अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - २

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
29 Sep 2014 - 9:15 pm


“ह्म्म्म, सूर्यवंशीसाहेब, त्याचा कबुलीजबाब तुम्ही जो नोंदवून घेत होता. तो आहे की मागवावा लागेल तुमच्या ऑफिसमधून? “ असे म्हणत डॉ. प्रमोद यांनी पुन्हा ती फाईल हातात घेतली. डॉ. अनंत यांनी आपला टेबलाच्या डाव्या खणातून अजून एक फाईल काढली व त्यातील ४-५ पेपर काढत ते डॉ. प्रमोद यांच्या हातात देत म्हणाले “हा त्याचा कबुलीजबाब! म्हणजे त्यांने स्वत: सांगितलेला... कच्चा मसुदा” डॉ. प्रमोद यांनी तो कबुलीजबाब वाचायला सुरवात केली...

क्रमश:

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

“मी सदा पांडुरंग.. नाही, मी अजय बाळकृष्ण.. नाही नाही.. मी नवल कूमार आहे. माझे नाव नवल कूमार! माझे शिक्षण एका नामवंत शाळेत झाले, मी उच्चपदवीधर असून माझे उच्च शिक्षण मी पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले, मला सायन्स ला जायचे होते पण मार्क कमी पडले एवढे कमी की मला कॉमर्सला देखील सोडून आर्टमध्ये माझे नाव नोंदवावे लागले. मी लहान मोठे गुन्हे त्याच काळात करू लागलो होतो, पण जेव्हा कॉलेज संपले व तेव्हा मी पूर्ण अर्थाने गुन्हेगार होण्याचे ठरवले. असा तसा गुन्हेगार नाही. मी खूप बुद्धिमान आहे, बुद्धी वापरून गुन्हे करायचे व कोणाच्या तावडीत सापडायचे नाही. असे ठरवून मी गुन्हे कसे करू शकतो याचा अभ्यास केला. तुम्हाला माहिती आहे, अभ्यास करणे म्हणजे किती कष्ट असतात. पण मी कष्ट केले, व सुरवात घरफोडी करण्यापासून ते अनेक खून करण्यापर्यंत मी प्रगती केली. पहिली घरफोडी केली तेव्हा मी एकदम बालिश होतो, माझ्या धडपडीमुळे आजूबाजूचे देखील जागे झाले, पण मी शिकत गेलो, समाज कसा वागतो हे समजावून घेत गेलो.

समाज कसा वागतो हे समजावून घेत गेलो या वाक्यावर तुम्ही चमकलात? अहो, थोडाफार धोका, त्रास, किंवा आपल्यावर काही बालंट येणार असे दिसले की सामान्य माणूस त्यातून आपली सुटका करण्यासाठी आपल्याला काही माहितीच नाही याचे कातडे आपल्यावर ओढतो... जसे की आपण! काय सूर्यवंशीसाहेब! बरोबर ना? तुमच्या भागातील आमदारांशी तुमची तर अगदी लहानपणा पासून मैत्री! पण जेव्हा त्यांना अटक होऊ शकते व पुढे केस देखील उभी होऊन कोर्टात सवाल-जबाब होऊ शकतात हे कळल्या क्षणी, तुम्ही काही हालचाल करायच्या आधीच कोणीतरी त्या आमदाराला उडवले!

पण तुम्हाला सर्व माहिती असून देखील तुम्ही गप्प बसला की नाही साहेब.. ठीक आहे, मी मुद्दावर येतो. तो खून पण मीच केला. असे अनेक खून ज्याबद्दल कधीच तपास लागला नाही, असे अनेक गुन्हे ज्यांचा गुन्हेगार कधी सापडलाच नाही ते या काळातील जवळपास सर्व मोठे गुन्हे मी केले आहेत, मोठे हां, चिल्लर चोरी मी करत नाही... पण काही गोष्टी अश्या आहेत, की उत्तर नाही आहे. पण सगळे सांगत आहे, सांगत बसलो आहे., आज सर्व काही सांगणार आहे.

