Blue Print

सुहास..'s picture
सुहास.. in राजकारण
26 Sep 2014 - 4:10 pm

काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.

सर्वात महत्त्वाचे ..

मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्‍यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो....
माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !!

तु कोण रे बाजीराव...

माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय )

who the hell is Raj Thakare ?

हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !!

मनसे आणि ईतर पक्ष

कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्‍यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्‍यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही ..

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार )

पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ?

..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्‍यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !!

बर्‍याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की .
राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा ..

चुका ...

होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या .

आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ...

अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अ‍ॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

3 Nov 2014 - 10:44 am | क्लिंटन

ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या

विविध ब्रोकरेज हाऊसेस वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी मधूनमधून असे रिसर्च रिपोर्ट प्रसिध्द करत असतात. असे १०-२० रिपोर्ट एकत्र केले की ब्लू प्रिंट बनवून ती आपल्या नावावर खपवता येणे फार कठिण नाही.मनसेने असेच केले आहे की नाही हे मला माहित नाही आणि केले असले/नसले तरी त्यात मला स्वतःला अजिबात इंटरेस्ट नाही.तरीही मनसे या पक्षाविषयी तो पक्ष कोणत्याही प्रकारचा अभ्यास करून काहीही विधायक करू शकेल अशा स्वरूपाचा विश्वास अजिबात वाटत नाही. आणि स्वतः आकंठ दारूत बुडलेल्या माणसाने दारूबंदीविषयी लेक्चरबाजी केली तरी 'कोण बोलत आहे' याकडे अजिबात लक्ष न देता 'तो काय बोलत आहे' याकडेच लक्ष देण्याइतका मी तरी भाबडा नाही. असो.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही.

नाही कशी? अमक्याचा गळा घोटू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ,भय्यांचे तंगड तोडू याप्रकारची भाषा तुम्ही कधीच बघितली नाहीत याचेच आश्चर्य वाटत आहे. मनसेवाल्यांचे लक्षवेधक काम केवळ इतकेच.

भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते.

राजकारणात काही 'बेलवेदर' लोक असतात.म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे की नाही याविषयी आपल्या मनात काही संभ्रम असेल तर अशा लोकांची मते एखाद्या दीपगृहाप्रमाणे दिशादर्शनाचे काम करतात.अशांनी एखाद्या गोष्टीवर टिका केली तर ती गोष्ट बहुदा चांगलीच असते. अशा बेलवेदर लोकांमध्ये कम्युनिस्टांचा नंबर कोणी हिराऊन घेईल असे वाटत नाही.आणि दुसरा नंबर नक्कीच मनसेसारख्या गुंड पक्षाचा आणि त्या पक्षाच्या समर्थकांचा लागतो (माझ्या मते). या दिशादर्शक दीपगृहांचे स्थान भारतीय राजकारणात अगदी थोडेसे किंवा कमी महत्वाचे असले तरी कायम रहावे असेच मला वाटते :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2014 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, तुम्ही काय पक्ष बंद करायला निघालात का काय ? एक गोष्ट चांगली बोलत नै तुम्ही ? मनसेनं भविष्यात काय करावं वगैरे ?

बाय द वे, बुडत्या जहाजात कोणाची बसायची तयारी दिसत नै. नाश्कात १८ नगरसेवक आणि २०० पदाधिका-यांचे राजीनामे...अरेरे कुठे चालला हा पक्ष. कार्यकर्त्यांनाच ब्ल्यू प्रिंट समजली नै वाटतं.. देवा, बघ रे ज़रा मनसेकड़े आता तुच काही करू शकतो !

-दिलीप बिरुटे

क्लिंटन's picture

3 Nov 2014 - 2:23 pm | क्लिंटन

च्यायला, तुम्ही काय पक्ष बंद करायला निघालात का काय ?

छे हो. मला तर मनसे कोपर्‍यातला एखादा पक्ष म्हणून चालू राहिलेलाच हवा आहे. पूर्वी दूरदर्शी पक्ष होता त्याप्रमाणे :)

अरेरे कुठे चालला हा पक्ष.

काही कल्पना नाही. बहुदा कृष्णकुंजमध्येच असावा :)

ऋषिकेश's picture

4 Nov 2014 - 2:16 pm | ऋषिकेश

ऋषि आता काय मत आहे ?

माझे मत अजूनही तसेच आहे.
सदर ब्ल्यू प्रिंट हा वाचनीय दस्ताऐवज आहे व इतर कोणत्याही पक्षाने निवडणूकपूर्व काळात मांडलेल्या डॉक्युमेंट्सपैकी सर्वात व्यापक मुद्दे कव्हर करणारा तसेच तपशीलवार आकडेवारी देणारे डॉक्युमेंट अन्य वाचनात आले नाही.

आता यावर आधारीत मत द्यावे का? वगैरे प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक प्रेरॉगेटिव्ह आहे. त्यानुसार (माझ्यासकट अनेक)मतदारांनी हक्क बजावला आणि बहुमत समोर आहेच.

बहुमताने एखाद्या पक्षाला नाकारले / स्वीकारले नाही म्हणजे त्याने सादर केलेला दस्ताऐवज लगेच बेकार होतोच असे नाही.

हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन प्रतिसाद देणं चाललय ! तुम्हाला माझ्या कडुन विष्लेशन पाहिजे पानिपताच ...आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती , ती का फाटली , आधी पोट निवडणुका झाल्या राजस्थान आणि गुजरात मध्ये कॉंग्रेस निवडुन आले की , उत्तरे मध्ये सपा ला जास्त जाग्या मिळाल्या तुमच्या पेक्षा , त्याच विष्लेषन तर सोडा उन्माद च संपेना, यशाने हुरळुन गेलेल्या पक्षाला , कुबड्या वापराव्याच लागण्यार आहेच , कोणा एका तरी एकाच्या कुबड्या घ्याव्याच लागणार आहेत , मग कोणाच्या घेणार, ज्यांनी तुम्हाला अफजला खान म्हटले त्याच्या की ज्यांना तुम्ही करप्ट पार्टी म्हणत होतात त्याच्या ? हाईट म्हणजे , माझ्या पक्षाचा एकच निवडुन आलेल्या ला ही तुम्हाला विचारावं लागल, माणुस खरच शेर निघाला, भर कॅमेर्‍यासमोर , नाही म्हटला , हे ही म्हटला की हार-जीत चालुच असते !! ( किती एकत असतील राज च ? ) ! तुमच्या सारखं नाही , महाराष्ट्राचा भले होण्यासाठी आम्ही एकत्र येवु ...

राहिली गोष्ट आंदोलनाची , मनसे हा एकच पक्ष आहे , जो आधी निवेदन देतो , प्रशासकीय अभ्यास करावा लागतो त्यासाठी , दिसेल त्याच्यावर आरोप करत नाही , जनतेची लुट चालु टोल च्या नावाने , त्याही वेळेस तेच केले होते, तुम्हाला माहीत नसेल तर अभ्यास वाढवा , कधी ना कधी त्या प्रकरणात ल सत्य बाहेर येईलच !! आज मिडियाचा ही रोष आहे आमच्यावर , कारण त्याला उथळ पत्रकारिता आवडत नाही ...

@ बिरुटे सर, काळजी बद्दल धन्यवाद , अ‍ॅक्शन हॅज अलरेडी बिन टेक ,

जोवर सरकार चुका करत असते, अस्मितेवर घाला घालत असते , छोटे पक्ष , जिवंत रहातात , पण ज्यांच्या बरोबर आठवलें सारखा राजकीय मर्कट असतो , ते. स्वःता काहीतरी अद्भुभुत केलेय असे समज असणारे मोठे समजणारे पक्ष संपतात हा आजवरचा इतिहास आहे ..

सिद्धार्थ ४'s picture

4 Nov 2014 - 2:49 am | सिद्धार्थ ४

माफ करा पण आपला प्रतिसाद खूपच भाबडा आणि pointless आहे. हे म्हणजे माझ्या पेक्ष्या दुसरा किती वेडा आहे हे दाखवण्या सारखे झाले. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात तो पक्ष definitely मोठाच आणि त्यालाच जास्त जनाधार हे लोकशाही चे कटू सत्य आहे. जेंव्हा congress majority मध्ये होता तेंव्हा हि हेच कटू सत्य होते. मी कल्याण चा आहे आणि मला वाटते कि KDMC मध्ये मनसे आज विरोधी बाकांवारती बसला आहे. been in opposition is also a great responsibility. आज काय दिसते? SS, BJP, congress & MNS सगळे मिळून लूटच चालू आहे. :(

सुहास..'s picture

4 Nov 2014 - 3:08 am | सुहास..

तुम्हाला , जे म्हणायचे आहे तेच मला म्हणायचे आहे , पण छोट्याला अजुन छोटं दाखविण्यात काय मोठेपण मिळते आणी काय असुरी आनंद मिळतोय काय म्हणावे , राज ची ही बाजु घेतलेली नाही मी अजुन ..काय झाले ते कोणाला माहीत नसावे , तुम्ही करणार ते विश्लेषण आणि मी केले तर अ‍ॅन्टी-मोदी ...आणी देयर ईज नो its not a party with a difference , it's just a party !!

