B .P . वर गावठी इलाज

रमेश भिडे's picture
रमेश भिडे in काथ्याकूट
23 Nov 2014 - 1:40 pm
गाभा: 

मला B .P . चा त्रास आहे असे एका operation च्या आधी आढळले .म्हणून २ दिवस गोळ्या देऊन B .P . तात्पुरते कमी केले गेले व नंतर operation केले गेले.त्यावेळी,रक्तचाप कमी करण्यासाठी कायमच्या गोळ्या घ्याव्या लागतील असे सांगितले होते व मीठ कमी करायला सांगितले होते .
माझ्या वडिलाना एका माणसाने रक्त दाब कमी करायला (डॉक्टर नव्हता तो तरी) एक औषध सांगितले होते ते असे आहे .
खालील ५ गोष्टींचे चूर्ण (पावडर ) करून सकाळी दात घासल्यावर काही खाण्याआधी ते घेणे व ते थोडे तुरट / तिखट वगैरे असल्यामुळे त्यावर पाणी पिणे .
१) टेटू साल
२)अर्जुनसाल
३)आवळा
४)दालचिनी व
५) मेथी
ह्या सर्वाचे चूर्ण आयुर्वेदिक दुकानात मिळते .ते प्रत्येकी २५ ग्राम एकत्र करून ठेवणे .सकाळी याचे मिश्रण फक्त १ चमचा घेण पाणी पिणे .
यात side effect चा संबंध नसल्याने वापरायचे ठरवले .मी स्वत: १० हून जास्त जणाना सांगितले व गोळ्या बंद केल्या. याचा effect छानच आहे .माझा स्वत:चा रक्तचाप ९० - १४० च्या पुढे गेल्या ३ वर्षात गेलेला नाही(वय ४६ म्हणजे ते नॉर्मल आहे) .इतरानाही चांगला परिणाम जाणवत आहे .
फायदे
१) आयुर्वेदिक आहे .नो side effects
२) alopathy गोळ्या रक्तदाब कमी करायला उपयुक्त आहेतच पण कालांतराने त्याने किडनीवर वाईट परिणाम होतात .
३) आयुर्वेदिक औषध इतके स्वस्त आहे की दिवसाला एक रुपयापेक्षा कमी खर्च येतो .
विशेष म्हणजे ,मीठ कमी करायला सांगितले असूनही मी पुर्वीतकेच मीठ खातो .त्यामुळे चवीवर आघात नाही.
मी काही व्यवसायाने कुठला डॉक्टर नाही. याचा परिणाम चांगला का आढळतो हे मला माहित नाही .हे करणे एक प्रकारे अवैद्न्यानिक आहे पण याचे परिणाम खूप चांगले आहेत हे मला व मी सांगितलेल्या सर्वाना जाणवले .

संदर्भ - Shrinivas Shripad Vaishampayan

.

आधारित *

प्रतिक्रिया

hitesh's picture

23 Nov 2014 - 1:48 pm | hitesh

आता टिंगलटवाळीला तयार रहा.

तीन वर्षापुर्वी इथे एका आयडीने फ्रॅक्चरवर धनगराचे औस्शध असा धागा काढला होता.....

जेपी's picture

23 Nov 2014 - 2:18 pm | जेपी

हितेश भाय,
तीन वर्षापुर्वीचे धागे तुमाला आठवतात.भले ग्यानी तुमी.
आमचा नाना पण असाच ग्यानी होता.
गेला बिच्चारा.
हळवा माझा नाना हळव त्याच,
हितेसभाय तुमच्यासाठी कायपण.

हळवा माझा नाना हळव त्याच (काय?),
हितेसभाय तुमच्यासाठी कायपण

:))

जेपी शब्द गाळू नका हो...

जेपी's picture

23 Nov 2014 - 4:08 pm | जेपी

=))
हळवा माझा नाना,हळव त्याच मन.
हितेसभाय तुमच्यासाठी कायपण
=))
दोन टायपो झाला तिन दिवसात ,
ते पण नको तिथे.

सूड's picture

24 Nov 2014 - 12:04 pm | सूड

__/\__

मला वाटलं नानांच्या मोहिनी अवतारातल्या आयडीला उखाण्यासाठी मदत करताय की काय पंगतीत!! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Nov 2014 - 4:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्या चुकुन गळु वाचलं की ओ. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2014 - 4:29 pm | टवाळ कार्टा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Nov 2014 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

तीन वर्षापुर्वी इथे एका आयडीने फ्रॅक्चरवर धनगराचे औस्शध असा धागा काढला होता.....

आणि

hitesh
सदस्यकाळ : 1 month 2 weeks

???

अनुप ढेरे's picture

28 Nov 2014 - 10:44 pm | अनुप ढेरे

बास का संपाकाका?
तुम्ही ब्यान केलत एखाद्याला तर त्यानं काय करावं? डू आयडी सोडून काय मार्ग दुसरा?

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2014 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर

उच्चरक्तदाबावर उपाय म्हणून मीठ कमी करायला सांगतात. आयुर्वेदाप्रमाणे 'कच्चे मीठ' कमी करायचे असते. म्हणजे जेवणात 'वरून' मीठ घ्यायचं नाही. बाकी शिजवलेल्या पदार्थात तो पदार्थ शिजताना घातलेले मीठ 'कच्चे' नसते म्हणून चालू शकते. (अर्थात प्रमाणात). पदार्थ मीठ न घालता बेचव करून खाऊ नये.