आपण कुठे होतो. कबुलीजबाब हो. तोच देतो आहे. हे सगळे चालू झाले ते गेल्या २०-३० वर्षापूर्वी नाही, याच्या देखील आधीपासून.. अगदी माझ्या माझ्या तारुण्यातील दिवसापासून! मी कधीपासून सुरवात करू याच विचारात आहे? असे तुम्हाला वाटते का? नाही ना? नाही मी कुठल्याच विचारात नाही आहे. सध्या मी कोठून व कसे सुरवात करावी या विचारात आहे. मी जास्त विचार करत नाही, फक्त ते कसे घडेल याचे चित्र मी माझ्या मनात उभे करत असतो व सांगत जातो. काही गोष्टी काही कथा आहेत अश्या तुम्हाला वाटतील.. पण या गोष्टी सत्य आहेत, फक्त त्या सत्य आहेत तुम्ही त्याला खात्रीलायक पुरावा नाही देऊन येऊ शकत कारण पुरावे शोधण्याचे काम तुमचे आहे. पण मी सांगतो आहे.. मी केले आहेत गुन्हे... भरपूर!

पण लहानसहान गुन्हे जसे, चोरी, दरोडा बद्दल मी सांगत बसत नाही, ना तुमचा वेळ जाईल ना माझा. मी केलेले १० मोठे गुन्हे सांगतो म्हणजे कसे सुटसुटीतपणा राहील व तुम्हाला काय व कुठे तपास करायचा याची दिशा मिळेल. दुसरी गोष्ट मी दुसऱ्यासाठी काम करत नाही, आय मीन करत नव्हतो. मी माझ्या ईच्छेने सर्व गुन्हे केले आहेत.

दिनांक नाही आता आठवत पण ८४-८६ च्या आसपासचा काळ असावा, अजय मेहरानी नावाचा एक मोठा हिऱ्यांचा व्यापारी मुंबई-बडोदा-सुरत मध्ये हिऱ्यांचा व्यापार करत असे. त्याचा उजवा हात म्हणता येईल असा त्याचा एक खास माणूस.. एम.बी.! महिन्यातील ठराविक दिवशी ठराविक वेळेत सुरत-बडोदा-मुंबई असा प्रवास करायचा व बरोबर त्याच्या आदल्या दिवशी तो त्याच मार्गाने परत सुरतला पोचत असे. त्याची सुरक्षा अशी काही चीज नव्हतीच. त्याच्याकडे एक लहानसे जर्मन मेड पिस्टल. फक्त एक अडचण होती तो आपल्या सीटच्या पुढील-मागील-वरील-बाजूच्या सर्व सीट स्वत:साठी बुक करायचा, एस.. म्हणजे तो डब्बात जवळपास एकटाच प्रवास करायचा फार फार तर सुरवातीला ५-६ आणि डब्बाच्या शेवटी ४-५ माणसे. शक्यतो त्याचे सहकारी असावेत.. पण नसावेत देखील. मी त्याला मारला व १० लाखाचे हिरे लुटले! कसा?

त्याची एक सवय होती, पान खाण्याची. आता सवय असली की त्या सवयीला धरून बाकीच्या सवयी आपोआप येतात, जसे की, खास ठरलेले पान, खास ठरलेला पानवाला, खास बसण्याची जागा, खास थुंकण्याची जागा आणि.. नवीन पान खाण्याआधी पाण्याने चूळ भरावी लागतेच ना! मी सतत आठ महिने पाण्याची बाटली घेऊन त्याच्या शेजारी त्याच्या आवडत्या पान टपरीवर त्याच्या सारखेच पान खात उभा राहत होतो, एकदा त्याने पाणी मागावे व पानवाल्या आधी माझी बाटली त्याच्या हातात जावी यासाठी!

