अनवाणी नवरात्र

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in काथ्याकूट
25 Sep 2014 - 11:54 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा.

वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत?

व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो.

तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?

प्रतिक्रिया

नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत.
नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले.
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

सुनील's picture

25 Sep 2014 - 12:14 pm | सुनील

श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे

हस्ताक्षर सुधारते! ;)

नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.

मदनबाण's picture

25 Sep 2014 - 12:02 pm | मदनबाण

श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

फुकटची बासरी वाजवून पण तोंडची वाफ दडवली जाते, साध्य काहीच होत नाही

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 12:54 pm | किसन शिंदे

=))

स्पावड्याचा अपेक्षित प्रतिसाद.!

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 12:56 pm | प्यारे१

अरे अरे, असं म्हणू नये स्पावड्या. शांत हो बघू आधी. मोठे आहेत ना ते?

विजुभाऊ's picture

25 Sep 2014 - 2:19 pm | विजुभाऊ

श्री श्री श्री स्पाजी.
मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.

सध्यातरी बासरी फुकट न वाजवता तिकीट लावून वाजवता येईल या प्रयत्नात आहे.

स्पा's picture

25 Sep 2014 - 2:48 pm | स्पा

इजाभाय चिल :D

ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Sep 2014 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.

काय आहे मग बाजरी वाजवणे?

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 1:12 pm | बॅटमॅन

छंद.

स्पा's picture

26 Sep 2014 - 1:28 pm | स्पा

छंदाची व्याख्या काय?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

@छंदाची व्याख्या काय?>>> मनाला आनंद देणारं कृतीबद्ध प्रमेय!

मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ?
तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ?
तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

+१

Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2014 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा

मग त्याला छंदच का म्हणत नाही? श्रद्धा का म्हणता?

स्पा's picture

26 Sep 2014 - 4:46 pm | स्पा

कोण म्हणतंय श्रद्धा ?

विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही

किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही

प्यारे१'s picture

26 Sep 2014 - 1:30 pm | प्यारे१

निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून.

कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज!

वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही.
नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही.

(बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )

प्यारे काका मध्येच आल्याने आमचा पास

पुढील चर्चा आमच्या खरड वहीत करू :)

प्यारे१'s picture

26 Sep 2014 - 1:35 pm | प्यारे१

ओ मी मधेच कुठं आलो?
तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो.

(दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

स्पा's picture

26 Sep 2014 - 1:36 pm | स्पा

(दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

याचसाठी केला होता अट्टाहास

कवितानागेश's picture

26 Sep 2014 - 9:48 pm | कवितानागेश

स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!!
मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?

हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले

दिपक.कुवेत's picture

27 Sep 2014 - 6:47 pm | दिपक.कुवेत

आता छुन्दा छंद लागूनच जौ दे सगळ्यांना....ल्वकर टाका पाकृ

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 2:02 am | खटपट्या

येवडं कराय लागतं व्हय बासरीसाठी ? मला वाटलं समदीजन कळव्याच्या जत्रत बासरी इकत घेतात म्हून !!!

दिपक.कुवेत's picture

27 Sep 2014 - 6:48 pm | दिपक.कुवेत

फार खटपट लागते बासरीसाठि. एवढं सोप्प नाहि खट्टु काका

खटपट्या's picture

28 Sep 2014 - 12:03 am | खटपट्या

हम्म !!

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 12:43 pm | टवाळ कार्टा

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...

विजुभाऊ's picture

25 Sep 2014 - 2:21 pm | विजुभाऊ

परफेक्ट टवाळभौ

जेपी's picture

25 Sep 2014 - 12:06 pm | जेपी

नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.

प्रमोद देर्देकर's picture

25 Sep 2014 - 12:39 pm | प्रमोद देर्देकर

हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे.
आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 12:42 pm | टवाळ कार्टा

+१११११११

सुहास झेले's picture

25 Sep 2014 - 12:41 pm | सुहास झेले

अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की... ;-)

सुहास..'s picture

25 Sep 2014 - 12:45 pm | सुहास..

तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >>

हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !!

हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 12:51 pm | प्यारे१

>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय

हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 3:11 am | पिवळा डांबिस

हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.

'चर्चा' आणि 'दर्जा' या शब्दांवर नाय आक्षेप?
कसले जाज्वल्य मिपाकर तुम्ही?
:)

पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..
आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

अवांतर : पुण्यात राहिले की असे वांदे होतात बोलताना ;)

का ब्वा ?

लिंक देतो खव त थोड्या वेळात :)

आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 12:57 pm | किसन शिंदे

वेल :P, हा धागा शंका निरसन कमी आणि आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. ;)

आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >>

पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)

पाटा खेळपट्टीवर रन होतात मग पाटा खेळपट्टीवरच का खेळू नये? का मॅचेस भरवू नयेत?

तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !!

बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)

प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)

किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >>

चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 1:28 pm | दिपक.कुवेत

@ किसन/सुहास...

माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये.

आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय.

अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.

देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ...

शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)

उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.

"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >>

हम्म !! शब्द मागे घेतो मालक ..
आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 3:02 pm | दिपक.कुवेत

अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 8:41 pm | किसन शिंदे

अरेरे!! दिपक चिडल्याचं पाहून एक मिपाकर असल्याची.... :D =))

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2014 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर

सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो.

अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात.

आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2014 - 1:13 pm | चौथा कोनाडा

मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 1:38 pm | दिपक.कुवेत

मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2014 - 12:37 pm | चौथा कोनाडा

छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)

आशु जोग's picture

25 Sep 2014 - 1:44 pm | आशु जोग

अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की...

चपला नाही तसेच कपडे पण नाही... अनवाणी अनकपडे

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 1:51 pm | टवाळ कार्टा

मग सगळे दांडीया खेळतात कि गरबा ;)

आदूबाळ's picture

25 Sep 2014 - 6:54 pm | आदूबाळ

गरबा

एक मित्र "गर्भा" असा उच्चार करतो. काही बातम्यांवरून अंदाज घेता हे विशेष खोटं नसावं...

पैसा's picture

25 Sep 2014 - 1:53 pm | पैसा

मस्त पाकृ! या वीकांताला करून पाहीन! :-/

धागा मनोरंजनात्मक वाटत असेल तर अवश्य उडवावा एवढेच म्हणतो.

पैसा's picture

25 Sep 2014 - 2:09 pm | पैसा

या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2014 - 3:11 pm | प्रभाकर पेठकर

इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात.
शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 3:17 pm | प्यारे१

देव एवढा दूधखुळा नाही हो पण.
तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं.
ते फळ तिथलं तिथंच.
उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार.
देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही.

देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2014 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर

>>>>देव एवढा दूधखुळा नाही हो पण......देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

एव्हढी समज असती तर काय पाहिजे होतं?

>> जर देवासाठी असेल तर ठीक.
देवासाठी लेखही लिहीता येतो तर. वाचावे ते नवलच.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 2:10 pm | प्यारे१

बस कर पगले अब रुलायेगा क्या?

मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं.

शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं.

बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको.

उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा.

हे असं होतं बघ. असो!

>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?

दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 3:04 pm | दिपक.कुवेत

कारण तु असचं काहिसं विचारशील म्हणून...तुझ्यासाठि हि चर्चा माफ :D

कवितानागेश's picture

25 Sep 2014 - 2:39 pm | कवितानागेश

त्यापेक्षा उपवासाचे मस्त दोनचार पदार्थ करून इथे दे रे

मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी.

आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला.

पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :(

दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही.
पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :)

सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी.

असो.

शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

मी २००० ते २००३ पर्यंत T.P.C.T's COE मध्ये होतो.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2014 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर

>>>>T.P.C.T's COE मध्ये होतो.

हा कांहीतरी पोलीसांचा बिनतारी संदेश वाटतो आहे

हा हा हा. काय काका, खेचताय काय? ;)

T.P.C.T's COE = Terna Public Charitable Trust's College of Engineering, Osmanabad.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 3:22 pm | प्यारे१

>> तक्तालीन कलेक्टर

शब्दप्रयोग आवडला. 'तख्तालीन' जास्त योग्य वाटतोय. :)

मृत्युन्जय's picture

25 Sep 2014 - 3:14 pm | मृत्युन्जय

नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा.

प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे.

नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 3:25 pm | प्यारे१

>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो.

असेच. तिसरं वर्ष आहे.
आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2014 - 3:29 pm | प्रभाकर पेठकर

>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली.

नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली.

>>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे.

एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.

डीट्टो.

हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 3:36 pm | दिपक.कुवेत

१ वर्ष उपास. दिवसभर काहि न खाता रात्री उपास सोडायचो.

शिंगणापुरात अगोदरही चोर्‍या होतच होत्या, फक्त रिपोर्टिंग दाबले जायचे असे ऐकून आहे.

ह्म्म... जरासे विषयांतर करुन एक इडियो देतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

वरील विडीओची फेसबूकवर आजकाल जाम चलती आहे असे नमूद करू इच्छितो.

काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 3:34 pm | दिपक.कुवेत

पण अप्रतिम आहे. किती निरागस आहेत हे विकणारी सगळे. काय आनंद होतोय १००० रु. मिळाल्यावर!!!

मदनबाण's picture

25 Sep 2014 - 3:37 pm | मदनबाण

मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रमोद देर्देकर's picture

29 Sep 2014 - 10:09 am | प्रमोद देर्देकर

अगदी +१ माझ्याही डोळ्यात पाणी आलं.

संगीतही छान दिलं आहे या चलचित्रणाला.

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 3:25 pm | बॅटमॅन

ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली.

बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

भिंगरी's picture

25 Sep 2014 - 3:59 pm | भिंगरी

नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा,
आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक.....
मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे.
परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे
सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात.
(यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2014 - 12:33 pm | चौथा कोनाडा

धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 4:43 pm | पिंपातला उंदीर

एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे.
ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

शिद's picture

25 Sep 2014 - 4:45 pm | शिद

:(

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 4:57 pm | प्यारे१

>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते.

बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा!
(आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2014 - 12:42 pm | चौथा कोनाडा

"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली"
उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते.
"अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 5:07 pm | दिपक.कुवेत

हेच म्हणायला आलो होतो कि बास...अजून फक्त काहि प्रतिसाद

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 5:11 pm | पिंपातला उंदीर

दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा!

टोमणा कि जळ्जळ ? ह. घ्या

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 5:18 pm | दिपक.कुवेत

तूला काय वाटतयं ते!!! ओक्के?

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 5:22 pm | पिंपातला उंदीर

अरे बाबा प्रतिसाद आम्चे मित्र्वर्य प्यारे याना होता

दिपक.कुवेत's picture

25 Sep 2014 - 5:25 pm | दिपक.कुवेत

धागाकर्त्यालाच आहे. कुठुन हा विषय चर्चे करिता ठेवलाय असं झालय? धागा उडवता येईल का संमं?

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 5:30 pm | पिंपातला उंदीर

मार्क टेलर ने Bradman चा रेकॉर्ड तोडण्याची संधी असून पण डाव घोषित केल्याची आठवण झाली

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 5:29 pm | प्यारे१

दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा!
आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

विनायक प्रभू's picture

25 Sep 2014 - 5:59 pm | विनायक प्रभू

९ दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे?

जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं.
बाकी साठी औषधं आहेतच. :)

नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे? >>

तुम्ही काही करु शकता , सल्ले/पालन ईतरांसाठी आहे मास्तर ;)

विनायक प्रभू's picture

25 Sep 2014 - 6:49 pm | विनायक प्रभू

आण्खी कस्ले कस्ले उपास पाळायचे म्हणे?

आपापली कुवत, वकुब इ इ नुसार जे जमतील ते!!

विनायक प्रभू's picture

25 Sep 2014 - 7:00 pm | विनायक प्रभू

मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का?

मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >>

हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;)

( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला
जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला !
बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमाया

विजुभाऊ's picture

25 Sep 2014 - 7:12 pm | विजुभाऊ

म्हणजे मी पापी का?

लहान बाळाची पापी घेतात..........

विनायक प्रभू's picture

25 Sep 2014 - 7:15 pm | विनायक प्रभू

बायकोचे नाव बाळू?

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 8:59 pm | सुबोध खरे

चामड्याच्या नाही पण रबराच्या किंवा प्लास्टिकच्या चपला (आणि पट्टा) घातलेला चालेल काय ?

मुक्त विहारि's picture

25 Sep 2014 - 9:40 pm | मुक्त विहारि

आमचा पण थोडा "प्रतिसाद-भार"....

आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही.

लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

कोऽहम्'s picture

26 Sep 2014 - 5:20 pm | कोऽहम्

वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत.

नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका.

कळावे,
मित्र

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2014 - 9:48 pm | चौथा कोनाडा

कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Sep 2014 - 11:37 pm | माम्लेदारचा पन्खा

नऊ दिवस चामड्याच्या चपला न वापरता अनवानी फिरण्यापेक्षा, चमडीगीरी सोडा, देवी आपोआप पावेल ......

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 2:06 am | खटपट्या

"देवी पावेल"...
देवी पटेल असं म्हणायचंय का ? :)

पाषाणभेद's picture

27 Sep 2014 - 10:00 pm | पाषाणभेद

एक खुळचट प्रथा पाळली जात आहे.
देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून.
आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात.
मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते.

आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो.

धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2014 - 1:18 am | प्रभाकर पेठकर

धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

सहमत.
समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला.
पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी.
आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे.

खुळचट प्रथा काहीही. निषेध.

प्रसाद गोडबोले's picture

28 Sep 2014 - 2:01 am | प्रसाद गोडबोले

कुवेत मधे अनवाणी पायाने फिरणे शक्य आहे का हो ?

दिपक.कुवेत's picture

28 Sep 2014 - 10:34 am | दिपक.कुवेत

अरेच्च्या पण मी अनवाणी फिरण्याचा प्रश्नच कुठे येतोय? धागा नीट वाचलाच ना?

प्रसाद गोडबोले's picture

28 Sep 2014 - 10:47 am | प्रसाद गोडबोले

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ...

चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे !

अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर...

त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ?

आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

काउबॉय's picture

28 Sep 2014 - 2:26 pm | काउबॉय

अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2014 - 2:38 pm | टवाळ कार्टा

याने काय होणार???

कानडाऊ योगेशु's picture

28 Sep 2014 - 2:58 pm | कानडाऊ योगेशु

सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

vikramaditya's picture

28 Sep 2014 - 4:41 pm | vikramaditya

स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

'न जाणता' कोटीवरि| साधने केली परोपरि| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2014 - 6:19 am | प्रसाद गोडबोले

प्यारे काका ,

इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )