वाघाच्या जबड्यात

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
24 Sep 2014 - 4:19 pm
गाभा: 

कालची धक्कादायक बातमी अनेकांनी वाचली असेलच. दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात झालेली घटना. एक २० वर्षाचा तरूण पांढ-या वाघाच्या खंदकात्/पिंज-यात पडला आणि वाघाने त्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ऐकायला वाचायला मिळालेली काही मतं आणि त्यावर माझे विचार खालीलप्रमाणे.

१) पण तो पडला कसा पहिले म्हणजे? - महत्वाचं हे आहे की सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन यंत्रणा गेली कुठे?
२) त्याच्याच उंगल्या नडल्या. / तो नशेत होता / त्याने आत्महत्या करायला उडी मारली असावी - हे काहीही असेल तरी ते काय आहे ते नंतर बघता आलं असतं. वाचवता का नाही आलं संग्रहालय प्रशासनाला
३) गर्दी पांगवण्यात सुरक्षारक्शकाचा वेळ गेला - की ना इंडियन वाली बात! हे बाकी आहे. प्रसंग काही असो, गर्दी जमणारच. फुकटात मनोरंजन.
४) व्हॉट्सॅप वर फेसबुक वर त्याचा व्हिडियो शेअर करण्यात आला - कहर. अर्थात दुसरी अपेक्षाच नाही. माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून....
५) भिंत काही फार उंच नाहीये - वा! मग मार उडी.
६) लोकांनी दगड मारले म्हणे - त्याने बिथरला हो तो.

असो. सहज आठवलं, अमेरिकेला एकदा डोळ्यासमोर झालेल्या प्रसंगात एक व्यक्ती फुटपाथवर पडलेली होती, तिच्या तोंडातून फेस येत होता. प्रथमदर्शनी दारुडा, गर्दुल्ला असेल असं वाटत होतं. सोबत असलेल्या माझ्या नातेवाईकांनी ९११ ला फोन केला असता मोजून पाच मिनिटाच्या आत फायरची गाडी, कॉप, व अँब्युलन्स तिनही तिथे उभ्या होत्या. त्या माणसाला उचलून नेण्यात आलं. कुणाला 'तुम्ही कोण, तुम्ही तिथे काय करत होतात' इत्यादीपैकी एकही प्रश्न न करता. अर्थात; ती अमेरिका होती.

प्रतिक्रिया

काका वेगळ्या विषयावर तुम्ही लिहिणार असे ठरलेले ना आपले

वाघ कुठे मध्येच आला ?

वेल्लाभट's picture

24 Sep 2014 - 4:34 pm | वेल्लाभट

फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!

स्पा's picture

24 Sep 2014 - 4:37 pm | स्पा

हा ते ठीके

अता लवकर आपल्या मेन टोपीक वर लिवा

>>अता लवकर आपल्या मेन टोपीक वर लिवा

सहमत !!

फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!

एका गंभीर घटेनेवर मुळात धागा काढलात तो ही काहीसा मस्करीत काढल्या सारखा.
ते कमी की काय म्हणुन ही विनोद केल्या सारखी प्रतिक्रिया.

आपसे ये उम्मीद न थी.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 2:37 pm | प्रसाद१९७१

वेल्लाभटांच्या कुठल्या प्रतिक्रिये मुळे तुमच्या त्यांच्या बद्दल च्या "उम्मीद" वाढल्या होत्या किंवा सेट झाल्या होत्या?

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2014 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा

@वाघ कुठे मध्येच आला ?>>> =)) ह्या ह्या ह्या =)) सं'वेदनाहीन नीच पांडू!!!! =))

न्यूजनेशन चानेल पाहात जा. नीट बातमी मिळेल.

वेल्लाभट's picture

24 Sep 2014 - 5:21 pm | वेल्लाभट

बर. तुम्हाला कळली ती बातमी सांगावी.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

>>>>माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून....

