कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
23 Nov 2014 - 12:47 pm
गाभा: 

मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे.
तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते.

या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही.

तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत.

आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो.
१. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही.
२. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो".
३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो.
४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते.
५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल.

अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते.

सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे.
-----------------------------
अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.

प्रतिक्रिया

arunjoshi123's picture

23 Nov 2014 - 12:51 pm | arunjoshi123

भाग २ मधे (इतर सार्‍या प्रश्नांखेरिज) मिपाकरांबद्दल चांभारचौकश्या करायला आवडेल. मिपावर किती जणांचे लहानपण गावात गेले आहे? तिथे काय काय आधुनिक सुविधा नव्हत्या?

किती ते माहित नाही. पण मी आहे. कु़काणे तालुका नेवासा जिल्हा अह्मदनगर. तिथे बहुतेक सर्व आधुनिक सुविधा होत्या. फक्त पाण्यासाठी वणवण करायला लागायची...

विलासराव's picture

24 Nov 2014 - 11:46 pm | विलासराव

मी बुगेवाडी, ता पारनेर जी अहमदनगर. आजही एसटी जात नाही गावात. लाईट आहे १९८८ पासुन. त्याआधी कंदील. पाण्याची जानेवारीनंतर बोंबच असते.

बाकी अ़कौंटंट कुकाण्यात आमचा एक मित्र होता संपत. त्याचा भाउ मुकेश.दोघेही नगर कॉलेजला होते १९८६-८८. आडनाव विसरलो आता. ख्रिश्चन होते. त्यांच्याबद्द्ल काही माहीती आहे का?

नाय हो दादा.. व्यनि केला आहेच.

असं दिसतंय कि आजही गावात राहणारा कोणी मिपाकर नाही. त्यावरून गावात नेट कितीचालते याची कल्पना यावी.
मी उस्मानाबाद जिल्ह्यात तेरखेडा आणि इटकूर येय्जे राहिलो आहे. लातूर जिल्ह्यात तोंडार आणि निटूर येथे राहिलो आहे. एकूण भेट दिलेली गावे ५०-६० च्या वर निघतील. भेट दिलेली म्हणजे किमान एक दिवस राहिलो अशी.

पैसा's picture

27 Nov 2014 - 2:13 pm | पैसा

माझे सासरे खेड्यात रहातात. अर्धा लीटर दूध जास्तीचं हवं असेल तर किमान ३ किमि चालावं लागतं. घरात विजेच्या व्होल्टेज फ्लक्चुएशन्समुळे कोणतीही उपकरण टिकत नाही. एक टीव्ही, एक ल्यापटॉप आणि ३/४ मोबाईल्स आतापर्यंत बळी पडलेत. पेपर रोज मिळत नाही. तोही ३ किमि चालत जाऊन आणावा लागतो. मोबाईल नेटवर्क ३जी २जी सोडूनच द्या. तिथून फोन लागला तर साखर वाटावी लागेल अशी अवस्था आहे. बीएसएनएल, टाटा, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल सगळे ट्राय करून झाले. आयडिया कधीतरी चालतं. त्यामुळे तिकडे जाण्यापूर्वी मी ८ दिवस गायब होणार आहे असं सगळ्यांना सांगूनच जाते. लँडलाईन फोन महिन्याचे २० दिवस बंद असतो. लाईट रोज एकदा तरी जातोच.

हे गाव कुठे आहे माहीत आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आणि राष्ट्रीय हमरस्त्यावर. आता बोला!

इरसाल's picture

27 Nov 2014 - 2:26 pm | इरसाल

आता रडवणार काय ?( अब रुलाओगे क्या च मराठी वर्जन)

मंदार कात्रे's picture

28 Nov 2014 - 12:31 am | मंदार कात्रे

मी जेव्हा गावी असतो तेव्हा वोडाफोन चे २जी नेटवर्क वापरतो. आमचे गाव (स्वामी नरेन्द्र महाराज आश्रमाच्या जवळ )नाणीज नजिक असल्याने तिथे बर्यापैकी चांगले नेटवर्क मिळते . तसेच इतरत्र ग्रामीण भागात फिरताना देखील वोडाफोन २जी वर ६० ते ११० केबीपीएस पर्यन्त स्पीड मिळतो !

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2017 - 11:34 am | मराठी कथालेखक

वा वा .. असे गाव कोकणातील समुद्रकिनारी असेल , छान नारळाची झाडं, मस्त वातावरण असेल तर मला आवडेल अशा ठिकाणी काही दिवस रहायला. ३ किमी साठी सायकल वापरेन. सायकल पंक्चरचे दुकान असेलच ना ?

अजूनही कोणी मिपाकर (शुद्ध) गावात राहतो काय?

इरसाल कार्टं's picture

15 Feb 2017 - 9:48 am | इरसाल कार्टं

मी एका अशुद्ध गावात राहतो पण बहुतेक सगळे नातेवाईक शुद्ध गावात राहतात.
मी लहान असतानापासूनच माझे गाव बऱ्यापैकी विकसित(?) झालेले पण मामा मावशीकडे हीच परिस्थिती होती, आताही बऱ्यापैकी आहे. अजून 2G नेटवर्क वर अडकलेत.
मामाकडे पोहायला शिकलो, नदीत मासेही पकडलेत लहानपणी, खैराचं डिंक शोधून खाल्लंय, चिंचा बोरं तर विचारू नका, बैलगाडी हाकणे, जनावरं चरायला नेणे हे सगळं केलंय.

गुगल क्रोम मधे ऐसी अक्षरे आणि मिसळपाव येथे टाईप करताना कधी कधी बॅकस्पेस वापरावे लागले तर नंतर एक कळ दाबली असताना कितीतरी अक्षरे उमटतात. मिटवलेली सारी अक्षरे प्रत्येक कळीला पून्हा येऊ लागतात. त्यामुळे इंटर्नेट एक्सप्लोरर वापरावा लागतो.एरवी फक्त क्रोमच वापरू इच्छिणार्‍या मला या समस्येमुळे दोन्ही ब्रावझर वापरत राहावे लागते. ही समस्या का येत आहे?

आदूबाळ's picture

23 Nov 2014 - 4:05 pm | आदूबाळ

असं व्हायला लागलं की त्या text box च्या बाहेर क्लिक करून मग परत लिहायला लागावं. किंवा alt tab दोनदा दाबून टंकन पुढे चालू ठेवावं.

arunjoshi123's picture

23 Nov 2014 - 4:45 pm | arunjoshi123

धन्यवाद.

यसवायजी's picture

24 Nov 2014 - 8:14 pm | यसवायजी

अजुन १ उपाय-
एकदा बॅकस्पेस आणी एकदा स्पेस प्रेस करा. सोप्पंय.

यसवायजी's picture

24 Nov 2014 - 8:19 pm | यसवायजी

एकदा स्पेस आणी एकदा बॅकस्पेस प्रेस करा. आता सोप्पंय.

विलासराव's picture

24 Nov 2014 - 11:49 pm | विलासराव

मी एंटर दाबुन परत बॅकस्पेस करतो.

अरे वा! उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद. मलाही तोच प्रश्न येत आहे. आता तुम्ही सांगितल्यानुसार करून बघते.

बॅटमॅन's picture

24 Nov 2014 - 6:34 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, बहुत धन्यवाद.

हा प्रयोग केला. ९० टक्के काम होतय. धन्यवाद हो अदूबाळासाहेब!

