मातृत्त्व लांबवणे

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in तंत्रजगत
16 Oct 2014 - 4:02 pm

बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं...

त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही.

यात असं म्हटलंय... मूल जन्माला घालणे लांबणीवर टाकून जैविक घड्याळाकडे दुर्लक्ष करत करिअरवर लक्ष केंद्रित करणे या महिलांना शक्य होणार आहे. आणि यासाठी अ‍ॅपल फेसबुक या कंपन्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. पण हे असं लांबणीवर कसं काय टाकता येइल आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय. मुलाच्या वडिलांचे काय इ. इ.

जरा शोध घेतल्यावर अशीही माहिती मिळाली

-----
egg freezing is becoming of increasing interest to a number of women who may not be in a secure relationship and choose to put a few eggs in storage for when, and if, the right man comes along. Putting fertility on hold in this way is egg freezing for social reasons.
------

लिंक १

लिंक २

लिंक ३

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

16 Oct 2014 - 4:15 pm | सौंदाळा

egg freezing...

याचा खर्च खुप असतो असे ऐकले होते.
तसेच स्त्रीचे वय वाढले तर अशाप्रकारे तयार केलेला गर्भ तिला धारण करणे सोपे नसेल, परत सरोगेट मदर आणा. होऊ दे खर्च..
तज्ज्ञांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

तत्रज्ञान माणसाचे माणुसपण हिराउन घेत आहे का ? असा प्रश्न हल्ली बर्‍याच वेळेला पडतो. कंपन्या त्यांचा स्वार्थ पाहतात आणि कर्मचारी त्यांचा आर्थीक फायदा, यात आहे त्या आयुष्याचे अनमोल क्षण जगणे मात्र विसरुन जातात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पैसा's picture

16 Oct 2014 - 7:21 pm | पैसा

आता तर पन्नाशीच्या पुढच्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनाही स्वतःचे मूल जन्माला घालता येते असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मग या तंत्राज्ञानाचा नेमका उपयोग काय? अभिनेत्र्यांचा अजून एक स्टंटबाजीकरता विषय, यापलिकडे फार काही उपयोग असेल असे वाटत नाही.

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2014 - 11:31 pm | पिवळा डांबिस

आजवर पुरुषांना त्यांचे शुक्रजंतू (काय पण सालं नांव आहे मराठीत!!) फ्रीझ करून ठेवायची सोय होतीच की.
आता स्त्रियांना जर एग्ज (ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही!) फ्रीझ करून ठेवता येत असतील तर त्यात वाईट काय?
ज्यांना ते करावंसं वाटतं त्या स्त्रिया ते करतील, ज्यांना विशीत माता व्हायचं असेल त्यांना याची गरजच नाही...

तुषार काळभोर's picture

21 Oct 2014 - 5:22 pm | तुषार काळभोर

बीजांड/स्त्रीबीज

पिवळा डांबिस's picture

21 Oct 2014 - 9:59 pm | पिवळा डांबिस

असेल बुवा असेल!
काय भयानक भाषा आहे!!!!
:)

आनंदी गोपाळ's picture

24 Oct 2014 - 1:35 pm | आनंदी गोपाळ

डिंभ.

ही केवळ 'योग्य वेळ' येईपर्यंत स्त्रीबीज जपून ठेवण्याची प्रक्रिया आहे, याचं आईची शिक्षणाची किंवा करिअरची प्राथमिकता हे कारण असेल किंवा एखाद्या दुर्धर आजारामुळे सद्य परिस्थितीत मातृत्व तिला शक्य नसेल असंही कारण असू शकेल.

या egg freezing च्या प्रक्रियेत (त्या स्त्रीने आपल्या बाळासाठी योग्य बाप शोधेपर्यंत किंवा तिच्या शारीरीक वा इतर प्राथमिकता मान्य असल्याने असं विलंबित पितृत्व मान्य असणारा पुरूष यात सहभाग घेईपर्यंत) पुरूषाचा सहभाग शून्य आहे.

एक प्रक्रिया म्हणुन (freezing eggs at temperature of -196 degrees Celsius) ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वीपासूनच उपलब्ध आहे. त्याची आता 'बातमी' होण्याचं कारण म्हणजे अ‍ॅपल आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांनी त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे, हे आहे. अर्थात्, त्यामागे या कंपन्यांचा, कर्मचारी महिला बाळंतपणाची रजा न घेता दीर्घकाळ काम करू शकतील हा स्वार्थ आहेच.

वर लेखात दिलेल्या दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे स्त्रीबीज freeze करण्यासाठी per freezing cycle अंदाजे १०,००० डॉलर्स च्या आसपास, आणि ते सांभाळण्यासाठी दरवर्षी ५०० डॉलर्स, असा खर्च अपेक्षित आहे. त्याच दुव्यात साधारणपणे ३८ वर्षे वयाच्या स्त्रियांसाठी हा मार्ग उपलब्ध आहे. त्यात म्हंटल्याप्रमाणे "Most women 38 years of age and under can expect to harvest 10- 20 eggs per cycle." हे वाचलं म्हणजे खर्च कुठपर्यंत वाढू शकेल याचा अंदाज यावा.

