रेड सिग्नल

अद्द्या's picture
अद्द्या in काथ्याकूट
16 Dec 2014 - 6:45 pm
गाभा: 

इथली माझी पहिलीच पोस्ट आहे . . काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या .

ऑफिसचं फुकटचं इंटरनेट वापरून चांगली गाणी / सिनेमा डाउनलोड करणे . आणि ते तिथेच बघत/ ऐकत बसणे या पेक्षा दुसरी मजा नाही . . त्यातही तो कुठला डब केलेला तमिळ / तेलगु सिनेमा असेल . तर मग . . आहाहाहा . काल हि हेच चाललं होतं . .आणि तेवढ्यात . फोन वाजला . कोण आहे हे न बघता मी उचलला . आणि मी काही बोलायच्या आतच . समोरून आवाज आला . " घरी येणार आहेस कि नाही आज . कि तिथेच गादी टाकून दिलाय तुमच्या मालकाने . घर आहे म्हणावं मला . " आणि फोन कट .
माझा चेहरा बघून माझा HOD म्हणाला . " मा का फोन था क्या ? .
मी म्हणलो . " हा . " आणि वेळ बघितली . . ९ वाजले होते. ७ वाजता पोचलो पाहिजे होतो मी घरी . . बॉस ला म्हटलं उरलेला सिनेमा उद्या बघू . .. .
गडबडीत निघालो . . आणि मग एक सिग्नल . .
सिग्नल ला थांबलो होतो. मागे एक होंडा सिविक वाले काका . आणि त्या मागे ' के एस आर टी सी ' .
आणि भारतीय प्रथे प्रमाणे . शेवटचे १० सेकंद असतानाच . कार वाल्याने जोर जोरात होर्न मारायला सुरुवात केली . या अपेक्षेने कि मी निघेन. पण . फक्त मागे बघितलं त्याच्याकडे . एक विचित्र चेहरा केला . . आणि तिथेच थांबलो . .
शेवटचे ६ सेकंद . . त्याने आपली गाडी जवळपास माझ्या गाडीला आणून लावली होती . खिडकीतून हात काढून काही तरी बडबडत होता . डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे मला फार काही ऐकू आलं नाही . . उगाचच बैला सारखी . एकदा होय म्हणून . एकदा नाही म्हणून मुंडी हलवली . आणि त्याला इशारा केला . जायचं असेल तर डोक्यावरून जा . सिग्नल सुटे पर्यंत मी नाही हलणार .
झक मारत बसला शांत . सिग्नल हिरवा झाला . आणि मी आरामात निघालो .या विचारात कि जाताना एखाद्या हॉटेलात "थाळी" ओरपावी . कि आपलं गप्प घरी जाऊन वरण भात खाउन सुखी राहावं . आणि एकदमच . एक सिविक माझ्या उजव्या बाजूला होती . डाव्या बाजूला सरकत होती . एक वेळ अशी आली कि मी अडकलोच होतो पूर्ण . थांबवली गाडी .
साहेब उतरले सिविक मधून . . मी तर गाडीवरच होतो . त्यानंतरचं संभाषण असं काहीसं झालं .
तो :- (प्रचंड चिडलेला . आणि आवाज रागामुळे टिपेला पोहोचलेला ) स्वतःला हरिश्चंद्राची औलाद समजतोस काय बे . . पुढे का नाही गेलास . उगाच थांबून काय उखडत होतास . .
मी (त्याच्या या वाक्यामुळे मला राग कमी आणि हसू जास्त येत होतं . . आवाजात थंडपणा ) :- तुम्ही काय सेबेस्तियन वेटेल चे वडील आहात का . ३ सेकंद वेळ झाला तर रेस हरणार आहात का.
तो (बहुतेक वेटेल कोण हे माहित नसावं . ) :- फोकलीच्या . उलटून बोलतोस . तुझ्या बापाच्या वयाचा आहे मी . .
मी :- म्हणूनच अजून पर्यंत आवाज नाही चढलेला . . गप्प निघ आता इथून . एक तर भूक लागले . घरी जायला वेळ होतोय मला .
तो :- च्यायला . बापाच्या पैशावर गाडी घेऊन माज करतोस होय रे भाड्या . साल्या तुझ्या अक्ख्या गाडीच्या किमतीत माझ्या गाडीचं बम्पर पण येत नाही .
मी ( हा कुठला विषय कुठे नेतोय हा विचार करत . ) :- म्हणूनच सांगतोय . गप्प निघ इथून . उगाच गाडीवर खर्च करायला लागेल नाही तर . आणि हो . राहिला विषय मी माज करतो याचा . तर बाप माझा आहे . आणि पैसे पण माझे आहेत . त्याचं मी काहीही करेन . आता निघ इथून . आणि मला पण जाऊदे . डोकं नको फिरवू . मारामारी करायचा मूड नाहीये अजिबात .
तसा तो थोडा काटक होता . त्यामुळे . जरी काही झालं तरी सांभाळू शकेन एवढी खात्री होती . एव्हाना गाडीवरून उतरून मी समोर थांबलो होतो त्याचा . उंचीला पण कमी होता . त्यामुळे . कमीत कमी स्वतःला वाचवू तरी शकलो असतोच आरामात .
पण . काय झालं काय माहित . फिरला परत तो . गाडीत बसता बसता पुटपुटला . "आजकालची मुलं . उलटून उत्तर देतात मोठ्यांना . . आई बापाने काही शिकवलं नाही वाटतं . इत्यादी इत्यादी .
गाडी चालू करता करता मी ओरडलो . "आज कालचे मोट्ठे . सिग्नल पण पाळता येत नाही . . .
आता तो चिडून मला मारायला येतोय असं वाटत असतानाच . ट्राफिक पोलिस आला . त्याने हे सगळं पाहिलं होतं.
कार वाल्याला मागे ओढलं . आणि मला म्हनला . "मनेग होगो मगने . झगडा माडतान रस्ते मेले . कत्ती " (घरी जा . रस्त्यात भांडत बसलाय गाढव )
त्याला उत्तर दिलं तर मी पण अडकलो असतो . . तिथून जी सुटलो तो डायरेक घरीच .