( आणि मला हक्क नाही का, मी आधी ही सांगीतलय , मी व्होट दिलयं लोकसभेला, घरातील सहा मते होती , वाटुन घेतलीत ) चुक दाखविली तर गैर काय ब्वा , मी व्यक्तीची पुजा करत नाही , पॉलीसी ची करतोय ...हे नमोरुग्नांच्या लक्षात येत नाहीये ...केडीएमसी त विरोधी बाकांवर आहे ना ? जेव्हा भाजपाचे नेते विरोधी पक्षात असतात, तर त्यांचा परफॉर्मन्स बघताय ना , मग फडणविसांच्या प्रश्नावर मला अजुन उत्तर दिले नाही इथे कोणी ? पुर्ती मध्ये शरद पवार आणि गडकरी याचीं भागीदारी वर कोणी दिलेले नाही ?

मुद्दे टाळायचे , त्यावर उत्तर द्यायची नाहीत , मग दुसर्‍याला नावे ठेवणे म्हणजे शेण स्वःता खायचे आणि दुसर्‍याच्या तोंडातुन वास येतोय असे म्हणण्यासारखे .!

आज जर मी मनसे चा काम करत नसतो आणि भाजपाचा कार्यकर्ता असतो तर हेच केले असते का ?

सिद्धार्थ ४'s picture

4 Nov 2014 - 3:29 am | सिद्धार्थ ४

तुम्ही खूप वयक्तिक घेत आहात. मी पण so called कुणाचा पंख नाही, पण मोदी जे करत आहेत ते मला खूप positive feel देतो. काहीतरी खरच चांगला बदल घडेल असे वाटते. (हेच तेंव्हा हि वाटले होते जेंव्हा MNS form झाला होता, पण आज इतक्या वर्ष नंतर खरच स्वप्नभंग झाल्या सारखे वाटते) मोदिनी पुढ्या ५ वर्षायात काही केले नाही तर मी आज जे MNS साठी बोलतो आहे तेच बोलीन (आणि मग आपल्याला खरेच Congress शिवाय काही पर्याय नसेल)

(आणि काय हि तुमची भाषा ? मला वाटते म्हणूनच SS & MNS अजून हि जनासामाजात अजून पसरली नाही आहे, हे तुम्हाला वयक्तिक नाही पण आज काल कुठलाही नेता नुसते दुसर्यांच्या चुकांवर बोट ठेवतो आणि नुसती टीका करतो हे पटत नाही. आणि म्हणूनच मोदी वेगळे वाटतात. इथे जेंव्हा आले होते तेंव्हा मला आमच्या security न पण थांबून विचारले होते के हे कोण आहेत? that was a proud moment)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2014 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती...............

प्रिय सुहास आत्तापर्यंतचे तुमचे सर्व प्रतिसाद वाचतोय त्यात तुम्ही जे मनसेचं सोडुन दुस-बद्दल बोलताय तेच मुळात चुकतंय. मनसेबद्दल तुम्ही स्वत:च बोलायला धागा काढलाय तेव्हा दुस-याने काय केले ते मुद्दे गैरलागु आहेत. मनसेनं काय केलं ? मनसेच्या पनिपताचं योग्य कारण ? मनसेच्या भविष्यातल्य वाटा ? मनसेची अवस्था ? नेतृत्त्व ? विश्वास ? ब्ल्युप्रिंट ? भाषा ? उणिवा, प्रचारातील मुद्दे याबद्दल अजुनही तुम्ही मोकळेपणाने बोललेला नाहीत आणि कार्यकर्ता म्हणुन तुम्हाला ते जमणारही नाही, असं वाटतं. आणि तुमच्याकडुन तशी अपेक्षा करणं आता जवळ जवळ मी सोडुन दिलंय.

मनसेला विकासाचं एक उत्तम मॉडेल बनविण्याची नाश्कात संधी होती. संपूर्ण महाराष्ट्र नाश्कात काय घडतं त्यावर लक्ष ठेवून होतं तुमच्या नेतृत्वाला तिथे विकासाचा कोणताही कस लावता आला नाही. महाराष्ट्रात सर्वात अगोदर नजरेत भरवणारी साथ मनसेला कोणी दिली असेल तर ती नाश्काने दिली तिथेच तुम्ही पहिली बाजी हरलात. महानगरपालिकेत तुम्ही काही पदांच्या मोहापाई तुम्ही शिवसेना- भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. ( महिला व बालकल्याण उपसभापतीपद ) मुळात पक्षाला अजुन कळलंच नव्हतं की आपण स्वतंत्र राह्यचं की कोणाकडे जाऊन भांडीकुंडी घासायची. आणि मनसेचे पाय असे चिखलात रुतत गेले. नगरलाही तुम्ही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपक्षाशी घरोबा केला. औरंगाबादमधे जिल्हापरिषदेत तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर संसार थाटला. कोणतीही स्वत:बद्दल ठोस भूमिका न घेता सत्तेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात मनसेने स्वत:चे अस्तित्व असे हळुहळु गमावले अतिशय बेसलेस भूमिका गेल्या काही वर्षा बघायला मिळाली आणि तुमची ब्ल्यु प्रिंटही तुम्हाला कुठेच वाचवू शकली नाही. त्याचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करायचा आणि जाहीर भाषणात शिवसेनेला नावं ठेवतांना आपलं नेतृत्व लोकसभेच्या भाषणात म्हणत होतं '' एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का? '' अरे सत्तेसाठी चुंबाचुंबी कोणी केली, हे आता सर्वांना कळलं आहे.

बाकी राहीली आमच्या अभ्यास वाढवायची गोष्ट. आमचा अभ्यास जेमतेमच आहे पण मनसेबाबत आता चांगला झाला आहे. आपल्या मनसेने राज्यात एकूण ४० ठिकाणी टोलबाबत माहिती संकलन केली काही मुद्दे आजही आपल्या सायटीवर बघायला मिळतात एकच मला सांगा मनसेने आणि त्यांच्या आमदारांनी विधानसभेत टोलबाबत भूमिका बदलली पाहिजे यासाठी नजरेत भरतील अशी कृती केली. (आमच्या आमदारांनी प्रशांत बंब यांनी लासुर रोडावरील रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे स्वतः तुरुंगात गेले आणि कागदोपत्री अभ्यास करुन तो टोल बंदच केला) आपल्या मनसेच्या आमदारांनी अशा किती अनाधिकृत टोल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. मनसेची गाडी आहे म्हणुन कितीतरी कार्यकर्त्यांनी टोल चुकवला हेच आपल्या आंदोलनाचे यश म्हणायचे का ? लोक साटं लोटं झालं म्हणतात त्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही.

कोणत्याही प्रशासकीय आंदोलनासाठी अभ्यास करावा लागतो ही गोष्ट मान्य. मनसेने किती आंदोलनाचा अभ्यास केला आणि किती आंदोलने यशस्वी केलीत. माझं निरिक्षण असं आहे, कोणत्याही आंदोलनाची हवा करायची आणि ते आंदोलन अर्धवट सोडायचं हाच एकमेव उद्योग मनसेने केला. दुकानाच्या पाट्या मराठीत लावा. (काही दिवस हवा केली सोडलं अर्धवट), मराठी भाषा अभ्यासक्रमात आवश्यक विषय असावा म्हणुन आपण शाळा महाविद्यालयांच्या संस्थाचालकांना पत्रे लिहिलीत. शाळा आणि महाविद्यालयामधे भाषा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी अभ्यास मंडळे असतात आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांना शासनाने असा विषय अभ्यासक्रमात समावेश करावा असे शासनाने निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणला पाहिजे, यातली कोणती कृती आपल्या आमदारांनी केली. मुळात भाषा अभ्यासक्रमात समावेश करावी यासाठी संस्थाचालकांना पत्रे लिहिणे हेच मुळी हास्यास्पद होतं. हा मुद्दाही नंतर बाजुला पडला.

रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, टॅक्सी-रिक्षाचे परवाने या बाबत बाहेरच्या लोंढ्याला रोखून नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी नुसती भाषणं केली. मला वाटतं टॅक्सी रिक्षा परवाने स्थानिकांना दिलं पाहिजे यासाठी काही दिवस आंदोलने केली आणि तेही अर्धवट सोडलं.

