मि. इंडिया की लडकी का खून पाकिस्तानी?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
22 Sep 2014 - 2:40 am
गाभा: 

मिस्टर इंडियाची भूमिका गाजवणार्‍या अनिल कपूरसाहेबांच्या कन्यारत्न सोनम कपूरने असे विधान केले की माझे दोन्ही आजोबा पेशावरमधे वाढले म्हणून माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्तच आहे.
सोनमताईंचे इतिहासाचे आणि मानवी जीवशास्त्राचे ज्ञान अफाट असले पाहिजे. बाईंचे नाना आणि दादा कुठल्या कारणाने भारतात पळून आले हेही माहित करून घेतले असते तर बरे झाले असते. तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे? तिथे सोनम कपूरसारखी अल्पबुद्धी, अल्पवस्त्री, अधर्मी महिला वावरत असेल तर तिच्या नसानसातले पाकिस्तानी खून किती वेळात पाकिस्तानी धरतीवर सांडेल ह्याची कल्पना आहे का?
असो. एक मनोरंजक बातमी वा पब्लिसिटी स्टंट म्हणून ह्याकडे बघायला हरकत नाही.

http://www.financialexpress.com/news/i-have-pakistani-blood-in-my-veins-...
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4699769566636656834&Se...

प्रतिक्रिया

मारवा's picture

22 Sep 2014 - 6:28 am | मारवा

सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे
आपला
धार्मिक मारवा

पोटे's picture

22 Sep 2014 - 1:23 pm | पोटे

आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत.

सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात

अहो पेशावरातल्या लोकांच्या दॄष्टीने ती अधर्मीच नाही का?

हुप्प्या's picture

22 Sep 2014 - 8:17 am | हुप्प्या

सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा.
http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-an...

पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.

पोटे's picture

22 Sep 2014 - 9:49 am | पोटे

म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का?

माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Sep 2014 - 9:57 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2014 - 10:19 am | पिवळा डांबिस

आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं
तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!!
सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय...
पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही...
टीआरपी?

पिडांकाका असं खिंडीत गाठू नक्का गडे.
=))

सुहास..'s picture

22 Sep 2014 - 2:47 pm | सुहास..

असेच म्हणतो ..

सोनमने ( अकलेचे) तोडले आणि काकानी झोडले तर कुठ जायच ;)

हुप्प्या's picture

24 Sep 2014 - 10:23 am | हुप्प्या

अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे?
सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.

पिवळा डांबिस's picture

29 Sep 2014 - 9:50 am | पिवळा डांबिस

अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे

व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Sep 2014 - 12:49 pm | पुण्याचे वटवाघूळ

माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या.

आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.

काळा पहाड's picture

22 Sep 2014 - 12:58 pm | काळा पहाड

अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Sep 2014 - 4:49 pm | पुण्याचे वटवाघूळ

रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.

हुप्प्या's picture

24 Sep 2014 - 10:27 am | हुप्प्या

सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो.
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Sep 2014 - 9:22 pm | पुण्याचे वटवाघूळ

सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?

एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.

हुप्प्या's picture

28 Sep 2014 - 10:29 pm | हुप्प्या

आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही.
तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा.
जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.

एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Sep 2014 - 1:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.

पोटे's picture

22 Sep 2014 - 8:03 pm | पोटे

पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ?

मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .

नाव आडनाव's picture

22 Sep 2014 - 8:24 pm | नाव आडनाव

मीठ पण पा़किस्तानी खाल्लं होतं का?

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 8:32 pm | टवाळ कार्टा

एकीच मारा पर क्या सॉलीड मारा \m/

पोटे's picture

23 Sep 2014 - 10:18 pm | पोटे

तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?

एस's picture

22 Sep 2014 - 1:06 pm | एस

यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!

हुप्प्या's picture

24 Sep 2014 - 10:29 am | हुप्प्या

आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 1:03 pm | दिपक.कुवेत

खूप आवडते विशेषत बिकिनीत.... मग तिच्यात कुठल्या ठिकाणाचं रक्त का असेना!!!

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 2:26 pm | बॅटमॅन

आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल.

तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा.

एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:39 pm | टवाळ कार्टा

पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात

तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;)
मुविकाका आले की जळवणार नुस्ते

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 2:47 pm | बॅटमॅन

पर्शिया म्हणजेच इराण हो. :)

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:56 pm | टवाळ कार्टा

हैला...गलतीसे मिश्टेक हो गया...

पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात

आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत

तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)

मदनबाण's picture

22 Sep 2014 - 3:24 pm | मदनबाण

नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 3:33 pm | बॅटमॅन

ओह अच्छा. धन्यवाद!!

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 7:15 pm | टवाळ कार्टा

हैला...फुल्टू फटाका

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2014 - 9:53 am | प्रसाद गोडबोले

*man_in_love*

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>>

य्या...य्या रे य्या य्या....! http://www.pic4ever.com/images/loveshower.gif त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? http://www.pic4ever.com/images/14.gif

लोकल सिनेमांमध्ये काम करतात की.

इतर ठिकाण साठी काम करायला बहुधा परवानगी नाहीये.

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:50 am | खटपट्या

मधुबाला तिकडचीच होती का ? जाणकारांनी भर टाकावी ?

