हरियाणाचे संत रामपाल प्रकरण आणि न्यायालयांचा अवमान करणारे चाहत्यांचे सांशंकीत वर्तन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
19 Nov 2014 - 10:11 am
गाभा: 

हरियाणा राज्यात (तथाकथीत संत) रामपाल नावाच्या व्यक्तीवर न्यायालयीन अवमाननेचे आणि हत्येचे काही आरोप आहेत. न्यायालयात उपस्थिती टाळण्याचे चाळीसपेक्षा अधीक प्रयत्नांनतर उच्चन्यायालयानी अजामीनपात्र वॉरंट काढून रामपालला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे या रामपाल महाशयांनी चक्क स्वतःचे खासगी सशस्त्र कंमाडो आणि चाहत्यांच्या भरोशावर न्यायालय आणि शासन यंत्रणेलाच खूले आव्हान दिले आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्याचे त्याचे म्हणणे न्याययंत्रणा भ्रष्ट आहे. पण खरे तर अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत म्हणून भारतीय घटनेनुसार आणि परंपरांनुसार भारतीय न्याययंत्रणेत बर्‍यापैकी समतोल आणि विश्वासार्हताही आहे की उठ सूठ कोणत्याही सोम्या गोम्याने यावे आणि न्याययंत्रणा आणि शासन यंत्रणेलाच आव्हान द्यावे हे स्विकारण्याचे धाडस करावे भारतीय न्याययंत्रणा एवढीही टा़कावू नाही.

भारतीय न्यायालयीन प्रक्रीया त्रिस्तरीय आहे स्थानिक उच्च आणि सर्वोच्च न्यायालय असे तीन स्तर आहेत एका स्तरावर प्रॉब्लेम असेल तर दुसर्‍या किंवा तिसर्‍या स्तरावर फिल्टर लागतोच. एखाद्या न्यायाधिशाचे एखाद्या प्रकरणात व्यक्तीगत हितसंघर्ष असण्याची शक्यता असल्यास दुसरा न्यायाधीश प्रकरण हाताळतो. त्या शिवाय हजार आरोपी सुटले तरी चालतील पण निरपराधाला शिक्षा होऊ नये हे तत्वाचीही अंमलबजावणी होतेच. ह्या तत्वामुळेच अटक झालेल्या रामपालाला जमानत मिळाली. पण हि जमानत मिळालेली मंडळी आपल्या लोकप्रीयतेचा गैरफायदा घेऊन न्यायालयीन प्रक्रीयेचाच गैरफायदा घेताना दिसतात.

माझा या धाग्याचा हेतु रामपालाबद्दल सध्या चालू प्रसंगाबद्दल मर्यादीत नाही त्याला आज ना उद्या अटक होईलच न्यायालये आणि संबंधीत यंत्रणा काय ती कार्यवाही करतील. या प्रसंगाच्या निमित्ताने काही संबंधीत पैलूंची चर्चा करणे हा मुख्य उद्देश आहे.

चाहत्यांनी आपणास आवडणार्‍या व्यक्तीची पाठराखण कायद्याच्या आणि न्याययंत्रणेच्या विरुद्धजाऊन करणे कितपत इष्ट आहे. अमूक तमूकचे चाहते अमूक तमूकला अटक करू देणार नाहीत अटक झाली तर सार्वजनिक हिंसेच्या उपद्रवमुल्याचा उपयोग होईल अशा धमक्या आणि अटकेचे निमीत्ताने सामाजिक शांततेचा भंग करणे कितपत उचीत असते ?

जमानत मिळालीकी आरोपातून सुटका झाल्या प्रमाणे विजयी प्रतिक्रीया देणे योग्य आहे का ?

माध्यमांची भूमीका चाहत्यांच्या वागण्याचे रिपोर्टींग करण्याची असते, का चाहत्यांना भडकावण्याची असते ?

दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निमीत्ताने रामपाल सारख्या व्यक्तींना एवढ्या प्रमाणात शस्त्रे उपलब्ध होतात. अनधिकृत शस्त्रांचा आपर नियंत्रणात ठेवण्यात देशभरच्या पोलीस यंत्रणा वारंवार अयशस्वी होताना दिसताहेत. असुरक्षेने अधिक असुरक्षेचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रीया होते.

