क्विझ वगैरे

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
27 Nov 2014 - 3:52 pm

पाकिस्तान !

१. 'पाकिस्तान'चा जीना यांनी सांगितलेला अर्थ काय...
२. ज्याची आई हिंदू होती अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव सांगा
३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात !
४. लारकाना मतदारसंघाशी कोण संबंधित आहे
५. राज्ये किती आहेत आणि सर्वात मोठे राज्य(सुभा) कोणते
६. या सर्वात मोठ्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे
७. हिंदू लोक तिथे आहेत का
८. हिंदूंचा बाप असे कोणाला म्हणतात
९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती
१०. नवाझ शरीफ कितव्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत

११. इम्रान खानच्या पक्षाचे नाव काय
१२. त्याच्या पक्षाकडे कोणत्या राज्याची सत्ता आहे
१३. भारतातल्या कोणत्या राजकीय व्यक्तिशी इम्रानचे आपल्याला साम्य वाटते. का
१४. २०१३ च्या लोकसभा निवडणूकीत इम्रानचा पक्षा कितव्या नंबरला राहीला
१५. पाकिस्तानात सामील झालेली अशी संस्थाने सांगा जी भारतात सामील होवू इच्छित होती पण पटेलांनी परवानगी दिली नाही.
१६. पाकिस्तानने भारताचा जो भूभाग बळकावलेला आहे त्यामधील प्रदेशांची नावे सांगा... जमतील तेवढी
१७. पाकिस्तानने बळकावलेला भूभाग भारताला परत मिळाला तर नेमके कोणकोणते फायदे भारताला होतील
१८. बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळे होण्याचे एखादे कारण सांगता येइल का
१९. अशी एखादी सुधारणा सांगा जी भारतात झाली. पाकिस्तानात मात्र आजही होवू शकली नाही
२०. पाकिस्तानतल्या एखाद्या पत्रकाराचे नाव सांगा
२१. एखाद्या लेखकाचे नाव सांगा
२२. भारतासाठी बांगलादेश अधिक घातक की पाकिस्तान
२३. १९४७ पूर्वी वा नंतर पाकिस्तानी प्रदेशात जन्मून भारतात येऊन नाव कमावलेले कलाकार सांगा
२४. पाकिस्तानातल्या दोन वर्तमानपत्रांची नावे सांगा
२५. पाकिस्तान आणि चीन यांच्यामधे वितुष्ट येइल असे काही मुद्दे सांगता येतील का...

असे काही प्रश्न. आपल्याशी चर्चा केल्याने आमचेही ज्ञान वाढीस लागेल... अशी अपेक्षा आहे

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

27 Nov 2014 - 4:04 pm | क्लिंटन

या प्रश्नांची उत्तरे इथे देणे अपेक्षित आहे की व्य.नि वर?

कपिलमुनी's picture

27 Nov 2014 - 4:20 pm | कपिलमुनी

२५. पाकिस्तान आणि चीन यांच्यामधे वितुष्ट येइल असे काही मुद्दे सांगता येतील का...

चीनमध्ये इस्लामप्रेरीत दहशतवाद वाढला की त्यांच्या मधे वितुष्ट येइल

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 4:42 pm | टवाळ कार्टा

२०. पाकिस्तानतल्या एखाद्या पत्रकाराचे नाव सांगा

चांद नवाब

आशु जोग's picture

28 Nov 2014 - 12:12 pm | आशु जोग

बरोबर आहे

नझम सेठी, हमिद मीर, एम ए नियाझी, मलिक मुहम्मद अश्रफ

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2014 - 12:15 pm | टवाळ कार्टा

तुमको समझ्याच नै :)

आशु जोग's picture

28 Nov 2014 - 3:00 pm | आशु जोग

कॅसेट अडकली त्याची

आशु जोग's picture

25 Jul 2015 - 10:43 am | आशु जोग

बजरंगी भाईजान

चिगो's picture

28 Nov 2014 - 2:10 pm | चिगो

चांद नवाब, इंडस न्युज, कराची.. =)) :D

आशु जोग's picture

27 Nov 2014 - 4:49 pm | आशु जोग

उत्तरे इथे चालतील

क्लिंटन's picture

27 Nov 2014 - 4:57 pm | क्लिंटन

इतर काही मिपाकरांनी उत्तरे द्यायला सुरवात केलीच आहे.मी मागे पडू नये म्हणून माझ्या आधीच्या प्रश्नाला उत्तर मिळायचे असूनही इथेच उत्तरे लिहितो :)

३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात !

बेनझीर भुत्तो

४. लारकाना मतदारसंघाशी कोण संबंधित आहे

झुल्फिकार अली आणि बेनझीर भुत्तो

५. राज्ये किती आहेत आणि सर्वात मोठे राज्य(सुभा) कोणते

पंजाब

६. या सर्वात मोठ्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे

मला वाटते ५०% पेक्षा जास्त. नक्की आकडा बघायला हवा.

७. हिंदू लोक तिथे आहेत का

आहेत ना.

९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती

असे कोणते संस्थान प्रत्यक्षात पाकिस्तानात विलीन झाले की नाही माहित नाही. बिकानेरच्या राजाला त्याचे संस्थान पाकिस्तानात विलीन करायचे होते.पण सरदार पटेलांनी अर्थातच तो डाव उधळून लावला असे वाचल्याचे आठवते.

१०. नवाझ शरीफ कितव्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत

तिसर्‍यांदा

११. इम्रान खानच्या पक्षाचे नाव काय

तेहरीक-ए-इन्साफ

१२. त्याच्या पक्षाकडे कोणत्या राज्याची सत्ता आहे

खैबर पख्तुनिखा (वायव्य सरहद्द प्रांत)

१६. पाकिस्तानने भारताचा जो भूभाग बळकावलेला आहे त्यामधील प्रदेशांची नावे सांगा... जमतील तेवढी

मुझफ्फराबाद, गीलगीट

१८. बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळे होण्याचे एखादे कारण सांगता येइल का

पश्चिम पाकिस्तानातील राज्यकर्त्यांची दडपशाही, उर्दू भाषेची सक्ती

१९. अशी एखादी सुधारणा सांगा जी भारतात झाली. पाकिस्तानात मात्र आजही होवू शकली नाही

लोकशाही :)

२०. पाकिस्तानतल्या एखाद्या पत्रकाराचे नाव सांगा

नजम सेठी, आर्देशीर कावसजी

२३. १९४७ पूर्वी वा नंतर पाकिस्तानी प्रदेशात जन्मून भारतात येऊन नाव कमावलेले कलाकार सांगा

राज कपूर, दिलीप कुमार, सुनील दत्त, साहिर लुधियानवी

२४. पाकिस्तानातल्या दोन वर्तमानपत्रांची नावे सांगा

डॉन, जंग

अमित मुंबईचा's picture

27 Nov 2014 - 5:36 pm | अमित मुंबईचा

९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती

असे कोणते संस्थान प्रत्यक्षात पाकिस्तानात विलीन झाले की नाही माहित नाही. बिकानेरच्या राजाला त्याचे संस्थान पाकिस्तानात विलीन करायचे होते.पण सरदार पटेलांनी अर्थातच तो डाव उधळून लावला असे वाचल्याचे आठवते.

माझ्या माहिती प्रमाणे हैदराबाद हे संस्थान तिथले निज़ाम पाकिस्तान मधे विलीन करणार होते. पण सरदार पटेलांनी तो डाव उधळून लावला

क्लिंटन's picture

27 Nov 2014 - 5:39 pm | क्लिंटन

हैद्राबादमध्ये बहुसंख्य प्रजा हिंदू असली तरी राजा हिंदू नव्हता :) त्यामुळे हैद्राबाद संस्थान प्रश्नातील अट पूर्ण करत नाही.

आशु जोग's picture

1 Dec 2014 - 4:10 pm | आशु जोग

छान...