तर . नमनाला घडा भर तेल घालून आणी मूळ प्रश्न विचारायचं सोडून हजार कडे भटकून आल्यानंतर हा प्रश्न . .
शेवटचे ५-६ सेकंद थांबायला काय जातं लोकांच . ?
एवढे पण पेशन्स नाहीत का ? कि ५ सेकंदाने का होईना . पण कायदा मोडतोय राजरोस . आणि आपल्याला कोणी काही करू शकत नाही याची खात्री वाटते . कि याचा कुठे तरी अभिमान वाटतो ?

प्रतिक्रिया

कुडंट अग्री मोर. इवरु दोड्ड मंदी निजवागि येन विचारिसतारे यारिगे गोत्तु. इवरिगे हिंगे माडबेकु. वयसगियस येऽनु नोडबारदु, तप्प इद्दरे औरदु मारिम्याले हेळबेकु. वयस जास्ति अंद्रे येन बेकाद माताडोद लायसन्स शिक्कावरु हंगे वर्तिसतारे. ई लेख ओदम्याले बहळ संतोष आतु पा.

(यावागरे ईतर्‍हा माडोद इच्छे इरुव आदरे ओंदसरे कूडा चान्स सिक्किल्लुव) बॅटमॅन.

मराठी संस्थळावर अगम्य भाषेत चर्चा चाल्ले. णिशेढ आगलेबेकू. m.M

हे तुम्ही माताडावे यातच खरी मजा बरली बघा. ;)

अद्द्या's picture

16 Dec 2014 - 8:55 pm | अद्द्या

होउदु . खरे इष्टे कन्नड बरल्लो ननगे

जेपी's picture

16 Dec 2014 - 7:02 pm | जेपी

@बॅटमॅन-काय लिवलय?

