स्ट्रेट फ़्रॉम द हार्ट !

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
22 Oct 2014 - 6:31 am
गाभा: 

कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे. ज्याची चिकीत्सा करणे आवश्यक बनलेले आहे.
सध्या एक वातावरण असे झालेले आहे की तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्हाला तुमची राष्ट्रनिष्टा सतत सिद्ध करावी लागते. जर ब्राह्मण असाल तर तुम्हाला दलितांच्या वेदना कळुच शकत नाहीत. तसेच जर तुम्ही स्ट्रेट असाल तर गे चळवळी विरोधात तुम्ही अगदी साधा जरी मुद्दा मांडु लागलात तर तुम्ही प्रतिगामी आहात असा शिक्का तात्काळ मारला जातो. हे अतिशय चुकीचे आहे. यातील समलैंगिंकांचा जो एक आक्रमक असा वर्ग आहे व तो ज्या पद्धतीने कार्य करत आहे ते अतिशय चुकीचे व अन्यायकारक असे आहे. या विरोधात कुणीच बोलायला धजत नाही म्हणुन समलैंगिकांचे गैरसमज वाढत च चालले आहेत. म्हणुन मी समलैंगिकते विरोधात माझे म्हणणे मांडत आहे.

समलैंगिक चळवळीची सुरुवात अगोदर अतिशय संयत संयमी रीतीने सुरु झाली. यातील लोक अगोदर सभ्य रीतीने आपला मुद्दा मांडत असत. सिव्हीलाइज्ड रीतीने आंदोलने, मिरवणुका आदि माध्यमातुन आपले विचार मांडत असत. पोलिसांना फ़ुल देणे आदि सकारात्मक रीतीने आंदोलन होत होते. असे सध्याही होते. मात्र हळुहळु यात एक बदल होतांना दिसत आहे. समलौंगिकांची पहीली लज्जा बुजरा स्वभाव जाउन त्याची जागा उद्दामपणाने घेतलेली दिसत आहे. आता ते अधिकाधिक उद्दामतेने वागु लागलेले दिसताहेत. याला अनेक कारणे आहेत. यातील महत्वाचे कारण म्हणजे समाजाने दाखविलेली आंधळी सहानुभुती. आंधळी अशासाठी की आपण जर समलैंगिकतेला विरोध केला तर आपली गणती ही प्रतिगामी मागास लोकांत होइल या भितीने वा अगोदर मनात असलेल्या गिल्ट ने की आपण या लोकांना फ़ार वाइट वागवलेले आहे. गिल्ट व रेकग्निशन च्या प्रेरणेतुन ( पुरोगामीत्वाच्या रेकग्निशन साठी) दिलेली सहानुभुती ही लंगडी च असते. कारण त्यात चिकीत्से चा अभाव व प्रत्येक च बाबतीत वाजवा रे वाजवा जे काय करताय ते चांगलच आहे व तुमच्यासारखे तुम्हीच ही भावना असते. मात्र हे कौतुक दिर्घ काळ टीकत नाही.

या बाबतीत दलित साहीत्य व त्याला उच्चवर्णीयांनी दिलेला प्रतिसाद याची तुलना करणे चुकीचे ठरणार नाही. दलित साहीत्याचे आगमन झाले तेव्हा त्याला असाच चिकीत्साशुन्य प्रतिसाद तेव्हाच्या उच्चवर्णीय लेखकांनी दिला होता. त्यात पु.ल. देशपांडे सर्वात आघाडीवर होते आला दलित लेखक की दे प्रस्तावना सर्व च लेखनाच डोळे झाकुन कौतुक टीकेचा अवाक्षर ही नाही अगदीच चिकीत्साशुन्य समीक्षा का ? तर प्रचंड गिल्ट आपल्या पुर्वजांनी केलेली पाप फ़ेडायची तर मग पाठींबा दिलाच पाहीजे ही भावना. मग सर्वच खटकणारया बाबींकडे दुर्लक्ष करायच. मग त्यांच्या मागे मागे बाकी समाज. याला समंजस चिकीत्सक ब्रेक लावला तो नरहर कुरुंदकर यांनी भजन व तेंडुलकरांनी कन्यादान या नाटकाने. कुरुंदकर या निर्भीड साक्षेपी विचारवंताने दलितांना त्यांच्या चुकीच्या दिशेने जात असलेल्या चळवळीची तिच्या मर्यांदांची चुकांची जाणीव करुन दिली. कन्यादान नाटकाने तेंडुलकरांनी दलित युवकांच्या मनात असलेल्या द्वेषाला नकारात्मक बाजुला उघड करुन दाखविले. व त्यानंतर नामदेव ढसाळ जे अगोदर घाशीराम कोतवाल या नाटकासाठी तेंडुलकरांच्या पुरोगामित्वाचे कौतुक करत होते. तेच ढसाळ तेंडुलकरांनी आपले घाशीराम चे पाप धुण्यासाठी तेंडुलकरांनी आता कन्यादान नाटक केलेले आहे असा दांभिक आरोप करत. पुढे जाउन दलित साहीत्याच्या मर्यादा काळाने स्पष्ट केल्या.पण दलित लेखकांनी इतक्या टोकाच्या अहंकार बाळगला की जे उच्चवर्णिय सुरुवातीला सहानुभुतीने त्याकडे वळले होते त्यांनी ही अखेर कंटाळुन त्याकडे पाठ फ़िरवली. कारण कोण ऐकुन घेइल हो. एक तर पुर्वजांनी केलेल्या पापाचा तिच्या वंशजाशी काय संबंध वर सारख सारख तुम्हाला आमची भाषा आमचे दु:ख कळुच शकत नाही. बर कॊणी संवेदनशीलतेने संवाद साधु पाहतोय प्रामाणिक प्रयत्न करतोय तर तुमची आम्हाला समजुन घेण्याची क्षमता तर नाहीच शिवाय समीक्षा करण्याची देखील लायकी नाही आम्ही आमचीच समीक्षापद्दती निर्माण करु आम्ही आमचेच समीक्षक विकसीत करु,मग याचा परीणाम जो व्हायचा तोच होणार. स्वत:च्याच व्यासपीठांवर स्वत:च्याच मर्यादित वर्तुळात ते साहीत्य फ़िरु लागले. मग पॆंथर चळवळ आली, राजा ढाले काय करणार तर सत्यकथे ची होळी करणार. का ? कारण त्याला पर्यायी साहीत्य निर्माण करण्याची क्षमता नाही म्हणुन ?