लंबूटांग's picture

6 Dec 2014 - 9:19 pm | लंबूटांग
  1. दोनदा स्पेस दाबणे. मिपा प्रतिसाद दाखवताना (बहुधा सेव्ह करतानाच) फक्त एकच स्पेस ठेवतो. हा प्रतिसादही असाच लिहीला आहे.
  2. जीमेलमधे मराठी टंकनाचा पर्याय आहे तो वापरून तिथे लिहून इथे चोप्यपेस्त करणे.
इरसाल कार्टं's picture

15 Feb 2017 - 9:54 am | इरसाल कार्टं

गूगल इनपुट टूल्स वापरून बघा. मी मिपावर लेख लिहिताना आधी एम एस वर्ड वर याच्या मदतीने टाईपतो आणि मग मिपावर कॉपी पेस्ट करतो. महत्वाचं म्हणजे हे ऑफलाईन चालतं.

कित्ता प्रश्न विचारते तुम जोशी साब.
असेल रिकामा वेळ तर होऊद्या टाइमपास खेळ.

(अग्नीकोल्हा प्रेमी) जेपी

बालवाडी, शाळा, कॉलेज,कंपनी सर्वत्र माझे सर्वात जास्त प्रश्न विचारणारा असे रेकॉर्ड राहिले आहे. ते इथेतरी का घालवावे? तरीही मी उत्तरे देणारांची कीव करत ५० प्रश्न सुचल्यावर त्यातला फक्त एक विचारत असतो. लोकांच्याइतके क्लिअर कंसेप्ट्स नाहीत हो आपले, काय करणार?

मायक्रोवेव्ह ओव्हनमधले ऑटो कुक मेनु खरेच कामाचे असतात का? १०१ ऐवजी १५१ मेनु असतील तर ११००० ऐवजी १५००० रु. देणे योग्य आहे का?

खेडूत's picture

15 Feb 2017 - 11:35 am | खेडूत

मुळीच नाही.
मायक्रोवेव्ह हा प्रकारच भारतातल्या पदार्थांना उपयुक्त नाही. असेलच तरी ५-१० मेन्यु सेटिंन्ग्ज पुरावीत.
१२००० ला ठीक वाटतो, मजकडे ओनिडाचा आहे, वर्षातून तीनेकदा वापरतो.

मिपा सदस्यांपैकी कोण कोण स्वतःस इथे "आहे तसे" प्रकट करतात? कोण कोण पोलिटिकली करेक्ट राहायचा प्रयत्न करतात? जनरली अशा करेक्शनचे स्वरुप काय असते. सार्वत्रिक कि फक्त एखाद्दुसर्‍या गोष्टीत?

पैसा's picture

23 Nov 2014 - 5:30 pm | पैसा

या प्रश्नाचं उत्तर नेहमी "मी प्रामाणिकपणे लिहितो/लिहिते" असंच येणार. कारण प्रामाणिक असो, की पोलिटिकल दोघेही हेच उत्तर देतील.

माझ्या बाबत साधं उत्तर आहे की नेहमी प्रामाणिकपणे बोलावे. (कारण आपण कोणाला काय खोटं सांगितलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा ते सोपं असतं.) :D :P :-/ खोडसाळ नसलेल्या माणसांना दुखवायचं मात्र मी शक्यतो टाळते. त्यांना साखरेच्या आवरणात कडू गोळी द्यायचा प्रयत्न करते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Nov 2014 - 9:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना साखरेच्या आवरणात कडू गोळी द्यायचा प्रयत्न करते.

सं.मं. नथुगुग्गुळाचा एक डोस दिला की भले भले जागेवर येतात असं ऐकलय. =))

मागे एक कोण ते विचारजंत होते त्यांना नथुगुग्गुळाची मात्रा बरोबर लागु पडली असं ऐकीवात आहे =))

मांजरांना पाणी अजिबात आवडत नाही. म्हणजे त्यांचे पूर्वज पाण्यात उतरून मासे पकडत असतील असं वाटत नाही. मग त्यांना मासे इतके का आणि कधी आवडायला लागले असतील? तेच दुधाबद्दल. मांजर गायीचं दूध काही काढू शकणार नाही! =))

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 11:33 am | मदनबाण

कॉलिंग मौ ताय ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2017 - 11:43 am | मराठी कथालेखक

आपण नागरी वस्तीत जे मांजर पाहतो ते पाळीव किंवा माणसाच्या वस्तीजवळ राहणारे मांजर आहे म्हणजे शतकानुशतके ते तसेच असावे कुत्रा , मा़ंजर, आणि इतर काही पशू (गाय , शेळी ई) सुद्धा फक्त मानवी वस्तीच्या जवळपासच राहतात असे मला वाटते. थोडक्यात त्यांचे 'नॅचरल हॅबिटॅट' म्हणजे मानवी वस्तीच; जंगलात हे प्राणी आढळणार नाहीत (त्यांचे जंगली अवतार असतील , जसे रानमांजर वगैरे पण ते वेगळे) . त्यामुळे त्यांच्या सवयी / आवडीनिवडी या मानवाच्या सवयीप्रमाणेच विकसित झाल्या असाव्यात.
अर्थात मी या विषयातील तज्ञ नाही, पण मिपावर असे एक दोन तज्ञ आहेत बहूधा, त्यांनी उत्तर द्यावे ही विनंती.

कामं टाळणाऱ्या माणसास "बोक्या अंगाला पाणी लावून घेत नाही {फक्त मासे गिळायला हवेत}"

नेपथ्य म्हणजे नक्की काय?

नेपथ्य म्हणजे नाटकातील पडदा व त्याआडचे जे कै चालते ते सर्व. ब्याकस्टेज.

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2014 - 6:51 pm | टवाळ कार्टा

पडद्याआड "बरेच" काही चालते असे ऐकुन आहे ;)

बॅटमॅन's picture

25 Nov 2014 - 6:53 pm | बॅटमॅन

अगदी अगदी ;)

राही's picture

31 Jan 2017 - 2:23 pm | राही

सध्या 'नेपथ्य' या शब्दाचा 'पडद्यापुढे निर्जीव असे जे जे काही असेल ते' असाही अर्थ प्रचलित आहे. म्हणजे स्टेजवरचे सेट्स, मांडणी, प्रॉपर्टी वगैरे.

arunjoshi123's picture

24 Nov 2014 - 6:45 pm | arunjoshi123

@ इतिहासतज्ञ
नानासाहेब पेशवे आणि नानासाहेब फडणवीस - मेन फरक काय आहेत?

नाव सोडलं तर काहीच सेम नाही.

नानासाहेब पेशवे म्हणजे पहिल्या बाजीरावाचा पहिला मुलगा. (१८५७ वाल्याचे नावही हेच आहे, पण तो वेगळा) त्याचे नाव बाळाजी बाजीराव. हा बाजीरावाच्या मरणोत्तर पेशवा झाला. याच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्याने आपला सर्वोच्च पॉइंट पाहिला (अटकेपार स्वारी) आणि लोवेस्टही (पानपत युद्ध इ.). याचा मृत्यू १७६१ नंतर लगेचच झाला.

नाना फडणवीस (नानासाहेब म्हणत नाहीत त्यांना) म्हणजे पेशव्यांच्या दरबारचा एक प्रख्यात मुत्सद्दी. आडनाव भानू. १८०० साली वारला. पानपतोत्तर काळात याच्या कारस्थानाची मराठी राज्याला फार मदत झाली. पानिपत युद्धाच्या वेळी याचे वय १८-२० वर्षांचे होते. थोरला माधवराव पेशवा थेऊरास वारल्यावरती काका मला वाचवा इ. नंतर सवाई माधवराव पेशव्याच्या वेळेस नाना, हरिपंत फडके, महादजी शिंदे, इ. लोकांनी मराठेशाही टिकवून धरली.

नानासाहेब फडणवीस आणि १८५७ चे बंड, इ दूरदर्शनवर ऐकले नि कंफ्यूज झालो.

स्वप्नज's picture

24 Nov 2014 - 7:58 pm | स्वप्नज

नानासाहेब नेफळे हे पूर्वजन्मीचे नानासाहेब पेशवे कि नाना फडणवीस....???

