मॅक्रो फोटोग्राफी - भाग १

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in मिपा कलादालन
11 Nov 2014 - 11:32 pm

मॅक्रो फोटोग्राफीचा प्रयत्न. . .

      दिवाळीत खुप बिझी असल्याने "उत्सव प्रकाशाचा" या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व फोटो पाहून फोटोग्राफीसाठी नवीन जोश आला.
      पावसाळ्यानंतर पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तो म्हणजे दिवाळीत. दिवाळीनंतर जो वेळ मिळाला त्यात थोडा वेळ काढून मॅक्रो फोटोग्राफीवर जास्त वेळ दिला. माझा कॅमेरा Canon SX50 HS आहे. अर्थात Point n Shoot कॅमेरा असल्याने DSLR ची सर त्याला येउच शकत नाही. परंतू तरीही कॅमेराच्या किमान features चा कमाल वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. या धाग्यात गेल्या आठवड्यात काढलेले मॅक्रो-फोटो आहेत.

फोटो १ - फुलपाखरू
ButterFly

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/501
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

        वरील फोटो काढताना पाहिलेला प्रसंग सांगावासा वाटतो. हे फुलपाखरू प्रत्येक फुलावर बसत होते. आणि एका फुलावर बसताच त्याला उडता येईनासे झाले. नीट पाहिल्यावर कळले ते ज्या फुलावर बसले होते त्याच्या फांदीला चिकटून एक नाकतोडा दबा धरून बसला होता त्याने अलगद त्याला पकडले. नाकतोड्याने फांदीशी चिकटून एक फांदीच असल्याचा 'आव' आणला होता. शेवटी मीच त्या फुलपाखराला सोडवले. शेवटी त्यानेही मला एक छान फोटो दिला होताच की.!

फोटो २ - Fly
Fly

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो ३ - Fly
Fly

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

फोटो ४ - Fly
Fly

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

फोटो ५ - Fly
Fly

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

फोटो ६ - Macro Water Drops
Water Drops

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो ७ - Macro Water Drops
Water Drops

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/251
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

Note - वरील सर्व फोटो Tripod चा वापर न करता काढले आहेत.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2014 - 1:15 am | संजय क्षीरसागर

लगे रहो.

खटपट्या's picture

12 Nov 2014 - 1:25 am | खटपट्या

बाप्रे !! भन्नाट !! चतूर आणि पाण्याचे थेंब तर जबरदस्त आलेत.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2014 - 2:15 am | मुक्त विहारि

स्पा, स्वॅप्स इ. जाणकारांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत...

पाण्याचे थेंब जबराट आले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2014 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो. १, ४ आणि ७ विशेष आवडले !

तुमचे फोटो पाहून मला माझ्या एका फोटोची आठवण झाली

कॅमेरा: Nikon L21
12 Megapixel, 4x zoom

Fly

इतर फोटो साठी पहा

https://www.facebook.com/vishal.jirange/media_set?set=a.112844835429999....

मागच्या प्रतिक्रियेत चित्र दिसत नव्ह्ते
आता पुन्हा पोस्त करीत आहे
Nikon Coolpix L22, 4X zoom, Macro Mode

हुकुमीएक्का's picture

14 Nov 2014 - 9:54 pm | हुकुमीएक्का

छान आलाय फोटो. थोडा Blur आलाय पण Macro मध्ये हाच प्रॉब्लेम होतो. मलाही खुप फोटो घ्यावे लागले. तुमचे Luck छान होते की तिथे पाण्याचे थेंब होते. मी पण २-३ थेंब टाकले होते. पण त्या माशीने ते पाणी पिऊन मलाच पाणी "पाजले" *lol*

स्पा's picture

12 Nov 2014 - 12:00 pm | स्पा

फोटो आवडलेच
पण एक उगाच सूचना

सब्जेक्ट वेगळा निवडला असतात तर अजून मजा आली असती, पाण्याचे थेंब, माशी, किडे, हे खूप कॉमन आहेत .
रंगीत दोर्याची रिळे, वेगवेगळ्या पेन्सिली, मशीनचे पार्ट, गालिच्याचे फर, अशा वेगळ्या ऑब्जेक्ट चे पण मॅक्रो भारी येतात

चौकटराजा's picture

12 Nov 2014 - 3:09 pm | चौकटराजा

हे फोटो चांगले आहेतच ! पण अनकवेनशनल सब्जेकट पण घ्यावे !

एस's picture

13 Nov 2014 - 1:03 pm | एस

राईट.

पहिले छायाचित्र आवडले. चौथ्यातला रचनाविचारही मस्त. मॅक्रोमध्ये अजून काही करता येईल का ते पहा. उदा. फ्लॉवर वगैरे भाज्यांचा वापर पार्श्वभूमीसारखा करून वेगळ्याच पर्स्पेक्टिवने क्लोजअप घेता येतील. आउट ऑफ फोकस असल्याने ते फारच वेगळे आणि ड्रामॅटिक वाटेल.

शुभेच्छा! :-)

हुकुमीएक्का's picture

13 Nov 2014 - 10:15 pm | हुकुमीएक्का

सर्व मतांशी सहमत. सब्जेक्ट निवडीचा, बॅकग्राऊंड सिलेक्शन आणि अनकवेनशनल सब्जेक्ट चा सल्ला खुप मोलाचा आहे...
स्पा यांनी सुचवल्याप्रमाणे

चौथ्यातला रचनाविचारही मस्त. मॅक्रोमध्ये अजून काही करता येईल का ते पहा. उदा. फ्लॉवर वगैरे भाज्यांचा वापर पार्श्वभूमीसारखा करून वेगळ्याच पर्स्पेक्टिवने क्लोजअप घेता येतील. आउट ऑफ फोकस असल्याने ते फारच वेगळे आणि ड्रामॅटिक वाटेल.

