Blue Print

सुहास..'s picture
सुहास.. in राजकारण
26 Sep 2014 - 4:10 pm

काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.

सर्वात महत्त्वाचे ..

मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्‍यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो....
माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !!

तु कोण रे बाजीराव...

माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय )

who the hell is Raj Thakare ?

हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !!

मनसे आणि ईतर पक्ष

कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्‍यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्‍यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही ..

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार )

पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ?

..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्‍यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !!

बर्‍याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की .
राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा ..

चुका ...

होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या .

आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ...

अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अ‍ॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !

प्रतिक्रिया

hitesh's picture

16 Nov 2014 - 8:15 pm | hitesh

आंदोलन विझलं वाटतं

गजानन५९'s picture

25 Nov 2014 - 12:42 pm | गजानन५९

सुहासराव मनसेची धरसोड वृत्ती (खरेतर राजची) मनसेला नडली असे म्हणावे लागेल.
आणि जे गुरुजी भाजपाच्या बाबत करत आहेत तेच तुम्ही इथे करत आहात असे का ? अहो झाल्या चुका मनसेच्या तर तोंडावर कबुल कराना तुम्हाला काय कोण फाशी नाय देणार लगेच, ते सोडून तुम्ही इथे इतरांवर बिनकामाची चिखलफेक करत आहात ते योग्य आहे असे वाटते का तुम्हाला ?
राजला नसेल इतका बिनकामाचा इगो आहे तुम्हाला कार्यकर्तेच जर असे असतील तर मग पक्षप्रमुखाला दोष कुठून देणार ? ब्लू प्रिंट यायला ८ वर्ष लागली आणि त्याचे कारण तर एके हास्यास्पद सांगत आहात तुम्ही लोक कि त्यापेक्षा त्या आठवलेंच्या रामदासची कविता परवडली हो.
लोकसभेला भाजपाला पाठींबा दिला तेव्हा राजनाथ सिंहने पुण्यात येऊन यांची जाहीर तसली होती (“अरे काहे बिना मांगे समर्थन डे राहे हो”) हेच राजने लोकसभा न लढवता थेट युतीला पाठींबा दिला असता तर आज विधान सभेला मनसेच्या किमान १५/२० जागा कश्याही निघाल्या असत्या.(खरे तर आपले गडकरी उर्फ चाणक्य हेच सांगत होते राजला पण नाय ऐकल ) शेवटी याच गडकरीने विधानसभेला यांच्या राम कदमला पळविला आणि यांचे वस्त्र पूर्ण फेडले.
साला भाषण पण काय असतात यांची म्हणजे शब्द बघा , एकहाती सत्ता काय, सुतासारखा सरळ काय हे सगळे त्या बाळासाहेबांनाच शोभायचे बाकी सगळे नुसते नकलाकार आहेत.
एकूण काय आता वेळीच जर यांनी स्वतः मध्ये बदल घडवला नाही तर अवघड आहे सगळे यांचे...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2014 - 12:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे गजानना. चुकांची कबुली देणे,मान्य करणे हे सुधारण्याचे पहिले लक्षण असते. खरे सांगयचे तर ह्यांचा कुठल्यातरी समाजाला लक्ष्य करण्याचा अजेण्डा कोणालाच आवडला नाही. तरूण पिढीला तर नक्कीच आवडला नसणार.ओबामाने मोदींना 'केम छो प्राय मिनिस्टर' म्हंटले म्हणून राज मोदींवर टिका करत होते की "बघा, मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत"!! उद्या राज पंतप्रधान झाले तर नक्कीच अमेरिकन अध्य़क्ष 'राम राम पाव्हनं' म्हणतील. आलेल्या पाहुण्याला खूष करणे ही जगभरची रीत आहे. भाषा,राज्याच्या आधारावर आता राजकारण करण्याची वेळ निघून गेली आहे हे त्यांना कळेल तो सुदिन. संघ्,नरेण्द्रने ,भाजपावाल्यांनी ते वेळीच ओळखले व आर्थिक विकास महत्वाचा हे ताडून राजकारण केले.

क्लिंटन's picture

26 Nov 2014 - 1:00 pm | क्लिंटन

उद्या राज पंतप्रधान झाले तर नक्कीच अमेरिकन अध्य़क्ष 'राम राम पाव्हनं' म्हणतील.

राज पंतप्रधान होणार? हहपुवा