मी पयला... ???

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
24 Sep 2014 - 11:26 pm
गाभा: 

मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते. मिपावर किंवा एखाद्या संकेतस्थळावर जे लोगिन करतात तेच वाचक असतात असे नाही.. अनेक सर्च इंजीनच्या माध्यमातून मिपासारखे संस्थळ वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत असते. त्यात माझ्यासारखे प्रतिसादापासून वाचन सुरु करणारे किमान ५-१०% तरी असतील ना?

असो, यात काय आनंद मिळतो हे मला माहिती नाही, मिळत असेल ही कदाचित, त्या शिवाय का अशी होड लागेल? जर एखादे बक्षीस, एखादा पुरस्कार पहिल्या प्रतिसादाला मिळत असेल तर कृपया त्याबद्दल मिपाने जाहीर घोषणा करावी, कारण संपादक मंडळ देखील यात लक्ष देत नाही म्हणजे हे अधिकृत असेल असे मी समजतो आहे.

हा धागा मिपाला खटकत असेल तर काढला तरी चालेल पण जे खटकले ते लिहितो आहे. किंवा माझे गैरसमज दूर होतील असे दुवे मला द्यावेत.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

विलासराव's picture

24 Sep 2014 - 11:28 pm | विलासराव

मी पयला!!!!!!

विलासराव, जोड्यांनी मारा राव!
आमचे थोबाड फोडून टाका.

"मी पयला" असं क मून बोलू राहिलाबे बेंबट्यान्नो ? अस अफाट पसर्लेल्या आंतरजालावरील मिपाकरांना, आपण दर्डावून विचारताच आम्ही शेजारील पाशिंजरकडे लागलीच खुलासा करून टाकला, "छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘

विलासराव's picture

24 Sep 2014 - 11:33 pm | विलासराव

विलासराव, जोड्यांनी मारा राव!

हे मला या जन्मात तरी शक्य नाही बॉ.
मीही हे कधी लिहीत नाही पण आता धागाच त्यावर आला. आनी योगायोगाने मी पाहीला म्हनुन गंमत केली राव.
बाकी काही नाही.

पैसा's picture

24 Sep 2014 - 11:47 pm | पैसा

मध्यंतरी जेपीने निरुपद्रवी गंमत म्हणून हे प्रकरण सुरू केलेले. जेपी भारत भ्रमणाला गेला तरी इतरांनी ते सुरूच ठेवले. इतर उपद्रवी प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष केले जाते.

मात्र लोकांनी निदान धाग्याच्या पहिल्या काही ओळी तरी वाचून मग प्रतिसाद द्यावेत ही विनंती!ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2014 - 9:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

मो.जिं.भाऊंच्या धाग्यावर म्हणायचय का? =))

हे मायबोली वर बघितलंय. कदाचित तिकडूनच आयात झालं असावं. आणखी एक असाच आयात डोक्यात जाणारा शब्द म्हणजे "धन्स्/धन्यू". आणखी २ अक्षरं टंकायला असा किती त्रास होतो काही कळत नाही.

जेनी...'s picture

25 Sep 2014 - 1:38 am | जेनी...

एकदम बरोबर ... त्या इंग्रजांनी जर कुठे वाचलं हे धन्स तर धस्कुन मरतिल :-/

हा आता त्यांना मराठी वाचायला येत नै म्हणुन बरं ..

बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

कपिलमुनी's picture

25 Sep 2014 - 2:14 pm | कपिलमुनी

दीज पीपल आर किलींग मराठी बाय सच अ वर्ड्स..

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 2:18 pm | प्यारे१

संस्थळ : मराठी अतरंगी लोकांच्या अभी के अभी व्यक्त होण्यासाठी उपलब्ध एक जागा!

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 2:34 pm | बॅटमॅन

शुद्धलेखन तर बोंबच आहे. भाषेचाही खून पाडतात ही लोकं.

माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि Thanks यांचा वर्णसंकर आहे ! ;) मी कधी-कधी वापरतो हा शब्द प्रयोग. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द वापरू लागले तर रुळेलही. शब्द रुळायला काय लागत नाय विशेष. पण सध्या तरी मला हा शब्द विचित्र वाटतो.

