माझे पहिलेच प्रवास वर्णन - फिलीपाइन्स

Madhavi_Bhave's picture
Madhavi_Bhave in काथ्याकूट
9 Dec 2014 - 4:44 pm
गाभा: 

(मी फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे,
http://www.misalpav.com/node/13573 श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार flickr वर upload करून टाकले आहेत. आशा आहे नाहीतर मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.)

हे माझे पहिलेच प्रवास वर्णन आहे. झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे. एस्पिकचा एक्का व इतरांप्रमाणे माझी ओघवती भाषा वगैरे नाही आहे तरी सांभाळून घेणे.

मी जानेवारी २०१३ मध्ये फिलीपाइन्सला २-३ दिवसांसाठी office च्या कामासाठी गेले होते. Airport अगदीच सामान्य होता पण देश मात्र प्रथम दर्शनीच प्रेमात पडावे असा. मुळात नजरेत भरतात त्या गगनचुंबी इमारती.

मी पण मनिला येथे राहत होते. मी राहत असलेला भाग म्हणजे "मकाती" होता आणि पिकासो स्टूडिओ मध्ये रहात होते. हॉटेल खूपच छान होते. मला ह्या हॉटेलची प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे रूम्स व toilets तर खूपच स्वच्छ होती पण त्याचबरोबर त्या रूमला जी attached बाल्कनी होती ती दोन्ही बाजूने मस्त रंगवलेली होती. रूम मध्ये पण छान सजावट होती. आणि रूम मध्ये छोटा फ्रीज, microwave वगैरे सर्व सोई होत्या. तश्या त्या सर्वत्रच असतील म्हणा पण मी जर जास्तच प्रेमात पडले होते माझ्या रूमच्या.

आणि ह्या बाल्कनीच्या दोन बाजू

त्यातल्या त्यात आठवणारी गोष्ट म्हणजे महागाई. आपल्यापेक्षा खूप महाग. कॉफ्फी बनवण्याची सामग्री ठेवलेली होती पण मला चहा हवा होता. म्हणून मी tea sache मागवला. तो तर मिळाला पण बिल बघून माझे डोळेच पांढरे झाले. एका tea sache साठी १८० रुपये (आपल्या currency मध्ये मी लगेच convert केले). अगदी जीवावर आले पण नशिबाने पैसे ऑफिसने भरायचे होते म्हणून त्यातल्या त्यात कमी दु:ख झाले पण नंतर मी काळजी घ्यायला लागले.

मला ऑफिसच्या कामामुळे जास्त फिरायला मिळाले नाही पण एकंदरीत मला फिलिपिनो माणूस हा खूप कष्टाळू, शिस्तप्रिय आणि मदत करायला तयार असाच वाटला. तसेच ऑफिसमधील लोक खूप प्रोफेशनल असल्याचे जाणवले. आणि ह्या देशावर अमेरिकेचा प्रचंड प्रभाव असल्याचे जाणवले. मार्कोसच्या राजवटीमध्ये ह्या देशातील जनतेने खूप सहन केले. त्याच्या बायकोकडे तर चपलांचे हजारो जोड होते असे वाटल्याचे स्मरते. पण तरी देखील हा देश त्यातूनही वर येण्यासाठी धडपडत आहे. अजून काही दशकानंतर हा देश आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देईल हे नक्की.

मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी एका Landmark नावाच्या mall मध्ये गेले होते. आणि एका floor वर फक्त purses च पाहून वेडी झाले. खाण्यापिण्याचे जरा हाल होते. एकतर महाग (आपली भारतीय मानसिकता. लगेच रुपये किती होतात हे calculate करायचे) आणि त्यातूनही आपण नक्की काय खात आहोत ते कळत नव्हते. पिकासो हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट घेत असताना समोर दिसणारी एक गोष्ट पळते मध्ये वाढून घेतली. तोंडात टाकली तर जर बेचव वाटायला लागली आणि क्षणार्धात भानावर आले. भानावर कसली, पाचावर धारण बसली. आपण नक्की काय खाल्ले. व्हेज कि नोन व्हेज. बरे नोन-व्हेज तर नक्की काय. बीफ वगैरे होते कि काय ह्याचा विचार करून गरगरायला लागले. शेवटी रेस्तौरंतच्या एका स्टाफला विचारले कि बाबा हे नक्की काय आहे. तो काय बोलला ते कळले नाही पण शेवटी मीच माझ्या मनाशी ठरवले कि काही तरी व्हेजच होते अशी समजूत काढली स्व:ताचीच आणि थोडी relax झाले.

मनिला मध्ये मी जेथे फिरत होते तिकडे सगळीकडे subway किंवा तत्सम chain होतीच पण मला सगळीकडे New Bombay (Authentic Indian Cuisine) ही restaurant chain मिळाली व माझा पोटाचा प्रश्न सुटला. जेवण मात्र खूप तेलकट आणि तिखट होते पण मी चालवून घेतले. मी पण भारतातून आले आहे आणि त्यातूनही पुणे - मुंबई वाली म्हटल्यावर मालकीण बाई पण गप्पा मारायला आली. अर्थात मला वाटले कि आता काहीतरी discount मिळेल पण तसे काही नाही झाले हा भाग अलहिदा.