आमच्या ओळखीत एक मंदी घालून स्कुटी चालवणारे सद्गृहस्थ आहेत , तशीच बाईक चालवता येईल काय

स्पा's picture

24 Nov 2014 - 7:05 pm | स्पा

मांडी *

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 7:35 pm | टवाळ कार्टा

केव्हडा मोठा गैरसमज झाला माझा =))

पिलीयन रायडर's picture

25 Nov 2014 - 9:51 am | पिलीयन रायडर

आमच्या कडे एक जुना TV आहे. थोड्या रेपेअरने चित्र पांढुरकं न दिसता नीट दिसेल आनी आवाजही निट येऊ शकतो.. तर ह्याचे नक्की काय करावे? भंगारातच घालावा लागेल का? जसं की जुन्या बाईक्स वगैरे स्क्रॅप करण्यसाठी विकता येतात.. तसं कुणी विकत घेत नाही का TV वगैरे?

सुनील's picture

25 Nov 2014 - 10:13 am | सुनील

वजन किती आहे TV चे? ;)

पिक्चर ट्युब चांगली असेल तर -आतले सर्किट बदलून आणखी पाच सात वर्षे चालेल खर्च रू २हजार हे सर्किट ८शे रुपयात मिळते आमचा बिन रिमोटचा फिलिप्स होता (अजून आहे)आठ वर्षाँपूर्वी सर्किट टाकले त्यात २३०चानेल+रिमोट आहे.
पि॰ट्युब गेली असल्यास मात्र भंगार (कानडीत बंगार =सोने)!

arunjoshi123's picture

25 Nov 2014 - 10:35 am | arunjoshi123

एच टी एम एल , इ ओपन सोर्स असेल तर तिचा मेन कोड (मंजे त्यात कोणत्या कमांडस, व्हेरियेबल्सचे टाईप्स, आणि संगणकाच्या भाषेचे इतर अनेक गुणधर्म) काय आणि किती असावा हे कोण ठरवते? अक्षरे बोल्ड करण्यासाठी ऐवजी करायचे असेल तर हा बदल कोण करेल आणि तो सर्वमान्य कसा होईल. कि फक्त "अधिकची फिचर्स" मनाप्रमाणे बदलता येतात, आणि कोर तीच ठेवावी लागते?

कंजूस's picture

25 Nov 2014 - 1:40 pm | कंजूस

W3SCHOOLS dot com वर HTML चे CSS धडे आहेत ते वाचून बऱ्याच गोष्टी करता/लिहिता येतात .अक्षरे बोल्ड/ठळक करण्याचा कोड देवनागरीवर कधीकधी काम नाही करत BOLD ?ठळक झाले का ? आता इथे ठळक झाले का या वाक्यावर कोड काम करत नाहीये पण इंग्रजी BOLDझाले.

देवनागरीतला मजकूरही ठळक झालाय की. कोड काम करतोय म्हणजे.

माझ्या मोबाईलवर दे॰ ठळक दिसत नाही म्हणून तसा समज झाला होता. धन्यवाद.

कंजूस's picture

25 Nov 2014 - 1:42 pm | कंजूस

HTML आणि CSS चे धडे वाचा.

सस्नेह's picture

25 Nov 2014 - 3:25 pm | सस्नेह

लिंक द्या.

कंजूस's picture

25 Nov 2014 - 5:01 pm | कंजूस

w3schoolsया साईटवरचे फक्त HTMLआणि CSS Tutorials वाचा.

अहो, मी ओपनसोर्स सॉफ्टवेअरची (कोडींग लँग्वेजचीच) मालकी कुणाची असते असा प्रश्न विचारला आहे. आता एच टी एम एल चे आज जे काही स्ट्रक्चर आहे त्यात समजा एक बदल करायचा आहे (समजा एक नवे फंक्शन टाकायचे आहे किंवा नवी व्हेरियेबलची टाईप टाकायची आहे किंवा तसलं काहीही. व्हीबी ५ आणि व्हीबी ६ मधल्या फरकांसारखे फरक करायचे आहेत)तर कोण करतं. तो बदल नक्की कसा करावा (म्हणजे नव्या फंक्शनचे नाव अ ठेवायचे का ब, इ इ ) यात "लोकांत" दुमत असले तर शेवटी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे बदल होतो? उदा. अँड्रॉईडची वर्जन्स आहेत. नवे वर्जन कोण आणते? कि ओपनसोर्स मधला ओपन भाग सिमित असतो नि बाकीचा कॉपीरायटेड असतो? ओपनसोर्स आहे म्हणून मी उद्या च्या जागी असा प्रोग्रामिंग लँग्वेजमधेच बदल करू शकतो का?

१)एचटीएमेल चे जे स्टैँडर्ड रेफ्रन्स WCमध्ये मान्य झालेले असतात तेच क्रोम, आइइ, ऑपरा इ॰ ब्राउजरकडून अमलात आणले जातील/जातात आणि त्यातली 'एलमेंटस' ओळखली जातील. आता तुमची नवीन एलमेंटस ब्राउजर ओळखतील आणि त्या आज्ञा अमलात आणतील असं तुम्हाला वाटतंय का ? बरोबर ?
२)AOSP =हे ANDROID चे सध्या जेलिबिन नवीनतम अवतरण आहे . हेच ओपन सोर्स वापरून नोकिआने android वर चालणारे X सिअरिज फोन बनवले आहेत परंतू गुगलने काही हातचे राखून ठेवले आहे ते रॉईल्टि दिल्याशिवाय नाही मिळणार.

गुगलने काही हातचे राखून ठेवले आहे

हेही जाणायचे होते. धन्यवाद.

arunjoshi123's picture

26 Nov 2014 - 1:55 pm | arunjoshi123

१. सोन्यावर व्हॅट आहे का? महाराष्ट्रात किती % आहे? प्रतिष्ठित रजिस्टर्ड व्यापारी आणि काळा व्यवहार करणारे किरकोळ व्यापारी यांच्या दरांत इतका फरक असतो का?
२. सध्याला कस्टम ड्यूटी आहे का? किती? कोणकोणत्या परदेशांतून सोने आणले तर ही ड्यूटी द्यावी लागणार नाही? साधारणपणे कायदेशीरपणे परदेशी भेट देणारा माणूस असे किती सोने विना-ड्यूटी आणू शकतो?
३. महाराष्ट्रात दागीन्यांचे सोने किती कॅरेटचे असते? हा कॅरेट प्रेफरन्स प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो असे आहे का? पूर्वोत्तर भारतात जवळजवळ २४ कॅरेटचे दागीने बनतात म्हणे. किती किती कॅरेटचे सोने ग्राहकांत कॉमन आहे?
४. गुंतवणूकीचे सोने (घरी ठेवायला घेतात ते बिस्किट) २४ कॅरेटचेच असते का? त्यावर शून्य मेकिंग चार्ज असतो का?
५. स्फटिक चिटकावलेले असताना त्यात सोने किती आहे हे कसे वजन करतात?
६. दागीने बनवण्यासाठी किती शुद्धतेच्या अधिकची शुद्धता चालत नाही.
७. मेकिंग चार्जेस किती % असतात. दागीना बनवणे किती अवघड आहे (डिजाईन किती कठीण आहे) यावर ते अवलंबून असते काय?
८. दुकानात मेकींग चार्ज घेतात. मित्रांकडून घेताना (ती डिजाईन मोडून दुसरी बनवायची असेल तर, इ) घेतात का?
९. तोळ्यात किती ग्राम असतात हे देखिल राज्यागणिक बदलते का? कुठे कुठे ११.क्ष ग्रामचा तोळा असतो म्हणे.
१०. गुंतवणूक करायची असल्यास बिस्किटे घेऊन बँकेत व्याजी "डिपॉझिट" म्हणून ठेवता येतात काय?
११. सोने किती कॅरेटचे आहे हे ओळखायची शास्त्रीय पद्धत काय? कारण ते दुकानदाराला लगेच करावे लागते कोणी सोने विकण्यासाठी आणल्यास.
१२. मेकिंग चार्जेस वजा जाता सोने खरेदी आणि विक्रीचा दर यांत फरक असतो काय?
१३. हॉलमार्क, इ जिथे आहे तो भाग खराब करून सोन्याची विश्वासार्हता घालवता येते का?
१४. सोने शुद्ध (म्हणजे सांगीतलेल्या कॅरेटचेच) आहे हे कळायचा ग्राहकासाठी मार्ग काय?
१५. सोन्याच्या कॅरेटप्रमाणे त्याच्या कांतीत फरक पडतो काय? तो दिसू, भासू शकतो इतपत असतो का?
१६. सोन्याचे भाव कडकायचा विशिष्ट महिना भारतात आहे काय?
१७. कोणकोणते इतर बाजार त्यांच्या इंट्रिंसिक कारणांमुळे पडले तर सोन्याचा भाव वाढतो?
१८. भारतात सध्याला सोन्याची एकही चालू खाण नाही काय?
१९. सोन्याचे आयसोटोप्स असतात का?
२० @ स्त्रीया - सोने न आवडणार्‍या स्त्रीया नगण्य मानता येतील काय?
२१ @ ज्यांना सोने आवडते त्या स्त्रीया - तुम्हाला काय आवडते - सोन्याचे मूल्य कि रूप?