सुहास एक नै शंबर गोष्टी मनसेने अशा अर्धवट सोडल्या. अजून एक गोष्ट सांगतो साहेबांना वाट्तं आपलं भाषण उत्तम होतं. लोक ऐकायला येतात. लोक ऐकायला येतात म्हणुन तुम्ही त्यांना काहीही बोललं पाहिजे का ? लोक गर्दी करतात, घोषणा देतात ते त्यांच्यावरील प्रेमाने त्यांच्यवर राग व्यक्त करण्यासाठी नाही. अतिशय मगरुरी वागण्यात दिसते. एक उदाहरण आठवलं आमच्या संभाजीनगरात कै. बाळासाहेबांचं भाषण होतं. सभेला ही गर्दी, नुसत्या घोषणा, साहेब भाषणाला उभे लोक आवरेचना. साहेब काहीच बोलले नाहीत नुसते शेतकर्‍यासारखी जागीच बैठक मारली दहा मिनिटे साहेब बोलले नाहीत आणि नंतर ते मैदान टाळ्यांनी दनाणुन गेलं. आपल्या साहेबांसारखे पाच मिनिटात व्यासपीठ सोडून गेले नाहीत.

जाऊ द्या मनसेवर किती अन काय बोलणार. आणि आपल्याकडून कोणतही अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण येणार नाही, हे मला एव्हाना कळलं आहे. आता आडात नै तर पोहर्‍यात कुठून येणार. असो, लिहिण्यासारखं खुप आहे पण थांबतो.

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

4 Nov 2014 - 8:20 am | खटपट्या

+११११
सहमत !!!

बिरुटे सर, एक नंबर प्रतिसाद!!! मान गये.

सुहास..'s picture

5 Nov 2014 - 1:42 am | सुहास..

Now this is really ridiculous !! हे सगळ अनुमान कशावरून काढलत आपण , मी आधी पासुन सांगतोय मला प्रशासन , मिडिया आणि राज आणि मी , या अनुषंगाने डिट्टेल मध्ये लिहायचय , मग तुम्ही कुठुन काढलात ? बातम्या वाचुन ? मी पक्षात काम करतोय दहा वर्षे !! एक दोन वर्षे नव्हे, तुम्ही नाही !! आणि लिहीणार होतो कारण रिक्वेस्ट आली होती, तुम्हाला कोणी विचारणा न करता , राज ने अपेक्षा-पुर्ती न केल्याने , राग काढायचा प्रयत्न केलाय आणि तुमची अनुमान काढण्याची पध्दत , रादर , मला वाटत, सवय हे तुमच्याच एका वैयक्तीक आठवणीने काढुन देतो तुम्हाला !!

आठवा, मी रहायचो गंगापुर ला , पण 'कहार' समाजा विषयी मला नीटशी कल्पना नव्हती , एक दोनदा कायगांव टोक्याच्या मंदीरात गेलो होतो , पण, मंदीरात चक्कर मारून परत आलो. मामा वारले तेव्हा अस्थी- विसर्जन करायला गेलो तेव्हा पाहिलं ! इतके हाल !! एक वयात आलेली मुलगी, आपल्या भावाबरोबर अतिशय भिकार अवस्थेत, संपलेल्या जेवणाचा उष्टावळ कॅरी-बॅग मध्ये भरत होती , पलीकडे . पाणी कमी झाल्याने नदीकडेच्या घाणेरड्या गाळामध्ये, एक वयस्कर स्त्री छातीपर्यंत बुडुन हातात चाळणी घेवुन गाळ चाळत होती , मला अस्स कसतरीं झाल पाहुन !! मी तुम्हाला फोन लावला, विचारले, कोण आहेत ही लोकं ? तुमचं वाक्य काय होतं आठवतय का ? " हॅ हॅ हॅ !! , शंभर एक रू गोळा करतात त्या बायका " सॉरी फॉर द लग्वेज बिरुटे सर बट दिस इज बुलशीट !! ही तुमची एखाद्या विषयी अनुमान काढण्याची पध्दत , आठवा , मी नेटवर्क कट होतयं कट केला होता .....be a studious man, but Dont be a judge mental !! नसेल जमत तर सांगा , मी या धाग्यावर ही स्पष्ट लिहिले आहे की , मला मिपाकर राहु दे , मला इथे चर्चा नाही करायची, प्रश्न असतील तर व्यनी त विचारा , नंबर ही दिलाय ....पाण तुम्हाला बघतोय मी , भाजपा विषयी लिहिले तर , स्कोर सेटल करण्यासाठी ( एक संपादक असुन ही ) शोधुन शोधुन प्रतिसाद देताय , ते ही कोणाच्या जोडीला ? जे स्वःताच साधं नाव देखील जाहीर करीत नाहीत . स्वंय घोषीत राजकीय विश्लेषक म्हणे !!!

एक दुसरा भाजपा समर्थक आहे इथे ! त्याच जर का सांगीतले ते तर लोक्स शेण घालतील त्याच्या तोंडात !! पुण्यात झालेल्या बलाक्ताराच्या चर्चेवर , कट्टा चालु असताना प्रतिक्रिया सांगु का ..............." तिला पन मजा आली असणार "

मला माहीत आहे , बातम्या आणि दोन चार लेख वाचल्यावर लोक्स थेरॉटिकल गोष्टी लक्षात घेत नाहीत , मग , मी जेव्हा भाजपा च्या विरोधात, त्यांना दोन पक्षा पैंकी एकाची कुबडी लागणार आहे हे वास्तव का लक्षात घेत नाहीत, उलट मनसे च सांग, मनसे च सांग , भाजपा विरोधी बाकांवर होती तेव्हा बोलत नव्हती का ? मौनीबाबाला चोर म्हणे पर्यंत मजल गेली होती ना , मग मी का विचारायचे नाही ? एकाने तर पार पगार विचारला माझा, सांगु का ? मला इतरांच काही घेणे - देणे मालक, पण तुमच्या सारख्या एरवी बॅलन्ड माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती ...( It's Not A Flattery !! )

तुम्हाला काय वाटते , जे तुम्ही विचारताय , मी विचारत नसेल राज ला , की टोल च काय झाल ? तुम्हाला काय वाटते, तेव्हढा बुळा आहे मी ? , तुम्हाला काय वाटते जो राज येव्ह्ढा हुशार आहे की अंबानी ला एक फोन करतो तर गोदा पार्क च बजेट आणतो ,एका फोनवर सचीन आणि लता ची भेट घडवून आणतो , टाटा घरी कावुन त्याला भेटतात, त्याला हे समजणार नाही की मी टोल आंदोलन, वा भुमीपुत्राच आंदोलन बंद केले वा राष्ट्रवादी चा सपोर्ट घेतला तर माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा डागाळेल ...कुठल्या विश्वात रहाता मग तुम्ही ...

शनीवारी होतो जवखेड्याला , विचारले हे सर्व !! मला नेमके काय झालं माहीत असुनही विचारले, लॅपटॉप घेवुन गेलो होतो , ते दाखवुन सांगीतले, हे असे चाललेय, लोक विचारताहेत काय करायचे ? त्यांनी जे उत्तर दिले ते .. ...सांगु !! नाय... नको...prejudice असलेल्या लोकांसमोर बोलायचे नाही असे ठरविले होते, धन्याच्या प्रतिसादावर च सांगीतले की मी हे !!!

मी सरळ बघतोय , मोदी उल्लु बनवितोय पब्लीक ला , मला काँग्रेस नकोय परत , पण किमान क्लॅरिटी तर द्या , काल एका वकील मित्राने टाकलीय आरटीआय !! मोदींनी खर्च कुठुन केला ते ? अजुन मला मी भाजपा ला विचारलेल्या " काँग्रेसी छापात " एक श्रीगुरूजी शिवाय कोणाचंही उत्तर आलेले नाही !! गट्स आहेत माझ्यात, मनसे विषयी मी उत्तरे देण्यासाठी वेळ मागतोय...तुम्ही मात्र त्या गोष्टीचा स्कोर सेटलिंग साठी फायदा उचलायचा प्रयत्न करताय असे वाटले मला .....sir , plz don't do a catwalk, when you can't even properly .. !!

बिरुटे सरांचा मित्र
सुहास..

( मी हा प्रतिसाद फक्त सरांना दिलाय, त्यात कोणीही काड्या वा आग लावण्याचा प्रयत्न करु नये हि नम्र विनंती )

चला , मोदीशेठ, आता जरा सुरवाती पासुन सुरू करू यात का ? मला तुमच्या विषयी आदर नाही, अनादर ही नाही , रादर,काहीच भावना नाही, माझे मत असते ते ' पॉलीसीज' बद्दल, मला आवडल्या नाही की आपण बोलणारच, तात्या मध्यंतरी म्हणाले की तुम्हाला गाडी , बंगला, पगार, भारतातील सर्वोच्च पद हे मिळत ते ! ते कश्या साठी तर ते या पॉलीसीज बद्दलच ..मग चला करु यात का सुरुवात ..

