अन-आन्स्वर्ड (?)

ससन्दीप's picture
ससन्दीप in काथ्याकूट
17 Nov 2014 - 12:31 am
गाभा: 

काल सकाळचांच अनुभव, चेन्नई एयरपोर्टला सुरुवातीच्या मुख्य गेट जवळ चेक-इन करते वेळी जमीनीवर ५०० रुपयांचे ४-६ नोटांचे एक बंडल सापडले.
रांगेमध्ये आमच्या पुढे दोन ते तीन प्रवासी होते (इन्क्लुडिंग एक जेपनीस) त्यामुळे साहजिकच क्षणाचाही विलंब न करता आम्ही (मी आणि माझी पत्नी) त्यांच्या जवळ विचारणा केली. पुढे असलेल्या जेपनीस माणसाने प्रामाणिकपणे ते पैशे त्याचे नाही असे सांगितले. (इथे तो नाही म्हणाला म्हणून नव्हे तर आधी कुठे तरी वाचनात आले होते की ते लोक खूप प्रामाणिक असतात) त्याच्या पुढे असलेल्या प्रवाशांची प्रतिक्रिया पण तशीच काहीतरी होती. आम्ही ही गोष्ट तिथूनच ५ ते ६ फुटांवर असलेल्या तिकीट चेक करत असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आणून दिली. त्याने ते पैशांचे बंडल (टोटल किती पैशे आहेत ते न मोजता) स्वतःच्या खिशामध्ये टाकले आणी आम्हाला खूणेनेच मी बघून घेतो चा इशारा दिला आणि आत मध्ये सोडले.
इथेच काहीतरी चुकीचे झाले असल्याची भावना आम्हा दोघांना झाली. लगेच आणि लगेज चेक-इन झाल्यावर आम्ही तिथल्या अजून एका अधिकाऱ्याला ही गोष्ट सांगितली. कदाचित तो हे speaker वर अनोन्स करेल असे आम्हाला वाटले, त्याने पण फक्त 'don't worry' ची प्रतिक्रीया दिली. आम्हाला पुन्हा एकदा आपण फसले गेलो असल्याची 'फीलिंग्स' झाली.

थोडक्यात 'अन-आन्स्वर्ड' हे शीषर्क द्यायची कारणे ही होती की
१) आम्ही खरेच फसले गेले होतो का?
२) पण हरवलेले पैशे तर आमचे नव्हते, मग आमच्या जीवाला का चूट-चूट लागावी?
३) कदाचित त्या जेपनीस माणसावर 'आपण हिंदुस्तानी प्रामाणिक असल्याचे' एक चांगले इम्प्रेशन पडले असेल का?
४) पण त्या पोलिसाचे काय? तोही तर हिंदुस्तानी होता..
५) तो अधिकारी त्या पोलीसाजवळ स्वतःचा 'कट' मागेल का?
६) त्या पोलिसाने माझ्या प्रामाणिकपण बद्दल बक्शीस म्हणून मला एखादी नोट दिली असती तर?
७) तो 'जेपनीस' मनुष्य जेपनीसच किंवा 'चायनीज अथवा कोरियन' होता की आपला नॉर्थ-इस्ट इंडियन बंधू ?
८) जर त्यांनी मला ते पैशे उचलताना बघितले नसते तर.. किंवा माझ्या पुढे अजुन कोणी नसते तर मी काय करायला पाहिजे होते?
९) Sri Tirumala Balaji आमची परिक्षा घेत होते का?

टीप: हा माझा इथे पहिलाच लेख/ अनुभव असल्या कारणाने मी अद्याप एखाद्या 'फेन्सी' स्वाक्षरी चा विचार केलेला नाही. तसेच व्याकरणात जर काही चुका आढळल्यास त्या मनामध्येच सुधारवून घ्याव्यात.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

17 Nov 2014 - 12:51 am | खटपट्या

मिपावर स्वागत !!
दोन दिवसांनी परत चौकशी करा काय झाले त्या पैशाचे !!

मुक्त विहारि's picture

17 Nov 2014 - 3:16 am | मुक्त विहारि

माझ्या बुद्धीला अनुसरून उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो...

१) आम्ही खरेच फसले गेले होतो का? ---> झाले गेले गंगेला मिळाले.तुमचे पैसे न्ह्वते ना? मग झाले.

२) पण हरवलेले पैशे तर आमचे नव्हते, मग आमच्या जीवाला का चूट-चूट लागावी? ---> सुसंस्कार

३) कदाचित त्या जेपनीस माणसावर 'आपण हिंदुस्तानी प्रामाणिक असल्याचे' एक चांगले इम्प्रेशन पडले असेल का? ---> अजिबात नाही. जापनीज आणि जर्मन माणसे, आपल्यासारखी खुळे नसतात.केवळ शीतावरून भाताची परीक्षा होत नसते.विशेषतः माणसांच्या बाबतीत.