पुढील फोटोग्राफीमध्ये त्याचा नक्कीच वापर करेन. बॅकग्राऊंड निवड करताना फारच कसरत झाली होती ती आता कमी होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलेत फोटू.

-दिलीप बिरुटे

झकासराव's picture

12 Nov 2014 - 3:04 pm | झकासराव

मस्त.. :)

पहिल्या फोटोत थोडा प्रकाश जास्त वाटतोय.

प्रचेतस's picture

12 Nov 2014 - 3:30 pm | प्रचेतस

फोटो आवडले.
मी पण नुकतेच काही रिव्हर्स मॅक्रो तंत्राने काढण्याचा प्रयत्न केला होता पण तसा असफलच झाला.

हुकुमीएक्का's picture

13 Nov 2014 - 10:22 pm | हुकुमीएक्का

रिव्हर्स मॅक्रो तंत्राबद्दल वाचले होते. खुप effective फोटो येतात. Depth of Field पण छान मिळते असे ऐकलेय. पण कधी पाहिले नाहीये कोणाला रिव्हर्स मॅक्रो use करताना.

वेल्लाभट's picture

12 Nov 2014 - 3:53 pm | वेल्लाभट

एसएक्स ५० चे रिव्हूज भारी होतेच. आज रिझल्टही बघितले.
मॅन्युअल मोडमुळे असेल कदाचित, एक्स्पोजर उणं अधिक झालंय
पण काहीही असो
पाण्याचे थेंब ए वन !

गुड वर्क भाऊ!

हुकुमीएक्का's picture

13 Nov 2014 - 10:24 pm | हुकुमीएक्का

फोटो दुपारी १ ला काढला होता. त्यामूळे उणं कराव लागलं.

प्रसाद१९७१'s picture

12 Nov 2014 - 3:54 pm | प्रसाद१९७१

मस्तच

फोटो आवडले ! अजुन येउद्या... :)

जाता जाता :- तुम्ही म्हणताय पॉइंट अ‍ॅड शुट कॅमेराने फोटो काढले आहेत,मला जितके समजते त्यानुसार मॅक्रो लेन्स वापरुन काढलेलेच फोटो हे "मॅक्रो" समजले जातात. तज्ञ मंडळींनी यावर मार्गदर्शन केल्यास आनंद होइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

एस's picture

13 Nov 2014 - 12:51 pm | एस

मी यातील तज्ञ वगैरे नाही, पण मॅक्रो छायाचित्रणावर एक लेख लिहिला होता. त्यातून काही उपयोग होतोय का पहा -

http://misalpav.com/node/26239

हुकुमीएक्का's picture

13 Nov 2014 - 10:29 pm | हुकुमीएक्का

@स्वॅप्स - आपला लेख वाचला. मॅक्रो फोटोग्राफीबद्दलचे खुप समज आणि गैरसमज दुर झाले. सर्व Concepts अगदी सहज आणि सोप्या शब्दात असल्याने पटकन clear झाल्या.

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 12:54 pm | वेल्लाभट

शिंपल शब्दात सांगायचं तर

ऑब्जेक्ट जितक्यास तितकं; म्हणजे १:१ गुणोत्तरात जेंव्हा फोटोत टिपलं जातं, तेंव्हा त्यास मॅक्रो म्हणतात. आणि हे ट्रू मॅक्रो लेन्स नेच शक्य होऊ शकतं. परंतु नॉन मॅक्रो लेन्स किंवा पॉईंट अँड शूट च्या मॅक्रो मोड ने वगैरे जे फोटो काढले जातात त्यांना आपण क्लोजअप्स म्हणू शकतो कदाचित, तेही मॅक्रो च्या ब-यापैकी जवळ जातात.

तांत्रिक निकष सोडले, तर सर्व क्लोजअप्स ना सरसकट मॅक्रोत गणलं जातं आता, तर... ठीक आहे, चालतंय.

गणेशा's picture

13 Nov 2014 - 1:36 pm | गणेशा

मस्त

मदनबाण's picture

13 Nov 2014 - 1:39 pm | मदनबाण

@स्वॅप्स
धन्यवाद. :) तुमचे लेखन म्हणजे हा विषय आम्हाला नीट समजुन घेण्याची मोठी संधी असते. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2014 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा

फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल.........पाखरू ;) लै मंजे लैच्च अवडलं. :)

आवडले फोटो. कैमरा बऱ्यापैकी मैक्रो आहे. तीन फोटोंत सेटिंग आइएसओ१०० आहे- उत्तम. असल्यास ६४ ठेवा. 'आपल्याकडे मैक्रो फोटो घेऊ शकणारा कैमरा आहे' हे सारखे लक्षात ठेवले की योग्य विषय आपोआपच 'दिसू' लागतात. तुमचा फैन झालो आहे.उत्साही फोटोग्राफरला आणखी काही सांगावे लागत नाही.

हुकुमीएक्का's picture

14 Nov 2014 - 9:50 pm | हुकुमीएक्का

माझ्या कॅमेराची ISO range 80 - 6400 आहे. त्यामूळे शक्यतो 80 वर फोटो काढायचा जास्त प्रयत्न करतोय. *smile*

जिज्ञासु आनन्द's picture

1 Feb 2015 - 8:32 pm | जिज्ञासु आनन्द

बढीया..