संवेदनशीलता

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in जनातलं, मनातलं
24 Sep 2014 - 7:06 pm

ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला .

अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले .

इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

समाजविचार

प्रतिक्रिया

रेवती's picture

24 Sep 2014 - 7:41 pm | रेवती

होय, लेख नव्हता आला! तरी काळजी वाटली नसेल, वाईट वाटलं नसेल असे कोणीही मिपावर नसेल. परवाच आठवण झाली होती. एकवेळ गावाचं पुनर्वसन (राजकारण्यांने होऊ दिलं तर) होईल पण पुनर्बांधणी झालेल्या घरात झोप येईल का? असे वाटले. पूर्वी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना पेप्रात आल्यावर समजत असत. आता जगभराच्या वाईट बातम्या समजतात. दु:ख करायला मनाची जागा पुरत नाही. गप्प बसावसं वाटतं.

आम्ही खरडफ़ळ्यावर त्याबद्दल बोलत होतो. सुहासने काही लिहिले होते. आणि मिपा बंद पडले बहुतेक. त्यामुळे धागा आला नसेल.

सुहासने काही लिहिले होते >>

चार दिवस जात होतो ..ते अनुभव लिहिला होता..मोजक्याच शब्दात ..पण लेखन उडाले ...

आज अचानक आठवण यायच कारण ??

तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . >>>

परत प्रतिसादतोय म्हणुन सॉरी ...मी ही मिपाकर आहे ...आणि माझ्या सोबत अजुन एक मिपाकर होते ...मी तर कामाला नव्हतो ...ते बिचारे वयस्कर असुन, काम धंदा सोडुन , रजा घेवुन भर पावसात रोज अर्धी का असेना बाईक मारत, येत होते ..

न राहवुन उल्लेख करतो आहे भाऊ ..नाव घेत नाही ..क्षमा असावी .

सह्यमित्र's picture

25 Sep 2014 - 10:48 am | सह्यमित्र

तुम्ही आणि तुमच्या सहकारी मिपाकरांनी केलेली कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे.

पैसा's picture

24 Sep 2014 - 10:59 pm | पैसा

अरे उडाले म्हणजे ते मिपा बंद पडले त्याच गडबडीत गेलंय. मी आताही शोधत होते खफवर. नाही सापडलं.

सुहास..'s picture

24 Sep 2014 - 11:01 pm | सुहास..

हो हो ..बंद पडले !!

( आय माय स्वारी ! )

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Sep 2014 - 10:49 pm | माम्लेदारचा पन्खा

नुसती तोंडपाटीलकी नको म्हणून मिपाकरांतर्फे फक्त मूक श्रद्धांजली !

मयत व्यक्तींची सरकारी नुकसानभरपाई रक्कम ऐकून भूछत्रासारखे उगवलेले नातेवाईक पाहून उबग वाटला....

मिपावर सर्व प्रकारची माहिती आणि चर्चा होतात्,आणि वरती सांगितल्या प्रमाणे याही घटने बद्धल लिखाण झाले होते.
आता प्रश्न संवेदनेचा, तर मला तर अनेकदा लोकांच्या संवेदना गोठल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो.
लहानपणी वर्तमानपत्रात एस्टीचा अपघात २ ठार अशी बातमी वाचली तरी फार मोठी घटना घडली असे वाटायचे, पण आता माणसं होलसेल मधे मरत आहेत त्याचे लोकांना काहीच वाटत नाही का ? उत्तराखंड्,माळिण घटना आणि अनेक. तिकडे अमेरिकेने इराक अफगणिस्तान बेचिराख करुन टाकला आहे आणि आता सिरीयावर हल्ले करत आहेत ! यात सामन्य माणसे मरत नाहीत ? अपंग होत नाहीत ? कधी कधी वाटत की {निदान हिंदूस्थानात तरी } की अती लोक संख्या झाल्यामुळे माणासाची किंमत उरलेली नाही !
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 12:01 pm | प्रसाद१९७१

मला वाटते मिपाकर समंजस आहेत आणि मॅच्युर पण आहेत.

अश्या गंभीर दुर्घटनेवर धागे काढुन आणि चर्चा करुन काही होत नाही हे कळत असल्यामुळे धागे काढले जात नाहीत.
धागे न काढणे हेच कदाचित संवेदनशीलतेचे उदाहरण असेल.

धागे काढायचे विषय वेगळे असतात.

मोठे व्हा, असो.

अर्थातच फिरतीवर असल्याने ही घटनाच फार उशिरा समजली (आणि मिपाप्रवेशही न्हवता) पण घटना सुन्न करून गेली... नंतर काही दिवसानीच भीमाशंकरला गेलो होतो आमचा "यो" अवतार बघून बहुदा आम्ही भाविक क्याटेगरितले वाटले नसावे म्हणुन जेंव्हा आम्हाला पर्यटक समजुन माळिण बघायला हया भागात आला होता काय ही तेथे विचारणा झाली तेंव्हा ते ऐकायचिही शरम वाटली... :(

सार्थबोध's picture

1 Oct 2014 - 9:38 am | सार्थबोध

खरय महत्वाचा विषय राहिलाच

पटतंय. विमान अपघातावर इथे धागे रेंगाळले. परंतू ट्रेकिंग वाल्यांनी (मीपण)का नाही लिहिलं ?आता सारवासारव न करता हे चुकलंच म्हणतो.

पैसा's picture

1 Oct 2014 - 2:52 pm | पैसा

वरचे प्रतिसाद वाचा हो! नेमके त्याच्या दुसर्‍याच दिवशी मिपा बंद पडले होते आणि सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागला होता. कोणाला लिहायचं असतं तरी कुठे लिहिणार?

एस's picture

1 Oct 2014 - 3:51 pm | एस

खरडफळ्यावर तेव्हा बरंच काही लिखाण झालं होतं, धागे काढायला मिपा बंद पडलं म्हणून जमलं नव्हतं. अगदी माळीण नेमकं कुठे आहे त्याच्या गूगल मॅपच्या लिंकपासून ते दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यापर्यंत बर्‍याचजणांनी बरेच काही लिहिले होते. असो.