बाकी, तुम्ही सुचविलेला उपाय नक्कीच करून पाहेन.

धन्यवाद.

आपल्याला हे माहित आहेच- पण एक रेविजन म्ह्णा:

लहान मुलांना एक प्रयोग सांगतात- काचेचा एक ग्लास घ्या. त्यात साधे नळाचे पाणी भरा. त्यात एक अख्खे लिंबू टाका. लिंबू पाण्यात बुडते. मग लिंबू काढून घ्या. त्याच पाण्यात चमचाभर मीठ टाका. आता लिंबू टाकून बघा. लिंबू तरंगते. का? तर मीठाने पाण्याची घनता वाढते.

रक्तात अस्लेल्या अतिरिक्त मीठामुळे रक्ताची घनता वाढते. त्या अतिरीक्त घनतेने रक्ताभिसरणाला जास्त दाब लावावा लागतो. मीठ कमी खाल्ले तर ही घनता कमी राहून कमी दाबाने रक्ताभिसरण होणे शक्य होते. थोडक्यात रक्तदाब हा मीठाशी सरळसरळ निगडीत आहे.

त्यामुळे आयुर्वेदावर विश्वास असो किंवा नसो, मीठे कमी न खाणे हे मुळीच शहाणपणाचे नाही.

तुषार काळभोर's picture

23 Nov 2014 - 5:48 pm | तुषार काळभोर

एक ग्लास पाण्यात लिंबू तरंगण्याएव्हढी घनता वाढवण्यासाठी एक ग्लास पाण्यात (अंदाजे १५०-२०० मिली) किती मीठ टाकवे लागेल?
आपल्या शरीरात रक्त किती असते? त्याची घनता हृदयावर दाब येण्याएव्हढी वाढवण्यासाठी किती मीठ रक्तात मिसळावे लागेल? त्यासाठी किती मीठ खावे लागेल? आपण 'सर्वसाधारण मराठी' कुटुंबात जे जेवण (कधी मुगाच्या खिचडीसारखे साधे, तर कधी भरपूर मीठ्मसालेयुक्त) करतो, त्यातून 'अ‍ॅव्हरेज' किती मीठ शरीरात जाते? त्याने रक्ताच्या घनतेवर किती परिणाम होतो? रोजच्या सामान्य जेवणातून मीठ कमी/वर्ज्य केल्याने रक्ताची घनता किती कमी होईल?

हुश्श्श!!

मीठ व रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. फक्त त्याच्या कार्यकारणभावामध्ये काहीतरी 'कन्फ्युज्यन' आहे, असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2014 - 6:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

शरिरात मीठ योग्य प्रमाणात (कमीही नको आणि जास्तही नको) असणे हे पेशींच्या रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असते. रक्तातील मीठाच्या आवश्यक प्रमाणाची कक्षा (रेंज) रक्ताच्या घनतेवर (आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर) खास परिणाम होण्याइतकी जास्त नसते. तेवढ्या प्रमाणात रक्तातील मीठाचे प्रमाण बदलण्याअगोदरच रासायनिक क्रियांमध्ये अपरावर्तनिय बिघाड होऊन मानवी आयुष्य संपून जाईल.

रक्तदाब आणि मीठ (NaCl) यांचा संबंध इतका सरळ, साधा आणि सोपा नाही... खूपच गुंतागुंतीचा आहे. जास्त माहितीसाठी हा विश्वासू दुवा उपयोगी आहे.

hitesh's picture

23 Nov 2014 - 7:57 pm | hitesh

कन्फुज भौ .. उगा नको ते लॉजिक लौ नका.

मिठातील सोडियम आयनमुळे शरीरार्त पाण्याचे रिटेन्शन होते.

सोडियम आयनमुळे रक्तवाहिन्या आकुंचतात.

ही दोन मुख्य कार्णे आहेत.

शिवाय अजुनहे कारणे आहेत

...अर्धवट माहितीने नुकसानच जास्त होते म्हणतात. ह्म्म!

क्षमस्व...

कंजूस's picture

23 Nov 2014 - 4:51 pm | कंजूस

अर्जुनारीष्ट हा काढा पूर्वीपासून आहेच परंतू एकदा का रक्तदाबाच्या सवय लावणाऱ्या गोळ्या घेऊ लागलात की याचा काही उपयोग होत नाही. तुभचे औषध गावठी म्हणू नका त्यात अर्जुनसाल हे मुख्य औ॰द्रव्य आहेच .

