हरयाना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (२०१४) : प्रत्यक्ष निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
18 Oct 2014 - 9:01 pm
गाभा: 

महाराष्ट्र व हरयानातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवार १९/१०/२०१४ या दिवशी लागतील. सकाळी ८ पासून मतमोजणी आहे. या निकालांसाठी हा धागा.

_________________________________________________________________________

वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या महाराष्ट्रातील मतदानोत्तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे आहेत.

http://www.rediff.com/news/report/exit-polls-bjp-clear-leader-in-maharas...

____________________________________________________________________________

एबीपी-माझा-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार, भाजप १४४, शिवसेना ७७, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी २९ अशी परिस्थिती असेल.

____________________________________________________________________________

अजून एक चित्रात्मक तुलना

__________________________________________________________________________

इंडिया-टुडे च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.

http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-india-today-cicero-exit-p...

____________________________________________________________________________

वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या हरयानातील मतदानोत्तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे आहेत.

चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीवर आधारीत हरयानातील निकालाचा अंदाज

http://www.todayschanakya.com/haryana-assembly-elections-2014.html

भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते)

हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या इतर काही वाहिन्यांच्या निष्कर्षानुसार,

(१) सी-व्होटरः भाजप - ३७, भारालो - २८, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - ६, इतर - ४

(२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३

_______________________________________________________________________________

१९८० पासून महाराष्ट्रात एकूण ७ वेळा विधानसभा निवडणुक झाली. २००४ चा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकात काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. १९८० व १९८५ मध्ये शिवसेना महाराष्ट्रात दखल घेण्याजोगा पक्ष नव्हता. भाजपबरोबर युती झाल्यावर प्रथमच १९९० मध्ये शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली. त्यानंतर १९९५, १९९९ व २००४ मध्ये शिवसेनेने दुसरा क्रमांक टिकविला. परंतु २००९ मध्ये शिवसेना ४ थ्या क्रमांकावर पोहोचली. १९९९ मध्ये जन्म झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये तिसरा, २००४ मध्ये पहिला व २००९ मध्ये तिसरा क्रमांक मिळविला. १९८० पासून भाजप कायमच तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिला. भाजपला कधीही पहिल्या दोन पक्षात स्थान मिळाले नव्हते.

हरयानात सुद्धा भाजप १९८७ चा अपवाद वगळता कधीही पहिल्या दोन क्रमांकात नव्हता. १९८७ देवीलालांच्या भारालोबरोबर युती केल्यामुळे भाजपला ९० पैकी १५ जागा मिळाल्या होत्या. ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी. इतर सर्व निवडणुकात भाजपला कधीही दोन आकडी जागा मिळाल्या नव्हत्या.

मावळत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपकडे ४७ व हरयानात ६ जागा आहेत.

सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या निष्कर्षानुसार या दोन्ही राज्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल. कदाचित दोन्ही राज्यात किंवा एका राज्यात स्पष्ट बहुमत मिळण्याची देखील शक्यता आहे. कायम तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपने सर्व पक्षांना मागे सारून दोन्ही राज्यात स्वबळावर प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणे ही फार मोठी कामगिरी असेल.

या निकालानंतर पहिला बळी जाईल तो मनसेचा. मनसे स्थापन होऊन ९ वर्षे होऊन गेली. परंतु मनसे अजूनही ५ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर येण्यासाठी मनसेला खूपच परीश्रम करावे लागतील व अजून अनेक वर्षे लागतील. मनसेत राहून फारसे काही मिळण्याची शक्यता नसल्याने मनसेचे नेते व कार्यकर्ते पक्ष सोडायला सुरूवात करतील. यातले बरेच जण शिवसेनेत परत जातील तर काही जण भाजपत जातील.