घेतलं त्याने पाणी, खळाखळा चूळ भरली व उरलेले पाणी गटागटा पिऊन देखील टाकले. त्याने पिले नसते तरी फारसा फरक मला पडला नसता, त्याने ४-५ थेंब जरी पाणी तोंडात ओतले असते तरी तो माझ्या जाळ्यात अडकणार होताच.. पाणीच तसे स्पेशल होते.

रस्ताच्याकडेला ती औषधे विकत बसतात बघा, आपण त्यांना नाक मुरडून त्यांच्याकडे न बघता निघून जातो. अश्याच एकाशी ३ महिने मैत्री केली, त्याने त्याच्या त्या रानटी औषधातून नेमकं मला हवे ते दिले. वास, चव विरहीत असा रस की त्याचा एक थेंब पण माणसाला काही तास आरामात झोपवू शकेल. मी असा तसा विश्वास नाही ठेवला त्याच्यावर! आधी मी त्याच्यावर प्रयोग केला.

तिसरया दिवशी तो शुद्धीत आला पण, टोटल लॉस. ओव्हर डोस दिल्यामुळे असेल तो शुद्धीत आला तरी शुद्धीत नव्हता आला. त्याला स्मृतिभ्रंश झाला होता. एम.बी. ला तर मी याच्या कित्येक पण अधिक डोस दिला होता. पण मला काळजी नव्हती, त्या रानटी औषधामध्ये गुण जरी असला तरी ते काम करायला हळू हळू सुरवात करत असे. तो पान खाऊन डब्बाजवळ पोचूपर्यंत माझ्याकडे खूप वेळ होता. अपेक्षेप्रमाणे एम.बी.ला काहीतरी गरगरतय याची जाणीव प्लेटफॉर्मवर पोचताच झाली व मी त्याला धरला..

तो हसला व म्हणाला पडलो असतो. धरला तुम्ही. मी देखील हसलो व त्याला विचारले डब्बा कुठला? त्याने सांगितला, व मी त्याला त्याच्या डब्बात चढवून त्याच्या सीटवर नेऊन बसला. बरोबर एक तासाने तो पूर्ण बेशुद्ध झाला असेल, २-३ तासात त्याच्या ह्दयाचे ठोके मंद मंद होत, शांत झाले असतील... कायमचे!

***********************************************************************************

"इंटरेस्टिंग, सूर्यवंशी तुम्हाला यात नवल काही वाटत नाही आहे? म्हणजे या पहिल्या गुन्हात?" - डॉ. प्रमोद सूर्यवंशी साहेबांच्याकडे पहात म्हणाले व हातातील कबुलीजबाबचे पेपर टेबलावर ठेऊन त्यांनी समोर असलेली पाण्याची बाटली हातात घेतली व झाकण काढले... तोच काहीतरी आठवल्यासारखे करत परत त्या बाटलीचे बुच लावून होती त्या जागेवर ती ठेऊन डॉ. प्रमोद तिच्याकडे टक लावून पाहू लागले..

सूर्यवंशीसाहेबांनी इकडे तिकडे थोडी चूळबुळ केली व एक मोठा आवंढळ गिळत ते म्हणाले “डॉ. प्रमोद, तुम्ही ते औषध आणि पाण्याच्या बाटलीबद्दल बोलत आहात?” डॉ. प्रमोद यांनी नकारार्थी मान हालवली व म्हणाले “डॉ. अनंत आणि सूर्यवंशीसाहेब! समजा, तुम्हाला एखाद्याला लुटायचे आहे, त्याची बेसिक माहिती तुमच्याकडे आहे, त्यासाठी लागणारे हत्यार, या केस मध्ये ते जंगली औषध तयार आहे, तरी तुम्ही आठ महिने वाटत बघत घालवणार? त्या पानवाल्याला काही रक्कम मोजून काही थेंब त्याच्या पानामध्ये घालता आले असते ना? हा सर्वात सोपामार्ग असताना असा आडवळणाचा लांबचा मार्ग याने का निवडला असावा, किंवा ठीक आहे, २-३ थेंब मध्ये तो काहीतास बेशुद्ध पडणार हे माहिती असताना एवढा ओव्हर डोस का द्यावा कि त्याचा जीव.... इंटरेस्टिंग!”

