अम्मा

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
27 Sep 2014 - 8:54 pm
गाभा: 

मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे.
नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ?
अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

प्रतिक्रिया

वरती अपील होईलच तरही गुन्हा सिध्द झाला जबर शिक्षा सुनावली गेली हे छानच

खटपट्या's picture

28 Sep 2014 - 12:01 am | खटपट्या

बरोबरे !! वरती अपील होउन अजुन १८ वर्षे जाण्याची शक्यता जास्त आहे.

६८ कोटी रुपयांच्या केस करता १०० कोटी दंड ! वरच्या कोर्टात निर्णय टिकेल का ? आणि वरचा निर्णय होईतो अम्मा, भगवान को …. ???

मुळात तिला शिक्षा झाली हे महत्वाच त्यामुळे लोकाना कस्पटासमान मानणार्‍या राजकारणी धेंडाना चपराक बसेल.

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2014 - 12:59 pm | टवाळ कार्टा

घंटा...हा राजकिय गेम केलाय

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 10:46 am | प्रसाद१९७१

हे सर्व महाराष्ट्रात कधी घडणार?

सामान्यनागरिक's picture

29 Sep 2014 - 12:39 pm | सामान्यनागरिक

महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा !
आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी.

नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते's picture

29 Sep 2014 - 12:56 pm | भाते

चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो!
यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल.
मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते's picture

29 Sep 2014 - 12:56 pm | भाते

चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो!
यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल.
मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 5:36 pm | प्यारे१

'विकत' घेतात हो त्या!

१६ जणांची आत्महत्या, हृदय विकाराने गेले म्हणे! काहीही. आता वरच्या कोडतात ही बाई सुटली तर या गेलेल्यांचं काय?

आज तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणी मंत्रीमंडळ शपथविधी मध्ये धाय मोकलुन रडत होत

अतुल झोड's picture

30 Sep 2014 - 12:08 pm | अतुल झोड

लोकशाहीची मुळे किती बळ्कत आहेत व घट्ना किती शक्तीशाली आहे हे यावरुन सिद्ध होतय......

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Sep 2014 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी
नेत्यांस अवगत आहेत.

ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे.
बन्देमे दम हय !!

विवेकपटाईत's picture

1 Oct 2014 - 5:49 pm | विवेकपटाईत

स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात:
हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद
http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 5:54 pm | निनाद मुक्काम प...

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात
आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी
चिकाटीने लढणारा तो स्वामी
आणि आरोप करून पळ काढणारा केजू
कुठे असतो आजकाल
मिस हिम

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 6:30 pm | निनाद मुक्काम प...

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात
आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 9:09 pm | श्रीगुरुजी

बर्‍याच दिवसांनी आनंदाची बातमी ऐकली. करूणानिधी, त्याची पिल्लावळ, महाराष्ट्रातले भ्रष्टवादी इ. तुरूंगात जातील तो सुदिन.

मृत्युन्जय's picture

1 Oct 2014 - 9:36 pm | मृत्युन्जय

महाराष्ट्रातले भ्रष्टवादी इ. तुरूंगात जातील तो सुदिन.

तुम्ही प्रचंड आशावादी

अनुप ढेरे's picture

2 Oct 2014 - 2:51 pm | अनुप ढेरे

महाराष्ट्रातले भ्रष्टवादी

यातले अनेक भाजपा प्रवेश करतायत सद्ध्या.

तुम्ही प्रचंड आशावादी .... का ?
तिथे घडू शकते तर इथे का नाही ???

सामान्यनागरिक's picture

2 Oct 2014 - 3:26 pm | सामान्यनागरिक

रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो !
आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते !
आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

धर्मराजमुटके's picture

24 May 2015 - 9:56 pm | धर्मराजमुटके

अम्मा बाईज्जत बरी झाल्या. पुन्हा मुख्यमंत्री देखील झाल्या. देवी, तुझ्या लीला अपरंपार आहेत.

चौथा कोनाडा's picture

25 May 2015 - 9:43 pm | चौथा कोनाडा

जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा !
(चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....)

खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे.
कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी !

|| धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त.
धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

श्रीगुरुजी's picture

25 May 2015 - 11:29 pm | श्रीगुरुजी

अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चौथा कोनाडा's picture

26 May 2015 - 7:39 am | चौथा कोनाडा

मिल जुलके खायेंगे, दुसरे काय?

सगळे एकाच माळेचे मणी,
सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?