दिवाळीचे फटाके !

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
22 Oct 2014 - 10:29 am

(वाघाच्या गुहेतला एक सीन)

धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?"

थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून"

धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … "

थोरले राजे: "काय म्हणालास?"

धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?"

थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार"

धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?"

थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत. आपल्या मनासारखी खाती मिळतील तर महाराष्ट्रात शिवशाही अवतरण्यासाठी तडजोड करणे भाग आहे वगैरे वगैरे आणि नाही मिळाली तर अफजलखान वगैरे नेहेमीचे आहेच. आणि ही सुभाषची मते आहेत असे म्हणायला तू रिकामा आहेस"

धाकटे राजे: "बाबा, पण ते माथुर तर न्यूजवाल्यांना म्हणाले की आम्हीच मोठा भाऊ"

थोरले राजे: "हे भावाचं काय काढलंस, तो कृष्णकुंजवाला माझा भाऊच ना तरी पण …"

थोरल्या राजांनी इथे मध्ये एक पाँज घेतला. मग राजांचा मूड सुधारण्यासाठी धाकटे राजे घाईघाईने म्हणाले.

धाकटे राजे: "तो दगाबाज नारर्या आपटला शेवटी"

थोरले राजे (स्वतःशीच): "तरीही त्यानं पोराची सोय लावलीच ना … आणि इथे याला अजून काहीच कळत नाही"

धाकटे राजे (पुन्हा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?"

------

(बारामती होस्टेलवर)

(तो कपाटातला खंजीर कुठे दिसत नाही, त्याच्या शोधात सर्व कर्मचारी दंग आणि एका गुप्त दालनात)

बाळराजे: "पण काका, मला एकदा विचारायचं तुम्ही. ताई आणि मी कुणी बाहेरचे आहोत का? त्या प्रफुल्लला दिल्लीत मंत्र्याचा बंगला हवा आहे म्हणून तो तुम्हाला काहीही सल्ले देतो."

काका: "मी आहे म्हणून वाचलास, नाही तर आली होती तुरुंगात जाण्याची पाळी."

बाळराजे: "काका, तुमच्याकडून काहीच शिकलो नाही की काय आम्ही. पुरावे मागे ठेवायला मी काय ***** आहे काय? आहो त्या आगीत सगळ्या फायली जळल्या. बाकी मी आपल्या विहीरीत फेकून दिल्या"

काका: " अरे त्या पृथ्वीनं आधीच आपल्या आयपँडवर सगळी महत्वाची पाने स्कॅन करून ठेवली आहेत. उगीच नाही तो परदेशात शिकून इंजिनियर बनला"

बाळराजे: "तिच्या**** आत्ता पाठवतो दहा लोक आणि आणू उचलून तो आयपँड. तसाही जेलला आपण घाबरत नाही."

काका: "आता गप बसून राहा. मोदीकाकांचा फोन येणार आहे. तो आल्यावर मग पाहू"

------

(नागपूरच्या एका वाड्यात गावाकडचे दोन आमदार)

एक: "सगळी तिकिटे पाठवली नक्की?"

दुसरा: "शंभर टक्के. दुपारला आपले लोक येणार म्हंजे येणार"

एक: "त्या बामणाला अजाबात पत्ता लागू द्यायचा नाही. शी. यम. आपलाच झाला पायजेल"

दुसरा: "मग आपलं भाऊ डायरेक मोदीला तसं सांगत का नाय?"

एक: "आरं येडा की काय तू. ज्याच्या मनगटात जोर तो शी. यम. मग त्याला मोदीतरी कसा नाय म्हनल?"

------
(दोन फुल एक हाफ या तंबी दुराई स्टाईल मध्ये लिहिण्याचा माझा एक प्रयत्न. शब्द माझे, शैली त्यांची)
-----

विनोदलेख

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

22 Oct 2014 - 10:41 am | सतिश गावडे

दिवाळीच्या फराळासारखा खुसखुशीत लेख.
शेवटचा हाफ तितकासा जमला नाही. मात्र दुसरा चांगला आहे.

पहिला एकदम खल्लास :)

मदनबाण's picture

22 Oct 2014 - 10:44 am | मदनबाण

झ - का - स ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

एस's picture

22 Oct 2014 - 10:58 am | एस

खुमासदार! बाकी ते 'आयपँड' वाचून उगीच मोजीभौंची आँठवन् आँलीं... ;-)

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 11:37 am | टवाळ कार्टा

मस्त

जेपी's picture

22 Oct 2014 - 11:59 am | जेपी

मस्त.आवडल

अविनाशकुलकर्णी's picture

23 Oct 2014 - 9:26 am | अविनाशकुलकर्णी

आम्हि पुणेकर "फटाकडे उडवले" असे म्हणतो.
तर अन्य महाराष्ट्रात "फटाके फोडले" असे म्हणयची रित आहे

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 2:50 pm | पाषाणभेद

नाय ब्वॉ तसं काही नसतं. असं तुम्ही बोलून एकदम पुण्याच्या अंगावर घेवू नका.
जे फटाके उडून फुटतात ते "फटाके उडवले"
अन जे बसल्या जागी फुटतात ते "फटाके फोडले"

सतिश गावडे's picture

23 Oct 2014 - 4:01 pm | सतिश गावडे

अकुंना या धाग्यावर फटाके उडवायचे असतील. :)

साती's picture

23 Oct 2014 - 10:29 am | साती

छान छान फटाके.
अजून अ‍ॅटम बाँब, लक्ष्मी बार येऊंद्या.

विवेकपटाईत's picture

23 Oct 2014 - 2:11 pm | विवेकपटाईत

मस्त आवडला
"http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html" title="हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद">

अनुप ढेरे's picture

23 Oct 2014 - 5:22 pm | अनुप ढेरे

हा हा हा, भारी.

पिंपातला उंदीर's picture

23 Oct 2014 - 5:26 pm | पिंपातला उंदीर

भारि. जम्लय

खटपट्या's picture

23 Oct 2014 - 10:55 pm | खटपट्या

मस्त !! आवडलं !!

किसन शिंदे's picture

25 Oct 2014 - 7:08 pm | किसन शिंदे

झक्कास आणि खुसखुशीत लेख. :)

तुमचा अभिषेक's picture

27 Oct 2014 - 11:53 pm | तुमचा अभिषेक

खुमासदार, आवडले,
दोन फुल्ल एक हाल्फ तंबी दुराई स्टाईल जमलीय :)

अर्धवटराव's picture

28 Oct 2014 - 9:25 am | अर्धवटराव

:)