एक... हे अदानींना २६० एकर जमीन , तुमच्या वेळेस कशी काय मंजुर झाली, मौनीबाबा असताना का मिळाली नाही ? पर्यावरण खातं , लवासा घडल्यापासुन, गवत कापायला परवानगी देत नाहीये महाराष्ट्रात, या महाभागाला जंगल कापायला कशी काय दिली ? बर ! २६० एकर ? किती मेगा वॅट चा प्लॅन्ट आहे ? काय रेट ने दिलीत, आणि जंगलात का, ते जैतापुर सारखं २६,००० प्रती एकर ने दिलेली मग आंदोलन केल्यावर, ( आठवा, आमचे बाळासाहेब, जैतापुरचे मयतापुर करू ) २,००,००० करता न यावे कोणाला ही म्हणुन का ? गोंदिया चा कोळसा, भुगर्भ शास्त्रज्ञांनी केव्हाच निकृष्ट दर्जाचा ठरविलाय , तिथुन कोळसा नाय ? अदानीचा च कोळसा बाहेर निघेल, बर ! बर , राज्य सरकार अस्तित्वात नसताना, ( राज्यपाल तुम्ही आणुन बसविलाय) हे कुठल्या धारेत बसते ? ( पहिल्या धारेत का ? मग आमचा आक्षेप आहेच !! )

दोन ..त्या काळ्या यादीच जरा नीट ठरवुन घ्या , नेमके किती पैसै आणणार आहात ते ? निवडणुक जाहीर होताना आठ हजार करोड होते, संपल्यावर पंधरा लाख करोड, १०० दिवसांत आणणार होतात ! २०० दिवस होतील आता, त्यात आपले प्रिय म्हातारे होत असलेले , ब्रुसलींचे बंधुराज, ब्रेटली ...आपल हे ..जेटली ...निवडणुकांच्या आधी म्हणाले की सरकार स्थापन होताना म्हणाले की सब कॉग्रेस वालों के नाम है उस मैं , मग अर्णव प्रश्न विचारतो " किती नावे आहेत " तर एक नाव तर नक्की आहे असं म्हणतात ..अरे मग सांग की , नव्या नवरी सारखं, नवर्‍याच नाव घ्यायला काय लाजतो लेका !! जेटु लेका, एव्हाना आम्हाला कळलय की प्रत्येक बिझनेसमन्स चे प्रत्येक राजकारण्यांशे आर्थिक नाते असतेच, त्यात तुझी ही काही नातेवाईक असण्याची शक्यता नाकारता येत नाही , विषेशता: ज्यानी शाही इस्पितळात खांद्यावर हात ठेवला , त्या नुसार अजुन तीन माणसे असतीलच खांदा द्यायला !!

तीन ..पेट्रोल आपल्यामुळे कमी झाल्याचे कळले , आपण आखाती देशांमध्ये मुत्र-विसर्जनासाठी जात असल्यामुळे बहुधा आपल्या भक्त-गंणांना असा पवित्र-समज झाला असावा , आम्हाला इतक्या दिवसांत माहीत नव्हते , आपल्याकडे गोमुत्र प्राशन करुन स्वःता ला पवित्र करुन घ्यायची प्रथा आहेच, आपले ही दोन एक थेंब इकडे, भक्तगंणासाठी टाकावेत हि नम्र विनंती !! आम्हाला अक्कल आहे , आम्हाला माहीत आहे की भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्याने आपल्याकडे भाव कमी होतात ! आम्हाला कोणीतरी म्हणाले की " मौनीबाबा " असताना ही असे होत होते , त्यांना सांगावे की तेव्हा डॉलर चा भाव आमच्या इकॉनॉमीच्या पार्श्वभागात कायम होता, आज तो त्या मानाने खुप कमी आहे, आणि स्थिर ही आहे, तेव्हा व्यापारी निंयत्रणाच बुच काढुन, राजधानीच्या निवडणुकांची काळजी सोडुन, लवकरात लवकर ३६ ते ४० रु. लिटर करावा, नंतर आपण केलेत तर आम्हाला समजेल की आपण केवळ निवडणुकांसाठी मातेला पाचारण केले आहे , अहो पेट्रोल म्हणजे माता च ना , सगळे भाव त्यामुळेच वाढतात ,बाकी ते आम्हाला आवडणारे आख्खे मुग अजुन ३६००० रु, क्विंटल पर्यंत का पोचले ते काही कळले नाही , गुजरात मध्ये वाढतात की काय ?

चार ...जपान ने आपला भारतातला अ‍ॅक्टिव्हा चा ११०० करोडचा चौथा प्रोजेक्ट , औरगांबाद च्या एवजी, अहमदाबाद ला का नेलाय हो , तुम्ही तर केला ना अहमदाबाद विकास जो काही करायचा तो , मग आमच्या गरीबांच्या औरगांबाद ने..माफ करा.. संभाजीनगर ने ...काय घोडं मारलय, मग मामासाहेब ( त्यांना हवे असते तर ) मॅक डॉव्हेल्स बॉटलिंग चा प्रोजेक्ट केव्हाच बारामतीत न नेता औ.बाद ला का नेला असेल , तिथे चंद्रकांत खैरै मुळे एक व्होट पडत नाही त्यांना १५ वर्षे , प्लस असे असुनही केरळ मध्ये युनियन च्या भांडणामुळे इकडे तिकडे न जाता, पास्ताबाई शी भांडुन, बिएमडब्ल्यु चा प्रोजेक्ट ही आणला की औ. बाद ला ( ४५०० मत मिळाली फक्त दर्डा ला राव ) ....सरसच !! पण कमनशिबी , आज या वयात अस्तित्वाची लढाई लढतय राव !!

पाच ...केवळ बारा - हजार आणी काहीतरी शेकडा वितरकांसाठी गॅस चा दर दोन रूपये आणि काही पैसै वाढविण्याच आम्हाला काही समजले नाही , आपण कांदा इराण कडुन घेण्याचं ठरल तेव्हा सामान्य कांदा खाण्यार्‍यांच्या विचार केलात म्हणे, संख्येने कमी असलेला , कांदा उत्पादकांचा नाही केलात , मग आज काय केलेत ! कोणाचा विचार केलात ...असो ...स़काळी - सकाळी आमच्या आया बहीणी, ती वजनदार गॅस ची टाकी डोक्यावर घेवुन, लायनीत लवकर नंबर लागावा म्हणुन पाहिली नसेल आपण, या कधीतरी ! दाखविन मजा ....

सहा ...ते , छोट्या कपड्यांमुळे बलाक्तार होतात म्हणणार्‍या हुड्डा ला हरियाना चा मुख्यमंत्री केलात ते आम्ही मर्जीतील माणसे पाहिजेत , हे आम्ही समजु शकतो पण हे " मेक इन इंडिया " चे काय खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात , अहो शेठ , ही परदेशी कंपन्या आपल्या इथे , जेव्हा कमी पैशात वस्तु बनवितात, रोजगार निर्माण करतात, तेव्हा एक प्रकारे आपण त्यांचे मिंधे होत असतो , एक तर जवळपास फुकटाची गुंतवणुक असते, पण जेव्हा , त्यांची कंपनी तोट्यात जाते ना, ते सर्वात पहिले आपली मारतात, इथले सर्व व्यवहार बंद करतात, आपल्या नौकर्‍या जातात, मग एमआयडीसी मध्ये तुलसी रामसे ब्रदर्स च्या भुतपटांच्या शुटींग कराव्या का ? तात्पर्य काय ? अम्ही अमित शहांचा चेहरा बघुन आधीच घाबरलोय, अजुन कशाला घाबरवताय ? इंटरनॅशनल इकॉनॉमी चा गेम कधी उलटेल सांगता येत नाही , कशाला रिस्का घ्यायच्या , त्या मौनीबाबा ने काळाची पावले केव्हाच ओळ्खली होती म्हणा की !! आणि अटलजी स्वदेशी बाबत काय सांगत होते हे कळलेच नाही म्हणायचे की तुम्हाला, ना राज धर्म कळला ना अटलजी !!

सात ....आम्हाला रविवारी आपलं भाषण एकायचा योग आला ! हल्ली लय एकसुरी होत चाललाय , आम्ही सातवी - आठवी ला सावरकर, बाबासाहेब, अटलजी, टिळक, गोळवलगुर्जी , आनंदीबाई , गांधी असं एकत्र करुन निबंध ठोकायचो, जे ठोकायचो की आम्हाला कांबळे मास्तर १० पैंकी किमान आठ मार्क द्यायचे, क्षणभर आमचाच एखादा आठवी-नववी चा आपण आमच्या शाळेतुन वाचनासाठी मागविलाय असे वाटुन आमची भारतीय म्हणुन जी उरली-सुरली छाती फुगली की विचारू नका...सकाळपासुन आमच्या छातीच्या या फुगवट्या कडे पाहुन आमच्या मातोश्री आम्हाला विचारतहेत की तुझी छातीला सुज का आली आहे ............काय सांगु ? आमच्या छातीवर दळण दळुन, आमच्या भुमातेच्या अंगावर आणलेली ही आमच्यावरच डुख धरलेली , सुज, आधी कोण उतरवणार ?

