"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके

sanjivanik१'s picture
sanjivanik१ in जनातलं, मनातलं
16 Nov 2014 - 3:18 pm

आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण .
मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .
"e" प्रत वाचताना डोळ्यांवर येणारा ताण ( brightness तरी किती कमी करणार ) , शारीरिक ताण त्यामुळे थोड्या वेळाने वाचायचा कधी कंटाळा येतो कळतच नाही . कागदी प्रत कुठेही , कधीही , कशीही वाचू शकतो. नव्या कोऱ्या येणाऱ्या पुस्तकाचा वास पण मस्त वाटतो . ( हे कारण प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही )

माझ्या या सवयी बद्दल माझ्या वर कुणीही कितीही आग पाखड केली तरी मी सुधरेन अस वाटत नाहि. पर्यावरण वाचवण्यासाठी माझ्या काही सवयीन मध्ये मी या सवयीची भर घालू शकत नहि.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

संजीवनीतै, किंडलसारखी ई-इंक रीडर्स वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.

आतिवास's picture

16 Nov 2014 - 4:00 pm | आतिवास

मी सध्या वाचन संस्कृती (अजिबात) नसलेल्या भागात आहे, सोबत पुस्तकं आणणं शक्य नव्हतं. सध्या फक्त 'किंडल' मुळे वाचन शक्य आहे.
सवयीचा भाग असतो, इतकंच!

डोळ्यावर ताण येऊ नये म्हणून खलिल पर्यायांचा विचार करावा:
१. Amazon Kindle किंवा इतर उत्पादकाचे ई-बुक रिडर
२. Android फोन असेल तर अनेक ई-बुक रीदर application उपलब्ध अहेत.यात Background colour Sepia/Gray etc.निवडावा.
३. जर .pdf or word प्रकारात ई-बुक असतील तर वाचताना Background colour Sepia/Gray etc.निवडावा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Nov 2014 - 6:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पण किंडलवर कोणतेही पुस्तक डाउनलोड करता येते का? की कुठ्ले पुस्तक घ्यायचे हे अ‍ॅमेझॉन ठरवणार्?म्हणजे एखाद्या पुस्तकाची किंडल प्रत नसली तर? शिवाय तुमचे ते वाय फाय जालपण आवश्यक आहे ना?

किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच पुस्तकं डाउनलोड करता येतात.किंडलप्रत नसेल तर pdfही वाचता येते. मराठी युनिकोडही दिसतं. wifi नसेल तर usb द्वारे पुस्तकं किंडलात भरता येतात.

किंडल वापरताना तुमचा फोटो नक्की टाका ;)

किंडल वापरताना तुमचा फोटो नक्की टाका

तीव्र अनुमोदन!
किंडल वापरते पण पुस्तक ते पुस्तक! काँप्युटर किंवा किंडलवर कागदाचा स्पर्श "मिसला" जातो.कितीही चांगलं का दिसेना!!

किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच पुस्तकं डाउनलोड करता येतात.

पण कंप्यूटरवर किंडल फॉर्म्याटातली बुके डौनलोड करून मग किंडलवर ट्रान्स्फरवता येतातच की. त्यासाठी अ‍ॅमेझॉन लागत नाही.

हो रे. पण कॉपीराईट प्रतिबंधित पुस्तकं DRM प्रोटेक्टेड असतात. समजा तू विकत घेतलेलं पुस्तक माझ्या किंडलवर सापडलं (म्ह. तू azw3 फाईल मला पाठवली, मी ते माझ्या किंडलावर घातलं आणि चुकून wifi सुरू केलं) तर त्या पुस्तकाची DRM माझ्या किंडलात सापडून किंडल ब्लॉक होईल.

कॉपीराईट नसलेल्या पुस्तकांबद्दल - अर्थातच - वांदा नाही.

