रटाळ 'फायंडिंग फॅनी'

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
22 Sep 2014 - 2:22 pm

हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण! :-(

---------------------------------------------------------------------------------

'फायंडिंग फॅनी' या नावाचा चित्रपट येऊ घातला आहे असं जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं तेव्हा मला वाटलं जगमोहन मुंदडा ('कामसूत्र' फेम), कैझड गुस्टाड (द ग्रेट 'बूम' फेम) सारखे उद्बोधक चित्रपट काढणार्या एखाद्या धीट दिग्दर्शकाचा हा पुरुष आणि स्त्री यांच्यातल्या शारिरीक आकर्षणावर गूढरम्य, गंभीर, आणि भावनिक भाष्य करणारा एक बेफाम चित्रपट असावा. 'फॅनी'चा स्लँग अर्थ तसा भलताच असल्याने माझा असा समज झाला. पुढे वाचलं की यात दीपिका, अर्जुन, पंकज, नसीरुद्दीन, डिंपल असे कलाकार आहेत. मग बुचकळ्यात पडलो. पण मनात म्हटलं का नाही? व्हाय नॉट? 'बूम'मध्ये जर अमिताभ बच्चनसारखा अभिनेता असू शकतो तर 'फायंडिंग फॅनी'ने असं काय 'तोंड काळं' केलं असावं की त्यात आघाडीच्या अभिनेत्यांनी काम करू नये. शक्य आहे. पण दीपिका? छे छे...काहीतरीच काय? नंतर कळलं की तो होमी अदजानिया नावाच्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मी त्याचा 'बीईंग सायरस' पाहिला होता. ठीक होता. 'कॉकटेल' पाहण्याची अजिबात इच्छा झाली नव्हती. पण त्यातल्या "सेकंड हँड जवानी" गाण्यात दीपिका आवडली होती. पोस्टर्सवरून चित्रपट वेगळा असल्याची जाणीव झाली. दीपिकाचे फोटोज सुरेख होते. पंकज कपूर 'चमेली की शादी'मध्ये आवडला होता. त्यानंतर कुठे कधी नीटसा भेटलाच नाही. नाही म्हणायला 'जाने भी दो यारो', 'एक रुका हुआ फैसला' वगैरे होते पण ते मेनस्ट्रीमचे चित्रपट नव्हते. 'चमेली की शादी'मध्ये तो जाम सही होता. नसीरुद्दीन शाह तर उत्तम आहेच. पण त्याला कॉमेडी जमणार का हा प्रश्न पडला. 'हीरो हिरालाल', 'जाने भी दो यारो' मध्ये वगैरे त्याने थोडी कॉमेडी केली होती पण ती अगदीच तोंडी लावण्यापुरती.

गेल्या शनिवारी संध्याकाळी कंटाळा आला होता. मोबाईलवरुनच तिकीट बुक करून टाकले. मोठ्या अपेक्षेने थेटरात जाऊन बसलो. आधी १०-१५ मिनिटे क्रॉसवर्डमध्ये जाऊन भारी भारी इंग्रजी पुस्तके हातात धरून शायनिंग मारली. कोथरूडच्या सिटी प्राईडमध्ये शनिवारची रात्रीची ९ वाजताची वेळ! प्रेक्षक छान नटून-थटून आले होते. एक मंद सुगंध मनाला प्रसन्न करत होता. दुसर्या दिवशी रविवार असल्याने सगळे निवांत होते. 'हिरवळ' सोडा; आख्ख्या सिटी प्राईडमध्ये जणू 'एकर्स ऑफ लॉन' अवतरली होती.

चित्रपट सुरु झाला. गोव्यातले कुठलेतरी पूर्ण ख्रिश्चन लोकवस्तीचे छोटेसे गाव. दीपिकाचा आवाज येत असतो. ती गाव आणि तिथल्या लोकांविषयी सांगत असते. सुरुवातच धाडकन आपटली होती. अतिशय संथ, निरुत्साही, आणि कंटाळवाणी सुरुवात होती. नंतर हळूहळू कॅमेरा नसीरुद्दीनच्या घरात शिरतो. नसीरुद्दीन शक्य तेवढ्या विचित्र वेषभूषेत काहीतरी करत असतो. इथे 'पेस्तनजी'ची आठवण होते. अत्यंत गचाळ घर! गोगलगायीपेक्षाही संथ गतीने नसीरुद्दीन हालचाली करत असतो. दाट रात्र झालेली असते. इथेच पहिली जांभई डोळ्याच्या कडा ओलावून गेली. पहिली सलामी! चित्रपटाचा वेग सेट झाला होता; मूड सेट झाला होता. काही वेळाने नसीरला एक पत्र येतं. आणि नसीर जोरात हंबरडा फोडतो. आसपासच्या घरातले दिवे लागतात. त्याने कधीकाळी (४७ वर्षांपूर्वी) एका मुलीला प्रेमाची कबुली देणारं पत्र पाठवलं असतं आणि ते तिला न मिळता ४७ वर्षांनी नसीरला परत मिळतं. तो दु:खी होतो. तिला आपलं हृदय कळलंच नाही. आणि आपण ती नाही म्हटली असंच समजून इतकी वर्षे जगत होतो असं वाटून नसीर निराश होतो. कॅमेरा संथपणे फिरतोय. नसीरदेखील संथपणेच हलतोय. संवाद अस्पष्ट आहेत.