४) पण त्या पोलिसाचे काय? तोही तर हिंदुस्तानी होता. ---> आता ह्याचे उत्तर काय देणार?

५) तो अधिकारी त्या पोलीसाजवळ स्वतःचा 'कट' मागेल का? ---> आपल्याला काय करायचे आहे?

६) त्या पोलिसाने माझ्या प्रामाणिकपण बद्दल बक्शीस म्हणून मला एखादी नोट दिली असती तर? ----> तुम्हाला अद्याप असे वाटत आहे?

७) तो 'जेपनीस' मनुष्य जेपनीसच किंवा 'चायनीज अथवा कोरियन' होता की आपला नॉर्थ-इस्ट इंडियन बंधू? --> बैल गेला अन झोपा केला.अहो, त्यांनाच विचारायचे ना?

८) जर त्यांनी मला ते पैशे उचलताना बघितले नसते तर.. किंवा माझ्या पुढे अजुन कोणी नसते तर मी काय करायला पाहिजे होते?--->बिंधास्त उचलायचे आणि अनाथाश्रमात दान द्यायचे.

९) Sri Tirumala Balaji आमची परिक्षा घेत होते का? ---> सध्या ते मिपाकरांचीच परीक्षा घेण्यात गुंतले आहेत.त्यातुन सुटले की मग कदाचित त्यांना विचार करायला वेळ मिळेल असे मला वाटत आहे.

आता आमचा एक प्रश्र्न धागाकर्त्यांना....

१) तुम्ही असेच संवेदनशील आहात का?

(सध्या आम्ही पहिलाच धागा काढणार्‍यांना, सपोर्ट करायचे ठरवले आहे.नाही तर ह्या ९ प्रश्र्नांबरोबर मस्त खेळता आले असते.)

ससन्दीप's picture

17 Nov 2014 - 8:19 am | ससन्दीप

मुक्त विहारि,
तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर 'हो' आहे.
आणि, तुम्ही त्या ९ प्रश्र्नांबरोबर मस्त न खेळल्याबद्दल (अथवा त्यांची जास्त चिरफाड न केल्याबद्दल) मी आपला आभारी आहे.

मुक्त विहारि's picture

17 Nov 2014 - 10:15 am | मुक्त विहारि

धन्यवाद

जॅपनीज होय! मला जेपनीस म्हणजे काय कळेना. असो.
हे असलं काही बघितल्यावर डोक्यात नको ते किडे वळवळतात. असेच एकदा मुंबै एयरपोर्टावर एक पडलेला पासपोर्ट तेथील पुरुष कर्मचार्‍याला उचलून आणून दिला होता. त्याने तो घेतला व त्याच्या साथीदाराबरोबर बोलणे पुन्हा चालू केले. मला माझे काम झाल्यावर अर्थातच तिथे रेंगाळायचे नव्हते पण सामान वाहिका वळवून, नवरा व मुलगा आता कुठे आहेत हे बघण्यासाठी जे काही सेकंद तिथे होते त्यात तो कर्मचारी दुसर्‍याला सांगत होता की अमकी तमकी स्त्री कर्मचारी आज हॉट दिसतिये आणि ती आपल्याकडेच चालत येतिये. आज हिला नाही झोपायला लावलं तर नाव बदलेन! पोटात ढवळून आलं. उगीच त्या म्हसोबाला पासपोर्ट दिला असे झाले. जाताजाता त्या मुलीकडे नजर गेलीच. डोळ्यात जे भाव होते त्याहून दुसरी वेदना अपेक्षित नव्हती. किती ताण होता तिला! या गोष्टीला कितीतरी वर्षे झाली पण हे असलं काही आठवतच! फुल्या फुल्या त्या मनुष्याच्या नावानं.......अजून जिवंत असलाच तर!

वेल्लाभट's picture

17 Nov 2014 - 12:17 pm | वेल्लाभट

हार्श रियॅलिटी. हार्शर दॅन वी थिंक.
व्हॉट गोज अराउंड, कम्स अराउंड. त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्यावाचून रहाणार नाही. तो योग्य अर्थी 'झोपेल' कधीतरी. किंवा ती वेळ या आधीच आलेली असेल. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2014 - 6:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसे सापडले होते ना. घ्यायचे अन पुढे जायचे होते.
ते तुम्हाला न मिळाल्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला होतोय. बस.

बाकी, मिपावर स्वागत आहे, येत जा, लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

ससन्दीप's picture

17 Nov 2014 - 8:26 am | ससन्दीप

डॉक्टर, त्रास या गोष्टीचा होतोय की ते ज्याचे आहेत त्याला न मिळता, चुकीच्या माणसाकडे गेले.
आणि मला यासाठी काही करता नाही आले.

