भेसळ

रवीराज's picture
रवीराज in काथ्याकूट
18 Oct 2014 - 5:13 pm
गाभा: 

भेसळ करणाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहीजे? खाद्य पदार्थांमधे भेसळ म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अन्नपदार्थांमधे भेसळ करताना जे घटक वापरले जातात त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवु शकतात, एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, एखाद्याला आयुष्यभरासाठी व्याधि / व्यंग यांचा सामना करावा लागु शकतो, समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते हे भेसळ करणऱ्यांना माहित असते. तरीही बिनदिक्कत भेसळ केली जाते.
उदा.- दुधामधे युरीया मिसळणे, सिंथेटिक दुध बनवणे, सिंथेटिक खवा बनवणे- त्यापासुन मिठाई बनवणे, मिठाईला चांदीच्या ऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख लावणे, कृत्रिम रंग वापरणे, किडनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे, सफरचंदावर चकाकीसाठी मेण लावणे, इ.इ. ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, अजुन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बहुतेकांना माहित नाही.
खून करणे, खूनाचा प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध इ. विविध कलमांखाली कठोर शिक्षा सुनावली जाते, तर अशाच एखाद्या कलमाखाली कठोर शिक्षा ह्या भेसळबाजांवर केली पाहिजे. कारण यांचे कृत्य तत्क्षणी दिसत नसले तरी दुरगामी भयंकर परिणाम करणारे असतात.
सणासुदिच्या काळात तर यांच्या या दुष्कृत्यामधे विलक्षण वाढ होते. सर्वसामान्य माणुस आनंदामधे सण साजरा करायला जातो आणि हि मंडळी त्याच्या आनंदावर विरजण घालायचे काम करतात. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी ग्राहकवर्ग जागरुक असला पाहिजे.
आणखी भेसळयुक्त पदार्थ कोणते, भेसळयुक्त पदार्थ कसे असतात, त्यांना ओळखायचे कसे, कुठल्या ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ असतात, भेसळ रोखण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात माहितीची देवाण-घेवाण करुन आपणा सर्वांच्या ज्ञानात भर घालता येईल.

प्रतिक्रिया

भेसळीची व्याख्या व्यापक असायला हवी. त्याविरोधात कायदे असले तरी अंमलबजावणीसाठी यंत्रणा नसल्याने किंवा अंशतः भ्रष्ट असल्याने कारवाई होताना दिसत नाही. फक्त ब्रांडेड अन्नपदार्थ विकत घेऊन हा धोका काही अंशी टाळता येतो. पण घेतलेली भाजी फळे धान्य भेसळयुक्त आहे का हे पहायची सोय नाही आणि वेळ पण नाही.

बाकी हल्ली अगदी लोकांच्या विचारांत पण भेसळ झालीय खरी! :)

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2014 - 10:19 am | माम्लेदारचा पन्खा

विविध अन्नपदार्थात होणारी भेसळ ओळखणे हे ब्रम्हदेवाच्याही कुवतीपलीकडचे झालेले आहे. कॅलशिअम कार्बाईडने पिकवलेली फळे, भाज्या, युरियायुक्त दूध,मेटनिल यलो घातलेल्या डाळी , माती आणि खडे घातलेलं धान्य, तुपातली प्राण्यांची चरबी , तिखटातला विटेचा चुरा, घोड्याची लीद आणि याशिवाय औषधातली भेसळ जीवघेणी होऊ शकते.

अनेक कडक कायदे करून ह्या विषयात म्हणावे तितके यश अजून आलेले नाही. फोफावलेला भ्रष्टाचार इथेही आपले स्वरूप दाखवतोच. ह्यावर अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे.

http://www.fssai.gov.in/ ह्या लिंकवर आपल्याला सुरक्षा उपायांची माहिती घेता येऊ शकेल तसेच अन्नाच्या व औषधाच्या भेसळीबाबत तक्रार कुठे व कशी करावी ह्याची माहिती सुद्धा मिळेल.

पेट्रोल मधे सुद्धा भेसळ होते आणि परिणामी इंजीनची बुच लागते, शिवाय प्रदुषण होते ते वेगळेच !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

रवीराज's picture

21 Oct 2014 - 12:09 pm | रवीराज

मिठाईवाल्यांनी मिठाईवर पिस्त्याऐवजी हिरवा रंग दिलेले शेंगदाणे वापरले.

अत्रन्गि पाउस's picture

27 Oct 2014 - 10:28 am | अत्रन्गि पाउस

भारतीय मानसिकतेत 'कायदेभंग' हाडीमाशी मुरलेला आहे आणि मग काहीही करून फायदा कमवा ह्याच्याशी सांगड घातली कि हा धुडगूस सुरु होतो ...
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा कुठे स्वस्त काही मिळते आहे असे कळले कि भारतीय मानसिकता पुढचा मागचा विचार करू देत नाही ...
मुंबईतील (रस्त्यावरील ) बहुतांश चहाच्या टपरीवर वापरले जाणारे दुधाचे ब्रांड बघा ...सांडविच टपरीवर वापरले जाणारे बटर चीज ह्यांचे ब्रांड बघा ....कशाचा कशाला पत्ता नसतो

बहुगुणी's picture

27 Oct 2014 - 9:10 pm | बहुगुणी

FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY OF INDIA: QUICK TESTS FOR SOME ADULTERANTS
IN FOOD

Kitchen tricks to expose food adulteration

वरच्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे मुंबईकरांसाठी:
Catch the adulterer
According to the directives by the FDA, if a packed product with an ISI or an AGMARK tests positive for adulteration, you can take the sample to the Agmark head office on the Tulsi Pipe road, between Matunga Road and Mahim railway station, and register an official complaint. The agencies then conduct their own tests, and if confirmed, raid their premises and take legal action against erring companies.

या विषयावर मिपावर यापूर्वीही सविस्तर माहितीपूर्ण चर्चा झाल्याचं आठवतंय, कुणाला दुवा मिळाला तर इथे देतीलच.

रवीराज's picture

28 Oct 2014 - 7:47 am | रवीराज

दुवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल बहुगुणी यांना धन्यवाद.