न वढलेली बिडी आणि खालेला मार २

Vijay Shankar Mane's picture
Vijay Shankar Mane in जनातलं, मनातलं
15 Nov 2014 - 12:01 pm

दुसर्या दिशि पुन शाळत्न येताना पक्या म्हणाला कार इज्या आज चान्स मार्तुय का ……लगीच हनम्या माझ्या तोंडाकड आशेन बगत होता मी म्हनालू करतू कस तरी पण तुमी आंब्याकड थांबू नका देवळाच्या पारावर थांबा मी काम झाल कि तडक देवळातच येतु .
वाटत खटाव करचा बापू भेटला आन म्हणाला आज इनामात्ला ढू हापसून मास पकडणार हायती इंजन लाऊन येणार असला तर घरन भाकरी घिउन या मास इनामातल्या हिरीवरच करणार हायती . मास म्हणल कि सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटल व्हत .मी पक्याला म्हणल कस करायच्र र पक्यान वर बगितल आन थोड्या येळण म्हणाला आपल काम झाल कि आपण देवळा कडन इनामात जाऊ तुझ्या वाटणीची भाकरी आमि आंतु कार दिल्या तुमच्याकड चपात्या असत्यात ना !... दिल्यान मुंडी हलवली.
पण इनामात आय न्हाय सोडायची मागच्या येळाला लाल्या पाटलान तुमच्या इज्यान वाळक चोरून नेली मी मागितली असती तर दिली नास्तिका म्हणल्यावर किर्ड्या ...मूडध्या म्हणत आयन लय मारल र तवा पास्न ती मला इनामाच नाव पण कडून देत न्हाय . आर तिला सांग आज देवळा माग आमराईत आम्ही सूरपाट्या खेळणार हाय म्हणून ….हन्म्यान लगेच सांगितल आण सगळ्यांनी घरी हेच सांगायचं ठरल .
घरी गेलो दादा नुकताच शाळत्न येउन रानात गेला हुता शिरडी घेऊन बर वाटल चला आज रानात जायचा तकाटा वाचला . हात धूतल शिक्यात्न भाकरी काढली बटाटयाच कोरड्यास मठातल धय घेतल त्यात भाकरी कुस्कारली आन सोप्यात राजनच्या कट्ट्यावर बसून वढायला सुरवात केली आजा पारावर्ण नुकताच आला मी जोरात इट्टला.. पांडुरंगा... म्हनालू तसा आजा म्हणाला कार माजी मस्करी कार्तुय्स्का मी त्याच्याकड बगून निर्माळ हस्लू तसा आजा मवाळला आन मला म्हणाला कार इज्या नवी मास्तरीण बरी शिकवती ना ! मी फकस्त मुंडी हलवली आजाण रान्ज्नात्न पाणी घेतल आन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी बसला आन मी आमचा पांडुरंग कधी बिडी वढून झुपतुया ची वाट बगत बस्लु .
नेहमी परमान आज्याची बिडी वाढून झाली व आज हळूहळू घोरायला लागला मी ताटातल खरकट वाट्यावर कोंबड्या ना टाकल आणि पितळी खान्ग्ळून टाकली आन पुढच्या तयारीला लागलो.
हळूच पाणी तापवायचं भगूल आज्याच्या डोक्या शेजारी ठेवल आन बंडल काढायला हात वर केला पण ...आर देवा ! हात कमी पडाय लागला म्हणून मी चवड्यावर उभा राहून बिडी बंडला साठी हात फिरउ लागलो .बिडी बंडल घावला बिडी काढली आणि मुठीत घःट पकडली पण उतरता उतरता भगून कलंडल आन धाप दिशि आज्याच्या डोक्याचा बाजूला पडल आजा आर आर म्हनस्तवर सुसाट मारुतीच्या देवळाकड पळत सुटलो सगळी ग्यांग परावर्ण माझ्या मग पळत येत हुती लय दम लागला हुता पक्याला म्हनालू हि घे तवा पक्या म्हणाला पहिला चान्स तुला मी तोंडात बिडी धरली आन समईच्या वातीवर धरली मला आदीच दम लागलेला आणि त्यात नाकातल्या वाऱ्यान घात केला समय इझली होती ...........!
सगळे एकमेकाच्या तोंडाकड बगत बस्लु दुचित हून मी म्हणल आतार काय करायचं हन्मा म्हणाला जावदेरे आपल्या नशिबात न्हवती वाढायची . माझ्या डोळ्या पुढ आय दिसत हुती …..!

( मिपाच्या व्याकरण शिरोमानिनी शुद्ध लेखन व व्याकरण चुका जरा हलक्या घ्याव्यात .चालक शिकत आहे
नडू नये ! डायरेक्ट अंगावर येऊ नये ………घेतले जाईल. आमच्याकड इनंती करत नाहीत जाणकारांनी नोंद घ्यावी. )
पहिल्या भागाच्या प्रतिसादा बद्धल धन्यवाद !

असेच प्रेम राहुन्द्या !

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

पयला हुकला तर हुकला, दुसरा बी प्रयत्न हुकला
अस कस चालायच मंतो मी.

(हुकलेला ) जेपी

गजानन५९'s picture

15 Nov 2014 - 12:17 pm | गजानन५९

मस्त :)

hitesh's picture

15 Nov 2014 - 4:59 pm | hitesh

छान

विवेकपटाईत's picture

15 Nov 2014 - 5:07 pm | विवेकपटाईत

मस्त लेख, आवडला

इनामात म्हणजे, देवळाला वगैरे इनाम देतात तशी जमिन वगैरे का हो?

बाकी, ग्रामिण ढब एकदम सही उतरवलीये... मजा आली...

खबो जाप's picture

19 Dec 2014 - 10:13 am | खबो जाप

मी आमचा पांडुरंग कधी बिडी वढून झुपतुया ची वाट बगत बस्लु

एक नंबर ; हान तेच्या ….