इरसाल's picture

27 Nov 2014 - 2:06 pm | इरसाल

तुमच्या "२१ अपेक्षित प्रश्नसंच" चे उत्तर मी देवु शकेन अस वाटतय. कारण मी त्याच क्षेत्रात आहे.

भाऊसाहेब, सोनेखरेदीची कितीतरी अंगे देखिल आम्हाला ठाऊक नसावीत. कृपया चांगलंस उत्तर द्या ना वेळ काढून.

२१@स्त्रीया.. तुम्हाला सोनं घालतात त्या स्त्रीया अावडतात का लिहिलंय की काय वाटलं एकदम वाचताना!!
तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर-सोन्याचे रूप आणि त्या रुपात दिसणारे मूल्य ^_~

प्रश्न वजनदार आहेत आणि हलके घ्या सांगता !

भौतिकशास्त्राच्या (आणि कामशास्त्राच्या सुद्धा बहुतेक ;) ) नियमांप्रमाणे वजनदार गोष्टी हलक्याने घेता येतात.

एस's picture

26 Nov 2014 - 11:10 pm | एस

मराठी आंतरजालावरील पहिला (शोधला गेलेलाच अर्थात !) डुआयडी कोणता होता?

आंजाचं माहीत नाही, पण पहिला ज्ञात डू आयडी मारीच राक्षस असावा.

बॅटमॅन's picture

27 Nov 2014 - 12:26 pm | बॅटमॅन

तो की गौतम ऋषींचे रूप घेऊन आलेला इंद्र ;)

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 1:33 pm | टवाळ कार्टा

समुद्र मंथनाच्या वेळचे विसरला काय? :)

बॅटमॅन's picture

27 Nov 2014 - 2:23 pm | बॅटमॅन

मोहिनी?

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 2:28 pm | टवाळ कार्टा

हा :)
पण मोहिनी आधी का राहू-केतू आधी???

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 2:30 pm | टवाळ कार्टा

पण तेव्हा सुध्धा "कुर्म" अवतार होताच ना...आणि मस्य अवतार त्याच्याही आधी...चायला किती वेरिएशनस :)

थॉर माणूस's picture

27 Nov 2014 - 2:51 pm | थॉर माणूस

अवतार वेगळा आणि डूआयडी वेगळा ना?
अवतार कुणाचा हे माहिती असते. ;)

बॅटमॅन's picture

27 Nov 2014 - 3:31 pm | बॅटमॅन

तेही खरंच म्हणा.

अन तसे पाहिले तर आपण सर्व त्या एका परमात्म्याचे डुआयडी आहोत.

- इंहभप (इंटरनेट हभप) ब्याटामहाराज गॉथमकर.

१)डुआइडी का घेतात ?काही सुप्त इच्छापूर्ती असते का ?
२)एक वेगळ्या रूपात लोकांसमोर यावं म्हणून अधिकृत आइडी घेऊ शकतो का ?उद्या समजा 'उदार' होऊन ( ते जरा कठीणच आहे म्हणा )लिहायचे ठरवले तर होता येईल का ?

पीसीसाठी सर्वात उत्तम ऑडिओ, व्हिडीओ प्लेअर कोणता? उत्तम म्हणजे प्लेअर मुळेच आवाजाच्या, फितीच्या प्रतीत फरक पडत असेल तर तसा. शिवाय प्रत्येक प्रकारचे संगीत, चित्रफित ऐकण्यासाठी लेमॅनसाठी सेटींग्ज कळायला अत्यंत सुलभ. इतरत्र नसलेली फिचर्स असलेला. भारतीयांसाठी वेगळे काही असेल तर उत्तमच.

असंका's picture

6 Dec 2014 - 3:27 pm | असंका

"Downloading Do Not Turn Off Target"

हा मेसेज किती वेळ दिसत राहू शकतो? हा मेसेज माझ्या फोनवर गेले बारा तास दिसत असून मी कंटाळून गेलो आहे. यातील टारगेट म्ह्णजे नक्की काय? PC की फोन?

पैसा's picture

6 Dec 2014 - 8:37 pm | पैसा

१२ तास काय डाऊनलोड करताय?

असंका's picture

6 Dec 2014 - 9:06 pm | असंका

बहुतेक ४९९ mb ची android upgrade file असेल. पण नक्की कोण काय आणि कुठे डाऊनलोड करत आहे तेच कळत नाहीये.

विजुभाऊ's picture

6 Dec 2014 - 4:46 pm | विजुभाऊ

एक प्रश्न आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या वेळेस वर्ल्डकप ची ओरीजनल ट्रॉफी ही मुम्बै कस्टम्स मधे ड्यूटी न भरल्या मुळे अडकून पडली होती अशा बातम्या होत्या. त्या मूळ ओरीजीनल ट्रॉफीचे नंतर काय झाले? ती कुठे आहे?
http://indiatoday.intoday.in/story/india-vs-sri-lanka-world-cup-final-ic...

१. कचाट्यात सापडणे आणि तावडीत सापडणे या वाक्प्रचारांतील कचाटा आणि तावड हे काय आहे?
२. प्रश्न धसास लावणे किंवा तडीस नेणे या वाक्प्रचारातील धस आणि तड काय आहे?
-(मराठीतील वाक्प्रचार आणि म्हणी या कृषीसंस्कृतीत फुलून आलेल्या आहेत. तेव्हा या शब्दांचादेखील उदगम शेतीत वापरल्या जाणार्‍या अवजारांत असेल का? )
३. आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का? तसेच नीट ह्या शब्दाचे देखील तसेच आहे का?

१. कचाट्यात सापडणे आणि तावडीत सापडणे या वाक्प्रचारांतील कचाटा आणि तावड हे काय आहे?

