PLATONIC व्याभिचार- तोल सांभाळुन घसरण्यातला आनंद !

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
22 Sep 2014 - 1:11 am
गाभा: 

माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. तर हे मला फ़ारच आश्चर्यजनक वाटले मी सात्विक संतापाने मित्राला विचारले की अरे जर तीला नव्हताच इंटरेस्ट तर विषय मुळात इतका वाढवलाच का आणि इतक्या वेळ स्पर्श तरी का चालवुन घेतला ? तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ? तर या मागे एक फ़ार विशीष्ट अशी मानसिकता असते. तर या विषयी आमच्या चर्चेतुन जे काही मला उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक सुंदर इंग्रजी शब्द आहे प्लॆटॉनिक लव्ह हा शब्द थोर तत्वज्ञ प्लेटो याच्या नावावरुन बनलेला आहे. याचा अर्थ होतो अशरीरी कृतिहीन प्रेम उदात्त प्रेम अथवा देवदासी निस्सीम वासनाहीन प्रेम. आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार तर याचा अर्थ असा की व्याभिचार हा नेहमीच कृती त व्यक्त होत नाही निव्वळ मानसिक पातळीवर ही अनेकदा व्याभिचार केला जात असतो. तर अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. मात्र कृती करणं त्या कटाक्षाने टाळतात म्हणजे कल्पनेच्या घोड्याला त्या बेलगाम उधळु देतात मात्र कृतीचा लगाम घट्ट हाती धरुनच. या स्त्रीयांना आपल्या मागे पुरुष पागल होतात ( वा आपण केव्हाही कुठल्याही वयात कुणालाही पागल करु शकतो) ही कल्पनाच प्रचंड एक्सायटींग असते. मात्र अर्थातच पुढची पायरी गाठण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. असे का होते ? त्या अस का करतात ?
यामागे अनेक घटक कार्यरत आहेत, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेणीवेवरील नैतिकतेचा प्रचंड दबाव. धर्म समाज कायदा सर्व बाजुंनी व्याभिचार हा कीती वाइट आहे पाप आहे याच सतत केल जाणार हॆमरींग ! त्यामुळे आज फ़िर जीने की तम्मना है आज फ़िर मरनेका इरादा है किंवा मी कात टाकली पर्यंतचा बेभान हिंमतीचा टप्पा त्यांना व्याभिचारात गाठता येत नाही. म्हणजे अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होतो, सर्व काही तोडुन मोकळं व्हावस ही वाटतं पण मग तो आवेग ओसरल्यानंतर मन स्वत:च्या नैसर्गीक उर्मींना कुरतडु लागत. मग नेणीवेवरील दबाव कार्यरत होतो. आता या घुसमटीतुनच एक विलक्षण दांभिकता जन्म घेते एक आत्मवंचनेचा नविन प्रवास सुरु होतो.
तो असा की या स्त्रीया एक नविन मार्ग चोखाळतात. त्या अगोदर आवडलेल्या पुरुषाला आव्हान देतात त्याला इनव्हाइट करतात एक्साइट करतात. यामध्ये तो पुरुष जसजसा पागल होत जातो जसा त्या स्त्रीला प्रेज करु लागतो तशा त्या याच गोष्टीचा आनंद घेतात. एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात. कारण त्यांना मुळात पुढे जायचच नसत. त्यांना तोच तितकाच चरीत्र वाचवुन आनंद ही देणारा मर्यादीत व्याभिचार च हवा असतो. त्यात काय नाहि मिळत ?
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो. शिवाय अशा अनुभवाच्या रीफ़्रेशमेंट नंतर मुळ विवाहातही परतल्यावर दिर्घ बदलीच्या सुटीनंतर रहाटगाडग्याला जोडुन घेतानाचा आनंद उपभोगता येतो. या खेळा तला पुरुष मात्र मुर्ख च असतो त्याला तोंडी आलेला घास गमावण्यातला चडफ़डाट केवळ भोगावा लागतो.
पण मग यातुन स्त्री ला एक अमर वेदना ही प्रत्ययास कधी कधी येत असावी की आपण झोकुन देउ शकत नाही प्रेम प्रवाहात आपण वाहु शकलो नाही याची देखील बोच तर असेल ? माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही.
सध्या चरीत्रहीन मित्रा शी चर्चे च्या माध्यमातुन अजुन बरेच काही समजुन घ्यायचे आहे..

प्रतिक्रिया

कथा कुणाची व्यथा कुणाला. ;)

खटपट्या's picture

22 Sep 2014 - 2:57 am | खटपट्या

कुठे भेटेल हा तुमचा मित्र ??
एक डाव वळ्ख करूनच द्या राव...

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 6:29 am | अत्रुप्त आत्मा

+१ ;-)

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 11:10 am | दिपक.कुवेत

नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 8:24 am | खटपट्या

:)

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 6:50 am | चित्रगुप्त

त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.

