दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
21 Nov 2014 - 11:39 am

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.

3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.

४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.

५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात

६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात.

७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.

समाजविचार

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

21 Nov 2014 - 11:43 am | मराठी_माणूस

प्रत्येकात काही न काही प्रमाणात, परिस्थितीनुसार ह्या गोष्टी आढळतात.

सुबोध खरे's picture

21 Nov 2014 - 11:44 am | सुबोध खरे

आपण सर्वच जण थोडे फार दांभिक आहोत. कारण यातील एक किंवा अनेक गोष्टी आपण कधीना कधी तरी करीत असतो. फक्त आपल्याला दुसर्याने दांभिक म्हटलेले चालत नाही.

माहितगार's picture

21 Nov 2014 - 11:52 am | माहितगार

स्वार्थाच्यादृष्टीने मानवी स्वभाव स्वहिताचे समर्थन करत असतो हे नैसर्गिक वाटते.

धागा लेखातील क्रमांक ३ चा मुद्दा काही वेळा बरोबरही असू शकेल पण नेहमीच बरोबर असेल का या बद्दल साशंकता वाटते.

सूड's picture

21 Nov 2014 - 2:49 pm | सूड

>>आपण सर्वच जण थोडे फार दांभिक आहोत. फक्त आपल्याला दुसर्याने दांभिक म्हटलेले चालत नाही.

रामदास's picture

21 Nov 2014 - 11:47 am | रामदास

सहमत

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने आमची ही कविता आठवली

http://www.misalpav.com/node/28280

पण बरेच दिवस मीच काही दांभिकपणा केलेला नाही ... आता काहीतरी खुसपट काढावे म्हणतो :D

स्पा's picture

21 Nov 2014 - 12:09 pm | स्पा

बर मग

आता काय करायचे?

मदनबाण's picture

21 Nov 2014 - 12:58 pm | मदनबाण

डॉकशी सहमत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }

कंजूस's picture

21 Nov 2014 - 1:09 pm | कंजूस

कुस्तीचा फड मारूनच हुबे राहिलाय समोरच्या गड्याला आत तरी येऊ द्या की.

प्यारे१'s picture

21 Nov 2014 - 2:49 pm | प्यारे१

१,२,३,४,५,६,७
आयला सगळेच आले की.
- पूर्वीपासूनच सर्टिफाईड दांभिक :)

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 3:08 pm | पाषाणभेद

दंभिक म्हणजे काय?

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 3:19 pm | पाषाणभेद

ऑनलाईन डिक्शनरीनुसार
A person who professes beliefs and opinions that he or she does not hold in order to conceal his or her real feelings or motives.
म्हणजें एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे.
थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती.

आपण वर दिलेल्या लक्षणांत तफावत दिसते आहे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे.
थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती.

पाषाणभेद तुम्ही दगडं फोडता का हो ? ;)

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 3:33 pm | पाषाणभेद

आपले मत समजले नाही. कृपया विस्तार करून सांगा म्हणजे आपल्या दोघांचेही शंकानिरसन होईल.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 3:57 pm | प्रसाद गोडबोले

अहो तुम्हीच विचारले ना की दांभिक म्हणजे काय म्हणुन मी उत्तर दिले

तुम्ही दगड फोडत नाही तरीही पाषाणभेद हे नाव घेता .... ह्यालाच म्हणतात दांभिकता आणि तुम्ही दांभिक :D

तुम्ही नाय का, गिर्जा नसताना गिर्जा होऊन लिहीत होतात पूर्वाश्रमी ? =))))

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 4:46 pm | प्रसाद गोडबोले

अरे डु आयडी काढुन मय्यत्तर्री पाठवणार्‍यांची चेच्ष्टा करणे अन योग्य वेळ आली की डु आयडी जाहीर करणे ह्याला दांभिकता म्हणत नाहीत , ह्याला टवाळगिरी म्हणतात किंवा रिकामटेकडा नाव्ही भिंतीला तुंबड्यालावी असे म्हणतात , आयटी च्या भाषेत बेन्चयोग =))

सूड's picture

21 Nov 2014 - 4:53 pm | सूड

;)

बॅटमॅन's picture

21 Nov 2014 - 4:55 pm | बॅटमॅन

विझवलीत काडी!!