काँग्रेस व राष्ट्रवादीचा या निवडणुकीत धुव्वा उडाला तर दोन्ही पक्षात फेररचना होईल. पक्ष बळकट करण्यासाठी कदाचित पवारांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे निमंत्रण दिले जाईल. पक्षाध्यक्ष किंवा पक्षात अत्यंत वरचे स्थान मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९८६ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होईल. किंवा कदाचित राहुल मागे पडून प्रियांका वड्राला काँग्रेसमध्ये सक्रीय व्हावे लागेल. काँग्रेस सोडून गेलेल्या इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये परत यायचे आमंत्रण दिले जाईल. पुढील निवडणुकात भाजपविरूद्ध काँग्रेस शक्य तेवढ्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून आघाडी बनवायचा प्रयत्न करेल.

असो. बघूया नक्की काय निकाल येतात ते.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2014 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये तिसरा, २००४ मध्ये पहिला व २००९ मध्ये तिसरा क्रमांक मिळविला.

२००९ च्या विधानसभेमध्ये ६२ जागा मिळवून राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होता. ४६ जागा मिळवणारा भाजप तिसर्‍या क्रमांकावर होता.

बाकी माहिती उत्तम.

निकालांमुळे आज रात्री जागरण होणार :-) .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Oct 2014 - 8:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मतमोजणी चालू होतेय. आय.बी.एन. लोकमत लावून बसलोय दोघेही.बारा वाजेस्तो चारवेळातरी चहा,ग्लुको,मारी बिस्किटांचा मारा नक्की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2014 - 8:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भाजपाला विदर्भात दोन ठिकाणी आणि शिवसेनेला कोकणात एके ठिकाणी आघाडी मिळालेली आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2014 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनसे आणि शेकाप तीन तीन जागांवर येतील म्हणतात
बाकी अपडेट इथे पाहा.

-दिलीप बिरुटे

नानासाहेब नेफळे's picture

19 Oct 2014 - 8:44 am | नानासाहेब नेफळे

भाजप्यांना बहुमत नाही, ढींच्याक ढिंच्याक ढिंच्याक.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2014 - 9:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

परत युती व्हायला हवी णाणा....नहितर राज्याचं काही खरं नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Oct 2014 - 9:43 am | माईसाहेब कुरसूंदीकर

घोडेबाजाराला ऊत येणार असे दिसतेय.अंबानी,अदानी शिवसेनेबरोबर
,राष्ट्रवादीबरोबर चर्चा करणार्,थैल्या सैल करणार..पर्यायाने मराठी माणसाला पैसा मिळणार म्हणून हे खूष आहेत...

जेपी's picture

19 Oct 2014 - 9:52 am | जेपी

bjp-49
inld-17
cong-14
hjc-1
हरियाणात भाजपा स्पष्ट बहुमताकडे

अर्धवटराव's picture

19 Oct 2014 - 10:07 am | अर्धवटराव

युतीला जवळपास २०० सीट्स मिळाल्या असत्या किंवा भाजप बहुमताने जिंकला असता. मिस यु मुंडे साहेब :(

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2014 - 8:45 pm | श्रीगुरुजी

अंतिम निकाल -

महाराष्ट्रः भाजप - १२३, शिवसेना - ६३, काँग्रेस - ४२, राष्ट्रवादी - ४१, मनसे - १

हरयाना: भाजप - ४७, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - १९, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - २

हरयानात भाजपने स्वबळावर ९० पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या राज्यात भाजप कधीही पहिल्या दोन क्रमांकात नव्हता. भाजपची सर्वोत्कृष्ट कामगिरी १५ जागा होती (१९८७ मध्ये) तेसुद्धा देवीलालांच्या भारालोबरोबर युती करून. स्वबळावर यापूर्वी भाजपला कधीही दोन आकडी जागा मिळाल्या नव्हत्या. आणि आता स्वबळावर भाजपने चक्क बहुमत मिंळविले आहे. लोकसभेत भाजपने हरयाना जनहीत काँग्रेसबरोबर युती करून १० पैकी ८ जागा लढवून ७ जिंकल्या होत्या. हजकाँला २ जागा लढवून एकही जागा मिळाली नव्हती. विधानसभा निवडणुकीसाठी हजकाँने ४५ जागांचा आग्रह धरला होता. भाजपने हजकाँबरोबर युती तोडून स्वबळावर लढण्याचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. मागील महिन्यात काही रा़ज्यात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून मोदी लाट ओसरली, भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाला, काँग्रेस पुन्हा एकदा जोर धरत आहे इ. कमालीचे मूर्खपणाचे निष्कर्ष काढणार्‍या पंडीतांना हरयानातील निकालाने जमिनीवर आणले आहे.

