टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सिंहाच्या तोंडाला खूप घाण वास येतो आहे. कळून सवरूनही सिंह विचारतो की त्याच्या तोंडाला घाण येते आहे काय? आता तू काय सांगाशील -
प्रेषक एकलव्य ( शनी, 08/09/2008 - 06:10) .
खूप घाण येते आहे (सश्याने हेच सांगितले आणि एका फटक्यात मेलं बिचारं)
11% (2 votes)
वाह वा! अगदी सुगंध येतो आहे (हरणाने थाप मारली तर खरी ... पण पचली नाही.)
0% (0 votes)
मला की नाही सर्दी झाली आहे. वासच येत नाही (हा तर आपला कोल्हा! दुनियेला पुरून अजून उरला आहे झालं... )
33% (6 votes)
दात घासायला मदत करू काय? (आमचे कन्यारत्न)
39% (7 votes)
आता तुम्ही बोला (किंवा खरे सांगू तर तुम्ही नकाच बोलू. तुमच्या पुढच्या पिढीला विचारा... )
17% (3 votes)
एकुण मतं : 18
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

विकांताची सुरुवात...
... म्हणून कधी नव्हे ते गोष्ट सांगत होतो. बसल्याबसल्या चाळा म्हणून कौलास वरील प्रश्न लावला आहे.
चीअर्स - एकलव्य
मी ससा
मेलं बिचारं
- सर्किट
ससोबा
असं खरं बोलून आपण नेमके कितीवेळा मेला आहात याचा विचार केला आहे का कधी?
मी नाही बोलले - लोलक बोलायला लावतो.
लोलक
लोलक बोलायला लावतो, मी नाही बोलत !
क्या बात है !
हे असे आम्हाला सुचले असते, तर आम्हीही संपादक नसतो झालो ?
च्यामारी, सत्य वचे वचनाला नाथा, करुनी पदाला या सुर विमला !!!
आणी म्हणे आम्ही शत्रू !!!!
- सर्किट
खरंच??
मी ससा: मेलं बिचारं - सर्किट
खरंच? बघा बुवा!
दुर्लक्ष...!
दुर्लक्ष...!
धन्यवाद.
हकनाक मेलं बिचारं
दुर्लक्ष आहे तोवर ठीक आहे.... पण "एकलव्य हकनाक मेला बिचारा" असे काही दिवसांनी झळकणार की काय.
(जंगलात वाढलेला आणि राजपुत्रांपासून हातभर दूर असलेला) एकलव्य
?????
?????
!!!!!
अंगठाबहाद्दर
तोंडाला वास
प्रिय एकलव्य,
मुलाला तुमचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर असे. डायवोर्स वकीलाचे कार्ड देइन.
विनायक प्रभु
वकिली!
मुलाला तुमचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर असे. डायवोर्स वकीलाचे कार्ड देइन.
विनायक प्रभू - आपल्या ठिणगीचे उत्तर कळले नाही... पण त्यामुळेच जास्त कुतुहल आहे. काय काय चक्रे मुलांच्या डोक्यात चाललेली असतील याचा नेम नाही.
(आणखी एकदा हतबुद्ध झालेला) एकलव्य
आपल्या
आपल्या ठिणगीचे उत्तर कळले नाही..
जबरा शब्द योजना !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
तोंडाला वास
प्रिय एकलव्य,
माझे स्पेशलायझेशन "सहन ही होत नाही सांगताही येत नाही" वासाबद्दल आपल्याला माहीत नाही. सिंहाची कायम्ची दोस्तीची गेरंटी. असले बरेच सिंह पाळ्लेला,
विनायक प्रभू
सांभाळून राहा
उगाचच सल्ला... तो विसरा पण स्वतःच्या स्पेशलायझेशनबद्दल खुलेपणाने सांगितल्याबद्दल आभार!
मदत
मी आपल्या कन्यारत्नाप्रमाणे - मदत करण्यास तत्पर...पण सिंहोबा घास करून कधी टाकतील त्याचा नेम नाही हो!
आणि मला वाटलं की दुनियाच कोल्ह्यांची आहे.
ह. घ्या
मला वाटतं...