गावात डिंपल ही विधवा तिच्या विधवा सुनेसोबत राहत असते. दीपिकाचा नवरा रणवीर सिंग हा लग्नाच्या समारंभातच मृत्यू पावतो. तेव्हापासून या दोघी एकत्र राहत असतात. गावात एक चित्रकार (पंकज) राहत असतो. दीपिकाला काहीच कामधंदा नसल्याने तिच्या मनात नसीरची ४७ वर्षांपूर्वी हरवलेली प्रेयसी शोधायला जाण्याची खुमखुमी येते. रटाळपणाचा कहर! दुसरी तगडी जांभई! विचित्र पार्श्वसंगीत वाजतेय. अर्जुन कपूर गावात आलेला असतो. त्याला दीपिकाने सोडलेलं असतं. म्हणून तो रागावलेला असतो. दीपिका घरचं कार्य असल्याप्रमाणे पंकज, नसीर, अर्जुन यांच्या गळी आपली 'फॅनी'ला शोधायला जाण्याची कल्पना उतरवते. सगळे तयार होतात. डिंपल आपल्या मांजरीला घेऊन येते. आणि ते पाचही नग एका अत्यंत घाणेरड्या गाडीत बसून या आगळ्यावेगळ्या सहलीला निघतात. मी जांभया मोजणं एव्हाना बंद केलंय.

सगळे गाडीत बसून प्रवास करत असतात. मध्येच मांजरामुळे नसीरला शिंका येतात. मग तो मांजराला मांडीत ठेवतो. ते त्याच्या नको त्या भागाला कडकडून चावा घेतं. प्रेक्षक हीहीही करून हसतात. तो ते मांजर उचलून खिडकीच्या बाहेर फेकतो आणि झाडावर आपटून ते मांजर मरतं. माझं डो़कं गरगरायला लागलं होतं. बायको खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे बघत होती. तिला हा चित्रपट पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. नावावरूनच तिला हा पिक्चर टुकार आणि कंटाळवाणा असणार याची खात्री वाटली होती. मी खूपच आग्रह करून तिला जवळपास खेचून आणलं होतं. घरी गेल्यावर आपलं काही खरं नाही याची खात्री मला पटली.

नंतर अचानक पेट्रोल संपतं. लांबचा ग्रामीण भागातला प्रवास आहे; पेट्रोलची सोय असली पाहिजे वगैरे साधा विचार कुणीच करत नाही. एरवी मोबाईलचा चार्ज संपल्यावर लोकं घाबरतात. दूर आडरानात पेट्रोल संपलं तरी हे पाचही जण ओक्के असतात. झाड शोधतात. पंकज तिथेच डिंपलला कपडे बदलायला लावून तिचं चित्र काढतो. डिंपल अतिशय भयानक कपडे घालून विचित्र अशी पोझ घेऊन उभी राहते. पंकज तिचं अत्यंत घाणेरडं चित्र काढतो. इथे मला पश्चात्तापाचे कढ यायला सुरुवात झाली होती. सहाशे वीस रुपयांच्या नोटा वाकुल्या दाखवायला लागल्या.

इकडे दीपिका आणि अर्जुन रंगात येतात. अंधार पडतो. डिंपल झाडाखाली पसरते. नसीर आणि पंकज तिच्या उशा-पायाशी बसतात. म्हटलं आता हे यांचं काही दाखवतात की काय म्हणून मला घाम फुटला. पण दिग्दर्शकाला थोडी तरी अक्कल असल्याचे जाणवते. डिंपल अस्ताव्यस्त पसरलेली असते. इकडे दीपिका आणि अर्जुन आधी भांडतात. अर्जुन लघुशंका करत असतांना दीपिका त्याच्याजवळ येऊन थांबते. मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय. पण तसं काही होत नाही. ती अगदी जवळ येऊन त्याला विचारते, "क्या कर रहे हो?". खरं म्हणजे हे कार्य करणारा पुरुष मागून जरी पाहिला तरी तो काय करत असावा याचा अंदाज येतोच. उभं राहण्याची ती ढब सगळं शब्दावीण सांगून जाते. पण दीपिका त्याच्या जवळ जाऊन त्याने तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या झिपकडे बघत 'ओह सॉरी' असं अगदीच कॅज्युअली म्हणते. इतकं क्यॅज्युअली की आपला कुणाला चुकून हलका धक्का लागल्यावर आपण कसे सॉरी म्हणू, अगदी तस्सं! अर्थातच तो एक सिग्नल असतो. ग्रीन सिग्नल. मग अर्जुन तिचं एक दीर्घ चुंबन घेतो. आणि ती भडकते. का? कळत नाही. आणि मग डायरेक्ट ते झुडुपामध्ये जातात. झुडुपात जे जे करण्यासारखं असतं ते ते सगळं घडून जातं.