दुसरीकडे शिवसेनेबरोबर २५ वर्षांची युती तोडण्याचा भाजपचा जुगार महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी ठरला. शिवसेना स्वतः १५१ पेक्षा खाली उतरायला तयार नव्हती व भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा द्यायला ठाम विरोध होता. शिवसेनेने दादागिरी, वर्तमानपत्रातून विखारी टीका, सामाजिक माध्यमातून खोटे आरोप व बदनामी, मोदी व शहांची अत्यंत असभ्य शब्दात बदनामी, गुजराती वि. मराठी वाद उकरून भाषिक फूट पाडणे, महाराष्ट्राचे भाजप तुकडे पाडण्याची खोटी आवई उठविणे असे असंख्य प्रकार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकून युतीतील जागावाटप (११९ जागा) हे अत्यंत चुकीचे होते हे दाखवून दिले. आम्हीच मोठा भाऊ, हम देनेवाले है लेनेवाले नही अशी मिजास करणार्‍या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या निम्म्या जागा देऊन जबरदस्त चपराक लगावली. निदान आता तरी शिवसेनेचे डोके ताळ्यावर येईल अशी आशा आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला व मुजोरीला महाराष्ट्रातील जनतेने सडेतोड उत्तर दिले तर नुसती बडबड करणारा मनसे हा अत्यंत नगण्य पक्ष आहे हे देखील अधोरेखित झाले.

जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी तब्बल १२३ जागा मिळवून भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. १९९० नंतर प्रथमच महाराष्ट्रात एका पक्षाला ३ आकडी जागा मिळाल्या आहेत.

अर्धवटराव's picture

19 Oct 2014 - 9:24 pm | अर्धवटराव

सेनेचे डोके अजुनही ठिकाणावर आलेले दिसत नाहि. आय विश सेना स्प्लिट्स नाऊ.

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2014 - 3:14 pm | श्रीगुरुजी

सेनेचे डोके भविष्यात कधीही ठिकाणावर येईल असे वाटत नाही. सेना फुटेल असेही वाटत नाही. मनसेचे उरलेसुरले कार्यकर्ते फुटुन सेनेत परत जातील असं दिसतंय.

उद्धव ठाकर्‍यांनी नेहमीप्रमाणे उतावीळपणे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद व महत्त्वाची मंत्रिपदे मागून, घाईघाईत आपले पत्ते उघड केले आहेत. त्यामुळे आता भाजप सावध होऊन पर्यायी व्यवस्थेच्या मागे लागेल. त्यांच्या जागी मायावती असती तर अतिशय चातुर्याने आपले पत्ते उघड न करता भाजपला खेळवून आपल्याला हवे ते तिने मिळविले असते. एकंदरीत मराठी माणूस कितीही शौर्याच्या गप्पा करीत असला तरी वाटाघाटीत नेहमीच हरतो हे दिसून येते.

रमेश आठवले's picture

21 Oct 2014 - 6:15 am | रमेश आठवले

महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज्य्यात एक पक्षाचे सरकार असायला हवे. हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. उद्धव हे मोडेन पण वाकणार नाही असा आवेश दाखवत आहेत. म्हणून शिवसेनेलाच मोडणे गरजेचे झाले आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 1:10 pm | श्रीगुरुजी

>>> हे शक्य होण्यासाठी सेनेच्या ६३ आमदारांपैकी कमीत कमी २१ म्हणजे १/3 आमदारांनी एकत्र येउन सेना सोडून भाजपात प्रवेश केला पाहिजे.तसे केले तर त्यांची आमदारकी रद्द होणार नाही.