स्पंदना's picture

24 Nov 2014 - 5:10 am | स्पंदना

१) अयुर्वेदिक औषधाला गावठी म्हणने अतिशय चुकीचे आहे. कदाचित या माणसाकडे आयुर्वेदिक पदवी नसल्याने वा तो वैदू नसल्याने त्याने सांगितलेल्या औषधाला तुम्ही गावठी म्हणत असाल.
मुख्य म्हणजे औषध म्हणजे काय ते समजावुन घेतलं तर अश्या चुका टळतील. औषध म्हणजे विशिष्ट्य प्रमाणात मिसळलेली रसायने. आता अ‍ॅलोपथीमध्ये ही रसायने प्रक्रिया करुन शुद्ध रुपात मिळतात अन त्यामुळे ती ताबडतोब उपाय करतात तर आयुर्वेदात ईच रसायने नैसर्गिक रुपात असल्याने थोड्या वेळाने काम करतील. पण बेस एकच. या बाबतीत अगदी ठळक उदाहरण म्हणुन क्लोरोक्विनाईनचा उल्लेख करता येइल.
२) मिठाचा वापर- त्याच काय झालं, घरची ग्रोसरी मी एकटी भरते, दर महिन्याची, अन काही जिन्नस आठवड्याला, वा संपतील तसे. ऑस्ट्रेलियात आल्यापासून टेबल सॉल्ट वापरत होते. तर माझ्या लक्षात यायला लागलं की मी हे टेबल सॉल्ट सारखं सारखं खरेदी करते आहे. मग टॅब ठेवला. सरळ बाटली उगडेली की तारीख लिहायला लागले. अहो महिन्याला चार माणसांसाठी मी चक्क एक किलोभर मिठ खरेदी करत होते. म्हणजे महिन्याला प्रत्येकजण पाव किलो मिठ खातोय???? आता हे टेबलसॉल्ट थोडं कमी खारट असतं, त्यामुळे जास्त लागत वगैरे सगळ्या सबबी जरी असल्या तरी....पाव किलो मिठ????
मग पहिला बाजारात कुकिंग सॉल्ट शोधलं, अन दुसरं म्हणजे चपाती (हो आम्ही गव्हाच्या रोजच्या पोळीला चपाती म्हणतो. ती आमची भाषा आहे, अन आम्हाला तिचा अभिमान आहे.) अन भातात मिठ घालायचं बंद केलं. सुरवातीचे आट एक दिवस सगळ्यांनी नाकं मुरडली, पण आता आले सगळे वळणावरं. भाजी आमटीमध्ये जस हवं तस मिठ असतं, पण भात अन चपाती बिनमिठाची!!
घरच्या एकाच माणसाकडे जर ग्रोसरी असेल तर असे अतिप्रमाणात खाणं लक्षात येतं.
आता तोच रुल मी तेल अन तुपावर सुरु केलाय. म्हणजे तेलाचा नवा डबा आणला की त्यावर तारिख लिहायची. किती दिवस वापरलं ते पहायच, अन डिव्हाइड बाय फोर!!
तूप ज्या दिवशी बनवलं त्या दिवसाची तारिख!! किती दिवसात संपल.
३) हृदयबल्य काढा म्हणुन आयुर्वेदिक दुकानात चौकशी करा. माझ्या घरातल्यांना त्याचा चांगला अनुभव आहे. त्यातले इनग्रेडीयंट्स मला सगळे आठवतात की नाही पहाते हं.
अर्जुनसादडा, रक्तरोहिडा, अनंतमुळ, सुंठ असे चार असावते असं वाटतय. हे चारही समप्रमाणात पावडर घेउन एकत्र मिसळुन ठेवायच. सकाळी याचा चक्क दुध घालुन चहा केला चालतो. म्हणजे चहाऐवजी हे मिश्रण चमचाभर मिसळुन पाणी उकळुन अर्ध करायच, हव असेल तर थोड दुध घातल चालत. साखर पहा, हवी असेल तर. अनश्यापोटी हे प्यायच अन मग अर्ध्यातासाने पाणी अथवा चहा चालेलं.

खटपट्या's picture

24 Nov 2014 - 8:07 am | खटपट्या

छान माहीती !!

ताई,

चरकसंहितेत हे औषध कुठे दिलेले आहे? किंवा कोणत्याही प्रमाण आयुर्वेदिक पुस्तकात या औषधाचे वर्णन सापडते काय? असल्यास नेमका श्लोक सांगणार काय?

आयुर्वेदात दिलेली उच्चरक्तदाबाची लक्षणे किती व कोणती? कफ पित्त वात दोषांच्या संतुलानाची उच्च रक्तदाबासंबंधीची मीमांसा थोडक्यात स्पष्ट करणार काय?

रक्तदाब मोजण्याच्या आयुर्वेदिक उपकरणाची माहिती देणार काय? मिलिमिटर ऑफ मर्क्युरीचे आयुर्वेदिक रुपांतरण कसे होते? त्यानुसार एसेन्शिअल हायपरटेन्शन, रीनल हायपरटेन्शन, व इतर सेकंडरी हायपरटेन्शनच्या वर्गवारीचे वर्णन करणारे मूळ श्लोक इथे लिहिणार का?


केवळ औषध सांगणाराच नव्हे, तर तुमचाही संपूर्ण प्रतिसाद गावठी आहे, असे सुचवितो.

उगंच तोंडाला येईल ते काढे आयुर्वेदिक आहेत असे साम्गून, अ‍ॅलोपथीतल्या चारदोन शब्दांना धरून 'असा अनुभव आहे' असं टंकलं, की त्याला वैज्ञानिक महत्व येते काय?

