आवतण ओरिगामी प्रदर्शनाचं

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
10 Dec 2014 - 12:30 am

|| श्री गुरवे नम: ||

ओरिगामी प्रदर्शनाचं निमंत्रण

ओरिगामी मित्र आणि कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान आयोजित
ओरिगामी प्रदर्शन - ‘वंडरफोल्ड २०१४’
सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, (छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ, म. फुले मार्केटसमोर) या ठिकाणी
गुरुवार, दि. ११ डिसेंबर ते रविवार १४ डिसेंबर २०१४ या दिवसांत सकाळी ११ ते संध्या. ६पर्यंत आहे.

सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार, मित्रांसह जरूर या.

या वर्षीच्या प्रदर्शनाची मुख्य कल्पना आहे ‘जेवणाचं टेबल’. सर्व ओरिगामी मित्रांनी जेवणाची भांडीकुंडी, काटेचमचे, अगदी जेवणाचे पदार्थही बनवले आहेत... अर्थात कागदापासून. याशिवाय प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार इतर ओरि-कलाकृती बनवल्या आहेत. या वर्षीच्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध ओरिगामी तज्ज्ञ मीनाक्षी मुखर्जी यांची उपस्थिती. या मूळच्या कोलकाताच्या, आता अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी अनेक ओरि-कलाकृती - विशेषत: मोड्युलर कुसुदामा, बॉक्सेस - निर्माण केल्या आहेत. त्यांची पाच पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. खास या प्रदर्शनासाठी त्यांनी एक ‘मयूर’ तयार करून या प्रदर्शनाला तो समर्पित केला आहे.

प्रदर्शनस्थळी ओरिगामी शिकण्यासाठी प्राथमिक व विशेष स्तराच्या ओरिगामी सशुल्क कार्यशाळाही घेतल्या जातील. त्यासाठी नावनोंदणी प्रदर्शनाच्या ठिकाणी करता येईल. कार्यशाळेसाठी कागद पुरवले जातील.

मी गुरु-शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत आणि शनि-रविवारी दिवसभर तिथे असेन. प्रदर्शनात ‘अॅक्शन ओरिगामी’च्या टेबलवर असेन.

सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण.

मिपाकरांची वाट पाहणारा
सर्वांचाच,
सुधांशुनूलकर
९८६९४२८५०३.

जाता जाता : समोरच पोलीस कँटीन (ग्रँड सेंट्रल कँटीन) आहे, तिथे खिमा, भेजा आणि काळजी छान मिळते. एक खादाडी कट्टाही होईल.

काही दुवे

ओरिगामी क्रेन्सवर लोकसत्तामध्ये लिहिलेला लेख

लोकप्रभाच्या १२ डिसेंबर २०१४च्या ताज्या अंकात पान ४४वरचा लेख

ओरिगामीविषयी मिसळपाववरचे माझे लेख
ओरिगामी
ओरिगामी - २
मी, ओरिगामी आणि सामाजिक पालकत्व

प्रास यांनी लिहिलेला ओरिगामी मिपाकट्ट्याचा वृत्तान्त

मीनाक्षी मुखर्जी याचं संकेतस्थळ

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 12:47 am | मुक्त विहारि

नेमके मी नसतांनाच....

सालं आमचे नशीबच फुटकं...

पुण्याचा कट्टा तर हुकलाच आणि आता हा पण हुकणार.

असो,

आता भारतात आलो की, परत एक ओरीगामी कट्टा करू या.

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 1:47 am | खटपट्या

+१

प्रचेतस's picture

10 Dec 2014 - 9:02 am | प्रचेतस

जायला नक्कीच आवडले असते.
पुण्यात कधी असे काही आयोजीत झाले तर जरुर माहिती द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2014 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

किसन शिंदे's picture

10 Dec 2014 - 9:49 am | किसन शिंदे

शुक्रवारी येण्याचा प्रयत्न करतो, बघू त्यातून कसे जमते ते.

प्रयत्न करते येण्याचा.कमलेश गांधींचं नाव अनिल अवचटांच्या छंदांविषयीमध्ये आदराने आलं आहे.त्यामुळेही प्रदर्शन पाहायची उत्सुकता आहे.

मदनबाण's picture

10 Dec 2014 - 10:12 am | मदनबाण

प्रदर्शनाला शुभेच्छा ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt

विलासराव's picture

10 Dec 2014 - 11:47 am | विलासराव

मी येतो उद्या सकाळी. पण आमचं काय? कारण समोरच पोलीस कँटीन (ग्रँड सेंट्रल कँटीन) आहे, तिथे खिमा, भेजा आणि काळजी छान मिळते. एक खादाडी कट्टाही होईल.

कंजूस's picture

10 Dec 2014 - 12:29 pm | कंजूस

आताच्या तरूण पिढीला मोबाईलच्या विळख्यातून सोडवून काही नवीन छंदांची आवड उत्पन्न करायची असेल तर प्रात्यक्षिके दाखवण्याकरता मुलांनाच ठेवले पाहिजे हा माझा खगोलमंडळाचा अनुभव आहे.

शिद's picture

10 Dec 2014 - 8:51 pm | शिद

मस्तच उपक्रम.

प्रदर्शनाचे फोटो डकवायला मात्र विसरु नका. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2014 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त उपक्रम.

-दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस's picture

11 Dec 2014 - 12:07 am | पिवळा डांबिस

समोरच पोलीस कँटीन (ग्रँड सेंट्रल कँटीन) आहे, तिथे खिमा, भेजा आणि काळजी छान मिळते.

हाय, हाय, हाय! ग्रॅन्ड सेन्ट्रल कॅन्टीऽऽन!!!
आठवणीने काळजात बारीकशी कळ आली!!
अहो, सेंट झेवियरचा विद्यार्थी हो मी!
कॅन्टीनच्या खिमा-पावावर (त्यावेळेस तितकंच परवडायचं) तर हा पिंड घडला!!
:)

आज जाऊन आले या प्रदर्शनाला.अप्रतिम कलाकृती बघायला मिळाल्या.
इनि,अारोही पण बच्चे कंपनी घेऊन आल्याने आमचा मिनी कट्टाच झाला प्रदर्शनामुळे!नूलकरांनी बच्चु मिपाकरांना अॅक्शन ओरिगामीचे मस्त नमुने भेट दिले.त्यात एक बोलका कावळा आणि खाऊ खाणारा पक्षी आहे! थोरांपासुन मोठ्याना,अगदी कमी साहित्यात नवनिर्मितीचा आनंद देणारा हा छंद,त्याची छान माहिती मिळाली.नूलकर,अनेक धन्यवाद.तुम्ही फोटो टाकालच म्हणून आमच्याकडचे टाकत नाही.