ग्रेट भेट - राजगड आणि आप्पा परब

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
10 Nov 2014 - 3:01 pm

रा'जांनी ज'गलेला गड
रा'जपण ज'पणारा गड
रा'जांचा ज'वळचा गड
रा'जधानीचा ज'बरदस्त गड
1
प्रातःकिरण

वरील विस्तारित शब्दांना विशेष अर्थ नाही. राजगडाची आठवण काढल्यावाचून राहणं कठीण होतंय, म्हणून आपलं काहीतरी. पहिल्या वेळेस राजगड भेट झाली तेंव्हाच पुन्हा यायचं हे निश्चित केलं होतं. त्या 'पुन्हा' चा जो योग आला तो फार वेगळा आणि विशेष होता. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राजगड पदभ्रमण मोहीम आयोजित केली गेली आणि सोबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब असणार अशी माहिती फेसबुकवर बघितली. आप्पांना आधीही भेटलो होतो, त्यांची पुस्तकं वाचलेली आहेतच. पण त्यांच्यासोबत ट्रेकचे दोन तीन अवसर हुकले होते. तेंव्हा आधीच राजगड, त्यात आप्पांच्या सोबत म्हटल्यावर तडक नाव नोंदवण्यात आलं.
2
प्रथमदर्शन

3
दोन्ही हात पसरून कवेत बोलावणारा दुर्गराज

4
नजरेच्या टप्प्यात आलेला गुप्त दरवाजा

एखाद्या ट्रेकिंग ग्रूप ने आयोजित केलेल्या ट्रेकला जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण शिवशौर्य ने केलेली व्यवस्था अतिशय उत्त्म होती. आम्ही साधारण ७० जण होतो. वयोगट ६ ते ७६. ७६ म्हणजे आप्पा परब. बाकी सगळे कमी अधिक अनुभव असलेले. पण आम्हा सगळ्यांना एकमेकांच्या साथीने एक उत्तम माहितीपूर्ण ट्रेक घडविल्याबद्दल शिवशौर्य ट्रेकर्स चे आभार मानायला हवेत.

5
सकाळचं कोवळं ऊन

6
उंचीवरून दिसणारं खोरं

7
उंचीवरून दिसणारं खोरं

"अजूनही तुम्ही या दगडांना, भिंतींना कान लावलेत, तर ते दगड तुमच्याशी बोलतील. इथे घडलेले प्रसंग, झालेल्या गर्जना, आखलेले बेत, तुम्हाला सांगतील.", आप्पा म्हणतात. आणि याचा प्रत्यय त्यांच्यासोबत केलेल्या या ट्रेक मधे पदोपदी येत होता. इतक्या आत्मीयतेने, इतक्या तन्मयतेने ते एक एक गोष्ट सांगतात, इतिहासाचं एक एक पान तुमच्यासमोर खुलं करतात, की तुम्ही ख-या अर्थाने त्या काळात जाऊन येता.
8
आप्पा परब

9
सहज एक फ्रेम. सुसज्ज सॅक आणि मागे तोरणा

10
पावसाळा सरलाय...

आमच्या चमूने सकाळी ६:३० वाजता गुंजवणे गावातून चोरदरवाज्याच्या किंवा गुप्त दरवाज्याच्या वाटेने चढाई सुरू केली. ८:३० ला आम्ही गडावर होतो. The Older, the stronger म्हणावसं वाटत होतं, कारण आप्पा सगळ्यात पुढे होते.

11

12
या बाल मावळ्यांना भारी मजा येत होती

13
गुंजण दरवाज्याची रचना पहा.... अद्भुत. आता फार कमी वापरात आहे.