बाकीचे प्रश्न

यसवायजी's picture

27 Nov 2014 - 5:17 pm | यसवायजी

'प्रधानमंत्री'च्या पहिल्या काही भागात यातल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. चांगली सिरीज आहे.
https://www.youtube.com/watch?v=S_3i0Hf8KMI
https://www.youtube.com/watch?v=tUJPsKDYimg
https://www.youtube.com/watch?v=SBKn6TFDVxQ

विशाखा पाटील's picture

27 Nov 2014 - 5:25 pm | विशाखा पाटील

९.बलुचिस्तानमधल्या कालात (कलत) संस्थानात हिंदू लोक होते/ आहेत.
१८.कारणे अनेक आहेत- भाषा, अंतर, one unit scheme
२५. चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीत अमेरिका खो घालू शकते.

आशु जोग's picture

18 Dec 2014 - 6:37 pm | आशु जोग

३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात !

आज पुन्हा याची आठवण झाली...

आशु जोग's picture

27 Nov 2014 - 5:29 pm | आशु जोग

यात आणखी एक प्रश्न जोडतो
२६. व्हिसा पासपोर्टविना भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती सांगा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Nov 2014 - 5:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आशू, अरे अशा अनेक व्यक्ती आहेत किंवा होत्या.रेफ्युजी चित्रपट पाहिला असशीलच ना?

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 6:00 pm | टवाळ कार्टा

अजून पण जणारे असतीलच...

आशु जोग's picture

7 Dec 2014 - 2:01 am | आशु जोग

९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती

थोडासा क्लू... बादशहा अकबर... आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक

क्लिंटन's picture

7 Dec 2014 - 7:06 am | क्लिंटन

अरे हो. उमरकोट (सिंध)

आशु जोग's picture

7 Dec 2014 - 1:28 pm | आशु जोग

अगदी बरोबर क्लिंटन.

उमरकोट. पूर्वीचे नाव अमरकोट. सांगायची गोष्ट संस्थानातल्या प्रजेच्या इच्छेवर विलिनीकरण अजिबात अवलंबून नव्हते. ते पूर्णपणे तिथल्या राजाच्या मर्जीवर अवलंबून होते. म्हणून जम्मू-काश्मीरबद्दल जो घोळ घातला जातो. त्याला काहीच अर्थ नाही. महाराजा हरिसिंग यांनी ते भारतात विलीन केले. तिथेच विषयाला पूर्णविराम मिळाला.

अमरकोटच्या राजाचे जोधपुर(बहुधा) संस्थानाशी वाकडे होते. त्यामुळे त्याचा निर्णय जोधपुरवर अवलंबून होता. जोधपुर पाकिस्तानात तर अमरकोट भारतात राहील. जोधपुर पाकिस्तानात गेल्यास अमरकोट भारतात राहील असा अमरकोटच्या राजाचा पवित्रा होता.

गंमत अशी की त्या संस्थानिकाची काही नातवंडे नंतर जोधपुरात येऊन स्थायिक झाली.

२६. व्हिसा पासपोर्टविना भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती सांगा

स्वातंत्र्यानंतर काही काळ (बहुदा वर्ष-दीड वर्षापर्यंत) दोन देशांमध्ये प्रवास करायला व्हिसा-पासपोर्टची गरज नव्हती. नंतरच्या काळात भारतातून हेर म्हणून पाकिस्तानात गेलेल्यांनी अर्थातच व्हिसा-पासपोर्ट वापरलेले नव्हते. पुढील व्यक्तींनी पाकिस्तानात जाताना नक्कीच व्हिसा-पासपोर्ट वापरला नव्हता---

