१

:)

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 6:11 pm | प्रसाद गोडबोले

आपण आनंदी चेजर्‍याची स्मायली टाकुन मौनात गेलात , आम्ही सांगितलेले ऐकलेलेत, हे पाहुन अत्यंत आनंद जाहला , लवकरच तुम्हास संपुर्ण प्रचिती येईल . तेव्हा शब्देविण संवादु होईल . तेव्हा एकदा बसु *drinks*

तो पर्यंत शुभेच्छा I am really so happy for you *i-m_so_happy*

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 6:14 pm | प्यारे१

;)

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:45 pm | गौरी लेले

छान !

हे छान केलंत प्यारे१ . नुसता शब्दांचा कीस पाडणार्‍यांशी वाद घालण्यात अर्थ नाही .

:)

आवडला प्रतिसाद.उत्तर द्यावे तर असे! घ्या आमचाही_/\_

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 6:38 pm | प्यारे१

:-/

विटेकर's picture

19 Dec 2014 - 9:53 am | विटेकर

"बेशर्त" हा शब्द वाचला आणि ड्वोळे पाणावले काही जुन्या आठवणीनी !!!
.
.
.
.
.
.
साश्रु नयनांनी प्रतिसाद लिहित आहे !

चुकीची स्मायली पडली बहुधा. बेशर्त स्वीकृतीमध्ये होतं बहुधा असं. =))

नाखु's picture

18 Dec 2014 - 3:09 pm | नाखु

ते नक्की माहीत नाही पण दानव आहे का ते मात्र माहीती झाले हैवानगिरीआणि तेच पुरेसे आहे
अतिअवांतर : रामायण आणि महाभारतातील देवातला "माणूसपणा" दिसल्यापासून माणसातल्या "देवावर" जास्त लोभ आणि जीव जडला आहे

स्वधर्म's picture

18 Dec 2014 - 3:28 pm | स्वधर्म

>>जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही.
- गौतम बुध्दाने याच प्र्श्नाचा शोध आयुष्यभर घेतला. दु:ख आहे, दु:खाला कारण असते व ते दूर करता येते, हाच बुध्दाने लावलेला महान शोध.
@ आत्मा व देव
- बुध्दाला आत्मा व देव आहेत का, हा प्र्श्न अनेकदा विचारण्यात आला होता. त्याने त्या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. हे प्रश्न 'अव्याकृत' आहेत असे म्हटले आहे. टीपः मला 'अव्याकृत' शब्दाचा अर्थ नक्की सांगता येत नाही. पण त्याने प्रश्नकर्त्यास प्रतिप्रश्न केला की, या समुद्राच्या किनार्यावर किती वाळूचे कण आहेत? - अफाट, अगणित उत्तर आले. तरी पण नक्की किती? बुध्दाने विचारले. असा संवाद काही वेळ झाल्यावर, प्रश्नकर्ता रागावून म्हणाला त्याचा माझ्या प्रश्नाशी काय संबंध? त्यावर बुध्द म्हणाला, देव, आत्मा आहे, की नाही, याचा तुझ्या जीवनाशी काय संबंध?
संदर्भः सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुध्द - ले. आ. ह. साळुंखे
तसेच बुध्दावर्च्या इतर अनेक पुस्तकाही या विषयी उहापोह आहे.
- स्वधर्म

रोचक प्रतिसाद. वाचतोय.

विटेकर's picture

18 Dec 2014 - 4:25 pm | विटेकर

संदर्भः सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुध्द - ले. आ. ह. साळुंखे
आता बोलणेच खुंटले.
चालू द्या !
अव्या़कृत : ज्याची "विकृती" होत नाही असे .
प्रकृती , पुरुष आणि ज्ञ अशा तीन संकल्पना मूळात सांख्यानी मांडळ्या. सार्‍या अद्वैत संकल्पनेचे ते मूळ आहे. आचार्यानी आपल्या प्रखर बुद्धीमत्तेने सांख्य तर खोडून काढलेच पण बुद्धाचा शून्यवाद आणि जैनांना स्याद्वाद दोन्हीही नि:शेष खोडून काढले आहेत.
त्यामुळे दु:खाची निवृत्ती की दु:खापासून सुटका हे मूळातून तपासायला हवे !

