विसावा भाग १

मालविका's picture
मालविका in भटकंती
10 Nov 2014 - 4:27 am

विसावा
२०१०मध्ये आम्ही (मी आणि नवरा)आम्ही ब्लेक फोरेस्टच्या ट्रिपला होतो.बरेच दिवस फिरायला जायच म्हणत होतो पण कुठे ते ठरत नव्हत.शेवटी घाई गडबड नको,दगदग नको असा विचार करून आम्ही ब्लेक फोरेस्टची निवड केली.फार फिरायचं नाही पण जाऊन ४ दिवस विश्रांती तरी घ्यायची.दोघानाही रोजच्या दिनक्रमातून काहीतरी विसावा हवा होता.शिवाय तेव्हाच मी गरोदर असल्याने अजिबात धावाधाव करायची नव्हती.फक्त विश्रांती साठी जायचं हे पाहिलं आणि मग तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहन असा आमचा एकूण मूड होता.अशा मूड साठी ब्लेक फोरेस्ट हे योग्य ठिकाण आहे.

सुरवात तयारीपासून होती.कुठून जायचं,कस जायचं याची माहिती इंटरनेट वरून काढायची काढायची त्यानुसार बुकिंग करायचं शिवाय बजेट सांभाळायच हे मोठ काम अर्थातच नवर्याने केल.शक्यतो गर्दीची ठिकाण टाळण्याकडे आमचा कल होता.म्हणूनच राहण्यासाठी तिथली titisee,freiberg हि ठिकाणं सोडून आणखी जर आतलं खेड शोधून काढलं.त्याच नाव schluchee.जर्मन उच्चार जर जास्तच कठीण.जसा जमेल तसा वाचा.मी शाकाहारी असल्याने इथे बाहेर फिरताना थोडी पंचाईत होते.खाण्यावर थोडी बंधन येतात.पण नशिबाने आम्हाला तिथे apartment प्रकारची खोली मिळाली.खरतर मोठ्या खोलीचे दोन भाग केले होते.एका भागात एक सोफा आणि छोट स्वयंपाकघर आणि एका भागात मोठा बेड.स्वयंपाकघर असल्याने ते आम्हाला सोयीच झाल.आम्ही घरून निघताना खाण्याची तयारी करून घेतली होती.इथल्या भारतीय दुकानात रेडी टू कूक च्या भाज्या मिळतात.त्याची ३/४ पाकीट आणि फ्रोजन पोळ्यांची २/३ पाकीट अस रात्री खाण्यासाठी घेतलं होत.ह्या रेडी टू कूक च्या भाज्या फक्त मायक्रोवेव मध्ये गरम करायच्या आणि पोळ्या तव्यावर भाजायच्या.त्यामुळे निदान रात्रीच जेवण तरी पोटभर व्हायचं.शिवाय जाताना इथून मोझरेला चीज,सन्द्विच चे ब्रेड,पेस्तो चटणी हे समान पण नेल होत त्यामुळे सकाळी उठून संद्वीच तयार करून घ्यायची आणि बाहेर पडायचं आणि रात्री भाजी पोळी अस खाण होत असे.खर तर बाहेर गेल्यावर खाण करत बसायला मला मनापासून आवडत नाही.पण हे भारतात शक्य आहे.इथे तशी खूपच पंचाईत होते.त्यात मला नवीन नवीन डिश खावून बघायचा अजिबात उत्साह नाही तेव्हा मला हे सगळ करायला चालत.त्यामुळे स्वयंपाकघर असलेल हॉटेल आम्हाला खूपच सोयीच पडल.

एकदा ठिकाण ठरल्यावर तिथे जाण्याचे पर्याय शोधणे सुरु झाल.amsterdam हून आम्ही basel ला विमानने गेलो.तिथून मग बसने frieberg ला आणि मग तिथून DB अर्थातच deutsche bahn (तेथील ट्रेन्स )ने नियोजित स्थळी म्हणजेच schluchsee या गावी पोहोचलो.गाव म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर येत तसं हे खेडेगाव नक्कीच नव्हत.सर्व सोयीसुविधांनी युक्त अस हे गाव होत.मध्यवर्ती ठिकाण नाही म्हणून गाव एवढच.बाकी दळणवळणाच्या आणि इतरही सोयी सुविधा अत्यंत सुंदर होत्या.

