दुकानदाराकडून अपमान..

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
9 Dec 2014 - 12:42 pm
गाभा: 

गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..

प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.

खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.

प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).

वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?

तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Dec 2014 - 12:51 pm | प्रचेतस

हम्म.
पुण्यातले दुकानदार मात्र इतक्या खालच्या पातळीवर कधीच उतरत नाहित.

कपिलमुनी's picture

9 Dec 2014 - 1:37 pm | कपिलमुनी

एकदा चप्पलच्या दुकानामधे चप्पल दाखवायला सांगितली तर तिथल्या नोकराने ४ चप्पल दा खवून झाल्यावर

तुम्हाला घ्यायची नसेल तर टाईमपास करू नका ! जास्त टाईमपास झाला तर मी खवळेन

असे उद्गार काढले होते .
मग आम्ही ताबडतोब पुणेरी बाणा दाखवत काउंटर अ‍ॅटॅक केला आणि चपला बघत असलेली बाकीची गिर्‍हाइके पण घालवली.

एका प्रसिद्ध साडी दुकानामध्ये बजेटवरून फार कटकट केली तेव्हा सौंनी ५०,००० च्या पुढचीच दाखवा असा आग्रह धरला होता तेव्हा मालकाचा चेहरा फोटू काढण्यासारखा झाला होता.

पुण्यातही नग आहेतच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Dec 2014 - 3:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

मास्टरमाईन्ड's picture

27 Oct 2015 - 2:26 pm | मास्टरमाईन्ड

मग आम्ही ताबडतोब पुणेरी बाणा दाखवत काउंटर अ‍ॅटॅक केला

लक्ष्मी रोडवरचं दुकान काय?
मीपण एकदा असाच काउंटर अ‍ॅटॅक केला होता आणि आलेली इतर गिर्‍हाईकं यशस्वीपणे (!) घालवली.
XXX कडे दाखवायला variety नाही आणि माज भयानक. अशांची अशीच जिरवली पाहिजे.

स्पंदना's picture

10 Dec 2014 - 3:54 am | स्पंदना

वल्ली धागा वाचला की नाही?
धाग्यात बायकोबरोबर गेल्याने दुकानदारांनी अपमान केला असे आहे. एकटे गेल्यावर नाही.
मग तुम्ही कसे काय ब्वा या बाबतीत पुणेरी दुकानदाराची हमी देता?

विशाल कुलकर्णी's picture

9 Jan 2015 - 8:59 am | विशाल कुलकर्णी

;)
धुंद रवीचे 'माझी लुंगी खरेदी' वाचलय का? ;)

प्रचेतस's picture

9 Jan 2015 - 9:01 am | प्रचेतस

नाय ना.

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 9:15 am | खटपट्या

हे घ्या !

http://www.maayboli.com/node/13195

प्रचेतस's picture

9 Jan 2015 - 9:22 am | प्रचेतस

धन्स खटपट्या.

विशाल कुलकर्णी's picture

9 Jan 2015 - 10:40 am | विशाल कुलकर्णी

नक्की वाचा. आमच्या रव्यासारखी अफलातून लेखकरत्ने लाखातून एकदाच जन्माला येतात ;)

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 10:45 am | खटपट्या

वाचलं आत्ताच ! कैच्या कै हसत होतो !!

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 8:33 pm | योगी९००

जबरा लिवलय लुंगी प्रकरण...खुप हसलो..!!

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 6:59 pm | हेमंत लाटकर

धुंद रवीचे 'माझी लुंगी खरेदी' वाचलय का? ;)

वाचले. खुप हसलो.

मोदक's picture

9 Dec 2014 - 12:58 pm | मोदक

इतके ऐकून का घेतले..?

आपलापण आवाज चढू शकतोच की.

..आणि चांगले दुकान असेल तर फेसबुक वर त्यांचे पेज असेलच. त्यावर डिट्टेल लिहून आपल्या पाच पंचवीस मित्रपरिवाराला टॅग करा आणि त्यांना हे सगळे पसरवायला सांगा (यात त्या पेजलाही टॅग करा.)

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2014 - 12:58 pm | पिलीयन रायडर

ऐकावं ते नवलच! कुणीही माझ्या नवर्‍याला असं काही बोललं असतं तर त्याची खैर नव्हती हे खरं.. त्यामुळे माझा नवरा अपमानांना डरत नाही..!!

तुम्ही गप्प राहिलात ह्याचंच मला खुप आश्चर्य वाटतय..

परवाच म्हैसुर पॅलेस मध्ये सिल्क साड्याम्चे जे दुकान आहे तिथे गेलो.. मी एकीकडे काही वस्तु पहात होते तेवढ्यात सासुबाई साड्यांच्या काऊंटर वर गेल्या.. १५ व्या सेकंदाला तिथली बाई "घ्याय्चं असेल तर घ्या.. टाईमपास करु नका" असं म्हणाली.. तिचे उच्चार साबांना कळाले नाहीत. मी काही बोलले नाही फक्त "दुकान बंद होतय आई.. लवकर घ्या.. असं म्हणत आहेत त्या.." इतकंच बोलले.. तिनी पुन्हा हे वाक्य २ दा म्हणलं... मग माझी सटकली..

तिला शुद्ध हिंदी मध्ये झाडुन... तिच्या ३ वाक्यांची परतफेड झणझणीत ३० वाक्यांनी करुन मगच तिथुन निघाले...!!

पुढे Govt of India च्या दुकानात गेलो.. तिथे भीतभीत विचारलं की तुमच्या दुकानाची वेळ काय.. तर ती म्हणे "तुमची खरेदी होइस्तोवर!!!" असं पाहिजे....

योगी९००'s picture

9 Dec 2014 - 1:06 pm | योगी९००

पहिल्या प्रसंगात गप्प राहीलो कारण एकदम अनपेक्षित झालेला शाब्दीक मार. आणि त्यावेळी सुचले पण नाही काय बोलावे ते...

स्पंदना's picture

10 Dec 2014 - 3:57 am | स्पंदना

तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. कश्याकाय गप्प राहिल्या?
माझ्याबरोबर असलेल्या कुणाही व्यक्तीचा विनाकारण अपमान, मग मित्र असो, नातेवाईक असो मी कधीही सहन करत नाही. नवर्‍याचा तर अपमान करणार्‍याचा मी कोथळाच बाहेर काढेन.

"शिवाजी म्हाराजांसारखी वाघनखे वापरून आपण दुकानदाराचा कोथळा बाहेर काढत आहात" असे सक्षात चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. :)

योगी९००'s picture

10 Dec 2014 - 10:44 am | योगी९००

तुम्ही गप्प राहिलात तरी सौ. कश्याकाय गप्प राहिल्या?
पहिल्या प्रसंगात तिला सुद्धा असे काही दुकानदार बोलेल असे वाटले नव्हते. दुसर्‍यावेळी मात्र तिच दुकानदाराला बोलली. (मी दोन्ही प्रसंगात तसा गप्पच होतो.)

सरल मान's picture

10 Dec 2014 - 1:07 pm | सरल मान

एकदम रास्त.....

प्यारे१'s picture

10 Dec 2014 - 1:35 pm | प्यारे१

>>> मी कोथळाच बाहेर काढेन.

आर यु 'सामना' कार्यकारी संपादक संरा हार्डकोअर फॅन? ;)

बाळ सप्रे's picture

9 Dec 2014 - 1:06 pm | बाळ सप्रे

"इथे एसीची हवा खायला येउ नये" अशी पाटी कुठे दिसत नाहिये बुवा असं म्हणून त्यालाच थोडा आणखी उचकावयचं :-)

मास्टरमाईन्ड's picture

27 Oct 2015 - 2:29 pm | मास्टरमाईन्ड

बरोबरंच आहे.

कवितानागेश's picture

9 Dec 2014 - 1:11 pm | कवितानागेश

मॉल मध्ये जाणे बंद करा.
गाद्या अंथरलेल्या जुन्या प्रकारच्या दुकानात जा.
मॉल मध्ये दुकानाच्या भाड्यानीच दुकानदार गांजलेले असतात, म्हणून त्यांची टाळकी सटकलेली असतात.

उघड्या रस्त्यावर / मॉलमध्ये दुकान टाकल्यावर हरतर्‍हेची गिर्‍हाईकं येणार. असं बोलून अपमान करणं तद्दन मूर्खपणाचं आहे. भाड्यानं / सरकारी करांनी / कामगारांच्या पगारानी वगैरे गांजला असेल तर तो त्या दुकानदाराचा प्रॉब्लेम आहे.