:)

चरकसंहिता काहे मी वाचली नाही आहे. अन औषध आयुर्वेदिक पदवी असणार्‍या वेद्यांनी दिले होते. आयुर्वेदिक औषधांना गावठी म्हणन मला तरी झेपल नाही. तसही अ‍ॅलोपथी मध्ये कुठे लिहीलयं ब्रँडी पिउन सर्दी खोकला जातो? तरीही माणस घेतातच. किंबहुना युरोप मध्ये अल्कोहोल शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठीच रोजच्या आहारात वापरल जातं. म्हणुन तर त्यांच्याकडे वाईनला आदरातिथ्यात इतक महत्व.
आनंदी गोपाळ तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुम्ही सांगा व्यवस्थीत. मिपावर प्रत्येक व्यवसायिकाने साधारण ढोबळ माहीती द्यायला काहीच हरकत नाही जेंव्हा असे लेख येतात. आता सांगायचच तर एक मावस बहिण, एक वहिनी यांनी मुद्दामहून आयुर्वेदिक कोर्स केलेत अ‍ॅलोपथीची प्रॅक्टीस चालत असताना. आणि अनुभवाला मी विज्ञान म्हणुन अजिबात ठोकले नाही आहे. पण जवळ जवळ सहा महिने अ‍ॅमिबीकने मी स्वतः आजारी होते. मी मुद्दामहुन हा अनुभव लिहीला नव्हता. कारण बिब्बा हा अतिशय कडक समजला जातो. वजन नावाची गोष्त सुद्धा उरली नव्हती अंगावर, तेंव्हा शेतावरच्या एका काकूंनी दोन दिवस हाताला बिब्बा बांधला. का तर म्हणे सोसत नसेल तर अंगावर उठतो. मला गंडा दोर्‍याचा प्रकार वाटला, पण असू दे म्हणुन गप्प बसले. तिसर्‍या दिवशी मात्र त्यांनी त्या बिब्ब्याला जाळावर धरुन पेटवला आणि त्यातुन बाहेर पडणार्‍या तेलाचे तीन थेंब निरश्या दुधात टाकले आणि मला प्यायला लावले. दोन दिवसात डिसेंट्री थांबली. शा महिने काही कमी काळ नसतो. कमी औषध नव्हती झाली. सलाईन वगैरे सुद्धा झाली होती.
मी वर लिहीताना कोठेही कोणाला कमी लेखल नव्हत, त्यामुळे तुमचा सूर समजला नाही. आम्ही मिपावर तुम्हाला डॉक्टर या तुमच्या प्रोफेशनने ओळखतो अन तेव्हढा मान सुद्धा देतो. असो ज्याची त्याची जीभ अन ज्याची त्याची लेखणी. व्यक्ती सापेक्षता असतेच.

आनंदी गोपाळ's picture

3 Jan 2015 - 8:52 am | आनंदी गोपाळ

चरकसंहिता काहे मी वाचली नाही आहे. अन औषध आयुर्वेदिक पदवी असणार्‍या वेद्यांनी दिले होते.

कोणते औषध दिले होते? हृदयबल्यकाढा ? तो काढा अन वरच्या लेखात दिलेले औषध हे एकच आहेत का??
शिवाय, या हृदयबल्य काढ्याला कोणत्या संहितेचा आधार आहे? अनुभव चांगला आहे म्हणजे काय आहे नक्की?

१. हे औषध आयुर्वेदात लिहिलेलेच नाही, तर त्याला गावठी म्हणणे यात न आवडण्यासारखे काय आहे?
२. ब्रँडी अ‍ॅलोपथिक औषध नाही. असे नसतानाही लोक ब्र्यांडि वा वाईन घेतात असे लिहून जणू तो गावठी अ‍ॅलोपथीक इलाज आहे असे सुचविणे कशासाठी?
(बाय द वे, 'अल्कोहोल' हे औषधी आहे, व औषधे देण्याचे माध्यमही. त्याचा फार्म्याकॉलॉजीत संपूर्ण अभ्यास करावा लागतो.)
३. प्रॅक्टीस व्यवस्थित चालत असताना कुणी आयुर्वेदिक कोर्स करणे हा आयुर्वेद वा मॉडर्न मेडिसिन श्रेष्ठ वा कनिष्ठ असल्याचा पुरावा कसा काय?
४. उगंच 'आयुर्वेदिक' च्या नावाखाली वाटेल त्या गोष्टींना प्रतिष्ठा देणे चुकीचे आहे, हा माझा सूर आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली भारतीय फार्मा इंडस्ट्रीत व उदा. साम टिव्हीवरही काय चालते, याचा थोडा कानोसा घेतला, तर आपण ती औषधे घेताना, व प्रमोट करताना काय चुका करतो आहोत ते समजेल.
५. येताजाता मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरला आरोपी करणार्‍या व कडक शिक्षाही ठोठावणार्‍या समाजात असली अवैज्ञानिक 'अनुभवसिद्ध' औषधे वापरणार्‍यांना, वापरायला उद्युक्त करणार्‍यांना कोणतीही शिक्षा नाही, हे पाहून मला मनापासून राग येतो.