असं सगळं कसं आनंदात चाललेलं असतं. कुणाला काहीच टेंशन नसतं. मध्येच केव्हातरी ते फॅनीच्या जुन्या पत्त्यावर जातात. तिथे एक विचित्र माणूस काहीबाही बडबडतो. मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो. मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. मग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श...

रटाळपणाचे सारे विक्रम 'फायंडिंग फॅनी' ने मोडीत काढले असावेत. अत्यंत मंदगती, कंटाळवाणे लांबलचक प्रसंग आणि संवाद, कळकट नसीर आणि पंकज (किती वेळा यांना असं बघायचं?), मध्येच विनाकारण पार्श्वभागावर टर्रकन फाटलेला झगा दाखवणारी डिंपल, अत्यंत फालतू कथा, अत्यंत नीरस सादरीकरण, ठिगळं लावल्यासारखे जोडलेले असंबद्ध प्रसंग (नसीरच्या शिंका, मांजरीचा चावा फॉलोड बाय मृत्यू, तिचा दफनविधी, डिंपलचे चित्र, अर्जुनची सूसू, प्रेतयात्रा, इत्यादी), कंटाळवाणी पटकथा, 'आता पुढे काय होणार' अशी पुसटशीही जिज्ञासा प्रेक्षकांना वाटू नये ही लेखक-दिग्दर्शकाने घेतलेली खबरदारी...काही विचारू नका.

आता मला खूप मोठी जांभई यायला लागली आहे. पुरे करतो. चित्रपट अजिबात बघू नका. त्यापेक्षा गुगलवर दीपिकाचे छान छान फोटो बघा, 'सागर' आणि 'जानबाज'मधल्या डिंपलला आठवा, आणि पैसे वाचवा!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

22 Sep 2014 - 2:36 pm | धर्मराजमुटके

तुम्ही चित्रपटाला रटाळ म्हटल्यामुळे मला हा चित्रपट पाहायची कोण उत्सुकता लागून राहिली आहे. मला रटाळ चित्रपट फार आवडतात. नक्कीच पाहिला जाईल. धन्यवाद !

अस्वस्थामा's picture

22 Sep 2014 - 2:40 pm | अस्वस्थामा

अहाहा ..! काय ते शाल जोडीतले देताय हो. पुणेकर पण लाजतील राव.. :)

मार्क ट्वेन's picture

22 Sep 2014 - 9:15 pm | मार्क ट्वेन

असेच म्हणतो. आता फाईंडिंग फॅनी आवर्जून पाहीन. शॉशँक रिडेम्प्शन, ड्रायव्हिंग मिस डेझी, फँड्री असे काही 'रटाळ' चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले आहेत.

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 9:29 pm | पिंपातला उंदीर

अधिक ११११११११

सुहास..'s picture

22 Sep 2014 - 2:37 pm | सुहास..

वाचले !!

मृत्युन्जय's picture

22 Sep 2014 - 2:38 pm | मृत्युन्जय

क्रिटिक्सनी चांगले म्हटले की मला अशीही चित्रपट् बघायची भिती वाटते. तुमच्या परीक्षणाने न बघण्याची इच्छा दृढ केली.

विनंतीला मान देऊन परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

सिनेमा रटाळ का असेना पण तुमचे परीक्षण खुमासदार झालं आहे हे नमूद करतो.

मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय.

=))

सस्नेह's picture

22 Sep 2014 - 5:27 pm | सस्नेह

अ

या गाण्याचा अर्थ काय ?

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:52 pm | टवाळ कार्टा

"देवाने शिक्षा करण्यासाठीच निर्माण केलेला अवयव व्यासपीठावर हलवा"

काउबॉय's picture

22 Sep 2014 - 3:22 pm | काउबॉय

=))

xD xD xD

वेल्लाभट's picture

22 Sep 2014 - 3:07 pm | वेल्लाभट

फॅनी मिळो न मिळो; तुमचा 'सूर' मात्र क्लास लागलाय!

सूड's picture

22 Sep 2014 - 3:30 pm | सूड

अरसिक किती हा मेला !! ;)

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 3:37 pm | प्यारे१

@ समीरसूर,

परिक्षण लिहीताना देखील कंटा़ळलेले होतात वाटतं. असे चित्रपट झोडायची संधी असतात ना?
की दीपिकाच्या एकंदर चांगल्या दिसण्याबद्दल माफी दिलीत?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो.http://www.sherv.net/cm/emo/laughing/happily-laughing-smiley-emoticon.gif मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifमग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श... http://www.sherv.net/cm/emo/laughing/small-laughing-smiley-emoticon.gif
=================
हल्ली प्रेक्षकांना पोस्टर आणि ठरवलेली वादळं/वाद दाखवून गंडवूनच फक्त पैसा कमविण्याचा बाजारबसव्या धंदा या फिल्लिम लाइननी सुरु केलेला आहे. मराठी चित्रपटही अगदी तंतोतंत अनुकरण करत आहेत. नाटकांमधेही हीच प्रवृती मूळ धरु पहातीये. त्यामुळे शिनेमाचा कचकाऊन फॅन असूनही मी गेली ३ वर्ष या सगळ्याला जवळ जवळ राम..,राम केलेला आहे.
===========
नागेश कुकनूर,गोविंद निहलानी
यांच्या अस्सल सिनेमांचा कट्टर फ्यान- आत्मू