कवितानागेश's picture

21 Oct 2014 - 4:04 pm | कवितानागेश

महत्त्वाचा विषय आहे.
मूळात त्या टिकवून ठेवलेल्या चा उपयोग फाक्त त्या आईलाच नाही, तर इतरही काही स्त्रियांना, ज्यांना बीजांड्कोषाचे काही आजार आहेत, किंवा काही कारणानी (अनुवाम्शिक रोग वगरै) स्वतःची बीजाम्डं वापरणे शक्य नाही, त्यांनाही होउ शकतो.
माझे तरी अस्म मत आहे, की जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत.

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 4:10 pm | मदनबाण

जसा sperm donation चा प्रचार केला जातोय, तसाच स्त्रियाम्नीही healthy eggs फ्रीझ करुन टिकवण्यासाठी द्यावीत.
माऊ तै... ते कंपन्या स्त्रीया आई होउन सुट्टीवर जाउ नये म्हणुन पैका देत आहेत, कंपनीच्या नफ्यासाठी मातृत्त्व लांबवण्यास सांगत आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

कवितानागेश's picture

21 Oct 2014 - 4:45 pm | कवितानागेश

भान्डवलशाही संपवणं सोपे नाही. त्यातल्या त्यात काय 'बरं' करता येइल त्याचा मी विचार करतेय. :)
आत्यंतिक स्पर्धेचं आणि भरपूर पैसा कमावण्याचं 'वेड' लोकांच्या डोक्यात आहे, तोपर्यंत कंपन्या त्याचा फायदा घेतच रहाणार. मग पुढचं फ्रस्त्रेशन टाळण्यासाठी त्यातल्या त्यात फायद्याचं काय होईल, तेच बघावं लागेल.
फक्त वयामुळे नाही तर कामाच्या ताणानीदेखिल ३५-४० नंतर प्रजनन्शक्ती कमी होत असते, अशावेळेस स्वत्;चे ( किन्वा दुसरीचे) 'तरुण एग्ज' वापरायला मिळाली तर निदान येणार्‍या जीवाला तरी त्याचा फायदा नक्कीच होईल.

सोत्रि's picture

18 Jan 2016 - 9:18 am | सोत्रि

प्रचंड सहमती!

- (भांडवलशाहीचा गुलाम) सोकाजी

महत्त्वाच्या विषयाचा उगाच पचका होणार नाही अशी आशा!

सुबोध खरे's picture

22 Oct 2014 - 2:56 pm | सुबोध खरे

हे वाटते तितके सोपे नाही.
स्त्रीबीजे गोठवून केंव्हा ठेवतात? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पोटातील अवयवाचा कर्करोग. यात ओव्हरी (बिजाण्डकोष), गर्भाशय, मूत्राशय इ खालच्या पोटातील अवयव किंवा रसग्रन्थिचा कर्करोग(लिम्फोमा) इ. य़ा मध्ये जेंव्हा त्या स्त्रीला रेडियो थेरपी द्यावी लागते तेंव्हा तिचे बीजांड कोश त्या किरणाच्या मार्गात येउन तिच्या स्त्रीबिजांचे नुकसान होऊ शकते किंवा त्या बिजांच्या गुणसूत्रात किरणोत्सारामुळे गंभीर असे बदल होऊ शकतात अशा वेळेस त्या स्त्रीचे उपचार सुरू करण्याअगोदर तिची स्त्रीबीजे काढून गोठवून ठेवली जातात. कारण जर केमो किंवा रेडियो थेरपीने वंध्यत्व आले तर तिची मुल स्त्रीबीजे वापरून तिला परत मुल होऊ शकते.
आता जर आपले स्त्रीकर्मचारी गरोदरपणाच्या सुटीवर जाऊ नये यासाठी काही कंपन्या त्यांना आर्थिक आमिषे दाखवून गरोदर पण पुढे ढकलण्यात उद्युक्त करीत असतील तर काय म्हणावे. लोक एक गोष्ट विसरतात कि वैद्यकीय शास्त्र पहिले बाळंतपण हे वयाच्या ३० च्या आत आणि दुसरे पस्तिशीच्या आत( खरेतर २५ आणि ३०) व्हावे असे सांगते याचे कारण स्त्रीची शरीरिक वाढ पूर्ण झालेली असते. त्याचवेळेस वय वाढलेले नसल्याने गरोदरपणात होणारे मधुमेह उच्च रक्तदाब इ विकार (जे मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम करू शकतात) यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी असते. पस्तीशी नंतर हे प्रमाण व्यस्त प्रमाणात वाढत जाते. शिवाय स्त्रीच्या हाडांची रचना जास्त घट्ट होते( तिची हाडे तेवढी लवचिक राहत नाहीत. यामुळे सिझेरियन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. शिवाय वाढत्या वयामुळे मुलांचे संगोपन तितके कठीण होत जाते. (उदा. वय जास्त झाले कि रात्रीची जागरणे कठिण होत जातात. मुलांच्या सततच्या तक्रारी किरकिरी आजारपणे यासाठी लागणारी शांत आणि संयत वृत्ती वयोमानानुसार कमी होत जाते. रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते)आणी झोप पूर्ण न झाल्याने पुढचा दिवसभर चिडचिड होत राहते. त्यातून आई कामावर जात असेल तर अजूनच कठीण
आर्थिक कारणासाठी आज स्त्रीबीजे गोठविली जातील.
पण यातून मध्य्वायीन पालकांचे नवीन प्रश्न निर्माण होतील. कारण मुले आपल्या पायावर उभे राहण्याच्या अगोदरच आईवडिलांची आजारपणे आणी वार्धक्य सुरु झालेलं असेल.
सध्या इतकेच पुरे