तीसरा मुद्दा न्यायालयीन दिरंगाईचा, जसे कि या रामपाल प्रकरणात या रामपालाला २००८ मध्येच अटक झाली होती पण मुख्य प्रकरण लवकर निकाली न निघताच त्याचे जास्तच फोफावले. एकतर न्यायालयीन प्रक्रीयेत अधीक वेळ जाणे न्यायालयीन प्रक्रीयेवरील विश्वास उडण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होत आहे.

अशा जमानत मिळालेल्या व्यक्तींवर चोख पाळत ठेऊन आवश्यक सुरक्षेच्या पलिकडे खासगी सुरक्षा मिळणार नाही आणि पुन्हा अटक करण्याची चौकशी आणि न्यायालयापुढे हजर करण्याची वेळ आल्यास तसे सहज करण्यासंबंधी संबंधीत कायदे आणि प्रक्रीयेत काही त्रुटी आहेत का ?

एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन न करण्याची दक्षता चाहत्यांनी घ्यावयास हवी असे तुम्हाला वाटते का ? चर्चेतील मनमोकळ्या सहभागासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

19 Nov 2014 - 11:05 am | रमेश आठवले

बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध स्थानिक कोर्टाने समन्स काढले होते परंतु ते बजावण्याची हिम्मत मुंबई पोलिस करू शकले नाहीत असे वाचनात आले आहे.

जेपी's picture

19 Nov 2014 - 12:49 pm | जेपी

छगन भुजबळ ग्रुहमंत्री झाल्यावर ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला होता.दंगाधोपा होऊ नये म्हणुन कर्नाटकातुन फौजफोटा आणला होता पण कोर्टानेच सगळ प्रकरण फेटाळल आणी भुजबळ साहेबालाच पळाव लागल

आनन्दा's picture

19 Nov 2014 - 11:46 am | आनन्दा

ह्म्म.. सांगणे कठीण आहे. पण तुमचे नाणे खरे असेल तर न्यालयाला घाबरायचे कशाला? रामदेवबाबांच्या विरोधात शासन ३ वर्षे शोध करत होते, पण अजूनही त्यांना अडकवणारा पुरावा मिळवणे त्यांना शक्य झालेले नाही.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 12:00 pm | प्रसाद गोडबोले

न्यायालयांचा अवमान करणारे चाहत्यांचे सांशंकीत वर्तन

अवमानावरुन आठवले .... ते मागे मुंबैत आझाद मैदानावर मोर्चा काढुन , अमर जवानच्या स्मारकाराला लाथाडणार्यांचे , अवमान करणार्‍यांचे काय झाले हो पुढे ?

ते मागे मुंबैत आझाद मैदानावर मोर्चा काढुन , अमर जवानच्या स्मारकाराला लाथाडणार्यांचे , अवमान करणार्‍यांचे काय झाले हो पुढे ?

याबद्दल पुढे एखादी बातमीही वाचनात आली नाही.

माहितगार's picture

19 Nov 2014 - 10:16 pm | माहितगार

आंतरजालावर शेवटची बातमी एप्रील २०१४ची दिसतीए ज्यात भरपाईच्या रकमेची विमाकंपनीकडून खात्री करून घेण्यास न्यायालयाने सांगितले किंवा काय. एकुण चौकशी आणि न्यायालयीन यंत्रणांची दिरंगाई सातत्याच्या अविश्वास चक्रास कारणीभूत होत रहाते असे वाटते.

येण्याची शक्यताही कमीच !

नाखु's picture

21 Nov 2014 - 9:44 am | नाखु

तसेही मानवता कळवळा वाद्यांच्या नजरेतून्/मिडियाच्या द्रुश्टीने हा विषय पुरेसा गंभीर आणि टाळीखेचक नाहीयेच मुळी!!
त्यामुळे अश्या छोट्या गोष्टीं बाबत बातमीची/पाठपुराव्याची अपेक्षा करूच नये!

मुक्त विहारि's picture

19 Nov 2014 - 10:31 pm | मुक्त विहारि

काय हे?

ह्या असल्या गोष्टी विचारल्या की बर्‍याच लोकांचा पोट शूळ उठतो...

आजकाल आम्ही "आझाद मैदान आणि मुझ्झफर नगरचा" विषय काढत नाही....

