फरसाण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
8 Oct 2014 - 8:32 pm
गाभा: 

फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच...
लहान थोर सा-यानाच तो आवडतो..
फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच
फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत..
मला पुरोहितांचे फरसाण आवडते,.
या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात..
हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत
पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार
आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी??

..

..

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

8 Oct 2014 - 9:21 pm | कपिलमुनी

:)
अकु आले

आमच्या गावाजवळ लेस्टरला फरसाण नावाचाच हलवाई प्रसिद्ध आहे फरसाणसाठी :)

पैसा's picture

8 Oct 2014 - 9:49 pm | पैसा

मला हल्ली नवा धागा म्हटला की धडकीच भरते! धाग्याच्या नावात फरसाण बघून वाटले आता काय गुजरात्यांना शिव्याशाप दिलेत की काय! पण नाही! इतक्या साध्या सरळ धाग्यासाठी अकुंना धन्यवाद! फोटो आवडले. आता कुटा फर्साण! =))

प्यारे१'s picture

9 Oct 2014 - 1:34 am | प्यारे१

>>>> आता कुटा फर्साण!
फर्सान्कुट. कसं लागंन त्ये चवीला? पार राडाच हुनार की.

कुटलेलं फरसाणं छान लागतं. आमचे आजोबा प्रत्येक चिवडा, फरसाण कुटून खायचे.

सुहास..'s picture

8 Oct 2014 - 9:52 pm | सुहास..

बेस्ट अ‍ॅज चकणा ;)

अविकाका , तुम्ही बी आमच्यातले का ;)

प्रमोद देर्देकर's picture

9 Oct 2014 - 12:01 pm | प्रमोद देर्देकर

अरे सुहास काय विचारतोयस? तुला माहित नाही का अकुकाकांची खासीयत. एकदा का धागा टाकला के की ते परत त्या धाग्यावर येत नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

8 Oct 2014 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी

लहाणपणी वाण्याच्या दुकानातील काचेच्या बरण्यांमधले फरसाण एखाद्यावेळेसच खरेदी केले जायचे.

आमच्या शहरातील सर्वात मोठ्या भारतीय दुकानात रांजणांमध्ये फरसाणाचे विविध पदार्थ ठेवलेले असतात. हवं तसं मिश्रण एकत्र करून विकत घ्या. पूर्वी मी जंक फूड म्हणून टाळायचो. एकदा खाऊन पाहिल्यावर आता नियमीतपणे विकत आणतो.

तुमचा अभिषेक's picture

8 Oct 2014 - 10:52 pm | तुमचा अभिषेक

फरसाणमध्ये भरपूर कांदा कापून, जमल्यास चवीनुसार टॉमेटोही चिरा जरा, असे ते मिश्रण पावात भरून कच्छी दाबेली सारखे खायचे.. बेस्ट .. सुका मिसळपाव सुद्धा बोलू शकतो याला :)

काळा पहाड's picture

8 Oct 2014 - 10:57 pm | काळा पहाड

त्यात उकडलेलं अंडं सुद्धा टाकून पहा मग सांगा.

आमच्याइथे मागल्यावर्षीपासून चितळ्यांचे फरसाण मिळायला लागलेय.

आमच्याइथे मागल्यावर्षीपासून चितळ्यांचे फरसाण मिळायला लागलेय.

आमच्या इथे मात्र नेहमी बेसनाचेच फरसाण मिळते

रेवती's picture

9 Oct 2014 - 5:39 pm | रेवती

असेल, मग मी काय करू?

पिवळा डांबिस's picture

8 Oct 2014 - 11:02 pm | पिवळा डांबिस

महाराष्ट्रात फरसाण खावं ते मुंबईत!
ते ही सेन्ट्रल लाईनवर घाटकोपर, मुलुंड तसंच वेस्टर्न लाइनवर अंधेरी, मालाड असल्या नामांकित उपनगरात!!!
माझी वैयक्तिक आवड म्हणजे मुलुंड वेस्ट्चं स्टेशन जवळचं कोठारीचं फरसाण!!!
पठ्ठ्या किती दशकं फरसाण विकतोय माहिती नाही पण चाळीस वर्षांपूर्वी त्याचं दुकान जुनं, म्हणजे दुकानावरची पाटीबिटी झिजून तुटून गेलेली, असं होतं! पण फरसाणाच्या चवीला तोड नाही!!!
अजूनही प्रत्येक भारतभेटीत त्याचं किलोच्या किलो फरसाण वाहून इथे आणतो!!!!