स्वधर्म's picture

18 Dec 2014 - 5:23 pm | स्वधर्म

आणि तेच तर बुध्दाच्या सांगण्याचे वैशिष्ट्य आहे. सांळुंखे यांच्या नावामुळे तसे झाले असेल, तर ते नांव सोडून द्या. बुध्दाच्या विचारांवरची इतर पुस्तकेही आहेत आणि त्यात हा प्रश्न आलेला आहे, असे मी म्हटलेच आहे. धर्मानंद कोसंबीचे एक पुस्तक मला सर्वात आवडले होते. माझी वाटचाल. ते अरविंद गुप्ता यांच्या संस्थळावर मोफत उतरवून घेण्यासाठी उपलब्ध होते.
>> बुद्धाचा शून्यवाद
बुध्दाने जे सांगितले त्याला हे नांव त्याने दिल्याचे मला कुठे वाचल्याचे आठवत नाही. आपण म्हणता तसले वाद, शब्द (दु:खाची निवृत्ती की दु:खापासून सुटका) संकल्पना इ. मध्ये बुध्दाने जे सांगितले ते वाचताना अडकायला होत नाही, हा मात्र स्वानुभव आहे.

- स्वधर्म

क्लिंटन's picture

18 Dec 2014 - 5:13 pm | क्लिंटन

उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव".

म्हणजे ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली हे तुम्ही पण मानता असा अर्थ तुमच्या या वाक्यातून निघत नाही का?

मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही.

हीच तर गंमत असते.महास्फोट हा एक सिध्दांत आहे पण ते वैज्ञानिक सत्य नाही--म्हणजे अजून ते निर्विवादपणे सिध्द झालेले नाही तरीही महास्फोट, बिग बँग थिअरी वगैरे बोलणारे मोठे विज्ञाननिष्ठ ठरतात तर देव या निर्विवादपणे सिध्द न झालेल्या गोष्टीविषयी कोणी बोलायला लागले तर ते अंधश्रध्द ठरतात.

जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही.सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही.

असले फालतूचे प्रश्न पडत नसले तरी आपण काहीतरी चुकीचे केल्यास त्याचे परिणाम कधीनाकधी आपल्यावरच होणार आहेत या विचाराने का होईना अशा गोष्टी टाळण्याकडे नक्कीच कटाक्ष असतो.माझ्यासाठी तरी इतके ठिक आहे.आणि एखाद्या गोष्टीचे उत्तर मला सापडले नाही किंवा कारण समजले नाही तर इतरांवर (इतर लोकांवर किंवा सिध्दांतावर किंवा अन्य कशावर) खापर फोडायला मला आवडत नाही.त्यामुळे असले प्रश्न सुचण्याशिवाय करण्यासारख्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी असल्यामुळे मी माझे मन त्यातच रमवतो :)

आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते?

एक गोष्ट सांगा ही शक्ती (समजा तुम्ही मानत असाल किंवा नसाल तरीही) काहीही करत नाही किंवा काहीही करणार नाही हे तुम्हाला नक्की कोणी सांगितले?त्या शक्तीचे तुम्ही थोडीच बॉस लागून गेलात की "मी अमुक एक कारवाई करणार आहे" असे त्या शक्तीने तुम्हाला (किंवा अन्य कोणालाही) सांगावे.अनेक वेळा अनेक गोष्टींचा कार्यकारणभाव वरकरणी समजत नाही पण अशा गोष्टी नक्की का झाल्या त्याचा उलगडा नंतर होतो. म्हणजे सुरवातीला नुसते डॉट्स दिसतात पण ते नक्की कसे कनेक्ट होतात ते आपल्याला नंतर कळते (किंवा अनेक वेळा कळतही नाही) म्हणजे याचा अर्थ जी काही शक्ती आहे ती नाहीच किंवा असलीच तर हातावर हात ठेऊन स्वस्थ बसली आहे अशा स्वरूपाचे अर्थ काढायला तुमच्यासारखे लोक स्वतंत्र आहेतच. एखादी गोष्ट नक्की का होते हे कळले नाही तर आपल्या आकलनात किंवा विश्लेषणात काही कमी पडत आहे हा अर्थ काही लोक काढतात आणि इतर काही आपण स्वतःला सोडून सगळ्या जगावर खापर फोडतात.तुम्ही जो प्रकार करत आहात तो नक्की कुठच्या कॅटेगिरीमध्ये आहे ते तुम्हीच बघून घ्या.