इथल्याच Pension Wiesengrund नावाच्या हॉटेल मध्ये आमच बुकिंग होत.आम्ही सांगितल्या वेळेच्या तासभर आधीच पोहोचलो.पण तिथल्या मालकाने जराही कुरकुर न करता १५/२० मिनटात आमची खोली तयार करून आम्हाला दिली.इथे बरेच जन घरगुती स्वरुपाची हॉटेल चालवतात.आमच हॉटेल देखील असच होत.मालकाच मोठ १५/२० खोल्यांचं घर होत.त्यातल्याच काही खोल्या तो भाड्याने देतो.मालक मालकीण खूपच छान स्वभावाचे होते.हॉटेलच्या बुकिंग मध्ये सकाळचा नाश्ता आणि ट्रेन चा पास यांचा समावेश होता .

पहिल्या दिवशी आम्ही १ वाजण्याच्या सुमारास पोहोचलो.मग विश्रांती घेवून बरोबर आणलेले खाणे खावून आम्ही बाहेर पडलो.मालकाकडून गावाची माहिती घेतली आणि मग भटकायला सुरवात केली.सुदैवाने सूर्यदेव प्रसन्न होते.इथे राहताना हवामान हा नेहमी धसका घेतलेला विषय असतो.सकाळी छान सूर्यप्रकाश असेल तर दुपारला ढग दाटून येतात.पावसाला हा १२हि महिने पाचवीला पुजलेला.त्यामुळे साधारण शनिवार रविवार काही बेत करायचा तर आधी हवामान बघायला लागत.बर्याच वेळा इथला हवामानाचा अंदाज खराही ठरतो हेही सांगण्यासारखे.

क्रमश:

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

10 Nov 2014 - 7:05 am | स्पंदना

अंहं!
आणि एक युरोपिअन टुर.
सुरवात अतिशय छान झालीय.
मालविका तू निदान शाकाहारी म्हणुन तरी तुझी अडचण होते बाहेर जाताना, आम्ही सगळे लिमीटेड मांसाहारी असुनही (लिमीटेड म्हणजे काही प्रकारचे मासे, अगदी दोन तीन प्रकार म्हण, चिकन अन गोट अथवा लँब) खात असूनही माझ्या घरच्यांना बाहेर जाताना विथ किचनच हॉटेल असेल तर आवडत. बहुतेकदा आम्ही युथ हॉस्टेल बुक करतो, कारण तेथे ही भली मोठी किचन मिळते, प्लस सगळी भांडी, डिशेस अन कटलरी उपलब्ध असते. आता अस का म्हणशील तर प्रचंड तळलेले प्रकार आवडत नाहीत, अन बेचव खाण घश्याखाली उतरत नाही.
मग मी मुग डाळ घातलेला मसालेभात (आम्ही याला खिचडी म्हणतो, पण खिचडीत एव्हढे मसाले नसतात) पाणी न घालता नुसता रोस्ट करुन नेते. तंदूर मसाला तयार करुन नेते, अन उपिट सुद्धा फक्त पाणी सोडुन तिखट मिठासह तयार करुन नेते. बरोबर माझा राईस कुकर असतोच. त्यामुळे पहिल्या दोन दिवसातच सगळे कंटाळतात बाहेरच खाउन, मग हा मेन्यु सुरु होतो.

अजया's picture

10 Nov 2014 - 7:38 am | अजया

अरे वा,नविन युरोप टुर!
पुभाप्र.

वेल्लाभट's picture

10 Nov 2014 - 9:29 am | वेल्लाभट

युरोप इट इज. येउद्यात. तेवढे फोटो...... भरपूर टाका म्हणजे झालं.
:)
वर्णनाची सुरुवात छान!

मुक्त विहारि's picture

10 Nov 2014 - 9:33 am | मुक्त विहारि

पुभाप्र...

मदनबाण's picture

10 Nov 2014 - 9:34 am | मदनबाण

फोटो ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

बहुगुणी's picture

10 Nov 2014 - 9:42 am | बहुगुणी

मिपावर प्रवासवर्णनांना (आणि पाककृतींना) फोटो मात्र मँडेटरी आहेत हे लक्षात असेलच :-)