14
लांबच लांब पसरलेली सुवेळा माची आणि डोंगरसोंड

15
सुवेळा

16
सुवेळा

17

a
संजीवनी माची - बिनीचा बुरूज

राजगडावर शिवाजी महाराजांचं तब्बल २८ वर्ष वास्तव्य होतं. त्यामुळे हा गड अनेक महत्वाच्या गोष्टींचा, घटनांचा साक्षीदार आहे. त्या घटनांच्या गोष्टी ऐकत, अवशेष बघत आमची भ्रमंती चालू होती. अशा अनेक जागा, अनेक मार्ग, अनेक अवशेष आम्हाला कळत होते, ज्यांच्या वाटेला माहिती किंवा कुतुहल नसेल तर कुणी जाणार नाही. सुवेळा, संजीवनी, पद्मावती असा भरभक्कम अजेंडा अतिशय रंजक प्रकारे पूर्ण करत पहिला दिवस मावळला तो पद्मावतीवर. क्षितिजावरच्या तोरण्याच्या काळ्या आकृतीसोबत.

19
तोरणा

aa
तोरणा

18

जेवल्यानंतर प्रत्येकाची संक्षिप्त ओळख प्रत्येकाने करून दिली. मग आप्पांनी पुन्हा काही गोष्टी सांगितल्या. हे सगळं थांबू नये असं वाटत होतं खरं, पण डोळ्यावर झोप आली होती. उद्या बालेकिल्ला बघायचाय म्हणत सगळेजण पटापट झोपले. पद्मावती देवीचं देऊळ आमचा आसरा होतं.

21
पंच पकवान्न

20

सकाळी काहीशी कुडकुडत जाग आली. थंडी म्हणावी तितकी नव्हती, पण होती. जमेल त्याने, जमेल तशी, आन्हिकं उरकली आणि मंडळी बालेकिल्ल्याच्या पाय-या चढत निघाली. आता ब-याचशा कठीण कातळटप्प्यांवर लोखंडी कुंपण लावलेलं आहे, त्यामुळे काठिण्य पातळी बरीच कमी झाली आहे.
22
बालेकिल्ल्यावरून दिसणारी पद्मावती माची

23
पाली दरवाजा

`साडेचार हज्जार फुटावर बालेकिल्ला.... कमाल माणूस यार', माझ्या मित्राचं वाक्य मला आठवत होतं. आम्ही बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात होतो. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून होणारं सुवेळाचं दर्शन कल्पनातीत विलोभनीय आहे. इथून पुढे तीन बुरुज, पाण्याची टाकी, तलाव, भवानी मातेचं मंदिर बघत राजवाड्याजवळ आलो. या ठिकाणी शिवाजी महाराज; खुद्द शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं या कल्पनेनेच शहारून जायला होत होतं. ते 'फीलिंग' अनुभवत तिथे काही काळ थांबलो. आणि मग बालेकिल्ला व गड उतरून पायथ्याशी आलो.

24
राजवाड्याचे अवशेष

संपूर्ण ट्रेक दरम्यान आप्पांना जमेल तेंव्हा मनातल्या शंका, प्रश्न विचारत होतो. शाळेतल्या पुस्तकांपलिकडचा इतिहास, त्या पलिकडचे शिवाजी महाराज, आणि त्यांची साक्ष देणारे गडकिल्ले समजण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं ख-या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर आप्पा परब आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींचा दृष्टिकोन, त्यांची अभ्यासू वृत्ती आपल्याला अंगी बाणवायला हवी. तरच, ते म्हणतात त्याप्रमाणे ते दगड, त्या भिंती आपल्याशी बोलतील.

25
सोनेरी शेतं

राजगडाची ही दुसरी वारी कमालीची अविस्मरणीय झाली. आणि अर्थातच, पुन्हा, पुन्हा-पुन्हा जावंसं वाटणारा हा गड आहे. त्यामुळे पुन्हा ट्रेक तर होणारच.

काही दुवे:
शिवशौर्य ट्रेकर्स
आप्पा परब
राजगड कथा पंचविशी

काही व्यक्तिचित्रे:
aa
वाटेकडे डोळे लावून बसलेली एक आजी

aaa
'अहो हसा की दादा जरा' म्हटल्यावर खुदकन हसले हे. आधी बावरले होते एकदम.

aaaa
या आजी सुरेख ताक विकत होत्या

aaaaa
'पाणी विके तरीही चेहरा तहानलेला'

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

10 Nov 2014 - 3:19 pm | सुधांशुनूलकर

सुंदर फोटो आणि समर्पक वर्णन.