की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे?

परत एकदा. कर्मविपाकाच्या सिध्दांतात काही चूक आहे की तुमचे इंटरप्रिटेशन चुकत आहे याचा विचार जमल्यास करा. जे काही होणार आहे ते सगळे माझे कर्म आहे त्यामुळे मी त्यात काहीच करू शकत नाही असा चुकीचा अर्थ आपण लावायचा (असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी) आणि स्वतः मूर्ख बनायचे.आणि त्याउपर दोष इतरांवर (कर्मविपाकाच्या सिध्दांतावर) ढकलायचा--- मजाच आहे की नाही?

जेपी's picture

18 Dec 2014 - 5:33 pm | जेपी

समाजाच्या सांगण्यावरुन बायकोला वनवासाला पाठवणारा राम श्रेष्ठ की नरकासुराच्या तावडीत पिचत पडलेल्या 16000 बायकांचा तारणकर्ता किस्ना श्रेष्ठ?
(माझ मत राम कल्पना आहे.किस्ना मानवी धुर्त राजकारणी)

>>माझ मत राम कल्पना आहे.किस्ना मानवी धुर्त राजकारणी

माझ्या एका मित्राचं मत अर्थात जे मलाही पटतं, रामायण जे काही सांगतं त्यात सगळ्या आदर्श गोष्टी येतात. त्यात एखादी गोष्ट एकतर काळी असते किंवा पांढरी. महाभारत त्यामानाने वास्तवात येतं आणि काळ्यापांढर्‍याच्या निरनिराळ्या छटा दिसतात. म्हणून किसना (मिपावरचा नव्हे) धूर्त राजकारणी असला तरी त्याला आदर्श ठेवावं. ;)

जेपी's picture

18 Dec 2014 - 5:51 pm | जेपी

किस्ना मानवी पातळीवर असल्यामुळे त्याच्या लिला आवडतात *biggrin*

बाकी कुणाला श्रेष्ठ मानायच हा प्रश्न टणाटण लोकांसाठी आहे.

(मोबल्यावर क्रुष्ण टायपता येत नसल्यामुळे किस्ना म्हणणारा) जेपी

अभ्यासकांच्या (पक्षी: वल्ली मृत्युंजय इ.) म्हणण्यानुसार बायकोला वनवासात पाठवण्याचा प्रसंग मूळ रामायणात नाही.

सौंदाळा's picture

18 Dec 2014 - 5:44 pm | सौंदाळा

प्रत्येकाच्या या बाबतीत काहीतरी कल्पना असतात
त्यावर चर्चा - वाद्विवाद करुन रोजच्या जीवनात नक्की काय फायदा होतो? सिरियली विचारतो आहे
देव संकल्पना समजली, पटली, नाही पटली माझी या विषयातली आधीची मते बदलली किंवा नाही बदलली तर माझ्या किंवा चर्चेत भाग घेणार्‍या इतरांच्या आयुष्यात काही विधायक किंवा विघातक बदल घडु शकतो का?
कोणाचा असा वैयक्तिक अनुभव आहे का?

अवांतर : मोठ्ठा मासा जाळ्यात सापडला की येतो परत धाग्यावर
गावेलच १-२ दिवसात ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Dec 2014 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे

दु:खं खूप आहेत. पण इतकी कामं पडलीत की दु:ख करायला वेळच मिळत नाही. खरंच :)

असंका's picture

19 Dec 2014 - 10:23 am | असंका

+१

आणि चांगलं काम केल्यानं जो आनंद मिळतो, त्याने इतर सगळ्या दु:खांवर फु़ंकर घातली जाते.

