राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
5 Nov 2014 - 8:40 am
गाभा: 

सात नोव्हेंबर ला "रंग रसिया" रिलीज होत आहे.

मित्रांनो, रणजित देसाईंचे राजा रवी वर्मा पुस्तक वाचलेत का? पूर्ण भारतात "राजा रवि वर्मा" च्या जीवनावरचे ते एकमेव आणि मराठी पुस्तक आहे. त्याचे नंतर इंग्रजीत भाषांतर झालेले आहे. आगामी हिंदी चित्रपट "रंग रसिया" त्यावरच आधारित अाहे. रणदिप हूडा आणि नंदना सेन हे त्यातले कलाकार आहेत. एखाद्या चित्रकाराच्या जीवनावर ची ही प्रथम आणि एकमेव कादंबरी आहे. रवी वर्मा आणि त्याचे जीवन खुप वादग्रस्त होते. त्याचे मामा राज वर्मा याने त्याच्यातला कलाकार लहानपणापासून ओळखला. त्या वेळचा इतिहासाचा कालखंड आणि एकूणच त्यावेळची मातृसत्ताक पद्धती आपल्याला आश्चर्यचकीत करते. मी मराठीत ही कादंबरी पूर्वी वाचलेली आहे. वाचनाची आणि चित्रकलेची आवड असणार्‍या सर्वांना सुचवू इच्छितो की आपणही ही कादंबरी जरूर वाचा.

येथे आपण खाली दिलेल्या सगळ्या बाबतीत चर्चा करूया:

राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...

प्रतिक्रिया

लेखन विषय सूचना हवा होता का?

खटपट्या's picture

5 Nov 2014 - 9:42 am | खटपट्या

आवडीचा विषय !!!
धन्यवाद !!
abcd

रामदास's picture

5 Nov 2014 - 11:31 am | रामदास

रॉय किणीकरांवर लेख होता. त्या लेखाची सुरुवात रॉय किणीकर रणजीत देसाईंना राजा रविवर्मा यांच्या जीवनावर कादंबरी लिहीण्याचा आग्रह करतात अशी होती. त्या लेखाची आठवण या धाग्यामुळे झाली.
चित्रपट परीक्षण आल्यानंतर बघावा असा विचार आहे.

आशु जोग's picture

5 Nov 2014 - 12:27 pm | आशु जोग

नंदना कुणाची कोण

एस's picture

5 Nov 2014 - 11:35 am | एस

वाचलीये आणि छान आहे. पण बरंच काल्पनिकही आहे. त्यातील काय सत्य आणि काय काल्पनिक हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे एक कलाकृती म्हणूनच कादंबरी आणि आगामी चित्रपटाकडे पाहिले पाहिजे.

संतोषएकांडे's picture

7 Nov 2014 - 12:15 pm | संतोषएकांडे

राजा रवी वर्मा यांचा वडोदरा (बडोदें) स्थित स्टुडीयो
पत्ता :
लक्ष्मीविलास पॅलेस
राजमहाल कंपाउन्ड
वडोदरा
.

उत्कृष्ट असावा ! बघायला पाहिजे !