कथा लेखन

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
18 Nov 2014 - 5:15 pm
गाभा: 

चांगली कथा कशी लिहावी ?

"आजकाल काही लिहित का नाहीस रे ?" कूठल्यातरी वेगळ्याच विषयावर चर्चा चालु असताना गिरिजाने अचानकच हा प्रश्न विचारला .
" आजकाल काही लिहित का नाहीस रे ? आधी काही ना काहीतरी लिहित असायचास ? कशा का होईना वादग्रस्त का होइना गोष्टीबिष्टी लिहायचास ... आता एकदमच बंद केलेलं दिसतय ... लिहिना एखादी चांगली गोष्ट "

ह्या संवादावरुन डोक्यात विचार चक्र सुरु झाले . आधी सुचायचे ते जसे च्या तसे लिहुन काढायचो , पण आता ते चांगले होईल का ह्या विचाराने लिहायचे टाळतो . पण खरंच एखादी चांगली कथा कशी लिहावी ?

माझ्या मते कथेचे चार घटक असतात :
१) कथाबीज - जो की कथेचा मुळ आत्मा . जे लेखकाला सांगायचंच . बहुतांशवेळा वन लायनर . कथेचे सार उदाहरणार्थ फाउंटनहेड मधे "Man's ego is the fountainhead of human progress" हे कथा बीज आहे.
२) पात्रं - मग वरील विचार कन्व्हे करायला पात्रंची रचना करावी लागेल , त्या पात्रांचे वर्णन जितके सक्षम पणे येईल , तितके विचार सहज पणे मांडता येतील .
३) प्रसंग - एकदा पात्रं उभारुन झाले की प्रसंग सिच्युअशन उभे करावे लागेल की ज्यातुन त्या पात्राचे कॅरॅक्टर दाखवता येईल .)
४)संवाद - आणि सर्वात शेवटी पात्रांमधील संवाद जे की खर्‍या अर्थाने कथा पुढे सरकवणारे असतील .

पण हे सगळे प्रत्यक्षात उतरवताना बराच घोळ होतोय ... जरा पात्रांवर प्रसंगांवर जास्त लक्ष गेले तर फार रटाळ होते कथा आणि जर संवाद जास्त झाले तर एकांकिका टाईप होते .
मग ह्यात नक्की ताळमेळ कसा साधता येईल ?

हे मोठ्ठे मोठ्ठे प्रसिध्द लेखक कसे बरे विचार करत असतील , जी.एं च्या कथा वाचुन तर अजुनही आश्चर्य चकित व्ह्याय्ला होते मला , ४० -४० पानांच्व्ही कथा कशी बरे लिहित असतील ते ?
लघुकथा लिहिणे तर त्याहुन अवघड वाटते मला कारण तिथे शब्दांची मर्यादा आली , मोजक्या शब्दात , पात्रं , प्रसंग संवाद लिहुन कथाबीज वाचका पर्यंत पोहचवणे जास्त जास्त अवघड आहे मला वाटते .
बालकथा हा माझ्या वैयक्तिक आवाक्या बाहेरील प्रकार आहे हे मला नुकतेच उमगले आहे , लहान पोरांना काय आवडेल अन काय नाही ह्याचा नेम नाही

ह्या विषयावर मिपाकरांचे काय विचार आहेत ? मिपावर कथा लेखन करणारे कशी लिहितात कथा ?

( अवांतर : चर्चा अपेक्षित असल्याने हे लेखन काथ्यकुट मधे टाकले आहे. )

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

18 Nov 2014 - 5:24 pm | आदूबाळ

जबरी धागा. मीही हे समजून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे.

मला गिर्जा हे कधी विचारत्ये त्याची वाट बघतोय, मगच उत्तर देईन ;)

प्रगो. जिमोंच्या कथा अभ्यासा जरा.
इकडे कोणीतरी मराठी कथालेखक नावाच्या आयडीने काही सम्पूर्ण कथा लिहिल्या आहेत त्याही अभ्यासा.
खूप ज्ञान मिळेल

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2014 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले

=))
जिमोंच्या कथा अन मराठी कथा लेखकांच्या परपीडनकथांचा मी पंखा आहेच ( तसे पाहिले तर मचाककथाही सुंदरच असतात ;))
... पण गिरिजाला ह्या असल्या कथा थर्ड क्लास वाटतात , आणि माझ्या अंदाजे बर्‍याचश्या लोकांनाही तसेच वाटत असेल

प्रश्न आहे की "खर्‍या अर्थाने चांगली" कथा कशी लिहिता येईल ? मी स्वतंत्रपणे उत्तर शोधायला घेतलेच आहे , परवाच वेताळ पंचविशी वाचायला घेतली आहे , बघुया काही सापडते का ?