विटेकर's picture

19 Dec 2014 - 9:56 am | विटेकर

चर्चा नेह्मीच्या सरळ धोपट मार्गाने जात आहे ! जियो मिपाकर्स !

चला इथून चालते होण्याची वेळ झाली ... वास्तविक क्लिण्ट्न यांना अधिक वाचायला आवडले असते.

पैसा's picture

19 Dec 2014 - 10:39 am | पैसा

या एवढ्या मोठ्या विश्वाचा आदि अंत कुणाला माहित नाही. या पसार्‍यात आपण अगदी क्षुद्र जंतूएवढे सुद्धा नाही. एकूण सगळ्या विस्तारात अमीबाइतकीच आपली किंमत असेल नसेल. मग त्यामागची योजना, किंवा ते कसे चालते हे आपल्याला एका जन्मात कसे कळणार? कळणार नसेलच तर मग डोके आणि वेळ तरी कशाला खर्च करायचा?

लिव ह्याप्पीली यामागे फक्त प्रॅक्टिकल विचार असावा. की आधीच आपल्या मागे भरपूर व्याप ताप असतात. मग त्यात कालचे दु:ख आणि उद्याची चिंता यांची भर घालून आहे ते दु:ख शतगुणित कशाला करा? आनंद, दु:ख जे काही असेल ते आजचे आज संपवा. आपला आनंद किंवा दुसर्‍याचे दु:ख शेअर करून दुसर्‍या दु:खी जीवाला जर थोडा रिलीफ देता येत असेल तर का न द्यावा? कारण आपले दु:ख दुसर्‍याला सांगितले की त्याची तीव्रता कमी होते आणि आनंदात दुसर्‍याला सहभागी करून घेतले की त्याचाही मूड जरा सुधारतो हा बहुसंख्यांचा अनुभव आहे.

जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही.

या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू नाहीत का? एकाचे दु:ख हा दुसर्‍याचा आनंद असू शकतो ना? एकीकडे भरती आली की दुसरीकडे ओहोटी आलेली असते ना? अनुभवणार्‍या व्यक्तीप्रमाणे अनुभव बदलेल.

सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही.

सर्वव्यापी सर्वशक्तीमान देव ही कल्पना माणसानेच निर्माण केलेली नव्हे काय? माणूस नव्हता तेव्हाही हे विश्व चालू होते आणि माणूस संपल्यावरही ते चालू असेल. माणूस नसता तर हा माणसाने कल्पना केलेल्या स्वरूपातला देवही नसता. मात्र हे विश्व असतेच असते. इतका विचार करणे आपल्याला रोज शक्य नसते. लहान असताना आपल्याला आईवडील रक्षणकर्ते असतात. मोठा झाल्यावर ते त्या रूपात उपलब्ध नसतात. म्हणून त्यावेळी माणूस लहान मुलासारखा कोणावर तरी भार टाकत असतो. नाहीतर बहुसंख्यांना जगणे कठीण होईल रे! कारण या दु:खातून, संकटातून आपण कसे बाहेर पडू याचे उत्तर माहित नसते ना! मग प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचे आहेत तसेच माहीत नसलेले उत्तर आपल्या आवाक्याबाहेर आहे पण आहे नक्की, अशी स्वतःची समजूत घातली की जगायला एक खरा/खोटा आधार तरी मिळतो.

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:35 pm | गौरी लेले

सुंदर लेखन सतिश !

तुमचे लेखन नेहमीच विचार प्रवर्तक असते , शिवाय वरील एका प्रतिसादात तुम्ही जे रेफरन्सेस दिले आहेत ते पाहुन आपण नेहमीच अभ्यासपुर्ण बोलता हे जाणवले .

आपले असे अधिक लेखन वाचायला आवडेल :)

संपादित