२००३ मधील सुधारीत पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील कमीतकमी २/३ आमदारांनी पक्ष सोडला तरच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कमीतकमी ४२ आमदारांनी पक्ष सोडला तरच हे शक्य आहे. इतके आमदार फुटणे हे जवळपास अशक्य आहे.

त्याऐवजी कदाचित भाजप कर्नाटकमधील 'ऑपरेशन लोटस' सारखे ऑपरेशन करू शकते. कर्नाटकात २००८ मधील निवडणुकीत भाजपला २२४ पैकी ११० जागा मिळाल्या होत्या. ६ अपक्ष होते व निधर्मी जनता दल (२८) व काँग्रेस यांच्या एकत्रित १०८ जागा होत्या. त्यामुळे ज्या बाजूला अपक्ष त्यांचेच सरकार बनणार होते. सुरवातीच्या काळात अपक्षांचा पाठिंबा मिळवून भाजपने सरकार स्थापन केले. परंतु हे सरकार कधीही कोसळू शकते हे त्यांच्या लगेचच लक्षात आले.

त्यातून ऑपरेशन लोटस् जन्माला आले. भाजपने काँग्रेसमधील ८-१० आमदारांना पटवून राजीनामा द्यायला लावला व नंतर त्यांना स्वतःच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत निवडून आणून स्वत:ची आमदार संख्या १२० च्या पुढे नेऊन स्थिरता आणली.

महाराष्ट्रात असेच ऑपरेशन भाजपला करावे लागेल. परंतु हे फारसे सोपे नाही. त्यासाठी विरोधी पक्षांचे कमीतकमी २८-३० आमदार पटवावे लागतील व त्यांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या तिकिटावर निवडून आणावे लागतील. वाटेल ते आमदार फोडून चालणार नाही. विरोधी पक्षांचे जे आमदार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत किंवा तिथे भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल तरच ते आमदार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येतील. समजा एखाद्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला ६०,००० मते आहेत. दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला ५०,००० मते आहेत व भाजपच्या उमेदवाराला खूप कमी म्हणजे १०,००० पेक्षा कमी मते आहेत. तर असा उमेदवार पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडूण येणे अवघड आहे, कारण उमेदवाराला फक्त स्वतःचीच नव्हे तर पक्षाची मते देखील मिळालेली असतात. त्यामुळे या उदाहरणात शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या ६०,००० मतात किमान ३०,००० पक्षाची मते असतील. हाच उमेदवार जर भाजपच्या तिकिटावर उभा राहिला तर त्याला स्वतःची जास्तीत जास्त ३०,००० व भाजपची १०,००० अशी ४०,००० मते मिळतील. याउलट सुरवातीला दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराची ५०,००० मते तशीच राहून तो जिंकेल. त्यामुळे ऑपरेशन लोटस जवळपास २८-३० उमेदवारांच्या बाबतीत यशस्वी करणे अत्यंत अवघड आहे.

सद्य परिस्थितीत शिवसेनेशी जुळवून घेणे हेच भाजपसाठी योग्य ठरते. शिवसेनेला उपसभापतीपद, उपमुख्यमंत्रीपद व मंत्रीमंडळातील ४२ जागांपैकी किमान एक तृतीयांश मंत्रीपदे देणे हे योग्य वाटप ठरू शकेल.