अजून एक गोष्टीचे अप्रूप वाटले. सर्व taxis एकदम मस्त. अगदी टोयोटा इत्यादी. आणि मला वाटते प्रत्येक पब्लिक ट्रान्सपोर्ट वर "HOWS MY DRIVING" आणि मग काही टेलीफोन नं दिलेले आढळले. जर driving चांगले नसेल तर मला वाटते त्या नंबरवर फोन करून तक्रार करायची सोय असेल.

आणि एक अतिक्षय लक्षात येणारे वाहन म्हणजे "जीपनी". जीपनी म्हणजे आपल्याकडची रिक्शा जशी सर्वत्र आढळते तसे आढळणारे वाहन. पण जीपनी चे रिक्शा बरोबर तुलना करणे म्हणजे जीपनी वर अन्याय होइल. जीपनी म्हणजे आपल्या कडची एखादी मिनी बस पण दिसायला मात्र जीप सारखी. अगदी मस्त वाहन होते. बसायचा मोह झाला पण वेळ पण नव्हता आणि जाणार कुठे हा पण प्रश्न. खरे म्हणजे मला फ्री टाईम फक्त संध्याकाळी मिळत होता ते पण काही तासच. दुसर्या दिवशी client बरोबर मीटिंग आहे हि टांगती तलवार असायचीच मनात.

एकदा तर एक train दिसली जाताना. अगदीच साधी होती आणि आपल्याकडे जशी गर्दी तशीच गर्दी होती. माझी गाडी पण फास्ट असल्यामुळे जसा जमला तसा फोटो काढला

आणि अजून एक विचित्र वाहन आढळले. स्कूटरला जशी एक sidecar जोडलेली असते तशी रिक्शाला जोडलेली sidecar. बघून गंमतच वाटली.

दोन दिवस राहून जसे जमेल तसे philippines पहायचा प्रयत्न केला. एकटीच असल्यामुळे जास्त काही शूर वगैरे बनायचा प्रयत्न केला नाही. पण एकंदरीतच घरी परत येताना खूप चांगल्या आठवणी घेवून आले. ऑफिसमध्ये भेटलेली लोक पण खूप छान होते व एकंदरीतच खूप कोऑपरेटीव होते.

पिकासो ची स्वागतिका

रूम सर्विस साठी आलेली Diane

भारतात परत येताना airport वर सोडायला आलेला taxi driver

प्रतिक्रिया

Madhavi_Bhave's picture

9 Dec 2014 - 4:56 pm | Madhavi_Bhave

फिलीपाइन्सला जाताना

sorry फोटो फारच लहान आले आहेत. edit करता येतील का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो येथे दिसण्यासाठी फोटोची लिंक आवश्यक आहे. बहुदा तुम्ही तुमचा फोटो अल्बम पब्लिक अ‍ॅक्सेससाठी खुला केलेला नाही त्यामुळे तुमच्या 'फोटोंच्या लिंक्स'ऐवजी 'फोटोस्ट्रीम क्लिंक्स' (उदा : https://www.flickr.com/photos/129143749@N07/15956538626/in/photostream/) कॉपी होत आहेत. ते सुधारले तर फोटो नीट दिसू लागतील.

गुगल फोटोवर ही समस्या सहसा येत नाही.

टिलू's picture

9 Dec 2014 - 5:23 pm | टिलू

मी हि काही महिने होतो - 'Mandayulong City' मध्ये. माझे निरीक्षण - मनिला शहर आपल्या दक्षिण मुंबई सारख आहे. पण Public Transport तसा कमीच आणि बेभरवशाचा आहे. Veg पदार्थ Non-veg पेक्षा महाग दिसले. Pizza Hut, Mcdonalds मध्ये हि Veg items नाही मिळत. पण मनिला एकदम lively आणि happening city आहे - अगदी आपल्या मुंबई सारखी. IT offshoring मध्ये हि मनिला पुढे येत आहे (स्वस्त आणि हुशार मनुष्यबळ)

विशाखा पाटील's picture

9 Dec 2014 - 7:08 pm | विशाखा पाटील

आवडलं. आखाती देशांमध्ये फिलीपिनोंचे प्रमाण खूप आहे. फिलिपिनो मैत्रिणीने दिलेला पहिला धडा इथे माहितीसाठी देते - "आमच्या देशाचं नाव फिलिपिन्स असं आहे, तुम्ही भारतीय फिलिपाईन्स असा चुकीचा उच्चार करतात."

सिरुसेरि's picture

9 Dec 2014 - 7:54 pm | सिरुसेरि

टायटॅनीक चा ही खरा उच्चार टिटॅनीक असावा .

विवेकपटाईत's picture

9 Dec 2014 - 9:42 pm | विवेकपटाईत

माहितीपरक लेख आवडला.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 2:21 am | मुक्त विहारि

छोटेखानी वर्णन आवडले...