मी डाउनलोड करून पहिला तरी एवढा पकलो , पळवून पळवून पहिला

तुम्ही चक्क पैसे मोजलेत ..... __/\__

चित्रपट पाहून शेवटी हातात काहीच पडत नाही

चित्रपट पाहून शेवटी हातात काहीच पडत नाही

अश्लील, अश्लील ;)

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 4:00 pm | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

@अश्लील, अश्लील>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/flashing-happy-face-smiley-emoticon.gif

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2014 - 6:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

"वाचाल तर वाचाल"...आता हे परीक्षण वाचल्यामुळे चित्रपट बघण्यापासुन वाचलो

पण तिला थोपवलं. तुझं परिक्षण वाचून धन्य झालो!

बरं झालं कळवलत. आता बघणार नाही. तशीही उत्सुकता नव्हतीच!

तिमा's picture

22 Sep 2014 - 8:48 pm | तिमा

मला आवडला बुवा! कारण मला संथ सिनेमेच आवडतात.

मला पण, (मी पाह्यलेल्या) कोकणातलं लाईफ तसं एरवीही निवांतच असतं की!! आता तो निवांतपणा परफेक्ट कॅप्चर केला म्हणून कौतुक करायचं की मुव्ही रटाळ म्हणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

माझ्याही एका मित्राला हा चित्रपट प्रचंड आवडला.
आमच्यासोबत आमचा अजून एक मित्र होता. मी कंटाळून मोबाईलवर एकशे चाळीस रुपयांचा कालापव्यय करत असताना आमचा तिसरा मित्र झोपला होता.

मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.

>>केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.

धन्य तो मित्र, धन्य ते मित्रप्रेम! =))

मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.

खी: खी: खी: =))

पैसा's picture

24 Sep 2014 - 3:23 pm | पैसा

एकशे चाळीस रुपये कोणी दिले? माझा गेल्या पुणेवारीतला चहा अजून मिळायचा आहे! ;)

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 3:27 pm | प्यारे१

दर्पण सुंदरी आरशात बघताना हळूच तिच्या बटव्यातून काढून घेतले असणार. :)

बॅटमॅन's picture

24 Sep 2014 - 3:56 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

दर्पणसुंदरीच्या बटव्यातून गद्याणक चोरताना वल्लीला पाहून 'हायस्स हस्तसमस्स' करणारी दर्पणसुंदरी एकदम डोळ्यांसमोर आली ;)

प्रचेतस's picture

24 Sep 2014 - 7:29 pm | प्रचेतस

=))

>>एकशे चाळीस रुपये कोणी दिले?

सगळं टीटीएमेम!! ;)

समीरसूर's picture

26 Sep 2014 - 11:07 am | समीरसूर

सूड

निवांतपणाच्या बाबतीत मला 'चितचोर' आवडतो. अगदी आरामत सगळं चालू असतं. शिवाय बघतांना उत्सुकता असतेच. मला फॅनीच्या बाबतीत ती उत्सुकता जाणवलीच नाही. शिवाय बहुतेक वेळ अंधार, अंधुक अशा फ्रेमस असल्याने चित्रपटाचा मूड उदासीन होतो. नसीरचा तो घाणेरडा मेकप, घाणेरडं घर, संथ हालचाली, दम नसलेली कथा...बघवत नाही अक्षरशः. 'चितचोर' किंवा 'कथा' किंवा 'छोटी सी बात' हे चित्रपट संथ होते पण कथा आणि पटकथा दोन्ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतात. फॅनीमध्ये हे काहीच नसल्याने तो प्रसन्न निवांतपणा नीट कॅप्चर होत नाही. इन फॅक्ट, तो निवांतपणा जाणवतच नाही. हाच निवांतपणा 'हम आपके है कौन?' मध्ये देखील चांगला कॅप्चर केला होता. त्यात माधुरीचे नितळ सौंदर्य होतेच. 'पेस्तनजी' मध्ये भुसावळचा निवांतपणा मस्त वाटला होता. तो ही चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. असो.

पैसा's picture

26 Sep 2014 - 11:20 am | पैसा

मग तर हा चित्रपट अत्यंत यशस्वी म्हटला पाहिजे. तुला माहित नाही, खेड्यातले कंटाळलेले लोक खरेच असे घाणेरडे रहात असतात. त्या पात्राच्या आयुष्यात काहीही प्रसन्नता नाहीये, विचित्रपणा भरला आहे हे उत्तम दाखवले आहे. गावांत काम करताना असले नमुने भरपूर पाहिले आहेत. नक्की कारण काय माहित नाही, पण गोव्यातल्या ख्रिश्चन लोकांच्यात तर्‍हेवाईकपणा, लग्न न करता रहाणे, आत्महत्यांचं जरा जास्त प्रमाण, घाणेरडी ठेवलेली घरं, डुकरं पाळलेली, असं खूप काही पहायलां मिळतं. खरं तर चर्चमधे गेलं तर उदासच वाटतं. मग देवळांत गर्दी नसेल तर छान प्रसन्न वाटतं. यात कोणी कृपया धार्मिक रंग शोधू नये, सहज जे जाणवलं ते बोलले आहे.

