मेणाचा मृत्युंजय भावला

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
1 Oct 2014 - 7:58 am

अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो.
त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते. जर अरेबियन नाइट्स जे रीचर्ड बर्टन याने लिहीलेले आहे ( अरेबियन नाइट्स च्या सुरस व चमत्कारीक कथा हा बाळबोध घरगुती मराठी अनुवाद नव्हे) व ज्यात रीचर्ड बर्टन च्या अत्यंत अभ्यासपुर्ण इस्लामी संस्कृती च्या सखोल अनुभवा अभ्यासा वर आधारीत फ़ुटनोट्स आहेत याचे वाचन असेल. तर इस्लामी संस्कृतीचे आकलन वाढते व काही लिंक लवकर लागतात. किंवा तुम्ही लॉरेन्स ऑफ़ अरेबिया हा सिनेमा बघितला असेल किंवा आवरण ही भैरप्पांची कादंबरी वाचली असेल तर कविता थोडी लवकर कळेल इतकेच म्हणायचे आहे. आदर वाइज देखील काही अगदीच गुढ आहे अशातला भाग नाही असो.

तर सर्वसाधारणपणे इस्लामी संस्कृतीत नवाबी षौक वा इनजनरल देखील अनेक उपभोगाच्या प्रकारांपैकी एक होता/आहे तो म्हणजे लौंडेबाजी कींवा ताजबाजी. लौंडा वा ताज या शब्दाचा अर्थ होतो समलिंगी संभोग ज्यासोबत करतात असा कोवळ्या वयाचा अविवाहीत मुलगा. यावरुन ताजबाज कींवा लौडेबाज हे शब्द बनतात म्हणजे असा षौक जे करतात ते पुरुष. हा अर्थात वरच्या वरीष्ठ स्तरात अधिक मुबलक प्रमाणात प्रचलित होता. साकी हा देखील कोवळा मुलगा च असतो ( जो दारु सर्व्ह करतो ) त्याच्याविषयी देखील अनेक लाडीक अश्लील उल्लेख शेरो शायरी त येत असतात. त्यामागील भाव हा देखील समलैंगिक आकर्षणातुन असतो.

आता यात अर्थातच मुलगा हा मायनर एज चा असतो त्याला उपभोगणारा हा सत्तावर्तुळातील आर्थिक सामाजिक सर्वच बाबतीत वरचढ. तर हा एक प्रकारे लैंगिक शोषणा चाच भाग झाला. यात जो काय स्वेच्छेने होत असेल तो दोन प्रौढ पुरुषांमधील संबंध तो वेगळा प्रकार आहे इथे मात्र जो आपण बोलत आहोत ते एकतर्फ़ी अत्यंत क्रुर असे लैंगिक शोषण च आहे. आता या कोलटकरांच्या कवितेमध्ये एका कोवळ्या अशा रीतीने भोगल्या गेलेल्या मुलाच्या मनाच्या अवस्थेचे त्याच्या भावनांचे. या क्रुर प्रसंगाला सामोरे जातांना त्या कोवळ्या मुलाच्या मनात उठलेल्या भावतरंगांचे अत्यंत सुक्ष्म विलक्षण संवेदनशील असे चित्र कोलटकर आपल्या खालील कवितेत रेखाटतात. पुन्हा एकदा एक लक्षात घ्या हा स्वेच्छेने केलेला प्रकार नाही. हा एक बलात्कार च आहे केवळ समलैंगिक बलात्कार आहे इतकेच.

तर कविता अशी सुरु होते.