काही दिवसांपूर्वी मिपावर हा धागा आला होता, तेव्हा यायची जबरदस्त इच्छा झाली होती, पण जमलं नाही. तुमच्या वॄत्तान्ताने अंशतः इच्छापूर्ती झाली.

दोन कॄष्णधवल फोटो फार आवडले.

राजांना (आणि आप्पांना) मुजरा...

स्पा's picture

10 Nov 2014 - 3:43 pm | स्पा

मस्तच रे

मुलांनी हे किल्ले पाहायलाच हवेत. शिवाय राणी लक्ष्मिबाईचा झाशिचा किल्ला (उ॰प्र॰)राणा कुंभाचा कुंभालगड,राणा प्रतापचा चितोडगड, भरतपूरचा लोहगड, (राजस्थान) व्यंकोजीचा ललितामहाल (तंजोर, तामिळनाड) राणी चन्नमाचा कित्तुर,चित्रदुर्ग (कर्नाटक) हे पण उतारवयात न जाता आता पाहायला हवेत.

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2014 - 7:50 pm | मधुरा देशपांडे

क्लास आलेत फोटो सगळेच!! मस्त !!

यसवायजी's picture

10 Nov 2014 - 7:54 pm | यसवायजी

फोटो मस्तच.

कपिलमुनी's picture

10 Nov 2014 - 8:17 pm | कपिलमुनी

वर्णन आणि फोटो मस्तच .
आपा परब यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टींपैकी १-२ इथे लिहिल्या असत्या तर अजून मजा आली असती

त्यांच्याकडून ऐकण्यात, त्यांच्या पुस्तकांतून वाचण्यात जी गंमत आहे ती मी लिहून नसती आली हो.

मुक्त विहारि's picture

10 Nov 2014 - 8:43 pm | मुक्त विहारि

१. वेल्ला भटांना, कारण त्यांनी आधी धागा काढून ह्या उपक्रमाची माहिती दिली.

२. अप्पा परब, ह्यांची आणि माझ्या मुलाची गाठ-भेट घालून दिली.

३. अर्थात माझ्या मिपाला आणि मिपाकरांना.मिपाकर आम्हाला भरभरून देत असतात..इतके की, आता ओंजळ भरून वहात आहे...

खटपट्या's picture

11 Nov 2014 - 12:08 am | खटपट्या

माझा गणेशा झालाय....

अजुन कोणी आहे का माझ्याबरोबर ? की मी एकटाच आहे गणेशा टीममधे..?

सखी's picture

11 Nov 2014 - 12:13 am | सखी

माझाही झालाय, काही कळत काही धाग्यातले काहीच फोटु दिसतात सगळे दिसत नाही. या धाग्यात फुल्ल गणेशा.

अरेरे हापीसात साईट ब्लॉक आहे. आता घरीच जाउन बघावे लागणार

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2014 - 7:24 am | टवाळ कार्टा

+१

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2014 - 12:09 am | बोका-ए-आझम

अप्रतिम फोटो आणि अप्रतिम वर्णन.

प्रचेतस's picture

11 Nov 2014 - 8:48 am | प्रचेतस

झक्कास वर्णन आणि फोटो.

खटपट्या's picture

11 Nov 2014 - 8:52 am | खटपट्या

आत्ता दिसले फोटो, छान आहेत. तो पाणिविक्या आहे त्याला बहूतेक जबरदस्तीने पाठवलेले आहे पाणी विकायला. :)

सूड's picture

11 Nov 2014 - 3:57 pm | सूड

आवडलं.

फोटो झक्कासच आले आहेत. वर्णन पण खासच.

गणेशा's picture

11 Nov 2014 - 7:28 pm | गणेशा

आवडेश ...

वेल्लाभट's picture

12 Nov 2014 - 3:36 pm | वेल्लाभट

धन्यवाद, सगळ्यांना. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Jan 2015 - 1:53 am | निनाद मुक्काम प...

मस्तच