चहा, सिगरेट आणि गप्पा - थंडी

खोंड's picture
खोंड in जनातलं, मनातलं
31 Oct 2014 - 6:45 am

हाताची चार बोटं वर करून न बोलताच जोश्या नि ऑर्डर दिली.
"कसली थंडीये …. " यंत्रमानवाच्या आवाजात कुडकुडत जोशी म्हणाला.
"मिष्टर झिरो फिगर … अंगावर थोडी तरी चरबी जमवा … एवढी पण थंडी नाहीये … "
"च्याक… पहिल्या सारखी थंडी नाही राहिली … "
चहा आला.
पहिला झुरका घेत सावंत म्हणाला "थंडी हि नाही आणि पहिल्या सारखी थंडी ची मजा हि नाही राहिली … "
"ते कसं ?"
"म्हणजे थंडीची मजा पहिल्या सारखी कुणी घेतच नाही … "
आजकाल म्हणे थंडीची मजा काय तर "अंथरुणात गाढवासारखे उशिरापर्यंत लोळत रहाणे… "
"यात कसली आलीये डोम्ब्ल्याची मजा"
"थंडीची खरी मजा तर आपण अनुभवायचो… गावाकडे"
"अहाहा … काय मजा येते … "
"थंडीची खरी मजा काय असते मी सांगतो "
सावंत वाफाळलेल्या चहाचा वास घेत बोलू लागला
"सकाळी पहाटे चार ला उठायचं …
बाहेर चंद्राचा सौम्य प्रकाश आणि त्यात दिसणारं गर्द धुकं
थंडीतल्या पहाटे हवेमध्ये पण एक वेगळाच वास असतो. पावसाआधी मातीचा येतो ना तसा.
मग मस्त बंब पेटवावा. बंबाच्या धुराच्या रांगा धुक्यात विलीन होताना पहाव्यात.
मधूनच बम्बातून उडणाऱ्या ठिणग्या.
पाणी कडक तापल कि त्या मंद चंद्र प्रकाशात ओट्यावर अंघोळ करावी. अंधारात कडक पाण्याने अंघोळीचा अनुभव फार निराळा असतो.
थंडीमुळे अंगावर आलेला काटा आणि त्यात कडक पाण्याचा स्पर्श किती सुखद वाटतो
कडक पाण्यामुळे अंगातून निघणाऱ्या वाफा त्या प्रकाशात स्पष्ट दिसतात. त्या वाफांचा अनुभवच निराळाच.
मग स्वच्छ कपडे घालून तेल लाऊन भांग पाडून तयार व्हावे आणि चहाचा एक कडक प्याला मारून बाहेर लेफ्ट राईट करत निघावे.
"
सावंत ने चहाचा घोट घेतला. एव्हाना सगळे त्याचाकडे बघतच राहिले.
"आईला… सावंत … कसला भारी आहेस रे तू … अगदी थंडीत कडक पाण्याने अंघोळ केल्या सारखं वाटलं " जोशी
"हो ना … ऐकूनच एवढं प्रसन्न वाटतंय तर प्रत्यक्ष अनुभव किती सुखदायक असेल" देशपांडे
तसं आम्ही पण उठून जातो फिरायला सकाळी सकाळी.
"स्वेटर टोपी घालून ना … ?"
"अंघोळ न करता स्वेटर टोपी आणि हाताची घडी घालून फिरायला जाणाऱ्या लोकांची मला कीव येते … दात न घासता चहा पिणाऱ्या लोकांएवढेच ते मला बावळट वाटतात … आणि म्हणे आम्ही गुलाबी थंडीचा अनुभव घेतो … " सावंत
"मी काय एन्जॉय करायचो सांगू ?" जोशी
"सकाळी ७ ला तयार होऊन बाहेर आलं कि दिमाखात होणारी सुर्यानारायनाची एन्ट्री"
"सुर्य त्या वेळी एखाद्या लाल आणि सोनेरी धाग्यांनी विणलेला राजेशाही पोशाख खातलेल्या राजकुमारासारखा दिसतो. तेवढाच राजेशाही… तेवढाच तेज पुंज "
"मग ती कोवळी किरणे अंगावर घेत एखाद्या टपरी समोरच्या बाकावर समोर चहा आणि हातात वर्तमानपत्त्रं घेऊन तास दीड तास नुसतं बसून राहावं… सूर्याच्या तेजाने शरीरातील प्रत्येक हाड नी हाड शेकून घ्यावा … "
"क्या बात है … जोश्या… मस्तच "
आणि अजून एक गोष्ट म्हणजे थंडीत करता येणारा पोशाख.
एक हाल्फ किंवा फुल स्वेटर अंगावर चढवला कि काय रुबाबदारपणा येतो म्हणून सांगू. उगीचच ऋषी कपूर झाल्या सारखं वाटतं…
"अए … रिशी पकुर … " साई स्टाईल मध्ये देशपांडे म्हणाला.
सगळे हसले. चहाचे झुरके घेण्यात मग्न.