बाद्वे,

आंध्रप्रदेशात पण कुणीतरी बोलले ना, की पोलीसांना थोडा वेळ सुट्टी द्या, मग १०० कोटी लोकांना आम्ही यमसदन दाखवतो.त्याचे पुढे काय झाले?

माहितगार's picture

19 Nov 2014 - 10:42 pm | माहितगार

न्यायालयीन शिक्षा लहान असतील तरी चालेल पण निकाल वेगाने व्हावयास हवेत, Truth and reconciliation commission सारखी काही व्यवस्था हवी म्हणजे हे परस्पर अविश्वासाचे गढूळ वातावरण दशकोंदशके सहन करावे लागणार नाही. या निमीत्ताने आमच्या एका धाग्याची हि एक जाहीरात.

hitesh's picture

21 Nov 2014 - 7:02 am | hitesh

त्यांच्या बोलण्यात यमसदन हा शब्द होता का ?

माहितगार's picture

21 Nov 2014 - 7:45 am | माहितगार

खुपणार्‍या टोकाच्या भूमीका निंदनीय असतात. दुसर्‍याचेते कार्टे आपाला तो बाब्या स्वरुपाच्या 'तेल ओतू वृत्ती' निंदा करण्याच्या लायकीच्याही नाही एवढ्या दुर्दैवी असतात.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2014 - 7:46 am | टवाळ कार्टा

मग खरे वाक्य काय होते ते आपणच सांगावे...

मुक्त विहारि's picture

21 Nov 2014 - 8:16 am | मुक्त विहारि

चल मस्त पार्टी करू...

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2014 - 8:21 am | टवाळ कार्टा

हाहाहा...चाल्लेल :)

कलंत्री's picture

19 Nov 2014 - 12:22 pm | कलंत्री

एकीकडे मोदी देशवविदेशात जाऊन भारताबद्दल चांगले मत बनवत आहे तर दुसरीकडे भाजपाच्या राज्यात प्रत्यक्ष राज्यसरकारांना / न्यायव्यवस्थेला सरळसरळ आव्हान देण्यात येत आहे.

आपल्या देशाला अश्या माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांपासूनच खरा धोका आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2014 - 12:46 pm | llपुण्याचे पेशवेll

न्याययन्त्रणेबद्दल बोलावे तेवढे कमीच.भारतीय न्याययन्त्रणा जरा जास्तंच लोकशाही (over liberal ?) आहे असे वाटते.

जमानत या शब्दाला जामीन असा मराठी शब्द आहे.

प्रसाद१९७१'s picture

19 Nov 2014 - 1:21 pm | प्रसाद१९७१

म्हणे ४२ वे़ळेला त्याने कोर्टाची सुनावणी टाळली. हा न्यायाधीशाचा दोष आहे. २-३ वेळेला टाळल्यावरच अटक वॉरंट काढायला हवे होते.

रमेश आठवले's picture

19 Nov 2014 - 10:05 pm | रमेश आठवले

पाकिस्तानचे जनरल मुशर्रफ यांना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याच कराची जवळील फार्म हौस मध्ये ठेवले होते आणि नंतर त्यांना कोर्टात नेण्या आणण्या च्या प्रवासातील धोका टाळण्यासाठी कोर्टाने त्यांच्या रहात्या घरालाच पुढील कार्यवाहीसाठी जेल म्हणून जाहीर केले होते.

सर्वात चांगली नसली तरी सर्वात वाईट आयडीया सुद्धा नाही, रामपालाच्या केस मध्ये अख्खा आश्रम जेल म्हणून जाहीर केला असता तर पोलीसांचे कष्ट जरासे वाचले असते पण घरालाच जेल म्हणणे म्हणजे सत्यमचे राजू , जबतक रहेगा आलू, गोलमाडी वगैरे मंडळींना हि पर्वणीच की

राजेश घासकडवी's picture

19 Nov 2014 - 10:15 pm | राजेश घासकडवी

न्यायालयीन प्रक्रिया पार पाडायला आलेल्या पोलिसांवर हल्ला होणं ही गर्हणीय आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे. बेचाळीस वेळा अशी समन्स धुडकावून लावून मग पोलिसांशी मारामारी करणाऱ्या माणसाचा संत म्हणून उल्लेख होतो हेही दुर्दैवी.