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 1:11 pm | मदनबाण

गुजराती दुकानदारांना बर्यापैकी माज /मस्ती असते असा अनुभव आहे,अर्थात सगळेच गुजराती दुकानदार तसे नाहीत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

एकाच समाजाला टार्गेट करण्याचा क्षीण प्रयत्न.
मदनबाण काका बहुतेक मोदीवाणी मुळे दुखावले गेले असावेत.
अवांतर : दुसर्‍या महायुद्धाचे वेळेस जर्मनाम्बद्दल चाम्गले उद्गार काढल्याबद्दल पी जी वुडहाऊस ला कोणीतरी विचारले होते की त्याने असे का म्हंटले. वुडहाऊस उत्तरला " आय डोन्ट हेट इन प्लुरल..."
मदनबाणकाका बघा काही प्रकाश पडला तर

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 2:10 pm | बॅटमॅन

आय डोन्ट हेट इन प्लुरल

पुणेकर नामक समाजाबद्दल मात्र हे खरे नाही हां.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Dec 2014 - 2:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"एकाच समाजाला टार्गेट करण्याचा क्षीण प्रयत्न."
भय्याना सारखे कोण टार्गेट करत असते हो येथे विजूभाउ? तुम्हीच ना ? ऑ?

एकाच समाजाला टार्गेट करण्याचा क्षीण प्रयत्न.
ज्या समाजाच्या दुकानदारांकडुन अनुभव आला ते सांगण्यात काय चूक ? आणि हा सात्यताने अनुभवण्यात आला आहे.

मदनबाण काका बहुतेक मोदीवाणी मुळे दुखावले गेले असावेत.
मोदी यांनी कोणते विधान केले ते ठावुक नाही, त्यामुळे मी दुखावण्याचा प्रश्न नाही.

अवांतर : दुसर्‍या महायुद्धाचे वेळेस जर्मनाम्बद्दल चाम्गले उद्गार काढल्याबद्दल पी जी वुडहाऊस ला कोणीतरी विचारले होते की त्याने असे का म्हंटले. वुडहाऊस उत्तरला " आय डोन्ट हेट इन प्लुरल..."
मदनबाणकाका बघा काही प्रकाश पडला तर
अर्थात सगळेच गुजराती दुकानदार तसे नाहीत. माझ्या प्रतिसादातले हे वाक्य तुम्हाला गुजराती मधुन सांगितले तर समजेल काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

माझ्या प्रतिसादातले हे वाक्य तुम्हाला गुजराती मधुन सांगितले तर समजेल काय ?
कहो कहो. मज्जा पडशे .बधु हमजाववा माटे तमने चोख्खी वात करवी पडशे भई.

बधु हमजाववा माटे तमने चोख्खी वात करवी पडशे भई.
असेच गुजराती दुकानदार एकमेकांशी बोलतांना माझ्या समोर उघडे पडले ! कारण मला थोडी बहुत गुजराती बोलता येते,वाचता येते आणि समोरच्याने बोलल्यावर कळते देखील. त्यामुळे त्यांचे खरे रुप मला पटकन कळले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

सरल मान's picture

10 Dec 2014 - 1:15 pm | सरल मान

आणि मारवाडी दुकानदार शक्यतो कधी हाडतुड करत नाही.....शेवट पर्यन्त किल्ला लढतो.

पैसा's picture

9 Dec 2014 - 1:28 pm | पैसा

बोरिवलीत असं झालं हं! धाग्याचे शीर्षक पाहून दोन अक्षरी नाव असलेल्या एका शहराबद्दल आणखी एक धागा आला असं वाटलं होतं! ;)

योगीभाऊ, तुम्ही विनोद म्हणून लिहिलं आहे, पण असं बोलणार्‍या दुकानदाराला मी ३०च काय ३०० शब्द तेही मोठ्या आवाजात ऐकवून मगच बाहेर पडले असते!

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 1:41 pm | दिपक.कुवेत

हा वेळखाउ प्रकार टाळण्यासाठि ते आधीच ग्राहकाला त्याचं घेण्याचं बजेट/रेंज, चॉईस ई. विचारतात आणि त्या नुसारच साड्या/ड्रेस मटेरियल दाखवतात. तरीहि हा प्रकार टाळण्यासाठि ऑनलाईन शॉपींग करा ना. भरपुर व्हरायटि, वाईड रेंज आणि मुख्य म्हणजे हवा तितका वेळ हाताशी. हा आता घासाघीस करुन साडि घ्यायचा आनंद लुटायचा असेल तर मात्र नो पर्याय. मधे बायकोला अशीच एक आवडली म्हणून फ्लीपकार्ट वरुन साडि घेउन सरप्राईज केलं.

हा प्रकार टाळण्यासाठि ऑनलाईन शॉपींग करा ना. भरपुर व्हरायटि, वाईड रेंज आणि मुख्य म्हणजे हवा तितका वेळ हाताशी.
या बाबतीत असहमत... कपडे खरेदी स्वतः पाहुन करणे अधिक चांगले,कारण कापड हाताला लागुन त्या बद्धल योग्य अंदाज लावता येउ शकतो, जे ऑनलाईन खरेदी मधे शक्य नाही. त्यातही साडी घेण्याचा "कार्यक्रम" असेल तर बायडी बरोबर यथायोग्य वेळ "काढुनच" जावे ! ही नको याचे डिझाइन खास नाही, अश्या प्रकारचा पॅटर्न आधी झाला आहे, कोयरीवाले डिझाइन नको, हा रंग कॉमन आहे, अश्या सर्व "बहुमोल" अनुभवांना तुम्ही मु़काल ! ;) "मनपसंद" साडी खरेदी झाल्यावर त्या साडीची स्तुती इतर बायकांनी जर भरपुर स्तुती केली तर मगं बायडीच्या जिवाला आनंदाची परिसिमा राहत नाही. ;) आणि हे सर्व अनुभवण्यासाठी ऑनलाईन खरेदी व्यर्थ आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 2:15 pm | मदनबाण

अधिकची भर...

उत्तम साडीची निवड करण्याचे स्कीलसेट डेव्हलप करणे नवरोबा मंडळींचे आध्य कर्त्यव आहे ! ;)
पाखरांच्या मेंदुत योग्य पॅटर्न निवण्यासाठी कोणता अल्गोरिदम रन होतो हे ज्याला शोधुन काढता येइल त्याला "मानस शास्त्रातले " नोबेल जाहीर होइल ! :p :D *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

पैसा's picture

9 Dec 2014 - 2:18 pm | पैसा

माझा नव्रा त्याच्या आईसाठी घेईल तसल्या साड्या मला घे म्हणतो. म्हणून मी कधीच त्याला दुकानात नेत नाही! =))

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 2:23 pm | मदनबाण

एक राहिलेच...

तुमचा खिसा हलका झाली,ही बायडीची "खरेदी" पूर्ण झाली याचे "नोटिफिकेशन" आहे.
त्यांचे झालेले समाधान हे काही काळा पुरतेच मर्यादित असुन काही काळाने हा जीव परत असंतुष्ट होउन त्याला परत समाधानी करण्यासाठी खिसा हलका करण्याची मानसिक तयारी तुम्ही नेहमीच ठेवली पाहिजे ! *LOL* :D :p

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2014 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा

@पाखरांच्या मेंदुत योग्य पॅटर्न निवण्यासाठी कोणता अल्गोरिदम रन होतो
.........................................................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
हे ज्याला शोधुन काढता येइल त्याला "मानस शास्त्रातले " नोबेल जाहीर होइल ! >>> बाणोबा...तुफ्फान मारलय...तुफ्फा........न! =)) __/\__/\__/\__ =))

@त्यांचे झालेले समाधान हे काही काळा पुरतेच मर्यादित असुन काही काळाने हा जीव =)))))) परत असंतुष्ट होउन
त्याला परत समाधानी करण्यासाठी खिसा हलका करण्याची मानसिक तयारी तुम्ही नेहमीच ठेवली पाहिजे !>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif
=========================================
सदर वक्तव्यांबद्दल तुमी पुण्यात आले,(किंवा आमी हुंबैत आलो! :D ) की , आमच्या कडून तुम्माला एक अत्तरफूल भ्येट!!! =))

मदनबाण's picture

10 Dec 2014 - 10:07 am | मदनबाण

आमच्या कडून तुम्माला एक अत्तरफूल भ्येट!!! Lol
भेटीसाठी इन-आडव्हान्स धन्यवाद. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt

सस्नेह's picture

10 Dec 2014 - 10:59 am | सस्नेह

गुर्जी, प्रतिसादातील स्मायल्या जरा कमी केल्या तर आम्हा पामरांना त्यातले म्याटर शोधणे जरा सोपे जाईल *smile*

आंतरजालावर खरेदी केल्यास कशी फसवणुक होऊ शकते याची उदाहरणे जर टाकायल सुरुवात केली तर मिपाचे सगळे सर्व्हर भरुन वहायला लागतील. जर यासंबंधात मिपाने खरेच एखादा वेगळा विभाग उघडला तर आम्ही अनेक गोष्टी टाकु शकतो. म्हऊन सांगतो आनलाईन शापिंग करु नका

दुकानदारानं असं विचारल्यावर आपला आवाज चढवून उत्तर द्यायचं आणि नंतर काहीतरी उत्तर देऊन वातावरण हलकं करावं. इट वर्क्स.