( आता , जरा उद्या परवा, आमच्या पुण्याच, आमच्या महाराष्ट्राच राजकारण बघतो, २४ नोव्हेंबर पासुन हिवाळी अधिवेशन आहेच दिल्लीला, तेव्हा , ते बिहारच्या पुराच आणि तुमच्या त्या तुलसी भाभी ला एकदा बघतोच )

अर्धवटराव's picture

5 Nov 2014 - 6:54 am | अर्धवटराव

मोदिंना महाराष्ट्रात प्रतिसाद का मिळाला याचं नेमकं उत्तर मिळालं.

काळा पहाड's picture

5 Nov 2014 - 11:44 am | काळा पहाड

२४ नोव्हेंबर पासुन हिवाळी अधिवेशन आहेच दिल्लीला, तेव्हा , ते बिहारच्या पुराच आणि तुमच्या त्या तुलसी भाभी ला एकदा बघतोच

जल्ला काय कल्ला नाय. मन्से चे लोकसभेत पण निवडून गेले आणि आमाला बातमीच नाय?

काळा पहाड's picture

5 Nov 2014 - 11:50 am | काळा पहाड

सुहास साहेब, या वेळी मनसेची ब्ल्यु प्रिंट पाहून सुद्धा मनसेला मत न देता आल्या कारणानं अपराधी वाटत होतं. ती भावना दूर केल्या बद्दल धन्यवाद.

प्रसाद१९७१'s picture

5 Nov 2014 - 1:38 pm | प्रसाद१९७१

सुहास साहेब, तुम्ही खरच काही लिहू नका. तुम्ही लिहुन तुमच्या पक्षाचे नुकसान करत आहात.
मी ७-८ लोकांना तुमचे लिखाण दाखवले, त्यातले काही तर २००९ चे मनसे चे मतदार होते.
तुमची सर्व मते वाचुन सर्वांनी आता काही झाले तरी भविष्यात मनसे ला मत देणार नाही असे ठरवले.

क्लिंटन's picture

5 Nov 2014 - 1:59 pm | क्लिंटन

तुमची सर्व मते वाचुन सर्वांनी आता काही झाले तरी भविष्यात मनसे ला मत देणार नाही असे ठरवले.

मग तर सुहासरावांनी लिहिलेच पाहिजे असे मी म्हणेन. मनसेचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा :)

काळा पहाड's picture

5 Nov 2014 - 2:53 pm | काळा पहाड

पाच ...केवळ बारा - हजार आणी काहीतरी शेकडा वितरकांसाठी गॅस चा दर दोन रूपये आणि काही पैसै वाढविण्याच आम्हाला काही समजले नाही

डेमॉक्रसी चा अर्थ माहितिये का सुहास साहेब? डेमॉक्रसी म्हणजे मॉबॉक्रसी नव्हे. ज्याचे ज्यास्त लोक त्याचा न्याय असं नसतं. वितरकांच्या मागणी सरकारला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी दर वाढवणे चुकीचे कसे?

काळा पहाड's picture

5 Nov 2014 - 3:28 pm | काळा पहाड

एक... हे अदानींना २६० एकर जमीन , तुमच्या वेळेस कशी काय मंजुर झाली, मौनीबाबा असताना का मिळाली नाही ? पर्यावरण खातं , लवासा घडल्यापासुन, गवत कापायला परवानगी देत नाहीये महाराष्ट्रात, या महाभागाला जंगल कापायला कशी काय दिली ? बर ! २६० एकर ? किती मेगा वॅट चा प्लॅन्ट आहे ? काय रेट ने दिलीत, आणि जंगलात का, ते जैतापुर सारखं २६,००० प्रती एकर ने दिलेली मग आंदोलन केल्यावर, ( आठवा, आमचे बाळासाहेब, जैतापुरचे मयतापुर करू ) २,००,००० करता न यावे कोणाला ही म्हणुन का ? गोंदिया चा कोळसा, भुगर्भ शास्त्रज्ञांनी केव्हाच निकृष्ट दर्जाचा ठरविलाय , तिथुन कोळसा नाय ? अदानीचा च कोळसा बाहेर निघेल, बर ! बर , राज्य सरकार अस्तित्वात नसताना, ( राज्यपाल तुम्ही आणुन बसविलाय) हे कुठल्या धारेत बसते ? ( पहिल्या धारेत का ? मग आमचा आक्षेप आहेच !! )

हा पॅराग्राफ नक्की मराठीतच आहे का? कशाचा कशाला संबंध लागत नाहिये म्हणून म्हणतोय.

दोन ..त्या काळ्या यादीच जरा नीट ठरवुन घ्या , नेमके किती पैसै आणणार आहात ते ?

ते कसं ठरवणार? तो अंदाज आहे. नक्की किति पैसे आहेत हे स्विस किंवा जर्मन बँकांनी डिक्लेयर केलय का? नक्की किती खाती आहेत हे तरी कुठं माहितिय? पण अंदाज तर करावाच लागणार. बर त्याची प्रोग्रेस ही गुप्त असणार. ती ते तुम्हाला का सांगतील?

तीन ..पेट्रोल आपल्यामुळे कमी झाल्याचे कळले , आपण आखाती देशांमध्ये मुत्र-विसर्जनासाठी जात असल्यामुळे

वा! काय ती भाषा!!

अहो पेट्रोल म्हणजे माता च ना , सगळे भाव त्यामुळेच वाढतात

भाव डिझेल मुळे वाढतात सुहास साहेब. अभ्यास वाढवा.

आख्खे मुग अजुन ३६००० रु, क्विंटल पर्यंत का पोचले ते काही कळले नाही , गुजरात मध्ये वाढतात की काय ?

निदान ते व्यापारी तरी आहेत. ते त्यांचा फायदा पहाणारच. मराठी लोक एजंटगिरी, गुंडगिरी, दलाली यांच्याशिवाय दुसरं काही करतात का? मजूर सुद्धा परराज्यातून आणावे लागतात.

चार ...जपान ने आपला भारतातला अ‍ॅक्टिव्हा चा ११०० करोडचा चौथा प्रोजेक्ट , औरगांबाद च्या एवजी, अहमदाबाद ला का नेलाय हो , तुम्ही तर केला ना अहमदाबाद विकास जो काही करायचा तो , मग आमच्या गरीबांच्या औरगांबाद ने..माफ करा.. संभाजीनगर ने ...काय घोडं मारलय

अहो कामं करता का तुम्ही लोक? सारखं अस्मिता, शिवाजी महाराज, अफझल्खान, शाइस्तेखान, तोडून टाकू, खळ्ळ खट्याक, शूर मावळे असलं काहीतरी बडबडून कामं होतात का? वीज आहे का महाराष्ट्रात पूर्ण वेळ? सवलतीत तर जाऊच दे. त्या एम आय डी सी मध्ये सगळे मावळे जाऊन उद्योगपतींना धमक्या देतात की काँट्रॅक्ट त्यांनाच मिळाली पाहिजेत म्हणून. आता जा तिकडे अहमदाबादेत पाठ मोडून काम करायला. इथं सगळं होतं ते मोडून खाल्लं तुम्ही लोकांनी. आणि वर नाक करून विचारताय की उद्योग तिकडे का नेताय म्हणून?

सहा ...ते , छोट्या कपड्यांमुळे बलाक्तार होतात म्हणणार्‍या हुड्डा ला हरियाना चा मुख्यमंत्री केलात ते आम्ही मर्जीतील माणसे पाहिजेत , हे आम्ही समजु शकतो

अहो, हरियानाचा मुख्यमंत्री हुड्डा नाहिये, खट्टर आहे. काय हे!

हे आम्ही समजु शकतो पण हे " मेक इन इंडिया " चे काय खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात , अहो शेठ , ही परदेशी कंपन्या आपल्या इथे , जेव्हा कमी पैशात वस्तु बनवितात, रोजगार निर्माण करतात, तेव्हा एक प्रकारे आपण त्यांचे मिंधे होत असतो , एक तर जवळपास फुकटाची गुंतवणुक असते, पण जेव्हा , त्यांची कंपनी तोट्यात जाते ना, ते सर्वात पहिले आपली मारतात, इथले सर्व व्यवहार बंद करतात, आपल्या नौकर्‍या जातात, मग एमआयडीसी मध्ये तुलसी रामसे ब्रदर्स च्या भुतपटांच्या शुटींग कराव्या का ? [...] इंटरनॅशनल इकॉनॉमी चा गेम कधी उलटेल सांगता येत नाही , कशाला रिस्का घ्यायच्या , त्या मौनीबाबा ने काळाची पावले केव्हाच ओळ्खली होती म्हणा की !! आणि अटलजी स्वदेशी बाबत काय सांगत होते हे कळलेच नाही म्हणायचे की तुम्हाला, ना राज धर्म कळला ना अटलजी !!