साती's picture

22 Oct 2014 - 7:53 pm | साती

त्याचप्रमाणे स्त्रीबीजे मिळवण्यासाठी छोटी का होईना शस्त्रक्रीया करावी लागते.
वीर्य मिळवण्याइतकी सोप्पी प्रक्रीया नाही ती.
त्यात सध्यातरी इन विट्रो फर्टिलायझेशन करून मग तो जीव आईच्या गर्भात इम्प्लाण्ट करणे या प्रक्रीयेचा सक्सेस रेट अगदी चांगल्या केंद्रातही ३०-४० टक्के किंवा त्याहून कमी आहे.
मग अशी किती स्त्रीबीजे गोठवून ठेवायची?
मूळात काही नैसर्गिक कमतरता असेल तर ठिक नाहीतर उगाच /करियरसाठी/हौस म्हणून निसर्गाच्या कामात कुठल्या लेवलपर्यंत ढवळाढवळ करायची याचीही नैतिक बाजू एकदा तपासली पाहिजे.
हे म्हणजे आमच्या गावात काही स्त्रिया उगाच उपासतापासांच्या नावाखाली/खूप काम असतं या सबबीखाली योग्य आहार न घेता स्वतःची हेळसांड करून घेतात आणि मग ब्लड लावा, सलाईन लावा म्हणून आमच्या मागे लागतात त्या स्पेक्ट्रमचे दुसरे टोक आहे.

रात्री मुलाने चार वेळा उठवले तर विशीतील आई ला परत झोपणे जितके सोपे आहे तितके चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या आईला सोपे नसते

सर, हे पुरुषाना देखील लागु होते का ?

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2014 - 9:58 am | टवाळ कार्टा

पुरुषांना प्रतिक्रीया कशी मिळेल ते सर्वस्वी त्या आईच्या "मूड"वर अवलंबून असेल ;)

सुबोध खरे's picture

23 Oct 2014 - 12:13 am | सुबोध खरे

साती ताई,
यावरून एका सिंधी स्त्रीची आठवण झाली. मी मुंबईत नौदलाच्या गोदीत आपत्कालीन कामावर असताना चक्कर येते म्हणून तिला आणले होते. ती नौदलाच्या वेतन कार्यालयात कारकून म्हणून काम करत होती. तिने सकाळी मधुमेहाची औषधे घेतली होती आणि उपास( बहुधा करवा चौथ असावा) म्हणून काहीही खाल्ले नव्हते. मी तिला परोपरीने समजावून सांगितले कि तुम्हाला काहीतरी खाणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही कोमात जाल. असे असताना सुद्धा तिने तसे करण्यास साफ नकार दिला. शेवटी नाईलाजाने मी तिला १८ G च्या कान्युलाने तीन ग्लुकोज एक तासात चढवली शिवाय दोन २५ % ग्लुकोजच्या अम्प्युलहि त्यात घातल्या. ती स्त्री नंतर व्यवस्थित कार्यालयात गेली. तिला मी भरपूर नारळाचे पाणी पिण्यास सांगितले( ते उपासाला चालणार होते असे ती म्हणाली होती )
पुढे काही वर्षांनी (१०-११ वर्षांनी ) मी घराचा हप्ता भरण्यासाठी वेतन कार्यालयात भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी अर्ज देण्यास गेलो असता. दोन लाखाचा धनादेश एक दिवसात माझ्या हातात आला. तेंव्हा त्या स्त्रीने मला या प्रसंगाची आठवण करुन दिली. तिने मला तिचा उपास मोडला नाही म्हणून धन्यवाद दिले आणि सांगितले कि सर तुमचा अर्ज पहिला आणि मी स्वतः सी डी ए मध्ये तो अर्ज तातडीने पाठवून सही करून आणवला. ( सामान्यपणे या कामाला तीन ते चार दिवस तरी लागतात). आता मी तिला धन्यवाद दिले.

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2016 - 2:11 am | नर्मदेतला गोटा

डायना हेडन बनली डिलेड ममा

भूतकाळ आणला वर्तमानकाळात