गुड बाय ऑर्कुट

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
30 Sep 2014 - 2:23 pm

आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस!
माझे आणि बर्‍याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला . इंटरनेट फोन वर घरी सहज उपल्ब्ध नसताना कॅफेमधे जाउन स्क्रॅप बघणे , स्क्रॅप पाठवणे ( खास लोकांचा स्क्रॅपबुकवर खास नजर ठेवणे) , फोटोज शेयर करणे याची धमाल यायची आणि मुख्य म्हणजे अनेक जणांशी तुटलेला संपर्क ऑर्कुटमुळे जुळला..
पूर्वी याहू ग्रूप्स होते पण एखाद्याला शोधणे..संपर्क सहज साध्य नव्हता..
ते ऑर्कुटमुळे सोपा झाला.
पण चेपुच्या स्पर्धेत मागे पडल्याने गुगलने ऑर्कुट बंद करायचा ठरवला आहे आणि तशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली..

आज ऑर्कुट बंद होणार म्हणून त्यावरचे फोटो कॉपी करताना बर्‍याच आठवणींनी नॉस्टॅल्जिक झालो म्हणून लेखन प्रपंच !

मुक्तकप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

30 Sep 2014 - 2:27 pm | दिपक.कुवेत

स्क्रॅप बघणे (आपलं आणि दुसर्‍यांच) हे खासचं असायचं आणि ऑर्कुट वापरायला एकदम सोपं होतं. ह्या चेपुची निदान मला तरी अजुन सवय झाली नाहिये.

खास लोकांचा स्क्रॅपबुकवर खास नजर ठेवणे

+१००
आणि आपली प्रोफाईल कोणी कोणी विजिट केली ते पण बघत राहायचो.

चौकटराजा's picture

30 Sep 2014 - 4:08 pm | चौकटराजा

आज देखील मला चेपू पेक्षा आरकूटच आवडते.

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Sep 2014 - 7:18 pm | माम्लेदारचा पन्खा

ऑर्कुटशी माझे असे एक वेगळेच नाते होते …. आयुष्यातल्या खूप बऱ्यावाईट आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत…चेपुला पहिल्यांदा पहिले तेव्हा ते अजिबात आवडले नव्हते (आताही काही खास आवडत नाही !) पण ऑर्कुटने बरंच काही दिलंय …. नंतर नंतर तर ऑर्कुटचा पासवर्ड पण आठवेना झाला लॉगीन न केल्यामुळे …आता ओर्कुट बरोबर सगळे फोटो,स्क्राप्स,त्या आठवणी पण निघून चालल्यात माझ्या आयुष्यातून कायमच्या…अलविदा ऑर्कुट !! आज टायट्यनिक मधली केट विन्स्लेट झाल्यासारखं पार्श्वसंगीत वाजतंय मनात !!

ऑर्कुट हा शब्द आत्ता दुसर्‍यांदा ऐकतिये. पहिल्यांना पुतणीने आठ वर्षापूर्वी बहुतेक, "काकू, तू ऑर्कुटवर आहेस का?" असे विचारले तेंव्हा आणि आत्ता!

मार्मिक गोडसे's picture

30 Sep 2014 - 11:33 pm | मार्मिक गोडसे

आर्कुटशी आमचे 'नाते' नसल्याने आम्हाला सुतक नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 3:51 am | निनाद मुक्काम प...

आभासी जगताची सुरुवात हि ओर्कुट ने झाली पण पुढे चेपू मध्ये जीव रमला. पहिल्या प्रेमाला टाटा करून चेपू मध्ये मन रमले.
म्हणून आज काही विशेष वाटत नाही , पण ओर्कुट मुळे मला मिसळपाव बद्दल माहिती मिळाली त्यासाठी ओर्कुट चा मी ऋणी आहे.

मी-सौरभ's picture

1 Oct 2014 - 7:33 pm | मी-सौरभ

सहमत १००%

कपिलमुनी's picture

1 Oct 2014 - 8:02 am | कपिलमुनी

https://www.google.com/settings/takeout

तुमच्या गुगल आयडीने लॉग इन करा आणि दिलेल्या लिस्ट मधून ज्या सेवेच्या माहितीचा बॅक अप घ्यायचा आहे ती सेवा सिलेक्ट करा. या द्वारे तुम्ही जीमेल, ऑर्कुट ,कॉन्टॅक्ट्स ई. सर्व गुगल सेवांचा बॅक अप घेउ शकता

समीरसूर's picture

1 Oct 2014 - 10:55 am | समीरसूर

ऑर्कुटवर मी कधीच नव्हतो. कधीच पाहिले देखील नाही. फेसबुकवर आहे. आजच्या पुणे मटामध्ये बातमी आहे की २०१७ पर्यंत लोकं फेसबुकला देखील कंटाळलेली असतील आणि नंतर फेसबुकदेखील बंद पडेल. हे होणारच. लोकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं.

फेसबुक बंद पडलं तर काही विशेष दु:ख-बिख्ख होणार नाही मला. मिपासारखा सोशल कट्टा नाही! :-)

ऑरकुट वापरलं होत आणि आवडलं देखील होतं... नंतर ऑरकुट प्रोफाइल डिलीवटला... बझ पण असेच बंद झाले.
सध्या जी-प्ल्स वापरतोय... जी-प्ल्स वरचा माझा प्रोफाइल लोक कसा काय शोधुन काढतात तेच अजुन मलाच कळाले नाहीये ! ;)
बाकी लग्नाळु होतो तेव्हा काही सुचवलेल्या पाखरांनी स्वतःचे निनावी ऑरकुट अकांउट बनवुन { म्हणजे आपले खरे अकांउट मला दिसु नये म्हणुन} माझे ऑरकुट पाहिल्याचे चांगलेच लक्षात आहे ! पाखरं जाम चाप्टर असतात बाँ ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

#‎Facebook‬ वर ओर्कुटच्या नावाने गळे काढणारे पाहून उगाच असे वाटले की मायला, ओर्कुटवर एवढे जीव ओतणारे होते, तर ओर्कुटचा अंत झालाच का?

धंद्याचे बेसिक गणित आहे, ग्राहक आहे तर माल आहे व माल आहे तर ग्राहक आहे. दोन्ही पैकी एक कमी किंवा बंद झाले की धंदा बुडतो! बुडत चालेला धंदा करायला काय गुगल आपल्या गावचा वाणी नाही. त्यांना वाटले ग्राहक नाहीत, बंद करा दुकान!

ज्या ग्राहकांना याचे दुख: वाटत आहे की उगाच त्यांनी दूकान बंद केले, त्यातील ९९.९९% लोकांनी गेल्या काही महिन्यात जाऊ द्या वर्षात म्हणून आपण एकदा ही लॉगीन करून देखील पाहिले नसेल ओर्कुटवर. ओर्कुटपेक्षा उत्तम आणि चांगला ऑप्शन असताना कोण जाईल मरायला त्या ओर्कुटवर =)) त्यांनी काळारूप बदल केले नाहीत ही त्यांची चूक.
काळ बदलला होता, बदलत आहे, हे दिसत असताना देखील त्यांनी समयोचित बदल केले नाहीत म्हणून ग्राहक हे फेसबूकवर आले व फेसबूकचा फायदा झाला. हे त्यांना दिसले नसेल का?

धंद्याची गणिते असतात हो सगळ्यांना सगळे सांगत ना गुगल बसणार आहे, ना #facebook ;)

*हे कोणाला व्यक्तिगत म्हणून लिहित नाही आहे! राग नसावा.