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 11:01 am | पिवळा डांबिस

मधुबाला तिकडचीच होती का ?

ती पठाण होती इतकंच माहिती आहे....

जाणकारांनी भर टाकावी ?

कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!!
:)

बॅटमॅन's picture

28 Sep 2014 - 10:44 pm | बॅटमॅन

आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.

@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात
(फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 3:46 pm | दिपक.कुवेत

कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 3:52 pm | बॅटमॅन

च्यायला. याद मत दिलाओ.......

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 3:58 pm | टवाळ कार्टा

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Sep 2014 - 9:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :)

प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप

आबा's picture

22 Sep 2014 - 4:15 pm | आबा

अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...

आबा's picture

22 Sep 2014 - 4:41 pm | आबा

#उपपंतप्रधान

या ठिकानी हीच इणंती करन्यात येत हाये. आमच्या प्यानलवर सोनलतैंना घ्येट्लंच पायजे!

आशु जोग's picture

22 Sep 2014 - 4:33 pm | आशु जोग

मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !

मदनबाण's picture

22 Sep 2014 - 8:48 pm | मदनबाण

पर्शिया म्हणजेच इराण हो.
बॅट्या... तुझी ही प्रतिक्रिया वाचता क्षणीच मला हे गाणं आठवलं, कारण अप्सरा पर्शियन क्लासिक डान्स करण्यात माहिर आहे... खरं तर हा व्हिडीयो योगा-योगा ने सापडला... कुठे तरी एक ट्युन ऐकली होती, कुठे ते नक्की आठवत नाही, परंतु.... ती ट्युन ऐकताच माझ्या लक्षात आले की हे गाणे मी आधी कुठे तरी ऐकले, शेवटी तू-नळीवर शोध घेताना ते गाणं सापडलं ! तसेच मूळ गाणं शोधताना हे देखील सापडलं. :)
गाणं होत, बंद कमरे में प्यार करेंगे. ;)
मूळ गाण्याचा दुवा :- http://www.youtube.com/watch?v=KP5Bb43NsyA

आता ते गाणं...

गाण्याचा पहिला भाग कदाचीत रटाळही वाटु शकेल पण, ३:०२ पासुन बंद कमरे में प्यार करेंगे सुरु होत,आणि प्रचंड मेहनत घेतल्यावरच जे टायमिंग जमतं ते ४:४२ ते ४:४४ मधे कळुन येते. म्युझिकच्या येणार्‍या एका बीट वर योग्य वेळी अंग हलवणे हे वाटतं तितक सोप्प नाही ! अप्सरा नावा प्रमाणेच दिसायलाही सुंदर आहे, हे काही वेगळ्याने पटवुन द्यायची गरज नाही. नंतर कदाचित विसरुन जाईन म्हणुन आजच इथे पोस्टवुन टाकला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

बॅटमॅन's picture

28 Sep 2014 - 10:46 pm | बॅटमॅन

वा व वा...धन्यवाद!!!

बाकी, अमाल अमालुद्दीन ही आमच्या तत्रस्थ लावण्यप्रेमाचे ताजे कारण आहे.

हे पाकिस्तानप्रेम खरच आहे काहो हुप्प्यासाहेब?
भारतात आणि भारताबाहेरून जिथून मिळेल तिथून ती मुल्गी तिची गुंतवणूक वसूल करायला बघतीये. तो व्य्वसायाचा भाग झाला.

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 11:08 pm | प्यारे१

अहो काही नाही हो, खुबसूरत नावाचा सिनेमा होता ना रेखाचा तिचा रिमेक काढलाय. त्यात रेखाचा रोल ही करतेय. आणि तिच्या नवरा / बॉयफ्रेन्डच्या रोल मध्ये आहे एक पाकिस्तानी कलाकार.

'कवतुक' नको करायला???

हुप्प्या's picture

24 Sep 2014 - 10:33 am | हुप्प्या

बाईसाहेब, माझा असा काही गैरसमज नाही. सदर बाईचे विधान हे उथळ आणि अविचारी आहे असे माझे मत. त्यावर दोन घटका करमणूक ह्यापलीकडे माझा काही उद्देश नाही. सोनमताईंना भारत वा पाकिस्तान दोन्ही देशांच्या राजकीय वा सामाजिक स्थितीत फार काही गम्य असेल असे मला वाटत नाही.
ह्या गोष्टीशी मी १००% सहमत की हा निव्वळ प्रसिद्धीकरता केलेला उपद्व्याप आहे.

भृशुंडी's picture

29 Sep 2014 - 1:12 am | भृशुंडी

१. सोनम कपूर (बिनमिशीचा अनिल कपूर भाग २) चा नवा चित्रपट खूबसूरत येतोय...आलाय.
२. त्यात तिच्याबरोबर फवाद खान नामक पाकिस्तानी हिरो आहे.
३. येनकेनप्रकारे चित्रपटाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवून पहिल्या ३ दिवसांत पैसा वसूल करून घ्यायचा आहे.

हे सगळं माहिती असूनही अशा वक्तव्याला किंमत देऊन त्यावर चर्चेची अपेक्षा आहे काय?
everyone involved has to participate in the structured propaganda & PR. एवढं साधं आहे.
पण कुठेही 'पाकिस्तान' म्हटलं की आपल्या आतल्या अँटीना जागृत होतात बहुतेक.