पंक्चरवाल्यांची चालुगिरी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
8 Oct 2014 - 1:44 pm
गाभा: 

मंडळी

आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल.
प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १०
ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो.

प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२

तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका.

एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला.

काही प्रश्न---

पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात?

टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे?

टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते?

चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते?

रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात?

तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2014 - 1:48 pm | पिलीयन रायडर

आमची अ‍ॅक्सेस पण गेल्या २-३ महिन्यात ६-७ वेळा पंक्चर झाली आहे.. नक्की भानगड काय असेल?

मृत्युन्जय's picture

8 Oct 2014 - 1:54 pm | मृत्युन्जय

हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2014 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो.

सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

8 Oct 2014 - 2:11 pm | मदनबाण

ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

नानासाहेब नेफळे's picture

8 Oct 2014 - 2:16 pm | नानासाहेब नेफळे

टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.

ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते.

हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित).

यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.

बाकी टायर पंक्चर होतो तिथेच बाजूला पंचरचे दुकान कसे असते हा मला पडलेला सार्वकालीन प्रश्न आहे.

हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात.

आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.

आयुर्हित's picture

8 Oct 2014 - 2:56 pm | आयुर्हित

त्यांच्या समोर उभे राहून नीट निरखून बघितले तर फक्त एकच पंचर निघेल!

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2014 - 3:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच
एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा

वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय

ब़जरबट्टू's picture

27 Mar 2015 - 2:58 pm | ब़जरबट्टू

हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...

पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी.
बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2014 - 3:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

यावर एक लेख टंकणारच आहे

तुषार काळभोर's picture

8 Oct 2014 - 3:00 pm | तुषार काळभोर

केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात.
(माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.)
(एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 3:05 pm | बॅटमॅन

सहमत आहे. केरळी पंचरवाले जास्त प्रामाणिक व नम्रही असतात.

बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे.
चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का?
ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........

महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ??

अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!

परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.

बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2014 - 3:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

तुषार काळभोर's picture

8 Oct 2014 - 3:16 pm | तुषार काळभोर

:)

सर्वसाक्षी's picture

8 Oct 2014 - 3:56 pm | सर्वसाक्षी

आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात.

माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.

काळा पहाड's picture

8 Oct 2014 - 5:27 pm | काळा पहाड

युपी बिहार वाले पाहिले की उगीचच कानखाली मारावंसं वाटतं.

समीरसूर's picture

8 Oct 2014 - 3:47 pm | समीरसूर

आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही.

माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-(

फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो.

एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)

ब़जरबट्टू's picture

27 Mar 2015 - 1:20 pm | ब़जरबट्टू

आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile
+११११
दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..

फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही.
मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .

आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;)
पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;)
बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;)

जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

काळा पहाड's picture

8 Oct 2014 - 5:30 pm | काळा पहाड

जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. Wink

हे बुलेटवाल्यांना चिडवायला ना?

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 3:29 pm | अनिरुद्ध.वैद्य

आताशा आम्ही एलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर बसवून घेणार आहोत. सो हवा टाईट नै व्हायची.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 3:32 pm | टवाळ कार्टा

सहमत...पण स्पोक व्हिलला ट्युबलेस बसवत नैत असे ऐकले आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयड्याची कल्पना नाही ह्याबद्दल. कॉलिंग मोदक.

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 3:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी.

बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.

कपिलमुनी's picture

31 Mar 2015 - 4:14 pm | कपिलमुनी

harleystyle

हे दिसायला (त्यातल्यात्यात) चांगले आहे...

आणखी प्रकार पाहिलेत का..?

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 4:32 pm | टवाळ कार्टा

भारी दिसते आहे :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 5:14 pm | अनिरुद्ध.वैद्य

हेच व्हील्स!

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2014 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर

पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2014 - 5:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते

रेवती's picture

8 Oct 2014 - 6:03 pm | रेवती

वाचतिये, काय बोलणार?

कपिलमुनी's picture

8 Oct 2014 - 6:03 pm | कपिलमुनी

ट्युबलेस टायर असतील तर एक पंक्चर किट विकत घ्यावे .

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 6:11 pm | प्रचेतस

डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले.

दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

प्यारे१'s picture

8 Oct 2014 - 6:50 pm | प्यारे१

>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)

विटेकर's picture

14 Oct 2014 - 2:22 pm | विटेकर

सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे !
आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे.
( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! )
पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !

ब़जरबट्टू's picture

27 Mar 2015 - 1:44 pm | ब़जरबट्टू

हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात..
हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो...
आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो...
पण काही चुका आपल्याही होतात, जसे :-
१) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे..
२) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो..
३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)

वाहन नसल्याकारणाने अजून तरी असे अनुभव आलेले नाहीत पण वर दिलेल्या अनुभवांवरुन बरंच काही शिकता आलं.

धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Oct 2014 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे.

दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.

माझा अनुभव

गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Oct 2014 - 8:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्थळं- कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पुढे लागणारी एक टपरी. आता बसतो का तो ते माहीत नाही.

ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)

आनंद's picture

8 Oct 2014 - 11:11 pm | आनंद

खर आहे !
अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.

टयुबलेस टायरला मी फक्त हवा भर म्हणून सांगतो. पंच वगैरे काय ते मी नंतर बघेन.

रवीराज's picture

9 Oct 2014 - 12:23 am | रवीराज

औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे.
असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.

चौकटराजा's picture

9 Oct 2014 - 5:59 am | चौकटराजा

इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले
प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून
मिळ्ते तिथेच हवा भरायची !

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2014 - 7:36 am | श्रीरंग_जोशी

या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या.

पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.

कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय..
तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..

काळा पहाड's picture

9 Oct 2014 - 11:15 am | काळा पहाड

हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.

मदनबाण's picture

9 Oct 2014 - 11:21 am | मदनबाण

भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo*
लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.
चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सार्थबोध's picture

10 Oct 2014 - 10:32 am | सार्थबोध

विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो

अंतु बर्वा's picture

11 Oct 2014 - 2:26 am | अंतु बर्वा

सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-)

बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!

ट्युब लेस वापरा. हवा गेलि तरि बरेच दिवस चालते. नंतर सवड असेल तेव्हा पंक्चर काढ

बिहाग's picture

14 Oct 2014 - 12:55 pm | बिहाग

( Modes pl move this to appropriate place )
( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line.

Thanks for the help.

काळा पहाड's picture

14 Oct 2014 - 1:54 pm | काळा पहाड

आय अ‍ॅग्री. इट टेक्स लॉट ऑफ टाईम टू टाईप. दॅट ईज द रिझन आय कॅन नॉट राईट मोअर.

पाषाणभेद's picture

21 Oct 2014 - 3:31 pm | पाषाणभेद

(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे)
(ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस.......

लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2014 - 4:18 pm | टवाळ कार्टा

इथे मराठीची "ग..म..भ..न" झालीये ;)

अभिजित - १'s picture

20 Oct 2014 - 9:28 pm | अभिजित - १

३३ ऐवजी ४० भरतात हवा . मी आता फक्त पेट्रोल पंप वर हवा भरतो.

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 12:15 pm | पिलीयन रायडर

मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे.
मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये..

मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का?

काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 12:43 pm | अत्रन्गि पाउस

अमृत मासिकात येणारे उसंदू वगैरे आठवले

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उसंदु काय प्रकार आहे विअर्ड रेन साहेब?

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 12:56 pm | अत्रन्गि पाउस

उप संपादकाच्या डुलक्या
आता त्याला आपण typos ...म्हणतो

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 12:46 pm | पिलीयन रायडर

मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..!

असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'(

ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 12:52 pm | पिलीयन रायडर

नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता..

माहितीसाठी धन्यवाद!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्युबलेस ची पण चौकशी करा. किंमतीचा अंदाज नाही.

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 1:00 pm | टवाळ कार्टा

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2

असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 1:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी तुझ्या आणि खाटुकच्या पंगतीमधे नाहीये असं म्हणायचय का तुला? =))

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 1:27 pm | टवाळ कार्टा

खाटूक आणि माझ्यावर बरेच शिक्के बसलेत...त्यातला १ अजूनतरी तुझ्यावर नै ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 1:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि कर किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर सांग.

कुठला ओ कुठला तो शिक्का म्हणे ;)

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 2:03 pm | टवाळ कार्टा

तोच तो...मिपावरच्या काही विशिष्ठ शक्तींच्या विरोधात लिहिण्याचा ;)

अब मिपा की कोई भी ताकत हमें उनके खिलाफ लिखनेसे नै रोक सकती- सिवाय संमं के ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 2:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काम झालेलं दिसतय :P

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, अन मला बी जत्रंला येऊ द्या की रं.. ;)

"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.

त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..?
या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..?

हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 2:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Mar 2015 - 4:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही.
शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 4:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

हायला मिपावर एक अनिरुद्ध कट्टा करायचा का? तुम्ही चौथे. =))

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 3:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

एकुलता एकच असायचो मी :D शाळा, कॉलेजमध्ये अनिरुद्ध नावाचे फार कमी लोक्स :)
जरूर करूयात कट्टा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार वाचु र्‍हायला का बे!!!! =))

अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात

ही पण भानगड आहे का..??

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 3:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे.

एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत.

नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:55 am | कैलासवासी सोन्याबापु

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

ब़जरबट्टू's picture

30 Mar 2015 - 10:45 am | ब़जरबट्टू

इत्ता दुर तक ढकले ?? सही मे ज्यादा पी थी लगती मिंया तुमने... सन्नी देओल बन गये यारों... :)

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा

माहिती मिळाली तर मल पण कळवा :)

"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.