अचानक जोशी म्हणाला
"च्यायला … थंडीतला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम तर विसरलोच आपण "
"कुठला ?"
"शेकोटी"
"शे… को … टी … " सगळे एका सुरात.
"खरंच यार… आधी चौका चौका त पेटणारी शेकोटी आता फक्त गुरखे आणि वॉचमन हेच पेटवताना दिसतात. "
"शेकोटी म्हणजे एक पाहुनचारच होता… कुणीही एकाने शेकोटी पेटवावी मग हळू हळू एक एक करून कुणीही तिथे येउन बसाव… त्या साठी ओळख असण्याचीहि गरज नाही.
ओळख आपोआपच होते. तिथे रंगणाऱ्या गप्पांची सर कशालाही नाही. "
"आम्ही पण न चुकता शेकोटीला जायचो … आमची सासू घेऊन … हसत सावंत म्हणाला.
सगळे मनमुरादपणे हसले.
"कुठे हरवले यार ते दिवस … गेल्या १० वर्षात एवढा फरक पडावा… "
"लोकांना आता फक्त ए शी ची सवय लागलीये रे … "
"हल्ली वेळ नसतो लोकांना… पैसा पैसा करत माणूस सुखाचे असे कित्येक हिवाळे गमावत चाललाय "
"ए आपण करायची का शेकोटी ?" जोशी
"करूयात कि … कधी करायची ?" उत्साहाने सावंत म्हणाला.
ह्या शुक्रवारी करू . आठवडाभर ऑफिसात भरपूर सुका कचरा साठतो.
शुक्रवारी ऑफिसात उशिरा पर्यंत थांबू आणि करू शेकोटी. "
"मजा येईल रे … जवळ जवळ ८-९ वर्षांनी शेकोटीजवळ बसेन" सगळ्यांचे चेहरे अजून न पेटलेल्या शेकोटीने उजळून गेले …
"ए ए ए … ऐक ना … सौमित्र अवतरतोय अंगात … " जोशी
"हो का … होऊन जाऊ दे… "

"ऐका हा … " घसा साफ करत जोशी बोलू लागला

कडाक्याची थंडी ओट्यावर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का ?
हाताची घडी सोड … तळहातावर झेल दवबिंदू …
इवलासा दवबिंदू पिउन टाक …
बघ माझी आठवण येते का ?
सूर्याची कोवळी किरणे चेहऱ्यावर घे …
डोळे मिटून घे … तल्लीन हो…
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड
टेकडीवर ये … दाट धुक असेलच …
हात लांबवून उभी राहा … काटा येईल अंगावर
बघ माझी आठवण येते का ?

या नंतर कडक चहा घ्यायला विसरू नकोस
या नंतर शेकोटी जवळ बसायला विसरू नकोस
या नंतर गरम पांघरून घे, झोपी जाण्याचा प्रयतन कर
येत्या हिवाळ्यात … एक दिवस तरी …
"बघ माझी आठवण येते का … " सगळे एका सुरात म्हणाले
आणि शेकोटीची स्वप्नं रंगवत निघाले…

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

जेपी's picture

31 Oct 2014 - 8:32 am | जेपी

चान चान . *wink*

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2014 - 9:00 am | अत्रुप्त आत्मा

सोफा,शिक्रेट आणि अंडी! अशी पुढची डिश वाढावी काय!? :-D

आनन्दा's picture

31 Oct 2014 - 10:09 am | आनन्दा

मस्त एकदम

समीरसूर's picture

31 Oct 2014 - 10:43 am | समीरसूर

खूपच छान! बोचणार्‍या थंडीत कढत पाण्याने आंघोळ केल्यानंतर जसे वाटते अगदी तसे वाटले लेख वाचून. सूर्याचे वर्णन मस्तच! आणि शेवटची कविता भारी! :-)

वेल्लाभट's picture

31 Oct 2014 - 3:07 pm | वेल्लाभट

अख्या धाग्यात मला सिगरेट दिसली नाही कुठे, शीर्षक सोडून. विझली की विसरलात?

खोंड's picture

1 Nov 2014 - 11:23 pm | खोंड

दर वेळी त्यांची सिगरेट दाखवली कि जोशी बुवांना राग येतो … सिगरेट implicit आहे असं जोशी बुवा म्हणतात *lol*

वेल्लाभट's picture

31 Oct 2014 - 3:08 pm | वेल्लाभट

धागा मस्तच. थंडी लव्हलीच.

बॅटमॅन's picture

31 Oct 2014 - 3:32 pm | बॅटमॅन

आंघोळ बाकी भावली.

(कढत्त पाण्याने आंघोळप्रेमी) बॅटमॅन.

आगाऊ म्हादया......'s picture

1 Nov 2014 - 8:56 am | आगाऊ म्हादया......

सही वाटलं...मी पण असाच..थंडीत फक्त बंडी घालून फिरणारा!!