"काही नाही… "

योगी_१९८५'s picture
योगी_१९८५ in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 5:34 pm

मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो…
त्या पैकी काही खालीलप्रमाणे…

कधी कधी… इशश्य…
कधी कधी… काही तरीच काय हो…
कधी कधी… आता शांत बसा…
कधी कधी…खाऊ कि मारू आता…
कधी कधी…अरे बापरे!!! काय करून ठेवलाय हे…
कधी कधी…जवळ येउन अस्सा……… घ्यावा… (मधला शब्द प्रत्येकाच्या विचार शक्तीनुसार टाकावा.)
कधी कधी…आई शप्पथ…इथेच नाचव…
कधी कधी…संपल सगळ…

आणि भरपूर…
पण यापैकी आपण जाणून, समजून घेतो तरी किती???
आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला आवडत असलेली "गोड " हास्य फुलावातोत का?

आणि आता "पुरुष वर्ग"
कारण होणारा आनंद हा बोलूनच दाखवल्या जातो…
आपल "काही नाही" हे बहुतेक वेळा म्हणा नाहीतर प्रत्येक वेळेस म्हणा एकच असत

"खरच काहीच नाही… "

पण तरी त्यातल्या त्यात काही भावना खाली टिपल्या आहेत…
कधी कधी…केली का काशी… ?
कधी कधी…याला म्हणतात "शुद्ध हलकटपणा"
कधी कधी… लैच फेल... रावं…!!!
कधी कधी… अबे झंडू …
कधी कधी… राहू देत मी सांभाळतो…

आणि अश्या परिस्थितीत आपल्या कोणी तरी एकांत द्यावा हिच अपेक्षा असते पण… ते कस शक्य आहे…
कुठून तरी आवाज येतो आणि म्हणतो "काय झाल?"

त्यावेळेला "काही नाही म्हणजे… शप्पथ डोक्यात दगड घालावासा वाटतोय…

तुमच्या अश्याच काही "काही नाही… " भावना असतील तर नक्की सांगा, आणि अनुभवलेल्या असतील आणखीन उत्तम …
मग त्या कोणत्या वर्ग कडून असतील …… त्याचं स्वागतच आहे…

योगी…

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

9 Oct 2014 - 5:37 pm | भिंगरी

अर्थ तुम्हीच समजुन घ्या...

जेपी's picture

9 Oct 2014 - 5:53 pm | जेपी

घोटाळा होत आहे.
दोन दोन योगी (scratch on head)