बॅटमॅन's picture

18 Nov 2014 - 6:42 pm | बॅटमॅन

हो अर्थातच. त्याला उपाय म्हणून मी वायफाय कनेक्ट करतच नाही. ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Nov 2014 - 9:25 am | लॉरी टांगटूंगकर

ब्लॉक म्हणजे खंप्लीट ब्लॉक?? हार्डवेअर यूसलेस व्हणार?
लॉक तोडता येतं का दुकानात जाऊन?

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 2:00 pm | बॅटमॅन

असेच विचारतो.

किंडलवर एक स्क्रीनसेव्हर असतो बघा. (माझ्या बेसिक मॉडेल किंडलवर पेन्सिली, फाऊंटन पेनं, असले आहेत.) तिथे जाऊन अडकतो. सोडवून घेण्यासाठी अ‍ॅमेझॉनला फोन करावा लागतो. ते काय प्रश्न विचारतात वगैरे माहीत नाही.

इ-रीडरचा दुसरा काही उपयोग आहे का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Nov 2014 - 12:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हातात पुस्तकं घेऊन वाचल्याशिवाय चैन पडत नाही. स्मार्टफोन, टॅब्स, पीसी किंवा लॅपटॉप वर ई-बुक्स वाचायचं समाधान मिळत नाही. :)

स्वीत स्वाति's picture

19 Nov 2014 - 11:16 am | स्वीत स्वाति

पुस्तक हातात घेउन वाचण्याची मजा नाही. :-)

कॅलिबर हे उत्तम सॉफ्टवेअर अनेक प्रकारच्या इबुक फॉरमॅट ला कनव्हर्ट करुन देत
किंडल वर मोबी फॉरमॅट हि चालतो
नुक वर इपब चालतो
मला नुक जास्त आवडतो मात्र

जयंत कुलकर्णी's picture

17 Nov 2014 - 7:34 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते किंडलवर अजून मराठी चालत नाही. किंडल फायरवर मराठी पुस्तक दिसते का ? किंडल व्हाईटवर तर दिसत नाही. मी एक पुस्तक किंडलमधे केले ते पि.सीवर किंडलमधे दिसते पण किंडलवर नाही.
मराठी पुअस्तक किंडल फॉर पिसी व किंडलफायरवर तयार करण्यासाठी कोणाची मदत होईल का ?

प्रचेतस's picture

17 Nov 2014 - 8:08 pm | प्रचेतस

किंडलवर मराठी पीडीएफ अगदी उत्तमप्रकारे दिसतात.
माझ्या किंडलवर संपूर्ण महाभारत, मुसलमानी रियासत आणि इतरही अनेक पुस्तके मराठीत आहेत. फ़क्त पीडीएफ वाचतांना किंडल ची ख़ास फीचर्स वापरता येत नाहीत.

माझ्याकडे असलेले मॉडेल किंडल पेपरव्हाईट आहे.

बॅटमॅन's picture

18 Nov 2014 - 6:43 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. शिवाय पीडीएफचे किंडल व्हर्जनमध्येही कन्व्हर्जन करता येतेच की.

जयंत कुलकर्णी's picture

18 Nov 2014 - 6:57 pm | जयंत कुलकर्णी

मी प्रयोग केले आहेत. पण मराठी व्हाईट किंडलवर (किंड्ल/मोबी फॉरमॅट) दिसत नाहीत.... कोणी केले असतील अतर कृपया सांगावे. मी फाँट एंबेड इ. करुन पाहिले आहे...

पाहतो ट्राय करून अन कळवतो.

आदूबाळ's picture

17 Nov 2014 - 8:38 pm | आदूबाळ

काका, वर मारवा म्हणतात त्याप्रमाणे कॅलिबर वापरून किंडल ईबुक सहज तयार करता येतं...

जयंत कुलकर्णी's picture

19 Nov 2014 - 1:12 pm | जयंत कुलकर्णी

मी कालच कॅलिबर वापरुन मोबी तयार केले व किंडलवर लोड केले. पण मराठी फाँट दिसत नाही. पी.सीवर मात्र दिसतो...