तर अगदी याच मार्गावर याच रीतीने आता समलैंगिक चळवळ चाललेली आहे. करण जोहर चे च उदाहरण पहा. आपला मुद्दा पोहोचावा यासाठी त्याने अगोदर विनोदाचा कुशल वापर केला व समलैंगिकता ही कन्सेप्ट दोस्ताना या चित्रपटाच्या माध्यमातुन हसत खेळत लाइटली का होइना हळुच मागील दाराने कुशलतेने पोहोचवली. आता त्याच्यात च झालेला बदल बघा काही काळानंतर तो बॉम्बे टॉकीज चित्रपट बनवतो. त्यातुन एक अत्यंत उग्र असा उद्दाम असा समलैंगिक कथानायक दाखवितो. ज्याच एकमेव क्वालिफ़ीकेशन तो समलैंगिक आहे हेच . त्याला मन मानेल तस तो वागतो अत्यंत तुछ्चतेने सभोवतालच्या लोकांशी च नव्हे तर स्वत:च्या कुंटुंबियांशी वर्तन करतो. कारण तो गे आहे त्याला सर्व समाज दांभिक वाटतो. त्याला प्रत्येक ठीकाणी ओरडुन आक्रस्ताळेपणाने मी गे आहे मी गे आहे असे ओरडण्याची अटेन्शन सीकींग ची सवय लागलीय. त्याच्या विचारसरणीला पुष्टी देइल असा दुसरा गे त्याच्या आयुष्यात येतो. हा दुसरा गे अतिशय भ्याड दांभिक असा आहे. स्वत: सुशिक्षीत सुस्थित असुनही तो एकटा अविवाहीत वा उघड गे म्हणुन राहण्याचे सर्व पर्याय नाकारुन एका खोट्या विवाह बंधनात त्याने स्वत:ला अडकवुन घेतलेल आहे. व त्यामुळे राणी मुखर्जी या त्याच्या पत्नीला तो लैंगिक तुप्ती देण्यात कमी पडतो. आहे. इथे अतिशय सुंदर निरागस असलेली राणी गोंधळात स्व-संशयाच्या चक्रात या भ्याड समलैंगिकामुळे अडकलेली आहे. तिचा विवाह फ़सलेला आहे. यातील हा उद्द्दाम तरुण मुलगा मग त्याला जबरदस्तीने त्याच्या कोशातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तो भर रस्त्यात कुठे ही कसा ही बेताल उद्दाम वागतो. राणीला तिच्या भावनांची कुठलीही कदर न करता अतिशय क्रुरतेने तिचा नवरा गे आहे हे वास्तव तिच्यापुढे उघड करतो. वास्तविक ती त्याच्या इतकीच परीस्थीतीची बळी आहे. तो अधिक संवेदनशीलतेने तिचे दु:ख समजुन घेउ शकतो. मात्र तो तसे करत नाही. कारण करण जोहर हा समलैंगिक एक मेसेज एक विशीष्ट अशी मानसिकता जी अनेक समलैंगिकांची बनलेली आहे उद्दाम असंवेदनशील ती त्या पात्राद्वारे व्यक्त करतो. अतिशय विचारपुर्वक मेसेज देण्यासाठी बनविलेला चित्रपट समलैंगिकांची जहाल पणा कडे होत असलेली वाटचाल दाखवतो. करण जोहर नेमका हाच मेसेज या चित्रपटाद्वारे देउ पाहतो. की आम्हाला पर्वा नाही तुमची तुमच्या समाजाची आम्हाला काय वाटेल त्या रीतीने आम्ही वागु तुम्हाला पटत नसेल तर दोष तुमच्यातच आहे. हा उद्दाम नायक व त्याची वर्तणुक ही काल्पनिक नसुन प्रत्यक्षातील समलैंगिकांची झलक मात्र आहे. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो तर या आरशात समलैंगिकांच्या वास्तव जीवनातील उद्दामता स्पष्ट दिसुन येत आहे. नव्हे ती मिरवलेली आहे. अमिताभ ने जंजीर नंतर एक प्रचंड मोठा प्रभाव त्या काळातील तरूणाई वर टाकलेला होता. तसाच परीणाम गे कम्युनिटी वर या चित्रपटाने टाकलेला आहे. मात्र हा अटीट्युड वाईट आहे.