दाते-कर्वे कोशातून
तावडी—स्त्री. १ (गुजराथेंत रूढ) नर्मदेच्या कांठीं ज्या ठिकाणीं नर्मदा ओलांडतात तेथें टेकडीवर असलेली धर्मशाळा, चौकी. ज्या तावडींत नावडी राहतात तिला नावडातावडी म्हण- तात. २ (ल.) तावड; अधीनता; पकड; कबजा. ३ (ल.) कचाटा; तडाखा; सपाटा. हल्लीं हा मूळ शब्द प्रचारांतून गेला आहें. मात्र यापासून बनलेले तावडींत, तावडीस, तावडींतून हें शब्द प्रचारांत आहेत. -डींतून- क्रिवि. (एखाद्याच्या) ताडाख्यांतून; कचाट्या- तून; पकडींतून. (क्रि॰ सुटणें; निघणें). तावडींत, तावडीस- क्रिवि. कचाट्यांत; सपाट्यांत; पकडींत;तडाख्यांत. (क्रि॰ सांपडणें; पडणें). 'शत्रूच्या तावडीस सांपडलों तो काय करील तें करो.' धरणें, आणणें याशब्दाबरोबर कर्तरीप्रयोग होतो. जसें:- मी शत्रूस माझ्या तवडीस आणलें, धरलें.

प्रश्न धसास लावणे

दाते-कर्वे
धस म्हणजे कडा/कपार हा अर्थ योग्य वाटतो.
तसंच "तडीस नेणे" : तड हा तट्चा अपभ्रंश असावा.

३. आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का? तसेच नीट ह्या शब्दाचे देखील तसेच आहे का?

आलबेल सरळसरळ ऑल वेलचा अपभ्रंश आहे.

पण नीट हा कानडी नेट्टगे (म्हणजे सरळ) वरून मराठीत आलेला आहे. इंग्रजी neat शी संबंध नाही.

आबा, माहितीबद्दल आभार. अश्या अनेक शब्दांबद्दल, वाक्प्रचारांबद्दल, म्हणींबद्दल शंका आहेत. आता दाते आणि मोल्सवर्थ कोश चाळून पाहीन. नीटबद्दल तसं वाटायचं कारण म्हणजे, अर्थांतील आश्चर्यकारक साम्य.
अवांतरः परवा चौकशी या शब्दाबद्दल फेबूवर खूप छान माहिती मिळाली. काय, कसे, कोणी आणि याची परिणती काय(नक्की हेच चार कस का, याबाबत जरा संभ्रम आहे) असे चार कस कोणत्याही गोष्टीला लावणे म्हणजे चौकशी करणे होय. तिथे पोस्टलेखकाने श्री. बा. जोशी यांच्या 'गंगाजळी भाग १-४' आणि 'उत्तम मध्यम' या पुस्तकांचा उल्लेख केला होता आणि ही माहिती या पुस्तकांतून मिळाली असे लिहिले होते. आता ही पुस्तके वाचावी लागतील असे वाटते.

हो - श्री बा जोशी सकाळमध्ये "गंगाजळी" नावाचं सदर लिहायचे. फार छान असायचं. खरा इंटरडिसिप्लिनरी विचार.

हो, त्याच लेखांचे संग्रह आहेत. राजीव सानेदेखील तशाच प्रकारचे वाटतात मला.. त्यांची गल्लत गफलत गहजब ही लोकसत्तेतील लेखमाला फार आवडलेली, पुस्तकदेखील संग्रही आहे.

राही's picture

31 Jan 2017 - 2:52 pm | राही

9) To burst or push through; to force a passage through obstruction: also to pierce, penetrate, or sink into suddenly...
10) धसणें (p. 249) dhasaṇēṃ v c P (धस!) To ram or drive (in, down, onwards, home). -दाते-कर्वे.
धस, धसकट म्हणजे अर्थात धान्य कापून उरलेला बुडखा, गवताची तीक्ष्ण काडी, कूस
एकंदरीत या शब्दात बळजबरीने, आडदाण्डपणाने निकाल लावणे, असा 'अनर्थ' सुद्धा आहे.

राही's picture

31 Jan 2017 - 2:55 pm | राही

वरील प्रतिसादातला संदर्भ मोल्स्वर्थ कोशातला आहे. दाते-कर्वेतला नव्हे. नजरचूक झाली आहे.

राही's picture

31 Jan 2017 - 3:11 pm | राही

तावडणे म्हणजे दामटणे, सक्तीने काम करून घेणे. सध्याही आपण ताबडणे, ताबडवून घेणे हे शब्द जुन्या अर्थानेच वापरतो.
आवरी तावरी हे इथपर्यंत, तिथपर्यंत किंवा इकडे-तिकडे या अर्थाचे बोलीभाषेतले शब्द आहेत.
तावडीचा अर्थ 'त्या तटी' 'तिकडे' असाही होतो.

खेडूत's picture

7 Feb 2017 - 11:43 am | खेडूत

इंग्रजी neat शी संबंध नाही.

असेच वाटते.
माऊलींनी आनंदाचे डोही मधे 'बोलु जाता बरळ करीसी ते नीट' म्हटले आहे, ते इंग्रजीतले नीट खचितच नव्हे!

दुरुस्ती: जेथे जातो तेथे या गाण्यात आहे- कदाचित तुकाराम महाराजांचाही असेल.

संदीप डांगे's picture

7 Feb 2017 - 12:20 pm | संदीप डांगे

तुकाराम महाराज, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती....

बोलू जाता बरळ करीतसे नीट, गेली लाज धीट केलो देवा

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2017 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का?

ब्रिटिशांच्या काळात, पहारेकरी आवाराच्या टोकाला पोचला की त्याने दुसर्‍या पहारेकर्‍यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात "ऑल वेल" असे म्हणावे असा शिरस्ता होता. त्या ऑल वेलचे अपभ्रंशीत रुप म्हणजे "आलबेल".

हे माझ्या लहाणपणी मोठ्यांच्या तोंडून ऐकले आहे. लेखी संदर्भ माहीत नाही.

Ranapratap's picture

30 Jan 2017 - 6:40 pm | Ranapratap

माझ्याकडे एच एम् टि चे जुने हातात बांधायचे घड्याळ आहे. सध्या बंद पडलेले आहे. दुरुस्त करून कुठे मिळेल.

नितिन थत्ते's picture

30 Jan 2017 - 8:39 pm | नितिन थत्ते

जिन्याखाली किंवा तशा अडचणीच्या ठिकाणी जे घड्याळवाले बसतात ते करतील.

ठाण्याला पोंक्षे वॉच कं म्हणून गोखले रोडवर दुकान आहे ते करतील दुरुस्त.

आपण कोठे राहता ? मुंबईत गोरेगाव , खार किंवा चर्चगेट जवळ ?/

गामा पैलवान's picture

31 Jan 2017 - 3:07 am | गामा पैलवान

सौरा,

कचपाश म्हणजे केसांचा फांस. त्यावरून कचाट्यात सापडणे म्हणजे केसांत अडकणे. हे केस बहुतेक भुताचे अथवा राक्षसाचे असावेत. किंवा केसाने गळा कापणे वगैरे उपमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

गापै, धन्यवाद, हे केसांचा पाश घालणे हा काही तांत्रिक विधी असावा का?

गामा पैलवान's picture

31 Jan 2017 - 8:05 pm | गामा पैलवान

सौर, तो असू शकतो. पण मला माहित नाही.
आ.न.,
-गा.पै.

राही's picture

31 Jan 2017 - 2:41 pm | राही

कचाट हा देशी शब्द आहे. त्याचा अर्थ गोंधळ, गडबड, घोटाळा, लचांड असा आहे. दासबोधात कर्मकचाट हा शब्द आहे तर एकनाथी भागवतात कचाट आहे. (दाते-कर्वे)

राही's picture

31 Jan 2017 - 10:34 am | राही

वरती कन्नड 'नेट्टगे'चा उल्लेख आला आहे. आपल्याकडे अगदी असाच 'नेटके' हा शब्द आहे आणि 'नीटनेटके' असा जोडशब्दही आहे.

