डेबिट कार्ड मदत पाहिजे

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
30 Nov 2014 - 11:45 am

मिपा चे सदस्य मला मदत करतील आणि माझा परदेश प्रवास सुखाचा करतील अशी अपेक्षा आहे

माझ्याकडे VISA चे DEBIT कार्ड आहे . एका COOPERATIVE बँकेतून घेतलेले

मी परदेशी जाणार असल्याने ते कार्ड INTERNATIONAL करून घेण्यास

बँकेत गेलो . बँकेने माझ्याकडून एका FORM वर सही मागितली .

त्यात पुढील शब्द होते

DECLARATION

I have read,understood & agreed to all terms & conditions of debit- cum-ATM card

including its international usage,interpretation of rules,risk,limits,charges,etc. with

other conditions.It will be applicable as updated from time to timeas per bank's rule.

Also,while using the card for international use, i will adhere to the prevailing

FEMA/RBI guidelines.

signature

बँकेतील एकासही वरील नियम मला सांगता आले नाहीत

दोन तीन दिवसात कळवणार आहेत

देशांतरमाहिती

प्रतिक्रिया

त्यापेक्षा तुम्ही फॉरेन करन्सी ट्रॅवल कार्ड का घेत नाही? तुमच्या बँकेबद्दल ठाऊक नाही परंतु अ‍ॅक्सिस बँकेचे मिळते. मी वापरलेले आहे.

कुठे जात आहात? कार्ड डॉलर, पौंड आणि युरोत नक्की मिळते. इथे पैसे भरतीय चलनात भरायचे आणि तिथे त्यांच्या चलनात वापरायचे (प्री-पेड कार्डाप्रमाणे).

दुकानात खरेदी करताना क्रेडिट कार्डाप्रमाणे स्वाईप केलेत तर, तितकेच पैसे तुमच्या खात्यातून जातील. मात्र एटीएममध्ये रोख काढायला वापरलेत तर जादा चार्ज पडतो!

सुनील's picture

30 Nov 2014 - 12:10 pm | सुनील

परत आल्यावर कार्ड सरेंडर करायचे. शिल्लक रक्कम त्यादिवशीच्या विनिमय दरानुसारे भारतीय चलनात परत मिळते.

यसवायजी's picture

30 Nov 2014 - 5:31 pm | यसवायजी

हेच सुचवतो. मी 'Thomas Cook Borderless Prepaid Card' वापरलं होतं.
घेताना ७२ रु. आणी विकताना ७८ रु. दर होता. तेवढेच ४ युरो खिशात पडले

कंजूस's picture

30 Nov 2014 - 12:30 pm | कंजूस

सुनील धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2014 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुनील यांनी सुचविलेला फॉरेन करन्सी ट्रॅवल कार्डाचा पर्याय तुमच्यासाठी सर्वात उत्तम, सोईचा आणि स्वस्त आहे.

तुमच्या मर्जीप्रमाणे एकूण ४०,००० अमेरिकन डॉलर्स पर्यंत परकिय चलन एक ते पाच वेगवेगळ्या चलनांमध्ये एकाच कार्डात साठवून ते वेगवेगळ्या देशांत वापरता येते. चलनबदलाचा महत्वाचा आणि परदेशात बेभरवशाचा ठरू शकणारा दर एकदाच भारतातल्या कार्ड देणार्‍या बँकेत द्यावा लागतो आणि हातात खर्चासाठी उपलब्ध रक्कम नक्की माहित राहते. कार्ड घेण्याअगोदर थोडा अभ्यास करून प्रत्येक देशात किती खर्च (खर्च + थोडि अतिरिक्त रक्कम) येईल ते ठरवलेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक चलन कार्डात साठवलेत तर सहसा परत चलनबदल करण्याची गरज पडू नये.

मूळ कार्डाबरोबर अजून एक अतिरिक्त कार्ड मिळते. मूळ कार्ड हरवले अथवा इतर काही समस्या आली तर ते डिसेबल करून अतिरिक्त कार्ड चालू करणे शक्य असते... त्या प्रक्रियेची माहितीप्रत जवळ ठेवा. बहुतेक हे काम फोनवरूनच होते.