१. ऊटीच्या हॉटेलमध्ये जेवायला संध्याकाळी थोडा उशीरा गेल्यावर एकदमच ऑर्डर द्या किचन बंद करणार आहे असं मालकानं सांगितलं. जेवायला लागलो आणखी एक रोटी मागवायचं ठरलं.
सांगितलं तर चिडून म्हणे आपको पेहलेही बोला था एक ही टाईम ऑर्डर दो.
म्हटलं गलती आपकी है, तो अचंबित.
म्हटलं खाना अच्छा बनाया इसलिये भूख बढ गया, मै क्या करु. आप खाना क्यु अच्छा बनाया?
तो खुश. नंतर मालक आमच्याशी गप्पा मारत बसला. आपका वाईफ मेरा दोस्त के बेटी जैसे दिखता है वगैरे...

२. कालच्या दिवाळीत कपडे खरेदीसाठी गेलो असताना दुकानदाराची बायको माझा मुलगा दंगा करत होता म्हणून ओरडली. शांतपणे वहिनी असं अज्जिबात ओरडू नका म्हणून सांगितलं, तिनं देखील नाही नाही मी त्याला नाही म्हणाले काही वगैरे केलं.
खरेदी करण्यासाठीचा वेळ आणि पैसा इथं कमी लागतो असा अनुभव असल्यानं पटकन खरेदी करुन निघालो. विषय संपवला. दुसरं दुकान शोधणं, तिथं घासाघीस करणं वगैरे करण्यापेक्षा मला 'तेव्हा' ते बरं वाटलं.

तात्पर्यः दुकानमालक काहीही कारणानं 'कावलेला' असू शकतो. त्याचं ओरडणं आपल्यावर व्यक्तीशः घेऊ नये. आपलं काम करुन निघावं.

माहितगार's picture

9 Dec 2014 - 2:27 pm | माहितगार

तात्पर्यः दुकानमालक काहीही कारणानं 'कावलेला' असू शकतो. त्याचं ओरडणं आपल्यावर व्यक्तीशः घेऊ नये. आपलं काम करुन निघावं.

व्यावसायिकाचं अथवा त्यांच्या कर्मचार्‍यांच ग्राहकाशी दुरवर्तन समर्थनीय असू शकतच नाही. आस्थापनेतील व्यक्तीच ग्राहकाशी वागण आस्थापना, व्यवस्थापन आणि कर्मचार्‍याच्या व्यक्तीगत मुल्य आणि प्रशिक्षणातून येत असावे. 'गुण नाही पण वाण लागला' अस बेण सर्वच आस्थापनांच्या वाटी थोड्या फार प्रमाणात येऊ शकत पण आस्थापना प्रमूखाची ग्राहकाप्रती आस्था उदाहरणातून दिसत असेल तर गोष्टी सावरल्या जाऊ शकतात. पण बर्‍याच ठिकाणी आस्थापना प्रमूख अथवा व्यवस्थापक दुसर्‍या आस्थापनातील चुकीच्या वर्तनांना आदर्श समजून वावरतानाही दिसतात हि वस्तुस्थिती असते. मग कर्मचार्‍यांशी आस्थापना प्रमुखाचे दुरवर्तन झालेले असणे, अपुरे अथवा उशीरा पगार दिले जाणे कर्मचार्‍यांने पुरेशी विश्रांती घेतली नसणे अथवा आस्थापनेने विश्रांतीची संधी दिलेली नसणे यातून या गोष्टी उद्भवतात. काही दुकानांमध्ये मालकाची नातेवाईक मंडळी अनुत्साहाने काम करत असते आणि अशी मंडळीही बेजबाबदारपणे वर्तन करताना दिसतात.

तुमच्या आस्थापनेच्या कर्मचार्‍याचे वर्तन चुकले आहे आणि ग्राहक तुमच्या पर्यंत तक्रार घेऊन पोहोचला, तुम्हाला कर्मचारी आणि ग्राहक दोन्ही सांभाळून घ्यावयाचे आहेत तर नेमके काय करणार ? राजीव गांधी श्रीलंकेत भेटीवर असताना गार्ड ऑफ ऑनर देणार्‍या एका श्रीलंकन सैनिकाने त्यांच्यावर हल्ला केला. हे श्रीलंकन राष्ट्रपती जयवर्धनेंना अनपेक्षीत होते. तो श्रीलंकन सैनिक असे का वागला यावर जयवर्धनेंनी त्याला कदाचित उन्हाचा त्रास झाला असावा असे सांगून वेळ मारून नेली.

एक ग्राहक म्हणून अशा वर्तनांकडे बघताना शेवटी तिही (स्खलनशील) माणसेच आहेत शेवटी चुकू शकतातच हे समजून सोडून देण्या शिवाय पर्याय नसतो. आपण चांगल्या मूड मध्ये असलो तर शक्यतोवर ह्युमर वर गोष्ट निभावता आलीतर चांगली अर्थात बर्‍याचदा हे सांगणे सोपे असते समोरा समोर आलेल्या दोन्ही व्यक्ती कावलेल्या असतील तर समर प्रसंग अटळ राहतोच.

अगदी अलिकडे मला एका वर्तमानपत्र विक्रेत्याने 'विकत घेणार असाल तरच वृत्तपत्रास हात लावा' हे बर्‍यापैकी मर्यादा ओलांडून सांगितले. एका दोन-चार रुपायांच्या वृत्तपत्राच्या खरेदीच्या इच्छेने दुखावले ते यावरून आठवले. असो.

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 2:36 pm | मदनबाण

थोड्याफार प्रमाणात सहमत... कारण आपण दुसरी बाजु देखील विचार करुन पाहिली पाहिजे.
परंतु योग्य वेळी त्यांना त्यांची "जागा" देखील दाखुन द्यायला हवी ! अन्यथा इतर ग्राहकांना सुद्धा तीच वर्तणुक मिळण्याची शक्यता बळावेल.सौजन्य हे दोन्ही बाजुंनी अपेक्षित असले पाहिजे. उत्तम दुकान चालणार्‍या दुकान मालकांमधे कमालीची "मग्रुरी" पाहिलेली आहे, त्या व्यक्तीस त्याला मिळणारा पैसा हा "ग्राहकांमुळेच" मिळतो आहे याची योग्य शब्दात जाणिव करुन दिलीच पाहिजे... कोणाचाही फुकटचा "माज" सहन करुन नये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

माहितगार's picture

9 Dec 2014 - 4:01 pm | माहितगार

कोणाचाही फुकटचा "माज" सहन करुन नये !

विक्रेता आणि ग्राहक नात्यात ग्राहक नेहमी बरोबर अशीच व्यावसायिक भूमीका असावयास हवी पण ती असंख्य लोकांना पेलणे प्रत्यक्षात झेपत नाही. आपली चूक असतानाही दुसर्‍या गाडी चालवणार्‍यालाच चूक म्हणून लोक नडताना दिसतात तसला प्रकार दुकानदारांकडूनही होताना दिसतो. त्या व्यक्तीस त्याला मिळणारा पैसा हा "ग्राहकांमुळेच" मिळतो आहे याची योग्य शब्दात जाणिव करुन दिलीच पाहिजे. देणे श्रेयस्कर पण शब्दाचा मार शहाण्यालाच बसतो असे म्हणतात.

आपण सर्व जगाला बदलू तर शकत नाही, शॉपींगच्या आपल्या स्वतच्या आनंदास पारखे न होता जमेल तो डोस द्यावयास हरकत नसावी. असो

आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?"

हे जरा अतीच झालं. बाकी मबा बोलतो ते काही चूक नव्हे. मुंबैच्या दुकानांत मराठी गिर्‍हाईक पाह्यलं तर, "और व्हरायटी चाहिये तो महेंगा मिलेगा". असं ऐकवलं जातं. म्हणजे मराठी माणसांची ऐपत नसतेच की काय महागडं घालायची अशी ओव्हरऑल समजूत झालेली दिसते. एका मित्राला तर 'आप मराठी हो ना इसलिये सस्ता दिखा रहा था' असं ऐकवलं होतं , आता बोला !!

बाकी तुम्ही म्हणजे फारच शांततेत घेतलेत. मी असतो तर सरळ सांगितलं असतं, "एसीची हवा खायला तुझ्या दुकानात यायला लागावं इतके वाईट दिवस नाही आले माझे!!"

तिमा's picture

9 Dec 2014 - 2:40 pm | तिमा

अशा वेळी मराठी बाणा जरुर दाखवावा.
मुंबईत एक 'बार्बिक्यू नेशन' मधे बराच वेळ स्टार्टर खाल्ल्यावर, तिथल्या वेटरने आम्हाला आगाऊपण, मेन कोर्स पण असल्याची आठवण करुन दिली. त्याच्या मॅनेजरला बोलावून त्याची खरडपट्टी काढली आणि खुन्नसमधे पुन्हा भरपूर स्टार्टर्स मागवले, खाताना जास्तीतजास्त वेळ घालवला आणि मेन कोर्स न घेता त्याचे डेझर्टसचे काऊंटर खाली करुन टाकले.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Dec 2014 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हल्ली ते मॉल वगैरे आल्यापासून एकंदरितच ह्या व्यापारी समाजाचा माज बराच वाढला आहे. जी जुनी दुकाने आहेत्,गुजराती,मारवाड्यांची, त्यांच्या आधीच्या पिढीने बरेच कमवून ठेवलेय त्यामुळे त्यांची नविन पिढी ग्राहकांना जुमानत नाही.
अशा वेळी चेहर्यावरची माशी हलू न देता तू शिकवलास तसाच धडा शिकवावा.

