गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत

पीनी's picture
पीनी in काथ्याकूट
11 Dec 2014 - 3:06 pm
गाभा: 

नमस्कार,
मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल.
कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही.
आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.
१. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे.
२. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले.
३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील.

सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का?
धन्यवाद.

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 3:29 pm | आयुर्हित

व्यनी केला आहे.

पीनी's picture

11 Dec 2014 - 3:31 pm | पीनी

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2014 - 4:27 pm | टवाळ कार्टा

इथे लिहिता नाही येणार का?...मला आणि बाकीच्यांना सुध्धा उपगोय होईल

यसवायजी's picture

11 Dec 2014 - 4:57 pm | यसवायजी

मं कमिशान कोन देनार??

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 5:29 pm | आयुर्हित

आपल्यासाठी: There is no free lunch in this world हे विसरू नका.
आपण कमिशन चुकवले किंवा टाळले तरी तुम्हाला कोठल्यातरी स्वरुपात त्याची किंमत चुकवावी लागते कारण.....
Newton's third law : Every action has got its own reaction

आणि सल्लागारांसाठी : प्रत्येक कर्माचे फळ हे १००% निश्चित (१००% GURANTEED) मिळणार, त्याबद्दल काळजी करू नकोस, त्याने कर्म करण्यात व्यत्यय येईल व कर्म करणे राहून जाईल किंवा त्याची गुणवत्ता कमी होईल: भगवान श्रीकृष्ण
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। येथे वाचा

यसवायजी's picture

11 Dec 2014 - 5:39 pm | यसवायजी

लैच लागलं की वो तुम्हाला. सॉरी हां.
बाकी, There is no free lunch in this world विरुद्ध The Best Things in Life Are Free. असा धागा काढला तर प्रतिसाद मिळतील काय हो?

बॅटमॅन's picture

11 Dec 2014 - 5:43 pm | बॅटमॅन

खी: खी: खी: =))

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 5:46 pm | आयुर्हित

लागायचं काय त्यात? आमचे basics अगदी पक्के आहे!

पण काय आहे, बऱ्याच लोकांना हे हि माहित नसते त्यामुळे सांगावेच लागते!

येवू द्या कि हा असा नाविन्यपूर्ण धागा! सर्वांना आरोग्यदृष्ट्या तर नक्की फायदाच होईल त्याचा.

क्लिंटन यांचा योग्य प्रतिसाद वाचा. फ्री आहे. :))))

लंबूटांग's picture

11 Dec 2014 - 8:55 pm | लंबूटांग

आमचे basics अगदी पक्के आहे

आणि

Newton's third law : Every action has got its own reaction

?!?!?!

तो लॉ असा आहे हो.

To every action there is always opposed an equal reaction: or the mutual actions of two bodies upon each other are always equal, and directed to contrary parts.

बाकी फायनान्स मधे आपल्याला फारसा विन्टरेस्ट नसल्याने चालू द्या

hitesh's picture

11 Dec 2014 - 5:47 pm | hitesh

अगदी सहमत ! एजंटला पैसे घालुन मिळालेल्या नोकरीपेक्षा फुकट मिळालेल्या नोक्रीत जास्त सुख असते.

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 8:57 pm | मुक्त विहारि

काउने पण हेच केले.

इकडे-तिकडे माहीती गोळा करत फिरण्यापेक्षा, आंतरजालावरच विचारायचे.

आमच्या काउ कडून बरेच सल्ले मिळू शकतात.

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2014 - 10:09 pm | टवाळ कार्टा

पण मुदलात काउ ती आहे का तो? का जो अवतार आहे तोच ग्राह्य धरायचा :)

हे नक्की...

hitesh's picture

12 Dec 2014 - 2:24 pm | hitesh

ज्ञान्स्श्वरानी उड उड रे काऊ

असे म्हटले आहे

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 3:37 am | मुक्त विहारि

ज्ञानेश्र्वर पण लिहीता येत नाही....

असो,

आमच्या काउला पण लिहीता येत नाही.

यसवायजी's picture

13 Dec 2014 - 7:23 am | यसवायजी

ज्ञानेश्वर

hitesh's picture

13 Dec 2014 - 9:28 am | hitesh

ज्ञानेश्वर.

आता तुम्हीही शुद्ध लिहुन दाखवा.

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2014 - 1:25 pm | टवाळ कार्टा

काउचा गीतेवर विश्वास नाहीये

नसतो एखाद्याचा,

पण संतवचने मात्र तोंडपाठ.

आणि अर्थाचा अनर्थ करायला ह्यांच्याकडूनच शिकायचे.

काउ पण असेच काहीतरी बडबडत असते.

असो,

ह्या काउबद्दल एखादा लेख लिहायला हवा.कळपातली काउ म्हणून.आमची काउ डू.आय.डींच्या कुबड्यांशिवाय, एकटी जगूच शकत नाही.

hitesh's picture

12 Dec 2014 - 2:35 pm | hitesh

इकडे आनि तिकडे या कार्यक्षेत्रात आंतर्जाल येत नै का ?

माझीही शॅम्पेन's picture

11 Dec 2014 - 7:47 pm | माझीही शॅम्पेन

ओह काका ..
तुम्ही ही मधुमेहावर धागे काढता त्यावेळी तुम्हालाही अप्रत्यक्ष रीत्या फुकटच माहिती हवी असते नाही का ?
उगाच डोक्याला शॉट लावतय..

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 10:51 pm | आयुर्हित

अप्रत्यक्ष रीत्या फुकटच माहिती ?

माझीही शॅम्पेन's picture

11 Dec 2014 - 11:20 pm | माझीही शॅम्पेन

हे घ्या तुमच्याच धाग्यावर तुम्ही लिहिलेल आठवतय का ?
आक्षेप फक्त फुकट शब्दावर आहे
तिकडे तुम्ही सहज फुकट माहिती पूरवयला सान्गत होतात नाही का ?

ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी.
याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 5:02 pm | आयुर्हित

कोणताही सल्लागार पूर्ण माहिती हाती आल्याशिवाय सल्ला देवू शकत नाही!

आणि वड्याचा मसाला वांग्याला चालत नाही!

असंका's picture

11 Dec 2014 - 5:26 pm | असंका

:-))

खाजगी वित्तसंस्था किंवा इतर संस्थांकडे जा असा सल्ला नाही ना दिलात? निदान काय सल्ला आहे त्याची झलक तरी सांगा, उद्या मिपावर मला असला सल्ला मिळाला म्हणून कोणी शिव्या देत यायला नको!

सुहास पाटील's picture

11 Dec 2014 - 4:22 pm | सुहास पाटील

गृह कर्ज किती फेडले आहे आणि किती बाकी आहे ह्यावर ठरवता येईल. तुम्ही आज पर्यंत किती इंटरेस्ट भरला आहे? बाकी स्टेट बँक + कसला इन्शुरन्स नीट कळेल का?

पीनी's picture

11 Dec 2014 - 4:43 pm | पीनी

हा गृहाकर्जावरचा कंपल्सरी इन्शुरन्स असतो. कर्जाच्या रकमेप्रमाणे हा प्रपोर्शनल असतो.
इंटरेस्ट रेट खूप जास्त असल्याने व डाउन पेमेंट करु न शकल्याने गृह कर्ज फार जास्त फेडले गेले नाही.

सुहास पाटील's picture

11 Dec 2014 - 4:56 pm | सुहास पाटील

तर मग स्टेट बँकेत टाकाच अर्ज. पुठे खूप फायदा अहे. लागुद्यात किती वेळ लागायचा ते.

सुहास पाटील's picture

11 Dec 2014 - 5:00 pm | सुहास पाटील

तुम्हाला प्रॉपर्टि इंशुरंस म्हणायचं का?

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2014 - 4:41 pm | पिलीयन रायडर

हं.. उपयुक्त धागा.. जाणाकारांनी मदत करावी.. आम्हाला पण चार पैशे वाचवता येतील.

प्यारे१'s picture

11 Dec 2014 - 4:47 pm | प्यारे१

एक्सेल शीट बनवावी.
आतापर्यंत किती पैसे भरले, किती भरायचे आहेत वगैरे.
त्यानंतर चालू स्थितीत भरावयाची रक्कम, क्रमांक १ नुसार बदल, क्रमांक २ नुसार बदल इ. प्रकार करावेत.
शेवटला (म्हणजे हप्ते संपताना) कुठली रक्कम कमी वाटते ते पाहून निर्णय घ्यावा.
(फक्त कमी रक्कम हाच मुद्दा असेल तर. अन्यथा नवीन बँकमध्ये काय पद्धतीनं काम होतं किती उशीर लागतो हे सुद्धा तपासून घ्यावं.)

hitesh's picture

11 Dec 2014 - 5:00 pm | hitesh

असल्या गोष्टी अल्टर बिल्टर करु नयेत... पैसे भरत बसा आणि जे घर घेतले आहे त्यात सुखाने रहा.

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 8:54 pm | मुक्त विहारि

काउ पण तिसर्‍या मुंबईत घर घेणार आहे म्हणे.

आता ती काय करते ते बघू.

hitesh's picture

12 Dec 2014 - 2:27 pm | hitesh

ती नै तो ...

उड उड रे काऊ

क्लिंटन's picture

11 Dec 2014 - 6:00 pm | क्लिंटन

मी एक एक्सेल शीट बनवून बघितली. त्यात कर्जाची रक्कम ५० लाख धरली आणि २५ वर्षांसाठीचे कर्ज असेल असे गृहित धरले.

जर ११.२५% ने तुम्ही कर्ज घेतले असेल तर दर वर्षाला ई.एम.आय साठी सुमारे ६,०४,६०० रूपये भरावे लागतील. कर्ज जर १०.१०% ने मिळत असेल तर दर वर्षाला ई.एम.आय साठी सुमारे ५,५५,००० रूपये भरावे लागतील.म्हणजे ई.एम.आय साठी सुमारे ४९,६०० रूपये दर वर्षी वाचतील.म्हणजे दर महिन्याला ४ हजार पेक्षा जास्त रूपये वाचतील.

तसेच १ लाख रूपये प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागतील.समजा हे एक लाख रूपये एकरकमी एफ.डी ला लावले तर ८% व्याज येईल असे समजू. या एफ.डी मधून २८ महिन्यांनंतर सुमारे १,२०,००० रूपये मिळतील. आज हे एक लाख रूपये एफ.डी मध्ये न टाकता प्रोसेसिंग फी म्हणून भरले आणि कर्ज स्टेट बँकेकडे शिफ्ट केले तर दर महिन्याला ४ हजार १२० रूपये वाचतील. अगदी शिस्तबध्द पध्दतीने वागले तर तांत्रिकदृष्ट्या या ४१२० रूपयांचे रिकरिंग करता येईल आणि त्यावर थोडे जास्त व्याज मिळेल.पण असे वाचलेले पैसे रिकरिंग मध्ये न जाता अधिक खर्चासाठी म्हणून बचत खात्यातच बहुतांश वेळा ठेवले जातात.त्यामुळे त्यावर ४% व्याज मिळेल असे धरले तर २८ महिन्यांनी १ लाख २० रूपये तुमच्याकडे साठतील. याचाच अर्थ तुम्ही दर महिन्याला जे ४१०० रूपये वाचविणार आहात (आणि त्यासाठी १ लाख रूपये प्रोसेसिंग चार्ज भरणार आहात) त्यासाठीचा ब्रेक इव्हन २८ महिने इतका असेल.