दहाहजारची पाटी फक्त पुस्तके वाचण्यासाठीच आहे का लाईट गेल्यावर प्रवासात बैटरी डाऊन झाल्यावर पंखा म्हणूनही वापरण्याइतके हलके आहे ?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2014 - 11:08 am | टवाळ कार्टा

_/|\_

प्रचेतस's picture

18 Nov 2014 - 11:56 am | प्रचेतस

ब्याटरी दोन महीने टिकते. =))

किंवा

तुम्ही सलग ३० तास वाचू शकता.

आणि वाराही घेऊ शकता, किंवा पाठही खाजवू शकता**

**हात पुरेसे लांब असतील तर.

चिगो's picture

19 Nov 2014 - 11:34 am | चिगो

बराचसा सहमत.. मला पण कागदी पुस्तक हातात घेऊनच वाचायला आवडतं.. किंडल पेपरव्हाईट घेतलेलं, पण हामेरीकेतून घेतल्याने सगळ्या पुस्तकांची कींमत डॉलरांमध्ये दिसते आणि जे रजिस्टर्ड कार्ड आहे त्यावरुन खरेदी करता येत नाही. त्यामुळे त्यातील रस गेलाय. मात्र आजकाल अँड्रॉईडवर आणि इतर बर्‍याच साईट्सवर ई-बुक्स बर्‍याच स्वस्त मिळतात त्यातल्या काही मोबाईलवर वाचतो. माझ्यामते, पुस्तकाची वाचनीयता हे त्याच्या फॉर्म्याटपेक्षा (कागदी वा ई-बुक) जास्त महत्त्वाची आहे.

रच्याकने : राजेंची "पुस्तकजत्रा" आता अमॅझॉनची बिजनेस पार्टनर आहे. त्यांनी मराठी पुस्तके किंडल ई-बुक्स म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती..

>>त्यांनी मराठी पुस्तके किंडल ई-बुक्स म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती..

अमेझॉनने २०१५ च्या शेवटी किंवा २०१६ पर्यत नकार दिला आहे. पण प्रयत्न सुरु आहे असे त्यांचे मत आहे.
सध्या मी गुगल बुक्सवर मराठी पुस्तके उपलब्ध करून देत आहे, जवळपास ८०-८२ पुस्तकांचे काम सुरु आहे व तसेच इतर प्रयत्न पण करत आहे :)

चिगो's picture

21 Nov 2014 - 1:58 pm | चिगो

मी गुगल ई-बुक्स वरुन माडगुळकरांची एक-दोन आणि "श्रीमान योगी" डाऊनलोड केले आहे.. ही तुमची किमया का? :-) धन्यवाद..

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2014 - 5:38 pm | जयंत कुलकर्णी

कसे केले आहे ते येथे लिहाल का ?

चिगो's picture

24 Nov 2014 - 1:41 pm | चिगो

Download "Play Books" App on your android handset. Then you can buy these books at a good discount by using your google valet. Sorry, I shouldn't have said "Google E-books" as they may be different from the books available on "Play Books" app..

प्रतिसाद इंग्रजीतच दिला कारण की नाहीतर फारच इंग्रजाललेल्या मराठीत लिहावं लागलं असतं..

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2014 - 5:52 pm | जयंत कुलकर्णी

कसे केले आहे ते येथे लिहाल का ?

सुबोध खरे's picture

19 Nov 2014 - 12:29 pm | सुबोध खरे

अंमझोन वाले डांबरट आहेत. माझे किंडल बंद पडले तर ते आम्ही दुरुस्त करीत नाही म्हणून मोकळे झाले. नवीन किंडल घ्या त्यात १ हजार सवलत देऊ म्हणून. त्यापेक्षा टैब्लेट घेऊन त्यावर वाचणे मी पसंत करतो.

स्वामी संकेतानंद's picture

20 Nov 2014 - 7:10 am | स्वामी संकेतानंद

किंडल कागदीशुभ्र विकत घ्यावा का? की त्याहून बरा किंवा तुल्यबळ दुसरा पर्याय आहे एखादा?
सध्या मी मोबाइल आणि लॅपटॉपवर वाचतो.