समलैंगिकांमध्ये पुर्वी व्यक्त होण्यापासुनच लज्जा होती आता मात्र त्या लज्जेची जागा विचीत्र उद्दामतेने घेतलेली आहे. अगोदरचा इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स तसाच आहे मात्र आता त्यात एक अरोगन्स ऑफ़ इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स दिसु लागलेला आहे. यामागे एक विशीष्ट शिकवण फ़ार महत्वाची भुमिका बजावते. जे लोक गे चळवळीला विरोध करतात तीच खर म्हणजे आतुन गे असतात व त्यांचा हा कडवा विरोध हा वास्तविक त्यांचा डिफ़ेन्स मेकॆनिझम असतो ही शिकवण ही अत्यंत घातक अशी शिकवण आहे. जी सातत्याने या चळवळीत मांडली जाते. हीचा पगडा असलेला समलैंगिक समाजातील इतर स्ट्रेट व्यक्तीकडे याच नजरेने बघत असतो. व स्ट्रेट ने जर समलैंगिकाच्या आग्रही लैंगिक मागणी ला विरोध केला (तर हा त्या स्ट्रेट माणसाचा डिफ़ेन्स मेकॆनिझम च आहे ही घटट समजुत गोड गैरसमज असलेला) गे हा त्याच्या अधिकाधिक मागे लागुन त्याला जबरदस्तीने तु गे च आहेस तु स्वत:ला फ़सवतोय आदि म्हणुन ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत असतो.. आणि विशेष म्हणजे अशा समलैंगिकाला आपण दुसरयाच्या लैंगिक हक्कावर स्ट्रेट असण्याच्या चॉइस वर गदा आणतोय असे वाटतच नाही. या फ़ोर्स करण्याचे प्रमाण समलैंगिकां कडुन वाढत आहे.

कोणी स्पष्ट बोलत नाही मात्र सार्वजनिक मुत्र्यांमध्ये असा अनुभव नेहमीच येत असतो. कोणी ना कोणी गे सारखा तिथे घुटमळत असलेला आढळतो. बाजुला कोणी स्ट्रेट व्यक्ती असेल तर अशा माणसाला किळस येइल अशा प्रकारचे हातवारे, इशारे, स्पर्श व लगट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. जसा एक मुलगा जर एका मुलीची लैंगिक छेड अश्लिल इशारे आदि करुन काढत असेल तर तो तिचा विनयभंग मानला जातो. एखादा गे आहे व त्याला जबरदस्तीने एखाद्या स्ट्रेट ने छेडणे हे ही विनयभंग च आहे. त्याच प्रमाणे जो माणुस स्ट्रेट आहे त्याला गे कडुन होणारा आक्रमक लौंगिक छळ हा त्या स्ट्रेट व्यक्तीचा झालेला विनयभंग च असतो. यात भेदभाव का केला जावा. विनय ही जर नैसर्गिक भावना आहे तर ती मुली साठी वेगळी मुला साठी वेगळी गे साठी वेगळी अशी कशी असु शकेल. गे व्यक्तीसारखीच स्ट्रेट व्यक्तीला देखील या जबरदस्तीची किळस च वाटत असते. मात्र एखादी मुलीची छेड काढणारा मवाली जो असतो त्याला कीमान मनात गिल्ट तरी असते. मात्र ज्या गे ला चळवळीतुन समलैंगिकाला व त्याच्या मागणी ला विरोध करणारे स्ट्रेट हे गे च असतात व अधिक कडवा विरोध करणारे तर अधिक च निश्चीत गे असतात अशी शिकवण सातत्याने मिळत असते. त्यांच्या मनात तर काडीचादेखील गिल्ट नसतो. उलटपक्षी या स्ट्रेट मधला लपलेला गे बाहेर काढण्याचे सत्कार्य च आपण करत आहो अशी भावना असते.

यामागे कमिंग आउट चे झालेले भव्य स्वागत ही कारणीभुत आहे. मी बाहेर आलो या धाडसाचे जे अफ़ाट कौतुक केले जाते. उदा. बिग बॉस मध्ये सलमान खान सुशांत या समलैंगिकाची ज़ोळख करुन देतांना त्याच्या थोर कार्याचा परीचय करुन देण्याच्या थाटात हा कसा करेजियसली कमिंग आउट झाला हे सांगतो.( विशेष बाब म्हणजे अशांनी बाकी कुठल्या क्षेत्रात काय योगदान दिले काय शिक्षण/ कर्तुत्व आहे आदि बाबी अगदीच गौण मानल्या जातात )

