पांढरा रस्सा

जागु's picture
जागु in पाककृती
6 Nov 2014 - 3:56 pm

खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून. तर मी केलेला पांढरा रस्सा खालील प्रमाणे:

साहित्यः
१ किलो चिकन (तुकडे करून व स्वच्छ धुवून)
४ चमचे आल, लसुण पेस्ट
२ छोटे कांदे चिरून
१ चमचा तेल

सुके वाटण
२ चमचे तिळ
दिड चमचा खसखस
अर्धा चमचा जीर
अर्धा चमचा शहाजीर
१ चमचा धणे
८-१० मिरी
१०-१५ काजू

फोडणी
२ मोठे चमचे तूप
५-६ मिरी
३-४ लवंगा
३-४ तमाल पत्र
१ डालचीनी काडी मोडून

१ ओल्या नारळाचे दूध
मिठ

पाककृती:
१)पहिला धुतलेल्या चिकनला आल्-लसुण पेस्ट लावून साधारण १ तास मुरवत ठेवा.
२) वरील सुक्या वाटणातील जिन्नस थोडे भाजून थंड करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.
३) एका भांड्यात तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत तळून त्यावर चिकन परतवा. थोडे मिठ घाला. हे चिकन वाफेवर शिजवून घ्या. शिजताना चिकनला पाणी सुटते. जर शिजण्यासाठी आवश्यक वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
४) दुसर्‍या भांड्यात तुप गरम करून त्यावर मिरी, लवंग, तमालपत्र, दालचीनीची फोडणी द्या. सुके वाटण घाला. त्यात शिजलेले चिकन घालून नारळाचे दूध घाला. थोडेसे मिठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवा. (मिठ कमी घाला कारण आधी चिकन मध्ये घातलेले आहे.)

झाला पांढरा रस्सा तयार.

आता आपल्या जेवणाच्या ताटात ह्या वाटीला मानाने बसवून जेवणाचा आस्वाद घ्या.

प्रतिक्रिया

झकास.
आहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा

गवि's picture

6 Nov 2014 - 4:20 pm | गवि

तोंड खवळले...

रेसिपी मध्ये सुके वाटण घालायचे टाईप कराय्चे राहीले आहे. ते फोडणी नंतर घालायचे आहे.

विजुभाऊ, गवि धन्यवाद.

अनुप ढेरे's picture

6 Nov 2014 - 4:41 pm | अनुप ढेरे

कहर!

गवि's picture

6 Nov 2014 - 4:42 pm | गवि

तांबडाही येऊदे...

की आलाय आधीच ?

कपिलमुनी's picture

6 Nov 2014 - 4:43 pm | कपिलमुनी

मस्त रेसिपी .

गरम गरम रस्सा प्यायला मस्त वाटतो. कोपु मधे आधि २-३ वाट्या पिउन मग जेवणाला सुरवात असते

सौंदाळा's picture

6 Nov 2014 - 5:08 pm | सौंदाळा

सहिच
तोंपासु.
पिंपरी मंडईत सुक्या माशाच्या दुकानात याचे पाकिट मिळते. २५ रु. ला.
शिजवलेल्या चिकनचे पाणी, नारळाचे दुध त्यात घालायचे आणि तेलावर मिरी, लवंग, दालचिनी घालुन हे सगळे एकत्र करायचे.पाणी वाढवुन २० वाट्या पांढरा रस्सा तयार होतो. एकदम छान लागतो.
आणि एक (त्या पाकिटावर लिहिले होते तेच सांगतोय)
शाकाहारी लोकांसाठी चिकनऐवजी मसुर शिजवलेले पाणी घालुन पण पांढरा रस्सा उत्कृष्ट होतो.

मृत्युन्जय's picture

6 Nov 2014 - 5:20 pm | मृत्युन्जय

ये. कुछ काम का इन्फ्रमेशन हय. धन्यवाद. आता पिंपरी मार्केटातले दुकान शोधणे आले

चाणक्य's picture

6 Nov 2014 - 6:16 pm | चाणक्य

कुठे आहे पिंपरी मंडईत सांगा पटापट

कपिलमुनी's picture

6 Nov 2014 - 6:20 pm | कपिलमुनी

सविस्तर पत्ता सांगा लौकर. वीकेंड जवळ येत आहे

सौंदाळा's picture

6 Nov 2014 - 6:57 pm | सौंदाळा

पिंपरी पुलाखाली मंडई आहे तिकडे मासे विकण्यासाठी वेगळी जागा (बंदिस्त गाळेवजा) आहे त्याच्या अलीकडेच दोन सुक्या माशाची दुकाने आहेत (तिकडे गेलात की वासावरुन कळेलच) त्यापैकी एका दुकानातुन मी घेतले होते.
मला फारशा अपेक्षा नव्हत्या पण करुन पाहिले आणि मज्जा आली. या विकेंडला मी पण परत घेणार आहे. कोणी येणार असेल तर खरड्/व्यनी करा, भेटु तिकडे

प्रचेतस's picture

6 Nov 2014 - 7:03 pm | प्रचेतस

सकाळी भेटशील का महादेवकडे?
दाल पकवान खाऊयात.

चाणक्य's picture

22 Nov 2014 - 10:44 am | चाणक्य

आत्ता वाचला तुमचा प्लॅन. गेला होतात का? नसाल गेलात तर उद्या जाऊ

hitesh's picture

7 Nov 2014 - 12:52 am | hitesh

म्हमईत कुठे मिळेल हा मसाला ?

मुंबईत कुठे मिळेल माहित नाही :(
'कोल्हापुर दरबार' पांढरा रस्सा मसाला असे नाव होते पाकिटावर

वा.... काय मस्त दिसतोय पांढरा रस्सा. बरेच वेळा खाल्ला आहे, पण घरी कधी बनवला नाहि अजुन. आता ह्या विकांतालाच बनवुन बघते. :P

बहुगुणी's picture

6 Nov 2014 - 5:35 pm | बहुगुणी

हे म्हणजे थाई करीचं कोल्हापुरी भावंड वाटतंय.

पांढरा आणि ताबडा रस्सा या दोन्हीची पाककृती स्वाती राजेश यांनीही दिली होती.

शिद's picture

6 Nov 2014 - 5:43 pm | शिद

झक्कासच! तोंपासू.

जेपी's picture

6 Nov 2014 - 5:45 pm | जेपी

मस्तच.
आमच्याकड मार्केट मध्ये ready to cook पांढरा रस्सा पाकीट मिळत मसाल्याच.
आता हे करुन पाहीन.

मोहनराव's picture

6 Nov 2014 - 5:49 pm | मोहनराव

एकच नंबर!!

खटपट्या's picture

6 Nov 2014 - 10:29 pm | खटपट्या

आ हा करुन बगाय पायजे !!

स्पंदना's picture

7 Nov 2014 - 3:18 am | स्पंदना

आता ह्या रविवारी करणं आलं!! :(

बहुगुणी धन्स. मी पाहीले नव्हते आधी धागे.
लाल रस्सा नेक्स्ट टाईम नक्की.

सगळ्यांना धन्यवाद.

हो ह्याचे एक रेडीमेड पॅकेट मिळते मार्केट मध्ये. मी पण आणले होते. तीही चव चांगली असते.

सुहास झेले's picture

7 Nov 2014 - 1:12 pm | सुहास झेले

झक्क्कास !!!

दिलिप भोसले's picture

21 Nov 2014 - 7:32 pm | दिलिप भोसले

फोटो सुंदर आहेत

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2014 - 8:39 pm | स्वाती दिनेश

जागु,
पांढरा रस्सा मस्तच!
स्वाती