बाकी विजुभाऊ , तुमचे काय मत आहे ते सांगा ना ... तुम्हाला कशा कथा आवडतात ?

हाडक्या's picture

19 Nov 2014 - 8:28 pm | हाडक्या

... पण गिरिजाला ह्या असल्या कथा थर्ड क्लास वाटतात , आणि माझ्या अंदाजे बर्‍याचश्या लोकांनाही तसेच वाटत असेल

तुमचा गिरिजा हा आयडी होता हे आठवून विचारतोय, गिरिजा नावाची कोणी व्यक्ती तुमची संबंधित आहे का ?
(तसे असेल तर उर्वरित प्रतिसाद रद्दबादल!)

तसे नसेल तर मात्र प्रश्न असाय की गिरिजा हीच माई असून तुम्ही माईंचे 'हे' आहात ?? ;)

(कृ. ह. घ्या. )

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 8:32 pm | प्रसाद गोडबोले

गिरिजा नावाची कोणी व्यक्ती तुमची संबंधित आहे का ?

>>>
अशा गोष्टी व्यनिंतुन विचारायच्या असतात ;)

जेपी's picture

18 Nov 2014 - 5:39 pm | जेपी

स्वत:चे आनुभव वापरा.

(डोक्यात चार कथा आसुन टायपाला वेळ न मिळणारा) जेपी

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2014 - 6:07 pm | प्रभाकर पेठकर

कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसावा.

ललीत लेखनात घटना जशी जशी घडते किंवा उलगडत जाते तशी कच्ची मी लिहीत जातो. दुसर्‍यावाचनात थोडेफार नाट्यमय किंवा/आणि अलंकारीक बदल मुळ कथानकाला धक्का न लावता करतो. आणि कथेवरून शेवटचा हात फिरवतो. ह्या वेळी कांही बदल करण्याची गरज नसते. वाटलीच गरज तर किंचित इकडे-तिकडे करावे लागते. हा अनुभव आहे.

माहितीपूर्ण किंवा प्रवासवर्णन त्या मानाने सोपे असते. तिथे कल्पनेचा खेळ कमी आणि वास्तवाची मांडणी अधिक असते. माहितीपूर्ण लेखनात जी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवायाची आहे त्यात वाचकाचा रस टिकून राहणे महत्त्वाचे असते. प्रवासवर्णनात तुमची संवेदनशिलता आणि शब्दसंचय फार महत्त्वाचा. सुंदर सुंदर पर्यटनस्थळांचे वर्णन करताना सुंदर सुंदर शब्द (आणि अर्थात छायाचित्र) वाचकाच्या नजरेसमोर ते विलोभनिय दृश्य उभे करतं.

सर्वात शेवटी, लेखकाच्या दृष्टीकोनातून/कल्पनेतून कथा आकाराला आली की वाचकाच्या दृष्टीकोनातून एकदा वाचून पाहावी. कुठे अडखळायला झाले तर साफसफाई करून टाकावी.

ही माझी पद्धत आहे. हेच अंतिम सत्य आहे असा माझा अजिबात दावा नाही.

खटपट्या's picture

19 Nov 2014 - 12:13 am | खटपट्या

इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. - जेव्हा तुम्हाला काही सुचतं तेव्हा ते तुम्ही कागदावर उतरवता की सरळ टंकायला घेता ?
माझा टंकायचा वेग कमी असल्यामुळे मी जे काही सुचतं ते कागदावर झरझर उतरवून घेतो आणि मग सावकाश टंकतो.

बाकीच्यांचे अनुभव काय आहेत ?

(मी काही कोणी लेखक नाही. पण मीपाकर काय करतात ते जाणून घ्यायचे आहे.)