याचा परीणाम असा होतो की आपण बाहेर येतोय याचाच एक ग्रेटनेस अहंकार या लोकांमध्ये एका बाजुस बळावतो व (गे चे विरोधक हेच गे आहेत या अतिविचीत्र बेसलेस शिकवणूकीमुळे) दुसरया बाजुने मी या स्ट्रेट मधला गे बाहेर काढतो. हा उद्दामपणा सुरु होतो. या बिगबॉस मध्ये ही बघा हा सुशांत नाव असलेला गे सारख सारख त्याच्या वागणुकीतुन मी गे आहे मी गे आहे याचे जमेल तितके भांडवल करुन घेतांना दिसतो. सारखा आपल्या वागणुकीतुन अटेन्शन सीकींग करण्याचा प्रयत्न करणे, मुद्दाम भडक अशी कृती केस आदि करुन ही गे ची अजुन एक खासियत बनत चाललेली आहे.
मला स्वत:ला असे काही अतिशय वाईट अनुभव समलैंगिकांचे आलेले आहेत. मात्र तरीही मी ते जनरलाइज न करता अजुन ही सर्वच गे असे असतात वा चळवळीतले सर्वच लोक असे आहेत असे मानत नाही , मी जी काळजी व्यक्त करतोय ती अशांचे प्रमाण वाढत असलेल्या बाबतीची. गे चळवळतील लोक आत्मपरीक्षण स्वत:च्या दोष वा इतिहासात ही गे च्या बाजुने ही काही अन्न्याय कधी झालेला आहे का या अर्थाने कधीच करतांना दिसत नाही. हे तर त्यांच्या गावी ही नसत. त्यांची एकांगी च विचार करण्याची पध्दत रुढ होत चालली आहे असे दिसते. इतरांनी दाखवलेले मंथनासाठी देखील न स्वीकारणे, आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य अशी भुमिका घेणे नित्याचे झालेले आहे.

.( एक किस्सा या बाबतीत आठवतोय तो इथे रेलेव्हंट आहे. कार्ल पॉपर हा महान तत्वज एकदा विटगेस्टाइन या दुसरया तत्वज्ञाला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा कार्ल ने काही फ़िलॉसॉफ़ीक प्रॊब्लेम्स संदर्भात आपली आरग्युमेंट्स विटगेन्स्टाइन समोर मांडली तेव्हा विटगेनस्टाइन ने ती कुठलाही तार्केक प्रतिवाद न करता ती सर्व मुद्दलातच बाद ठरविली. ही आठवण सांगतांना कार्ल म्हणतो Popper recalled that Wittgenstein “ had been nervously playing with poker.” Which he used “ like a conductor’s baton to emphasize his assertions” and when a question came up about the status of ethics wittgeinsin challenged him to give an example of moral rule. “ I replied: “ Not to threaten visiting lecturers with pokers “. Whereupon Wittgenstein in a rage , threw the poker down and stormed out of the room, banging door behind him,” यातील विटगेनस्टान चे समलैंगिक असणे हा एक रोचक योगायोग च म्हणायला हवा असो)

याची गे ने केलेल्या समलैंगिकांच्या हरॅसमेंट ची फ़ारशी वाच्यता कुणी करत नाही कारण ती गोष्ट स्ट्रेट व्यक्तीला अनेकदा कीळसवाणी व टाळावीशी वाटते. काही दिवसांपुर्वीचे सोनु निगम ची केस या संदर्भात बघावी. झा नावाच्या एका प्रतिथयश समलैंगिक पत्रकाराने सोनु निगम चा अतोनात मानसिक छळ केला. शेवटी कंटाळुन सोनु ने पत्रकार परीषद घेउन आपली व्यथा मांडली. सोनु स्प्ष्ट म्हणतो की तो गे चळवळीच्या विरोधात नाही मात्र तो स्वत: स्ट्रेट आहे त्याला तशा संबधात अजिबात रस नाही. हे सर्व झा ला समजावुन ही झा ने त्याचा पिछा सोडला नाही. सोनु ने स्पष्ट विरोध केल्यावर तर समलैंगिक झा ची मजल इतकी वाढली की त्याने सोनु विरोधात स्वत:ची पत्रकारीतेची पोजिशन वापरुन सोनु विरोधात चिखलफ़ेक करायला सुरुवात केली त्याय्चा करीयरला अपाय होइल असे बदनामीकारक लिखाण हीन पातळीवर जाउन सुड भावनेने केले. झा मधील आक्रमक पणा ही केस हे प्रातिनीधीक आहे. अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्याची वाच्यता करुन स्वत:वर शिंतोडे उडवुन घेण्याची कोणाची इछ्चा नसते. त्यामुळे या समलैंगिकांच आणखी च फ़ावत. आपल्याला विरोध करणारे प्रतिगामी मानले जातील हे माहीत असल्याने व आपण जे करतोय ते किळस मुळे हे लोक उघड करणार नाहीत .यामुळे मग यांचा आक्रमकपणा वाढत जातो. हिंदीत एक म्हण आहे नंगे से खुदा डरे ! तिचा अर्थ समलैंगिकांना सर्वात जास्त कळलेला आहे. या म्हणी मागील भितीचा ते कुशलतेने वापर करतात. सोनु निगमचे समोर आलेले उदाहरण अत्यंत बोलके आहे. व हे समोर आले म्हणुन कळले इतकेच. सोनु त जे धाडस आहे ते क्वचितच कोणी दाखवितो. म्हणुन ही काळी बाजु समोरच येत नाही. जे येत ते एकतर्फ़ि चित्रण ज्यात गे वर काय अन्याय झाला त्याचीच बाजु येते,

गे इतरांच शोषण करु शकतो गे इतरांना आपल्या स्थानाचा पॉवरचा उपयोग करुन एक्सप्लॉइट करु शकतो या बाजुने कोणी बोलण तर फ़ार दुरची गोष्ट विचार देखील करुन बघायला तयार नाही. व अनेकांच्या मनात संताप असतो त्याला वाट करुन देत नाही असेही असते.