समीरसूर's picture

27 Sep 2014 - 9:17 am | समीरसूर

पण हे सगळं उदासवाणं कंटाळवाणं चित्र बघायला रु. ६२० घालवले याचं वाईट वाटतंय हो. :-) हे तर काय कुठेही सहज बघता येतं. दिग्दर्शकाच्या दृष्टीने तो स्वतः यशस्वी झाला असेल पण बॉक्स ऑफिसवर आदळली ही कंटाळकथा! :-)

मला जे काही म्हणायचंय ते त्यातलं बरंचसं पैसातैंच्या प्रतिसादात आलंय. मी आधी म्हटलं तसंच निवांतपण, तर्‍हेवाईकपणा हे अगदी परफेक्ट पकडलं म्हणूनच मला आवडलं.

नसीरच्या घाणेरड्या मेकअपबद्दल म्हणाल तर काही अपवाद सोडले उतरत्या वयाचा सडा फटिंग माणूस टापटीप दिसायचा खटाटोप कशाला करेल? पण प्रेयसीला शोधायला निघताना तो शक्य तितका कूल दिसायचा प्रयत्न करतो हेही लक्षात आलं असेलच.

तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that. :)

समीरसूर's picture

27 Sep 2014 - 9:21 am | समीरसूर

जाऊ द्या, नसीर कसा का दिसेना, दीपिका कशी दिसली आहे हे महत्वाचं. ती लखलखत्या सुवर्णमुद्रेसारखी दिसली आहे हे खरं. :-)

तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that.

करेक्ट! महाराष्ट्रातले नेते आपल्यासारखे समजुतदार असते तर आजचा महाराष्ट्र दीपिकेच्या लखलखत्या सौंदर्याप्रमाणेच सतेज राहिला असता. असो. ते आपल्या हातात नाही.

भृशुंडी's picture

30 Sep 2014 - 1:22 am | भृशुंडी

अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे.
आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही?
"कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात.

समीरसूर's picture

1 Oct 2014 - 10:45 am | समीरसूर

अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे.

पण जे इन्डोअर्स प्रसंग आहेत ते बहुतेक सगळेच उदास करणार्‍या अंधूक प्रकाशात आहेत. ते बाहेर मुक्काम ठोकतात त्या प्रसंगांमध्येदेखील अंधार, संध्याकाळच जास्त आहे.

आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही?

समारंभ होता पण सगळं कसं निवांत होतं. कुठेच घाई नव्हती. सगळे मिळून गप्पा मारतायेत; अंताक्षरी खेळतायेत. रामटेकडीच्या मंदिरात अनुपम खेर निवांतपणे कचोर्‍या तळतोय, मैफिली चालू आहेत...मला तरी या सगळ्यांत एक मस्त निवांतपणा जाणवला..निरर्थक घाई नाही.

"कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात.

'कथा' संथच वाटतो; अर्थात त्याच्या गतीमुळे त्यातल्या मनोरंजनमुल्याला कुठेच धक्का लागत नाही हे ही खरे. कासवाच्या गोष्टीवर आधारित असल्याने संथपणा बर्‍याच अंशी 'कथा'चा गाभा होता. 'छोटी सी बात' मध्ये निवांतपणा पुरेपूर होता. आणि तो अजिबात कंटाळवाणा किंवा उदासवाणा वाटत नाही. आणि 'चितचोर' तर खूपच निवांत होता. अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात.

'फॅनी' मात्र पुरताच फसलाय. ना धड निवांत, ना धड उत्साहवर्धक, ना धड ग्लॅमरस...असं सगळं कडबोळं झालंय 'फॅनी'चं. असंबद्ध प्रसंगांना जोडून साकारलेली बेंगरूळ कंटाळकथा असंच 'फॅनी'चं वर्णन करावं लागेल.

ताजा कलमः 'फॅनी'चं आतापर्यंतचं कलेक्शन २८ कोटी रुपये झालं आहे. २९ कोटीवर जाऊन 'फॅनी' चा व्यवसाय संपणार असा जाणकारांचा होरा आहे. 'हिट' होण्यासाठी (म्हणजे खर्च निघून वितरकांना थोडा नफा मिळण्यासाठी) 'फॅनी'ला कमीत कमी ४० कोटींचा व्यवसाय करणं आवश्यक आहे. आणि ते अशक्यच दिसतंय! :-)

अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात. >>>

+१

कपिलमुनी's picture

8 Oct 2014 - 3:59 pm | कपिलमुनी

आंजा वर तर बजेट १२-१५ कोटी आहे असा लिहिला आहे आणि विकि वर http://en.wikipedia.org/wiki/Finding_Fanny कलेक्शन ४२ कोटी झलाय ..
खखोदेजा

समीरसूर's picture

8 Oct 2014 - 4:12 pm | समीरसूर

मी आकडे जालावरच पाहिले होते (बॉक्सऑफीसइंडिया). अर्थात ते एक आठवडा आधीचे होते. अर्थात ही माहिती अचूक मिळणे अजूनही थोडे कठीणच आहे. त्यामुळे खरंच खखोदेजा..