सुबोध खरे's picture

9 Oct 2014 - 12:15 pm | सुबोध खरे

+ १००
मुलुंडला मी ४७ वर्षे राहत आलो आहे( मधली २३ वर्षे लष्करात असल्याने जाऊन येउन) परंतु त्या दुकानाचे नाव आजही मला माहित नाही.ते ज्या इमारतीत आहे तिचे नाव कोठारी निवास आहे त्यामुळे त्या दुकानाला कोठारी निवास, कोठारीचं फरसाण अशी नावे आहेत. तो फरसाण बाजूच्याच दुकानात तळतो. त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. त्या फरसाणाचा खप भरपूर असल्याने तेथे शिळे फरसाण कधीच मिळत नाही. शिवाय फ़र्सनबरोबर मिळणारी पपई च्या काचर्या घातलेली चटणी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अशी चटणी एक तर गुजराती फरसाण वाल्यांकडे मिळते किंवा थेट सौराष्ट्रातच मिळते.

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2014 - 11:17 am | प्रभाकर पेठकर

त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात.

खरे साहेब, आपल्या दुकानदारावर मी कुठलाही आरोप करीत नाहीये. आणि कुठलेही सरसकटीकरणही करीत नाहीए.
माझा अनुभव सांगतो आहे.
चांगल्या ब्रँडेड तेलाच्या डब्यांना भंगारात बर्‍यापैकी किमत येते फक्त अट असते डब्याला अगदी बारीक भोक पाडून (खिळ्याने वगैरे) त्यातील तेल काढून घ्यायचे आणि डबा खराब करायचा नाही. आठवड्यातून एकदा एक माणूस येऊन सर्व डबे घेऊन जातो अर्थात तुम्हाला चांगली किंमत देऊनच. शिवाय तुमच्याकडचे वापरलेले, काळे पडलेले तेल सुद्धा विकलं जातं.
ह्या काळ्या पडलेल्या तेलात कसले तरी केमिकल मिसळले कि त्यातील कार्बन (तेल काळे करणारा घटक) वेगळा होऊन तळाशी बसतो. वरचे अल्मोस्ट स्वच्छ दिसणारे तेल त्या वापरलेल्या ब्रँडेड डब्यात भरून ते बेमालूम 'सील' केले जातात. हे वापरलेले तेल अर्ध्या किमतीत विकले जाते. बघणार्‍याला ब्रँडेड डबे दिसतात आणि 'चांगले' तेल वापरत असल्यावर विश्वास बसतो. ह्या तेलात, ते स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या, केमिकलचे अंश असतात जे आपल्या आरोग्याला अत्यंत धोकादायक असतात.
सर्व उपहारगृह व्यावसायिक असे तेल वापरतात असे नाही. पण बहुतेक जणं वरच्या कमाईसाठी ब्रॅंडेड तेलाचे डबे अशा एजंटांना विकतात आणि ह्या धोकादायक भेसळीला हातभार लावतात. असे तेल खुपवेळा रस्त्यावच्या वडापाव गाड्यांवर, ऑम्लेट, भुर्जीपाव गाड्यांवर, रस्त्याच्या कडेच्या चायनिज गाड्यांवर विकले जाते. टपरी टाईप उपहारगृह सुद्धा वापरत असावीत असा माझा संशय आहे.
हा प्रतिसाद मागेही एकदा तुमच्याच एका प्रतिसादावर दिला होता. नव्याने देण्याचे कारण नविन सदस्यांच्या माहितीसाठी आणि जुन्या सदस्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी दिला आहे. वाचकांनी बाहेरचे जंक फुड वगैरे खाताना काळजी घ्यावी ही विनंती.

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 10:02 pm | पिवळा डांबिस

तुम्ही डिसक्लेमर दिलेला आहेच. आणि कोण कसलं तेल वापरत असेल ते आजकालच्या काळात ते कुणी सांगावं?
परंतु कोठारी फरसाणच्या संदर्भातला अनुभव म्हणून सांगावसं वाटतं की त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय.
पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही...
असो.