अजुन एक शब्द मिपावर सर्रास वापरला जातो :- बाडिस { By default सहमत }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमाया

भाते's picture

25 Sep 2014 - 8:29 pm | भाते

मराठी सोडुन काय बी समजलं नाय बा! काय लिव्हलय हे?

पैसा's picture

25 Sep 2014 - 2:43 pm | पैसा

मग तुम्ही का देवनागरीत इंग्रजी वाक्यंच्या वाक्य लिहिताय? तीही अशुद्ध??

अय्या कमुन्ना काकु का म्हणताय सासुबै ?? :O

कपिलमुनी's picture

26 Sep 2014 - 3:53 pm | कपिलमुनी

टीपी धाग्यावरचा टीपी.

बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

यावर प्रतिसाद होता तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2014 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्स आणि धन्यू हे शब्द उपक्रम या संकेतस्थळावर आमच्या मित्रांनी वापरले तेच या शब्दाचे निर्माते आहेत आणि त्यांची ती परंपरा आम्ही पुढे नेली हे नम्रपणे नमूद करतो. आमच्या मित्राची आठवण काढणारे शब्द शोधल्याबद्द्ल धन्स !! (रावसाहेब वाचताय ना प्रतिसाद)

-दिलीप बिरुटे

-

श्रीरंग_जोशी's picture

25 Sep 2014 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

माझ्या निरिक्षणाप्रमाणे या प्रकाराला लोकप्रिय करण्यार मुक्त विहारी यांनी पण हातभार लावला आहे. मोजीकथांवर हे आवर्जुन पहायला मिळाले.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2014 - 2:48 pm | मुक्त विहारि

त्यामुळे फक्त त्यांच्या कथांवरच

"मी पहिला" असे लिहायचो.

त्याचा राग कधी मोजींना पण आला नाही.(अर्थात "मोजी" हे राग-लोभ-माया-प्रतिसाद- यांच्या पलीकडे पोहोचले आहेत्,हे पण जाता नमूद करु इच्छीतो.)

ते आपले धागा सोडतात आणि आम्ही आपले त्या धाग्याचे मनोरंजन करून सोडतो.

त्या मनोरंजनांत पहिला प्रतिसाद आपला असावा असा अट्टाहास मात्र बर्‍याच जणांचा असतो.

'मी पयला' ला लै मोठा इतिहास हाय.
आमी उगा गम्मत मनुन पुना सुरु केली.
याबद्दल आमचे एका संपादीके कडुन व्यवस्थित जाहिर कान उघडणी झाली आहे.
त्यामुळे लोकांनी हे शब्द उचलुन धरले.

एस's picture

25 Sep 2014 - 7:52 am | एस

मिपाचे मनोगत करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.

मिपाचे मनोगत करण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा.

कोण मनोगत ?
धन्यवाद.

एस's picture

25 Sep 2014 - 8:08 pm | एस

कोण मनोगत ?

तेच ते. आता काय तुम्हांला इतिहास सांगायचा का? ;-)

कवितानागेश's picture

25 Sep 2014 - 8:44 am | कवितानागेश

मला आजपर्यंत वाटत होतं , हे जिमोंच्या कथांवर मुक्तविहारीकाकांनी सुरु केलय. :)

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 9:27 am | टवाळ कार्टा

मी टैम्पास म्हून ल्हितो :)

जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, तेव्हा कुठल्हाही धाग्यावर पहिला प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागायची. इतकच काय तर उजवीकडे हजर सभासदात आपलं नाव सातत्याने दिसण्यासाठी ब्राउजर सातत्याने रिफ्रेश मारले जायचे. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 10:02 am | किसन शिंदे

अरेच्च्या!!

मला वाटलं जेपी आणि मुविंनी धागा हायजॅक करण्यासाठी सुरू केलेली आधुनिक परंपरा आहे ही. ;) (ह.घ्य)

मुक्त विहारि's picture

25 Sep 2014 - 9:06 pm | मुक्त विहारि

"मी पहिला"

हे लिहिण्यात जी मज्जा आहे, ती इतर धाग्यांवर नाही..

