चिनी चित्रकार आणि नेपाळी छायाचित्रकार

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
28 Oct 2014 - 6:36 am

आज सकाळी माझी भलतीच निराशा झाली, सारसबागेत दीपोत्सव असतो दर वर्षी...सुंदर आकारात मांडलेल्या पणत्या ही खरच मेजवानी असते डोळ्यांना, खास करून पहाटे ४-६ या वेळेतल्या अंधारात. त्यातूनही त्या प्रकाशात मधेच अनेक प्रसन्न, गोड चेहरे पाहून अधिकच छान वाटायला लागतं.
पणत्या लावण्यासाठी लोकं मध्यरात्री २ पासून जागा धरून ठेवायला कमी करत नाहीत. आणि नंतर मात्र creativity चा जो काही कस लावतात ना...कमाल!!
पण आजचा चित्र वेगळच होतं, तोच canvas ठेऊन चित्रकार बदलल्यासारख बदललेलं चित्र...चिनी लोकांचं आपल्या बाजारपेठेतल आक्रमण. ५० रुपयाला मिळणारा तो हॉट एअर बलून. सगळीकडे तेच तेच आणि तेच. एका दिवाळीत चित्र बदलल. मागच्या वेळी सगळ छान होतं. नक्कीच!! आकाशात ते दिवे पहायला फार मस्त वाटत, सुंदर दिसत...पण किती वेळ?? ३ मिनिट?? त्यानंतर??
कुठल्यातरी निद्रिस्त पक्षाच्या घरट्याजवळ ते कोसळणार..झाडाची १-२ पानं जळणार, त्या बलून वर चिनी लिपी असणार, त्या बलून चा कचरा सारसबागेची शोभा घालवत असणार ...
ते मंद तेवणारे दिवे, लोकांची creativity लोप पावल्यासारखीच. मला सुचत नसलं, जमत नसलं तरी मुक्तपणे आस्वाद घ्यायला नक्कीच आवडायचं, पण गर्दीच फार.त्यात सगळ्यांना तो बलून सोडायचा होता. छे!! नको नको झाल...
फारच वाईट वाटायला लागलं...अनेक गोष्टींमुळे!
ह्या सगळ्या मन:स्थितीचा अंत शोधत होतो मी..दिवाळी असून छान वाटत नव्हतं. एकंदर पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल पाहून Late lessons from early warnings हा रिपोर्ट आठवून विषण्ण वाटत होत...
काय कराव या विचारात होतो, अचानक चान्खा बिस्त या नेपाळी मित्राचा call आला...विद्यापीठाच्या International hostel मध्ये दिवाळी साजरी करू म्हणत होता...आग्रह केलाच त्याने..मीही अगदी नकळत हो म्हणालो. जेवण पण होतंच.
मी जाणार म्हणून पटकन आईने पुन्हा चकल्या केल्या,चिवडा लाडू तर नेलेच त्यांच्यासाठी. इराणी, पाकिस्तानी, व्हिएतनामी, नेपाळी, कुर्चीस्तानी आणि स्वीडन इ. देशातले मित्र भेटले...काही नव्याने मित्र झाले. फराळ म्हणजे काय हे सांगताना जीव गेला माझा. पण फारच आवडला सगळ्यांना फराळ.
चान्खा ने एक आणखी चांगली गोष्ट केलेली, ती म्हणजे “तुम पोंडीत है, नोनभेज नाही कायगा, इसलिये ये भेज खाव” अस म्हणून माझ्या एकट्यासाठी शाकाहारी जेवण तयार केलेलं...कोणे मी ह्यांचा? पण त्यांना खरच आनंद झालेला मी गेल्याचा...एक पुणेरी मित्र आकाशही सकाळपासून तिथे त्यांच्या सोबत अभ्यासाला होताच. David रुळला आहे...जरा इथल पाणी नाक न मुरडता पितो, बर वाटलं.
तुडुंब खाऊ घालून चान्खा कुठेतरी पळून गेला...जरा वेळाने खाली गेलो तर नेपाळी नाचाची तयारी चालू होती.
एक रिंगण करायचं...मध्ये एक जण उभा राहून काय काय मागतो देवाकडे...आणि आपण होकारात होकार मिळवायचा...व्हय म्हाराजा म्हटल्यासारख. आज त्यांचं नवीन वर्ष सुरु होतं, म्हणून हे सगळं. भाषा म्हणजे सगळ ओळखीचं वाटूनही न समजल्यासारख.
मग तिथे पूजा झाली, नेपाळी झेंडा पण होता पूजेत हे विशेष. पुन्हा नाच झाला त्या रिंगणात...मग प्रत्येकाच्या कपाळाला तांदूळ लावण्यात आले आणि लक्ष्मी आणि सरस्वती देवीकडे शुभेच्छा कथन केल्या. त्यानंतर मात्र बारशापासून १३व्या पर्यंत काय असत असल्या गप्पा झाल्या तर्क मल्ला बरोबर. इतरांना दिवाळी म्हणजे काय ते समजावल. David ला लक्ष्मीपूजन आणि पैसा यातला रिलेशन शोधत बसायच होत...तेही समजावलं. Girls Hostel मधून पण समवयस्क मैत्रिणी आल्या होत्या. एक जुनं भांडण मिटल.
तेवढयात कुणीतरी २५ इन १ असला फटाका लावलाच, जरा वाईट वाटल मला पुन्हा पण सकाळसारखाच इलाज नव्हता....
त्यानंतर प्रत्येकजण कस वाटल ते सांगत होता...खर्या अर्थाने सांस्कृतिक देवाण घेवाण झाल्याचा आनंद खूपच होता. मागच्यावर्षी दिपेन्द्र या मित्राला एक गाण karaoke करून देताना चांगलच पाठ झालेलं...खूप शांत आणि मस्त अर्थपूर्ण गाणं आहे, “बस मा छैनो मेरो मन” म्हणून....ते म्हणून दाखवलं त्यांना. खूपच आनंद झाला सगळ्यांना.
या आनंदी क्षणांनी आजचा दिवस संपला, त्याची छबी राहणारे मनात...पण ती मनात उतरवणारया चान्खाचा मात्र मी कायम ऋणी राहीन.
-आगाऊ म्हाद्या(२४ ऑक्टोबर १४)

समाजअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

28 Oct 2014 - 7:14 am | जेपी

मुक्तक आवडल.
छान

आगाऊ म्हादया......'s picture

28 Oct 2014 - 9:08 am | आगाऊ म्हादया......

धन्यवाद!

शीर्षक आणि लेखामधे परस्पर संबद्ध वाटत नाही.

आगाऊ म्हादया......'s picture

28 Oct 2014 - 9:09 am | आगाऊ म्हादया......

अरेरे...तो समजवावा लागणं हे माझं अपयश आहे.

अर्धवटराव's picture

28 Oct 2014 - 9:29 am | अर्धवटराव

तुमी वरिजनल मिपाकर नाय काय? वेल्लकम्म हियर.

मुक्तक मस्त जमलय :)

आगाऊ म्हादया......'s picture

28 Oct 2014 - 4:25 pm | आगाऊ म्हादया......

कधी असतो कधी नसतो...आल्यावर मात्र सगळ वाचून काढतो...धागा चांगला नसला तरी मिपाकर ज्या कमेंटा करतात न....वा वा वा!!
असो, धन्यवाद!

बहुगुणी's picture

28 Oct 2014 - 2:28 pm | बहुगुणी

ते “बस मा छैनो मेरो मन” जरा टाका इथे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर, ऐकायला नक्की आवडेल. आणि अर्थही सांगा.

आगाऊ म्हादया......'s picture

28 Oct 2014 - 4:29 pm | आगाऊ म्हादया......

attachment लावायची सवय नाही, थांबा जरा,प्रयत्न करतोय.

नवीन सुधारणा झाल्या असतील तर माहीत नाही, पण इथे अ‍ॅटॅचमेंट करण्याची सोय बहुतेक नाहीये.

तुम्ही ऑडॅसिटी वापरून तुमचं ध्वनिमुद्रण एम पी ३ स्वरुपात डिव्ह्शेअर सारख्या फाईल शेअरिंग साईटवर ठेवू शकाल, आणि मग तो दुवा इथे द्या (किंवा ते ध्वनिमुद्रण तिथून इथे एम्बेड करा.)

आगाऊ म्हादया......'s picture

29 Oct 2014 - 8:29 am | आगाऊ म्हादया......

नवीन प्रकार कळला तुमच्यामुळे!
बसमा छैनो मेरो मन

आगाऊ म्हादया......'s picture

29 Oct 2014 - 8:32 am | आगाऊ म्हादया......
बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 4:33 pm | बॅटमॅन

मी चुकून अ‍ॅसिडिटी वाचलं. =))

खटपट्या's picture

29 Oct 2014 - 4:38 am | खटपट्या

जे काही आहे ते चांगलंय !!

मुक्त विहारि's picture

29 Oct 2014 - 6:12 am | मुक्त विहारि

आवडले...

ऐकायला फारच मधूर वाटलं, धन्यवाद! आता अर्थही येऊ द्या.

आगाऊ म्हादया......'s picture

30 Oct 2014 - 3:05 pm | आगाऊ म्हादया......

हं ते जमत नाहीये अजून आणि divshare ला इमेल पण कन्फर्म होत नाहीये.
अर्थाचं म्हणाल तर अगदी शब्द अन शब्द नाहीये माझ्याकडे.
चान्खाला किंवा तर्कला गाठून अनुवाद करून घेईन.