रमेश आठवले's picture

21 Oct 2014 - 11:24 pm | रमेश आठवले

विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते.
माझ्या आठवणी प्रमाणे राजीव गांधी यांनी आणलेल्या मूळ anti defection बिलामध्ये मधु लिमये आणि इतर यांनी अशी तरतूद सुचवली होती आणि ती स्वीकारण्यात आली होती.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2014 - 5:42 pm | श्रीगुरुजी

>>> विधानसभेत सर्व निवडून आलेल्या विधायकांचा शपथविधी झाल्यांनतर एखाद्या पार्टी च्या संख्ये पैकी १/३ सदस्यांनी आंम्ही अमुक अमुक नावाची वेगळी पार्टी बनवत आहोत तीला मान्यता द्या असा एकत्र अर्ज केला तर अध्यक्षांना त्या पार्टीला मान्यता द्यावी लागते. नंतर ती पार्टी सरकारला बाहेरून पाठींबा देऊ शकते आणि कालांतराने सरकार चालवणार्या पार्टीत विलीन सुद्धा होऊ शकते.

तुम्ही म्हणता तशी तरतूद १९८५ मध्ये प्रथमच आलेल्या पक्षांतरविरोधी कायद्यात होती. याच कायद्यात २००३ साली दुरूस्ती करण्यात आली. या नवीन दुरूस्तीनुसार कोणत्याही पक्षाचे एखाद्या सभागृहातील कमीतकमी २/३ सदस्य फुटले तरच त्या पक्षांतराला कायदेशीर मान्यता आहे. २/३ पेक्षा कमी सदस्य फुटले तर त्या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. अर्थात सदस्यत्व रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार सभापतीकडे असल्याने व सभापती हा सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असल्याने व सदस्यत्व रद्द करावे की मान्यता द्यावी हा निर्णय घेण्यास सभापतीवर कालमर्यादेचे बंधन नसल्याने बहुतेकवेळ सभापती आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून निर्णय घेण्यास विलंब लावून सत्ताधारी पक्षाला मदत करतात.

सद्यपरिस्थितीत भाजपला बहुमतासाठी राष्ट्रवादी/काँग्रेसचे किमान २८ सदस्य फोडावे लागतील किंवा शिवसेनेचे किमान ४२ आमदार फोडावे लागतील. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटणे अत्यंत अवघड आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना केली तर खालील दोन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळ आहेत.

चाणक्य -
भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते)

(२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३

चाणक्यचे निष्कर्ष जवळपास बरोबर आले आहेत.

एसी नेल्सन चा अंदाज भाजप, काँग्रेस व हजकाँ बद्दल जवळपास बरोबर आला. भारालो च्या बाबतीत आकडे बरेचसे चुकले.

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2014 - 9:04 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील प्रत्यक्ष निकालांची व मतदानोत्तर चाचण्यातील विविध निष्कर्षांची तुलना केली तर,

(१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५),

(२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व

(३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७)

हे तीन निष्कर्ष प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आलेले दिसतात.

मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षात बरेच तथ्य असते असे दिसून येते.

चौकटराजा's picture

20 Oct 2014 - 6:02 pm | चौकटराजा

फडणीस, चव्हाण, पवार व उद्धव यात सर्वात पक्के व सर्वात कच्चे मडके कुणाचे असा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी एक प्रश्नावली तयार करावी. नमुना प्रश्न १ भाजपने आयारामाना घेतले नसते कर काय नुकसान व फायदा झाला असता उत्तर जागामधे यावे. प्र २ जिथे शिवसेना व भाजपा पहिल्या दोन क्रमांकात आहेत तिथे कुणाला जास्त जागा आहेत. सेना १५१ वर अडून राहिली होती. भाजपा ला १३० चालल्या असत्या .अशात शिवसेना अजिबात न निवडून येण्याची शक्यता असलेल्या किती ठिकाणी सेना निवडून आली व तिने भाजपाला खोटे ठरविले ? ई ई .

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2014 - 9:00 pm | श्रीगुरुजी

(१) माध्यमांच्या संशोधनानुसार भाजपने एकूण ५६ तथाकथित आयारामांना तिकीट दिले होते (यातले खरे आयाराम २०-२२ होते कारण ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले होते. उरलेले लोकसभा निवडणुक किंवा त्यापूर्वीच भाजपत आले होते.). त्यापैकी फक्त १९ जिंकले.

