महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Sep 2014 - 4:58 pm
गाभा: 

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते

१) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07jf... यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे. उरलेल्या शेवतच्या रिकाम्या पर्यायात शरद पवार, गोपीनाथ मुंडे ही दोन नावे एक एक करून जोडून पहा महाराष्ट्रातील (किमान ऑनलाईन) लोकप्रीयते बद्दल अंदाजा येईल.

२) पहिल्या याच्यात मोदी आणि गांधी नाहीत तेव्हा https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F0246lq%2C%20%2Fm%2F0296... मोदी गांधी कुटूंब पवार आणि राज अशी तुलना पहा

३) पक्षाच्या नावानुसार https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F0135dr%2C...

४) पुन्हा एकदा मराठी नेते राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दोन्ही चव्हाण अशोकराव आणि पृथ्वीराज
https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thak...

प्रतिक्रिया

माहितगार's picture

28 Sep 2014 - 5:06 pm | माहितगार

हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thak...

लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार's picture

28 Sep 2014 - 5:10 pm | माहितगार

शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते

https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&c...

माहितगार's picture

28 Sep 2014 - 5:13 pm | माहितगार

अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय

https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2...

माहितगार's picture

28 Sep 2014 - 5:29 pm | माहितगार

अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.

विवेकपटाईत's picture

28 Sep 2014 - 5:53 pm | विवेकपटाईत

दिल्लीत अधिकांश लोक राज ठाकरेला उद्धव ठाकरे पक्ष चांगला नेता मानतात का? हे सांगता येण कठिन आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Sep 2014 - 6:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आक्रमकता. हिंदुह्रुदयसम्राटांंचा हा वारसा राज ठाकरेंना मिळालाय.

कपिलमुनी's picture

29 Sep 2014 - 5:13 pm | कपिलमुनी

सनी लिओन टाकून बघितला ..

आणि ड्वाळे पाणावले

सुहास..'s picture

29 Sep 2014 - 5:18 pm | सुहास..

सनी लिओन टाकून बघितला ..>>

हा हा हा हा ! च्यायला कॅप्टन नं पार दांडक च उडवल ;)

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 5:35 pm | प्यारे१

इलेक्शनला स्वतः उभं राहणारांबद्दल हा पोल आहे ना पण?