भारतीय फ़ॅशन उद्योगात अनेक प्रख्यात डीझायनर रोहीत बाल सारखे व बॉलिवुड मध्ये अनेक गे प्रोड्युसर करण जोहर सारखे आहेत. या दोन्ही क्षेत्रात पडद्यामागे अनेक युवा स्ट्रगलर्स चे प्रचंड मोठ्या प्रमाणात समलैंगिक शोषण होत आहे. या विषयी च्या कास्टींग काउच च्या अनेक टीव्ही वरील चर्चेच्या कार्यक्रमात इंडस्ट्रीतल्याच लोकांनी ही बाब अनेकदा मान्य केलेली आहे. एका कार्यक्रमात करण जोहर ने गंमत करत असल्याचा आव आणत बॆण्ड बाजा बाराती चा नायक असलेल्या हिरोला प्रश्न केला की यशराज मध्ये असा प्रकार तुला आढळला का ( समलैंगिक शोषणाचा अनुभव ) त्याने जेव्हा इनोसंटली यशराज मध्ये तर नाही मात्र मला असे काही अनुभव बॉलिवुड च्या काही समलैंगिक प्रोड्युसर कडुन आले आहेत त्याविषयी सांगावयास सुरुवात केली. त्याबरोबर करण ने अरे मी तर गमतीने विचारत होतो म्हणुन कुशलतेन विषय टाळुन दिला कारण तो त्याच्या भाउबंदाना अडचणीत आणु शकणारे कटु सत्य मांडु लागला होता म्हणुन.
समलैंगिकाने एखाद्याअ स्ट्रेट माणसाकडुन ( माहीतीच्या अभावात) प्रेमाची मागणी करण्यात काही गैर नाही विशेष ही नाही मात्र एकदा स्ट्रेट कडुन नकार आल्यानंतर तो त्याने पचवायलाही शिकले पाहीजे. समलैंगिक चळवळीत गे लोक पोलिसांचे कौन्स्लींग करतात की त्यांनी गे ना कसे ट्रीट केले पाहीजे. पत्रकारांचे करतात की त्यांनी गे संदर्भातील विषय कसे हाताळले पाहीजेत. मला वाटत सर्वात जास्त गरज गे लोकांच्याच काउन्सेलिंगची आहे ती अशी की स्ट्रेट माणुस कसा ओळखावा ? त्याच्या लैंगिकतेचा सम्मान कसा करावा? आपल समलैंगिकत्व हे त्यांच्यावर थोपण स्ट्रेट लोकांचा विरोध हा त्यांचा डिफ़ेन्स मेकॆनिझम नसुन त्यांचि व्यक्तीगत निवड आहे. याच भान ठेवण या संदर्भात गे च कौन्सेलींग होण आवश्यक आहे. तसेच आपल्या आग्रही मागणीने स्ट्रेट व्यक्त्ती ला कीळस वाटु शकत त्याचा ही विनयभंग होउ शकतो याच ही कौन्सेलींग करण गरजेच आहे. पण ज्यांना आपले दु:ख च खरे आपल्या वेदना च खरया असे च वाटते. त्यांना काय कळेल कितपत कळेल सांगण कठीण आहे.

एक स्ट्रेट व्यक्ती म्हणुन सर्व समलैंगिकांना मला सांगावस वाटत की आमच्या डोक्यावरील आमचे केस हे नैसर्गिक खरेखुरे आहेत त्याला विग समजुन उपटण्याचा प्रयत्न करु नये आम्हाला ही त्याचा त्रास होत असतो. तसेच आमचा चेहरा हा खरा आहे त्याला मुखवटा समजुन ओरबाडण्याचा प्रयत्न करु नये आम्हास वेदना होतात.

गे व्यक्तींनी देखील आपल्या सत्तास्थानाचा अनेकदा दुरुपयोग केलेला आहे. गे व्यक्तींनी स्ट्रेट लोकांच शोषण केलेल आहे. अनेक शक्तीशाली सधन समलैंगिक नवाबांनी राजांनी आपल्या समलैंगिक वासनापुर्तीसाठी अनेक निरागस आयुष्यांना चिरडलेल आहे. प्रत्येक गे हा अन्यायग्रस्त च असतो असे नाही सुसंक्रुत असतो असेल च असे ही नाही. सर्वात महत्वाच म्हणजे गे असण हेच जणु काय क्वालिफ़ीकेशन आहे असे जे समजल जात ते चुकीच आहे.

समलैंगिकांना आपल “वेगळ” असण हेच जणु काही” विशेष” आहे अस वाटु लागलय.