एक्सेलमध्ये पी.एम.टी म्हणून एक फंक्शन असते त्यातून आपल्याला किती ई.एम.आय बसेल हे काढता येते. उदाहरणार्थ ५० लाखावर ११.२५% ने २५ वर्षांसाठीचे हप्ते काढायचे असतील तर =PMT(११.२५%, २५, ५००००००) असे एक्सेलमध्ये लिहिल्यास दर वर्षी ६,०४,५६७.२५ इतका हप्ता येईल हे समजेल. दर महिन्याचा ई.एम.आय काढायचा असेल तर व्याज ११.२५% भागिले १२ बरोबर दर महिन्याला ०.९३७५% तर मुदत २५ वर्षे म्हणजे ३०० महिने असे धरून =PMT(०.०९३७५%,३००,५००००००) असे एंटर केल्यास महिन्याचा हप्ता ४९,९११.९८ आहे हे कळेल.

काही मुद्दे:
१. महिन्याला ११.२५% व्याज त्या मानाने बरेच जास्त वाटत आहे. पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक १०.२५% ने कर्ज देतात.तसेच साधारणपणे फेब्रुवारीमध्ये व्याजाचे दर कमी झाले तर त्यापुढे २-३ वर्षे तरी दर त्यामानाने कमीच असतील अशी चिन्हे आहेत. गृहकर्जामध्ये पहिले २-३ वर्षे जास्त कठिण असतात.नंतर पगार वाढले की कर्जाच्या हप्त्यांचा बोजा तितका वाटत नाही.तेव्हा सध्याच्या परिस्थितीत पहिल्या २-३ वर्षांमध्ये फ्लोटिंग रेटवर कर्ज घेणे इष्ट असा विचार मी केला होता.

२. बॅंका प्रोसेसिंग फी सांगताना अनेक गोष्टी सांगत नाहीत.म्हणजे प्रोसेसिंग फी २५,००० अशी सांगितली तरी CERSAI चार्जेस, घराचा विमा,लीगल सर्च, लीगल ऑडिट,दोन व्हॅल्युएशन रिपोर्टचे चार्जेस, इनकम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन चार्जेस इत्यादी अनेक गोष्टी असतात.या सगळ्या गोष्टींसाठी अजून १२-१४ हजार रूपये भरावे लागू शकतील. तसेच एकूण कर्जाच्या रकमेच्या ०.२% इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल ती वेगळीच.तसेच कर्ज मिळाल्यापासून ३० दिवसात मॉरगेज क्रिएशन करावे लागते.त्यासाठी अजून १०-१२ हजार खर्च येईल.तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे विमा+प्रोसेसिंग हा खर्च १ लाखापेक्षा जास्त होऊ शकेल. त्यात अजून काही छुपे चार्जेस आहेत का याची पण पडताळणी करून घ्या. एल.आय.सी कडून कर्ज घेताना तुम्ही जो खर्च केला असेल तो मात्र फुकट जाईलच.पण कर्ज शिफ्ट करायचे की नाही हा निर्णय घेताना एल.आय.सी कडे तुम्ही जे प्रोसेसिंग आणि इतर चार्जेस दिले असतील त्याचा अंतर्भाव करू नये कारण शेवटी ती एक "संक कॉस्ट" आहे.

३. एल.आय.सी च्या कर्जाची लवकर परतफेड केलीत तर त्यासाठी काही चार्जेस्/पेनल्टी नाही ना याची खात्री करून घ्या.

४. सध्या गृहकर्जावरील व्याजावरील कर सवलत दिड लाख रूपये आहे.नव्या दराने कर्ज शिफ्ट केल्यावरही तुम्ही व्याज दिड लाखापेक्षा जास्त भरणार असाल तर काही प्रश्न नाही. पण समजा नवीन ठिकाणी व्याज समजा १ लाख ४० हजारच भरणार असाल तर तुमचे करपात्र उत्पन्न १० हजारांनी वाढेल आणि त्यावर ३०% च्या ब्रॅकेट मध्ये असाल तर ३ हजार आयकर भरावा लागेल त्याचाही कॅल्क्युलेशनमध्ये अंतर्भाव करायला लागेल.

तसेच तुम्ही बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला असेल तर त्याचे महापालिकेकडून कन्व्हेयन्स झाले आहे का हे पण बघून घ्या. नव्या मुंबईत अनेक ठिकाणी महापालिकेचे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे पण कन्व्हेयन्सची प्रक्रिया चालू आहे.जर कन्व्हेयन्स झालेले नसेल तर काही बँका गृहकर्ज देत नाहीत.तसेच कन्हेयन्सची प्रक्रिया चालू आहे पण कन्व्हेयन्स झालेले नाही अशा परिस्थितीत प्रॉपर्टीवर मॉरगेज क्रिएट करायच्या आधी बिल्डरची एन.ओ.सी लागेल का हे पण बघून घ्या.आणि अर्थातच बिल्डर अशी एन.ओ.सी फुकटात देत नसतो.आणि आपले हात दगडाखाली असतील तर तो सांगेल ती रक्कम आपल्याला देणे भाग असते.असे झाल्यास पहिल्या प्रोसेसिंग साठी आणखी खर्च येऊ शकेल.

शेवटी सगळ्या गोष्टी आकड्यांवर आणि एकूणच या प्रकाराला किती वेळ जाईल आणि मधल्या काळात किती खेपा घालायला लागतील आणि किती त्रास होईल यावर अवलंबून असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.तरीही तो निर्णय घेताना नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा यासाठीची एक दिशा दाखवायचा प्रयत्न या प्रतिसादातून केला आहे. जर आकडेमोड करताना, एक्सेलसाठी काही मदत लागली तर जरूर व्य.नि करा.