हे कार्ड बहुतेक सर्व मोठ्या खाजगी बँकात (Axis, HDFC, ICICI, इ) मिळते, एसबीआय मध्येही मिळत असावे.

भारतिय डेबिट कार्ड परदेशात वापरू शकता पण त्याचे चलनबदलाचे दर अवाच्यासवा असतात, तेव्हा सावधान !

रमेश आठवले's picture

30 Nov 2014 - 2:30 pm | रमेश आठवले

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डा वरून त्यांच्या नियमाप्रमाणे रोज १००० अमेरिकन डॉलर पर्यंत काढता येतात. परंतु अमेरिकेत मात्र त्यांच्या नियमाप्रमाणे कोणत्याही ATM मधून फक्त ५०० डॉलर दिवसाला काढता येतात . या व्यवहारासाठी २.५ ते ३.५ डॉलर इतके सेवा शुल्क कापले जाते. हे पैसे त्या वेळी असलेल्या चलन दराप्रमाणे तुमच्या रुपयाच्या खात्यातून तत्काळ कापले जातात.

देशपांडे विनायक's picture

1 Dec 2014 - 9:35 am | देशपांडे विनायक

आपणा सर्वांचा response अतिशय धीर देत आहे . धन्यवाद

माझ्या saving a/c मधे माझ्या F D च्या against कर्ज उपलब्ध करून घेतलेली रक्कम वापरण्याची सोय केलेली आहे
त्यामुळे माझ्याच बँकेतून international कार्ड मिळावे असा प्रयत्न करत आहे

माझे visa debit card आहे तर कोणत्या बँकेतून ते घेतले यामुळे मला द्यावे लागणारे charge बदलतात का ?

कार्ड स्वाईप केल्यावर किती charge असतो ?

कार्ड वापरून कॅश काढली तर जास्त charge पडतो हे बँकेने सांगितले

FEMA/RBI RULES मधील FEMA म्हणजे काय ?

लव उ's picture

1 Dec 2014 - 10:23 am | लव उ

Foreign Exchange Management Act

देशपांडे विनायक's picture

1 Dec 2014 - 1:59 pm | देशपांडे विनायक

आत्ताच AXIS बँकेत जाऊन आलो . मला समजले ते खाली लिहित आहे . आपला अनुभव काय सांगतो ?

माझे समजणे बरोबर आहे की चूक
TRAVEL DEBIT कार्ड काढण्यासाठी १५ मिनिटे लागतील

निरनिराळ्या १२ CURRENCY करिता उपयोग करता येतो

कॅश काढताना २ डॉलर CHARGE [ रक्कम कितीही असली तरी ]

कार्ड ५ वर्षे चालते . पहिल्यांदा कार्ड काढताना ३०० रुपये पडतील

कार्ड स्वीप केल्यास CHARGES नाहीत

सुनील's picture

2 Dec 2014 - 8:51 am | सुनील

TRAVEL DEBIT कार्ड काढण्यासाठी १५ मिनिटे लागतील

फार वेळ लागत नाही एवढे नक्की!

निरनिराळ्या १२ CURRENCY करिता उपयोग करता येतो

शक्य आहे. मी ३ चलनांसाठी (डॉलर, पौंड आणि युरो) वापरले. अधिक चलनेदेखिल शक्य आहेत.

कॅश काढताना २ डॉलर CHARGE [ रक्कम कितीही असली तरी ]

रोख रक्कम काढलीत तर फिक्स चार्ज पडतो एवढे खरे. तो किती आणि कसा ते बँकेवर अवलंबून आहे. पण जनरली रोख काढायचे गरज पडू नये.

कार्ड ५ वर्षे चालते . पहिल्यांदा कार्ड काढताना ३०० रुपये पडतील

शक्य आहे. मी जनरली सरेंडर करतो. हवे तर पुन्हा नवे काढता येतेच.

कार्ड स्वीप केल्यास CHARGES नाहीत

हे मात्र खरे.