गे चळवळीने आपल्यातील वाढत चाललेल्या उद्दामपणा ला असंस्कुत पणा वर चिंतन करणे आपल्यातील दोषांची चिकीत्सा करणे अत्यंत आवश्य्क आहे. गे चळवळीने जे विघातक वळण घेतलेल आहे ते समाजासाठी घातक आहे.

खालील अरुण कोलटकरांच्या कवितेतील समलैंगिक बलात्कार भोगणारया कोवळ्या मुलाची प्रातिनीधीक वेदना समलैंगिकांनी समजावुन घेणे अगत्याचे आहे.

- हो गया ?
- हो गया.
मी मेणाचा भावला
चिकणा हिजडा
भादरलेला
दरबारी हजामानं
हिरेजडीत वस्तरा उघडताच
मी काखा वर केलेल्या
मांड्या फ़ासटलेल्या
पोटावर सुगंधी साबण फ़ेसाळताच
माझा श्वास मंद झालेला
रंगमहालात मी उताणा उखाणा
पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम
बदामी होणारा सलामत
नसत्या झुंबराला
पेटवतो
माझा दुबारा सलाम
मी कुशीला वळेन
तेव्हा माझी विकतची पाठ
ओलावेल गुलाबपाण्यानं
आणि माझ्यावर अंधार पडेल
सुरकुतलेल्या राजाप्रमाणं
लटलटत.
मेणाचा मृत्युंजय भावला
उच्चारेल मृत्याचा राजलंड
बोबडा

वरील लेखाशी संबंधित लिन्क्स

http://zeenews.india.com/home/sonu-nigam-alleges-sexual-harassment-by-se...
http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=677330
http://www.instablogs.com/come-on-baby-light-my-fire-the-male-casting-co...
http://archive.indianexpress.com/news/zeenat-amans-next-movie-on-sexual-...
http://www.youtube.com/watch?v=l8-D96IAIfs
http://www.wnd.com/2002/04/13722/

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 9:42 am | टवाळ कार्टा

समलैंगिकांमध्ये पुर्वी व्यक्त होण्यापासुनच लज्जा होती आता मात्र त्या लज्जेची जागा विचीत्र उद्दामतेने घेतलेली आहे. अगोदरचा इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स तसाच आहे मात्र आता त्यात एक अरोगन्स ऑफ़ इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स दिसु लागलेला आहे.

हे फक्त भारताबद्दलच का in general?

मी हे भारतापुरत खात्रीने सांगु शकतो. इतर देशातील चळवळी ज्या टीव्ही वर्तमानपत्रे आदि माध्यमातुन माहीत होतात तिथे ही काही फार वेगळे चित्र दिसत नाही

छान लेख.
मुद्दा कळाला,पटला.

गुल-फिशानी's picture

22 Oct 2014 - 2:38 pm | गुल-फिशानी

एका विचारसरणी च्या मुद्द्यावर सकारात्मक मार्गाने आपल म्हणण भावना कोणापर्यंत पोहोचल्या तर त्याचा आनंद आणि महत्व माझ्यापुरत तरी फार मोठ आहे.

समजुन घेण्यासाठी
धन्यवाद

सुबोध खरे's picture

22 Oct 2014 - 2:26 pm | सुबोध खरे

व्यंकटेश माडगूळकरांनी १९४६ साली लिहून ठेवले आहे. गरिबीने माणूस लाचार तरी होतो किंवा मुर्दाड तरी. वैचारिक किंवा सांस्कृतिक गरीबिचाही त्यात समावेश असावा.

गुल-फिशानी's picture

22 Oct 2014 - 2:41 pm | गुल-फिशानी

तुम्हाला काय म्हणायच आहे माझा गोंधळ झालाय. हे कशाच्या संदर्भात आहे. कृपया थोड विस्ताराने लिहील तर बर होइल.
ही विनंती

इनिगोय's picture

22 Oct 2014 - 11:26 pm | इनिगोय

खरंय. आपण दोन्हीही झालेलो आहेत.

विवेकशून्यदेखील.

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2014 - 2:36 pm | संजय क्षीरसागर

लेख एकदम मुद्देसूद आहे. आवडला!

गुल-फिशानी's picture

22 Oct 2014 - 2:45 pm | गुल-फिशानी

सध्या इतका एकांगी प्रचार समलैंगिकतेचा चालु आहे की त्याची काही नकारात्मक बाजु असु शकते याचा विचार करण तर दुर त्यावर काही बोलण हा एक ब्लास्फेमी असल्यासारख ट्रीट केल जात आहे.
आपल्या विचारांना तपासुन पाहण्याची गरजच वाटेनाशी झालेली आहे.

आनन्दा's picture

22 Oct 2014 - 5:43 pm | आनन्दा

मी माझ्या आयुष्यात तीन समलैंगिकांचे अनुभब घेतलेले आहेत. त्यातला एक तर अत्यंत किळसवाणा होता.
माझ्या दॄष्टीने यामध्ये जसे कायद्याचे महत्व आहे, त्यापेक्षाही अधिक घरातील जबाबदार व्यक्तीने वयात आलेल्या मुलाला लईंगिक शिक्षण देणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. आणि एकट्या फिरणार्‍या पौगंडावस्थेतील मुलांना समाजातील या धोक्यांचे ज्ञान देणे अधिक आवश्य आहे असे मी समजतो.