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2014 - 2:02 am | प्रभाकर पेठकर

ललित लेखन मी थेट मिसळपावावर लिहायला घेतो. एका बैठकीत होणारं नसेल (तसे होत नाहिच) तर नोटपॅडवर कॉपीपेस्ट करून ठेवतो. बाकी पायर्‍या वर दिल्या आहेतच.
प्रवासवर्णनं आधी कच्ची लिहून काढतो. त्यात कुठली छायाचित्र कुठे टाकायची हेही लिहून ठेवतो. सर्व लिहून झालं की टंकायला घेतो.
ह्याला कांही खास नियम नाहीये. नसतोच. तुम्हाला जे सोयीचे होईल त्याप्रमाणे करावे.

कागदावर लिहिण्यापेक्षा पीसीवर टंकलेले बरे पडते. गूगल IME मधून फास्ट टंकता येते.

मराठी अक्षरे{देवनागरी कळफलक} दणकून मराठी लिहिण्यातला आनंद आणखी वाढतो.

सिरुसेरि's picture

18 Nov 2014 - 6:12 pm | सिरुसेरि

पण या गिरिजा कोण ? त्या कोणी कथा समिक्षक आहेत का ? साप्ताहीक सकाळचे कथा विशेषांक प्रकाशित होतात . त्यामधील कथाही वाचनीय असतात .

गिरीजा बर्याच काही आहेत.येत जा .कळत राहील.

स्पंदना's picture

19 Nov 2014 - 4:45 pm | स्पंदना

गिर्जा काकू आणि प्रगो हे एकातम्मतेचे, अद्वैत्याचे हुदाहरण आहे. ते हृदयाला भावते, मनाला चावते आणि आकाशाला खुल्लेआम भिडते!!
:))))

या विषयावरचे मी वाचलेले उत्तम पुस्तक
अज्ञाताचा शोध - श्री. ना. पेंडसे
त्यात त्यांनी कादंबरी कशी असावी, काय घटकांचा विचार करावा, कथाबीज कसे फुलवावे वगैरे सोदाहरण (स्वत:च्या आणि क्वचित ठिकाणी दुसर्‍यांच्या) स्पष्ट केले आहे.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

18 Nov 2014 - 6:32 pm | चंद्रनील मुल्हेरकर

मराठी लेखक, अगदी पु लं पासुन सगळे पाश्चिमात्य लेखकांची शैली उचलतात, एका प्रसिद्ध ब्रिटीश विनोदी कथालेखकाला पुलं कॉपी करायचे म्हणे, त्या लेखकाचे नाव आठवत नाही ,जाणकारांनी उजेड पाडावा.

कथा लिहितानाची बरीच वेगवेगळी तंत्रे आहेत.
रत्नाकर मतकरी हे बरेचदा "ट्विस्ट इन द टेल " प्रकारचे लिहितात.
शंकर पाटील , द मा मिरासदार हे सुद्धा ट्विस्ट इन द टेल तंत्र वापरतात.
वपु काळे हे ट्विस्ट इन द टेल थोड्या वेगळ्या पद्धतीने तंत्र वापरतात.
मात्र वरील सगळे लेखक कथेत अखेरपर्यन्त रम्जकता राहील कथेचा ओघ प्रवाही राहील आणि शेवट काय होणार याची उत्सुकता वाचकाला अखेरपर्यन्त राहील याची काळजी घेत.
मिलिंद बोकील , ह मो मराठे हे कथेत उगाच पाल्हाळीक न येता कथेत वर्तमानाचे भान अखेरपर्यन्त राहील याची दक्षता घेतात.

प्रसाद१९७१'s picture

19 Nov 2014 - 5:19 pm | प्रसाद१९७१

मिलिंद बोकील कीती पाल्हाळ लावतात ते "गवत्या" वाचा म्हणजे कळेल.

ह्.मो. फारच छान लिहीतात.

मतकरींचा ट्विस्ट काय असेल ते त्यांच्या थोड्या कथा वाचल्या की कळायला लागते. खुप लिखाण पाडले की असे होते.