पगला गजोधर's picture

17 Nov 2014 - 9:36 am | पगला गजोधर

नोट - नोट पे लिखा होता हैं, उसे खर्चनेवालेका नाम, लेनेवले करोड
देनेवाला ( तेरे जैसा ) ईक राम.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Nov 2014 - 9:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे ससन्दीपा, भारतात एकदा हातातून पैसे सुटले व तेही सरकारी अधिकार्यांच्या हातात गेले, त्यातही पोलिसांच्या,की ते गेलेच म्हणून समज.ह्यापुढे कधी परत मिळाले तर बाजूला जेपनीस उभा आहे की सबनीस उभा आहे ह्याच्या विचार न करता खिशात टाक् व दान करून टाक.

ससन्दीप's picture

17 Nov 2014 - 10:26 am | ससन्दीप

हो नक्कीच

तुम्ही नवभारतीय का नवएनाराय ?

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2014 - 12:18 pm | टवाळ कार्टा

ससनदीप...छान केलेत :)

वेल्लाभट's picture

17 Nov 2014 - 12:21 pm | वेल्लाभट

फार प्रश्न पाडून घेऊ नका हो. केलंत ना तेंव्हा योग्य वाटलं ते...? बास. संपलं. आता तुमच्या हातात काही नाही. पुन्हा असा अनुभव येईल तेंव्हाही तेंव्हा जे योग्य वाटत असेल तेच करा आणि विसरा.

पिवळा डांबिस's picture

17 Nov 2014 - 12:35 pm | पिवळा डांबिस

तुम्हाला पैसे सापडले. तुमच्यापुढे तीन पर्याय होते....
१. स्वतःच्या खिशात घालायचे.
पण मग तुम्ही असा धागा काढायला इथे आला नसतात.
२. ते पोलीस, विमान कंपनी कर्मचारी यांच्या ताब्यात द्यायचे
मग इदं न मम! त्या पैशांचं पुढं काय होतं याच्याशी तुमचा संबंध नाही...
३. ते पैसे खरोखरीच त्यांच्या खर्‍या मालकाकडे जातायत का याची खूपच चाड असती तर
तुम्ही त्या पोलिसाच्या शेजारी उभां राहून तो ते पैसे इतरांना हरवलेत का असं विचारतोय का याची (प्रसंगी आपली फ्लाईट सोडून) खात्री केली असतीत!!!

मला माहिती आहे की पर्याय #३ हा इमप्रॅक्टिकल आहे, मी तुमच्या जागी असतो तर तुम्ही स्वीकारलेला पर्याय #२च स्वीकारला असता.
पण म्हणूनच तुम्ही इथे प्रस्तुत केलेले सर्व प्रश्न निरूपयोगी ठरतात!!!
तात्पर्य: आपण जर पराकोटीची समाजसेवा न करता जर यथाशक्ती समाजसेवा करणार असू तर इतर घटकांकडून पराकोटीच्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

तुमच्या तात्पर्याचा अर्थ: मला क्रिकेट खेळता येत नाही तर मी आपल्या इंडियन टीम कडून सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा करु नये? यातला 'इतर घटक' हा आपल्या प्रमाणे सामान्य नसून पराकोटीच्या समाजसेवेसाठीच नेमलेला आहे.
तसे जर नसते तर मी खरंच असा धागा काढायला इथे आलो नसतो.

पिवळा डांबिस's picture

17 Nov 2014 - 1:18 pm | पिवळा डांबिस

मला क्रिकेट खेळता येत नाही तर मी आपल्या इंडियन टीम कडून सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा करु नये?

अपेक्षा जरूर करावी पण अपेक्षाभंग झाल्यास (आणि तो इंडियन टीम बर्‍याचदा करते) त्रागा करू नये. इतकंच.

यातला 'इतर घटक' हा आपल्या प्रमाणे सामान्य नसून पराकोटीच्या समाजसेवेसाठीच नेमलेला आहे.

चूक. आता हे चूक का ते लिहीत बसत नाही. पण विचार केल्यास तुम्हाला हे नक्की उमजेल अशी आशा.

इथे तुम्हाला असे म्हणायचे आहे की समाजसेवा ही नेहमीच यथाशक्ती न होता पराकोटीचीच असली पाहिजे?

माझ्याकडे कसलीही जबाबदारी न घेता:

जर आपल्याला ती वस्तू सापडली असेल, तर तिच्या खर्‍या मालकाशिवाय इतर कुणालाही ती आपल्या ताब्यातून काढून घ्यायचा हक्क नाही. आपली परीस्थिती "बेली Bailee" सारखी असेल.