व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).
व्हिडीओ चित्रीकरण करणं कोडगेपणा किंवा भावनाहीनतेचे उदाहरण म्हणता येणार नाही. (फेसबुकावर शेअर करणं नक्कीच चुकीचं आहे.) पण ह्या चित्रीकरणाचा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला, मिडियाला आणि त्या तरूणाच्या नातेवाईकांना प्रसंगाचे तपशिल मिळण्यास मदत होते. चुक प्राणिसंग्रहालय प्रशासनाची असेल तर प्रशासनाविरुद्ध खटला उभा करण्यात त्या तरूणाच्या नातेवाईकांना सबळ पुरावा मिळू शकतो. प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर मिडियाला त्याविरुद्ध आवाज उठवायला पुरावा मिळू शकतो. सुरक्षा रक्षकांची किंवा सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहीली असेल तर कारवाई करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला घटनेचे खरेखुरे (सांगीला सांगी आणि... असे नाहीत) तपशिल मिळून अशा व्हिडीओची मदत होऊ शकते.
रस्त्यावरचे अपघात, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकरणांमध्ये शेजारपाजारच्या दुकानांचे किंवा कोणी पर्यटकाने केलेल्या व्हिडिओ शुटींगचे फुटेज तपासले जातेच जाते. गुन्हेगारांना पकडायला त्याचा उपयोग होतो.
पुन्हा सांगतो, फेसबुकावरील शेअर करणे मलाही खटकले आहे.

वेल्लाभट's picture

24 Sep 2014 - 5:26 pm | वेल्लाभट

व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).

विश्वास दांडगा आहे.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 5:54 pm | प्रभाकर पेठकर

विश्वास दांडगा आहे कारण अजून आपल्या समाजात चांगुलपणा शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतात.
आत्ताच ती चित्रफित पाहिली. कदाचित कोणी गेलं नसेल लगेच. पण प्रत्येकजण त्या वाघाचं लक्ष विचलीत करण्याचा आणि तरूणाला वाचवायचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एव्हढ्या भयानक प्रसंगात स्वतःही भांबावल्या अवस्थेत त्या वाघाला त्या तरूणापासून दूर पळवायचा प्रयत्न प्रत्येकाचा होता. असो.

तो तरूण आत कसा पडला आणि जवळपास एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे समजत नाही.

हेतू कसाही असला तरी वरुन आलेल्या दगडाने वाघ बिथरला आणि त्याचक्षणी निर्णायक हल्ला केला(दगडफेकीपासून दूर घेऊन जाणे) असे प्रथमदर्शनी स्पष्ट वाटतेय.

सुहास..'s picture

24 Sep 2014 - 6:05 pm | सुहास..

मेल्या म्हशीला मणभर दुध !!

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 6:35 pm | प्रभाकर पेठकर

शक्यता आहे गवि. पण लोकं काय करू शकत होते? शक्यतो आरड्याओरड्याने दगड वगैरे मारून वाघाचे लक्ष विचलीत करावे आणि पळवून लावावे इतका साधा विचार त्या हतबल जमावाने केलेला दिसतो आहे. जंगलात कसे शिकारीला ढोल, थाळ्या वाजवून हाकारे घालतात आणि वाघाला आपल्याला हवे त्या क्षेत्रात आणतात तसाच कांहीसा विचार जमावाने केला असेल. पण वाघ आपल्या शिकारीला घेऊनच पळेल आणि आपला सदहेतू विफल होईल असे वाटले नसेल. प्रसंगाचं गांभिर्य, भांबावलेपण, अननुभवीपणा, आयुष्यात प्रथमच पाहात असलेलं दृष्य वगैरे वगैरे गोष्टींनी भारलेल्या मेंदूत सारासार विवेक हरवला आणि दुर्घटना घडली असे मला वाटते.
सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती अजूनही मनाला पीळ पाडते आहे.

काउबॉय's picture

27 Sep 2014 - 12:01 pm | काउबॉय

एक तर गोळी घाला अथवा तोंडाने आवाज करा वा प्रतिक्रियाच देऊ नका हे उत्तम, उगा पुचाट हल्ला करून वाघाला डिवचतानाआपण त्याचे काही बिघड्वु शकत नाही याची जाणीव कशाला करून द्यायची ते सुध्दा मुक्त जंगल न्हवे तर त्याच्या हक्काच्या वावराच्या अतिशय मर्यादित परिसरात :(

सुहास..'s picture

24 Sep 2014 - 5:45 pm | सुहास..

धागा घेतलास , छान केले !
हल्ली इतक्या क्लिप्स येतात,यु ट्युब वर तर पसाराच आहे !! त्या युस वगैरै च्या अपघाताच्या, ते कुणी मगरीच्या जबड्यात हात गमावल्याचा तर, त्यामुळे एका बाजुने मन थोड असंवेदनशील होत चाललय हे ही तितकेच खरे :) अर्थात , त्या पोरीचे पब बाहेर जे हाल झाले होते ( परत एकदा...शीSSट ) अक्षरशः मनात कालवाकालव झाली होती ... एखाद्याने ती पहिल्यांदा बघीतली की येतो काटा वगैरै ..पण ते मिडिया इतकी लांबड लावतात की तो मृत्युचा तमाशाच वाटायला लागतो ..तुर्तास इतकेच म्हणेन फास्ट वर्ल्ड, ग्लोबल वर्ल्ड नथिंग एल्स मॅटर !!