@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते.

इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं)

याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

सुबोध खरे's picture

27 Mar 2015 - 7:54 pm | सुबोध खरे

गवि साहेब
माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात.
http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html
http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

मोदक's picture

30 Mar 2015 - 12:16 pm | मोदक

धन्यवाद गवि..!!

चाकांमध्ये नायट्रोजन वापराचा काही अनुभव आहे का..? त्यामुळे टायर तापत नाही असे ऐकले आहे.

टवाळ कार्टा's picture

30 Mar 2015 - 12:24 pm | टवाळ कार्टा

साध्या हवेत पण ७४% नायट्रोजन असतोच की...मला पण समजत नाही की त्या बाकी २६% ने असा काय फरक पडतो

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 3:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लॅांग ड्राईव्ह ला फरक पडतो. टायर जास्त थंड राहतात.

मोदक's picture

30 Mar 2015 - 3:11 pm | मोदक

धन्यवाद!

प्रसाद१९७१'s picture

31 Mar 2015 - 12:58 pm | प्रसाद१९७१

ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का?

माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः

http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-ca...

तुषार काळभोर's picture

1 Apr 2015 - 9:41 am | तुषार काळभोर

लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे.
युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर)
झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी .
देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 11:05 am | टवाळ कार्टा

४ वर्षांत एकदाही हवा भरली नाही???? गाडी फूटभर तरी ढकलता ना ;)

तुषार काळभोर's picture

1 Apr 2015 - 4:38 pm | तुषार काळभोर

आम्ही इंच इंच भूमी रस्ता लढवतो.. :D

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 5:13 pm | टवाळ कार्टा

वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :)

खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

तुषार काळभोर's picture

1 Apr 2015 - 4:40 pm | तुषार काळभोर

मतितार्थ आत्ता लक्षात आला
स्वसंपादन आजवर पहिल्यंदाच वापरलं ---- धन्यवाद, नीलकांतजी!

नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट.

तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः

लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो.

टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच.

-लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात.

टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं.

शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही.
.....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो.

थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Mar 2015 - 3:25 pm | अनिरुद्ध.वैद्य

हा प्रश्न मलापण पडला होता.
धन्यवाद.

ब़जरबट्टू's picture

27 Mar 2015 - 3:15 pm | ब़जरबट्टू

बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच..

माझ्या काळ्या लिस्टीत.. :-
१) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :(
२) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :(

माझ्या पांढ-या लिस्टीत.. :-
१) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :)

एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

रवीराज's picture

30 Mar 2015 - 3:28 pm | रवीराज

जगताप डेअरीतील हिंदी भाषीक पंक्चरवाल्यां बाबतीत सहमत, इतरांबद्दल अनुभव नाही.

खटासि खट's picture

30 Mar 2015 - 3:21 pm | खटासि खट

वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

मोदक's picture

30 Mar 2015 - 3:45 pm | मोदक

मोरं :))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 4:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मनसेमोराचा कसा पिसारा फुलला.

कापूसकोन्ड्या's picture

30 Mar 2015 - 8:09 pm | कापूसकोन्ड्या

चांगला धागा
माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला
नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू.
मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो.
नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन))
काही गोष्टी समजल्या

  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत

.
उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)

  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)
खंडेराव's picture

31 Mar 2015 - 3:21 pm | खंडेराव

औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली.

मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 10:23 pm | संदीप डांगे

मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही.

हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

अहो,
ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 10:55 am | संदीप डांगे

वोके वोके. माय मिष्टेक...
म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे

तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 11:28 am | पिलीयन रायडर

मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे?

गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

संदीप डांगे's picture

1 Apr 2015 - 12:15 pm | संदीप डांगे

झालं की. ट्युबलेस मधे अ‍ॅन्टी पंक्चर जेल लावून नायट्रोजन भरा.

सुनील's picture

1 Apr 2015 - 1:32 pm | सुनील

मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो.

पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 1:37 pm | टवाळ कार्टा

+१०००

खंडेराव's picture

1 Apr 2015 - 3:54 pm | खंडेराव

योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

मदनबाण's picture

1 Apr 2015 - 4:50 pm | मदनबाण

सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

ऋष्या's picture

6 Apr 2015 - 12:00 pm | ऋष्या

गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले.

तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

मदनबाण's picture

6 Apr 2015 - 12:32 pm | मदनबाण

ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

आजानुकर्ण's picture

1 Apr 2015 - 6:38 pm | आजानुकर्ण

चिंचवडला जयहिंद पेट्रोलपंपाजवळ एक सेल्फ सर्विंग हवायंत्र होते. तसा प्रकार लोकप्रिय नाही का?