प्रभाकर पेठकर's picture

11 Oct 2014 - 3:53 am | प्रभाकर पेठकर

त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय.
पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही...

वाचून आनंदच झाला. कधी काळी आलोच तिथे तर मीही विश्वासाने कोठारींकडून फरसाण घेईन.
माझा उद्देश आहे की, कांही ठिकाणी, कांही संशयास्पद आढळलं तर काळजी घ्या. सगळेच कोठारी नसतात.

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2014 - 10:31 am | पिवळा डांबिस

कांही ठिकाणी, कांही संशयास्पद आढळलं तर काळजी घ्या.

सहमत आहे.

नाटक्या's picture

9 Oct 2014 - 11:28 pm | नाटक्या

घाटकोपरला हिंगवाला लेन बहुदा. मस्त फरसाण मिळायचे.. आठवड्यातून एकदातरी वारी व्हायची...

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 2:44 am | पिवळा डांबिस

वॉव! ग्रेट माईन्ड्स थिंक अलाईक!!!!!!!! :)
मिपावरचे दिग्गज माझ्या मताशी सहमत असलेले पाहून धन्य झालो!
खरेडॉक्टर, नाटक्या, तुम्हाला अनेक धन्यवाद!
(आता बाकीच्या चिल्लरपिल्लरांना घालू देत काय गोंधळ घालायचाय तो!!!)
:)

मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का पि डां काका. उगा आपण रहात असलेल्या लाईनला लागून शेवटचं स्टेशन म्हणजे जग संपतं असं नाही. (फुल्ल पेटती मशाल. राकेलच्या बुधल्यासकट )
आमच्या पाचगणीच्या लक्ष्मीविलास हॉटेल (दवे बरं का दवे) चं नाहीतर राजपुरे चं फरसाण खाऊन बघा. नाय आवडलं तर नाव बदलेन.
(स्वगतः ...... अहो स्वगत आहे ना? तुम्हाला कसं कळणार?)

थोडक्यात, गावागणिक फरसाणची, फॉर दॅट मॅटर कुठल्याही पदार्थाची चव बदलते.
लहानपणापासून त्याच चवीची सवय लागलेले आपण थोडीच्च दुसर्‍या कशाला चांगलं म्हणणार आहोत? पदार्थाच्या चवीबरोबर आपण चघळतो आपले 'ते' दिवस. खरंतर ते आपल्या आवडीचे असतात. म्हणून अमुक एक लई भारी आणि तमुक एक बरा. चालायचंच!

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 9:52 pm | पिवळा डांबिस

(आता बाकीच्या चिल्लरपिल्लरांना घालू देत काय गोंधळ घालायचाय तो!!!)
चालू द्या..
:)

प्यारे१'s picture

10 Oct 2014 - 10:35 pm | प्यारे१

:-/

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2014 - 10:34 am | पिवळा डांबिस

:P

>>ऑलरेडी, मुभा दिलेली आहे.

आता संपादकांच्या तकलेर मिर्‍यां वाटपाची बाकी रवतली सगळीं !! ;)

पैसा's picture

12 Oct 2014 - 5:27 pm | पैसा

पिडांच्या फुडे कोण कितें उलयतलो?

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2014 - 10:24 am | पिवळा डांबिस

पिडांच्या फुडे कोण कितें उलयतलो?

आय अ‍ॅम टेकिंग धिस अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट!!! :)
अ‍ॅन्ड, थॅन्क यू सो व्हेरी मच, फॉर द कॉम्प्लिमेंट!!
आय अ‍ॅम ग्रेटफुल!!

पैसा's picture

14 Oct 2014 - 4:22 pm | पैसा

कॉम्प्लिमेंटच आसां!

हजार सोनाराचो नि येक पिवळो डांबिसचो!

(जमलंय का कोंकणी/मालवणी जे कै असेल ते?)

सानिकास्वप्निल's picture

10 Oct 2014 - 4:50 pm | सानिकास्वप्निल

+१००००००
अगदी अगदी लहानपणापासून कोठारीचे फरसाण खाल्ले आहे, आजही भारतवारीत माहेरी गेल्यावर कोठारीकडचेच फरसाण आणते व इथेसुद्धा घेऊन येतेच.
खरे सर म्हणतात तसेच पपईची लच्छेदार चटणी तर क्या बात है.