पैसा's picture

24 Sep 2014 - 6:21 pm | पैसा

आताच मोबाईलवर क्लिपची सुरुवात बघून कसंतरी झालंय. बराच वेळ तो माणूस वाघासमोर बसून हेल्प हेल्प म्हणून ओरडत होता. :( ती क्लिप तिथेच बंद करून टाकली.

झूच्या लोकाना बोलावायला कोणी गेले नसावेत बहुतेक. व्हिडिओ काढतायत मेले.

पियू परी's picture

24 Sep 2014 - 9:23 pm | पियू परी

पैसाताई मलासुद्धा भयंकर कसंतरी झालं ती क्लीप बघुन. :(

vikramaditya's picture

24 Sep 2014 - 7:59 pm | vikramaditya

पोलीसांना बोलवायला पाहीजे हे बरोबरच आहे. परंतु बरेचदा ते सुद्धा ज्याला आपण 'ईल प्रीपेअर्ड' म्हणतो तसे असतात. म्हणजे उदा. अतिरेकी येणार एके-४७ घेवुन आणि आपले पोलीस बिचारे एक काठी घेवुन उभे.

वाघासमोर तावडीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे ज्ञान/ प्रशिक्षण सुरक्षा दला कडे असेल का हा वेगळाच विषय आहे. आपल्याकडे बरेचदा अपघातग्रस्तांना हातगाडी वर टाकुन नेले जाते.

ह्या शिवाय, वर्षानुवर्षे पिंजर्यात कोंडलेल्या असहाय्य प्राण्यांना बघायला जाणा-या लोकांचे वर्तन भयानक असते.
दगड, ब्लेड पासुन सगळ्या वस्तु प्राण्यांवर फेकल्या जातात. असा आपला बहुसंख्य क्राउड असतो.

कंजूस's picture

24 Sep 2014 - 8:28 pm | कंजूस

आता एक भिती आहे. त्याला माणसाच्या रक्ताची चव लागलीय. तो धोकाधायक होऊ शकतो.

हाडक्या's picture

24 Sep 2014 - 8:51 pm | हाडक्या

भौ.. स्पार्टकस भाऊंचा 'शिकारीच्या संदर्भातली लेख-मालिका व्यर्थच म्हणायची का ?
आता त्या वाघाला मारण्याची मागणी नको येऊ दे म्हणजे झाले.

भिंगरी's picture

5 Oct 2014 - 12:56 am | भिंगरी

जब जानवर कोई इंसान को मारे
कहते है दुनियामे,बेहशी उसे सारे.
(किती निरपराध जनावरांचे जीव माणसाने घेतले आहेत)
चुप क्यूं है संसार?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Sep 2014 - 1:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या तरूणाचि मानसिक स्थिती ठीक नव्हती असे वाचले इंग्रजी पेपरात.भविष्यात हे प्रसंग कसे टाळता येतील ह्यावर मिपाकरांनी चर्चा करावी.

ह्म्म... आज ती क्लीप पाहिली, दगड मारल्यावर वाघ बिथरला ! लोखंडाची जी जाळी आहे ती सहज ओलांडुन जाता येइल अशी दिसत आहे ! निदान माणसांना, लहान मुलांना सहज ओलांडुन जाता येइल अशी जाळी नसावी !

बाकी असे अनेक व्हिडीयो पाहिले आहेत, खुप वर्षांपूर्वी Eugene Armstrong नावाच्या अमेरिकन सैनिकाचे शीर धडा वेगळे करण्याचा व्हिडीयो कोणी तरी मला पाठवला होता { तो व्हिडीयो पाहण्याच्या आधी तो कशाचा आहे हे माहित नव्हते}, तो पाहिल्या नंतर २ दिवस मला धड झोप आली नव्हती !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

शिद's picture

26 Sep 2014 - 11:56 pm | शिद

1

पुण्याच्या सर्पोद्यान्यात देखील असेच आहे. सुसरी आणि सापांच्या पिंजरे तर असे आहेत की कडेवर बसलेला मुलगा टुणकन ऊडी मारुन आत जाईल. मी मागेच जॅकडीं.ना त्याबद्द्ल विचारणार होतो.