भाजपवर आयारामांना तिकीट दिल्याचे आरोप करताना शिवसेनेने सुद्धा ५३ आयारामांना तिकीट दिल्याचा मुद्दा माध्यमांनी सोयिस्कर दुर्लक्षित केला. त्यापैकी फक्त १४ जिंकले.

काँग्रेस व राष्ट्रवादीकडे फारसे आयाराम नव्हते. कारण उघड आहे. जिथे विजयाची शक्यता आहे तिथेच आयाराम जाणार.
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २७ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मुदत होती. भाजप्-शिवसेना युती जेमतेम ४८ तास आधी तुटली. भाजपची सुरूवातीची तयारी १३०-१३५ जागा लढविण्याचीच होती. भाजपला जेमतेम ४८ तास आधी अचानक उर्वरीत ११५-१२० जागांवर प्रबळ उमेदवार शोधावे लागले. त्यामुळे आयारामांची चंगळ झाली.

भाजपने आयारामांना घेतले नसते तर जास्तीत जास्त १९ जागा गमवाव्या लागल्या असत्या. अर्थात निवडून आलेले आयाराम हे फक्त स्वतःच्या मतांवर निवडून आलेले नाहीत. त्यांच्या विजयात भाजपच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे आयाराम नसते तर प्रत्यक्षात ५-७ जागा गेल्या असत्या.

(२) शिवसेना ज्या जागा १६० जागा भाजपला द्यायला अजिबात तयार नव्हती त्या जागांवर स्वतंत्र लढून भाजपचे ४० आमदार निवडून आले आहेत. युती होण्यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेले शिवाजीनगर (सध्याचा कोथरूड) सारखे मतदारसंघ युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून बळकावले होते. आता स्वतंत्र लढल्यावर प्रचंड फरकाने जागा जिंकून भाजपने आपल्या मूळच्या जागा परत मिळविल्या.

उलट शिवसेनेने युती तुटल्यावर भाजप आधीपासून लढवत असलेल्या ११९ जागांवर स्वतंत्र लढून शिवसेनेला फक्त ४ जागा जिंकता आल्या. ही युती असमान व विषम जागावाटपावर आधारीत आहे व आम्हाला शिवसेनेपेक्षा खूप जास्त जनाधार आहे व म्हणूनच आम्हाला जास्त जागा लढायच्या आहेत ही भाजपची भूमिका योग्य ठरली आहे.

(३) कोकण वगळता इतर सर्व भागात भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत. अगदी आपला बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मुंबई, ठाणे व मराठवाड्यात सुद्धा भाजप सेनेपेक्षा पुढे आहे. त्यामुळे शिवसेना युती झाल्यावर स्वतःची पुरेशी ताकद नसताना दांडगाई करून जास्त जागा लढवित होती हे सिद्ध होत आहे.

(४) भाजप सुरवातीला १३५+१३५+१८ हे सूत्र मागत होता. नंतर भाजप १३०+१४०+१८ या सूत्राचा आग्रह भाजपने धरला होता. शेवटी भाजप १२५-१४५-१८ या वाटपावर राजी होत होता. परंतु उद्धव ठाकर्‍यांनी आपल्या हट्टामुळे व दुराग्रहामुळे १५१ पेक्षा खाली उतरायला नकार दिला व स्वतःचाच घात करून घेतला. १२५-१४५-१८ हे सूत्र मान्य झाले असते तर युतीला किमान २४० जागा मिळाल्या असत्या व भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवित असल्यामुळे शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता होती. तसेच आपण १६९ वरून १४५ पर्यंत खाली येऊन भाजपवर फार मोठा उपकार करत आहोत व त्याग करीत आहोत असा डंका पिटता आला असता व महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाचे आधीच आश्वासन घेता आले असत. स्वतः मोठा भाऊ असल्याची झाकली मूठ झाकलेलीच राहिली असती.

परंतु स्वतःचा दुराग्रह कायम ठेवून शिवसेनेने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला.