तुम्ही आणि इंटरनॅशनल इकॉनॉमी वर बोलावं म्हणजे विनोदच म्हणा. नक्की कसल्या रिस्क बद्दल बोलताय तुम्ही? कारण जेव्हा मार्केट खराब होतं तेव्हा आउट्सोर्सिंगला जोर येतो. आणि हा गेम नाहीये सुहास साहेब, हा बिझनेस आहे. गेम-रिस्क हे सगळं तिकडं बोलायचं-ज्यांना "..की जय" म्हणायशिवाय काही समजत नाही त्यांच्यापुढे. बाकी तुमची व्होकॅब्युलरी सुधरा जरा "मिंधे होणं", "आपली मारतात", "खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात".. काय हे! बाकी "मेक इन इंडिया" ही संकल्पना जरा समजून घ्या आणि मग बोला.

सात ....आम्हाला रविवारी आपलं भाषण एकायचा योग आला ! हल्ली लय एकसुरी होत चाललाय

मध्ये मध्ये टॉप ट्वेन्टीतली गाणी लावायला सांगावं काय, "सैनिकां" च्या "श्रमपरिहारा" साठी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2014 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास, आंधळेपणाने काम करणारे अनेक पक्षांमधे कार्यकर्ते असतात तसंच तुमचं झालं आहे, असं मला वाटायला लागलं आहे. तुम्ही काहीच नीट उत्तर दिलं नाही. मी जे काही लिहिलं आहे, मी जे काही अनुमान काढलं आहे. त्या अनुमानाला तुम्ही जे 'कहार समाजाबद्दल'चं खासगी बोलणं इथे जाहीर करुन उदाहरण म्हणुन लिहिलं आहे, ते पाहुन तुमची आता मला दया यायला लागली आहे. म्हणजे मी इथे विनाकारण लिहितोय असं मला वाटतंय.

खासगी संभाषणाबद्दल आणि अवांतर. : आपल्या मामाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आपण गंगापूरला आलात आणि एक स्त्री पाण्यात बुडी मारुन गाळ जमा करत होते आणि मी म्हणालो की त्या शंभर एक रुपये जमा करतात त्यात हॅहॅहॅ करण्यासारखं काय आहे ? तुम्ही केवळ एका प्रसंगाने त्यांच्याबद्दल व्यथित होऊन माझ्या कोरडेपणाचा राग येऊन तुम्ही फोन कट केला म्हणतात, हे मला आत्ता तुमच्या बोलण्याहुन कळतंय. पहिली गोष्ट मला तुमच्याशी बोलण्यात कोणताही आनंद वाटत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही माझा फोन कट करण्याने माझी कोणतीही जहागिरी बुडालेली नाही. हवा पाणी अन्न वस्त्र निवारा, फोन गप्पा, आणि सर्व गोष्टी वेळच्या वेळी अजून पूर्ण होत आहे. एका क्षणाने आपण जो अभ्यास केला व्यथित झालात त्याने माझे डोळे भरुन आले आहेत. मला स्वतःच काही सांगायचं जीवावर येत तरीही तुमच्यासाठी-

www.kaharsamaj.com नावाचं माझं ड्रुपलवर आधारित एक मराठी संकेतस्थळ इथे जालावर चार एक वर्ष होतं. तिथे मी कहार समाजाच्या मुलांना लिहितं केलं होतं. समाजाचा इतिहास, रुढी, परंपरा, गीतं, सण, त्याबद्दल मी लेखन केलं आहे. त्यांची कामं त्यांचं जगणं याची मला उत्तम जाण आहे. माझ्या त्या संकेतस्थळावरील सर्व्हर क्रॅश झाल्याने सर्व डाटा गेला माझं संकेतस्थळ वाहुन गेलं. पाटोदा येथील मराठी विषयाचे प्रा.डॉ.रामनाथ वाढे यांच्याबरोबर मी 'कहार समाजातील लोकगीते' या विषयावर अभ्यास करतांना या समाजाचा नदीकाठावर फिरुन मी त्यांचा चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळे त्या समाजाबद्दल मला जितकं अधिकारवाणीने बोलता येईल तितकं तुम्ही बोलूच शकत नाही, इतकेच सांगतो. समाजासाठी मी आंदोलन केली आहेत. ( विश्वास नसेल तर फोटू टाकायचा सांगा मी टाकेन)

अजून एक सांगतो माझ्या संपूर्ण प्रतिसादात मी कोणत्याही पक्षाची बाजू घेतलेली नाही. मी फक्त अजूनही मनसेच्या पक्षाच्या वाताहाताची कारणं विचारत आहे, बाकी पक्षाबद्दल मी अजून कुठेही चकार काढलेला नाही. मनसे जे वागलं ते मी लिहिलं आहे. वरचा प्रतिसाद येईपर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण जमलेलं नाही. बाकी, स्कोर सेटलिंग वगैरे माझं काही नसतं. एकतर मी हल्ली चर्चेत पडत नाही. जे असतं ते स्पष्ट आणि रोखठोक मग मानाचं असो की अपमानाचं. मला त्याचं काही वाटत नाही. आपल्याला इतर प्रतिसाद पाडण्यासाठी खुप वेळ आहे. मनसेच्या वाताहाताची कारणं लिहायला वेळ नै मोठी गम्मत आहे. कार्यकर्तेच असे तर पक्षाची वाताहात होणारच. बरं, आपला आवही असा आहे की (आपला वरचा प्रतिसाद) साहेब सर्व गोष्टी तुमच्याशी चर्चा करुन निर्णय घेतात असो, आपले प्रतिसाद वाचण्यात काही अर्थ नाही, आता वेळ घालवण्यात मला इट्रेष्ट नाही, तुमचं चालु द्या. मनसेला फिनिक्ससारखी झेप घेण्यासाठी शुभेच्छा...!

(अजून एक सायंकाळी सहापर्यंत परिक्षेच्या कामात आहे. व्यक्तिगत लिहिलं तर मला ऑनलाईन मी जरी असलो तरी लिहायला लगेच जमणार नाही. म्हणजे तुम्ही लिहिलेलं मला पटलेलं आहे, असा अर्थ घेऊ नये म्हणजे झालं )

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

23 Nov 2014 - 1:49 am | सुहास..

प्रतिसाद लिहितो आहे ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2014 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्देसुद लिहा, विषयांतर करु नका. उत्सुकता आपल्या लेखनाची आहेच.

-दिलीप बिरुटे

बाकीच्या धाग्यांवर प्रतिसाद देताय म्हणून विचारले.

बाकीच्या धाग्यांवर प्रतिसाद देताय म्हणून विचारले.

मागेच अशाच कुठल्यातरी धाग्यात-- स्पेसिफिकेश(न) देतो लवकरच म्हणून ८-१० दिवस हे अंतर्धान पावले.स्पेसिफिकेश कधी देताय म्हणून विचारल्यावर दिली आहेत की वर असे उत्तर दिले.अजून एकदा असेच काहीतरी झाल्यावर या मनुष्याच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आले :)

श्रीगुरुजी's picture

4 Nov 2014 - 8:41 pm | श्रीगुरुजी

>>> आधी पोट निवडणुका झाल्या राजस्थान आणि गुजरात मध्ये कॉंग्रेस निवडुन आले की , उत्तरे मध्ये सपा ला जास्त जाग्या मिळाल्या तुमच्या पेक्षा , त्याच विष्लेषन तर सोडा उन्माद च संपेना,

याचं विश्लेषण पूर्वी २-३ वेळा वेगवेगळ्या धाग्यांवर मी केलेले आहे. ते वाचलं असेलच. पोटनिवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात. केंद्राचा त्याच्याशी फारसा संबंध नसतो. या पोटनिवडणुकात अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे उ.प्र.मध्ये बसपाने आपले उमेदवार केले नव्हते. त्यामुळे बसपाची मुस्लिम व दलित मते सपाकडे गेली व त्यामुळे सपाला ११ पैकी ८ जागा मिळाल्या. बसपाचे उमेदवार असते तर भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले नसते. २०१७ मध्ये उ.प्र. विधानसभेची निवडणुक आहे. त्यावेळी बसपा दूर रहाण्याची सुतराम शक्यता नाही व साहजिकच पोटनिवडणुकातील निकालाच्या पुनरावृत्तीची सुतराम शक्यता नाही.

बिहार मधील पोटनिवडणुकीत संजद, राजद व काँग्रेसने युती केली होती व त्यामुळेच त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या.
२०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यावेळी अशी युती होण्याची सुतराम शक्यता नाही व साहजिकच पोटनिवडणुकातील निकालाच्या पुनरावृत्तीची सुतराम शक्यता नाही.

याविषयी अधिक सखोल विश्लेषण खालील लेखात वाचा.

http://indianexpress.com/article/opinion/columns/arithmetic-not-love-jihad/

>>> यशाने हुरळुन गेलेल्या पक्षाला , कुबड्या वापराव्याच लागण्यार आहेच , कोणा एका तरी एकाच्या कुबड्या घ्याव्याच लागणार आहेत , मग कोणाच्या घेणार, ज्यांनी तुम्हाला अफजला खान म्हटले त्याच्या की ज्यांना तुम्ही करप्ट पार्टी म्हणत होतात त्याच्या ?