अंमळ गधेगाळीतल्या शेवटच्या वाक्यातील क्रियापदाचा 'वि'शेषेकरून भास जाहला. त्यादृष्टीने पाहता 'काडी' हे नामाभिधान चपखल आहे!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 5:05 pm | प्रसाद गोडबोले

एकावेळी किती फासे लावुन ठेवाल शिकारी साठी ... जरा सबुरीनं घ्या . एकावेळी एकच काडी लावु द्या रे ;)

जेपी's picture

21 Nov 2014 - 5:08 pm | जेपी

फालतु लेख.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

>>>> जे पी तुम्ही << फालतु (Third class ) लेख ओळखण्याचे सात निकष:>> असा धागा का बरे पाडत नाही ;)

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले

जे पी तुम्ही फालतु (Third class ) लेख ओळखण्याचे सात निकष: असा धागा का बरे पाडत नाही ;)

कारण आमच्या बुंदीच्या झार्याने जिलीबी पाडता येत नाय. *blum3* *wink*

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2014 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

=))

मुक्त विहारि's picture

21 Nov 2014 - 11:46 pm | मुक्त विहारि

आयला...

मराठीतला नविन "वाकप्रचार"

"बुंदीच्या झार्‍याने जिलबी पाडणे."

सतिश गावडे's picture

21 Nov 2014 - 11:02 pm | सतिश गावडे

कुठून ढापलंत हे?

जेपी's picture

22 Nov 2014 - 5:08 am | जेपी

ढापलायच कशाला ,
टिकुन राहायच तर स्वत:चे शोध लावावे लागतात *wink*

रेवती's picture

21 Nov 2014 - 11:19 pm | रेवती

गर्व से कहो हम दांभिक हय| ;)

दांभिक लोकांची ७ लक्षणे ...

१) देखल्या देवा दंडवत घालणे .
२) आयजीच्या जीवावर बायजी ऊदार..
३) मुखी हरीनाम, अंतरी शिव्याशाप.
४) गर्जेल तो पडेल काय ?
५) लोकांच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
६) आपला तो बाब्या , लोकाचे ते कार्टे .
आणि
७) लोकां सांगे ब्रम्हज्ञान , आपण कोरडे पाषाण.

या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ का? ;)

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2014 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

ह्यालाच दांभिकपणा म्हणतात. हिन्दीकरण करण्याची प्रचंड उत्सुकता आहे पण शाहजोगपणे विचारून घ्यायचं. *smile*

हलकेच घे हो, रेवती. (हाही दांभिकपणाच का??)

मी आहेच मुळी दांभिक! वरच्या एका प्रतिसादात त्याचा उल्लेख न लपवता केलाय. ;)

मनीषा's picture

23 Nov 2014 - 6:15 am | मनीषा

---- त्याचा उल्लेख न लपवता केलाय.

म्हणजे तुम्ही खर्‍या खर्‍या दांभिक नाहीच . कारण जे आहे ते नाकारणे आणि नाहीये ते आहेच असे आत्मविश्वासाने सांगणे, हे तर दांभिकपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे ना?

खटपट्या's picture

23 Nov 2014 - 1:38 am | खटपट्या

द्या की !!

अहो तेच तर! मला करायचे आहे भाषांतर पण ज्यांचा प्रतिसाद आहे त्यांची परवानगी मिळाली तर बरे! ;)

ते प्रातिधीकार मुक्त हाय,तर होऊन जाऊ द्या.*biggrin*

मनीषा's picture

23 Nov 2014 - 5:58 am | मनीषा

जरूर जरूर ... माझा काही कॉपीराईट नाहीये . :)

पण का..का..का?

टीप : क्रमांक ४ मधील पडेल म्हणजे "रत्नांग्रीचा अण्णू गोगटे" नाही.
ते -- गर्जेल तो बरसेल काय? असे वाचावे.

जेपी's picture

23 Nov 2014 - 6:08 am | जेपी

पण का का का ?>>>>>
तुमी 'बबलन का मकबरा ' पाहायला जावा मंजे समजेल .

रेवती's picture

23 Nov 2014 - 8:41 am | रेवती

ओक्के. धन्यवाद मनीषा!
प्रयत्न केला पण फारसे जमले नाही.
मूंह में राम बगल में छुरी हे एकच जमले बाकी शरणागती. ;)
हे म्हणजे जो गरजेगा वो बरसेगा क्या? टैप झाले.

छान! प्रयत्न चालू राहू दे .
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता .. तेलही गळे -
माहीती आहे ना?

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2014 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले

आत्ताच दांभिक लोक ओळखण्याच्या अजुन एक निकष निदर्शनास आला आहे !

आज दांभिक लोक ओळखण्यचाा नवा फंडा समजला.