आपले डोळे पारच दिपून गेलेले दिसतायत त्या प्रखर प्रकाशझोतात!

त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?

+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला.
लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.

केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.

विलासराव's picture

22 Sep 2014 - 9:55 am | विलासराव

माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे.

मग हा उपद्व्याप हा?

तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही.

मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव

धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये.

मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच.

बाकी चालू द्यात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2014 - 3:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

मराठीत "अनुनय "

बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही.

"अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता"

"अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत"

"मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"

नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.

स्पा's picture

22 Sep 2014 - 10:20 am | स्पा

200 नक्की

नानासाहेब नेफळे's picture

22 Sep 2014 - 11:03 am | नानासाहेब नेफळे

स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो ,त्यामुळे ठराविकच नव्हे, तर प्रत्येक स्त्री प्लेटोकाकांची पुतणी असते.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 11:22 am | टवाळ कार्टा

वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना??
तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)

मृत्युन्जय's picture

22 Sep 2014 - 11:22 am | मृत्युन्जय

स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो

तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय?

काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही..

बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.

सुबोध खरे's picture

22 Sep 2014 - 11:53 am | सुबोध खरे

मजेदार
सावकाश प्रतिक्रिया लिहितो

काउबॉय's picture

22 Sep 2014 - 11:58 am | काउबॉय

हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 12:20 pm | कवितानागेश

बरं मग? :)

नानासाहेब नेफळे's picture

22 Sep 2014 - 12:28 pm | नानासाहेब नेफळे

तर काय!

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 12:33 pm | बॅटमॅन

शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

नाखु's picture

22 Sep 2014 - 12:35 pm | नाखु

अपे़क्षेची उपेक्षा का उपेक्षीत ...

पायजे ते घ्या ओ. कुठलाही अर्थ घेतला तरी त्याने के एल पी डी का टळणारे? ;)

सौंदाळा's picture

22 Sep 2014 - 1:42 pm | सौंदाळा

के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

HMT, A.B.C.D, JAPAN

या पामरास पण सांगावे

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 2:07 pm | प्यारे१

आयडी बदल लेका. नुस्ता आयडी घेऊन कुणी टवाळ बनत नस्तंय. ;)

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:37 pm | टवाळ कार्टा

चायला मी शॉर्ट्फॉर्मस वापरत नाही...जो है वो है

हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 3:27 pm | हाडक्या

+१ हेच म्हणतो.. आम्हाला पण व्यनि करावा .. ;)

प्रमोद देर्देकर's picture

22 Sep 2014 - 5:06 pm | प्रमोद देर्देकर

+२
हेच म्हणतो अम्हाला पण व्य.नि. करावा.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 7:05 pm | टवाळ कार्टा

ज्ञानकण वाटलेले आहेत ;)

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 10:18 pm | हाडक्या

धन्स..

ते कण जरा आमच्यापत्तुरबी पोचु द्या.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:12 pm | टवाळ कार्टा

लोल...मिपावार धत्तुरा पण नाही मिळणार

सौंदाळा's picture

22 Sep 2014 - 1:37 pm | सौंदाळा

'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' नाटक दाखवा तुमच्या मित्राला.

विलासराव's picture

22 Sep 2014 - 1:40 pm | विलासराव

मुद्दलातच घोळ दिसतोय.

आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार.

आता झाले का सगळे सोपे?

आंबट चिंच's picture

22 Sep 2014 - 2:32 pm | आंबट चिंच

गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>

ही ह्ही ह्ही खि क

हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला

ब्र मगची

कॅसेट लावली आहेस.

@ नाना ने:-

स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.

. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

आनन्दा's picture

22 Sep 2014 - 2:40 pm | आनन्दा

. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

खिक्क!

आंबट चिंच's picture

23 Sep 2014 - 8:27 am | आंबट चिंच

खिक काय मी मध्यस्ती वापरतो म्हणजे थेट भेटत नाही असं म्हाणायचं होतं मला.
बाकी चालु द्या.

सुहास..'s picture

22 Sep 2014 - 2:41 pm | सुहास..

ओक्के !! तिला दाखवितो धागा ;)

तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला.

स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 6:52 pm | कवितानागेश

तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे -

when does a woman owe you sex?

मूळ स्रोत -
When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

काउबॉय's picture

22 Sep 2014 - 7:21 pm | काउबॉय

इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.

तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही.
स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच
मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे )
ढळतांना जे अडखळले
ते फुल च असते सडले

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 8:37 pm | कवितानागेश

ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही.
प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं
तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.

स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात?

दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!

या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो.
<< स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 10:31 pm | चित्रगुप्त

काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.

तिमा's picture

23 Sep 2014 - 10:03 am | तिमा

आमचे हे, असले ओढे बारा महिने दुथडी भरुन वहात असतात.