प्यारे१'s picture

11 Dec 2014 - 6:14 pm | प्यारे१

__/\__

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद!

मोदक's picture

11 Dec 2014 - 6:18 pm | मोदक

+१

रेवती's picture

11 Dec 2014 - 9:44 pm | रेवती

+१

क्लिंटन मस्तच प्रतिसाद

फक्त प्रोसेसिंग फी हल्ली इतकी नसते
१७ लाखांवर बहुतांश ब्यान्कांनी मला जास्तीत जास्त ८००० पर्यंत फी सांगितली ( सगळे चार्जेस पकडून )
त्यावर मला एकही रुपया द्यावा लागला नाही , मी फायनल केलेली ब्यांक IDBI

त्यामुळे ५० लाखांवर एक लाख प्रोसेसिंग फी, ये बात कूच जमि नाही

सुबोध खरे's picture

11 Dec 2014 - 8:15 pm | सुबोध खरे

अरे वा
स्पा नवीन घर घेतो आहे हे कळले.
भूमिपूजनाचे आणि त्यानंतरच्या पोटपूजेचे आमंत्रण केंव्हा येणार? आम्हाला मध्यवर्ती केंद्रवर्ती किंवा चक्रवर्ती कोणतेही ठिकाण चालेल.

स्पा's picture

11 Dec 2014 - 8:38 pm | स्पा

नाय हो डाॅक.
घर घेउन चार वर्ष झाली , m talking bout transferring the loan

फक्त प्रोसेसिंग फी हल्ली इतकी नसते
१७ लाखांवर बहुतांश ब्यान्कांनी मला जास्तीत जास्त ८००० पर्यंत फी सांगितली ( सगळे चार्जेस पकडून )

प्रोसेसिंग फी ०.५% ते १% असते.कधीकधी काही ऑफर असली तर प्रोसेसिंग फी मध्ये सवलत मिळते. अशा ऑफरच्या जाहिराती गुढीपाडवा, दसरा यावेळेला बघितल्याचे आठवते. तसेच वरील प्रतिसादात जो १ लाख हा आकडा लिहिला आहे त्यात प्रोसेसिंग फीबरोबरच विम्याचाही समावेश आहे.हा विमा मी पण घेतला आहे. कर्ज आऊटस्टॅन्डिंग असताना जर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी जेवढे कर्ज ऑटस्टॅन्डिंग आहे तेवढ्या रकमेची भरपाई बँकेला करते म्हणजे कर्जदाराच्या कुटुंबियांना अडचण येत नाही. समजा कर्ज ५० लाखाचे आहे. कोणत्याही गृहकर्जात पहिली १० वर्षे ई.एम.आयचा बराचसा भाग व्याजासाठी जातो तर मुद्दल त्यामानाने बरेच कमी फेडले जाते.११.२५% व्याजावर पहिल्या ५ वर्षात केवळ ५% तर १० वर्षात सुमारे १३.५% इतकेच मुद्दल फेडले जाते.हा विमा 'रिड्युसिंग बॅलन्स' वर असतो. म्हणजे कोणत्याही क्षणी जितके कर्ज आऊटस्टॅन्डिंग आहे तितकेच हा विमा कव्हर करतो (सुरवातीला १००%, ५ वर्षांनंतर ९५%, १० वर्षांनंतर ८६.५% इत्यादी). २५ वर्षांसाठीच्या कर्जाला एकूण कर्जाच्या साधारण २% इतका एकरकमी प्रिमिअम पडतो.

विमा मीही घेतलेला आहेच पण तरीही ती रक्कम इतकी जात नाही.
काही लिंक्स मिळाल्या तर चेपवतो.

क्लिंटन's picture

11 Dec 2014 - 9:35 pm | क्लिंटन

तुझे वय कमी असल्यामुळे तुला प्रिमिअम कमी लागला असेल.मला २% लागला :(

सुबोध खरे's picture

11 Dec 2014 - 11:04 pm | सुबोध खरे

असा विमा घेणे जबरदस्तीचे नाही.आपला आयुर्विमा असेल( टर्म विमा) आणि याची रक्कम जर आपल्या सर्व वित्तीय जबाबदार्यांपेक्षा जास्त असेल तर आपण या विम्याला नकार देऊ शकता.(आपल्याला आपल्या विम्याचे हप्ते भरल्याच्या पावत्या दाखवाव्या लागतात) मी आय सी आय सी आय बँकेला ठणकावून सांगितले मी घराचा विमा घेणार नाही पटत असेल तर कर्ज द्या नाहीतर खड्ड्यात जा. गपचूप कर्ज दिले.

क्लिंटन's picture

11 Dec 2014 - 11:30 pm | क्लिंटन

हो बरोबर असा विमा घेणे सक्तीचे नाही.तसे बँकेने मला स्पष्टपणे सांगितले होते.तरीही २५ वर्षे हा बराच मोठा कालावधी असतो.२५ वर्षात काय होईल कोणी सांगितले आहे? आणि एकूण कर्जाच्या २% रक्कम म्हणजे तितकी मोठीही नाही विशेषतः ज्या वेगाने जागांच्या किंमती वाढत गेल्या आहेत ते पाहता.तेव्हा मी तरी तो विमा घेणेच पसंत केले.