“सूर्यवंशीसाहेब, तुम्ही असा काही गुन्हा घडला आहे, त्या काळात याची चौकशी केलीत का?” डॉ. प्रमोद यांनी आपला कपाळावरील घाम रुमालाने फुसत विचारले. सूर्यवंशी यांनी आपली ब्रिफकेस उघडली व एक फाईल बाहेर काढली व डॉ. प्रमोद व डॉ. अनंत यांच्यासमोर धरली. डॉ. प्रमोद यांनी फाईल हातात घेतली व चाळू लागले.

काहीवेळाने ते म्हणाले “ त्या दोन वर्षात त्या रूटवर, म्हणजे सुरत-बडोदा-मुंबई २६ प्रेत सापडली, त्यातील ७ अशी होती ज्यांचे स्टेट्स अनक्लेम बॉडीज असे आहे. म्हणजे बेवारस प्रेत. ७ पैकी २ भूकबळी, ४ आत्महत्या आणि एक ह्दयगती बंद पडल्यामुळे. बरोबर तुम्हाला ही तेच वाटले असेल जे मला वाटले, ही बॉडी त्या एम.बी. असावी का? सूर्यवंशीसाहेब.. हा क्ल्यू घेऊन किमान सुरवात तर करा पुढे पाहू... पुढील मिटिंगमध्ये, पण डॉ. अनंत, त्याला हलके समजू नका, जास्त कोणाला त्याच्या जवळ जाऊ देऊ नका, पूर्ण नजरकैदेत ठेवा त्याला व एका सुरक्षित खोलीत.. आता पर्यंत जे जे पाहतो वाचतो ऐकतो आहे त्यावरून तरी सध्या मी एकच यातून अर्थ काढू शकत आहे... ही इज व्हेरी व्हेरी डेंजरस पर्सन. यू नीड टेक केअर.. सूर्यवंशीसाहेब ऐकताय ना?”

सूर्यवंशीसाहेब हलकेसे हसत म्हणाले “साहेब, आमच्या फोर्सची टीम येथे आत व बाहेर पूर्ण सुरक्षाकवच करून उभी आहे.” सूर्यवंशी भले हलके हसत बोलले जरी बोलले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर उभे राहत असलेले काळजीचे जाळे वाचायला त्या दोन्ही डॉ.ना सहज जमले होते व ते पाहून यांचे देखील चेहरे पडले होते..

क्रमशः

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 9:25 pm | उगा काहितरीच

धारप स्टाईल वाटतंय ... येऊ द्या पुढचे भाग.

दशानन's picture

29 Sep 2014 - 9:29 pm | दशानन

>>>धारप स्टाईल

कुठली कथा? म्हणजे धारपांची कुठली कथा तुम्हाला हे वाचल्यावर आठवली?

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 9:38 pm | उगा काहितरीच

स्टाईल बोलतोय हो. कुठली एखादी कथा नाही . मस्त. (संपादक मंडळाला विनंती : एका पेक्षा जास्त वेळेस प्रकाशीत झालेले प्रतिसाद अप्रकाशीत करावेत. )
जाता जाता मी पयला.

एस's picture

29 Sep 2014 - 9:27 pm | एस

पुभाप्र.

मस्त झालाय हा भाग...एकदम सस्पेंस.

पण, लिंक लागली असतानाच लेख आटोपला. कृपया पुढचा भाग थोडा मोठा टाका ही आग्रहाची विनंती.

हो आता वाचताना जाणवले ते मला हि, पुढील भाग नक्कीच मोठा लिहीन.