१. चुकीने पाकिस्तानात गेलेले सरबजीत सिंग सारखे लोक
२. सुरजित सिंग, कश्मीरसिंग, किशोरीलाल शर्मा यांच्यासारखे हेर
३. रविंदर कौशिकची कहाणी तर अगदीच विलक्षण आहे. पाकिस्तानात हेर म्हणून गेलेल्या या रॉच्या एजन्टने कराची विद्यापीठात प्रवेश मिळविला आणि तिथून डिग्री पूर्ण केली.इतकेच नव्हे तर तो पुढे पाकिस्तानी सैन्यात भरती झाला आणि मेजर पदापर्यंत पोहोचला.तिथून आतल्या बातम्या द्यायचे काम त्याने दहा-बारा वर्षांपर्यंत केले. पुढे त्याला पाकिस्तानात पकडले गेले आणि अत्यंत हालहाल करून त्याला अनेक वर्षे तुरूंगात ठेवले गेले.
४. मागच्या वर्षी पेपरमध्ये वाचले होते की २००४ मध्ये मुंबईतल्या (पार्ल्यामधील) एका इंजिनिअरच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्या झटक्यात तो अमृतसरला गेला.पुढे तो समझौता एक्सप्रेसमध्ये चढला (कसा काय कोणाला माहित. त्याला तोपर्यंत कोणीच कसे अडवले नाही) आणि तो लाहोरला पोहोचल्यानंतर त्याला पकडले गेले. मागच्या वर्षी तो भारतात परत आला. तसेच शाळेत असताना वाचलेली गोष्ट आठवते.अट्टारी रेल्वे स्थानकातील हमालाने कोणा प्रवाशाचे सामान चढविले पण नक्की किती पैसे द्यायचे या भांडणात वेळ गेला आणि गाडी सुटली. तो गाडीतून उतरू शकला नाही आणि त्याला लाहोर रेल्वेस्टेशनवर पकडले गेले. नाव नक्की आठवत नाही.

२१. एखाद्या लेखकाचे नाव सांगा

महंमद हनीफ. लय भारी लेखक.

अनुप ढेरे's picture

27 Nov 2014 - 5:59 pm | अनुप ढेरे

१९. अशी एखादी सुधारणा सांगा जी भारतात झाली. पाकिस्तानात मात्र आजही होवू शकली नाही

याच्या उलट काही असेल तर तेही वाचायला आवडेल. अशी 'सुधारणा' जी पाकिस्तानात झाली आणि भारतात नाही झाली.

सुधारणा = स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरेंवर आधारित काहीतरी. किंवा काही असे अधिकार जे बहुतांश जगाने मान्य केलेले आहेत.

अनुप ढेरे's picture

27 Nov 2014 - 6:00 pm | अनुप ढेरे

१५. पाकिस्तानात सामील झालेली अशी संस्थाने सांगा जी भारतात सामील होवू इच्छित होती पण पटेलांनी परवानगी दिली नाही.

हे ही रोचक आहे. कधी ऐकलं नाही याबद्दल.

प्रश्न मस्तं आहेत!

प्रसाद१९७१'s picture

27 Nov 2014 - 7:19 pm | प्रसाद१९७१

ह्याच्या ५०% माहीती भारता बद्दल तरी जमवा.

तुम्हाला फारच कौतुक "त्यांचे"

आशु जोग's picture

1 Dec 2014 - 6:35 pm | आशु जोग

"माहीती नाही"ला माहीती नाही म्हणा की

कारणे का शोधताय :)

खटपट्या's picture

3 Dec 2014 - 7:02 am | खटपट्या

:)

आशु जोग's picture

1 Dec 2014 - 6:37 pm | आशु जोग

1 2 8 9 13 14 15 17 22
अद्याप बाकी आहेत

आशु जोग's picture

4 Dec 2014 - 1:40 am | आशु जोग

२. ज्याची आई हिंदू होती अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव सांगा

झुल्फिकार अली भुट्टो - आई राजस्थानी हिंदू होती

चावटमेला's picture

5 Dec 2014 - 6:41 pm | चावटमेला

२६. व्हिसा पासपोर्टविना भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती सांगा

कासीम रिझवी

आशु जोग's picture

5 Dec 2014 - 11:25 pm | आशु जोग

चित्रपट निर्माता ? राकेश रोशनवर हल्ला करणारा

पिंपातला उंदीर's picture

7 Dec 2014 - 3:07 pm | पिंपातला उंदीर

२६. व्हिसा पासपोर्टविना भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती सांगा

दावूद इब्राहिम ; )

आशु जोग's picture

7 Dec 2014 - 4:00 pm | आशु जोग

भूदान चळवळीकरता विनोबा भारतभर हिंडले. पुढे त्यांनी आपल्याच देशाच्या दुसर्‍या भागात(पाकिस्तानात) जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना सीमेवर अडवण्यात आले. पण विनोबा भारत पाकिस्तान भेद मानत नसावेत. त्यांनी आपला आग्रह सोडला नाही.

शेवटी त्यांना पाकिस्तानातही प्रवेश मिळाला.