सुहास झेले's picture

22 Sep 2014 - 9:55 pm | सुहास झेले

मला ही आवडला.... :)

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 9:47 pm | प्रचेतस

आम्ही तिघं मित्र गेलो होतो.
एकाला सिनेमा प्रचंड आवडला. त्यातल्या विनोदांना खदखदून हसत, मध्येच कोंकणी भाषेतले शब्द उच्चारत तो हा सिनेमा एकटकपणे पाहात होता, दुसर्‍या मित्राने सुरुवात कशीबशी पाहिली नंतर मात्र कंटाळून मोबाईलवर मिपा, वास्सप आणि फेबु बघत बसला. माझी मात्र छान झोप झाली.

तुम्ही म्हणे तेव्हा "मेझ रनर" च्या ट्रेलरवर समाधान मानलेत. आणि तुमच्या त्या मित्रांनी तुमच्यासोबत "मेझ रनर" पाहण्याचे कबूल केले असे ऐकून आहे. :)

प्रचेतस's picture

23 Sep 2014 - 9:10 am | प्रचेतस

अगदी अगदी.
पण मेझ रनर बहुधा टुकार असेल असे मला वाटतेय. काहीशा अशाच थीमवर आधी हंगर गेम्स सारखे सिनेमे येऊन गेलेत.
मी खर्‍या अर्थाने वाट पाहतोय ती नोलनच्या 'इंटरस्टेलर' आणि पीटर जॅक्सनच्या 'द हॉबिटः बॅटल ऑफ फाइव्ह आर्मिज' ची.

सिनेमाच माहित नाही.परिक्षण मात्र मनोरंजक...

इष्टोरी इतकी फालतू असली तरीही अर्जुन कपूर सोडल्यास स्टारकास्ट माझ्या आवडीची आहे.

दीपिका = दिसण्यासाठी आणि कमनीय बांध्यासाठी.
पंकज कपूर = फक्त अभिनयासाठी.
नसिरुद्दीन शहा = अभिनयासाठी
डिम्पल = या वयातही दिसण्यासाठी. (कमनीय बांधा हा भूतकाळ झाला.)

अर्जुन कपूरचा का माहित नाही पण प्रचंड म्हणजे काय च्या कै राग येतो. म्हणजे उलटा टांगून मारावासा वाटतो. पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 11:32 am | टवाळ कार्टा

पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.

ती वडीलांच्या "वळणावर" गेली आहे का??? ;)

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 11:39 am | खटपट्या

काहीतरीच काय ? माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर"

मदनबाण's picture

25 Sep 2014 - 10:52 am | मदनबाण

माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर"

१००% सहमत ! ;)
S

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

समीरसूर's picture

26 Sep 2014 - 11:16 am | समीरसूर

श्रद्धा कपूर आजच्या जमान्याची सोनाली बेंद्रे आहे काय? किंवा अजून मागच्या जमान्याची विद्या सिन्हा? अर्थात तिचा अभिनय खचितच सोनाली बेंद्रेपेक्षा उजवा आहे. 'आशिकी २' मध्ये मला आवडली होती ती. पण तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते. जे अमृता राव, अमृता अरोरा, तारा शर्मा, नेहा धुपिया, सोहा अली खान, अनिता राज, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, इशा देओल, भूमिका चावला, स्नेहा उल्लल, सोनम कपूर अशा तमाम नट्यांमध्ये कधीच नव्हते नेमके ते श्रद्धामध्ये देखील नसावे असे वाटते. ज्याला 'उम्फ' किंवा 'अपील' म्हणता येईल अशा एका हिंदी नट्यांमध्ये आवश्यक असणार्‍या आकर्षणमुल्याची गोष्ट करतोय मी.

प्यारे१'s picture

26 Sep 2014 - 4:03 pm | प्यारे१

ह्यालाच 'अभ्यासू' प्रतिसाद म्हणतात का? :)

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 4:39 am | खटपट्या

खरे आहे तुम्चे. अजुन ती "निरागस" मोड मधुन बाहेर आलेली नाहीय...

काउबॉय's picture

27 Sep 2014 - 11:11 am | काउबॉय

अर्थात 3पत्ती बघितल्यावर हेच विचार आले होते जे आशिकी व एक विलन बघितल्यावर विर्घळुन गेले. नई हय वोह.

तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते
हेच ते! काहीतरी खटकतय त्या श्रद्धाच्या डोळ्यात/चेहर्‍यात!

काउबॉय's picture

30 Sep 2014 - 1:34 am | काउबॉय

तिची ऐश्वर्या बनू नये इतकीच अपेक्षा आहे.