शिद's picture

29 Sep 2014 - 10:13 pm | शिद

धन्यवाद. :)

सारिका होगाडे's picture

29 Sep 2014 - 10:07 pm | सारिका होगाडे

गुढ वाढत आहे. आता पुढील भाग केव्हा? प्रतिक्षा करत आहे.

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 11:29 pm | काउबॉय

फक्त कोणाचा मुद्डा पाडायला सरेंडर झालाय याची जाम उत्सुकता आहे

खटपट्या's picture

29 Sep 2014 - 11:58 pm | खटपट्या

मस्त !! पु.भा.प्र.

दिपक.कुवेत's picture

30 Sep 2014 - 12:23 am | दिपक.कुवेत

फक्त शेवटि "यू नीट टेक केअर" ह्यात नीट एवजी मस्ट हवं का? नीट मराठि शब्द होईल ना?

माझी चूक! नीड हवे होते, नीट च्या जागी :(
प्लीज संपादक मदत करा.

राज, वाचतोय... उत्कंठावर्धक भाग...

इनिगोय's picture

30 Sep 2014 - 7:42 am | इनिगोय

पुढचा भाग लवकर येऊ द्या.

मस्त लिहित आहात.

जेपी's picture

30 Sep 2014 - 9:51 am | जेपी

वाचतोय.
उत्कंठावर्धक

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Sep 2014 - 11:49 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त सुरुवात झाली आहे.
पुढचा भाग जरा मोठा लिवा

पैजारबुवा,

मृत्युन्जय's picture

30 Sep 2014 - 12:26 pm | मृत्युन्जय

मस्तच. वाचतोय. पुढचा भाग लवकर येउ द्यात.

अनिल तापकीर's picture

30 Sep 2014 - 1:08 pm | अनिल तापकीर

पकड चांगली आहे येउ द्या पुढचा भाग

उमेश येवले's picture

30 Sep 2014 - 2:30 pm | उमेश येवले

मस्तच उत्कंठावर्धक गुढ वाढत आहे. आता पुढील भाग केव्हा? भाग जरा मोठा लिहा.

बाबा पाटील's picture

30 Sep 2014 - 8:06 pm | बाबा पाटील

पुढचा भाग लवकर येउ द्या.

सविता००१'s picture

1 Oct 2014 - 11:23 am | सविता००१

मस्तच.

धारप नव्हे मतकरी स्टाईल वाटते.
इन्ट्रेस्टिन्ग पुभाप्र

पैसा's picture

1 Oct 2014 - 9:29 pm | पैसा

क्राईम - सस्पेन्स - सायको - थ्रिलर!

दशानन's picture

1 Oct 2014 - 9:36 pm | दशानन

पैसा ताई,

"अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा)" चे भाग वाचून मला एकाने विचारले "तुम्ही खरच खून केले आहेत का हो?"

असे मला फेबुवर विचारले =))

पैसा's picture

1 Oct 2014 - 10:02 pm | पैसा

दशानन आयडी आहे म्हणून उद्या कोणी सीतेला पळवलस का असं विचारायचा! =)) मस्तच लिहिलंस पण! या लॉजिकने बाबूराव अर्नाळकर वगैरे मंडळी किती मोठे गुन्हेगार असतील नै! =))

दशानन's picture

1 Oct 2014 - 10:08 pm | दशानन

सीता एकवेळ चालेल हो, पण सोन्याची लंका दाखवा म्हणून मागे लागला तर काय करू :P

बाबूराव अर्नाळकर, सुशि यांना तर.... :D

राजाभाउ's picture

13 Jun 2017 - 11:40 am | राजाभाउ

याचे पुढचे भाग आहेत का?

नाही, विसरलो होतो लिहायला.
घेतो परत लिहायला.

राजाभाउ's picture

13 Jun 2017 - 3:41 pm | राजाभाउ

येस घ्या लवकरच वाट बघतोय.