जी जुनी दुकाने आहेत्,गुजराती,मारवाड्यांची, त्यांच्या आधीच्या पिढीने बरेच कमवून ठेवलेय त्यामुळे त्यांची नविन पिढी ग्राहकांना जुमानत नाही.
बरोबर आहे तुमचे माईसाहेब. मराठी लोकांची जी नवी ग्राहकांची पिढी आहे त्याना खरेदीची सवय राहिली नाही असे म्हणायला लागेल. ( हे वाक्य खवचटपणे म्हंटलेले आहे)
माईसाहेब काका तुमच्या मते सर्व दुकानदार गुजराथी आणि मारवाडीच असतात. मराठी लोक दुकानदार नसतातच.दादरचे आठवले शहाडे / गिरगाव पंचे डेपो / पार्ल्याचे प्रभुकृपा /विजय सेल्स / पु ना गाडगीळ / पुणतांबेकर वगैरे बहुतेक गुजराथी मारवाडीच असावेत ( पूर्वजन्मीचे) उगाच्च एखाद्या समाजाला नावे ठेवताना आपण मराठी लोकांच्या नॉनइंटरप्रेन्यर शिप बदल कॉमेम्ट करत असतो हे लक्ष्यात घ्या.
तुमच्या सारख्या उतार वयातील वयोवृद्ध बाई आणि माणसाला हे सांगावे लागावे हे मनाला पटत नाही.

तुमच्या सारख्या उतार वयातील वयोवृद्ध बाई आणि माणसाला हे सांगावे लागावे हे मनाला पटत नाही.

ठ्ठो =)) =)) =))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Dec 2014 - 10:26 am | माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब तुमच्या मते सर्व दुकानदार गुजराथी आणि मारवाडीच असतात

ऑ? असे कुठे म्हंटले? पण मुंबईत काय वा ईतर शहरांमध्ये काय, बहुतांशी दुकानदार गुजराती-मारवाडी आहेत, हे मान्य आहे की नाहि?
जे मराठि दुकानदार म्हणतो आहेस ते पूर्विपासूनच तसे आहेत्.म्हणजे 'मराठी बाण्याचे'. पण हा मराठी बाणा (माल घ्यायचा तर घ्या नाहीतर चालू पडा) गेल्या काहीवर्षात गुजराती दुकानदारांमध्येही दिसू लागला आहे.आधी ते तसे नव्हते.हे मान्य नसेल तर प्रश्नच मिटला.समाजाला नाव ठेवत नाही आहे कोणी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2014 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, काही हुकलेले लोक असे दुकानदार झालेले असतात म्हणजे यांच्या डोक्यातच काही तरी प्रॉब्लेम असतो. म्हणजे कटकटी वगैरे असं काही किंवा सकाळपासून ग्राहकच आले नाहीत, आले असतील तरी ते टाईमपास वाले आणि मग एखादा ग्राहक हातातून सुटतोय असं लक्षात आलं की अशा भडक माथ्याचे दुकानदार काहीही बोलू शकतात. पण, असं कोणी बोललं की त्याला ''तुझ्या दुकानात कपड्यावर काही सोनं फ्री मिळतं म्हणुन आलो नव्हतो'' किंवा ''इथे कपडे नीट मिळणार नव्हतेच असं मित्र म्हणत होतेच ते खरं आहे '' ''असा अनुभव येणारच'' असं काही तरी त्याच्या तोंडावर फेकूनच घरी जावं. फुकट दुकानदाराचं ओझं घरी घेऊन जाऊ नये. उलट त्याच्या समोरुन जेवढं हसत खिदळत जाता येईल तेवढं जावं. पन्नास पन्नास रुपयाचे दोन आईसक्रीम घेऊन खात खात त्याच्याकडे पाहात जावं. सालं त्याला त्याच्या बोलण्याचा त्रास झाला पाहिजे आणि आपण बदला घेतलाच पाहिजे याचा आपल्याला आनंद.

बायको सोबत असल्यावर आपण जे नरमाईचं धोरण घेतो ते अजिबात घेऊ नये. होऊ दे आपला कितीही अपमान पण दुकानदाराचा अपमान केल्याशिवाय जायचंच नाही. (हानामारीवर यायचं नाही) बायको घरी येऊन बोलली पाहिजे, काय कमाल हो तुमची इतकं कशाला बोलायचं त्याला... ( इथे आपण जिंकलेलो असतो) द्याट्स ऑल युवर ऑनर.

-दिलीप बिरुटे
(हिशेब चुकते करायचा नाद असलेला)

भारीच हां प्राडॉ! मी आता असंच करणार.

पण ते ५० ५० रुपयाच्या आईसक्रीम चे काही कळले नाही. आपण खर्च पण करु शकतो हे दुकानदाराला दाखवायला का?

कारण मुंबईत शे-दोनशे रुपयाचे आईसक्रीम कोणाच्या खिजगिणतीत पण नसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2014 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबैत आईसक्रीम महाग असतं तर.... ;)
आमच्याकडे नसतं बॉ.

आईसक्रीम किती महाग स्वस्त हा प्रश्न नै, पण तुमच्या बोलण्याचा आमच्यावर काहीच परिणाम झालेला नाही, आम्ही निर्लज्जासारखे इथे उंडारत आहोत हे दाखविण्यासाठी आईसक्रीम असं म्हटलं आहे.. आईसक्रीम घ्यायचं नसल्यास नवरा बायकोंनी त्याच्या दुकानाच्या बाहेर गाण्याच्या भेंड्या खेळाव्यात...एकमेकांच्या हातावर मस्त टाळ्या द्याव्यात उगाच. असो.
हेतु कल्ला की नाय ?

-दिलीप बिरुटे

vikramaditya's picture

12 Dec 2014 - 9:50 am | vikramaditya

पण खरे तर त्या दुकानदाराच्या प्रतिस्पर्धी दुकानातुन मिळणारा माल विकत घेवुन प्रतिस्पर्धी दुकानाच्या ब्रँडेड पिशव्या घेवुन ह्याच्या दुकानासमोर फिरणे असेही करता येइल. शेजारच्या दुकानातुन घेतले म्हटल्यावर ह्याची मजबुत जळेल.

ते दुकान पण एकाच मालकाच असलं तर? :)

काळा पहाड's picture

12 Dec 2014 - 6:02 pm | काळा पहाड

मग पोपट होईल. सरळ आहे.

पिंपातला उंदीर's picture

9 Dec 2014 - 3:27 pm | पिंपातला उंदीर

इथे दुकानदार (विशेषतः साड्या विक्रेते ) यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार कुणीतरी करावा . एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच दुख समजून घेणार नाही तर कोण ? निम्म्याहून अधिक दुकान खाली उतरवल्यावर ' तुमच्या दुकानांत काही variety च नाही ' अस म्हणून निघून जाणार गिऱ्हाईक बघितल्यावर मन शांती न ढलायला तो इसम संत महापुरुष असावा लागतो . त्यापेक्षा पुरुष गिऱ्हाईक बरे . १० मिनिटात समोर जे नग आहेत त्यातलं एक पसंद करून काहीही घासाघीस न करता बाहेर पडतात . हा जरा आपला 'devil 's advocate वाला मुद्दा बर का .

दुकानदाराच्या समर्थकांनी दुकानदाराच्या बाजूने बोलावे, तर ग्राहकांनी ग्राहकांच्या बाजूने. कुणा एकाने सगळीकडून बोलायचा मक्ता का घ्यावा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2014 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही हरकत नाही, आता आपल्याला कपडे आवड्ले नसती्ल. पुढच्या वेळी अजून नवीन आणतो तेव्हा नक्की पसंत पडेल असे म्हणनारे दुकानदार असतात. ग्राहकांना देव मानणारेही आहेतच ना.

आता उगाच स्त्रीयांना कपडेच झटकन कधीच पसंत पडत नाहीत, त्यांना स्वत:ची एक आवडच नसते, इतरत्र खरेदी केलेल्या काठापदरांची, कुठेतरी पाहिलेल्या टॉपची आवड त्यांना खुणावत असते, स्त्रीयांच्या मनातला कपडा अजून या भुतलावर यायचा आहे, असे विषय काढून उगाच विषयांतर करु नका. मला स्त्रीयांच्या खरेदीवर कमेंट्स करायला अज्जिबात आवडत नाही. ;)

-दिलीप बिरुटे

इथे दुकानदार (विशेषतः साड्या विक्रेते ) यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार कुणीतरी करावा

मी वर अधिक समावेशक प्रतिसाद देण्याचा प्रयास केला आहे. खाली बिरुटे सरांनी चांगली प्रतिक्रीया नोंदवली आहे. दुकानदारांच्या अडचणींचा सहानुभूती पुर्वक विचार करणे वेगळे आणि दुरवर्तनाचे समर्थन करणे वेगळे. ग्राहक चुकला ग्राहकाने हजार कॉमेंट पास केल्या तरी दुकानदाराने संत नव्हे दुकानदार म्हणून तोल ढळू द्यावयाचा नसतो त्याच्या तोल ढळण्याचे व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय समर्थन होऊ शकेल का या बाबत मी साशंक आहे.