तुमचा प्रतिसाद, हे औषध 'आयुर्वेदिक' आहे असे सांगणारा होता, ते तसे आहे, हे सिद्ध करणारा काही बेस आहे का? हे मी विचारत होतो. तो तसा बेस नाही, हे मला ठाऊक आहे. ते कोणत्या बेसिसवर तपासता येईल, तेही त्या प्रश्नांच्या माध्यमातून मी लिहिलेले आहे. तेव्हा गावठी औषध हे गावठीच आहे, तसेच त्याला इतर प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्नही गावठीच आहे, असे पुन्हा एकदा म्हणतो.

धन्यवाद!

अनुप ढेरे's picture

3 Jan 2015 - 9:17 am | अनुप ढेरे

४. उगंच 'आयुर्वेदिक' च्या नावाखाली वाटेल त्या गोष्टींना प्रतिष्ठा देणे चुकीचे आहे, हा माझा सूर आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली भारतीय फार्मा इंडस्ट्रीत व उदा. साम टिव्हीवरही काय चालते, याचा थोडा कानोसा घेतला, तर आपण ती औषधे घेताना, व प्रमोट करताना काय चुका करतो आहोत ते समजेल.

याच्याशी सहमत आहे.

अल्कोहोल' हे औषधी आहे

याच्याशी देखील पूर्ण सहमत आहे. ;-)

स्पंदना's picture

3 Jan 2015 - 12:01 pm | स्पंदना

ब्रँडी मेडीसीनचा अभ्यास न करणारे शेतकरी, घरच्या आया, आज्या द्यायच्या, त्याला तुम्ही उचलुन धरता आहात आनंदी गोपाळ. अन आयुर्वेद औषधे ही वनस्पतीजन्य असल्याने चुर्ण अम काढे आयुर्वेदातच येतात. उगा वाद घालण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, पण घरातले सगळे वयोवृद्ध हा काढा घेतात अन तेंव्हा पासून निदान रक्तदाब अन ह्रदयाशी संबंधीत ब्लॉकेज वगैरे गोष्टी बर्‍याच नियंत्रणात आहेत. तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही सांगा शांतपणे माहीती, उगा माझ्या प्रतिसादावर राग कशाला? येथेच इस्पिक एक्का मिठाबद्दल सांगताहेत, बाकी सगळे बोलताहेत, त्यावर वाद घाला.
एकून तुमचा राग माझ्या प्रतिसादापेक्षा विनाकारण माझ्यावर असलेला दिसतोय.
राहीली गोष्ट डॉकटारांना आरोपी बनवण्याची, मी माझ्या प्रतिसादात असे काही लिहीलं आहे? कोठे? दाखवा बघु!!
गावात राहून बरीच अशी औषधे वेळच्या वेळी उपयोगी पडलेली पाहिल्याने त्यांना उगा गावठी म्हणुन कमी लेखलेले मला आवडलं नाही. अन ज्या मुळे बरे व्हायला मदत होते ते माझ्यामते तरी औषधच!!
माझ्या प्रतिसादातला किलोभर मिठाचा भाग तुम्ही अगदी सोयिस्कर वगळता आहात. गावठी म्हणुन एखाद्या गोष्तीला हेटाळुन तुमच समाधान होत असेल तर होउ दे बापड.
माझी तर येथेच लेखन सीमा.
तसेही धाग्यावर बाकी कोठेही प्रतिसाद न देता फकत एक प्रतिसाद घेउन कुटण्याला सल्युट!

आनंदी गोपाळ's picture

3 Jan 2015 - 10:45 pm | आनंदी गोपाळ

ब्रँडी मेडीसीनचा अभ्यास न करणारे शेतकरी, घरच्या आया, आज्या द्यायच्या, त्याला तुम्ही उचलुन धरता आहात आनंदी गोपाळ. अन आयुर्वेद औषधे ही वनस्पतीजन्य असल्याने चुर्ण अम काढे आयुर्वेदातच येतात.

मी ब्रँडीला कधी उचलून धरलं? अल्कोहोल व ब्रँडीतला फरक, हा ज्येष्ठमध व 'स्टिरॉईड' मधल्या फरकासारखाच आहे, ही उपमा आपल्या ध्यानी येतेय का?

मॉडर्न मेडिसीनचीही असंख्य औषधे वनस्पतीजन्य आहेत. आयुर्वेदातही प्राणीजन्य वा खनिज औषधेही आहेत.

अ‍ॅस्पिरिन विलो ट्री बार्क पासून, सदाफुलीपासून कॅन्सरची औषधे बनतात. बुरशी ही वनस्पतीच. या वनस्पतीपासून बनलेले पेनिसिलिनही आयुर्वेदिक होईल, नाही का? ही सगळीच केवळ वनस्पतींपासून बनलीत म्हणून ब्ल्यांकेट आयुर्वेदात येतात का?

पण, त्या प्रतिसादांपायी कुणा अजाणत्याचा तोटा होऊ शकतो, हे माझे वैद्यकीय ज्ञान मला सांगते.