हो, नेट्टगे> नेटके> नीट असा प्रवाह असावा. सरळसोट सारखंच नीटनेटका असा जोडशब्द नंतर वापरात आला असावा.
मराठी म्हणी, वाक्प्रचारांचा स्वतंत्र असा कोश नाही का?

राही's picture

31 Jan 2017 - 3:23 pm | राही

इडिअम्स अ‍ॅण्ड फ्रेसेस इन् मराठी असा शोध घेतला की अनेक पर्याय मिळतात.

आदूबाळ's picture

31 Jan 2017 - 3:24 pm | आदूबाळ

करुणात्रिपदीतून उदृत

श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।

ही काय ष्टुरी आहे कोणाला माहीत आहे का? प्रथम एका ब्राह्मणाचं पोट दुखायला लागतं (पोटशुळाने द्विज तडफडता) आणि मग पुढच्या चरणात त्याचा मुलगा मरतो?

राही's picture

1 Feb 2017 - 6:26 pm | राही

या चारही कथा गुरुचरित्रातल्या आहेत. पहिली कथा श्रीपादश्रीवल्लभांची आहे. व्यापार-उदिमास निघालेल्या एका वल्लभेश नामक काश्यपगोत्री द्विजाला तस्करांनी ठार मारले आणि नंतर श्रीपादश्रीवल्लभांनी त्यास जिवंत केले अशी ती कथा आहे. पुढच्या कथा श्री नृसिंहसरस्वतीस्वामीचरित्रात वेगवेगळ्या द्विजांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. कोणा द्विजाचा पोटशूळ शांत केला तर दुसर्‍या एका द्विजाची मुले वाचत नव्हती (मरत असत.) ती जगवली वगैरे.

इथूनः
फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले.
तर हे अनुबोधपट कुठे मिळू शकतील?
अवांतर: डॉक्युमेंटरीसाठी अनुबोधपट हा शब्द किते छान आहे. हा शब्द कुणी प्रचारात आणला असावा?

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2017 - 8:35 pm | पिलीयन रायडर

डेस्टिनेशन वेडींग बद्दल माहिती आहे का? म्हणजे आपल्या सारख्या मध्यमवर्गीय माणसाला नेहमी सारखे पुण्यात कार्यालय घेऊन आणि ५००-७०० लोक जेवायला घालुन लग्न करायचे नसेल, तर अगदी उदयपुर-जयपुर नाही पण पुण्याजवळ काही पर्याय आहेत का?

१०० माणसांची चांगली सोय व्हावी आणि प्रवास सुरक्षित आणि थोडक्यात आटपणारा असावा इतक्या माफक अपेक्षा आहेत.

बोका's picture

7 Feb 2017 - 1:33 pm | बोका

ढेपे वाडा

http://www.dhepewada.com/packages.html

२३ नोव्हेंबर २०१४ चा धागा अजून धगधग्तोय??

मीच ठिणगी टाकली :))) चांगला धागा आहे, असे बरीच प्रश्नचिन्हे कुणी उत्तरे देणारे मिळत नसल्याने निवांत पडून असतात. इथे मिपावर जाणकारांची वाणवा नाही त्यामुळे विचारावेसे वाटते.

२०१६साली नववर्षाची सुरवात म्हणून 'सदाहरीत धागे' मालिका चालू केली होती. त्याचेदेखील ३-४ भाग झालेले.

मला वाटतं सासंनी वेळ मिळाला तर अजोंची ही सिरीज आणि गविंची ती सिरीज एकाच स्टँडर्ड नावाखाली आणावी.

बाकी धागा वर काढल्याबद्दल आभार

24 Nov 2014 - 7:05 pm |
स्पा
आमच्या ओळखीत एक मंदी घालून स्कुटी चालवणारे सद्गृहस्थ आहेत , तशीच बाईक चालवता येईल काय

>>हे वाचून लय हसले.

मिपावर जाणकारांची वाणवा नाही

तुम्हाला 'वानवा' असे म्हणायचे असावे. 'वणवा' असाही एक शब्द आहे.

'नाही निर्मळ जीवन, तेथे काय करील साबण' ही ओळ तुकाराम महाराजांच्या इयत्ता आठवीला अभ्यासक्रमात असणार्‍या अभंगातून घेतली आहे. हे खरेच तुकाराम महाराजांनी लिहिले असावे का? असेल तर तेव्हा साबण म्हणजे काय अभिप्रेत होते त्यांना? साबणाचे प्रचलन केव्हापासून सुरू झाले?

राही's picture

8 Feb 2017 - 12:46 pm | राही

नामदेवांच्या अभंगातसुद्धा हा शब्द आढळतो. 'बोध साबण लावुनि ठायीं,डाग उडविला पाहीं' (तुळपुळे-फेल्ड हाउस)
फार पूर्वी मुलतानी मातीच्या वड्या मिळत. त्याने अंग आणि चेहरा स्वच्छ केला जाई. नुसती मातीसुद्धा अंग धुण्यासाठी, कपडे चोळण्यासाठी वापरली जाई. या वडीला साबनी किंवा 'लाहौरी' म्हणत. पुढे त्यात पापडखार, चुना, तेल वगैरे घालून ओबडधोबड रसायन बनवले जाऊ लागले. त्याला साबण म्हणू लागले. आपल्याकडेसुद्धा तेलाने अंग चोळून स्वच्छ करण्याची पद्धत होती. साबण हा शब्द saponification,soap, savon, seife, serf अश्या अनेक शब्दांशी संबंधित आहे.
http://www.dictionary.com/browse/soap
आणि इतर अनेक शब्दकोश

गामा पैलवान's picture

8 Feb 2017 - 6:53 pm | गामा पैलवान

राही,

साबनी हा शब्द साफ करणारी ती साफनी असा काहीसा दिसतो. साबनेट हा शब्द पोर्तुगीज भाषेतही आढळतो.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2017 - 11:28 am | मराठी कथालेखक

कोणत्याही वाहनावर स्पीडोमीटर वरील वरचा आकडा खूप मोठा असतो (बहूतेकरुन जो आकडा गाठणे त्या गाडीला कधीच शक्य होणार नसते), असे का ?
उदा: माझ्या १०० सीसी बाईकवर (Hero Honda CD Dawn) हा आकडा १४० आहे. अगदी उताराचा फायदा , जास्तीत जास्त अक्सीलरेशन ई विचारात घेतले तरी १०५ च्या पुढे जाणे अशक्य आहे.
कमी अधिक प्रमाणात हीच गोष्ट इतर अनेक बाईक व कारच्या बाबतीत मी पाहिली आहे (उदा: इंडिका - २०० )

खेडूत's picture

8 Feb 2017 - 1:34 pm | खेडूत

k

किमान दोन कारणे-
१. युजर एक्स्परियन्सः चालकाला वेगाचा अंदाज येण्यासाठी, की तो खूप जोरात जातोय, त्यावेळी वेगाची प्रत्यक्ष संख्या पहाणे शक्य/सुरक्षित नसते. नुसते पाहून कळते की आपण क्रेझी वेगाकडे चालालोय. इंजिन अजून थोडा जास्त वेग घेऊच शकते, पण अन्य पॅरामीटर्सची वाट लागते. सर्वाधिक वेगाच्या २५% जास्त हा आकडा असतो.
आपल्याकडे दुचाकींवर त्यासाठी लाल आणि हिरवे पट्टे मारून किफायतशीरतेच्या मर्यादा दाखवतात.
१९७४ मधे ओपेकबरोबर मारामारी सुरू असताना रिचर्ड निक्सन यांनी सर्व स्पीडॉमीटर्सला ५५ माईल्स या (किफायतशीर मर्यादा)आकड्याला गोल करण्याचे आदेश काढले होते.
२. आपले रस्ते आणि टायर्स दर्जेदार नसल्याने दिसतो त्याहून प्रत्यक्ष वेग कमी असणेच सुरक्षित असते. त्यामुळे हा वेग ५-६% मुद्दाम जास्त दाखवला जातो. आदर्श परिस्थितीतच हे समजून येते. अन्यथा रस्त्यावर प्रत्य्क्ष चालवताना साठच्या वेगाने गेल्यास तासाभरात आपण साठ किमी जातच नाही!