दुसरे जिथ पर्यंत स्त्रीयांच्या चोखंदळपणा, आवडी निवडी आणि भारतीय संस्कृतीशी परिचय असूनच बहुधा संबंधीत दुकानदार व्यवसायात येत असावेत आणि ग्राहकाच्या आवडी निवडींशी जुळवून घेण्याची पहिली आणि शेवटची जबाबदारी व्यावसायिकाचीच, व्यावसायिकाशी जुळवून घेण्याची जबाबदारी ग्राहकाची नव्हेच.

माहितगार's picture

9 Dec 2014 - 4:29 pm | माहितगार

एक पुरुष च दुसऱ्या पुरूषाच दुख समजून घेणार नाही तर कोण ?

* या वाक्यातून स्त्रीयांच्या पोषाखाच्या व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी सूचीत होते ) असो

...हा जरा आपला 'devil 's advocate वाला मुद्दा बर का

डेव्हील्स अ‍ॅड्वोकेट कसलं आल, दुकानदाराची ग्राहकानुवर्ती स्ट्रॅटेजीत कमतरता असण्याची समस्या दिसते. बरेच हुशार कापड व्यावसायिक गिर्‍हाईकाची द्विधामनस्थिती टाळून लवकर डिसीजन व्हावे म्हणून आजकाल पोस्टर नुसार कपडे उपलब्ध करताना दिसतात, दुसरा एक मार्ग एका वेळी एका पॅटर्नमध्ये दोनच रंग उपलब्ध असल्याचे सांगतात, त्यात अजून जे हुशार असतात ते दोन लेव्हलला प्रशिक्षीत माणसे ठेवतात गिर्‍हाईक आवडले नाही म्हणताच अजून काही पॅटर्न काढून दाखवणे हा प्रकार केला जातो. आणि तरी गिर्‍हाईक दुकाना बाहेर जाऊ लागल्यास गोडाऊन मधून मागवून देतो अशी लोणकढी मारून दुसर्‍या दुकानातून हवी ती वस्तु मागवून गिर्‍हाईकांना प्रसन्न ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे दुकानदारही असतात.

योगी९००'s picture

18 Dec 2014 - 10:57 am | योगी९००

बरेच हुशार कापड व्यावसायिक गिर्‍हाईकाची द्विधामनस्थिती टाळून लवकर डिसीजन व्हावे म्हणून आजकाल पोस्टर नुसार कपडे उपलब्ध करताना दिसतात, दुसरा एक मार्ग एका वेळी एका पॅटर्नमध्ये दोनच रंग उपलब्ध असल्याचे सांगतात, त्यात अजून जे हुशार असतात ते दोन लेव्हलला प्रशिक्षीत माणसे ठेवतात गिर्‍हाईक आवडले नाही म्हणताच अजून काही पॅटर्न काढून दाखवणे हा प्रकार केला जातो. आणि तरी गिर्‍हाईक दुकाना बाहेर जाऊ लागल्यास गोडाऊन मधून मागवून देतो अशी लोणकढी मारून दुसर्‍या दुकानातून हवी ती वस्तु मागवून गिर्‍हाईकांना प्रसन्न ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे दुकानदारही असतात.
हे एकदम पटलं..नुकतेच एका दुकानात गेलो असता असाच अनुभव आला. दुकानातला माणूस एकदम प्रोफेशनल होता आणि त्याने हिला एखादा पॅटर्न जरा आवडत नाही असे दिसल्या दिसल्या नवीन पॅटर्न काढायचा. तसेच एखादा पॅटर्न थोडाफार जरी आवडला तर त्याच पॅटर्न मधले वेगवेगळ्या रंगाचे कपडे दाखवायचा. आम्ही येथून खरेदी करूनच बाहेर पडलो.

(आता तुम्ही म्ह्णालं सारखे सारखे काय खरेदीला जाताय.. लग्नसराई आहे त्यामुळे कपडे खरेदी करावे लागले. आमच्यासाठी मात्र दोन वर्षापुर्वीचा झब्बा तयार होता. कारण तो झब्बा अजूनही तितकाच फ्रेश वाटत होता.)

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2014 - 4:47 pm | प्रसाद गोडबोले

एक महत्वाचा सल्ला देतो योगी , पटला तर घ्या नाहीतर सोडुन द्या :

मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?".

आयुष्यात कधीही कधीही परक्यासमोर घरच्या माणसावर अन त्यातही विशेषतः पत्नीवर कधीही ओरडु नका . That's how the weak men behave , strong men always stand for their family .

मी तर कित्येकदा आपल्याच माणसाची चुक आहे हे खणखणीत स्पष्ट दिसत असुनही फॅमीलीची बाजु घेवुन कचकचीत भांडलो आहे ...

ऑल्वेज रिमेमंबर : फॅमिली फर्स्ट :)

योगी९००'s picture

9 Dec 2014 - 4:54 pm | योगी९००

तुमचा सल्ला एकदम पटेश...

कदाचित दुकानदारांना हेच हवे असावे की नवर्‍याला हुसकवावे की त्याने मग बायकोला काहीतरी खरेदी करण्यास भाग पाडावे.

हाडक्या's picture

9 Dec 2014 - 9:12 pm | हाडक्या

नवर्‍याला हुसकवावे

एक दुरुस्ती, उकसवावे असे तुम्हास म्हणावयाचे असावे असे दिसते, नवर्‍यास हुसकावून बिले कोण भरणार मग ??

(हुसकावणे : हाकलणे, उकसवणे (हिंदी शब्द): डिवचणे)

योगी९००'s picture

10 Dec 2014 - 10:49 am | योगी९००

उकसवावे हे बरोबर. मला हेच म्हणायचे होते. आभारी आहे.

सुबोध खरे's picture

9 Dec 2014 - 11:09 pm | सुबोध खरे

प्रगो साहेब
हजार हिस्श्यानि पटेल अशी गोष्ट
दुकानदाराने कधीही आमच्या कुटुंबाला उलट बोलण्याची हिम्मत दाखवली असता त्यांचे दात सव्याज त्यांच्या घशात घातलेले आहे भांडण करून वर माल विकत न घेत बाहेर पडलो आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड वरील एका प्रथितयश तीन मजली दुकानात एक साडी विचारली असता एका दीड शहाण्या नोकराने उद्धट शब्दात तुमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून सांगितले. मी त्याच्या म्यानेजरला बोलावून त्याची कडक शब्दात हजेरी घेतली वर अगोदर पसंत केलेल्या पाच साड्या सुद्धा तेथेच ठेवून बाहेर निघालो. माझ्या मेहुण्याचे लग्न असल्याने बरीच खरेदी करायची होती. हे पाहून त्या दुकानाचा मालक येउन विचारू लागला काय झाले म्हणून. मी हकीकत सांगितल्यावर तो मला समजावू लागला कि साहेब गावाकडचे लोक असे बोलल्यावर आमच्यकडे पण पैसे आहेत हे दाखवण्यासाठी दुप्पट खरेदी करतात. त्यावर मी त्याला कडक शब्दात ( खास लष्करी आवाज काढून) सुनावले कि ग्राहकाचा उपमर्द करण्याची तुमची पद्धत अत्यंत टाकाऊ आहे आणी माझे बजेट कितीही होते आणी मला पूर्ण लग्नाची खरेदी करायची होती. पण आता मी तुमच्याकडे एकही साडी घेणार नाही. आमची बायकोच काय पण सासू सासरे सुद्धा एक शब्द न बोलता दुकानाच्या पायर्या उतरले. मग आम्ही कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका दुकानात तशाच साड्या साधारण २५ टक्के स्वस्त घेतल्या. ( तेंव्हा कुमठेकर रस्ता आता सारखा "मोठा" झालेला नव्हता). हे पाहून सासू आणी सासरे यांचा माझ्या व्यवहार ज्ञानावर विश्वास निर्माण झाला.
कोणत्याही दुकानात दुकानदाराने उद्धटपणाने वागलेले मला सहन होत नाही. पैसे आम्ही मोजायचे आणी शहाणपणा त्याने करायचा हे मला सहनच होत नाही. हेच धोरण मी दवाखान्यात ठेवतो. जो रुग्ण आपल्याला पैसे देतो त्याच्याशी उद्धटपणे मी कधीच वागत नाही किंवा माझे सहाय्यक तसे करणार नाहीत हे मी कटाक्षाने पाळतो. जी गोष्ट शक्य नाही ती नम्रपणे सांगा.

अभिजित - १'s picture

10 Dec 2014 - 10:16 pm | अभिजित - १

१/२ वर्षापूर्वी लेख वाचला होता. मोठ्या दुकानात सेल्समन चे फंडे. अमेरिकेतील .. अगदी हाच. ग्राहकाचा अपमान करून त्याला प्रवूत करणे खरेदीला. उंची सेंट, घड्याळे , पर्सेस च्या विक्रीत .. आणि हा जोरदार चालतो !!

काळा पहाड's picture

11 Dec 2014 - 12:20 am | काळा पहाड

नाव सांगा ना, आम्ही ही नाही जाणार नाही तिकडं.