मदनबाण's picture

10 Dec 2014 - 10:19 am | मदनबाण

लेखन आवडले... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt

आयुर्हित's picture

10 Dec 2014 - 11:53 am | आयुर्हित

छान सुरवात.
लेख वाचून त्या देशाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे.

"अजून काही दशकानंतर हा देश आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देईल हे नक्की."
नक्कीच, त्यांनाही मोदींसारखा कार्यकुशल नेता मिळो!

छान ओळख नवीन शहराची. एखाद्या फोटोची लिंक द्या. बघू जमतं का.

जयन्त बा शिम्पि's picture

10 Dec 2014 - 12:30 pm | जयन्त बा शिम्पि

वाटल होत काही सवलत मिळेल ! ! भारतीय मन , कोठेही गेले तरी चकटफु किंवा सवलतीची अपेक्षा ठेवणारच ! !

काळा पहाड's picture

11 Dec 2014 - 11:19 am | काळा पहाड

बै, दोन वरसामागची ट्रीप आत्ता का टंकलिये?

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 1:57 pm | आयुर्हित

झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे.

Madhavi_Bhave's picture

11 Dec 2014 - 2:01 pm | Madhavi_Bhave

आयुर्हित जी धन्यवाद

का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?
की असा काही नियम आहे कि जेव्हाचे तेव्हाच लिहिले पाहिजे? मला मिसळपाव वर कितीतरी जुनी प्रवासवर्णने वाचल्याचे आठवते. आणि मुळात जर तुम्हाला जुने प्रवास वर्णन वाचायला आवडत नसेल तर न वाचणे हा option आहे ना तुमच्याकडे. आणि मी कधी गेले होते व मला का लिहावे वाटले ते मी अगदी सुरुवातीलाच लिहिले आहे की.

काळा पहाड's picture

11 Dec 2014 - 2:58 pm | काळा पहाड

प्रॉब्लेम? नै ब्वॉ. तुमाला का तसं वाट्लं? जस्ट क्युरियस यू नो.

जगातला सर्वात जुना प्रवास मराठीत लिहिल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे हो आपल्याकडे!

@इस्पिकचा एक्का : या साठी लिमका बुकात व ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला संपर्क करायला हवा.

काळा पहाड's picture

11 Dec 2014 - 3:05 pm | काळा पहाड

कुटला हो कुटला? लिंका द्या ना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2014 - 4:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
श्रीगुरुजी's picture

11 Dec 2014 - 3:04 pm | श्रीगुरुजी

प्रथमच प्रवासवर्णन लिहिण्याचा प्रयत्न चांगला आहे. पुढील लेखनास शुभेच्छा!

माझा एक पुण्यातील मित्र विजय फडके गेली अनेक वर्षे फिलिपिन्समध्ये सहकुटुंब रहात आहे. परत जाणार असाल तर त्याची संपर्क माहिती देण्याचा प्रयत्न करीन.

Madhavi_Bhave's picture

15 Dec 2014 - 11:19 am | Madhavi_Bhave

श्रीगुरुजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल व देवू केलेल्या मदती बद्दल धन्यवाद. २०१५ मध्ये बहुतेक माझी ऑफिस टूर असेल. जाण्यापूर्वी नक्की कळवेन.

झंम्प्या's picture

12 Dec 2014 - 7:20 am | झंम्प्या

खूप छान जमलंय प्रवास वर्णन आवडलं. कधी पुन्हा आल्या आणि काही मदत लागली तर जरूर संपर्क करा.

Madhavi_Bhave's picture

15 Dec 2014 - 11:22 am | Madhavi_Bhave

झंप्याजी अगदी नक्की. बहुदा २०१५ मध्ये ऑफिस टूर होईल नक्की.

इस्पीकचा एक्का, टिलू, विशाखा पाटील, सिरुसेरि, विवेकपटाईत, मुक्त विहारि, मदनबाण, आयुर्हित, कंजूस, जयन्त बा शिम्पि, काळा पहाड आपण दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

आज सकाळी जेव्हा लेख पुन्हा पाहिला तेव्हा जादू झाल्यासारखे सर्व फोटो मोठे दिसायला लागले ते पाहून अत्यानंद झाला व सुखद धक्का बसला. ज्यांनी हि मोलाची मदत केली व एवढे कष्ट घेतले आहेत त्या मिपाकरी ना माझे मनापासून खूप धन्यवाद. आता हा लेख मलाच पुन्हा वाचावासा वाटला.

आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

तुम्ही २०१५ मध्ये जावून आलात की, परत एकदा वेगळ्या नजरेने फिलिपिन्स बघा आणि त्या नजरेतून टिपलेले फिलिपिन्स आम्हाला दाखवा, आभाराची फिट्टंफाट.

(स्वगतः, हे असे फुकटचे प्रवासवर्णन आम्हाला हवेच आहे.)

पद्मश्री चित्रे's picture

15 Dec 2014 - 4:53 pm | पद्मश्री चित्रे

लेख छान आहे.