तसेच बोरीवली-दहिसरच्यामध्ये प्रकाश फरसाणवाला आहे त्याच्याकडे मिळणारा कॉर्न चिवडा, पोह्यांचा चिवडा ताजा,चविष्ट असतो, तसेच दहिसर पूर्वेला Misquitta Nagar ला फरसाणमार्ट आहे (नाव आठवत नाही) तिथे मिळणारी कचोरी, भावनगरी शेव, गाठिया व डिंकाचे लाडू अगदी तोंपासू आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

फरसाण आलं..मग जिलबी नको का? :D

ही घ्या... =))
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQF6KNxgHopjHhLNtWCLnZJBOCjA5fhTUvhGK2syWHwgWlJ0q3v

आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण ज्या तांब्यातून पाडली गेली तो तांब्या- अर्थात भांडे..का लपविता?

त्यांनी लपविले नसेल. कदाचित पीठ परत भरत असतील

हम्म, शक्यता नाकारता येत नाही.

नाखु's picture

9 Oct 2014 - 12:38 pm | नाखु

पाहण्यासाठी तरी धन्याशेठ यांनी या धाग्यावर अवतीर्ण व्हावे ही आत्मुदांची इच्छा.

ह्या... अकुकाकांच्या धाग्यात एकपण ष्टोरी नाही हे पाहून फरसाणात कुजका दाणा आल्यागत वाटलं...

विकास's picture

9 Oct 2014 - 1:34 am | विकास

धाग्याकर्ताने धाग्यात चितळे आणि काका हलवाईंचे नाव दोनदा का आणले अशी मला उगाच शंका आली.
फरसाणला इंग्रजीत मिक्शर म्हणलेले पाहीले आहे.
मला फरसाण आवडते
भेळ आणि मिसळीवर पण फरसाण चांगले लागते.
फरसाणात कांदा घालून कोणी खाल्ले आहे का?
फरसाण कुठल्या तेलात केलेले असते माहीत नाही. पण एकंदरीतच त्यात फॅट असावे असे वाटते. म्हणून ते कमी खावे.

असो, याहून जास्त मोठा निबंध लिहीता येईल असे वाटत नाही.

अनुप ढेरे's picture

9 Oct 2014 - 7:26 am | अनुप ढेरे

मंगला टाकीजजवळ गुप्ता फरसाणवाला आहे. एक नंबर फरसाण मिळत त्याच्याकडे. आणि बरोबर मिरचीचा ठेचा. आहाहा!

हरकाम्या's picture

10 Oct 2014 - 12:09 am | हरकाम्या

मंगला थेटर्जवळ म्हणजे नेमके कुठे ?

शिवाजीनगर कोर्टाकडून जो रस्ता येतो तिथून मंगलाला जायला डावीकडे वळालं की लगेच.

दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक).आमच्या बाल्कनीत दहा वर्षे येणारा कावळा फक्त फरसाणच खातो सकाळी आठ आणि दुपारी चार वाजता.

काळा पहाड's picture

9 Oct 2014 - 11:21 am | काळा पहाड

इतकं जंक फूड देवून तुम्ही त्याचं कोलेस्टेरॉल वाढवलेलं असणार. कुठे फेडाल ही पापं !

मदनबाण's picture

9 Oct 2014 - 11:30 am | मदनबाण

दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक).
सौराष्ट्र का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 10:08 pm | पिवळा डांबिस

दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)

ते ही मस्त असतं!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Oct 2014 - 9:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मिपाकर गुजरातमध्ये गेलेले दिसत नाहीत वाटते...
फरसाण खावे ते राजकोट,भावनगरला. ८०च्या दशकात गेलो होतो आम्ही तिकडे. उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे.

काळा पहाड's picture

9 Oct 2014 - 11:22 am | काळा पहाड

पैसे दिले का नाही की नेहमीप्रमाणंच?