कुबड्या न घेता सुद्धा सरकार चालू शकते या भीतिमुळे शिवसेना बावचळलेली आहे व त्यामुळेच ते सातत्याने अनिल देसाई व सुभाष देसाईंना दिल्लीच्या वार्‍या करायला लावून 'आम्हाला आत घ्या की हो' अशा मिनतवार्‍या करीत आहेत. ज्यांची संभावना अफझलखान, आदिलशहा, कुतुबशहा, दिल्ली की बिल्ली अशा शेलक्या शब्दांनी केली त्यांचेच या स्वाभिमानी मावळ्यांना आता पाय धरावे लागत आहेत.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 1:20 pm | श्रीगुरुजी

मनसेला एक महापालिका धड सांभाळता आली नाही. अख्खे राज्य ते काय चालविणार? निळी प्रत ९ वर्षांनी आली. आता त्याची अंमलबजावणी व्हायला किमान ९०० वर्षे लागतील.

राज ठाकरे खूपच चमत्कारीक भाषणे करीत आहेत. म्हणे इतकी वर्षे भाजप शिवसेनेला आतून पोखरत होता आणि बाळासाहेबांनी भाजपला पूर्वीच लाथ घालून हाकलला असता. अरे लेका, याच भाजपच्या जीवावर तुझा पहिला महापौर झाला ते लगेच विसरलास? तेव्हा नाही भाजपला लाथ घालाविशी वाटली. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलीस ते विसरलास वाटतं? नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचीच मदत घेऊन त्यांनाच शिव्या देण्याइतका कृतघ्नपणा देखील तुझ्या अंगी आहे. ज्याचा गळा मफलरने आवळायला निघाला होतास त्याचीच मदत घेताना निदान मनाची तरी वाटायला हवी होती.

मनसे आणि राज ठाकरे एकंदरीत भंपक काम आहे. नुसती बडबड आणि बडबडीच्या एकदम विरूद्ध कृती असे यांचे वैशिष्ट्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2014 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनसेला एक महापालिका धड सांभाळता आली नाही. अख्खे राज्य ते काय चालविणार?

अगदी खरं आहे. लोकांना लै बाता मारल्या यव करु अन त्यव करु. नाश्कात एक उत्तम संधी होती तिथे काहीच घडले नाही,टोलबद्द्ल तर विचारुच नका. मला स्वतःला वाटलं सालं काय वक्तृत्व आहे, साहेबांची आठवण यावी आणि साहेबांसारखाच हा माणुस मोठा होणार सालं मला खुप आनंद झाला होता तेव्हा आणि आता नामुष्किचा पराभव झाल्यावर असं वाटतं लोकांनी बरोबर जागा दाखवली. जाऊ द्या.

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

1 Oct 2014 - 5:44 pm | मालोजीराव

मस्त लेख,

यंदा (काकाला तिकीट मिळाल्याने) आपण मनसे वाले

hitesh's picture

1 Nov 2014 - 6:46 pm | hitesh

काकांचे काय झाले ?

hitesh's picture

1 Nov 2014 - 11:57 am | hitesh

राज ठाकरे म्हणत होते .. एकहाती सत्ता द्या.

...

म्हणुन त्यांचा एकच आमदार निवडुन आला.

क्लिंटन's picture

1 Nov 2014 - 12:13 pm | क्लिंटन

लवकरच राठांना शून्यहाती सत्ता द्या असे म्हणायला लागले तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप चांगला दिवस असेल :)

hitesh's picture

1 Nov 2014 - 1:11 pm | hitesh

शून्य होण्याच्या मार्गावरच आहे.

तो आमदार भाजपाच्या वाटेवर आहे म्हणे.

hitesh's picture

1 Nov 2014 - 1:16 pm | hitesh

मनसे हे स्वतःच सेनेची कार्बन कॉपी - निळी प्रत आए.

मूळ प्रत आनि निळी प्रत. दोनत फारसा फर्क नाही

श्रीगुरुजी's picture

1 Nov 2014 - 7:10 pm | श्रीगुरुजी

आधी हे वाचलं.

>>> मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे.

हा परिच्छेद वाचल्यावर सध्या तुमचे वय २५ च्या आत असावे असं वाटतंय.

नंतर हे वाचलं.

>>> सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !!

राज ठाकर्‍यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. तुमच्या वरील परीच्छेदानुसार २००३ पासून शिवसेना सोडण्याचे विचार त्यांच्या मनात घोळत होते. २००३-२००४ मध्येच तुमच्यासारख्यांना बाळासाहेबांपर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. तुमचे वय सध्या २५ च्या आत असेल तर २००३-०४ मध्ये तुम्ही १२-१३ वर्षांचे असणार. इतक्या लहान वयात तुम्ही बाळासाहेबांपर्यंत पोहोचत होता हे आश्चर्यच म्हणायचं!

पिंपातला उंदीर's picture

1 Nov 2014 - 8:40 pm | पिंपातला उंदीर

राज आणि मनसे यांची खिल्ली उडव्नार्यांनी १०० दिवसात देशा बाहेरचा काळा पैसा वापस न आणणे , पाकिस्तान विरुद्ध कडक भूमिका न घेणे (सैनिक मरत असताना नवाझ शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे ई .), रोबेर्ट वाध्रा वर काहीही कारवाई न करणे , अनेक राष्ट्रवादी 'बिभीषण ' पावन करून घेणे रेल्वे दरात भाववाढ करणे, मंत्री मंडळात कलंकित मंत्री घेणे , गंभीर गुन्हे असणार्या आणि स्वतहाच्या राज्यातून तडीपार असणार्या इसमाला पक्ष अध्यक्ष करणे आणि अनेक इतर गोष्टीवर कोलांटी उडी मारण्यावर भूमिका घेणे अपेक्षित आहे . म्हणजे आपला पक्ष सब से धुला हुआ , एकदम सफेद आणि बाकी सगळे घाण अशी भूमिका घेणार्यांच्या वैचारिक भाबडेपणा चे नेहमीच हसूच येत आले आहे . सगळेच पक्ष या हमाम मध्ये नंगे आहेत हे या भाबड्या लोकाना कधी कळेल हे ते अयोध्येचा राम च जाणो . अरे हो ! कारगिल मध्ये हारलेल्या भूभागाच आणि राम मंदीराच काय झाल हो ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Nov 2014 - 12:18 am | निनाद मुक्काम प...

मनसे विषयी काही गंभीर आक्षेप
मनसे ची स्थापना झाली तेव्हा राज्यभर दौरे करून चांगली वातावरण निर्मिती व मुहूर्ताची सभा गाजली मात्र राज ह्यांची भाषणे व कृती व आवेश पटला नाही , कारण ते त्यांचे मुद्दे व वक्तव्ये वास्तवापासून कोसो
दूर होते.
जे माझ्या काकाला , भावाला अगदी पवार ते इतर पक्षांना जमले नाही जो महाराष्ट्राचा पिंड नाही अशी एकहाती सत्ता त्यांनी जोशात मागायला सुरवात केली.
त्यांना कोणी तरी समजाऊन सांगायला हवे होते. नवीन पक्ष आहे एक एक शिवरायांनी किल्ले ,प्रदेश घेऊन स्वराज्याची स्थापना झाली. एकदम दिल्लीच्या तख्ताला गवसणी घातली नाही व मैदानी युद्ध टाळली , पण राज ह्यांनी लोकसभा निवडणूक २००९ लढवली ती फक्त आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी.
स्वतःच्या विजय झाला नाही पण युतीच्या दोन मोक्याच्या जागा
पडल्यावर अपुन दे दो मारा हा फिल्मी डायलॉग त्यांच्या पुढील राजकारणातील दिशा दर्शवत होते.

