न वढलेली बिडी अन खाल्लेला मार 3

Vijay Shankar Mane's picture
Vijay Shankar Mane in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 11:14 am

उग डोक्याला ताप हून बसला हुता .तवर माग पाटलाचा पांडूतात्या वाकून बगत म्हणाला काय करताय र ! माझ्या हातातली बिडी बगून मला म्हणाल का र तू खालच्या आळीच्या शंकरचाका ! आम्ही तिकडून धूम ठोकली मी पक्याला म्हणल आतार हा लाम्बडा पांडू तात्या नक्की आजाला सांगणार मग आयचं फटक काय चुकत नाहीत सांच्याला ..........
मी पक्याला चिडून बोललु हे सगळ तुझ्यामुळ झाल ...पक्या गुळ मुळीत म्हणाला काय नाय होत्रे चल इनामात जाऊ .....माझी डोळ्यात वड्यातल डोक्री मास वळ वळायला लागल आन माझ हात शिवशिवायला लागल सांच सांच्याला बगू म्हणून आमि सगळी निगालु इनामात जायला !
वड्याची धार आटली होती पण खड्यात पाणी साटल्याल हुत आन त्यच्या वरच हिरीच इजन लावायचं प्लानिंग हुत सगळ्यांनी मिळून फुटबाल बहिर काढला आन इंज्नाचा गाडा वडीत खाली आणला फुटबाल पाण्यात सोडला आन गणपान हंडील मारून तेला सुरु केल सगळी पोर आता काठावर्ण पाणी कमी हुयाची वाट बघत हुती मी तर पैरण कडून हाताला गुंडाळलि होती .
पयल खेकड्याच बीळ दिसल आन मी पाण्यात उडी टाकली आन खास दिशि बिळात हात घातला हाताला चीक्लात्न वळवळताना लागल जोरात मुटीत पकडल आन पक्या…….. बग वाम हाय बहुतेक…! म्हणून टाकल तर खरच वाम निघाली सगळी पोर तिच्या माग लागली मारायला तवर हन्मा गण्या आन दिल्या पन पाण्यात उतरला आन सगळी पाणी ढवलायला लागली जस पाणी खडळायला लागल तस मास तोंड पाण्या बहिर काढाय लागली .
बाकी सगळी काठावर गेली हुती मी पाण्यातच होतो मला पाणी जर खाली झाल्यावर दुसर यक बीळ दिसल मी हळूच वाकून हात घातला हाताला काई तरी वळवळाल मी घट मुटीत धरल आन हनम्या वाम म्हणून टाकल आन वर बगितल तवर हनम्या बगयाच्या आदीच गोनी फेकली राड्यात आन फूड गेला त्यव होता मोठा इरुळा आन त्यव नेमका पक्याच्या पायात पक्या ठू बोम्बलला साप साप म्हणून लय मजा येत हुती माप मास मिळाल .सगळी मिळून इंजन हिरीवर जस हुत तस लावल आन मास धुयाला सुरवात केली तवर संग्ल्यांच्या भक्रिवर्लि त्याल चटणी सत्या न गोळा किली पद्यान दिल्यान तीन दगड ठीउन जाळ पिटीवला पण भगुन न्हवत म्हणून लाल्याच्या वावरातल्या भूज्गाव्ण्याच्या डोस्क्यावारच मडक सत्या घिउन आला आन मसाला लाऊन मास मस्त वाफवायला ठेवल भन्नाट वास सुटला हुता मस्त खोबर्याच्या ( आंब्याच नाव ) झाडाकाली सावलीला सगळी पंगत बसली पोटाला तडस लागस्तावर मास हाणल आन सगळी लोळत पडलु .
उन खाली झाल्यावर सगळ्यांनी कापड काढली आन हिरीत कठड्यावर्ण धडा धडा उद्या टाकल्या आन पकडा पकडीचा खेळ सुरु झाला .
बराच येळ खेळत हुतु . मग सगळे मस्ती करत मसानवाटयातन गावात निघालू सकाळच रामायण डोक्यातन निगुन गेल हुत !

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

धडपड्या's picture

17 Nov 2014 - 12:35 pm | धडपड्या

शुद्धलेखनाची अपेक्षा नाही, परंतु किमान विरामचिन्हे तरी वापरावीत... वाक्ये वाचताना बरीच कसरत होतेय...

Vijay Shankar Mane's picture

17 Nov 2014 - 3:36 pm | Vijay Shankar Mane

नोंद घेतली आहे !

आमाला तर वाचला कायच पिरोब्लेम आला न्हायी बा ; आमि बी हेच केल तेवड बिडीच परकर्न सोडून ; तेवड जमल न्हाई बगा