माहितगार's picture

19 Nov 2014 - 10:32 pm | माहितगार

सहमत, बहुधा संत कबीरांचे नाव लावल्यामुळे उत्तर आणि मध्यभारतातला शिष्य संप्रदाय त्याला आयता मिळाला. गेल्या ५०० वर्षात संत कबीरांच्या कबीरपंथी परंपरेस न लागलेले गालबोट या रामपालाने लावले असे म्हणता येईल असे वाटते. पण महत्वाचे संत कबीराच्या शिष्यांना कुणाचे कुठपर्यंत समर्थन करायाचे याचे तारतम्य उरु नये ही दुर्दैवाची गोष्ट.

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 11:16 pm | प्यारे१

मी हुशार आहे असं म्हणणं आणि खरंच तसं असणं ह्यात फरक आहे ना? कबीर पंथी अथवा कबीरांचा अवतार आहे असा 'स्वतःचा क्लेम' होता त्याचा. त्यामुळं संतपरंपरेला गालबोट लागू नये. असो!

माहितगार's picture

19 Nov 2014 - 11:23 pm | माहितगार

मी हुशार आहे असं म्हणणं आणि खरंच तसं असणं ह्यात फरक आहे ना?

सहमत आहे.

असो,

सध्या तरी "दाम करी काम" हेच गाणे ऐकावे म्हणतो...

अर्धवटराव's picture

19 Nov 2014 - 10:47 pm | अर्धवटराव

कायद्याचं राज्य हि संकल्पना समाजात रुजायला कायदा बनवणारे, राबवणारे, पाळणारे, सर्वच कमि पडले.

माहितगार's picture

19 Nov 2014 - 10:51 pm | माहितगार

सहमत आहे. सर्वांसाठी कायदा जो माणसांसाठी असेल यासाठी सामाजिक आणि राजकीय सजगता हवी

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 12:40 am | बहुगुणी

अखेर या बाबाला अटक करण्यात आलेली आहे असं दिसतं. त्याच्यावरचा खटला खरोखरच देशद्रोहाच्या (sedition) आरोपाखाली चालवण्यात येणार असेल तर फार उत्तम.

असेच खटले MIM चा ओवेसी आणि इतरही काही देशविघातक, प्रक्षोभक भाषणं करणार्‍यांवर चालवले जातील का?

माहितगार's picture

20 Nov 2014 - 12:54 am | माहितगार

अखेर या बाबाला अटक करण्यात आलेली आहे असं दिसतं. त्याच्यावरचा खटला खरोखरच देशद्रोहाच्या (sedition) आरोपाखाली चालवण्यात येणार असेल तर फार उत्तम.

त्याने शासन यंत्रणेसमोर अत्यंत गंभीर आव्हान उभ केल हे खरच बर्‍याच गंभीर आरोपांचा वाली होऊन चांगला दीर्घकाळ आत जाण्याची शक्यता आहेच. राजद्रोहाचा आरोप होऊ शकतोच आणि तो चिटकण्याची शक्यता आहेच राजद्रोह आणि देशद्रोह या शब्दांच्या अर्थछटात फरक आहे असे वाटते. अर्थात गंभीर आरोपांखाली बूक करणे शासन यंत्रणेची केवळ प्रेशर टॅक्टीक असू शकते. तो न्यायालया समोर सरळ गेला असता तर त्याच्यावरचे आरोपातून प्रत्यक्ष सहभाग दर्शवणे अवघड गेले असते. आता तो स्वतःहूनच गंभीर आरोपांमध्ये गोवला गेला आहे.

सर्वच देश विघातक प्रवृत्तींवर एकसारखी अशी धडक कारवाई होणे गरजेचे आहे अर्थात जनता जेथे जेथे मतपेटीच्या राजकारणात न फसता बहुमताची सरकारे आणतील तेथे ते अधीक सोपे जाईल. त्या दृष्टीने सध्याची महाराष्ट्रातील राजकीय अस्थीरता पोषक म्हणता येईल असे वाटत नाही.

प्रक्षोभक भाषणं करणार्‍यांवर चालवले जातील का?

असे झाले तर फार उत्तम.