बाकी,

ह्या आधुनिक परंपरेला आमच्याकडून सुरुवात झाली असेल तर, मंडळ आभारी आहे.

. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !
मिपा विश्लेषक आदुबाळ सांगु शकेल.

बहुदा सातवाहन काळापासून ही पद्धत आहे...

अनुप ढेरे's picture

25 Sep 2014 - 11:51 am | अनुप ढेरे

तिसरा बॅटमॅनचा सेनापती चौथा प्यारे यानी त्याच्या शिलालेखात लिहिलय म्हणे.

सुहास..'s picture

25 Sep 2014 - 12:39 pm | सुहास..

काय सांगताय ?

काल परवा पानिपतात अब्दाली च्या अंगावर धावुन जाताना मी एका सैनिकाच्या तोंडुन " मी पयला " हा शब्द ऐकला आहे !!

असो ..जोक्स अपार्ट ....मी पयला काय वा प्यार्टी काय चोप्य पस्ते काय किंवा बा*वला काय शब्द प्रयोग चांगला असेल तर लोकांनी उचलुन धरला आणि थोडी माफक करमणुक म्हणुन खपला तर काय हरकत आहे ..असु देत ..

सर्वसाक्षी's picture

25 Sep 2014 - 10:15 am | सर्वसाक्षी

जर तुम्ही 'मी पयला' हे टंकण्यासाठीच येत असाल तर तुमची निराशा होत असावी. मात्र जर तुम्ही धागा वाचायला, आस्वाद घ्यायला वा चर्चेत सहभागी व्हायला येत असाल तर कुणी 'मी पयला' असा प्रतिसाद तुम्हाला खटकण्याचेकारण नाही. शिवाय प्रत्येल धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही. मी पयला असा प्रतिसाद दिसल्याने मी कधीही धाग्याकडे पाठ फिरवली नाही आणि बहुतेक करुन कुणी फिरवत असेल असे वाटत नाही.

असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा?

अगदी पूर्वी याहू मराठी पिपल (१९९८-१९९९ चा सुमार) वर लेखन क्र. शिर्षकासोबत दिसायचा (सर्व विषयांना/ धाग्यांना समाईक असा) तेव्हा ५०००/१००००/१५००० वैगेर क्रमांकाचा प्रतिसाद देण्यासाठी सभासद आतुरतेने वाट पाहत दबा धरुन बसायचे. ज्याचा प्रतिसाद हुकेल तो ज्याने क्रम साधला त्याला खिलाडुपणे 'तू पटकावलास काय' असा प्रतिसाद लिहायचा. मात्र हे कुणाला खटकलं नव्हतं.

तुमची आक्षेप नक्की कशासाठी आहे?

सर्वसाक्षी,

>>>>असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. तो त्याचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा?

ह्याच चालीवर कोणी म्हणेल, 'असते एखाद्याला अशुद्ध लेखनाची आवड. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा?

काय म्हणता?

सर्वसाक्षी's picture

25 Sep 2014 - 4:19 pm | सर्वसाक्षी

पेठकर साहेब तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते.

एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडुन गाडी उलट्या दिशेने वा अतिवेगाने चालवली तर ते इतरांना धोआकादायक असू शकते मात्र एखाद्याने एका कडेने कुणालाही न आडवता वाहतुकीला अडथळा न आणता गाडी एका कडेने संथ चालवली तर त्याला कुणी हरकत घ्यायचे कारण नाहीए.
मी पयला असे एखाद्याने प्रतिसादात म्हटले तर इतरांना काय त्रास आहे? मुळात असे प्रतिसाद वाचुन कुणी लेखन वाचायचे टाळेल हेच पटत नाही कारण सदर प्रतिसाद हा लेखनाला दिलेला प्रतिसाद नसून ते चेपु वरील 'स्टेट्स अपडेट' च्या धर्तीवर असते.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2014 - 1:05 am | प्रभाकर पेठकर

तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते.

खूप जणांना नियम तोडण्यातच आनंद मिळत असतो. तुलना आनंद मिळविण्याची आहे.

(वादावादी/प्रतिसाद उपरोधात आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.)