सुबोध खरे's picture

12 Dec 2014 - 10:18 am | सुबोध खरे

क्लिंटन साहेब
मी आपल्याला काही सांगणे हे चुकीचेच ठरेल. परंतु २० लाखाचे गृह कर्जावर २ टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये होतात.सुरुवातीला हि रक्कम फार जास्त होते कारण मध्यमवर्गीय माणूस एक बेडरूमचे घर परवडत असेल तर आपलि चादर ताणून दोन किंवा दीड बेडरूम चे घर घेतो. त्यामुळे सुरुवातीला त्याची फारच ओढाताण होत असते. या चाळीस हजारात पहिले दोन महिन्याचे हप्ते जातात. शिवाय या विम्यामध्ये शिल्लक रक्कमच परत करण्याचा करार आहे त्यामुळे १५ वर्षांनी आपण जर गेलात तर आपल्या कुटुंबाला शिल्लक असलेले ३-४ लाखच मिळतात. याऐवजी आपण आपला आयुर्विमा २० वर्षाचा (टर्म) घेतलात तर सात हजार एकशे रुपयात आपल्याला ५० लाख रुपयाचा विमा मिळेल ( म्हणजे ४०, ०००० रुपयात सहा वर्षाचा हप्ता आपोआप वळता होईल)( भारती axa चा ४० वर्षे वयाच्या पुरुष तंबाखू न वापरणाऱ्या व्यक्तीचा २० वर्षाचा विमा) https://buyonline.bharti-axalife.com/eProtect/Premium/PremiumCalculation)वय कमी असेल तर हा ह्प्ता अजूनच कमी येईल.
सहा वर्षात जसा आपला पगार वाढेल तसे हे सात हजार रुपये वर्षाला म्हणजेच ६०० रुपये महिन्याला आपल्याला पॉकेट मनी सारखे वाटतील. शिवाय पुढची २० वर्षे आपल्याला एवढ्या मोठ्या रकमेच्या विम्याचे संरक्षणही मिळेल.

क्लिंटन's picture

12 Dec 2014 - 11:00 am | क्लिंटन

हो बरोबर आहे.शेवटी विमा घ्यायचा की नाही हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा.विमा घ्यायलाच पाहिजे अशी सक्ती करणे नक्कीच अयोग्य होईल.बँका या विमाच्याही ८०% रक्कम कर्जाऊ देतात.निदान अलाहाबाद बँकेने तरी तसे कर्ज मला दिले. ५० लाखाचे ११.२५% ने २५ वर्षांसाठीचे कर्ज असेल तर त्याचा ई.एम.आय असेल ४९,९१२ रूपये. विमा २% म्ह़णजे १ लाख रूपये असला तर त्याच्या ८०% म्हणजे ८०,००० रूपये कर्जात वाढ होईल आणि एकूण कर्ज असेल ५०,८०,०००. त्याचा ई.एम.आय पडेल ५०,७११ रूपये. म्हणजे दर महिन्याला ७९९ रूपये जास्त. सुरवातीला ७९९ रूपये जास्त ई.एम.आय भरणे जड जाईल पण ३-४ वर्षांनी ती रक्कम विशेष वाटायचीही नाही. तेव्हा आपले काही झाल्यास आपल्या घरच्यांना घराबाहेर पडावे लागेल ही धाकधूक आणि महिन्याला काही शे रूपये जास्त ई.एम.आय (मला जास्तीचा ई.एम.आय ७९९ पेक्षाही कमी भरावा लागतो) यात मी तरी निर्णय घेतला की दर महिन्याला काही शे रूपये जास्त भरलेले परवडले. तसेही महिन्याला ७९९ रूपये म्हणजे दिवसाला २६-२७ रूपयेच.घरून वेळेत निघून रिक्षाने न जाता बसने किंवा पायी स्टेशनवर गेल्यास दररोज तेवढे रूपये वाचतातच.

दुसरी गोष्ट म्हणजे ५० लाखाचा टर्म प्लॅन घेतला असेल आणि १० वर्षांनंतर कर्ज ४३ लाख रूपये आऊटस्टॅन्डिंग असताना कर्जदाराचा मृत्यू झाला तर कुटुंबियांना ७ लाख रूपयेच मिळतील आणि बाकीचे ४३ लाख बँकेकडे जातील. महागाईचा दर १०% धरला तर १० वर्षांनंतरचे ७ लाख म्हणजे आजचे २,७०,००० रूपये.ही रक्कम फार मोठीही नाही आणि ज्या कारणासाठी टर्म प्लॅन घेतला आहे तेच यातून पूर्णपणे फुलफिल होत नाही.जर मृत्यू हृदयविकाराने एका फटक्यात झाला तर त्यात फार खर्च येणार नाही.पण हॉस्पिटलचे बील भरून महिन्या-दोन महिन्याने मृत्यू झाल्यास हे २ लाख ७० हजार रूपये कुठच्या कुठे कमी पडतील. त्यामुळे माझा स्वतःचा टर्म प्लॅन कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट संरक्षण देत असला तरी तो टर्म प्लॅन मी बँकेला पैसे द्यायला नाही तर माझ्या कुटुंबियांना पैसे मिळावेत म्हणून घेतला आहे.त्यामुळे तो प्लॅन मी स्वतंत्रच ठेवायचा निर्णय घेतला.आणि तसेच मेडिकल इन्श्युरन्सही घेतला. थोडे पैसे जास्त भरावे लागतात पण ते परवडले हा विचार मी केला.

सांगायची गोष्ट ही की निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा.फक्त निर्णय घेताना सगळ्या इनपुटचा विचार करून आकडेमोड करून नक्की काय करणे योग्य ठरेल याचा आडाखा घेऊनच घ्यावा. जर कोणी तेवढी रिस्क घ्यायला तयार असेल तर विमा न घेणे कधीही चांगले.मी स्वतः तरी तितकी रिस्क घ्यायला तयार नव्हतो.

