अभंग "चरणी ठेवुनी माथा…"

सार्थबोध's picture
सार्थबोध in मिपा कलादालन
12 Dec 2014 - 8:48 am

शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो.

माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे.

चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे,
शब्द - सचिन पु. कुलकर्णी (www.saarthbodh.com)
संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले,
ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप,
ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई.
गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित.

अभंगाची लिंक इथे देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=erzGKkzpYbc

शब्द -

चरणी ठेवुनी माथा.......गुरुराया वंदिन माझा ll धृ ll

तैसे माझे मन व्याकुळले, चरणी विसावले,
श्री चरणा, गुरु चरणा ll १ ll

वनी काननी तुजला, शोधिले त्रिभुवनी या
कोण तुजवीण त्राता, दाव पाऊले सत्वरा ll २ ll

दैन्य दु:ख झाले बहु, पापवासना चित्ता
कसा सावरू आता, कृपा करी गुरुराया ll ३ ll

Website Link -
http://www.saarthbodh.com/2013/10/blog-post_14.html

धन्यवाद,
- सार्थबोध

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

12 Dec 2014 - 10:03 am | पाषाणभेद

अभंग ऐकला नाही पण शब्दकळा उत्तम आहे. नंतरऐकेनेच

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 10:10 am | सतिश गावडे

तुमच्या ब्लॉगचे टेम्प्लेट लैच गचाळ आहे राव. जरा चांगले टेम्प्लेट लावा की. ढीगानी आहे ब्लॉगरवर.

मुक्त विहारि's picture

12 Dec 2014 - 11:08 am | मुक्त विहारि

आवडले...

तुमचा ब्लॉग पण बघीतला.

जमल्यास थोडे अजून सजवता आले तर बघा..

सह्मत आहे, नक्की प्रयत्न करतो , तत्सम काही सुचवायला जमेल का तुम्हा दोघाना, धन्यवाद .