हा कसला संत ? जसा असाराम तसाच हा रामपाल ! नावात राम असले वर्तन हे रावणाचेच ठरले !
आपल्या देशात अश्या धर्माच्या ठेकेदारांची कमी नाही... पण अश्या काही नमुन्यांमुळे यापुढे खरे उत्तम संत-महात्मे विनाकारण संशयाने पाहिले जाउ शकतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

बाळ सप्रे's picture

20 Nov 2014 - 3:35 pm | बाळ सप्रे

आश्चर्यकारकरीत्या खालील शिकवणी तो भक्तांना देतो !!!
> ड्रग्जचा विरोध: बाबा रामपाल आपल्या अनुयायांना हुक्का, दारू, बियर, तंबाखू, बीडी, सिगारेट, गुटखा, मांसाहार, अंडे, अफीम, गांजा, चरस सारख्या अमली पदार्थांपासून दूर राहण्यास सांगतात.
> तीर्थस्थळांवर जाण्यास विरोध: बाबा रामपाल कोणत्याही प्रकारचं व्रत, पूजा-पाठ मानत नाहीत. सोबतच गंगा स्नान, मंदिरात जाणंही निषिद्ध मानतात.
> जन्म-मृत्यूनंतर होणाऱ्या कोणत्याही पूजेचा ते विरोध करतात. सोबतच पितरांची पूजाही करू नये असं सांगतात.
> मांसाहारी जेवण आणि जातीभेदचाही विरोध करतात.
> रामपाल कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या नाच-गाण्याला अश्लील मानतात आणि त्याचा पूर्णपणे विरोध करतात.
> लग्नाच्यावेळी देण्यात येणाऱ्या हुंड्याचा ते विरोध करतात. त्यांचं म्हणणं आहे हुंडा देणं आणि घेणं देशातील अशांतीचं कारण आहे.

माहितगार's picture

21 Nov 2014 - 7:29 am | माहितगार

हो तेच तर, महाशयांनी भोंदू आणि अतीवादी सर्व पंथात असू शकतात तसे पुरोगाम्यात असू शकतात याचा आत्ता पर्यंतचा सर्वात चांगला नमुना पेश केला, स्वत:ला आधूनिक विचारांचा दाखवूणार्‍या व्यक्ती कडून कायद्याची हकनाक अवमानना हा विरोधाभास आहे. इतरवेळी संत महोदयांच्या जाती धर्म निरपेक्षतेने डोळे पाणावले असते.

नाखु's picture

21 Nov 2014 - 10:01 am | नाखु

सतलोक आश्रमात रामपालचे

बाकी पुढे या प्रकरणांचे काय होते?? असारामबापूंना (ज्यु.आसारामसहीत) काही शिक्षा होईल का?

जयललीला शिक्षेने थोडासा आशावाद वाढला आहे खरा!
बाकी राम* जाणे!
आसाराम
रामपाल
सोडून खरा रामराया.

माहितगार's picture

21 Nov 2014 - 10:22 am | माहितगार

रामपाल प्रकरणात कायदेशीर दृष्ट्या प्रत्यक्षदर्शी पुराव्यांची कमतरता असेल असे वाटते. रामपाल प्रकरण कदाचीत बापूंपेक्षाही अधीक चलाख असण्याची शक्यता असू शकेल असा अंदाज आहे (चुभूदेघे) . सरकारी बाजूला सॉलीड विटनेस मिळाल्या शिवाय रामपालास मोठी शिक्षा कठीण वाटते.

जयलीलाची शिक्षा सुप्रीम कोर्टात अद्याप निश्चीत झालेली नाही. जयलीला केसही न्यायायलयीन दिरंगाईचे उत्तम उदाहरण आहे.

योगी९००'s picture

21 Nov 2014 - 10:53 am | योगी९००

@मदनबाण
तुम्ही दिलेल्या लिंकवर "बाबा रामपाल अटक सत्र सुरू असतांना या फेसबुक पेजचे लाइक्स जवळपास दोन हजार रुपयांनी वाढलेत." असे लिहीले आहे. म्हणजे फेसबुकवर या बाबाचे पेज लाईक करायला सुद्दा दोन हजार रुपये लागतात का? असा प्रश्न मनात आला.