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2014 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

किंडल परिक्रमा हे कागदीशुभ्रपेक्षाही अद्ययावत आहे.

बादवे, अ‍ॅमेझान वरून विकत घेतलेले पुस्तक १४ दिवसांसाठी इतर किंडल वापरकर्त्यांना उसने देता येते.

मिपावरील किंडल वापरकर्त्यांचा समुह स्थापन केल्यास या सुविधेचा अधिक लाभ घेता येईल.

वापरकर्त्यांचा समूह बनवण्याची चांगली ऐड्या आहे. पण भौगोलिक मर्यादा भेदून शेअर होऊ शकतं का? उदा. उसात बसून तुम्ही टांझानियातल्या आतिवासतैंना पुस्तक उसनं देऊ शकाल का?

तसं जर होत असेल तर वेगळा धागा काढून त्यावर प्रत्येकाने आपल्याजवळच्या किंडल पुस्तकांची यादी दिल्यास त्या त्या व्यक्तीला व्यनिमार्फत संपर्क साधून पुस्तक उसनं मिळवता येईल.

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2014 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी

मी अमेरिकेतल्या अमेरिकेत करून पाहिले आहे.

इमेल आयडीने पुस्तक हस्तांतरणाचा संदेश पाठवायचा असतो. जिला पाठवले आहे त्या व्यक्तिने स्वीकार केल्यास १४ दिवसांकरिता अथवा त्या व्यक्तिने त्याअगोदर परत करेपर्यंत मुळ वाचकाला त्याच्या किंडलमध्ये ते पुस्तक उपलब्ध नसते.

मला तुमचा इमेल आयडी पाठवा लगेच एक पुस्तक पाठवतो.

प्रचेतस's picture

20 Nov 2014 - 9:53 pm | प्रचेतस

मी अमेझोनवरून एकही पुस्तक विकत घेतले नाही.
बरीचशी पुस्तके डिजिटल लायब्ररी ऑफ़ इण्डिया किंवा उस्मानिया डिजिटल लायब्ररीतून प्रताधिकारामुक्त अशी उतरवून घेतली आहेत.
किंडल फॉर्मेट मधली बरीचशी इंग्रजी पुस्तके ही प्रोजेक्ट गटेनबर्ग ह्या संस्थळावरुन उतरवली आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2014 - 9:59 pm | श्रीरंग_जोशी

किंडलवरून पुस्तक उसने देण्याची सुविधा केवळ अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतलेल्या पुस्तकांना लागू होत असावी.

आदूबाळ यांना एक पुस्तक पाठवून पाहिले पणा त्यांच्या देशात ही सुविधा प्रतिबंधित आहे :-( .

प्रचेतस's picture

20 Nov 2014 - 10:39 pm | प्रचेतस

मला तुझ्याकडून लोन वर आलेले पुस्तक मिळाले. पण घरी वाय-फाय नसल्याने उतरवून घेता आलेले नाहीये.
उद्या ऑफिसमध्ये उतरवून बघतो.

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2014 - 10:44 pm | श्रीरंग_जोशी

ही सुविधा भारतात चालल्यास खूपच उपयोगी ठरेल.

प्रचेतस's picture

21 Nov 2014 - 11:16 am | प्रचेतस

भारतात चालत नाहीये.
बहुधा ही सुविधा फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2014 - 6:15 pm | श्रीरंग_जोशी

सदर सुविधा भविष्यात अमेरिकेबाहेरही चालेल अशी आशा आहे.

आतिवास's picture

21 Nov 2014 - 1:28 pm | आतिवास

किंडल फॉर्मेट मधली बरीचशी इंग्रजी पुस्तके ही प्रोजेक्ट गटेनबर्ग ह्या संस्थळावरुन उतरवली आहेत. ही माहिती नवी आहे माझ्यासाठी. आत्ता दोन वुडहाऊस लॅपटॉपमध्ये उतरवून घेतले आहेत. घरी गेल्यावर किंडलमध्ये नेता येतात का ते पाहते.
धन्यवाद या माहितीबद्दल.