योगीजी, तुम्ही पहिले आपले मोराल आणि करेज वाढवा.
यासाठी एक किलो पुणेकर, अर्धा किलो कोल्हापूरकर आणि छटाक सातारकर यांचा काढा उकळवून दोन कपाचा एक कप करावा व रोज सकाळी घ्यावा . अ

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2014 - 4:53 pm | प्रसाद गोडबोले

छटाक सातारकर

=))

हो सातारकर छटाकभरच ... जास्त झाले साइड इफ्फेक्ट होवु शकतात ... :D

अवांतर : आमच्या महाराजांचा विडीयो पाहिला की नाई ?
" हतबल जरी असलो तरी आमच्या मुसक्या बांधायची हिंमत आज नाय उद्यानाय अन भविष्यातही कुणाची होणार नाय ..... कॅमेरा आहे म्हणुन सांगतोय ... परत 'सांगितलं नाही' म्हणायचं नाही "

प्यारे१'s picture

9 Dec 2014 - 4:57 pm | प्यारे१

तेवढे पुरेसे असतात. +१११

- आम्हीपण सातारकर. काय विजुभौ? ;)

विजुभाऊ's picture

9 Dec 2014 - 6:37 pm | विजुभाऊ

बर्रोब्बर प्यारे.
सातारकर चिमुटभर सुद्धा भारी पडतील.

आनन्दिता's picture

10 Dec 2014 - 1:47 am | आनन्दिता

+१

सहमत

चिगो's picture

15 Dec 2014 - 11:59 am | चिगो

लिंक द्या प्रगो, लिंक..
(सातारा सासुरवाडी असलेला) चिगो..

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 12:04 pm | टवाळ कार्टा

मलापण

प्रसाद गोडबोले's picture

15 Dec 2014 - 4:35 pm | प्रसाद गोडबोले

ऑफीसात यु ट्युब बॅन असल्याने लिन्क देता येत नाहीये .

"Zee24Taas: Satara Udyenraje Bhosale Filmy Style - YouTube" गुगल करा लगेच सापडेल :)

हा हा हा...भारीच स्टाईल आहे.

खटपट्या's picture

15 Dec 2014 - 11:49 pm | खटपट्या

अजुन चित्रतटात का नाही गेले हे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2014 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या स्टाईल है बावा...! :)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 12:27 pm | टवाळ कार्टा

lol

खटपट्या's picture

16 Dec 2014 - 12:55 pm | खटपट्या

घरी असून गणेशा झालाय,

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2014 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

"The server at howudekharch.com can't be found, because the DNS lookup failed." असा मेसेज येतोय. दुसर्‍या संस्थळावरून (शक्य असल्यास गुगलफोटो) फोटो डकवायचा प्रयत्न करा.

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 4:42 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा प्रतिसाद उडवा ... तो फोटो "आली लहर...केला कहर" टाईपचा होता :)

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा

Dash 1

योगी९००'s picture

17 Dec 2014 - 9:47 am | योगी९००

बापरे... एवढेच म्हणेन मी...!! सातारा म्ह्णजे युपी/बिहारपेक्षाही खतरनाक area असावा असे वाटायला लागलयं...!!

गंमत(?) म्हणजे माझा एक मित्र, ज्याने लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान भाजपाचे समर्थन केले आणि भाजपा जिंकला म्हणून आनंदाने नाचत होता, तो नाचता नाचता असेही म्हणाला की दिंडोरीचा "हरिश्चंद्र चव्हाण" आणि सातार्‍याचे "उदयनराजे भोसले" यांच्या विजयाने मी खूपच जास्त खुष आहे कारण ते दोघेही माझ्याच जातीचे आहेत. या दोघांच्या कामाविषयी मी विचारले असता त्याला एकही गोष्ट सांगता आली नाही. मला (नेहमीप्रमाणे) त्याच्या या वाक्यावर काय बोलावे ते कळले नाही. अर्थात अशी प्रजा असेल तर काय कोणीही राजे होतील.

अमित मुंबईचा's picture

17 Dec 2014 - 10:58 am | अमित मुंबईचा

सस्नेह's picture

16 Dec 2014 - 12:11 pm | सस्नेह

खल्लास व्हिडो ! *dash1*

हाडक्या's picture

16 Dec 2014 - 5:07 pm | हाडक्या

काही दिवसांपूर्वी एक "raudransh_27" ह्या आयडीने या परमपूज्य अशा महाराजांबद्दल काही लोक अनादराने बोलले म्हणून हा खालील लेख टाकला होता.
http://misalpav.com/node/27899

आता साहेब हा विडो पाहून काय विचार करत असतील असा विचार करत होतो. ;)

(अवांतर : यांच्याशी संबधित बर्‍याच चेपु पानांवर हा व्हिडो फिरत होता आणि दुर्दैवाने सांगायचे तर बर्‍याच टाळक्यांना ह्यात महाराजांची "ऐट", "शान" आणि "राजे-पण" दिसत होते आणि खरोखर अभिमान वाटत होता.. )

जसे भक्त तसा देव हो. चालायचंच!

इरसाल's picture

17 Dec 2014 - 10:13 am | इरसाल

त्या मनुक्षात राजा असलेले एकही लक्षण दिसत नाही.
म्हणजे जसे तेजपुंज चेहरा, एकप्रकारची आब, रुबाब........ह्यो तर तारवटलेला दिसतोय.८० च्या दशकात नायक खलनायक जसे हातवारे करायचे तसला परकार दिसतोय.

या सायबाचा आणखीन एक विडीयो आहे...मिशी काय भुवई उडवुन देईन टाईप.
सापड्ल्यास देतो.

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2014 - 10:30 am | टवाळ कार्टा

राजांचं राजेपण किती ठेवावे याची अक्कल आपल्यालाच नाहीये

हे तुमच्यासाठी ओ. कैक लोकांना आहेत तीच राजलक्षणे वाटतात त्याला काय करणार, नैका?

हाडक्या's picture

18 Dec 2014 - 9:58 pm | हाडक्या

तुमी विडिओ पाह्यलाय (बरेच विडिओ पण आहेत तसे), आमी याला सातार्‍यात प्रत्यक्ष अनेकदा असे चाळे करताना पाहिलाय.
दुर्दैव हे की हा शिवाजी राजांचे नाव वापरतो आणि याच्या आजूबाजूला बरेच लोक असे आहेत की ते याच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करीत बसतात आणि गाडा सुरु राहतो.

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.

हे आपलं लिहिण्यापुरतं. तसे दिसत नाही.

हाडक्या's picture

19 Dec 2014 - 6:17 pm | हाडक्या

ह्म्म.. ते पण खरंच म्हणा.
तसं या वर्षी यांच्या शहरी मतात (ग्रामीण भागाचा नक्की विदा नाही) भरपूर घट झाली आहे. त्यांचा चुलत-भाऊ (तो बराच सभ्य आहे) जो विधानसभेस निवडून येतो त्याच्याही शहरी मतांमध्ये भरपूर घट आलीये या वर्षी.
म्हणून आशावाद फक्त.

अनुप ढेरे's picture

15 Dec 2014 - 12:17 pm | अनुप ढेरे

कहर व्हीडो आहे तो. हावभाव, हात-वारे, कॉलर ताठ करण... सगळच राजेशाही थाटात =))

प्यारे१'s picture

15 Dec 2014 - 3:38 pm | प्यारे१

ते बर्‍याचदा त्याच 'भावावस्थे'त असतात. :)

तिमा's picture

9 Dec 2014 - 4:59 pm | तिमा

नुकतेच मुंबईतल्या, मरीन लाईन्सच्या एका मोठ्या दुकानात, लग्नाच्या खरेदीसाठी जाण्याचा योग आला. सर्व बायका एकीकडे खरेदीत मग्न होत्या. आम्ही पुरुष, एकाबाजूला उभे होतो.दुकानातील एक वरिष्ठ सेल्समन, सारखा, थोड्या थोड्या वेळाने,'काय चाललंय काय?' असे म्हणत होता. आधी आम्हाला वाटलं की तो आम्हाला उद्देशूनच बोलतोय. पण नंतर त्याला तसे बोलायची संवयच असावी, हे लक्षांत आले. त्यामुळे आम्हीही दुर्लक्ष केले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2014 - 5:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

अशावेळी डोक शांत ठेउन नडायचे असते.

माझ्या घराजवळ असलेल्या एका हार्डवेअर दुकानदाराने असाच माझा अपमान केला होता. मी त्याच्या दुकानातून खुर्चीला बसवायची रबरी बुचं घेतली होती. त्याची साईज चुकीची निघाली म्हणुन बदलायला गेलो तर त्याने माझी अक्कल काढली होती.