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 8:20 pm | प्यारे१

प्रसादराव प्रॉपर कुठले हो तुम्ही?
नै म्हणजे सुरवातीपासूनच की नंतर डेव्हलपमेण्ट झाली असा प्रश्न पडलेला म्हणून.
(हलकं घ्याल अशी अपेक्षा नाही ;) )

विजुभाऊ's picture

22 Nov 2014 - 2:56 pm | विजुभाऊ

@प्यारे
प्रसादराव हे प्रॉपर छत्रपतिंच्या प्रॉपर राजधानीचे आहेत. तेही वरच्या शनिवार पेठेतले

मी प्रगो बद्द्ल नाही विचारलं हो विजुभौ, मी प्रसाद१९७१ वाल्यांना विचारलेलं. ;)

एकाच चेहर्‍याचे सगळे मुखवटे आणि काय हो.. ;)

एका प्रसिद्ध ब्रिटीश विनोदी कथालेखकाला पुलं कॉपी करायचे म्हणे, त्या लेखकाचे नाव आठवत नाही ,जाणकारांनी उजेड पाडावा.
पुलं नी कथा लिहील्या नाहीत. त्यांच्या लिखाणावर वुडहाऊस चा प्रभाव आहे पण त्यापेक्षाही जास्त प्रभाव चिंवि जोशी आनि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या शैलीचा आहे

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2014 - 5:44 pm | बोका-ए-आझम

कथा म्हणावी अशी पु.लं.नी एकच लिहिली - म्हैस आणि ती अप्रतिम आहे. बाकी पु.लं.नी कुठल्यातरी ब्रिटिश लेखकाची शैली उचलली असं बेधडक म्हणणं आणि त्या लेखकाचं सोयिस्कररीत्या नाव न लिहिणं आणि नंतर त्याच्यावर जाणकारांना उजेड पाडायला सांगणं याने मस्त करमणूक झाली. उत्तम लेखक हा बरेचदा इतर लेखकांचे लिखाण वाचून, त्याने प्रभावित होऊन स्वतःचं लिखाण सुरु करतो. त्यामुळे असा कोणाचातरी प्रभाव असणारच. लेखकाला स्वतःची शैली सापडायलाही वेळ लागू शकतो. त्यामुळे लगेच नक्कल करण्याचा आरोप करणे हा मूर्खपणा आहे.
अवांतर - ही माझ्या वडलांच्या शैलीची नक्कल आहे ;)

बॅटमॅन's picture

21 Nov 2014 - 5:52 pm | बॅटमॅन

शांता शेळके अन गदिमा यांच्यातील खालील संवाद आठवला.

शांता शेळके: तुमच्या गीतांना मधाचा गोडवा आहे.
गदिमा: (कौतुकाने सुखावल्याची स्मायली)
शांता शेळके: कुठल्या फुलातून अन किती प्रमाणात वेचलाय ते कळत नाही, पण तयार होणारा मध मात्र गोड.
गदिमा: मंचरकरीण!!!! (थोडेसे मजेत दटावणे इ.इ.)

तर असं आहे पुलंचं. किंबहुना प्रत्येकाचं असंच असतं, फक्त तयार होणारं मिश्रण सर्व केसेसमध्ये तितकं थोर नसतं इतकंच.

कंजूस's picture

18 Nov 2014 - 7:17 pm | कंजूस

सर्वात प्रथम धन्यवाद हा सोनटक्काछाप मंदमंद सुवासाचा धागा काढल्याबद्दल. इथे सर्वाँनाच वाव आहे. दोन तीन दिवसांत शंभरी गाठणार नाही. परंतू हळूहळू संग्राह्य होत जाईल पुस्तकात ठेवलेल्या सोनटक्क्याच्या फुलासारखा.

पेठकरांचे विचार पटले. कथेच्या लिंक्स देणार का ?
चांगल्या कथेतले मुख्य पात्र 'आता पुढे काय करणार?'ची उत्सुकता शेवटपर्यँत टिकवून ठेवते. कधीकधी घटनांची गुंतागुंत आणि त्यात गुरफणारी पात्रे असतात. काही कथांत पात्राच्या मनाचा थांगपत्ता लागला आहे, तळ गाठला आहे असे वाटतानाच अचानक छे छे असं नाही हे पुढे येते (रविंद्रनाथ जीए).काहीवेळा आपण कथेच्या वातावरणात डुंबत असतो आणि अचानक लेखक हाक देतो वाचकहो!(पेंडसे). वयानुरूप काही कथा/कादंबऱ्या आवडतात (गुलशन नंदा). आपली कथा मनाने लिहावी. तुलनात्मक विचारांचे ओझे न बाळगता उतरवावी नक्कीच आवडेल.
गिरिजा हे एक काल्पनिक वाचक पात्र प्रत्येक लेखकाच्या मनात असतेच.

