आली दिवाळी

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
21 Oct 2014 - 6:19 pm
गाभा: 

मिपावरील समस्त मित्रांनो,
महाराष्ट्राचे नवे सरकार दिवाळीआधी बनेल असे वाटत नाहीये. राजकारणापासून थोडा वेळ काढा. आता दिपावली आली आहे. तेव्हा खालील विषयांवर काथ्या कुटावा ही नम्र विनंती. फटाकेबाज विषयांची यादी खालीलप्रमाणे. आपणही या यादीत भर टाकू शकता.
१. प्रदुषणमुक्त दिवाळी - दिवाळीचे फटाके कसे प्रदुषण करतात, त्यामुळे पर्यावरणाचे कसे नुकसान होते, माणसांना कशा कशा प्रकारे ईजा होतात याचे दाखले द्यावे.
२. त्यातून जमल्यास शिवकाशी किंवा तत्सम ठिकाणी बालकामगारांचे कशा प्रकारे शोषण होते यावर प्रकाश टाकावा.
३. जमल्यास भर दिवाळीत संस्कृतीच्या नावे शिमगा करावा.
४. प्रदुषणमुक्त दिवाळी कशी साजरी करावी याचे ज्ञानामृत पाजून आमच्यासारख्या अडाण्यांचा उद्धार करावा.
५. जमल्यास प्रदुषणमुक्त दिवाळी ते दिवाळीमुक्त भारत इतपर्यंतही हा धागा खेचावा.
६. नरकासुराचा वध कसा अयोग्य होता ?
६. भाऊबीज हा महिलांचे शोषण करणारा सण कसा आहे त्यावर तावातावाने चर्चा करा.
८. नवरा या प्राण्याचा खिसा पाकीट रिकामा करणारा हा सण आहे यावर प्रकाश टाका.
९. दिवाळीनिमित्ताने सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी हा गुंतवणू़कीचा अयोग्य पर्याय कसा आहे याचे मिपावरील अनुभवी मंडळींनी विश्लेषण करावे. अमुक तमुक सालात सोन्याचा भाव इतका होता आणि आता इतका आहे. हेच पैसे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतविले असते तर तुम्हाला कित्ती कित्ती फायदा झाला असता असे सांगून सोने खरेदी करणार्‍यांना कानकोंडे करण्याचा प्रयत्न करावा.
१०. दिवाळीच्या निमित्ताने कामगार असलेल्यांनी बोनस न दिलेल्या मालकांचा उद्धार करावा. जमल्यास हा दुवा त्यांना इमेल करावा.
११. जे मिपाकर मालक असतील त्यांनी कामगार कसे माजले आहेत याचे तपशीलवार वर्णन करुन बोनस पद्धत कशी चुकीची आहे याचे समर्थन करावे.
१२. वयोवृद्ध मिपाकरांनी आपल्या वेळची दिवाळी कशी सुंदर होती नाहीतर आजचे सण साजरे करणे म्हणजे कशी थेरं आहेत अशा प्रकारचे प्रतिसाद द्यावेत. महिलां सभासदांनी आमच्या माहेरी यंव असतं आणि त्यंवं असतं अशाप्रकारे गळे काढावेत आणि चकल्या करंजा हसल्या का ? टाईपचे प्रतिसाद द्यावेत.

टीप : वरील विषय चर्चिल्यानंतर हमखास व्हर्च्युअल फटाके फुटतील याची खात्री बाळगा आणि खर्‍या फटाकयांवर एकही रुपया खर्च न करता फटाके फोडल्याचा आनंद घ्या.
समस्त मिपाकरांना दिपावलीच्या आगलावू ( स्वारी आगावू) शुभेच्छा !

प्रतिक्रिया

अक्षरमित्र's picture

21 Oct 2014 - 6:50 pm | अक्षरमित्र

दिवाळीत विनाकारण दिवे लावून मोलामहागाचे तेल जाळले जाते. तुम्हाला ना कश्शाकशाची म्हणून किंमत नाही.
आता वीजेच्या जमान्यात कशाला हवे तेलाचे दिवे ???
:)

सूड's picture

21 Oct 2014 - 7:17 pm | सूड

गप रांव रे!!