बॅटमॅन's picture

16 Dec 2014 - 7:05 pm | बॅटमॅन

ही मोठी माणसे स्वतःला काय समजतात त्यांचं त्यांनाच माहिती. यांना असंच पाहिजे. चूक असेल तर वय वगैरे न पाहता तोंडावर सांगता आले पाहिजे. वय वाढलं म्हणून वाट्टेल ते बोलायचं लायसन्स असल्यागत वागतात हे लोक. लेख वाचून खूप बरे वाटले.

(असे कधीतरी करायला मिळावे अशी इच्छा असलेला परंतु एकदाही चान्स न मिळालेला) बॅटमॅन.

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 7:46 pm | टवाळ कार्टा

(असे कधीतरी करायला मिळावे अशी इच्छा असलेला परंतु एकदाही चान्स न मिळालेला) बॅटमॅन.

तु चक्क पुण्यनगरीत पाउल ठेवले नाही अजून???

तिथेच असूनही असा चान्स काही नै मिळाला. इन्शागणपती मिळेलही.

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 10:45 pm | टवाळ कार्टा

इन्शागणपती >> =))

"इन्शागणपती" हा शब्द आवडल्या गेला आहे.

बाकी बरीचशी चर्चा पांडूरंगाच्या भाषेत असल्यामुळे ईल्ले.

सिरुसेरि's picture

16 Dec 2014 - 7:29 pm | सिरुसेरि

कन्नडा मातडा बरते इल्ला , तमिळ सोलंगा सुल्ला , आंध्रा तेलुगु चप्पंडी चप्पू .
बाकी कर्नाटकात ( बेंगलोर ? ) तो होंडा सिविक वाला काका नेमका मराठीच निघाला हा योगायोग दिसतोय .
आणी उपेन्द्रा , गणेश , सुदीप या मंडळींना नमस्कार .

तुम्ही चेन्नैचे/च्या का ओ? 'सिरुसेरि' वरून विचारले.

(कोणे एके काळी सिरुसेरीत जायचा चान्स असलेला) बॅटमॅन.

यसवायजी's picture

16 Dec 2014 - 7:48 pm | यसवायजी

बाकी कर्नाटकात ( बेंगलोर ? )
भौशा, KA22 असेल.

अद्द्या's picture

16 Dec 2014 - 8:54 pm | अद्द्या

नाही . बेळगाव . . :)

आतिवास's picture

16 Dec 2014 - 7:44 pm | आतिवास

हं!
या प्रश्नांची उत्तरं एकदा कळली, की 'सिग्नल तोडण्याचा' प्रश्न शिल्लकच राहणार नाही!

आयुर्हित's picture

16 Dec 2014 - 7:45 pm | आयुर्हित

त्या काकांना भडकायचे कारण काय होते?
आपल्या गाडीचा क्रमांक महाराष्ट्रातील आहे काय?
कदाचित त्याला जोराची ...लागली होती! असे समजून सोडून द्या.

अद्द्या's picture

16 Dec 2014 - 8:56 pm | अद्द्या

हे होतंच जवळपास सगळी कडे . आणि मी काही केल्या हलत नाही ग्रीन सिग्नल झाल्या शिवाय . त्यामुळे असे वाद भरपूर झालेत . .

ननगे कन्नड तिळितदं

यसवायजी's picture

16 Dec 2014 - 11:08 pm | यसवायजी

आदरे येन माडोन अंतीरा?

मितभाषी's picture

17 Dec 2014 - 8:39 pm | मितभाषी

ननगे कन्नड बुर्गेदील्ला.
कॅळ्सा मारतॅडवा... ;)

पहिलाच लेख आहे होय? चांगलं लिहिलंयत की! अभिनंदन.

पण एक शंका- ट्रॅफिकचा एकही नियम आपण कध्धी म्हणजे कध्धी तोडलेला नाहिये? विचार करून बघा- डोक्यावर केस कमी असतील इतके ट्रॅफिकचे नियम आहेत भारतात.