सुबोध खरे's picture

12 Dec 2014 - 12:02 pm | सुबोध खरे

क्लिंटन साहेब
माझे म्हणणे जर वेगळे आहे. आपल टर्म विमा जितका असेल( जर ५० लाख असेल तर) त्यात अजून २० लाखाची( किंवा कर्ज जेवढे असेल तेवढ्या रकमेची) वाढ करावी म्हणजे घराच्या बाबतीतला धोकाही कमी होतो आणि एकदम पैसे भरण्याची कटकट वाचते.
आजमितीला तरी टर्म विम्या इतका कोणताच विमा स्वस्त नाही. घराचा विमासुद्धा नाही.

क्लिंटन's picture

12 Dec 2014 - 12:39 pm | क्लिंटन

अच्छा असे आहे तर. हा विचार मी पण केला होता. टर्म प्लॅनपेक्षा थोडा हा विमा थोडा (फार नाही) महाग पडला ही गोष्ट बरोबर आहे.मी अर्थातच तंबाखू खात नाही (आणि वयही ४० नाही :) ) त्यामुळे जर ४० वर्षाच्या व्यक्तीस ५० लाखाचा २० वर्षांचा टर्म प्लॅन ७१०० रूपयात असेल तर माझ्या इतक्या वयाच्या व्यक्तीस २५ वर्षाचा प्लॅन साधारण ७.५-८ हजार पर्यंत पडेल असा एक अंदाज. (यात सर्व्हिस टॅक्स धरला आहे की नाही माहित नाही अन्यथा प्रिमिअममध्ये आणखी १२.३६% अ‍ॅड करावे लागतील). माझ्या बँकेने दिलेल्या प्लॅनप्रमाणे मला महिना ६७५ रूपये ई.एम.आय जास्त पडतो म्हणजे दर वर्षी ८,१२० रूपये. त्या विम्याच्या २०% रक्कम मला सुरवातीला भरायला लागली आणि घर घेताना इतके खर्च होत असतात तेव्हा सुरवातीला आणखी ही २०% रक्कम हा बोजा झाला होता हे नक्कीच.

तसेच टर्म प्लॅनमधून विम्याची रक्कम मिळून, ती आपल्या बँकेत जमा होऊन कर्ज फेडणे ही धावपळ घरच्यांना करायला लागेलच.बँकेच्या विम्याप्रमाणे अशी धावपळ कुटुंबियांना करायला लागणार नाही तर डेथ सर्टिफिकेट दिले की बँकच विमा कंपनीकडून पैसे घेऊन लोन अकाऊंट बंद करेल असे बँकेत मला सांगितले होते. खरोखरच तसे होईल की नाही हे माहित नाही आणि ते मला कळणारही नाही :)

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2014 - 7:23 pm | टवाळ कार्टा

फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा हा धागा वा.खू. करण्यासाठी योग्य ठरतो

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 8:53 pm | मुक्त विहारि

सहमत...

क्लिंटन यांचा सुयोग्य प्रतिसाद...

पीनी's picture

11 Dec 2014 - 9:05 pm | पीनी

अत्यंत मुद्देसुद प्रतिसाद आहे. आपल्या सल्ल्याची खूप मदत होईल.

पैसा's picture

11 Dec 2014 - 10:00 pm | पैसा

उत्तम अभ्यासपूर्ण प्रतिसाद!

कवितानागेश's picture

12 Dec 2014 - 2:57 pm | कवितानागेश

मस्त प्रतिसाद

पीनी's picture

11 Dec 2014 - 9:06 pm | पीनी

सगळ्यांना धन्यवाद

प्रमोद देर्देकर's picture

12 Dec 2014 - 3:12 pm | प्रमोद देर्देकर

क्लिंटन साहेब गृहकर्जे ही आधी बांधुन तयार असलेल्या घरासाठीच मिळतात का?
मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?

तसे कर्ज बँका देतात की नाही याची कल्पना नाही.मी "सेकंड हॅण्ड" घर विकत घेताना बँकांकडून कर्ज घेताना लागणार्‍या गोष्टींची माहिती काढली होती कारण अगदी अलीकडच्या काळात (४-५ महिन्यांपूर्वी) मी त्याच अनुभवातून गेलो होतो.पण इतर गोष्टींची माहिती काढली नव्हती.

एखाद्याला कमर्शिअल युजसाठी जमीन विकत घ्यायची असेल तर बँका जमिन विकत घ्यायला कर्ज देत नाहीत.उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला जमिन विकत घेऊन त्यावर हॉटेल बांधायचे असेल तर बँका हॉटेल बांधण्यासाठी कर्ज देतात पण जमिन १००% आपल्या पैशातून विकत घ्यावी लागते आणि जमिन विकत घ्यायला बँक कर्ज देत नाही (यातूनही पळवाटा काढणारे तशा पळवाटा काढतातच :) ) पण हाच नियम जमिनीचा वापर कमर्शिअल युजसाठी करायचा नसेल (उदा. स्वतःला राहायला घर बांधणे) तर लागू पडतो की नाही याची कल्पना नाही.कदाचित पैसाताईंना याविषयी अधिक माहित असेल. पण जमिन विकत घेतली असेल तर त्यावर घर बांधायला ८०% पर्यंत कर्ज बँकांना द्यायला हरकत नसावी.

पैसा's picture

12 Dec 2014 - 4:32 pm | पैसा

जमीन खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी कर्ज मिळते. अशा वेळी घराची किंमत जमीन + घरबांधणी अशा समजली जाते. समजा तुम्ही प्लॉट आधी खरेदी केला असेल तर तो घर बांधणीसाठीच्या कर्जाला मार्जिन म्हणून वापरता येतो. तसेच घर बँकेकडे गहाण टाकताना जमिनीच्या प्लॉटसकट टाकावे लागते.