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2017 - 5:31 pm | मराठी कथालेखक

आपले रस्ते आणि टायर्स दर्जेदार नसल्याने दिसतो त्याहून प्रत्यक्ष वेग कमी असणेच सुरक्षित असते. त्यामुळे हा वेग ५-६% मुद्दाम जास्त दाखवला जातो.

मला तरी असे वाटत नाही.

फ्रिक्शन शून्य ठेऊन (मंजे चाक अदरांटी (उदगीरच्या भाशेत अधांतरी)), निर्वात पोकळीत (हवेचा त्रास नको), व्हील १००% बॅलॅन्स करून, ल्यूब्रिकंट योग्य नि योग्य व्हिस्कोसिटीचे नि योग्य प्रमाणात --- मग फुल्ल अ‍ॅक्सलरेश - इतकी स्पीड येईल.
----------

डिझाईन डिपा. च्या गणितात तरी येईल.

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2017 - 5:34 pm | मराठी कथालेखक

निर्वात पोकळीत इंजिन कसे चालेल ?

फक्त चाक निर्वात पोकळीत.

धन्यवाद राहीताई
इथे आणखी माहिती मिळाली.

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2017 - 9:51 pm | पिलीयन रायडर

http://time.com/4663457/melania-trump-daily-mail-law-suit-flotus/?xid=ti...

फर्स्ट लेडी बद्दलची ही बातमी मला कुणी समजावुन सांगेल का? नक्की ह्याचा अर्थ काय?:-

Mrs. Trump "had the unique, once-in-a-lifetime opportunity, as an extremely famous and well-known person, as well as a former professional model, brand spokesperson and successful businesswoman, to launch a broad-based commercial brand in multiple product categories, each of which could have garnered multi-million dollar business relationships for a multi-year term during which plaintiff is one of the most photographed women in the world," the lawsuit said

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Feb 2017 - 10:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

पिराताई, माझ्या माहितीने ह्या बाईंनी "डेली मेल" वर डिफेमेशनची केस टाकली आहे. डेली मेल ने त्यांचा उल्लेख कुठेतरी "एस्कॉर्ट" असा केला आहे. बाईंच्या वकिलांचे म्हणणे आहे की त्यांना असे हीन संबोधन लावल्यामुळे त्यांच्या एकूणच प्रतिमेवर आघात झाला असून त्यामुळे त्यांना ब्रँड म्हणून मिळणाऱ्या व्यवसायाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. एकूण १५० मिलियन डॉलरचा दावा केला आहे वाटतं.

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2017 - 10:45 pm | पिलीयन रायडर

पण मग - had the unique, once-in-a-lifetime opportunity, as an extremely famous and well-known person हे काय?

संदीप डांगे's picture

8 Feb 2017 - 10:50 pm | संदीप डांगे

मला समजले ते असे:
had the unique, once-in-a-lifetime opportunity (as an extremely famous and well-known person, as well as a former professional model, brand spokesperson and successful businesswoman, ) to launch a broad-based commercial brand in multiple product categories, each of which could have garnered multi-million dollar business relationships for a multi-year term during which plaintiff is one of the most photographed women in the world

संदीप डांगे's picture

8 Feb 2017 - 11:14 pm | संदीप डांगे

वन्स इन अ लाइफटाइम संधी ही एक कमर्शियल ब्रॅण्ड लॉन्च करण्याबद्दल आहे, पण बातमी चटपटीत बनवण्यासाठी मिडियावाले जाणूनबूजून अर्थाचे अनर्थ करत आहेत. तीचे फस्ट लेडी असणे तिला एन्कॅश करायचे आहे असे वातावरण बनवले आहे. प्रत्यक्षात तसे काहीही दिसले नाही. तिच्या इमेजला धक्का पोचल्यास त्या मल्टी-यिअर-टर्म (बिजनेसच्या) बट्ट्याबोळ होइल जी त्या बाईच्या आजवरच्या इमेजला (जगातली सर्वात जास्त फोटोग्राफ्ड स्त्री) समोर ठेवून प्लान केली आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Feb 2017 - 10:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

वकिली अतिशयोक्ती असावी बहुतेक :). आधीचीच ब्रँड व्हॅल्यू आणि त्यात आता फर्स्ट लेडी..हि वन्स इन लाईफटाइम ओपोर्च्युनीटी असं म्हणायचं असेल :)

गामा पैलवान's picture

8 Feb 2017 - 11:53 pm | गामा पैलवान

पिराताई,

पूर्वप्रघातानुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि त्याचे कुटुंबीय सत्ताकाळात व्यवसायापासून दूर राहतात. मात्र तशी कायदेशीर जरुरी नाही. म्हणून मेलनीबाई आणि डोनल्डबुवांनी आपापले धंदे चालूच ठेवलेले आहेत. तर अशा वेळेस कोणीतरी तिचा एस्कॉर्ट म्हणून उल्लेख केल्याने धंद्यावर वाईट परिणाम झाला असं एकंदरीत रडगाणं आहे. आयुष्यातली एकमेव संधी याचा अर्थ राष्ट्राध्यक्षपत्नी असतांना आपली प्रतिमा आणि स्थान यांद्वारे पैसे मिळवायची सोय असा आहे.

आ.न.,
-गा.पै.

पी. के.'s picture

9 Feb 2017 - 12:27 pm | पी. के.

गावातील घरासाठी Vu Televisions [pronounced “view”] कंपनीचा TV घ्यायचा विचार करतोय. बैठकरूम मोठी आसल्यामुळे मोठा TV बघतोय. ५५ इंच फुल्ल HD ४२ हजारा पर्यंत भेटतोय. सोबत ३ वर्ष वारंटी पण आहे. बाकीचे नावाजलेले ब्रँड खूप महाग आहेत आणि वारंटी १ वर्ष .

आपल्या पैकी कुणाकडे आहे का या कंपनीचा TV . कसे आहेत हे TV ?

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2017 - 5:28 pm | मराठी कथालेखक

हिंजवडीच्या तमन्ना एक्स्युकिटिव्ह नामक उपहारगृहात Vu चा TV पाहिला होता काही वर्षांपुर्वी, छान दिसत होता. अजूनही तोच TV तिथे असेल तर तो उत्तम आहे असे म्हणता येईल. (किंवा नवीन TV पुन्हा त्यांनी त्याच कंपनीचा घेतला असेल तरी तेच म्हणता येईल).

उपहारगृह जवळच आहे, पण फक्त TV चा ब्रँड बघायला कसे जाणार ?.. शिवाय उपहारगृह थोडे महागडे आहे ? नाष्टा करुन येतो, व्यनिमध्ये अकाउंट नंबर आणि बिल पाठवतो... काय म्हणता ? :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Feb 2017 - 5:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

व्हिडिओकॉनपण एक पर्याय ठरू शकेल तुमच्या रेंजच्या जवळपास (थोड्याफार फरकाने).

बाइक घ्यावयाची आहे. होंडा युनीकॉर्न चा विचार करतो आहे. जुने मॉडेल परत लाँच होणार असल्याचे ऐकले. तेव्हा ही गाडी घ्यावी का? जुने की नवे मॉडेल अधिक चांगले राहील? हिच्याव्यतिरीक्त ह्या रेंजमधल्या इतर चांगल्या बाइक्स कोणत्या? जर कोणाकडे यूनिकॉर्न असेल तर अनुभव कसा आहे?