(४) एकंदरीत सर्वात कच्चे मडके उद्धव ठाकर्‍यांचेच दिसते. स्वतःच्या ताकदीविषयी अवास्तव भ्रम, पराकोटीच्या वल्गना, मोदींना अफझलखानाची उपमा देणे, चर्चेसाठी आदित्यसारख्या अननुभवी मुलाला पाठविणे, युती तुटल्यावर मोदी व शहांवर असभ्य व्यक्तिगत हल्ले करणे, अत्यंत नकारात्मक प्रचार करणे इ. गोष्टीतून आपण खूप कच्चे आहोत हेच उद्धव ठाकर्‍यांनी दाखवून दिले.

पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वादग्रस्त मुलाखत देऊन आपणही कच्चे असल्याचे दाखवून दिले.

त्यातुलनेत फडणवीस खूपच प्रगल्भ वागत होते.

पवारांच्या धूर्तपणाला मात्र तोड नाही.

दुश्यन्त's picture

20 Oct 2014 - 7:54 pm | दुश्यन्त

@श्रीगुरुजी- बऱ्याच एक्झिट पोल चा पोलखोल पण झाला. कॉंग्रेस खासकरून एनसीपीला ३०-३५ दाखवत होते काहीजण २८-३० दाखवत होते. तसेच ज्या टुडेज चाणक्यचा फार गवगवा केला जात होता (लोकसभेला त्यांचे अंदाज बरोबर आले होते), त्यंनी भाजपला १५१ दाखवले होते. अजून एकाने भाजपला १४५ दाखवले होते. तसेच अपक्ष+ इतरांना कुणी जास्त भाव देत नव्हते.आणि विभागवार पहिले तर बहुतेक सगळ्यांचेच अंदाज चुकले आहेत. झी'ने मराठवाड्यात एनसीपीला १ तर सेनेला २ जागा देवून मस्त जोक केला होता. असे बरेच हवेतले अंदाज वेगवेगळ्या सर्व्हे/ एक्झिट पोलचे होते.थोडक्यात हे सगळे अंदाज असतात निकाल वेगळेच लागतात.
हा आता दहा संस्थांनी वेगवेगळ्या रेंजचे दहा सर्व्हे/अंदाज दिले ( उदा.भाजप- ९५ ते १५० या रेंजसाठी १० वेगवेगळे अंदाज) दिले तर त्यातले कुठले तरी २-३ बरोबर येणारच की.

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2014 - 8:31 pm | श्रीगुरुजी

चाणक्यचा हरयानाबद्दलचा अंदाज बराचसा बरोबर आला आहे. चाणक्यचा अंदाज असा होता.

भाजपः ४५-५९ (प्रत्यक्ष जागा - ४७), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (प्रत्यक्ष जागा - १९), काँग्रेस: ५-१५ (प्रत्यक्ष जागा - १५), इतर : २-८ (प्रत्यक्ष जागा - ९)

एसी-नेल्सनचे हरयानाबद्दलचे निष्कर्ष भारालो वगळता इतर सर्व पक्षांच्या बाबतीत जवळपास बरोबर आले. एसी-नेल्सनचा अंदाज असा होता. भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३

महाराष्ट्राबद्दल एकूण ३ अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास आहेत.

(१) एबीपी न्यूज्/नेल्सन (भाजप - १२७, शिवसेना - ७७, काँगेस - ४०, राष्ट्रवादी - ३४, मनसे - ५)
(शिवसेनेबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.)

(२) सीव्होटर/इंडिया टीव्ही(भाजप - १२९, शिवसेना - ५६, काँगेस - ४३, राष्ट्रवादी - ३६, मनसे - १२) व
(मनसेबाबतीत अंदाज चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.)

(३) इंडिया टुडे(भाजप - १२४, शिवसेना - ७१, काँगेस - ३५, राष्ट्रवादी - २९, मनसे - ७)
(राष्ट्रवादीबाबतीत अंदाज थोडासा चुकला. इतरांबद्दल जवळपास बरोबर आहे.)