मित्रहो's picture

20 Nov 2014 - 11:52 pm | मित्रहो

कुणी वापरली आहे का? त्याचा परीणाम किंडलसारखाच होतो का? कमी Backlight वगेरे.
जोपर्यंत अंमेझोन मराठी पुस्तके उपलब्ध करत नाही तोपर्यंत किंडल घ्यावे की नाही हाच विचार करतोय.

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2014 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

मी किंडल अ‍ॅप लॅपटॉप, किंडल फायर टॅब्लेट, आयपॅड व ब्लॅकबेरी झेड १० वर वापरले आहे.
पांढर्‍या पार्श्वरंगाने डोळ्यांना त्रास होत असल्यास दुसरा पर्याय उपलब्ध आहे.
मी बुकगंगावर खरेद केलेली मराठी इ-पुस्तके किंडल फायरवर बुकगंगाच्या अ‍ॅपद्वारे वाचतो.

प्रचेतस's picture

21 Nov 2014 - 11:17 am | प्रचेतस

किंडल अ‍ॅपचा उपयोग तसा फक्त एक साधा रीडर म्हणूनच होतो.
इ-इंक रीडर चे फायदे त्यात मिळत नाहीत.

पुस्तक उसने देणे, डिजि॰ लाइ॰, गटेनबर्ग इ॰ माहिती रोचक ++.

ज्यांच्याकडे मोप पैका आहे त्यांनी किन्दल विकत घेऊन वाचावे*

मी मित्राच्या किन्दल वर एक दोन पाने वाचून बघितली , मजा नाय येत
शिवाय आपल्याला हवी ती पुस्तके असतातच असे नाही

* हे माझे वयक्तिक मत आहे

साध्या चतुरभ्रमणध्वनीपेक्षा किंडल कागदशुभ्राची किंमत कमीच आहे, तरीही त्याला मोप पैशेवाल्यांच्या खेळात मोजल्याचा णिषेध.

(गरीब किंडलवापरकर्ता व मंदभ्रमणध्वनीचा मालक) बॅटमॅन.

स्पा's picture

21 Nov 2014 - 4:32 pm | स्पा

:ड

प्रचेतस's picture

21 Nov 2014 - 4:33 pm | प्रचेतस

प्राईम लेन्स सकट डिएसेलार क्यामेरा बाळगणार्यांनी असे म्हटलेले पाहून ड्वाळे पाणावले.

बाकी इतरत्र कुठेही मिळू शकत नाहित अशी दुर्मिळ पुस्तके किंडलवर मिळू शकतात शिवाय वाचायला पण त्रास होत नै.

प्राईम लेन्स सकट डिएसेलार क्यामेरा बाळगणार्यांनी असे म्हटलेले पाहून ड्वाळे पाणावले.

अगदी असेच म्हणतो. गरीबांची चेष्टा करण्याची एक संधी दवडत नाहीत हे स्पाजी. "ॐ फटू स्पाहा" हा त्यांचा मंत्र असल्याचे नुकतेच लक्षात आले आहे.

चिगो's picture

21 Nov 2014 - 5:03 pm | चिगो

"ॐ फटू स्पाहा" =))
"ॐ फटू पहा, स्पाहा" हेपण चालेल वाटतं..

अचूक जागी काडी पडल्याचे पाहून, स्वताचीच पाठ थोपटून घेण्यात येत आहे

अचूक जागी काडी पडल्याचे पाहून, स्वताचीच पाठ थोपटून घेण्यात येत आहे
याला पाठ थोपटणे नाही,स्वतःचे कुल्ले बडवुन घेणे म्हणता. *secret*

जिथे हात पोचतोय ते बडवत असतील हो.. ;)

चेतन677's picture

26 Nov 2014 - 8:54 am | चेतन677

कागदी पुस्तके वाचण्याची मजा शेवटी वेगळीच असते.............

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2018 - 10:52 am | प्रकाश घाटपांडे

मराठी पुस्तकांसाठी सध्या किंडलची काय परिस्थिती आहे?