कसेही असले तरी कीप इट अप!!

अद्द्या's picture

17 Dec 2014 - 12:56 am | अद्द्या

माहित नाही । पण जेवढे नियम माहिती आहेत ते तरी कधी नाही तोडले . :)

असंका's picture

17 Dec 2014 - 1:03 am | असंका

ग्रेट! अभिनंदन....

वेल्लाभट's picture

17 Dec 2014 - 9:53 am | वेल्लाभट

मी असंच करतो. नेहमी. करत राहणार. काही जण समजतात. पण ९०% थयथयाट करतात. सवय झालीय मला. उलट मजा येते. हे वैचारिक अतिरेकी भारतातून, जगातून जोवर नष्ट होत नाहीत तोवर समस्या संपणार नाहीत.

तुमचं कौतुक! आणि हे समाजकार्य असंच चालू ठेवा!

अद्द्या's picture

17 Dec 2014 - 6:32 pm | अद्द्या

स्वतःच्या सुरेक्षेचे नियम पाळण्याला समाजकार्य म्हणता येईल कि नाही माहित नाही
पण धन्यवाद :)

वेल्लाभट's picture

18 Dec 2014 - 2:06 pm | वेल्लाभट

पाळणं समाजकार्य नसलं तरी पाळायला भाग पाडणं समाजकार्य नक्कीच आहे.

स्वधर्म's picture

17 Dec 2014 - 12:09 pm | स्वधर्म

की ते तोडणं अवघड असेल. सिग्नल पाळूनच माणसाचा फायदा होईल. आपल्याकडे ज्या प्रकारे सिग्नल बसवले जातात, त्याकडेही बघण्याची गरज आहे. लोकांना दोष देणं सोप आहे, पण सिस्टीमच अशी असेल की दुरूपयोग करण अवघड आहे, तर जास्तीत जास्त लोक सिग्नल पाळतील, व हा प्र्श्न काही प्रमाणात सुटेल. अर्थात तरीही काही बेशिस्त लोक असतीलच, पण बहुसंख्य लोक 'नीट' वागतील. या साठीच्या दोन संकल्पना इथे पहायला मिळतील.
- स्वधर्म

प्यारे१'s picture

17 Dec 2014 - 12:38 pm | प्यारे१

मला हा लेख वाचून 'संक्षिप्त आंतरजालीय किस्सा' रुपकात्मक रितीनं मांडलाय की काय असं वाटलं.

असो. बदलीन. :)

सस्नेह's picture

17 Dec 2014 - 6:29 pm | सस्नेह

चष्मा तपासून घ्यावा.

प्यारे१'s picture

17 Dec 2014 - 10:24 pm | प्यारे१

चालतंय.

अद्द्या's picture

17 Dec 2014 - 6:32 pm | अद्द्या

म्हणजे नक्की काय ?

प्यारे१'s picture

17 Dec 2014 - 10:24 pm | प्यारे१

समदा उलगडून सांगायचा काय रे तुला? ;)

मितान's picture

17 Dec 2014 - 8:30 pm | मितान

व्वा !
चांगलं लिहिलंय. मी पण असंच करते. रस्त्यावर माझ्यासमोर कोणी कचरा टाकला किंवा थुंकले तर आजूबाजूच्या लोकांना कळेल अशा पद्धतीने तो माणूस आणि कचरा आलटुनपालटून जमेल तेवढा वेळ बघत राहते. काही खजिल होतात काही पळुन जातात.. !

hitesh's picture

17 Dec 2014 - 10:32 pm | hitesh

सिग्नलच्या बाबतीत हा पर्याय कसा वापरणार ?

गाडीवाला , गाडी , सिग्नल याकडे आळीपाळीने बघत बसणार का ?

मितान's picture

18 Dec 2014 - 12:02 am | मितान

मी कुठे तसं म्हणाले ? :)

वेल्लाभट's picture

18 Dec 2014 - 2:08 pm | वेल्लाभट

नेव्हर माईंड