जॅक डनियल्स's picture

5 Oct 2014 - 12:36 am | जॅक डनियल्स

जेंव्हा तुम्ही कुठल्या पण सार्वजनिक ठिकाणी जातात तेंव्हा तुमची काही तरी जवाबदारी असते. म्हणजे उदा. लग्नाला जाताना चांगले कपडे घालून जायचे, मयताला जाताना साधे जायचे.
त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही प्राणीसंग्रहालयात जातात तेंव्हा तुम्ही जवाबदारी ने वागला तर कडे वरचा मुलगा सुसरीच्या खड्यात पडणार नाही. लहान मुले वाकून पडणार नाही एवढी सगळ्या भिंतीची उंची आहे. अजगर-मगर-घोणस यांचे पिंजरे लोकं किडे करतात म्हणूनच बंद आहेत. प्राणीसंग्रहालयात पाळायचे जे काही नियम असतात ते जर पाळले तर अपघात होणार नाहीत.

हुप्प्या's picture

28 Sep 2014 - 10:14 pm | हुप्प्या

एखाद्या कागदाला (वर्तमानपत्र वगैरे) आग लावून तो पिंंजर्यात टाकला असता तर कदाचित वाघ घाबरुन पळाला असता. दगडापेक्षा आगीला तो जास्त घाबरतो असे वाटते. अर्थात ही पश्चात बुद्धी झाली.

मेघना मन्दार's picture

1 Oct 2014 - 12:36 pm | मेघना मन्दार

वाघ म्हण्जे काय कुत्रा आहे का दगड मारुन त्याला पळ्वायला किन्वा लक्ष दुसरीकडे वळ्वायला?? वाघाच्या टेरिट्रि मध्ये अचानक कोणि माणुस आला तर तो सुद्धा बावचळ्ला असेल. वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2014 - 3:01 am | प्रभाकर पेठकर

>>>>वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

हो! दगड मारले नसते तर, उगीच थोडा वेळ, त्या तरूणाशी गुदगुल्या गुदगुल्या खेळून, कंटाळून, वाघ गेला पण असता.

तो शक्य तितका त्याच्या कंफर्टझोनमधे आलेल्या अनाहूत पाहुण्याशी इंटरेक्षन टाळतच होता तो मुला पेक्षा जास्त गोंधळला असावा आणि पब्लिक कडून अनावधानाने त्याचा गोंधळ भीतीमधे बदलेल आशा प्रकारची कृती घडली दोष पब्लिकच्या इच्छेचा नाहिये पण जसे म्हणतात ना Person shouldn't be known by his intention but by the results of his action....that's what really counts.

जॅक डनियल्स's picture

5 Oct 2014 - 1:21 am | जॅक डनियल्स

मी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हाच मला जाणवले होते की १००% मुलाची चूक आहे. संग्रहालयातील प्राण्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्यांना फक्त १-२ माणसांची जवळून सवय असते, एक खाणे देणारा आणि दुसरा पिंजरा साफ करणारा. साधारण पणे सगळे पांढरे वाघ हे प्राणी संग्रहालयात च लहान चे मोठे झालेले असतात. (म्हणजे पिल्लू आणले जाते आणि मग ते वाढवले जाते. ) त्यांना फक्त त्यांना दिलेले खाणे (जिवंत नाही- मासाचे तुकडे ) शांतपणे खाणे याचीच सवय असते. त्यामुळे हे प्राणी त्यांच्या कीपर बरोबर शांत पणे राहतात कारण त्यांना त्यांची सवय असते. जर कोणी डॉ. आमटे चे नेगल वाचले असेल किंव्हा त्यांचे व्हिडीओ पहिले असतील तर त्यांना कल्पना येइल. पण त्यांच्या पिंजऱ्यात कुठली पण परकीय गोष्ट आली तर (खार, कुत्रा, माणूस इ. ) तर ते बावचळून जातात, त्यांना नक्की काय करायचे ते समजत नाही, ते त्यांच्या "कमफ़र्त झोन च्या" बाहेर असते.