प्रदीप's picture

9 Oct 2014 - 12:11 pm | प्रदीप

माई जुन्यापुराण्या आहेत... म्हणजे तश्या त्या असाव्यात, कारण सर्वांनाच त्या अधिकारवाणीने अरे-तुरे करतात. तेव्हा त्या कदाचित १८८० च्या दशकातही तेथे गेल्या असण्याची शक्यता आहे!

फुरसुंगीकर आज्जी, लिहा ना एकदा तुमच्या १८८० मधल्या दौर्‍याचं वर्णन!! वाचायला आवडेल.

पैसा's picture

9 Oct 2014 - 5:42 pm | पैसा

ती कुरसुंदीकर आज्जी. फुरसुंगीकर नव्हे. तुला हा फुरसुंगीचा फास्टर फेणे वाटला काय?

...आत्ताच्या ह्या दशकात तिकडे 'मोदीछाप' उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे. असे नान्याने मला एकदा हळुच सांगितले होते. तो म्हणे तिकडे हल्ली वरचेवर जात असतो, हे खरे आहे काय ???

विजुभाऊ's picture

9 Oct 2014 - 10:57 am | विजुभाऊ

वा वा वा माईसाहेब. तुमच्या त्या १८८० च्या दशकातल्या दौर्‍याचे वर्णन ल्ह्या की.

त्रिवेणी's picture

9 Oct 2014 - 11:47 am | त्रिवेणी

व्यक्ति:श मला चितळे, काका हलवाई यांच्याकडचे फरसाण नाही आवडत. फारच मिळमिळत असतात.
कराचीवालाची जाड शेव मस्त असते. तीच मी शेवभाजी साठी सुद्धा वापरते.

तिमा's picture

9 Oct 2014 - 11:54 am | तिमा

खरं तर गुजराती लोक तशा प्रकारच्या सगळ्याच नाश्त्याला 'फरसाण' असे म्हणतात. फक्त मुंबई-पुण्याकडे या
मिक्स्चरला 'फरसाण' म्हणतात. 'फरसाण' नांवाने जे मिळते त्याहीपेक्षा चविष्ट मिक्स्चर खायचे असेल तर ' शेव खमणी' खाऊन बघा. बडोदा-अमदाबादला उत्तम चवीची मिळते.

बॅटमॅन's picture

9 Oct 2014 - 12:06 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद!

प्रदीप's picture

9 Oct 2014 - 12:17 pm | प्रदीप

आपण ज्याला फरसाण असे संबोधतो, त्याला गुजराती 'फाफडा' म्हणतात. ताटात 'डाव्या व मधल्या' बाजूला जे जे काही असते, म्हणजे लोणची, चटण्या, भजी, ढोकळा इत्यादी. -- ह्या सगळ्याला मिळून 'फरसाण' म्हटले जाते.

मी अहमदाबादेत पूर्वी रहात होतो, तेव्हा आमच्या जवळच एक नवे फरसाणचे दुकान उघडले. त्याचा गल्लीच्या कोपर्‍याबर 'फरसाण नो दरियो' व त्याखाली दुकानाच्या दिशेने बाण--असा बिलबोर्ड लावला होता, तो ह्या लेखाच्या निमीत्ताने आठवला.

विजुभाऊ's picture

9 Oct 2014 - 12:35 pm | विजुभाऊ

प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; जेवणातील तळलेल्या विषेषतः खार्‍या-तिखट पदार्थाला उदा : पापड, समोसे , गाठेया ,कचोरी , पात्रा , ढोकळा ,या सर्वाना फरसाण असेच सम्बोधतात. आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो.

प्रदीप's picture

10 Oct 2014 - 10:54 am | प्रदीप

माझी एक चूक झाली होती, लोणची- चटण्या इ. 'अथाणूं' म्हटले जाते-- ते 'फरसाण'चा भाग नव्हेत. आणि तुम्ही लिहील्याप्रमाणे जेवणातील तळलेल्या,खार्‍या-तिखट पदार्थांना फरसाण असे संबोधतात.

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2014 - 10:32 pm | पिवळा डांबिस

आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो

गडी अंगानं किरकोळ, न आडवा,
त्याच्या काव्यात सातारवी गोडवा,
गंऽऽ त्याच्या काव्यात सातारवी गोडवा...

हसरा मुखडा, काळजाचा तुकडा
मिपावरी रुतला,
गं बाई बाई, मिपावरी रुतला!!!