अधिक माहितीसाठी "Finder of Lost Goods: Indian Contract Act" तपासावा.

जर आपल्याला ती वस्तू सापडली असेल, तर तिच्या खर्‍या मालकाशिवाय इतर कुणालाही ती आपल्या ताब्यातून काढून घ्यायचा हक्क नाही.
घराचा पाया खणताना सोन्याचा हंडा सापडला तरी? सरकारला पण नाही?

मी काही वकील नाही, पण माझ्या मते गुप्त धनाची मालकीच सरकारकडे असते. अशा वेळी खर्‍या मालकाला परत देणे म्हणजेच सरकारला देणे असे होइल,

परत एकदा, माझ्याकडे कसलीही जबाबदारी नाही.

यसवायजी's picture

17 Nov 2014 - 2:17 pm | यसवायजी

पण माझ्या मते गुप्त धनाची मालकीच सरकारकडे असते.
म्हणूनच विचारले. असो. जबाबदारीचं टेन्शन घेऊ नका. मला कुठला हंडा सापडतोय? ;)

असंका's picture

17 Nov 2014 - 2:45 pm | असंका

:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2014 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला कुठला हंडा सापडतोय? निराश होऊ नका "पुरुषस्य भाग्यम्" सांगून येत नाही ;) :)

ससन्दीप's picture

17 Nov 2014 - 1:48 pm | ससन्दीप

काहीतरी नवीन माहिती आहे, पण bouncer जातेय

कॅश ही गुड्स आहे की नाही, हे मला नक्की माहित नाही, त्यामुळे मी अधिक काही लिहिले नाही. पण जर हा कायदा वापरला नाही, तर इतर कुठला कायदा इथे लागू करणार? त्यामुळे माझ्या मते तरी कॅश आपल्या ताब्यात ठेवायचा आपल्याला पूर्ण हक्क होता. खर्‍या मालकाला शोधून त्याला त्याची कॅश परत द्यायची अशा वेळी आपल्यावर जबाबदारी आली असती. असे करताना (मूळ मालकाला शोधून त्याला त्याची रक्कम परत देताना) झालेल्या खर्चाची परतफेड मागायचाही आपल्याला हक्क होता.

पण आता काय त्याचे? नुसतेच थिओरेटीकल डिस्कशन! असो, पुन्हा केव्हा तरी येइल कामाला....

डिस्क्लेमर : माहितीसाठी. मी कसलीही जबाबदारी स्विकारलेली नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Nov 2014 - 6:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

धागा अगदी अस्सल मराठी हो.अगदी काथाकूट!! हे म्हणतात-
१) गुजराती-मारवाडी संस्थळावर असा धागा कुणी टाकलाच नसता.
२) सिंधी संस्थळावर सगल्यांच्या प्रतिक्रिया "वेडाच दिसतोय' अशा आल्या असत्या किंवा "मला दे पैसे ,मी तो व्यवस्थित पोचवतो" अशा आल्या असत्या.
३)पंजाबी संस्थळावर- 'अर्ध्या पैशाची दारू प्यायची,बाकीच्या अर्ध्याची बायकोला साडी घ्यायची' अशा आल्या असत्या.

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2014 - 7:42 pm | दिपक.कुवेत

बास.... म्हणजे ह्यातच तुमच्यात अजून माणूसकि / प्रामाणीकपणा शील्लक आहे ह्याचा हा ढळढळीत पुरावा आहे.

चलत मुसाफिर's picture

17 Nov 2014 - 10:32 pm | चलत मुसाफिर

अशी अनपेक्षित धनप्राप्ती झाली, कुणी हक्क सांगणारा आला नाही, सरकारजमा करण्याची मुभा (वरील कथेत सांगितल्या कारणामुळे) नसेल, आणि सदसद्विवेकबुद्धी ते पैसे गपगुमान खिशात टाकू देत नसेल, तर सरळ त्या नोटा जे पहिले मंदिर दिसेल, त्याच्या दानपेटीत अर्पण कराव्यात.

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2014 - 10:49 pm | टवाळ कार्टा

सरळ त्या नोटा जे पहिले मंदिर दिसेल, त्याच्या दानपेटीत अर्पण कराव्यात.

हे मात्र करु नये...देवाला पैशांची गरज नसते

वेल्लाभट's picture

19 Nov 2014 - 2:26 pm | वेल्लाभट

ज्याचा त्याचा प्रश्न

प्रशांत हेबारे's picture

18 Nov 2014 - 12:56 pm | प्रशांत हेबारे

तुम्ही Airport operator ला पैसे द्यायला पाहिजे होते. म्हणजे बरोबर गेले असते.असे मला वाटते. कारण एकदा Banglore airport वरती check in counter वर wallet सापडले होते. airport operator इंडिगो ने ते announce करून दिले.