खूप लोकं जेंव्हा प्राणी संग्रहालयात जातात तेंव्हा त्यांचे डोके घरी ठेवून जातात, प्राणी झोपला आहे त्याला दगड मार, काठीने त्याला ढोस, आवाज काढ असले प्रकार करतात . मी स्वतः खूप लोकांना या वरून शिव्या दिल्या आहेत. सर्पोद्यान मध्ये दगड मारण्याऱ्याला दंड करायचो आणि जर पैसे नसतील तर भर चौकात उठाबशा काढायला लावायचो. खूप सारी लोक पोरींना इम्प्रेस करायला अनेक गोष्टी करतात , मी एका मुलाला दंड केला होता कारण तो त्याच्या छावीला इम्प्रेस करायला सुसरीच्या जाळीवर चढला होता.

लोकं जर थोडे विचार करून प्राणी संग्रहालयात वागले तर अश्या गोष्टी होणार नाहीत . दुसऱ्या लोकांच्या घरी जाताना जसे आपण सभ्य पणे वागतो तसे च जर प्राणी संग्रहालयात वागलो तर प्राण्यांना पण त्रास कमी होइल.

vikramaditya's picture

8 Oct 2014 - 4:28 pm | vikramaditya

असो वा पुरातन किल्ले / वास्तु, आपले लोक खरच डोके घरी ठेवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नुकसान करण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही त्यांना झापल्याचे वाचुन फार बरे वाटले. एकंदरीतच बाहेरीलही भटक्या पशु-पक्षांना त्रास देणा-यांना आमचा ग्रुप जोरदार झापतो. बेअक्कल लेकाचे!

अर्धवटराव's picture

5 Oct 2014 - 10:28 am | अर्धवटराव

आपला बेशिस्तपणा आपल्याला जिथे तिथे नडतो. एक माणुस बिचारा हकनाक मेला... त्याची चुक होतीच, पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. . रस्त्यांवर तर आपण सर्कस करतोच; जत्रेत, इस्पीतळात, बस-ट्रेनमधे, आणि आता प्रत्यक्ष वाघाच्या पिंजर्‍यात... अवघड आहे.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 10:47 am | प्रभाकर पेठकर

>>>>पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच.

म्हणजे नक्की काय?

आता, प्रत्यक्ष त्या प्रसंगापासून इतक्या दूर सुरक्षित वातावरणात, आपल्या नजरेसमोर कोणी मरत नसताना, आपल्याला (त्यात मीही आलोच) बरेच शहाणपण सुचू शकते पण तिथे समोर मृत्यूचा खेळ चालू असताना, आपले हातपाय गळाल्या अवस्थेत त्या तरुणाला वाचवण्यासाठी वाघाचे लक्ष विचलीत करणे, त्याच्या सावजा वरून हटविणे हे 'प्रथमोपचारासारखे' वाटले असल्यास लोकांना दोष देता येणार नाही असे मला वाटते. फक्त एव्हढ्या गर्दीत अशा प्रसंगातही आगीचा प्रयोग कोणी केला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तसा केला असता तरीही वाघ आपल्या सावजाला घेऊन त्या घोळक्यापासून दूर आंत गेला असता आणि तो प्रयोगही फसलाच असता. पण उतावळेपणे वागून तो जमाव जाणूनबुजून त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे चित्र उभे करणे अन्यायकारक ठरेल.

अर्धवटराव's picture

6 Oct 2014 - 8:35 pm | अर्धवटराव

उतावळेपणा म्हणता येईल, जाणुनबुजुन नाहि म्हणता येणार. नक्की काय करायला हवं होतं हे मी खात्रीने सांगु शकत नाहि. पण असा बाका प्रसंग उभा राहिला असताना ( प्रसंग इतका खतरनाक अजीबात नव्हता) आम्हि सर्वप्रथम शक्य तितके कमरेचे पट्टे आणि तत्सम गोष्टी एकत्र करुन पिडीत व्यक्तीला वर ओढण्याचे प्रयत्न केले आहेत.

सदर घटनेत नेमकं काय करायला हवं होतं हे सांगणं कठीण आहे. इथे रेस्क्युचा स्कोपच फार कमि आहे. पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

vikramaditya's picture

8 Oct 2014 - 4:38 pm | vikramaditya

पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

पर्फेक्ट.

प्रसाद१९७१'s picture

8 Oct 2014 - 5:18 pm | प्रसाद१९७१

कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

"थोडा" ह्या शब्दाला आक्षेप आहे.