हितंबी दिस्तोय, तिथंबी दिस्तोय,
शोधू नको, शोधू नको, शोधू नको....

बाटला गं बाई, बाटला!!!!
बाटला गं बाई, बाटला!!!!

घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!
:)

नाटक्या's picture

10 Oct 2014 - 11:26 pm | नाटक्या

पिडां कडे भरपूर मोकळा वेळ दिसतोय?

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2014 - 10:37 am | पिवळा डांबिस

फ्रायडे मूड!
दुसरं काय!!!
:)

विजुभाऊ's picture

22 Oct 2014 - 6:49 pm | विजुभाऊ

बाटला गं बाई, बाटला!!!!
बाटला गं बाई, बाटला!!!!

घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!

ओ हायच मी पक्का घाटी. कृष्णेच्या घाटावरचा.
उगाच डोंबोली अन ठाणे असल्या बीनघाटाच्या गावातला नाय
पिडां काका कदी येताय हिकडं.....

सस्नेह's picture

9 Oct 2014 - 11:57 am | सस्नेह

फरसाणसारखाच खुसखुशीत अन सात्विक धागा !

सौंदाळा's picture

9 Oct 2014 - 12:02 pm | सौंदाळा

आमचे मत
नाशिककर फरसाण, एच्.ए. कॉलनी पिंपरी १ लंबर
परदेशी फरसाण, गांधी पेठ, चिंचवड्गाव. २ नंबर

पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण? पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव सारखाच पुणेरी फरसाण हा विनोदाचा विषय आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे फरक आहे.
खरे खवय्ये गावांवरुन नाही तर प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन, चाखुन मत बनवतात,

प्रचेतस's picture

9 Oct 2014 - 12:28 pm | प्रचेतस

नाशिककर सहमत. लै भारी.
पण हल्ली अंमळ सोडा जास्त असतो.

परदेशीकडचे अगदी ताजे आणि मस्त.

चाणक्य's picture

30 Oct 2014 - 4:28 pm | चाणक्य

सहमत

नाखु's picture

10 Oct 2014 - 11:09 am | नाखु

कुठे आहे? एकदा भेट द्यावी काय?
नेह्मीचे परदेशीपेक्षा जरा बदल म्हणून.

पुण्यात फरसाण हा प्रकार इतका मोठ्ठ्या रेन्ज मधे मिळतो की लोक बटाटा वेफर्स आनी वडा पावाला सुद्धा फरसान म्हणतात

प्रचेतस's picture

9 Oct 2014 - 12:40 pm | प्रचेतस

इंदोरी नमकीन हेच खरे. बाकी सर्व व्यर्थ.

पुण्याच्या मंडळींनी या धाग्यास टक्कर म्हणून मिठाईवर लवकर धागा याने डोमेननेम रेजिस्टर करावे अन्यथा कोणीतरी ढापेल आणि पुणेरी आत्मे अतृप्त राहतील चितळे,काका आणि सिरवी आहेतच सुरूवात करण्यासाठी.

नडियादी भुसा आणि महाबळेश्वर मिक्स हे दोन फरसाणप्रकार उत्तम.

कोंककातले फरसाण इन जनरल उजवे. गणपतीपुळ्याला मंदिराबाहेर लागून जी मिसळ नाश्त्याची दुकाने आहेत तिथे गेल्यास नक्की दोनेक किलो ष्टाक भरुन आणावा.

सदाशिव पेठेत एस पी कॉलेज समोर एक भेळेचे दुकान आहे ( हो तेच ते ; आरशात सुलट दिसावीत म्हणून भिंतीवर उलटी पाटी लावलेले" ) तेथे फरसाण खाऊन बघा.
अर्थात पुण्यात क्याम्पात लाल देवळाजवळ एक मोठे भावनगरी दुकान आहे. तेथे भरपूर व्हरायटी मिळते.

विलासराव's picture

9 Oct 2014 - 6:41 pm | विलासराव

कुर्ला (प.) चा दिप़क फरसानवाला आमचा नं १.