पण छैना म्हणजे 'नाही'. शब्द आहेत तसे हिंदीशी relate करा ,खुपसं गाणं समजतं.

बाकी गाण्याचा शोध घेता घेता त्याचा व्हिडिओ सापडला, ज्यातलं गाणं आणि तुमचं स्वतःचं व्हर्जन यात खूपच साम्य आहे हे लक्षात आलं, तुम्ही आता आणखी गायनाचे नमुने इथे टाका, आणि 'जियो मिपा'वर झेंडा लावून तुम्ही कुठे वास्तव्यास आहात ते मिपाकरांनाही कळू द्या, म्हणजे भविष्यातल्या कट्ट्यांना तुमचं गाणं आसपासच्या मिपाकरांना ऐकायची संधी मिळेल.

त्या व्हिडिओमधली दृश्ये पाहून जुन्या 'पहेली' चित्रपटाची आठवण झाली.

धृपदाच्याच नावाच्या सिनेमाचं ट्रेलरही पाहिलं, एच आय व्ही शी संबंधित नेपाळी सिनेमा आहे नन्रता श्रेष्ठचा.

आगाऊ म्हादया......'s picture

30 Oct 2014 - 10:30 pm | आगाऊ म्हादया......

अहो मी ओरिजिनल गाणंच टाकलंय...मी काही माझं रेकॉर्ड नाही केलेलं.

बहुगुणी's picture

30 Oct 2014 - 10:50 pm | बहुगुणी

मला वाटलं मला hidden diamond सापडला :-)

तुम्ही एक गाण karaoke करून देताना चांगलच पाठ झालेलं...खूप शांत आणि मस्त अर्थपूर्ण गाणं आहे, “बस मा छैनो मेरो मन” म्हणून....ते म्हणून दाखवलं त्यांना. खूपच आनंद झाला सगळ्यांना. असं लिहिलंत म्हणून वाटलं की ते तुमचंच रेकॉर्डिंग आहे.

असो, तुम्ही म्हंटलेलं व्हर्जन टाका, आवडेलच ऐकायला.

छान लेखन ,गाणे ऐकता नाही आले (फ्लैश प्लेअर इल्ले).

आगाऊ म्हादया......'s picture

30 Oct 2014 - 3:08 pm | आगाऊ म्हादया......

नाव कंजूस पण प्रतिक्रिया देताना तशी बरीच मोठी दिलीत.:-D

बाकी सर्वांचे आभार!

पैसा's picture

30 Oct 2014 - 5:20 pm | पैसा

लिहीत रहा अजून!

आगाऊ म्हादया......'s picture

30 Oct 2014 - 10:28 pm | आगाऊ म्हादया......

:-)

कंजूस's picture

30 Oct 2014 - 6:41 pm | कंजूस

मी लगेच आजच DIVSHARE वर साइन अप करून एक फाइल चढवली त्याची कोणती लिंक वापरायची ते बहुगणी यांना विचारले आहे. इतरही ऑडिओ शेअर साइट धंडाळत आहे. परंतू सूचना अशी दिसते की३० दिवसांत कोणीच पाहिले नाही तर ती फाईल डिलीट करतात /होते. युट्युब -श्टाइल ऑडिओ स्टॉरिज पाहिजे आहे.लवकरच मार्ग निघेल /दाखवेल कुणितरी इथे.

बहुगुणी's picture

30 Oct 2014 - 6:53 pm | बहुगुणी

डिव्हशेअर ला साईन करा, फुकट आहे,क्रेडिट कार्ड लागत नाही. ते केलंत की बरीच जागा मिळते, आणि त्या फाईल्स वर्षानुवर्षे राहतात (माझ्या ४ वर्षे आहेत).

कंजूस's picture

31 Oct 2014 - 10:37 am | कंजूस

ऑडिओ शेअरिंग साईट
आगाऊ म्हाद्या ,बहुगुणी.
ऑडिओ अपलोड/शेअर करून{स्वत:चे केलेले} त्याची लिंक देण्यासाठी शोधलेल्या प्रयत्नातून एक साइट मिळाली. कोणत्याही ऑडिओ फॉर्मेट( WAV WMA AAC AMR -इ०)अपलोड करून त्याची MP3 फाईल करून लिँक मिळाली. शिवाय फ्लैश/प्ले +डाउनलोड ऑप्शनही आले.

MP3 , flash player आणि अकॉउंट बनवणे हे सर्वच प्रश्न एका ठिकाणी
Vocaroo dot com येथे सुटले.

बुलबुलचा रेकॉर्ड केलेला आवाज(WAV 580kb size)ची लिंक MP3पाहा:

LINK=http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS

इथे आहे

आगाऊ म्हादया......'s picture

1 Nov 2014 - 8:58 am | आगाऊ म्हादया......

आभारी आहे.