पैसा's picture

19 Nov 2014 - 12:33 am | पैसा

चांगली कथा एका दमात वाचावीशी वाटली पाहिजे.

कथा लिहीत नसल्यामुळे तंत्राबद्दल काही सांगू शकणार नाही. मात्र कथा लेखनाच्या तंत्राच्या आहारी गेलेल्या काही लोकांच्या कथा शेवट निर्जीव वाटायला लागतात. तेव्हा ते टाळावे.

इतर जे काही थोडंफार लिहिते, ते थेट टाईप करते. नेहमीच एकदा लिहायला सुरवात केली की संपवल्याशिवाय थांबत नाही. मुळात सुरुवात करतानाच अगदी लिहिलंच पाहिजे असं वाटल्याशिवाय लिहीत नाही. त्यामुळे डोक्यात लिखाण उमटत जातं ते बहुतेकदा फायनल असतं. शुद्धलेखन वगळता त्यात काही बदल क्वचितच असतात. निबंध स्पर्धांमधे बरेचदा भाग घेतल्यामुळे ही सवय लागली असावी कदाचित.

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2014 - 2:26 am | पिवळा डांबिस

सर्वच प्रतिसादाशी सहमत.
चांगली कथा असो वा अन्य लिखाण, 'वाचनीयता' हा गुण त्यात असला पाहिजे. अजून किती बाकी उरलंय असं वाचकाला बघावंसं वाटता कामा नये.
दुसरं म्हणजे कथानकाची गती आणि वातावरणनिर्मीती यांतला समतोल साधला गेला पाहिजे. वातावरणनिर्मीतीच्या नादात कथानक रेंगाळता कामा नये. पण त्याचबरोबर कथानकाच्या गतीमूळे वाचकाला वातावरणाचा आस्वाद घेण्यासठी पुरेसे क्षण न देता कथानकाबरोबर फरफटतही नेता कामा नये.
कठीण आहे ते सगळं सांभाळणं.
म्हणूनच मी फारशा कथा लिहीत नाही!
:)

जयंत कुलकर्णी's picture

19 Nov 2014 - 12:26 pm | जयंत कुलकर्णी

आणि एकदम संपली असेही व्हायला नको....

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2014 - 7:24 pm | बोका-ए-आझम

यावरून साॅमरसेट माॅमची एक आख्यायिका आहे. एकदा माॅम याच विषयावर एक व्याख्यान देत होता तेव्हा तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - Aristocracy, Spirituality, Sex and Suspense.
तेव्हा एक मुलगी उभी राहिली अन् म्हणाली की हे सगळं वापरून तिने आत्ता एक कथा लिहिलेली आहे.
माॅमसकट सगळ्यांनी तिला आग्रह केला तेव्हा तिने ही कथा वाचून दाखवली -
एकदा एक राजकन्या (Aristocracy आली)
देवाला म्हणाली, " हे भगवान् " (Spirituality आली)
मी गरोदर आहे (Sex आला)
पण मला या मुलाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (Suspense आला.)

याला कथा म्हणायचं का?

बोबो's picture

22 Nov 2014 - 4:05 am | बोबो

मस्तै चर्चा. वाचतोय…

मुक्त विहारि's picture

22 Nov 2014 - 4:38 am | मुक्त विहारि

मनांत आले की लिहायला सुरुवात करायची.

हाकानाका....

प्रसाद गोडबोले's picture

22 Nov 2014 - 11:32 am | प्रसाद गोडबोले

इतकं सोप्पं नाहीये ना मुवी

म्हणुनतर धागा काढला , आता इथल्या काही आयडी वापरुन बरेच दिवस रेंगाललेली गोष्ट पुर्ण करावी असा मानस आहे ...बघुया कसे काय जमते ते !!

प्रसाद गोडबोले's picture

22 Nov 2014 - 11:32 am | प्रसाद गोडबोले

आयडी = आयडीया

सस्नेह's picture

22 Nov 2014 - 2:18 pm | सस्नेह

नक्की 'या' ना ?