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 8:55 pm | माम्लेदारचा पन्खा

पेटलेल्या वाड्यात काकूरूपी फटाक्यांची घाऊक बाजारात घेतलेली टोपली घेऊन घुसून आपण दिवाळीच्या पूर्वसंध्येला शोभा आणलीत !

समस्त मिपाकरांतर्फे आपले आभार !

खटपट्या's picture

21 Oct 2014 - 11:11 pm | खटपट्या

चांगलंय !!

आयुर्हित's picture

22 Oct 2014 - 11:01 am | आयुर्हित

या ज्वालामुखीच्या आत किती खदखद दडली आहे?
आतून येवू द्या बाहेर एकदाची.....म्हणजे सारे कसे शांत होईल!

समीरसूर's picture

22 Oct 2014 - 12:09 pm | समीरसूर

मस्तच! :-) अजून काही:

  • दिवाळी आणि महागाई या अनैतिक संबंधांमुळे हैराण होऊन फ्लिपकार्टवर फक्त ४२००० रुपयात मिळणारा फाईव्ह-सिम, ९३ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन दुकानात ४७००० ला विक्रीसाठी ठेवून बाजारात महागाईचा कसा उच्चांक गाठला गेला आहे हा खुमासदार विषय चघळा
  • पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यातला फरक संदर्भासहित स्पष्ट करा
  • पूर्वीच्या दिवाळीत काय मजा यायची अशी सुरुवात करून आताच्या दिवाळीत कसा राम नाही हे विशद करून दाखवा
  • पुण्याची दिवाळी आणि मुंबईची दिवाळी फरक स्पष्ट करून दोन्ही ठिकाणच्या दिवाळीचे फायदे आणि तोटे तपशीलवार पटवून द्या.
  • पुण्या-मुंबईतल्या दिवाळीच्या धरतीवर भारतातली-परदेशातली दिवाळी असे चर्चासत्र आयोजित करा.
  • 'आली माझ्या घरी ही दिवाळी' या गाण्याचे रसग्रहण करून दिवाळीच्या जागी होळी, संक्रांत, कोजागिरी पौर्णिमा असे सण कल्पून तुलनात्मक अभ्यासावर आधारलेला लेख प्रकाशित करा. या गाण्यातून फुटणारे अनेकविध रंगीबेरंगी अर्थाचे अनवट धुमारे फुग्यांसारखे फुगवून दाखवा. कोणी टाचणी लावल्यास 'फुग्यातून फटाके' असा अनुभव निर्माण करून दाखवा.
  • घरी केलेल्या दिवाळीच्या पदार्थांचा गेल्या २५ वर्षांचा विदा (क्वांटिटी, चव, फीडबॅक, किती दिवस पुरले, किती माणसे होती, वगैरे) एका तक्त्यात तयार करा. त्या तक्त्याचा सगळ्या अंगांनी अभ्यास करून कुठल्या पदार्थावर पुढच्या १० वर्षात काय पाळी येणार आहे याचे आडाखे बांधा. उदा. अनारसे १० वर्षांनी लुप्त होतील कारण बनवायला किचकट आणि फसायला तत्पर असा हा पदार्थ आहे; लोकांची तिखट खाण्याची क्षमता ज्या वेगाने कमी होत आहे त्यावरून १० वर्षांनी शेव म्हणजे फक्त बेसनाचे तळलेले धागे असतील; १० वर्षांनी चकलीसोबतच करंजीदेखील चखण्याचा भाग होऊ शकेल; वगैरे वगैरे....
  • दिवाळीच्या दिवशी मल्टीप्लेक्समध्ये मोठा अपेक्षेने पाहिलेला चित्रपट कसा भिकार होता याचे रटाळ वर्णन लिहून काढा.

सगळ्यांनी कृपया हलके घ्यावे. थोडीशी गंमत इतकेच! :-) कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.