विनायक प्रभू's picture

25 Sep 2014 - 10:48 am | विनायक प्रभू

हा आक्षेप नेम्का कुठ्ल्या तोंडाला आहे?

,

निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय ती काही विशिष्ट प्रकारच्या धाग्यांवर होताना दिसते.
हेच '१००', '+१,', आणि स्मायलींच्याही बाबतीत म्हणता येईल.

बाकी, धागा आधी वाचावा, प्रतिसाद मग वाचावेत असा माझा क्रम असतो. त्यामुळे प्रतिसादांवरुन मी धाग्याबद्दल मत बनवत नाही (आणि धाग्यावरुन प्रतिसादकांबद्दल!)

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 12:42 pm | सुबोध खरे

+१०००

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 9:10 pm | किसन शिंदे

अतिवास ताईंशी सहमत

सुहास झेले's picture

26 Sep 2014 - 9:35 am | सुहास झेले

१०० टक्के सहमत ... प्रतिक्रिया वाचून लेखाबद्दल कुठलेही मत मी बनवत नाही :)

थर्ड पार्टी म्हणून कधी या गोष्टीची मज्जा घेऊन पहा. मग शक्यतो ही मज्जा नसून उपद्रव आहे तो त्याच प्रकारात येतो "मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" आज प्रकाशित केलेलेल्या लेखावर देखील मुद्दाम असा प्रतिसाद आलाच!

आधी मला वाटले, की मी लेखन पाहिले, म्हणून मी पहिला असा भाव असावा पण तो मी पहिला वाला नंतर लेखनाकडे हुंगुन ही पहात नाही जे जाणवले होते.
अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.

जागे होणारच हो...

"मी पहिला" ह्या प्रतिसादातच ती जादू आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2014 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))

>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ

लिहिता ना हे लक्ष्यातच आले नाही हो =)) :D

सवंगडी's picture

25 Sep 2014 - 9:52 pm | सवंगडी

मी नाय भौ वापरला कंधीच !

काय??? तुम्ही अजुन कधीच नाहि वापरला ???

अरेरे !!

मुक्त विहारि's picture

26 Sep 2014 - 7:34 am | मुक्त विहारि

+१

सवंगडी's picture

26 Sep 2014 - 11:30 am | सवंगडी

नै ना …. शाळेत पण शेवटून दुसरा यायचो ना….

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 3:03 am | पिवळा डांबिस

अभ्यास करायचा नाही,
शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं...
यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं,
आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!!

आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!!
:)

सवंगडी's picture

26 Sep 2014 - 11:34 am | सवंगडी

पिडा सर सोडू का अंगठे ? फार वेळ झाला ओ …
अन हि काय पिंडा आहे ? अहो तो मी नव्हेच हो

पिवळा डांबिस's picture

28 Sep 2014 - 11:22 am | पिवळा डांबिस

तुम्हाला कोणी सांगितलंय?
ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये?
उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!

त्यांना आनंद मिळाला म्हणून मी गप्प बसलो होतो की पिडा :D

सवंगडी's picture

28 Sep 2014 - 7:32 pm | सवंगडी

आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज )
आता तरी सोडू का सांगा ना ??
ओ पिंडा मास्तर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2014 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पयला असं यापुढे प्रतिसादात दिसणार नाही असं वाटतं ! ;)
-दिलीप बिरुटे
(डबल ब्यारलवाला)

या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे.
काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे.
- जेपी
(थ्री नॉट थ्री रायकलवाला)

यसवायजी's picture

27 Sep 2014 - 10:10 pm | यसवायजी

म्हणे 'मी पैला'. कायपण करतात ना हे लोक? वय वाढलं तरी पोरखेळ जात नाही बघा.

-पोरकट- SYG ;)

मुक्त विहारि's picture

28 Sep 2014 - 12:01 am | मुक्त विहारि

उलट आहे....

वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो.

आणि तसेही,

मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.

यसवायजी's picture

28 Sep 2014 - 12:42 am | यसवायजी

ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय.
-पोरकट- SYG ;)

@ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे,
तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.

दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 6:51 pm | कवितानागेश

इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.