विनोद१८'s picture

22 Oct 2014 - 11:55 pm | विनोद१८

फरसाणाशिवाय त्याच्याकडे एकदा शेवबुंदीसुद्धा खाउन बघा, अप्रतिम चव. त्याने बाजुलाच एक काउंटर चालु केलेय चाट व फास्ट फुड्चे तिथले जंबो बटाटे वडे व सामोसे तसेच उत्तम दर्जाचे व चवीचे दहीवडे न चुकता खावेत.

बध्धा गुजरात एवूच खाय छे अने पछी बुलेटनी सवारीना जाय छे !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Oct 2014 - 11:46 pm | निनाद मुक्काम प...

वा विलासराव तुम्ही जुन्या आठवांनी ताज्या केल्यात
कुर्ला वेस्ट ला स्टेशन जवळ लहान पणापासून माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग दीपक फरसाण
ह्यांची खासियत म्हणजे शेंदरी रंगाच्या जिलब्या
ताज्या ताज्या गरमागरम जिलब्या खाण्यासाठी तेथे दिवस रात्र गर्दी असते , माझे बालपण डोंबिवली मध्ये गेले सुट्टीत कुर्ला येथे आल्यावर पहिले जिलब्या खाणे ठरलेले असायचे तेही पत्रावळी मध्ये बांधून त्यामुळे पाक सांडत नाही.
इतर फरसाण पण लाजवाब

बाळ सप्रे's picture

10 Oct 2014 - 11:30 am | बाळ सप्रे

चिपळूणच्या परांजपे यांचा लाल चिवडा आणि जाड शेव फार अप्रतिम असते..

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2014 - 12:41 pm | बोका-ए-आझम

गुजरातमध्ये आणि आता मुंबईत पण - थाळीमधल्या तळणीच्या तिखट पदार्थांना सरसकट फरसाण हा शब्द वापरला जातो - समोसा, कचोरी, ढोकळा, खमण, तिरंगी - हे सगळं फरसाण यातच मोडतं. बाकी तसं फरसाण म्हणाल तर दर शनिवारी आमच्या इथे शिवाजी पार्कात फरसाणवाला चक्कर मारतो. निव्वळ अप्रतिम! शिवाय छेडा, रोका आणि ब्रिजवासी या त्रयीने आज गेली ५०-६० वर्षे तरी आमचा हा चस्का पुरा केलेला आहे!दादरला रानडे रोडवर कच्छी फरसाण पण सुंदर!

मागे संगमनेर मध्ये बाजारतळावर नढे ची फरसाण भेल खाल्ली, अन् बस दिल खुश झाला, मझा आली.

आमच्या गावातील ब्रिजवासी फरसाण एक नंबर हाय.

रमेश आठवले's picture

10 Oct 2014 - 11:28 pm | रमेश आठवले

गुजरात मधील काही भागात फरसाण ला पर्चुरण असेही संबोधतात. लहानपणी या नावाने खाल्ले आहे.

विजुभाऊ's picture

11 Oct 2014 - 10:25 am | विजुभाऊ

गुजराथीत "परचुरण". हा शब्द "किरकोळ " या अर्थाने वापरला जातो

फरसाणात चिवडा जास्त असावा की फाफडा? दाणे कमी असावेत की जास्त? चिवडा मक्याचा हवा की जाड पोह्यांचा? डाळं कमी हवं की जास्त? फरसाण तयार घ्यावं की हवं तसं मिश्रण बन्वून घ्यावं? मनुका जास्त असाव्यात की काजू? बारीक शेव किती बारीक असावी? भडभुंजाकडचं फरसाण घ्यावं की घेऊ नये?

अर्थात हे मी माझ्यासाठी विचारत नाहिये...उगाच एक आपलाही शेर असावा म्हणून!!

प्रोलिफिकगाय's picture

11 Oct 2014 - 10:45 pm | प्रोलिफिकगाय

कोठारीचं फरसाण मुलुंडला नक्की कुठे आहे ?

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2014 - 3:23 am | प्रभाकर पेठकर

कोठारींच्या दुकानात.