भविष्यात घर बांधण्यासाठी प्लॉट विकत घेण्यासाठीही कर्ज मिळते. मात्र आपण प्लॉट विकत घेतल्यापासून दोन वर्षांच्या आत त्यावर घर बांधू असे अंडरटेकिंग द्यावे लागते. असे घर न बांधल्यास २ वर्षांनी त्या कर्जावर जनरल रेटने (सगळ्यात जास्त असेल तो) व्याज आकारले जाते.

दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन देते काय ?

पैसा's picture

12 Dec 2014 - 11:36 pm | पैसा

पण त्याला घराच्या कर्जाचा दर नसतो. वेगळा असतो. जर दुकान गाळा विकत घेऊन खरा धंदा करायचा असेल तर प्रायॉरिटी सेक्टर अंतर्गत लोन मिळेल. पण नुसताच गाळा घेऊन ठेवायचा असेल तर मॉर्टगेज लोन होईल. त्याला व्याज दर बराच जास्त असतो आणि बँकेच्या कर्ज देण्यालायक फंड्सपैकी किती टक्के मॉर्टगेज लोन्स देता येतील यावर निर्बंध असतात. जर बँकेची लिमिट संपलेली असेल तर अशी नवी लोन्स देणे काही काळासाठी बंद होऊ शकते. म्हणजे अमूक एका बँकेत अमूक वेळी मॉर्टगेज लोन मिळेलच अशी खात्री देता येणार नाही.

खटपट्या's picture

12 Dec 2014 - 11:46 pm | खटपट्या

ओके, धन्यवाद.
तरी कीती टक्के व्याज दर असेल? होम लोन जर १०% ने मिळत असेल तर गाळ्यासाठी १५% ने मिळेल का ?

पैसा's picture

12 Dec 2014 - 11:55 pm | पैसा

सध्याचा नेमका दर माहीत नाही. पण प्रत्येक बँकेच्या साईटवर तुम्हाला तो मिळू शकेल. उदा. सिंडिकेट बँकेचा सध्याचा दर बेस रेट + २.७५ म्हणजे १३.२५% आहे. इतर बँकांचा याच्या जवळपास असणार.

मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?

कर्ज मिळते. मात्र बांधकाम होत जाईल तसे कर्ज रिलीज होते. सुरूवातीला पहिला कर्जाचा हप्ता मिळतो, नंतर बांधकाम प्लिंथ लेव्हलला आले की पुढचा हप्ता.. असे टप्प्या टप्प्याने कर्ज मिळते व तशीच व्याज आकारणी होते. (ही व्याज आकारणीही कमीटमेंट इंटरेस्ट + अव्हेल्ड इंटरेस्ट अशी असते)

ही अत्यंत वरवरची माहिती आहे. तुम्ही बँकेच्या शाखेतून सल्ला घेणे योग्य.

प्रमोद देर्देकर's picture

12 Dec 2014 - 4:01 pm | प्रमोद देर्देकर

ओक्के धन्यवाद

स्वधर्म's picture

12 Dec 2014 - 4:02 pm | स्वधर्म

मी नुकतेच गृहकर्ज घेतले. मला स्टेट बँकेने प्रोसेसिंग फी आकारली नाही. तेंव्हा सुरू असलेली प्रोसेसिंग फी माफ असण्याची योजना अजून चालू आहे का, तसेच ती सवलत टेक ओव्हर प्रकारच्या कर्जासाठी मिळेल का, हे अवश्य विचारून पहा.

तुंम्ही व्याज दर १०.१ % म्हणत आहात. तो फक्त स्त्री कर्जदाराचे नांव पहिले असल्यासच आहे. अन्यथा व्याजदर १०.१५% आहे, अशी माझी माहिती आहे.

वास्तू विमा: हा तुमचा एलआयसीच्या कर्जासाठी आधीच काढला आहे काय? असल्यास स्टेट बँकेला चालेल. माझा प्लॅट रिसेलचा होता. त्यांच कर्ज होते विमाही होता. मला असे समजले की तो मी वापरू शकत नाही, कारण बँकही बदलते व विमा धारकही. दोन्हीपैकी एक जरी तेच असेल, तर तोच विमा मला वापरता आला असता. मला कर्ज मिळाले आहे. अजून प्लॅटचा विमा घेतला नाही. पण लवकरच घ्यावा लागेल.

स्वतःचा विमा: तो मी बँकेचाच पण टर्म विमा घेत आहे. कर्ज रकमेच्या इतकी पॉलिसी असलेला. कर्ज विमा अजून स्वस्त पडला असता, पण त्याची रिस्क जसजसे फिटत जाईल तसतशी कमी कमी होत जाते, कारण तो बँकेच्या ग्रुप पॉलिसी खाली आहे व उद्देश फक्त कर्जाची सुरक्षा असा आहे. म्हणजे अर्जदाराचा मृत्यू झाल्यास फक्त कर्ज फिटेल व कुटुंबास काही मिळणार नाही. माझा स्वतःचा विमा विशेष नव्हता त्यामुळे मी टर्म पॉलिसी घेतली आहे. यात पॉलिसीची पूर्ण रक्कम कुटुंबाला मिळेल, त्यातून त्यांनी उरलेले कर्ज फेडल्यास बाकी रक्कम त्यांना मिळेल. तसेच त्यास काहीही मॅचुरिटी बेनिफीट नाही. उद्या समजा लवकर कर्ज फिटले, तर मी हप्ते थांबवू शकतो व त्या लायबेलिटीतून मुक्त होऊ शकतो.

- स्वधर्म

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Dec 2014 - 6:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर वर किती परिणाम होतो? माझं एजुकेशन लोन संपत आलयं (८ महिने अजुन). ते संपलं की घरासाठी एक आणि त्याआधी व्यवसायासाठी (ह्याच्यासाठी मी धागा काढलेला होता आणि ते अजुन २ महिन्यात अ‍ॅप्रुव्ह होईल) कर्ज काढायचं आहे. आजपर्यंत एकही हप्ता चुकलेला किंवा उशिरा गेलेला नाही. कर्जाच्या प्रकाराप्रमाणे सिबिल स्कोअर मधे फरक पडतो का?