लोकसभेच्या वेळी रालोआला कमीत कमी २४८ व जास्तीत जास्त ३४० जागांचा अंदाज होता. बहुतेक अंदाज २६०-२७० च्या आसपास होते. त्यावेळी फक्त चाणक्यचा अंदाज ९८-९९ टक्के बरोबर आला होता.

कोणतेही सर्वेक्षण अगदी अचूक आकडे देऊ शकत नाही. प्रत्यक्ष निकालात व दिलेल्या अंदाजात उणे-अधिक १० टक्के फरक असेल तर ते सर्वेक्षण अचूक नसले तरी अचूकतेच्या जवळपास जाणारे असते. सर्वेक्षणातून जागांचा अगदी अचूक अंदाज मिळाला नाही तरी मतदारांचा एकंदरीत कल व निकालांची दिशा निश्चित समजते. सर्व सर्वेक्षणातून काही समान कल दिसत होते. ते म्हणजे (१) भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल, (२) मनसे सर्वात लहान पक्ष असेल व मनसेची कामगिरी नगण्य असेल, (३) काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही व दोघांची एकत्रित बेरीज १०० च्या आतच असेल. हे तीनही कल बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.

चौकटराजा's picture

20 Oct 2014 - 9:52 pm | चौकटराजा

आज सकाळ मधे आलेला तपशीलवार निकालाचे मी आकडेवारीचे निरिक्षण व पृथ:क्करण करतो आहे..त्यातून युती आघाडी तुटली नसती तर काय झाले असते याचाही शोध घेत आहे. एक गोष्ट समोर येते आहे की भाजपाने शिवसेनेला जितक्या जागांवर २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा कमी जागावर शिवसेनेने भाजपला २ नम्बरला टाकले आहे. राष्ट्रवादीने जितक्या जागावर कॉग्रेसला २ नंबरला टाकले आहे त्यापेक्षा काँग्रेसने कमी जागांवर राष्ट्रवादी ला मागे टाकले आहे. परंतू भाजपाची सेनेवरची वरताण राष्ट्रवादीने कॉग्रेसवर केलेल्या कुरघोडी पेक्षा बरीच मोठी आहे.

चाणक्यने भाजपला महाराष्ट्रात १५१ आणि सेनेला ७०+ दिले होते. कॉंग्रेस एनसीपीला एकदम चिल्लरमध्ये गणल होत.भाजपवाले पण चाणक्यने आम्हाला १५१ चा अंदाज दिलाय आम्ही निश्चित १५० पार करू असे बोलायचे.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 8:51 pm | श्रीगुरुजी

निकाल लागेपर्यंत सर्वच पक्ष स्वतःबद्दल अवास्तव अंदाज देत असतात. जसे भाजपवाले आम्ही १५० पार करू असे म्हणत होते तसे शिवसेनावाले आम्हाला १७५-२०० जागा मिळतील असे सांगत होते, काँग्रेसवाले आम्ही १०० च्या पुढे जाऊ असे सांगत होते तर राष्ट्रवादीवाले आम्ही बहुमताच्या जवळ आहोत असा दावा करत होते.

भाजपला आपण केलेल्या दाव्याच्या ८० टक्के जागा मिळाल्या पण इतरांना आपापल्या दाव्याच्या तुलनेत जेमतेम १/३ जागा मिळाल्या.

विवेकपटाईत's picture

21 Oct 2014 - 8:02 pm | विवेकपटाईत

निकाल लागला बेडूक आणि सर्प कोण हे कळलेच असेल.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 8:32 pm | श्रीगुरुजी

तुम्ही जर बेडूक व सर्प हे शिवसेना-भाजप संदर्भात म्हणत असाल तर या दोघांपैकी कोणीच त्यापैकी नाही. हे जर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात म्हणत असाल तर त्या दोघांपैकीही कोणीच बेडूक अथवा सर्प नाही.

त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेला बेडूक कोण व सर्प कोण हे अजून समजलेले नाही.