अवांतर :- अभिनय कौशल्य राहुदे पण फक्त बोलके डोळे मधुबाला, श्री देवी, जेनेलिया, व श्रध्दा कपूर यांचेच आहेत. यांच्या डोळ्यात अखंड बघत रहावेसे वाटते.

श्रद्धा कुपरच्या डोळ्यात मठ्ठ भाव आहेत असे नाही का वाटत?

रेवतीताई आजकालच्या नट्यांकडून आपण अभिनयाची अपेक्षा करावी का ?

रेवती's picture

24 Sep 2014 - 7:44 pm | रेवती

हम्म्म...

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 12:33 pm | प्यारे१

तुम्ही 'एक व्हिलन' बघावा अशी तुम्हाला णम्र विणंती. :)

खटपट्या's picture

25 Sep 2014 - 10:40 am | खटपट्या

'एक व्हिलन' हा चित्रपट सुरु केला. मोजून २० मिनिटे बघितला आणि माझा धीर सुटला. चित्रपट बंद करून मस्तपैकी टोम एंड जेरी बघून झोपी गेलो.

प्यारे१'s picture

25 Sep 2014 - 12:20 pm | प्यारे१

तेच तर चुकलं ना तुमचं. अजून थोडा बघायला हवा होता. ;)

सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे राव. कथेसाठी कोण बघायला सांगतंय?
हिंदी चित्रपटांमध्ये कथा, अभिनय वगैरे विचारात घ्यायचं नसतं ह्या मतावर मी आलेलो आहे.

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 4:37 am | खटपट्या

असे आहे होय. पर्त बघतो की, जातोय कुटं ? बगुन सान्ग्तो ....

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर

रेतवी (अर्थात रेवती),

ती 'श्रद्धा कूपर' नाही, 'श्रद्दा कपूर' आहे, हे सहज कळावे.

काका, ते मुद्दाम लिहिले आहे.

पैसा's picture

23 Sep 2014 - 2:42 pm | पैसा

परीक्षण आवडलं. सिनेमा ठीक आहे. गोव्यातल्या टिपिकल झोपाळू श्टाईलने जातो. सुशेगात!

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2014 - 11:49 am | चौथा कोनाडा

मस्त परिक्षण ! आवडले. सिनेमा बघतानाचा कंटाळा लेखनात पुरेपुर उतरलाय !त्या करती शंभर पैकी एकशे साडेतीन गुण ! सिनेमा कदाचित चांगला असावा. असल्या सिनेमा साठी निवांत पणा पांघरून ट्यून व्हायला पाहिजे ! ना.कुकनूरचा "मोड" सुद्धा निवांतच होता. लोकाना झेपला नाही म्हणतात !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Sep 2014 - 1:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

किती निर्मात्यांना आयुष्यातुन उठवणार आहात अजुन =)) ?

उत्खनक's picture

24 Sep 2014 - 3:13 pm | उत्खनक

संथ आहे आणि बहुदा त्यामुळेच रटाळही वाटत राहतो.
अभिनयाच्या बाबतीत तर नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल यांना खरंच सलाम!

मधूनच थोडासा ब्लॅक कॉमेडीच्या जवळ जाणारा प्रकार आहे.
उदा: पंकजकपूर जे चित्र काढतो त्याआधीचे त्याचे वागणे आणि नंतरचा एकदम आलेला रिलक्टन्स अन् तुसडेपणा.. आणि त्यात काहीही न बोलता बरेच काही बोलून जाणारी डिंपलची देहबोली.. हा प्रकार एखाद्या व्यक्तीला हव्यासाने वापरून फेकून दिल्यासारखे दर्शवतो..!

ठीक वाटला. :)

हाडक्या's picture

24 Sep 2014 - 8:45 pm | हाडक्या

बाकी चालू द्या.. पण ते धाग्याचे शीर्षक तेवढे मजेदार हो..
ते मी दोन तीन वेळा रायडींग फॅनी असं वाचलं चुकून... *lol*

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 3:02 pm | बॅटमॅन

त्या शीर्षकाजवळ Brazzers असा बॅनर नै ना दिसला खाली कुठे ? ;)

सूड's picture

26 Sep 2014 - 3:46 pm | सूड

>>Brazzers असा बॅनर नै ना दिसला खाली कुठे ?

__/\__ मान गये, आप और आपकी पसंद !! ;)

गप्रांव मेल्या! (बरोबर जमलं का?)

जसे काय खट्याळ आम्रविकेला नाकंच मुरडतोस किनै ;)

काउबॉय's picture

30 Sep 2014 - 10:12 am | काउबॉय

=)) =))

सूड's picture

30 Sep 2014 - 7:05 pm | सूड

>>खट्याळ आम्रविकेला

हायला!! कुठून सुचतं रे बाबा एकेक भाषांतर.

हाडक्या's picture

26 Sep 2014 - 4:01 pm | हाडक्या

श्शी अचरत बावलत.. *lol*

मुक्त विहारि's picture

30 Sep 2014 - 12:57 am | मुक्त विहारि

तुम्हाला आणि सर्व प्रतिसादकांना....