पैसा's picture

12 Dec 2014 - 11:39 pm | पैसा

रेग्युलर लोनच्या बाबत काहीच अडचण नाही. एक किंवा २ हप्ते ओव्हरड्यु झाले तरी मोठा प्रचंड परिणाम होत नाही. मात्र तीन हप्ते थकित झाले तर आणि लोन एन पी ए झाले तर मात्र दुसरे लोन मिळणे जवळपास अशक्य असते.

विलासराव's picture

12 Dec 2014 - 11:10 pm | विलासराव

गावठाण भागात घर घेताना काय बाबी तपासायला हव्यात?
त्यावर थोडेफार लोन होते असे मला समजले आहे तर ते किती ?
भविष्यात काय त्रास होउ शकतो?
घर मला रहायला घ्यायचे आहे, गुंतवणुन म्हनौन नव्हे.
सानपाडा, बेलापुर ,खारघर येथे गावठाण एरीया आहे.

hitesh's picture

13 Dec 2014 - 9:51 am | hitesh

घर रहायला घ्यायचे तर गावठाण का शहरठाण कशाला पहायचे ?

जसजसे शहर वाढत जाईल तशी गावठाणालाही जास्त एफ एस आय मिळेल्च .

अआपल्याला घराची गरज आहे तशी सरकारला इतकी लोकसंख्या अशी अ‍ॅकोमोडेट करायची याची चिंता असेलच .

त्यामुळे भविष्यात चांगलि डेवलपमेंट होईलच.

:)

घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन.

... श्री भगवान काऊ मुनी उवाच

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2014 - 1:24 pm | टवाळ कार्टा

घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन.

... श्री भगवान काऊ मुनी उवाच

अर्रेच्या...तुम्ही तर गीता टाकाउ आहे म्हणालात ना

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2014 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना...

... श्री भगवान टाकाऊ मुनी उवाच

असं म्हणायचं आहे काय ? त्यांचं टंकनकौशल्य यथातथा असल्याचं दिसतं बर्‍याचदा :) ;)

hitesh's picture

15 Dec 2014 - 4:16 am | hitesh

टा - काउ मुनी !

hitesh's picture

13 Dec 2014 - 10:31 am | hitesh

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा.

पांडवानी खांडववन घेतले तेंव्हा तिथे गावठाणच काय जंगलठाण होते. नंतर भगवंताच्या कृपेने तिथे इंद्रप्रस्थ उभे राहिले.

http://www.misalpav.com/node/29565

काव काव ये ... चिव चिव ये....
धागा काढ... प्रतिसाद दे...
आणी...भुर्र्रर्रर्रर्रर्र ऊडुन जा.....

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2014 - 1:24 pm | टवाळ कार्टा

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा.

अर्रेच्या...तुम्ही तर गीता टाकाउ आहे म्हणालात ना

मुक्त विहारि's picture

15 Dec 2014 - 12:00 am | मुक्त विहारि

त्यांच्या मनाला येईल तसा अर्थ काढतात.

मित्रहो's picture

13 Dec 2014 - 1:14 pm | मित्रहो

गृहकर्जच नव्हे तर इतर कुठल्याही कर्जाच्या बाबतीत वर क्लिंटन साहेबांनी सांगितलेली PMT,(EMI किती) PPMT (EMI मधले Principal किती), nper(no of EMI) याचे गणित स्वतः करता येते. तसे केल्यास आपण घेतो तो निर्णय योग्य किेवा बरोबर याचा व्यवस्थित अंदाज बाधता येतो.
इन्शुरंस घेणे आवश्यकच नसते. बँकाचे एजंट ते लादतात. लोन मधून जे पैस मिळतात त्यातून विमा काढायचा असल्याने आपण तयार होतो परंतु त्यात बऱ्याच अटी असतात. मला बंगलोरला घर घेताना ICICI च्या माणसाने विमा काढावाच लागेल वगेरे सांगितले, मी काढला पण मला त्या विम्याचा फारसा फायदा झाला नाही.
तुम्ही एसबीआय मधे प्रयत्न करा, प्रोसेसिंग फी च्या बाबतीत बारगेन करा. लोनची रक्कम जास्त असेल तर प्रोसेसिंग फी सवलत मिळतेच. विमा आधी काढलेला असेलच तर परत का काढावा लागतो हे कळले नाही.
गृहकर्जाविषयी व्यवस्थ्त माहीती आणि शेवटपर्यंत बारगेन करायची इच्छा असेल तर प्रश्न लवकर सुटतो.

अतरंगी's picture

13 Dec 2014 - 3:03 pm | अतरंगी

एस बी आय मधे 31 डिसेंबर पर्यंत प्रोसेसिंग फिज आकारण्यात येणार नाही.

संपर्क :-Chief ManagerState Bank of IndiaPune Main BranchContact No. 020-66456119/6001

प्रफुल्ल's picture

19 Dec 2014 - 11:03 am | प्रफुल्ल

मी आयडीबीआय मध्ये होम लोन अप्लाय करतोय. प्रोसेसिंग फिज नाहित. पण नतंर इन्शुरंस घ्यावा लागेल आणि मोर्ट्गेज इन्टिमेशन पण करावा लागेल अस एजंट ने सांगितलय. मला मोर्ट्गेज इन्टिमेशन नाही माहित, म्हणजे मी अगोदर एस बी आय मधून होम लोन घेतले होते तेव्हा मोर्ट्गेज इन्टिमेशन वगैरे केले नव्ह्ते. कुणी सांगेल का मोर्ट्गेज इन्टिमेशन काय भानगड आहे??