परवा कोठेतरी असे वाचले की या रामपाल बाबाचे भक्त रोज बाबाला दुधाने आंघोळ घालायचे आणि नंतर त्या आंघोळलेल्या दुधाची खीर बनवून भक्त प्रसाद म्हणून पायचे. हे वाचून अक्षरशः १० मि. हसत होतो. नेमके त्याच दिवशी आमच्या कॅटीनला खीर बनवली होती. (अर्थात मी खाल्ली नाही.)

परत@मदनबाण : तुम्ही आमच्याच कंपनीत ना..? परवा खीर खाल्लीत काय?

माहितगार's picture

21 Nov 2014 - 11:06 am | माहितगार

आंघोळलेल्या दुधाची खीर

चरण तीर्थ आणि आंघोळलेल्या दुध इत्यादीचे तिर्थ आपल्याकडे काही धार्मिक परंपरांमध्ये अजूनही असल्याचे ऐकुन आहे पण तो श्रद्धेचा भाग असावा. ऑदरवाईज पुरोगामी रामपाल महाराजानी त्यांच्या आंघोळलेल्या दुधाने विकार बरे होतात ही अंधश्रद्धा बिझनेस मॉडेल म्हणून प्रयत्न पुर्वक फैलावलेली असावी असे वाटते

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2014 - 11:57 am | टवाळ कार्टा

त्या खीरीमध्ये काही औषधी तत्वे झिरपत असतील =))

मदनबाण's picture

21 Nov 2014 - 12:54 pm | मदनबाण

तुम्ही आमच्याच कंपनीत ना..?
यात काय संशय ?
परवा खीर खाल्लीत काय?

यक्क्क... *blush* *bad*
कँटीनच्या माझ्या खाण्यात प्लास्टिकचा तुकडा, दगड, स्टेप्लरची पीन आणि एकदा फुड पॉयझन झाल्याने तिथे अन्न गिळण्याचे टाळतो ! अगदीच नाइलाज झाला तरच रंगीत भात पोटात {प्रचंड सोडा घातलेला } ढकलुन जेवल्याचे समाधान करतो. *blush* *bad*
तक्रार करण्यासाठी फोन लावला तर पलिकडुन उत्तर आले, क्लायंटची पण तक्रार आली होती खाण्या बद्धल ! पहातो...
मी काय समजुन घ्यायचे होते ते घेतले आणि कँन्टीन मधे जेवायचे सोडले !

जाता जाता :- जो स्वतःला इश्वरी अवतार असल्याचे जाहीर करतो तो बाबा / संत बोगस असल्याचे / ओळखण्याचे सर्वात सोप्पे लक्षण आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले

जो स्वतःला इश्वरी अवतार असल्याचे जाहीर करतो तो बाबा / संत बोगस असल्याचे / ओळखण्याचे सर्वात सोप्पे लक्षण आहे.

करेक्ट ! जो खर्‍या अर्थाने संत झालाय त्याच्या लक्षात येते की अवतार वगैरे सगळी मयथॉलॉजी आहे , आपण अवतार नसुन साक्षात पुर्णपरमेश्वरच आहोत ... आणि मग तेव्हा डीक्लीयर करायला काही शिल्लकच राहिलेले नसते :)

मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥३॥

अशी अवस्था आहे ती ... कितीही बोलली तरी काय समजणार लोकांना !

म्हणुन खरा संत जाहीर बिहीर करण्याचा फंदात पडतच नाही तो आपला "रामकृष्ण नामी उन्मनी साधली ।" ह्या अवस्थेत "ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥४॥ "
असा काहीसा अनुर्वाच्च्य आनंद घेत मस्त राहातो !!

______________________________________

ए गणपत चल दारु ला ...

विकास's picture

25 Nov 2014 - 2:56 am | विकास

ही बातमी वाचताना, अमेरीकेतील वॅको टेक्सास मधील डेव्हिडीयन नावाच्या एका पंथाची आणि त्याचा म्होरक्या डेव्हिड कुरेशची आठवण झाली... विकीवरील खालील एक भाग एकदम वाचनीय आहे...