माझ्या व्यक्तीगत अनुभवातून मी असे म्हणेन की स्ट्रेट पुरूष स्त्रीचा विनयह्बंग करताना १० वेळेस विचार करत असेल, तर गे एका मुलाचा विनयभंग करताना एकदाही विचार करत नाही.

आनन्दा's picture

22 Oct 2014 - 5:45 pm | आनन्दा

आणि पुढे जाऊन मी कदाचित थोडेसे धाडसी विधान करत आहे, की प्रौढ वयात गे असणारे पौगंडावस्थे स्ट्रेट असण्याची देखील शक्यता असू शकते. त्यांना कदाचित जबरदस्तीने देखील गे बनवले जऊ शकते.

तुम्हाला वाईट अनुभव आले या विषयी खेद वाटतो. पौंगंडावस्थेत आलेले वाईट अनुभव मनावर खोलवर दिर्घकाळ परीणाम करत असतात. भारतात मोठ्या प्रमाणावर बालकांचे लैंगिक शोषण होते. सत्यमेव जयते च्या चाइल्ड अब्युज च्या एपिसोड मध्ये सांगितलेले होते त्या प्रमाणे जवळ जवळ ५० टक्के मुलांचे भारतात कुठल्या ना कुठल्या प्रमाणे अब्युज होत असते.
या लहान मुलांमध्ये मुल मुलींच साधारण सारख प्रमाण जर धरल तर अनेक लहान मुलांच लैंगिक शोषण हे होत असत. हे शोषण समलैंगिक पुरुषां कडुन लहान बालकांच होत असतं, या समलैंगिक करत असलेल्या शोषणा विषयी कोणीच काही बोलत नाही.
यानंतर दुसरा एक पैलु देखील आहे
समलैंगिक पुरुष जेव्हा मोठ्या अ‍ॅडल्ट स्ट्रेट व्यक्तीच्या पुरुषाच्या मागे लागला त्याचा विनयभंग केला तर कायद्यान्व्ये असा विनयभंग पुरुषाचा होउ शकतो हे मानल च जात नाही.
याचा फायदा घेउन ( वरील सोनु निगम च्या केसमध्ये झा ने घेतला तसा) गे पुरुष स्ट्रेट पुरुषाला हॅरेस करतात.
एकीकडे समलैंगिक स्वतःच्या लैंगिक हक्कासाठी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात
मात्र दुसरीकडे हाच कायदा जेव्हा त्यांना विनयभंगा च्या गुन्ह्यापासुन वाचवतो ( गे ने केलेला पुरुषाचा विनयभंग हा गुन्हाच नाही या साठी कुठलीच तरतुद नाही मात्र एखाद्या स्ट्रेट ने जर एखाद्या स्त्री चा विनयभंग केला तर मात्र त्याला व्यवस्थ्रित शिक्षेची तरतुद आहे )
समलैंगिकाची चळवळ या विषयावर संतापजनक मौन बाळगते. त्यांना हे सर्व माहीत असुन ही ते बोलत नाहीत. कारण ही कायद्यातील पळवाट त्यांच्या फायद्याची आहे. म्हणुन ते त्यांच्या विरोधात काहीच बोलत नाही.
दुसर म्हणजे त्यांची संख्या कमी आहे जास्तीत जास्त त्यांच्याच दाव्यानुसार भारतात ४० लाख गे पुरुष आहेत मी म्हणतो ५० लाख धरुयात. आता इतकी कमी लोकसंख्या आहे सर्वच सर्वांना कनेक्ट होणार नाहीत. मग ते काय करतील ?
तर ते सतत शोध घेत असतात सर्वत्र चाचपडत फिरत असतात सार्वजनिक मुत्र्यांमध्ये चाट रुम मध्ये मॉल मध्रे बागेत
यात ते सातत्याने स्ट्रेट व्यक्तींसमोर प्रपोजल्स ठेवतात. मात्र मुळ संख्या कमी असल्याने आणि जो स्ट्रेट आहे त्याकडुन प्रतिसाद अशक्य असल्याने यांच्या कडुन सातत्याने गे कडुन स्ट्रेट लोकांचा विनयभंग करण्याचे प्रमाण वाढत आहे.
आता जर कायद्यातील तरतुद गे ने केलेला स्ट्रेट पुरुषाचा विनय भंग हा मानतच नाही तर तो त्यांच्या मोठ्या फायद्याचा आहे. अशी तरतुद स्पेसीफीक स्वरुपात आली तर अनेक गे विरोधात स्ट्रेट कडुन गुन्हा दाखल केला जाउ शकेल. हे सर्व माहीत असल्याने ते जाणीवपुर्वक या कायद्यातील पळवाटे विरोधात चकार शब्द काढत नाहे.
एकीकडे स्वतःचे लैंगिक हक्क आक्रमक पणे मागायचे
व दुसरीकडे दुसर्यांचे तेच हक्क नाकारण्याचे कायद्याकडुन मिळालेले स्वातंत्र्य उपभोगायचे हा
निव्वळ दांभिक पणा आहे.
ही तरतुद झाल्यास अनेक गें ना स्ट्रेट ला प्रपोजल करण्यापुर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. कारण मग तो एक स्त्री चा होतो त्या प्रमाणे त्या पुरुषाचा विनय भंग मानला जाइल

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2014 - 9:34 pm | बोका-ए-आझम

सुंदर लेख. एक उत्सुकता म्हणून विचारतो - गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रियांचाही समावेश होतो.या लेखात गे लोकांचा म्हणजे पुरूषांचा उल्लेख आहे. निदान संदर्भ तरी तसेच आहेत.
स्त्रियांच्या बाबतीतही असंच आहे का त्या अपवाद आहेत हे लेखावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे ती एक उणीव लेखात जाणवली. बाकी लेख उत्तम!