- हो गया ?
- हो गया.
यात त्या मुलाने प्रश्न केलेला आहे झाल का ? आटोपल का ? उत्तर मिळालय हो झाल ( आता जाउ शकतोस या अर्थाने)
आता मुलगा पुढील कविता स्वत: नॅरेट करतोय. स्वत:विषयी बोलतोय कोलटकरांचा एक एक शब्द अतिशय काळजीपुर्वक वापरलेला असतो बघा
मी मेणाचा भावला
चिकणा हिजडा
भादरलेला
स्वत:ला भावला म्हणतोय व तोही मेणाचा का ? तर भावला हा शब्द मुलगा दर्शवतो मुलगी नाही परत भावला हा खेळण्यासाठी असतो मन मानेल तस तुम्ही त्याच्याशी खेळु शकता. त्याचे हातपाय पोट कसेही वाकवु हलवु शकतात. त्याच्या शरीराशी कसेही अगदी मनाला येइल तसे भावला तुम्हाला करु देतो. त्याला पर्याय च नसतो तो तुमचा खेळ असतो. क्लीओपात्रा या सिनेमात क्लीओपात्रा ही राजाला एका प्रसंगात संतापुन सांगते i am not your sport !. म्हणजे तु वाटेल तस माझ्या शरीरा बरोबर भावने बरोबर खेळु नाही शकत पण भावला ? तो काय म्हणु शकतो बिचारा विकत घेतलेला जत्रेत दिड दमडीची किंमत असले ला भावला ! शिवाय हा मेणाचा आहे. मेणाची तीच खासियत पुन्हा हवा तो आकार द्या कसाही वाकवा तोडा मरोडा काहीही करा तो लोखंडाचा नाही मेणाचा आहे. मउ मॅलीएबल. आणि तो भादरलेला आहे. त्याच्या अंगावरील केस काढण्यात आलेले आहे त्याच वॅक्सीग करण्यात आलेल आहे. तो स्त्री सारखा व्हावा म्हणुन केस काळे केस अडथळा निर्माण करतात रसभंग होतो म्हणुन त्याला पुर्ण भादरलेला आहे “ तयार “ करण्यात आलेला आहे.
दरबारी हजामानं
हिरेजडीत वस्तरा उघडताच
मी काखा वर केलेल्या
दरबारी हजाम आहे नेहमीचच काम आहे हे त्या मुलाच नेहमीच आणला जातो तो येथे राजाला तलफ़ आली की. मग तो म्हणतोय की सराइतपणे आता माहीतेय पुढे काय होणार हे आणि विरोधाचा प्रश्न च येत नाही, म्हणुन तो तुरंत काखा वर करुन उभा राहतो. वस्तरा हिरेजडीत आहे हा उल्लेख भोगणारा राजा कीती शक्तीशाली आहे याची ओळख करुन देतो. म्हणजेच दबाव काय असेल आणि विरोधा चा परीणाम काय असेल व त्या मुलाची तेथील पोझीशन काय असेल याची कल्पना येत जाते.
मांड्या फ़ासटलेल्या
पोटावर सुगंधी साबण फ़ेसाळताच
माझा श्वास मंद झालेला
त्याला प्रिपेअर करण्यात येत आहे. मांड्या फ़ासटलेल्या त्या नंतर पोटावर सुगंधी साबण लावताच त्याचा श्वास मंद झालाय म्हणतो का ? गर्भगळीत झाल्यान ? नेहमीचा अनुभव असला तरी येणारया शिसारीनं ? कळत नाही पण श्वास मंद झालेला वाचताच त्या मुलाच मन डोळ्यासमोर उभ राह्त.
रंगमहालात मी उताणा उखाणा
पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम
बदामी होणारा सलामत
हो गुलाम च आहे तो हे तर सरळ सत्य आहे. बदामी होणारा सलामत ही ओळ काही मला कळली नाही. पण एक आहे सीन डोळ्यासमोर उभा राहतोय व मुलाच्या मनाची अवस्था तेथील वातावरण व त्यातील वस्तुंचा प्रतिकात्मक वापर सर्व घटनेचा संवेदनेच्या पातळीवर तरी झणझणीत अनुभव देतो.
नसत्या झुंबराला
पेटवतो
माझा दुबारा सलाम
राजाला मी दोनदा सलाम केला म्हणतोय हा मुलगा व नसते झुंबर देखील पेटवते याचा सलाम हे प्रतिकात्मक आहे. याला पाहुन याचा सलाम पाहुन जी कामवासना राजाच्या मनात पेटलीय त्याच प्रतिक आहे. तो पेटवतोय राजाच्या कामवासनेला राजा पेटुन उठलाय पुढच्या कामनेने.
मी कुशीला वळेन
तेव्हा माझी विकतची पाठ
ओलावेल गुलाबपाण्यानं
हे ही एक नवाबी रीच्युअल आहे पाठ पुढील कार्यक्रमासाठी गुलाबपाण्यान सुगंधीत केली जातेय. आणि ती विकतची आहे हे महत्वाच. ती हवी तशी वापरता येणार आहे. राजा दाम देखील मोजणार आहे
आणि माझ्यावर अंधार पडेल
सुरकुतलेल्या राजाप्रमाणं
लटलटत.
मेणाचा मृत्युंजय भावला
उच्चारेल मृत्याचा राजलंड
बोबडा
वरील ओळी एक्स्प्लेन करण्यात अर्थ नाही......स्वत: च असणं गरजेचं आहे,

मांडणीसमीक्षा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

1 Oct 2014 - 9:01 am | खटपट्या

काय लिहू कळत नाहीये.
असं काही असतं…… (?)
दया, शिसारी, राग, हतबलता सर्व भावना एकत्र आल्या.

जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय.

एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

स्पंदना's picture

1 Oct 2014 - 11:49 am | स्पंदना

असह्य!!
असहाय्य्य!!

विटेकर's picture

1 Oct 2014 - 12:21 pm | विटेकर

....

नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय !
फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

सविता००१'s picture

1 Oct 2014 - 1:46 pm | सविता००१

आई गं....

राही's picture

1 Oct 2014 - 4:13 pm | राही

रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज.
जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

दशानन's picture

1 Oct 2014 - 10:14 pm | दशानन

>>मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)

१६ खंडात आहे.

एस's picture

1 Oct 2014 - 7:12 pm | एस

अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

सूड's picture

1 Oct 2014 - 7:51 pm | सूड

.....

दशानन's picture

1 Oct 2014 - 10:15 pm | दशानन

या सुरेख अश्या लेखाला प्रतिसाद द्यावा असे शब्द माझ्याकडे नाहीत!

अप्रतिम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2023 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे.
हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो,
म्हणून धाग्याची आठवण.
’तुझ्यासारखी बेढब बाई
कुणी क्वचितच पाहिली असेल
पण तुला
एक कविता मी देऊ लागतोे’

बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2023 - 5:21 pm | श्रीगुरुजी

वाचून शिसारी आली. हा प्रकार खरं तर अनैसर्गिक विकृती आहे. परंतु हा प्रकार नैसर्गिकच आहे हे सांगत समर्थन करणे वाढत आहे.

भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ)
'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ?

मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः

रंगमहालात मी उताणा उखाणा
पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम
बदामी होणारा सलामत
नसत्या झुंबराला
पेटवतो
माझा दुबारा सलाम

यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही.

यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला:
.

वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः

कुमार१'s picture

13 May 2023 - 10:08 am | कुमार१

आवडलाच !