आणि मला वाटलं की दुनियाच कोल्ह्यांची आहे. ह. घ्या
खरं आहे म्हणा एका अर्थी! मला असंही वाटतं की कोल्ह्यांचीही एक वेगळीच दुनिया आहेच.
(आपल्याच दुनियेत मस्त) एकलव्य
आता तुम्ही
आता तुम्ही बोला (किंवा खरे सांगू तर तुम्ही नकाच बोलू. तुमच्या पुढच्या पिढीला विचारा... )
अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं.
पुढची पिढी
अजून माझी पुढची पिढी आली नाही आहे; तुमच्या कन्यारत्नाचं उत्तरच पटलं.
यमीताई - अहो तुम्हीच पुढच्या पिढीतल्या आहात हे झळकते आहेच की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
(पिढ्यानपिढ्यापासूनचा) एकलव्य
म्या काय
म्या काय म्हंतो की शिंवाजवळ जावच कशापायी? नाय म्हणजे ये माहित हाय कि तो शिंव हाञ
तो तरास देइल तर कशाला जाव जवळ?
आपल दुरुन खडं माराव कि त्याला झाडावर बसुन....
वा रे पक्या
यू मे बी राईट! आय डोन्ट नो दो!!
@@
जल्लातुमी
जल्ला
तुमी काय लिवलय ते वाचता येतय पर समजंत नाय र
क र क भासा ही
अवो ते
अवो ते विंगरजी हाय ... सायब गेला भासा रायली!
अवो ते
अवो ते विंगरजी हाय ... सायब गेला भासा रायली!
अस्स व्हय ... असुं दे असुंदे सायब जावु दे सायबाची मानस रावु दे
"डेन्जर" पक्याला
त्याच्याच भाषेत सांगावं म्हटलं झालं... राहलं बुवा!
पहिल्या दिवशी सत-इसबगोलचा डोस द्यावा
त्यानंतर एक दिवस लंघन करावे



पुढचे दोन दिवस सशाचे सूप प्यावे
नंतरच्या दिवशी कोल्ह्याला पंगतीला घेऊन कोवळ्या हरणाचे मांस खावे
तोंडाचा वास कायमचा जाईल!
(खुद के साथ बातां - रंग्या, ह्यातला तू कोण रे? ससा, हरीण की कोल्हा?
)
चतुरंग
पेशंट
अहो डॉ. दाढे कुठे आहात हो! तुमचा एक राजघराण्याचा पेशंट वाट पाहतोय
-(मिपाच्या प्रश्नांची उत्तरे मिसळप्रेमींतच शोधणारा) ऋषिकेश
वास आणि इतर
प्रिय एकलव्य,
प्रश्न बायको समोर विचारला. उत्तराने तिचा पण गोंधळ उडाला. तुमची गादी चालवतो आहे चा आहेर मीळाला.
स्पश्टिकरण असे: सिंहाच्या तोंडाच्या वासाचा सर्वात जास्त त्रास कोणाला? अर्थात सिंहिणिला. आता बायकोचे आयकत नाही त्याला डायवोर्स व़कील लागणारच. तुला चाल्तो का सिगारेट चा वास?गादी बाहेर. म्हणुन सिगारेट सुट्ली. अमेरीकेत कुठ्ल्याही कारणावरुन बायको सोडु शकते असे काहीतरी लेख वाचले असणार.
द्रोणाचार्य विनायक प्रभु. आजकाल मी पण जपुन असतो काय बोलेल चा नेम नाही
हा हा हा
विनायकपुत्राने लावलेली लिंक आवडली... हहपुवा@@
स्पेश्लायझेशन
प्रिय एकलव्य,
मि.पा वर प्रतिमा चर्चेत आमच्या प्रतिमेची भर. ती खरी आहे. जगातल्या सर्व सिंहाना ह्या समस्येचा त्रास कधि ना कधि होतोच. हे स्पेशलाय्झेशन मुळे आपल्य्याला टर्कुन असतात.
द्रोणाचार्य विनायक प्रभु
औकात बघून
ससा, हरिण, कोल्हा यांच्या जागी असतो तर सर्दी झाली असती. यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते. तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही.
त्याक्षणी मला असे वाटले की ...
यांच्यापैकी कोणीही सिंहाला दात घासायची "ऑफर" दिली असती तर सिंहाने बहुधा त्यांच्या हाडाने दात साफ केले असते.