सविता००१'s picture

24 Nov 2014 - 10:57 am | सविता००१

अपर्णाताई, नेमकं किती मीठ दर महिन्याला प्रत्येकाला लागत असेल? आमच्याकडे पण ४ जणांसाठी मला ऑलमोस्ट १ किलो लागतच आहे मीठ! माझे वडील आणि नवर्‍याला तर ज्यात-त्यात वरून मीठ घालायची सवय आहे. हे तर वाईट आहेच.. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2014 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

Food Standards Agency (UK) च्या अधिकृत मानकाप्रमाणे (Guideline Daily Amount; GDA) मिठाचे प्रतिदिवस प्रमाण असे असायला हवे:

Age 11 years and over, 6g per day (2300 mg sodium)
Age 7-10 years, 5g per day
Age 4-6 years, 3g per day
Age 1-3 years, 2g per day.

अर्थातच वर दिलेली प्रमाणे निरोगी व्यक्तींसाठी आहेत. रक्तदाब, मुत्रपिंडाचे विकार, इ आजार असणार्‍यांच्यासाठीचे प्रमाण रोगाच्या प्रकाराप्रमाणे आणि गांभिर्याप्रमाणे व्यक्तीपरत्वे वेगळे असेल. ते तज्ञ वैद्यकिय सल्ल्यानेच ठरवणे उचित होईल.

बाजारात मिळणार्‍या तयार (रेडिमेड) पदार्थांतिल मिठाच्या प्रमाणाप्रमाणे त्यांचे वर्गिकरण असे केले जाते:

High salt content food = 1.5g of salt (or 0.6g of sodium) per 100g
Medium salt content food = between the High and Low figures
Low salt content food = 0.3g of salt (0.1g of sodium) per 100g.

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2014 - 12:24 pm | प्रसाद१९७१

@भिडे साहेब

१) आयुर्वेदिक आहे .नो side effects

ह्या विधानाला काही अर्थ आहे का? कदाचित तुम्ही लिहीलेल्या ५ गोष्टींना साईड इफ्फेक्ट नसतील. तरी सुद्धा त्यातला कोणताही पदार्थ भरपूर खाल्ला तर त्रास होणारच ( जसे मीठ जास्त खाल्यामुळे होइल तसा ).

चंद्रनील मुल्हेरकर's picture

24 Nov 2014 - 12:59 pm | चंद्रनील मुल्हेरकर

90 ते 140?? सिस्टॉलीक काय?

चिगो's picture

24 Nov 2014 - 1:55 pm | चिगो

मी तीन-चार वर्षांपुर्वी वाचलेल्या एका माहितीनुसार..

उत्क्रांतीच्या काळात मानव जे काही खाद्य खायचा, त्यात नैसर्गिकरीत्या मीठ कमी प्रमाणात असल्याने आपले शरीर खाद्यातून जास्तीत जास्त मीठ शोषून घेण्याचा प्रयत्न करते. त्या माहितीनुसार, आपली मुत्रपिंडेपण मुत्रातून जास्तीत जास्त मीठ शोषण्याचा प्रयत्न करतात. मीठ घालून जेवण बनवण्याची पद्धत ही उत्क्रांतीकालाच्या तुलनेत फार उशिरा अस्तित्वात आली. त्यातल्या त्यातही भरपुर मीठ घालून बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ जसे की लोणचे, पापड, फरसाण इत्यादी हे तुलनात्मक रित्या फारच नवे (मागील हजार-पाचशे वर्षांतील).. त्यामुळे अजूनही आपले शरीर ह्या भरपुर मीठ असलेल्या पदार्थांतूनही जास्तीत जास्त मीठ शोषण्याचा प्रयत्न करते, जे की रक्तदाबासारख्या विकारांशी संबंधित आहे..

ह्या बाबतीत जाणकारांचे, खासकरुन इए साहेबांचे मत वाचायला आवडेल जे शरीरशास्त्र आणि उत्क्रांती ह्या दोन्ही बाबींतले जाणकार आहेत.. :-)

दिलिप भोसले's picture

26 Nov 2014 - 3:41 pm | दिलिप भोसले

प्रयत्न करून बगायला काय हरत आहे.सर्व पदार्थ शरीराला पोषक आहेत.

चौकटराजा's picture

29 Nov 2014 - 4:49 pm | चौकटराजा

मला मधुमेह व रक्तदाब दोन्ही विकार आहेत. व दोन्हीला अलोपथिक औषध घेत आहे. दोन्ही विकार ताब्यात आहेत. माझ्या अनुभवानुसार मीठ व साखर यांची एक व्यसनात्मक संवय आपल्याला लागलेली असते. ती प्रयत्नाने कमी करता येते.बरेच मधुमेही अस्पार्टेम ची गोळी घातक म्हणून बिनसाखरेचा चहा प्यायला शिकतात की त्याना पुढे पुढे तोच चहा " खरा चहा" असे वाटू लागते. मीठाचेही असेच आहे. मला आता बाहेरचे फरसाण शेव ई गोष्टी फारच खारट करतात असे वाटते.कारण मी जेवणात मीठ घेतच नाही. आपण मीठाची घातक संवय लावून घेतली वाईट झाले हे कळते त्यावेळी फार उशीर झालेला असतो. रक्तदाबाने आपल्याला घेरलेले असते.