चित्रपट थोडा कंटाळवाणा होतोच, पण उत्तरार्धात.
परीक्षण सिनेमापेक्षा रटाळ वाटलं. असो.

समीरसूर's picture

1 Oct 2014 - 10:02 am | समीरसूर

परीक्षण रटाळच होतं. एकदम कबूल! मलाच नंतर वाचवलं गेलं नाही. :-) एका बैठकीत लिखाण नाही झालं तर असा विचका होतो. म्हणूनच लिखाणाच्या आधीच क्षमा मागून घेतली. :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 6:16 pm | निनाद मुक्काम प...

पद्मिनी कोल्हा पुरे तिची मावशी
मराठी व पंजाबी मिक्स तडका
आपल्याला बुआ आवडते , किंबहुना ती दैव व नशिबाला अधिक आवडते. ते तिच्यावर फिदा आहे.
आता हैदर येत आहे.
फेनी हा मल्टी प्लेकस च्या लोकांसाठी बनविलेला शिनेमा
तो इंग्रजी मधून पाहण्यात खरी गंमत
बॉलीवूड शिनेमा इंग्रजीत पाहणे रोचक वाटले , त्याचे हिंदी वर्जन पकाऊ वाटते असे वाचून व ऐकून आहे.
एक प्रयोग म्हणून दीपिकाने आपल्या कारकिर्दीच्या उभरत्या काळात ह्या सिनेमाला निवडल्याचे कौतुक वाटते.
मागच्या वर्षी तिच्या सिनेमांनी ५०० कोटीचा धंदा गेला.
अवांतर
शक्ती मुलांच्या सोबत युकेत पंचतारांकित हॉटेलात मला भेटला होता , ही गोष्ट २००४ ची तेव्हा नुकतेच त्याचे स्टिंग गाजले होते.
त्यांचे मुलगा मुलगी अतिशय साधे होते व ह्याच्या तेथे माकडचाळे चालू होते , दोन्ही मुलांनी मी मराठी आहे हे कळल्यावर अस्स्खलित मराठीतून माझ्याशी संवाद साधला तेव्हा कोल्हा पुरे कनेक्शन माहिती नसल्याने मी तीन ताड उडालो होतो.
अभिनेत्री यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ महत्वाची
माधुरीचे व अभिताभ चे सुरवातीचे ८ ते १० सिनेमे तद्दन बकवास
मग अचानक त्यांच्यात ष घुसला की काय
नशिब बलवान तो गधा भी पेहेलवान
अवांतर
ह्या वर्षी ष बहुदा दिपिकेच्या पत्रिकेत आला असावा.
शशी चा पेइङ्ग गेस्ट पण इंग्रजीत झ्याकपाक वाटला होता.

.

षक्ती कपूर एकंदरीतच घाणेरडा आहे. मलाही तो एयरपोर्टावर दिसला होता. त्याच्या स्टींग ऑपरेशनबद्दल काही माहित नव्हते. आता माहित झाले. काय अचरट मनुष्य आहे! बायकोने त्याची खेटराने पूजा बांधायला पाहिजे.

सूड's picture

1 Oct 2014 - 7:13 pm | सूड

आमची श्रद्धा मात्र भांगेच्या जुडीत तुळस सापडावी तशी आहे बरं !! सगळ्या सुंदर मुलींचे तीर्थरुप असेच असतात, डोक्यावर पडलेले!! ;)

आतातरी तुझी 'सुंदर मुलगी हवी' ही अट बदलणारेस का? ;)

लग्न मुलीशी करायचंय की तिच्या बापाशी, त्यावर बहुधा बदलणे- न बदलणे अवलंबून असावेसे वाटते. चॉईस अपना अपना.

सूड's picture

8 Oct 2014 - 6:28 pm | सूड

ब्याट्याच्या या असल्या हुश्शारीचं आपल्याला नेहमीच कवतिक वाटतं ब्वॉ!!

सूडक्या, संदर मुलीबरोबर विचित्र बाप फ्री! फ्री! फ्री! तुला चालत असेल तर एकच का, दहा सुंदर मुली तुला सांगून येतील.

प्यारे१'s picture

9 Oct 2014 - 8:59 pm | प्यारे१

खरंय.

श्रद्धा कितीही चांगली असली तरी तिचा शक्ती कपूर चांगला असणंसुद्धा समाजात आवश्यक असतंय.

तुमचा अभिषेक's picture

9 Oct 2014 - 8:51 pm | तुमचा अभिषेक

दोन टोकाची परीक्षणे आणि मते येत आहेत या चित्रपटाला ..

गेले दोन आठवडे पेन ड्राईव्हमध्ये पडलाय.. बघावे की न बघावे :(

तुमचा अभिषेक's picture

9 Oct 2014 - 8:54 pm | तुमचा अभिषेक

बाकी चित्रपट जर खरेच रटाळ असेल तर परीक्षणाने नेमका मूड पकडलाय ..
म्हणजे रटाळपणा छान उतरलाय अशी कॉम्प्लइमेंट आहे ही :)