सेनेला सोडून भाजपने आपल्या नव्या पक्षाच्या सोबत येण्यासाठी भाजपला आपले उपद्रव मुल्य व अस्तित्व दाखविण्यासाठी राम नाईक सारखा हिरा पडून गोविंदा नामक दाउद दरबारी हजेरी लावणारा उमदेवार निवडणून आला पुढे तो तितक्यात वेगात राजकारणातून नाहीसा झाला
नवीन पक्ष असतांना संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही प्रकारच्या निवडणुकीत उमदेवार उभे करण्याचा त्यांचा अट्टाहास हा केवळ आघाडीकडून सुपारी घेऊन जिंकण्यापेक्षा युतीला पाडण्यासाठी उभे केले आहेत असा समज दृढ झाला. वसंतसेनेचे आधुनिक रूप दिसले.
ह्या वेळच्या लोकसभेत गडकरी ह्यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली व कश्यासाठी भाजपच्या विरुद्ध उमेदवार उभे केले नाही त्या बदल्यास राज व त्यांच्या पक्षाला भाजपकडून काय मिळाले.
राम कदम ला भाजपने घेऊन चांगलीच परतफेड केली.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचवेळी सेनेविरुद्ध उमेदवार देऊन द्वेषाचे राजकारण करत असल्याचे चित्र जनतेत उभे राहिले म्हणूनच ह्या निवडणुकीत मुंबई मधील ९ जागा बहुतांशी सेनेला मिळाल्या.
आता
सोशल मिडीयावर त्यांच्या पक्षाने इतर पक्षांच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात अस्तित्व ठेवले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या देशात दोन पद्धतीचे राजकारण होते.
मोदी धाटणीचे व उर्वरित पक्षांचे
सविस्तर सांगायचे तर मोदी ह्यांची राजकारण ,प्रचार करण्याची पद्धत भारतीय राजकारण नवीन आधुनिक काळाशी सुसंगत कॉर्पोरेट पद्धतीने शिस्तबद्ध व अत्यंत योजनाबद्ध रीत्या होते.
त्यांची निवडणूक केंपेन मधून ओबामाच्या तोडीस तोड होती असे खुद अमेरिकन मिडिया कडून सांगण्यात आले ,
एकहाती सत्ता मागण्यासाठी १५ वर्ष राज्य चालविण्याचा अनुभव व सामान्य घरातून येउन आपला मार्ग आपल्या पद्धतीने आखणारे मोदी व उर्वरित पक्षात घराणेशाहीतून वर आलेले नेत्यांचे जुनाट कालबाह्य राजकारण
मनसे बद्दल सांगायचे तर राज ह्यांना ठाकरे आडनावामुळे त्यांचे सहकारी व पक्ष उभा राहण्यात मदत झाली मात्र तडफदार भाषण नकला , आरोपांची आतिषबाजी ह्यात समस्येवर जालीमदेवालायापेक्ष्या शौचालये हवी हे आधुनिक काळाचे भान राखणारी तत्कालीन वास्तविक जनतेची नाळ जोडणारी विधाने राज ह्याच्याकडून आली नाही. उपाय नक्की काय आहे हे ब्लू प्रिंट येई पर्यंत जनतेला माहिती नव्हते.

मोदी भाषणात नेहमीच गुजरात चा हवाला देतात ह्याचे एकमेव कारण जे एखाद्या भाषणात मला तुमच्या मतदार संघात उदा सौर उर्जा प्रकल्प आणायचा आहे असे सांगायचे असेल तर जनतेचा त्यांच्यावर विश्वास वसतो कारण गुजरात मध्ये असे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या उभे राहिले आहेत , आता अनेकांना गुजरात यश खरे वाटत नाही मात्र सामान्य जनतेसमोर गुजरात चा झाला तसा विकास आपला होईल हा विश्वास देण्यात मोदी यशस्वी ठरतात इतर पक्षांच्या सह खुद मनसे मध्ये मोदी गुजरात चे उदा देऊन जणू होय हे शक्य आहे हे जनतेच्या मनात ठरविण्यात इतर पक्ष नाकाम ठरले
अजून एक मुद्दा म्हणजे ग्रामीण भारत सोडा पण सोशल नेटवर्किंग वर असणारे मतदार सुद्धा ब्लू प्रिंट जाऊन वाचण्याचे कष्ट घेणार नाही , मोदी ह्यांनी २०१२ पासून विविध प्रसंगी विविध स्थळी आपले धोरण जनतेसमोर मांडले तेव्हा कुठे त्यांची हवा निर्माण झाली ,
भाषणे खूप झाली आता हवी कृती तेव्हा कुठे स्वप्नातील भारत दिसेल ,आताही संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्याचे टाळून तुमच्या मोक्याच्या मोजक्या जागांवर लक्ष केंद्रित केले तर महानगर महापालिकेपासून परत पक्षाचे राजकीय पुनर्वसन शक्य होईल , सेनेची सध्याची वाटचाल पाहता दक्षिणेतील राज्यांच्या सारखे मुंबई मधील मराठी मतदार हा मनसे व सेना असे आलटून पालटून मतदान करणार असे वाटते तेव्हा आता अबकी बार मनसे सरकार पण त्यासाठी एका माणसाने सारा महाराष्ट्र सोडा आधी बालेकिल्ले परत मिळावा असे सांगावेसे वाटते
आता तू नळी व इतर माध्यमांच्या मूळे लोकांना तुम्ही काय म्हणतात हे लोकांच्या लक्षात राहतो.
काही सांगायचे आहे , निवडणूक लढवायची आहे व ती लढविणे आमच्या गुणसूत्रात नाही अशी वक्तव्ये पाहून खरेच संभ्रमित अवस्था निर्माण होते.

प्रसाद१९७१'s picture

4 Nov 2014 - 1:20 pm | प्रसाद१९७१

राठांचे एक नशिक मधले भाषण बघितले, त्यात मी अंबानीला सांगीतले, मी महिंद्राला सांगीतले. ते लगेच तयार झाले वगैरे असले डॉयलॉग होते. कशासाठी तयार झाले तर फ्लायओव्हर खाली बाग करायला. :-)

त्यापेक्षा महानगर पालिकेच्या पैश्यानी रस्ते नीट केले असते आणि गुंङगीरी कमी केली असती तरी मते मिळाली असती. पाहीजेत कशाला अंबानी आणी महींद्रा, सरकार कडे भरपूर पैसे आहेत जर भ्रष्टाचार न करता वापरले तर.

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:35 pm | hitesh

सहमत

आय बि एन लोकमतवर याच विषयावर चर्चा चालू आहे.

मोदक's picture

5 Nov 2014 - 10:58 am | मोदक

Wed, 22/10/2014 - 15:50 - कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत..
Wed, 05/11/2014 - 04:57 - मनसे विषयी मी उत्तरे देण्यासाठी वेळ मागतोय..

सुहास.. संपूर्ण इतिहास लिहायचा असेल तर थोडीथोडकी तरी सुरूवात कर. खूप दिवस झाले निकाल येवून आणि या गोष्टीला (ब्लू प्रिंटसारखा!) जितका वेळ लागेल तितके महत्व कमी होईल.

माझ्यापुरते सांगतो - राज ठाकरे ज्या परिस्थितीमध्ये बाहेर पडले... किंवा घराणेशाही नाही नाही म्हणत चाललेला घराणेशाहीचा खेळ यातून "वेगळे काहीतरी होईल.. काहीतरी बदल घडेल" असेही वातावरण तयार झाले होते.

लै इमोशनल नाही.. पण "आपल्या घरातील एखादा मेंबर नवीन धाडस करताना सर्वजण जसे काळजी करतात तशी काळजीही अनेकजण करत होते." त्या सर्वांचा भ्रमनिरास झाला हे मतपेटीतून सिद्ध झाले आहे. वेळोवेळी बदललेले पवित्रे.. अर्धवट सोडलेली आंदोलने.. अनेक गोष्टी वरती चर्चिल्या गेल्या आहेतच.

अधिक आरोप प्रत्यारोपांवर वेळ न घालवता योग्य मुद्द्यांवर लवकर लिहिता हो - इतकेच सुचवत आहे.

+१

अतिशय सकारात्मक प्रतिसाद

hitesh's picture

5 Nov 2014 - 6:20 pm | hitesh

अस्मिएच्या नावाने हिंसक आम्दोलने झाल्यावर जे सामाजिक नुस्कान होते , त्याच्या भर्पाईसाथी ब्लु प्रिंटात प्रोविजन आहे का ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Nov 2014 - 11:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी योग्य बोललास.कुठल्यातरि राज्यातल्या लोकांना दूषणे द्यायची."राहायचे असेल तर मुकाट्याने राहा","तुमच्या राज्यात निघून जा" असली भाषा वापरायची.असे बोलून आपण सत्ताधर्यांनाच अनुमोदन देत आहोत ह्याचे भान राहिले नाही.ह्या निवडणूकीतही मोदींवर टिका होती. धरणात मुतण्याची भाषा करणार्यांबद्दल,'आदर्श' लोकांबद्दल चकार शब्दही नाही. ह्यामुळे सुशिक्षित मध्यमवर्ग ह्या पक्षापासून दूर गेला.

hitesh's picture

7 Nov 2014 - 12:47 am | hitesh

आधी मोदीचेच फोटो लावुन हे फिरले.

मग मोदी बोल्ले . सेना ओरोजिनल आहे , मनसे डुप्लिकेट आहे.

दुसर्‍या दिवशीपासुन मनसेवाले मोदींच्या विरोधात बोलु लागले !

बॅटमॅन's picture

6 Nov 2014 - 2:27 pm | बॅटमॅन

अहो असले प्रश्न विचारणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे हे विसरलात का तुम्ही =))

hitesh's picture

9 Nov 2014 - 10:11 am | hitesh

१० की कितेतरी नोव्हेम्बरला राज ठाकरे यांचे टोल विरोधी आंदोलन पुन्हा सू रु होणार आहे

प्रसाद१९७१'s picture

10 Nov 2014 - 10:44 am | प्रसाद१९७१

निवडणुकीचा खर्च भरुन निघायला नको का?