सत्याचे प्रयोग's picture

8 Dec 2014 - 6:12 pm | सत्याचे प्रयोग

पुण्यात लय फिरलो पण टेटू साल नाही मिळाली कुठे मिळेल कळेल काय
मी फक्त मेथी दाने भिजवून खाली पेट खात होतो त्यानेही बी पी चा फरक जाणवत होता हा प्रयोग करून पाहतो

रमेश भिडे's picture

2 Jan 2015 - 4:41 pm | रमेश भिडे
प्रशांत हेबारे's picture

19 Dec 2014 - 2:31 pm | प्रशांत हेबारे

टेटू साल काही सापडत नाही. तेव्हा कृपया मदत करावी.

रमेश भिडे's picture

2 Jan 2015 - 4:39 pm | रमेश भिडे

Oroxylum Indicum - Mother Herbs
www.motherherbs.com/oroxylum-indicum.html

रमेश भिडे's picture

2 Jan 2015 - 4:44 pm | रमेश भिडे

tetu
Oroxylum indicum fruits in Rangareddy district of Andhra Pradesh, India

अमेरिकन त्रिशंकू's picture

2 Jan 2015 - 11:59 pm | अमेरिकन त्रिशंकू

संपादक मंडळी,

असल्या धाग्यांकरता एक स्टँडर्ड डिस्क्लेमर आहे का?

बहुतेक संस्थळांवर (मराठी नव्हे) वैद्यकीय सल्ले देण्यास कायदेशीर भानगडीत पडावे लागू नये म्हणून परवानगी नसते.
भारतातपण इंटरनेट्चे नियम/कायदेकानून बदलत आहेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी काही केसेसमध्ये झाल्याचे ऐकिवात आले आहे.

बघा विचार करा.

आनंदी गोपाळ's picture

3 Jan 2015 - 8:58 am | आनंदी गोपाळ

एक्झॅक्टली हेच म्हणतोय.
भारतात तसे नसते.
संस्थळावरच काय, नेहेमीच्या जगातही कुणीही उठून कुणालाही काय वाट्टेल त्या गोष्टी औषधाच्या नावाखाली घ्यायला सांगू शकतो. इथे डॉक्टर-डॉक्टर खेळायची हौस प्रत्येकाला असते. खेळून जिवावर बेतले की शेवटी ज्या मॉडर्न मेडिसिन वाल्याच्या दारी पोहोचतील त्या डॉक्टरचा गळा धरता येतो, व तोडीपाणीही करता येते.

-(एकंदर परिस्थिती पाहून "आनंदी" झालेला) आनंदी गोपाळ

धन्यवाद. हो असा डिस्क्लेमर आवश्यक आहे. आणि तो अस्तित्वातही आहे.
अधिकारिक धोरणात आहेच पण शिवाय , तो याच (किंवा कोणत्याही) पानावर उजव्या मेनूमधे तुम्हाला दिसेल. खाली पुन्हा पेस्ट केला आहे:

सूचना: "येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

अमेरिकन त्रिशंकू's picture

3 Jan 2015 - 5:37 pm | अमेरिकन त्रिशंकू

गवि,

धन्यवाद. माझ्या मते ही सूचना पुरेशी नाही.
संस्थळावर कोणतेही वैद्यकीय सल्ले/चर्चा नकोत हे स्पेसिफकली पॉलिसीमध्ये असावे हे माझे मत आहे.

बघा विचार करा.

सूचनेवर जरुर विचार केला जाईल.

आभार.

पैसा's picture

3 Jan 2015 - 7:25 pm | पैसा

वैद्यकीय सल्ले/चर्चा नकोत असे सांगता येणार नाही. इथे जे डोक्टर्स आहेत ते उघडपणे आपण डॉक्टर आहोत असे सांगतात आणि योग्य असेल तो सल्ला आरोग्यविषयक प्रश्नांना नेहमीच देतात. इतर सदस्य जे डॉक्टर्स नाहीत त्यांचे सल्ले कितपत मनावर घ्यायचे हे चर्चा करणार्‍याने ठरवावे. तसेही बोलता बोलता आपण तब्बेतीच्या तक्रारी घरी, ऑफिसमधे, मित्रांमधे करत असतोच. समजा मी म्हटले की मला सर्दी झालीय तर माझ्या चौथी पास सासूबाईंपासून ते डॉ. खर्‍यांपर्यंत सहजच प्रत्येकजण त्रास कमी व्हावा म्हणून काहीतरी सांगतोच. त्यातले नेमके काय करावे की नेहमीच्या डॉक्टरकडे जावे हे मी ठरवले पाहिजे. इथले डॉक्टर नसलेल्यांचे सल्ले वाचून कोणी त्याप्रमाणे वागत असेल असे मला वाटत नाही. जामोप्या यांनी निव्वळ खोडी काढण्यासाठी 'धनगरी उपाय' हा धागा काढला होता त्याची आठवण झाली.

आता चर्चा करू नये म्हणालात तर सगळी संस्थळेच बंद करावी लागतील! कारण इथे लोक येतात ते काहीतरी वाचण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी! मग त्यात अमूक विषय हवा आणि अमूक विषय नको असे सांगता येणार नाही. याउलट डॉ. सुबोध खरे, बाबा पाटील, साती यांनी वेळोवेळी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर धागे काढून चर्चेत भाग घेतला आहे आणि ते सगळेच या संस्थळाचे महत्त्वाचे घटक आहेत. अशा चर्चांच्या निमित्ताने वैद्यकीय व्यवसायातील अधिकृत मते लोकांपर्यंत पोचतात.