त्या वेळी तर मी त्याला चांगले सणसणीत उत्तर दिलेच पण त्या नंतर जवळ जवळ महिना दोन महिने मी त्याच्या दुकानात जाउन विचारायचो "लोणी आहे का?" सुरुवातीला तो वैतागला. नाही म्हणायचा. मग नंतर नंतर तो भडकायला लागला. मी दुकानात येताना दिसलो तरी ओरडा अरडा करायला लागायचा. "पोलीस कंप्लेंट करेन असे म्हणायचा"

तो भडकला तरी मी त्याला शांत पणे म्हणायचो "तुला माहित आहेना मला अक्कल नाहीये ते? मग कशाला चिडतोस. नाहिये लोणी तर नाही म्हणुन सांग"

नंतर नंतर तर मी त्याच्या दुकानावरुन जाताना नुसते "लोणी" असे मोठ्यांदा म्हणुन पुढे जायचो आणि तो मला शिव्या देत बाहेर यायचा. हळु हळु गल्लीतल्या सगळ्या पोरांना पण हे कळले. मग तो दुकानदार कुठेही दिसला तरी "लोणी" असा आवाज यायचा. आणि तो दुकानदार वेड्यासारखा दिसेल त्याला शिव्यागाळ करत सुटायचा.

बरेच दिवस हा प्रकार चालला होता. त्याने माझ्या घरी सुध्दा तक्रार केली होती व माझ्या बाबांनी पण मला या वरुन ताकीद दिली होती पण तो पर्यंत फार उशीर झाला होता, त्या तक्रारीचा काहिही उपयोग झाला नाही, मी चिडवायचा बंद झालो तरी बाकिचे बरेच दिवस त्याला चिडवतच होते.

तुम्ही पण असेच काहीतरी करा. त्या दुकानात जाउन "लंगोट आहेत का" अशी चौकशी त्याच माणसाकडे करा. तो नाही म्हणाला की कसले फालतु दुकान आहे म्हणुन त्याचा जमेल तेवढा पाणउतारा करायचा. शेवटी त्याने समजा कंटाळुन लंगोट मागवले तर "हे असे नको रेशमी हवेत" किंवा "पांढरे नकोत लाल हवे" असे सांगायचे. पाणउतारा करण्याचा कार्यक्रम चालुच ठेवायचा.

वाटल्यास तुमच्या मित्रमंडळींना सुध्दा या मज्जे मधे सामिल करुन घ्या.

त्याचा संताप एनजॉय करा आणि चिकाटीने त्याला सतावत रहा. बघा एक दिवस तो तुमची बिनशर्त माफी मागेल. निदान परत अशा पध्दतीने कोणाशी बोलायची हिम्मत तरी करणार नाही.

(एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता पण ते पुन्हा केव्हा तरी)

पैजारबुवा,

सस्नेह's picture

9 Dec 2014 - 5:03 pm | सस्नेह

__/\__

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 5:06 pm | मदनबाण

__/\__ __/\__ __/\__

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Dec 2014 - 5:47 pm | लॉरी टांगटूंगकर

_/\__/\__/\_

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2014 - 8:33 pm | प्रसाद गोडबोले

=))

"हे असे नको रेशमी लंगोट हवेत"

=))

रेशमी लंगोट 'इमॅजिन' करुन पहायला पाहिजे एकदा ... फंडा भारी आहे , आपण व्हिक्टोरीया सिक्रेटच्या धर्तीवर "बाबुराब सिक्रेट" नावाची मेन्स लिंगर चेन सुरु करु ;)

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 8:38 pm | टवाळ कार्टा

"बाबुराब सिक्रेट"

=))

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2014 - 8:41 pm | प्रसाद गोडबोले

मॉडेलिंग करणार का रे टवाळ कार्ट्या ;) =))

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 8:45 pm | टवाळ कार्टा

नाय बा ... माझ्याकडे ६/७ प्याक नायत
स्पाला विचार त्येच्याकडे हायेत म्हन्त्यात लोक

vikramaditya's picture

9 Dec 2014 - 10:12 pm | vikramaditya

मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहे. ईथे पॅक्सचे काय काम?

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 10:19 pm | बॅटमॅन

तुमच्या मॉडेलला काही पॅक? असे कुणी विचारले नाही उद्या म्हणजे झाले. ;)

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 8:42 am | टवाळ कार्टा

मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहे

असे कोणते कोणते "अंगभूत" गुण लागतात जे आपल्या स्पा कडे नाहित
=))

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 10:20 pm | बॅटमॅन

अगायायायायाया =)) =))

बाकी मेन्स लिंगर चेन म्हणजे नाव लिटरली आणि फिगरेटिव्हली देखील कसं चपखल बसतंय नै ;)

तदुपरि जुन्या काळी राजेमहाराजे लहान असताना रेशमी लंगोट वापरत असतील की. जरा पाहू काही जुन्या ग्रंथांत वा पत्रांत तसा उल्लेख सापडतोय का ते ;)

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 10:24 pm | टवाळ कार्टा

समजा जर उल्लेख नाहीच मिळाला तर मग ???

तर मग बॅट्या हे रेशमी लंगोट घालून एक नवा ईतिहास रचेल....(बॅट्या हलके घेशीलच हो...खात्री आहे)

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 8:44 am | टवाळ कार्टा

तर तर...आणि मग बॅटमॅनला त्याच्या गणवेशाच्या बाहेर घालायला रेशीमवस्त्र मिळेल =))

रच्याकने...बॅट्याचा "तसा" फोटो मचाकवर लावून त्याला मचाकचा "ब्रँड अँबेसेडोर" करायचा का? ;)

मचाकवर 'आनंदी' लोक किती आहेत ते माहिती नाही. समजा बहुसंख्य असले तरी त्यांच्यापुढे माझा बळी का म्हणून? जोकरादि व्हिलन माझं डोकं खातात ते पुरेसं नाय वाटतं. की तुमचाच फटू लावू तिथे ;)

काय राव, एखादा चांगला फटाका लावायचा सोडून हे काय चालवलंय?

रेशमी .... बनियन जालीका,
रुप सहा नही जाये .... वालेका.
(ओ पीं ची क्षमा मागुन)

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 11:07 am | टवाळ कार्टा

ते जुने झाले आता... ये तो बडा टॉईंग है ही जास्त चालेल ;)

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 6:59 pm | दिपक.कुवेत

हे सतवायचे उपाय नक्कि ध्यानात ठेवीन आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा जरुर वापर करीन. लंगोटाची आयडिया तर मस्तच!!!

मोदक's picture

9 Dec 2014 - 5:10 pm | मोदक

__/\__ :))

अजया's picture

9 Dec 2014 - 5:52 pm | अजया

=))

विजुभाऊ's picture

9 Dec 2014 - 6:24 pm | विजुभाऊ

__/\०_ पैजारबुवा.
लैच्च भारी....... एकदम हुच्च

टिवटिव's picture

9 Dec 2014 - 8:45 pm | टिवटिव

___/\____

स्पंदना's picture

10 Dec 2014 - 4:13 am | स्पंदना

:))))

:))))

न्युसन्स वॅल्यू!!

:-))
अफलातून!!

योगी९००'s picture

10 Dec 2014 - 10:51 am | योगी९००

_/\_
रिक्षावाल्याच्या किस्साही टाका सेपरेट धाग्यात.. आमचाही अनुभव टाकतो तेथे.

एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता

हा किस्सा टाकाच.!!

मंदार दिलीप जोशी's picture

11 Dec 2014 - 3:25 pm | मंदार दिलीप जोशी

माझा एक मित्र प्रथमच पुण्यात आला होता. त्याला रिक्षावाल्याने मुद्दामून फिरव फिरव फिरवला. मग मित्र ज्या इमारतीत जायचं होतं तिथे पोहोचल्यावर म्हणाला इथेच थांबा मी पाच मिनिटात येतो असं म्हणून इमारतीत शिरला. आणि त्याच्या मित्राच्या घरी काम झाल्यावर घराला मागून दार होतं तिथून सटकला. :D

पैजारबुवा - रिक्शावाल्याचा किस्सा टाका!!!!!!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Oct 2015 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही…

चारएक वर्षांपूर्वी डेक्कन क्वीन ने स्टेशनला उतरलो आणि रिक्षावाल्याला विचारले सिंहगडरोडला येणार का? तो म्हणाला अडिचशे रुपये होतील. मी नेहमीच सगळ्या रिक्षावाल्यांना मठ्ठ आणि बावळट वाटत असेन बहुतेक कारण प्रत्येक वेळी अशीच् सुरुवात होते. पण या वेळी मला तिकडे हुज्जत घालायचा कंटाळा आला होता. मी हो नाही काही म्हणालो नाही आणि सरळ रिक्षात बसलो. त्याने मिटर टाकलेच नाही. मी मनात म्हणालो चला बरेच झाले.

घराजवळ आल्यावर मी त्याला रिक्षा सोसायटीच्या आवारात घ्यायला सांगितली. खाली उतरलो बॅग वॉचमनच्या केबीन मधे ठेवली आणि वॉचमनला सोसायटीचे गेट लाउन टाकायला सांगीतले. रिक्षावाल्याला ऐकु जाईल अशा आवाजात वॉचमनला म्हणालो “मी सांगेपर्यंत ही रिक्षा सोसायटीच्या बाहेर गेली नाही पाहिजे.” आमचा त्या वेळाचा वॉचमन पण जरा टग्याच होता. त्याने घाईघाईने दार लावले आणि माझ्या मागे येउन उभा राहिला.