अगदी हेच...
कोल्हाच्या बाबतीतही शंभरात नव्व्याण्णव वेळा कदाचित सिंह त्यालाही खाऊनच टाकेल. हरणाचे उत्तर आणि कोल्हयाचे उत्तर वेगळे आहे... पण फक्त मूर्ख सिंहांसाठीच!
तुमच्या कन्यारत्नाचे उत्तर सशाच्या उत्तरापेक्षा वेगळे का ते कळले नाही.
शक्यता नाकारता येत नाही. शंभरात अठ्ठ्याण्णव वेळा कदाचित आपण म्हणता तेच घडेल. घमेंडी सिंहासमोर कोकराचा निभाव लागणार नाही. पण गुणात्मक दृष्ट्या हेच उत्तर मला इतरांपेक्षा वेगळे भावले. हमखास मरण्यापेक्षा कदाचित (अगदीच यदाकदाचित का असेना) एखादा सिंह या उत्तराने जीवनदान देईल.
अवांतर - निव्वळ टाईमपास म्हणून हा कौल लावला आहे. हे जरी खरे असले तरी त्याक्षणी "अरेच्या हे सालं आपल्या डोक्यातच आलं नाही" असे एकदम मनात चमकून गेले. वास येतोय बिचार्याच्या तोंडाला मग मदत करायली हवी हे सरळसोट सूत्र माझ्या निर्ढावलेल्या मनात दूरदूरवरही आले नाही. पण बहुतेक सर्व लहान मुले "हे वर दिलेले" किंवा "अशीच काहीशी " उत्तरे देतील.
निरुत्तर
न उत्तर देण्याचा ऒप्शन खुला असेल ना? शिंव्ह कुठे म्हन्तो कि उत्तर द्या नाहीतर खाउन टाकिन.
काय रे उत्तर का देत नाही असे डरकाउन विचारले तर कोल्ह्यासारखे उत्तर द्यावे.
शिंव्हाच्या मुड प्रमाणे खाली ल उत्तरे
१) पार्टी झालि ना मग वास येनारच
२) अहो पोट खराब झाले तरी बी त्वंडाला वास मारतोय
३) शिंव्हिनीसमोर जाताना काळजी घ्या. अहो इदेशीचा वास लप्वायला किमाम खाल्ला तर देशीचा वास मारतुया.
४)कोण आहे रे तिकडे? कोण म्हन्तो रे वास येतोय? आपणच प्रतिप्रश्न उपस्थित करावा.
५) महाराज वास येतुय पन दुसर्याच्या तोंडाचा आपल्या मुखकमलाचा नव्हे.
६) अहो मपलाच वास इतका येतुय त मंग दुसर्याच्या तोंडाचा वास काय येनार.
.
.
.
.
प्रकाश घाटपांडे
दात घासायला मदत करू काय?
नमस्कार,
दात घासायला मदत करू काय? (आमचे कन्यारत्न)
क्या बात है !!!!!!!
एकदा माझ्या भाच्याला सांगितले की उद्या तुळशीचं लग्नं आहे.ताबडतोब प्रश्न आला
पण साख्ररपुडा कधी झाला ???????
अशा वेळी सिंहाची शेळी व्हायला जराही वेळ लागत नाही .
आपला...
( लहान मुलांचे असे बोल ऐकायला उत्सुक असलेला )
संतोष.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
तुमा सरवांच खर
सगळ वाचल पन प्रश्न पडला की आता कुठे सिंह उरलेत सगळेच बिन दातां चे आहेत आणि पशु उद्यानात, सर्कशीतल खाद्य म्हणजे तोडा चा वास येणारच
काय रे
काय रे एकलव्या? तुझा हा सिंह अंमळ वेडझवाच दिसतोय स्वतःच्या तोंडाला येणारा वास माहित असेल तर बाकिच्यांना कशाला विचारतोय?
तूच तर नव्हेस ना तो?...
... सिंहाचे कातडं पांघरून आलेला? अंमळ नाही पुरताच वेडझवा आहेस.
अवांतर - स्वतःच्या तोंडाला येणारा वास माहित असताना बाकिच्यांना विचारणारे "थोर विचारवंत" म्हणून प्रसिद्ध होतात असे काहीसे ऐकून आहे.