सस्नेह's picture

3 Jan 2015 - 7:45 pm | सस्नेह

केवळ वैद्यकीय विषयासाठी वेगळ्या डिस्क्लेमरची आवश्यकता वाटत नाही कारण इथे चर्चिल्या जाणा-या अनेक विषयांपैकीच तो एक.
आणि सल्ल्याबद्दल म्हणावे तर येथील वाचक हे संगणक ज्ञान असणारे सुशिक्षित व सूज्ञ असल्याने इथली वैद्यकीय मते ते सल्ला म्हणून घेतील किंवा कसे याची जबाबदारी संस्थळावर येत नाही.
तरीही, आनंदी गोपाळ व त्रिशंकू यांना असा काही जालीय कायदा माहिती असल्यास त्याचा दुवा अथवा तपशील द्यावा. मिसळपाव प्रशासन त्यावर निश्चितच विचार करेल.
धन्यवाद.

अमेरिकन त्रिशंकू's picture

3 Jan 2015 - 8:15 pm | अमेरिकन त्रिशंकू

केवळ वैद्यकीय विषयासाठी वेगळ्या डिस्क्लेमरची आवश्यकता वाटत नाही कारण इथे चर्चिल्या जाणा-या अनेक विषयांपैकीच तो एक.

वैद्यकीय चर्चा/सल्ले आणि इतर चर्चा यात महत्वाचा फरक असा आहे की एकामध्ये लोकांच्या जीवाशी खेळ होउ शकतो.

आणि सल्ल्याबद्दल म्हणावे तर येथील वाचक हे संगणक ज्ञान असणारे सुशिक्षित व सूज्ञ असल्याने इथली वैद्यकीय मते ते सल्ला म्हणून घेतील किंवा कसे याची जबाबदारी संस्थळावर येत नाही.

हे तुम्ही जर गृहित धरत असाल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही न्यायालयात हे व्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणून स्वीकारले जानार नाही.

माझ्या पहिल्या पोस्ट्मध्ये म्हणल्याप्रमाणे भारतातील इंटरनेट्बद्दलचे कायदे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे असे ऐकले आहे (उदा. फेसबुक) तेव्हा वेळीच काळजी घ्या यासाठी हे माझे २ पैसे होते. माझ्यामते धोरणामध्ये एव्हढे एक डिसक्लेमर टाकणे फारसे अवघड नसावे.

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.

अमेरिकन त्रिशंकू's picture

3 Jan 2015 - 7:56 pm | अमेरिकन त्रिशंकू

माझ्या मते डॉक्टर रुग्णाची पूर्ण तपासणी करून आणि पूर्वेतिहास जाणून घेउन वैद्यकीय सल्ला देतात.
अगदी एखाद्या डॉक्टरने जरी संस्थळावर सल्ला दिला आणि तो नीट जाणून/समजून न घेता त्याची कोणी अंमलबजावणी केली तर ते डॉक्टर, रूग्ण आणि संस्थळ या तिघांनाही धोकादायक ठरू शकतं.

असं घडलं तर त्याबद्दल त्या डॉक्टरला आणि संस्थळाला जबाबदार धरलं जाउ नये यासाठी ही सूचना होती.
जर वैद्यकीय चर्चा नकोत असे धोरण नको असेल तर पॉलिसीमध्ये "या संस्थळावरील वैद्यकीय चर्चां व त्यातील उपाय्/सल्ले याची पूर्ण जबाबदारी ही त्या व्यक्तीची राहील. त्याबद्दल संस्थळ कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही." असं स्पेसिफिक वाक्य असावे.

उदाहरणादाखल वेबएमडी डॉट कॉम सारखी वेबसाईट काय म्हणते ते बघा.

The Site Does Not Provide Medical Advice

The contents of the WebMD Site, such as text, graphics, images, information obtained from WebMD's licensors, and other material contained on the WebMD Site ("Content") are for informational purposes only. The Content is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read on the WebMD Site!

If you think you may have a medical emergency, call your doctor or 911 immediately. WebMD does not recommend or endorse any specific tests, physicians, products, procedures, opinions, or other information that may be mentioned on the Site. Reliance on any information provided by WebMD, WebMD employees, others appearing on the Site at the invitation of WebMD, or other visitors to the Site is solely at your own risk.

The Site may contain health- or medical-related materials that are sexually explicit. If you find these materials offensive, you may not want to use our Site

माझे २ पैसे.

पैसा's picture

3 Jan 2015 - 11:00 pm | पैसा

वेबएमडी साईट संपूर्णपणे वैद्यकीय विषयाला वाहिलेली आहे. मिपा हे सर्व विषयांवर लिहिण्यावाचण्याचं ठिकाण आहे. तसे म्हटले तर प्रत्येक विषयाला वेगवेगळा डिस्क्लेमर तयार करत बसावा लागेल. उद्या कोणी वकिली विषयांवर चर्चा करू नका म्हणेल. कोणी आर्थिक बाबींवर चर्चा करू नका म्हणेल, तर आणखी कोणी राजकीय विषयांवर चर्चा करू नका म्हणेल. मिपावरील सध्याचा सर्वसमावेशक डिस्क्लेमर मला तरी पुरेसा वाटतो आहे.