मग रिक्षावाल्याला विचारले किती पैसे झाले. तो म्हणाला “आपले अडीचशे रुपये ठरले होते.” मी खिशातुन सत्तर रुपये काढुन त्याच्या हातात ठेवले आणि सांगीतले “मिटर प्रमाणे एवढेच होतात तेवढेच मिळतील” तो माझ्याशी जोरजोरात ओरडाआरडा करत वाद घालायला लागला. “ते आधिच ठरवायचे होते’ “आता जेवढे ठरले तेवढे दे नाहीतर बघुन घेइन” वैगेरे धमक्या द्यायला लागला. “मी त्याला म्हणालो जास्त शहाणपणा केलास तर तुझी रिक्षा रात्रभर सोसायटी बाहेर जाउ देणार नाही. बघ तुला काय परवडतय ते.” आमचा वॉचमन पण माझ्या बरोबरीने रिक्षावाल्याशी हुज्जत घालु लागला.

तो पर्यंत सोसायटी मधेही लोकं जमायला सुरुवात झाली होती. जशी गर्दी जमा होउ लागली तसा त्याचा स्वर नरम् पडत गेला. कारण गर्दीमधल्या कोणीच त्याला सहानुभुती दाखवत नव्हत. मग तो दिडशे रुपयां पर्य्ंत खाली आला, त्यानंतर मग शंभर तरी द्या असे म्हणायला लागला. पण मी सत्तर रुपयांवर ठाम होतो. शेवटी अर्धापाउण तासा नंतर त्याल बहुतेक ते सगळे असहाय्य झाले. त्याने रागारागाने माझे सत्तर रुपये पण परत केले आणि म्हणाला “जा भिकारड्या तुला फुकट सोडल अस समज.” मी शांतपणे सत्तर रुपये खिशात टाकले. वॉचमनला गेट उघडायला सांगीतले. गेट उघडल्या बरोबर तो घाईघाईने रिक्षा घेउन निघुन गेला मी त्या सत्तर रुपयातले पन्नास रुपये वॉचमनला बक्षीस म्हणुन दिले, माझ्या पाठीमागे येउन उभा राहिला म्हणुन आणि घरी गेलो.

पैजारबुवा,

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2015 - 3:27 pm | पिलीयन रायडर

अरे बापरे.. बरंच डेअरिंग केलत की!!

मी पण एका रिक्षावाल्याने असं वाट्टेल त्या गल्ली बोळातुन फिरवल्यानंतर त्याला "पैसे देत नाही जा" असं सांगितलं होतं. तो ही रागारागाने निघुन गेला होता!! तरी मी त्याला १५०/- देत होते.. त्याला २५० हवे होते. मी तर मीटर वगैरेपण वाद घातला नाही. फक्त तू इतकं का फिरवत होतास हेच विचारलं. तर येडं आहे ते १५०/- पण न घेता गेलें. वर म्हणे ओवाळणी तुम्हाला. मी धन्यवाद म्हणाले!

प्यारे१'s picture

27 Oct 2015 - 3:57 pm | प्यारे१

अच्छा 'सत्तर रुपये' तेव्हापासून अखिल भारतात फेमस आहेत तर

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 5:25 pm | टवाळ कार्टा

माने, हा शुध्ध हलकटपणा आहे

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही…

ह्या ह्या ह्या...

बाकी तुमचा लोणीवाला किस्सा जबरदस्त स्ट्रेसबर्स्टर आहे. त्यामुळे रिक्शावाल्याचा किस्सा पेंडींग आहे ते लक्षात राहिले होते.

रुस्तम's picture

27 Oct 2015 - 7:41 pm | रुस्तम

"लोणीवाला " कोणता किस्सा ??

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2014 - 1:29 pm | प्रमोद देर्देकर

ठोssss :))
ज्ञा. पै. जबरा किस्सा तुम्हाला सा. /\___/@@\. तुमच्या चरण पादुका पाठवुन द्या जरा .

मंदार दिलीप जोशी's picture

11 Dec 2014 - 3:18 pm | मंदार दिलीप जोशी

__/\__ __/\__ __/\__

निलीमा's picture

12 Dec 2014 - 11:59 am | निलीमा

लय भारी आइडिया हाये बघा ही... *clapping* *lol*

पुरूषांनी बायकांबरोबर दुकानात गेल्यास सर्व सुत्रे आपल्या हातात ठेवावीत म्हणजे मनस्ताप होत नाही.
आपल्या चपला /पादत्राणे बघून दुकानदारास खरेदीशक्तीचा अंदाज आलेला असतो.
मुख्यगोष्ट सर्व साड्या सूरतहून येतात. तिथे मिळणारी पाचशेची (लेबल किंमत)साडी येथे घासाघीस करून १९००ची पंधराशेला मिळते वर नवऱ्याला एसीची हवा फुकट.
आणखी माहिती हवी आहे का ?

कपिलमुनी's picture

9 Dec 2014 - 5:28 pm | कपिलमुनी

अजून माहिती दिलीत तर तुम्हाला अनाहिताची मेंबरशिप पण मिळेल ! येउ द्या

सूड's picture

9 Dec 2014 - 5:35 pm | सूड

असेच म्हणतो. ;)

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते(तिकीट सेकंड सीटिंग रु १२०.) मधल्या चार तासात खरेदी जमवायची. येताना सुतरफेणी, घारी आणि अडदियोपाक वगैरे मिठाई आणता येते.(हीच मिठाई दादरच्या अग्रवाल क्लास जवळच्या मधुर ड़्रायफ्रुटसमध्येही मिळते.) ऑटोने पाचसात मिनीटांत 'बॉम्बे मार्केट'(शंभरेक दुकाने आहेत, रविवारी बंद असते.) गाठायचे. फैन्सी साड्या असतात. आजूबाजूला अशीच मोठी मार्केटस आहेत. सुती साड्या आता महागच असतात.मदुराई, कोचि, कन्याकुमारीला, तिरुपतीला इथूनच माल जातो. वर्षातून एखादी ट्रीप नोव्हेँबर डिसेंबरला करता येईल. संक्रांतीच्या काळात नको.

कविता१९७८'s picture

10 Dec 2014 - 9:58 am | कविता१९७८

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते

रीझर्वेशन करुन गेल्यास उत्तम ,बांदा टर्मिनस हुन सुटणारी ईंटरसिटी बोरीवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी नंतर सुरत ला जाउन थांबते. सुरतहुन उतरल्यावर स्टेशनबाहेर रिक्षा मिळतात , शेअरींग ने १० रु. पर्यंत जाता येते पण रीक्षाचालक नवीन लोकांना लगेचच ओळखतात, मग ३०-४० रु. भाडे आकारतात. दोन बॉम्बे मार्केट आहेत, एक जुने आणि दुसरे नविन. आधी जुने बॉम्बे मार्केट लागते नंतर नवीन , दोघांमधे १ की.मी. चे ही अंतर नसेल, नवीन बॉम्बे मार्केट समोर गार्डन सिल्क मिल चे ऑफीस आहे. बाकी सुरत ला अगदी एकाबाजुला एक असे हजारो मार्केट्स आहेत. सुरत टेक्स्टाईल मार्केट ही चांगले आहे, सुरत ला खुप मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे एकाच रंगाच्या एकाच डीझाईनच्या ७-८ वेगवेगळ्या वरायटी पाहायला मिळतात, डुप्लिकेसी पण असते. आम्हाला एका दुकानदाराने डुप्लिकेट साडी कशी ओळखावी हे सांगितले होते. एक साडी होती तिच्यावर जो स्टँप लावला होता त्यावर साधारण कंपनीचे नाव , पत्ता, साडीचे मटेरीयल, लांबी, आणि नकल से सावधान अशी चेतावनी होती तश्याच कलर मधे सेम डीझाईन मधे एक साडी होती त्यावर फक्त कंपनीचे नाव आणि नकल से सावधान इतकंच छापलं होतं. येताना प्लॅटफॉर्म न. ४ वरुन ४ वाजुन १० मिनिटांनी ईंटरसिटी सुटते.

रु १२० तिकीट रेझ॰चेच आहे.

कंजूस's picture

9 Dec 2014 - 5:10 pm | कंजूस

नवऱ्याने बायकोबरोबर साडीखरेदीला जाताना असे कृपया वाचावे.

सिरुसेरि's picture

9 Dec 2014 - 5:25 pm | सिरुसेरि

तुम्ही दुकानदाराशी वाद घातला नाही हे योग्यच केले . कारण त्या तसल्या फालतू दुकानदारांची तितकीही लायकी नसते . त्यांना चपलेने मारले तर आपलीच चप्पल खराब होते . त्यापेक्षा अशा दुकानदारांची दखल न घेणे , त्यांना वाद घालण्याइतपतही जास्त भाव न देणे हेच तुम्ही योग्य केले . असे मॉल , दुकाने यापुढे टाळनेच उत्तम . यांवरुन प्रेटी वुमन मधला जुलिया रोबेर्ट्सचा ड्रेस खरेदीचा प्रसंग आठवला . इतर दुकानात भरपुर ड्रेस खरेदी करुन जिथे अपमान झाला त्या दुकानात जाउन खिजवायचे - वेरी बिग मिस्टेक ...