=))

आदर्श इंधन कुठे मिळते? आदर्श शाळेत (मिरजेतली इपॉनिमस शाळा). असे आमच्या सरांनी एकदा सांगितल्याचे
आठवले. =))

गौरीबाई गोवेकर's picture

13 Oct 2014 - 9:19 pm | गौरीबाई गोवेकर

आजकाल मेले मैद्याचे फरसाण मिळते. चावता चावत नाही. बेसनाचे खुसखुशीत फरसाणाचे दिवस गेले आता

विजय पिंपळापुरे's picture

14 Oct 2014 - 3:35 pm | विजय पिंपळापुरे

माझ्या माहीतीप्रमाणे ते फरसाण वाट्याण्याचे असते.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा

@ वाट्याण्याचे असते.>>> रैट्ट +++१११

तेलातली प्रामाणिक भेसळचा पेठकरकाकांचा अनुभव खरा आहे. मी पूर्वी घडयाळे दुरुस्तीनिमित्ताने वेगळी तेले वापरून पाहायचो. एका एमआईडीसीला लागणाऱ्या तेल विकणाऱ्या दुकानात गेलो होतो. मी अर्धा लिटरच मागितल्याने दुकानदाराने विचारले कशाला पाहिजे ?वाणी आमच्याकडून नेतात गोडेतेलात मिसळायला.

'गोडा तेला'(?)तली भेसळ हा गुन्हा होऊ शकत नाही परंतू 'शेंगदाणा तेला'तल्या भेसळीबद्दल खटला भरता येतो.
फरसाणात भेसळ केल्याबद्दल माफ करा.

विजय पिंपळापुरे's picture

14 Oct 2014 - 4:27 pm | विजय पिंपळापुरे

होय, सफेद वाटाणे भिजवुन त्याच्या पासून बनवतात फरसाण.

तेच फरसाण कड्क असत.

कपिलमुनी's picture

14 Oct 2014 - 6:03 pm | कपिलमुनी

शतकाकडे !

प्रोलिफिकगाय's picture

22 Oct 2014 - 5:33 pm | प्रोलिफिकगाय

कोठारींचे फरसाण दुकान मुलुंडला कुठे आहे ?
मुलुंड कॉलनी मध्ये आहे तेच का ?

मुलुंड स्टेशनहुन पाच रस्त्याकडे जाताना डाव्या हाताला पोलीस स्टेशनच्यापुढे कोपर्‍यावरचे दुकान.

सुबोध खरे's picture

30 Oct 2014 - 8:33 pm | सुबोध खरे

मुलुंड स्टेशन पश्चिम ला उतरल्यावर डावीकडे वळून भांडुपच्या दिशेने जवाहरलाल नेहरू रोड कडे चालायला सुरुवात करा.दोन मिनिटाच्या अंतरावर डावीकडे कोपर्यावर CCD दिसेल त्याच्या समोरच्या बाजूला चौकाच्या कोपर्यावर असलेले फरसाण मार्ट म्हणजे कोठारी निवास्चे फरसाण मार्ट. बर्याचदा रिक्षाची रंग तिथपर्यंत पोहोचते इतके स्टेशनच्या जवळ आहे. तितक्याच अंतरावर पूर्वेला माझा दवाखाना सुद्धा आहे. माझ्या वेळेत आलात तर फरसाण माझ्यातर्फे. (सर्व मिपाकरांना खुली ऑफर)

प्रोलिफिकगाय's picture

22 Oct 2014 - 5:36 pm | प्रोलिफिकगाय

Kothari Sweets Farsan
Pipe Line Bus Stop,
Guru Gobind Singh Marg,
Mulund West Mumbai,
Maharashtra 400082, India‎

मी-सौरभ's picture

22 Oct 2014 - 7:17 pm | मी-सौरभ

शतकाकडे अजुन एक पाऊल :)

vikramaditya's picture

22 Oct 2014 - 10:53 pm | vikramaditya

एस. व्ही. रोड, तृप्ती फरसाण... worth checking out!!!

जेपी's picture

23 Oct 2014 - 7:05 am | जेपी

नव्याण्णव.

अनुप ढेरे's picture

23 Oct 2014 - 7:26 pm | अनुप ढेरे

शंभर!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2014 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

गुलाबजाम!

फरसाणावर धाग्याचे शतक..

जय हो अकु.. यू आर अ हीरो..

प्रोलिफिकगाय's picture

30 Oct 2014 - 1:40 pm | प्रोलिफिकगाय

धन्यवाद विनोद१८ !!