इरसाल कार्टं's picture

15 Feb 2017 - 10:16 am | इरसाल कार्टं

मी ४ वर्षे झाली वापरतोय, पूर्णपणे समाधानी आहे.

धन्स इका.. घेणे फिक्स केलेय आजच..

वामन देशमुख's picture

31 Mar 2017 - 12:52 pm | वामन देशमुख

RDBMS theory बद्धल मदत हवी आहे. विशेषतः नॉर्मलायझेशन फॉर्म्स आणि डेटा डिपेंडंसीज समजून घ्यायचे आहेत. विकी, StackOverFlow आणि इतर साइटींवर वाचून झालेय पण पुरते समजले नाही. विशेषतः 3NF, BCNF फारसे काही कळले नाही.
कुणी इथे लेख लिहिला तर बरे होईल. मला फोनवर समजावून सांगितले तर फारच उपकार होतील. तज्ज्ञ मिपा करांनी मला व्यनी करावा ही विनंती.

फ्रेंच व बंगाली भाषांत पारंगत असणार्‍या मिपाकांकडून मदत हवी आहे.
या दोन्हीही भाषा शिकण्याची मनस्वी इच्छा आहे. सुरूवात कोठून करावी येथेच अडलो आहे. यूट्यूबचा वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र एक ना धड भाराभर अश्या लिंक्स येत आहेत. अतिशय बेसिक्सपासून(मुळाक्षरांपासून) या भाषा शिकण्याची गरज आहे मला. कृपया चांगली पुस्तके, वेबसाईट्स, कोर्सेस, व्हॉटसॅपग्रूप सुचवा. या भाषा वाचता लिहिता, बोलता याव्यात अशी फार इच्छा लहानपणापासून आहे.

आदूबाळ's picture

3 Apr 2017 - 1:38 pm | आदूबाळ

सौरा, पुण्यात असाल तर 'अलियांस फ्राँसे' या संस्थेचे फ्रेंच वर्ग फार छान आहेत. (पत्रकारनगरच्या टोकाला आहे ही संस्था.)

आबा, हो पुण्यातच आहे. नक्की जाईन त्यांच्याकडे.

फ्रेंच शिकणे सध्या पुढे ढकलले मात्र बंगाली शिकण्याचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. बरेच प्राथमिक पातळीवरचे यश मिळाले आहे. 'बॉर्णोपरिचय' हे अप्रतिम अ‍ॅप, 'बंगाली भाषा परिचय' हे महाराष्ट्र साहित्य व संस्कृती महामंडळाच्या साईटवर मोफत पिडीएफच्या स्वरूपात उपलब्ध असणारे पुस्तक आणि बंगाली बडबडगीते, अ‍ॅनिमेटेड गोष्टी आणि सिनेमे या माध्यमातून शिकणे चालू आहे. मला स्वतःला बरीच प्रगती वाटत आहे. वर्णमाला जमू लागली आहे. आता छोटी छोटी वाक्ये वाचू शकत आहे. उच्चारांशी देखिल बराच परिचीत झालो आहे. भारी वाटतंय.

तेजस आठवले's picture

21 Apr 2017 - 4:33 pm | तेजस आठवले

आठवडाभर गावाला जायचे असल्यास कुंडीतल्या झाडांना पाणी मिळण्यासाठी काय उपाय करावा ? (शेजारी झाडे हलवणे अथवा त्यांना पाणी घालायला सांगणे हा पर्याय नाही.) खात्रीलायक आणि वापरून पाहिलेलाच उपाय कृपया सांगावा.

एकुलता एक डॉन's picture

23 Apr 2017 - 8:44 pm | एकुलता एक डॉन

पाण्याची बाटली छिद्र पडून ठिंबक सिंचन वापरून पहा

पुस्तक दिनाच्या निमित्ताने फेबूवर अनेकांनी आपल्याकडे कशी हज्जार्रो पुस्तके आहेत अशी जाहिरात केली. 'आम्हाला नै आवडत ती इबुकं, आम्हाला पुस्तकांचा वास आवडतो, तो येतो का तुमच्या शिंच्या इबुकांत' वगैरे पोष्टी बऱ्याच पाह्यला मिळाल्या. पण मला खरोखर इपब फॉरमॅटमध्ये टॅबवर पुस्तकं वाचायला खुप आवडतात. भरभर वाचून होतात, कुठेही बसल्या बसल्या वाचता येते, स्वस्त पडतात, बरीच फुकट मिळतात. मराठी, हिंदी पुस्तकेदेखील किंडल फॉरमॅटमध्ये मिळतात. ऑफिसमध्ये पुस्तक घेऊन जाणे अशक्य आहे, तिथे मोबाईल किंवा टॅबवर वाचल्यास बॉसला पण काही वाटत नाही. तेव्हा इबुकांचा अजून प्रचार प्रसार व्हावा असे वाटते.

यु पी एस इनव्हर्टर कुठल्या कंपनीचा चांगला आहे ?

'आर्य‌न इन्व्हेज‌न थिय‌री' पूर्ण‌प‌णे खोटी अस‌ल्याचे सिद्ध‌ झाले आहे का? म्ह‌ण‌जे ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ स‌र्व इतिहास‌कारांना, उत्ख‌न‌कांना मान्य‌ होईल‌ असा एखादा निष्क‌र्ष‌ निघाला आहे काय‌(एखाद्या इतिहास‌ प‌रिष‌देत‌ व‌गैरे याव‌र च‌र्चा होउन‌ क्लोझ्य‌र‌ होणे अश्या स्व‌रुपात‌)? कि अजून‌देखिल ही थिय‌री ख‌री आहे यासाठी दिल्या गेलेल्या आधारांना पूर्ण‌प‌णे ब‌र‌खास्त क‌र‌ता आलेले नाहीये?
मला आंतरजालावर कुठेही खात्रीलायक माहिती सापडली नाही याबाबत.

माझी आई तिच्या गोड‌ आवाजात ल‌हान‌प‌णी एक‌ गाणं म्ह‌ण‌त‌ असे. त्यात‌ले काही श‌ब्द‌ असे - म‌हाराज लंकापुरी , प‌री राज्य‌ न‌ग‌री, आनंद क‌रिती हो न‌र नारी, गुढ्या तोर‌णे, तोर‌णे घ‌रोघ‌री, क‌ल्प‌वृक्ष‌ असे दारी, गुढ्या तोर‌णे. हे गाणं अत्य‌ंत म‌धुर‌ आहे नि मी क‌धी रेडिओ व‌र प‌ण ऐक‌लं नाही. कोणाला ठाऊक‌ आहे का हे गाणं? गुग‌ल‌व‌र/युत्युब्व‌र नाही.

तेजस आठवले's picture

15 Jul 2017 - 10:34 pm | तेजस आठवले

इलेक्ट्रिक बाईक / स्कूटर वापरतं का कोणी ? असल्यास अनुभव/अभिप्राय/माहिती द्यावी.

दिल दोस्ती दोबारा मालिकेचे बारा का वाजले?

एकेक कलाकाराने एकामागून एक एक्झिट का घेतली? मराठी मालिकांचे प्रोड्युसर निदान एका वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट सुद्द्धा करत नाहीत का?

एका कथेत खालील वाक्ये वाचली

'आमच्या काकूने उभे लावून घेतले होते. मला कसे तरीच झाले. माझी आई असे कधीच करीत नसे. केवळ रीत म्हणून मी काका- काकूंना नमस्कार केला.'

इथे ठळक भागाचा अर्थ काय असावा?

माफ करा.
आमच्या काकूने उभे लावून घेतले होते. मला कसे तरीच झाले. माझी आई असे कधीच करीत नसे. केवळ रीत म्हणून मी काका- काकूंना नमस्कार केला.
इथल्या ठळक भागाचा अर्थ अपेक्षित आहे.