गे लोकांमध्ये समलैंगिक स्त्रीयांचा देखील समावेश होतो. यात शंकाच नाही. माझ्या लेखात पुरुषांचे संदर्भ आहेत हे खरच आहे.कारण मला पुरुष असल्याने तो अनुभव अधिक आहे व साहजिकच पुरुष असल्याने माझा फोकस पुरुष समलैंगिकां संदर्भात आहे. मला लेस्बीयन्स चा प्रत्यक्ष जीवनात फारच कमी अनुभव आहे. त्यावर मी फारस बोलण्या इतका माझा अनुभव च नाही.म्हणुन मी पुरुष समलैंगिका संदर्भात माझी भुमिका मांडलेली आहे,
माझा एक आग्रहाचा मुद्दा हा आहे की पुरुषाला ही विनय असतो व त्याचा ही भंग होउ शकतो. एका गे माणसाकडुन ज्रर हॅरेसमेंट च्या स्वरुपात तो होत असेल तर कायद्यात त्या विरोधात स्पेसीफीक प्रोव्हीजन्स असली पाहीजे
जसे कायदा एखाद्या स्त्री ला विनयभंगा विरोधात कायद्याच पाठबळ पुरवतो. विनयभंग करणार्या साठी शिक्षेची तरतुद असते. तशी तरतुद पुरुषाच्या विनयभंग साठी देखील असली पाहीजे
यात लिंगा वर आधारीत भेदभाव करता कामा नये
याकडे समलैंगिक चळवळ दांभिक मौन बाळगते.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2014 - 11:47 pm | बोका-ए-आझम

हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. समलिंगी व्यक्तीकडून सामान्य कामेच्छा असणा-या व्यक्तीचा विनयभंग होऊ शकतो आणि कायद्यात त्याला शिक्षेची तरतूदही असली पाहिजे. पण मग (भारतीय दंडसंहितेच्या) कलम ३७७ मध्ये तशी तरतूद आहे आणि समलिंगी लोकांच्या आंदोलनाचा एक मुद्दा हासुद्धा आहे की हे कलम रद्द करा.

.

मुद्देसूद लिखाण. पटलं. नटरंग सिनेमात नायकावर ओढवलेला प्रसंग आठवला.

मध्यंतरी स्त्रीने पुरुषावर केलेल्या बलात्काराची बातमी वाचली होती. पुरुषालाही विनय असतो आणि त्याचा भंग होणं त्याच्यासाठी तितकंच मनस्ताप देणारं होऊ शकतं, जितकं एखाद्या स्त्रीसाठी होईल. मग तो स्त्रीने केलेला असो, की पुरुषाने. मात्र भारतात कायद्याने पुरुषाचा विनयभंग/बलात्कार हा गुन्हा होत नाही, हे धक्कादायक वाटलं.

लेस्बियन असणा-या मुली इतर स्ट्रेट मुलींच्या मागे लागल्याची तुरळक उदाहरणं माहीत आहेत. पण अग्रेसिव्ह लेस्बियन रॅगिंगबद्दल कदाचित हाॅस्टेलमध्ये राहिलेल्या मुली सांगू शकतील.

हे सगळं वाचून असा विचार मनात आला, की जर हे असं होत असेल, तर क्ष काळानंतर एकट्यादुकट्या पुरुषावर बलात्कार होण्याच्या केसेसही ऎकाव्या लागतील का?

हरकाम्या's picture

22 Oct 2014 - 11:22 pm | हरकाम्या

हा लेख या येथे कशासाठी टाकलाय हे अजिबात कळत नाही. यातुन आपण काय साध्य करणार आहात ?
का जागा मिळाली म्हणुन काहीही लिहायचे. आणि त्यावर लोकांचे मत आजमावयाचे हाच " प्रामाणिक " उद्योग दिसुन
येतो. मला वाटते मिपाच्या सरपंचांनी आपला विशेषाधिकार वापरुन हा फालतु " लेख " उडवला पाहिजे.

शैलेन्द्र's picture

23 Oct 2014 - 10:42 pm | शैलेन्द्र

-११११११११११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2014 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही मुद्दे पटणारे आहेत.

-दिलीप बिरुटे

जे.पी.मॉर्गन's picture

1 Nov 2014 - 1:26 pm | जे.पी.मॉर्गन

लेख पटला. व्यक्तिशः अश्या लोकांचा कधी अनुभव आला नाही पण तुमचे विचार पूर्णपणे पटले. हे सगळं उगाच ग्लोरिफाय होतंय हे ही पटतंय.

जे.पी.