On August 5, 1989, Howell released the "New Light" audio tape, in which he stated he had been told by God to procreate with the women in the group to establish a "House of David" of his "special people". This involved separating married couples in the group and agreeing that only he could have sexual relations with the wives, while the men should observe celibacy.[15][16] He also claimed that God had told him to start building an "Army for God" to prepare for the end of days and a salvation for his followers.[16]

बिल क्लिंटनच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पहील्या कालावधीच्या वेळेस ह्या माणसाचे साम्राज्य वाढले होते. ते डोईजड होऊ शकते याची कल्पना आली. त्याला ऑफर करून देखील तो पोलिसांच्या स्वाधीन होण्यास तयार नव्हता. त्या आवारात लहान मुलांवर अत्याचार चालू असल्याचे समजले. दारूगोळापण होताच. शेवटी नव्याने नेमणूक झालेल्या (आणि पहील्या स्त्री) अ‍ॅटर्नी जर्नल जेनेट रेनो यांनी हल्ला करायला परवानगी दिली. त्यात तो डेव्हीड आणि त्याचे अनेक समर्थक मारले गेले.

आठवते त्याप्रमाणे त्यावेळेस नव्याने आलेल्या क्लिंटन (आयडी नाही!) आणि त्यांच्या प्रशासनावर भरपूर टिका झाली. ती करण्यात रिपब्लिकन्स आघाडीवर होते. १९९३ ला ही घटना घडली आणि त्यातूनच पुढे १९९५ ला ओक्लाहोमा सिटी मधे टिमोथी मॅक्वे आणि त्याच्या साथीदारांनी या घटनेचा निषेध म्हणून सरकारतर्फे हल्ला करणार्‍या अल्कोहोल, टोबॅको अँड फायरआर्म (एटीएफ) चे कार्यालय असलेल्या सरकारी इमारतीस बाँब लावून उध्वस्त केले. त्यातच मुलांचे पाळणाघर असल्याने त्यात अनेक मुले देखील दुर्दैवाने दगावली. तरी देखील या महाभागाची गाडी २००४ मधे लिलावात $३७,००० घेतली... विकीवरील माहीतीप्रमाणे पुढे २००९ मध्ये डेव्हीडच्या आईचा चाकूने खून केला गेला. तीच्या बहीणीनेच तो केला असा समज आहे.

सुदैवाने इतक्या थरावर गोष्टी न जाता रामपाल मिळाला हे खूपच बरे झाले....

अतीअवांतरः (जालवरील निरोक्षण) - इंजिनिअर जेंव्हा इंजिनिअरींगचे काम करत नाहीत तेंव्हा काय करू शकतात याची सध्याच्या काळातील दोन उदाहरणे - केजरीवाल आणि रामपाल! दोघेही हिस्सरचे! ;)

जालवरील निरोक्षण) - इंजिनिअर जेंव्हा इंजिनिअरींगचे काम करत नाहीत तेंव्हा काय करू शकतात

हे वाक्य घेऊन आत्ता सकाळी वेगळा साधासुधा मनोरंजन चर्चा धागा काढला होता पण मिपा प्रशासनाने धागा उडवलेला दिसतोय. केजरीवाल आणि रामपाल! दोघेही हिस्सरचे हे वाक्य मिपा प्रशासनास चालू शकते. आम्ही नाहीच निगेटीव्ह न लिहिलेला धागा मिपा प्रशासनास का चालला नसावा ? काय गौडबंगाल आहे ?

सुदैवाने इतक्या थरावर गोष्टी न जाता रामपाल मिळाला हे खूपच बरे झाले
रामपाल प्रकरणात हत्या झालेल्या आहेत, शिवाय ज्या आश्रमातुन त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच आश्रमात झालेल्या हिंसाचारात स्त्रीया आणि लहान मुले दगावली आहेत. शिवाय गर्भपाताच्या सुविधा आणि निरोध इं देखील त्या आश्रमात सापडले आहेत.
अधिक इकडे :-
Arms, Petrol Bombs, Pregnancy Strip Found in Rampal's Ashram
More firearms, bombs recovered from Rampal's ashram
Indian ashram standoff leaves at least six dead

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

पंजाबी हरयाणवी साधूंचे डेरे आणि उत्तर प्रदेशात आखाडे प्रकारांचा समाज जिवनावर बर्‍यापैकी प्रभाव असावा ज्याची महाराष्ट्रात आपल्याला तेवढी कल्पना येत नाही. आस्था के डेरे, समाज की उलझन हा लेख पंजाबातील डेर्‍यांची पार्श्वभूमी सांगतो.