जेनी...'s picture

29 Sep 2014 - 9:04 am | जेनी...

=))

या धागा लेखातली काही वाक्य उलट्या क्रमानी लावली तर धागा लेखक म्हणतो त्या पेक्षा चित्र जरास वेगळ दिसत का ? स्त्रीला परस्पर्ष केव्हा स्विकार्य वाटतात हा सरळ प्रश्न आहे का आधी

यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो

वसुली हा शब्द देण लागण्याशी असतो. लीमाउजेट यांनी देण = To owe च्या संबंधाने उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटत नाही का ? कोणत देण लागतात अस धागा लेखक अथवा त्यांच्या तथाकथित मित्राच मत आहे. या वाक्य ज्यावर दिलय तो आधीचा परिच्छेद पुन्हा खाली देतो

अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.

हि गरज वासनेची नाही भावनेची आहे हे जर धागा लेखकाच्या तथाकथित ज्ञानी मित्रास ठाऊक आहे तर ........ आता अजून एक आधीच वाक्य वाचा

तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही.

गरज शारिरीक नव्हे मानसिक आहे याचं चारित्र्य(वान/हिन) गृहस्थास ज्ञान असूनही उपरोक्त वाक्यातला नेहमीप्रमाणे हा शब्द लगट करणे हा सवयीचा भाग असल्याचे सुचीत करत नाही का ? यात मोकळेपणाने बोलणारी अथवा फ्लर्टींग करणारी स्त्री अतृत्प असते हे पहिल गृहीत धरणं आहे; स्त्रीयांना पुरुषांनी पुढाकार घेऊन केलेला स्पर्ष आवडतो हे न लिहिलेल अध्याहृत गृहीत धरण हा यातला दुसरा भाग आहे. धागा लेखक अथवा त्यांचा मित्र स्त्रीयांना केव्हा आणि कोणते स्पर्ष स्विकार्य असतात हा प्रश्न लेखात विचारत नाहीत तर त्यांना ते हवं असत हे गृहीत धरताहेत किंवा कसं ?

याला कायदे विषयक चिकित्सक नजरेनी पाहील तर आधी करून नंतर स्त्रीयांना हे हवच असत वाली सारवासारव आहे ? का व्हिक्टीम ब्लेमींग (मराठी शब्द ?) ?

तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ?

इथे नेमकी कुणाची मानसिकता तपासण्याची गरज आहे आधी करून नंतर व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍यांची का स्त्रीयांची ? असे प्रश्न उपस्थित करणार्‍या बद्दल हे काय म्हणत असतील याची सध्या कल्पनाच करतो आहे

आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार

म्हणजे जी स्त्री यांच्या ज्ञानी मित्रांशी ते म्हणतात तसे केवळ भावनिक गरजे पोटी मोकळे पणाने बोलते ती एनकेन प्रकारेन व्याभिचारी या शिक्क्याची धनी आहे आणि त्यांच्या वसुली साठी देणं लागते, प्लेटॉनिक टॉक करणार्‍या बहुसंख्य स्त्रीया नकार देत असूनही अतृप्त स्त्रीयांना तृप्तता देण्याच महनीय समाज कार्य यांचा ज्ञानी मित्र पुन्हा पुन्हा करत राहतो , धागा लेखक इतर प्रतिसादकांना हे ही पटवून देऊ पाहतोय की हे आजीबात विनोदी नाहीए हे गंभीर आहे का विनोदी हे स्पष्ट करण धागा लेखकालाच शक्य आहे हे निश्चित

धागा लेखातील एका परिच्छेदाकडे अनुषंगिक अवांतर चर्चेसाठी आपण पुन्हा येऊ

अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.

अशाच प्रकारच्या परिच्छेदात समकक्ष लेखन अमुक एका समुदायाच्या स्त्रीया अतृप्त असतात आणि त्यांना तृप्त करण्याची स्वाभाविक जबाबदारी तमुक समाजानी पार पाडली पाहीजे अशा स्वरूपाच लेखन करणारा कुणी समकालीन समाजोद्धारक या निमीत्ताने आठवतो का ? जस्टीफिकेशन काय तर अमुक समाजाच्या लोकांनी तमुक समाजाच्या बद्दल यापुर्वी अशीच कथा लिहिली ते लिहू शकतात तर आम्ही का नाही ? एकाने चूक केली म्हणून दुसर्‍याच्याही चुकीचे समर्थन होते आणि तेही असाहाय्य स्त्रीयांच्या शरीराचे बळी देऊन ? हा विशिष्ट प्रसंगही सोडून द्या हि एक्सक्युजेस (कि गद्धेगाळी ?) सर्वच प्रकारच्या समाजांच्या धर्मांच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांकडून विवीध संघर्षात आपला अहंकार का सोय जपता येणारा सोपा स्त्रीयांना व्हिक्टीम बनवण्याचा मार्ग स्विकारून पुन्हा व्हिक्टीम ब्लेमींग करत असतात आणि पुन्हा उजळ माथ्याने समर्थनही केले जाते ? लीमाउजेटांनी उल्लेख केलेल्या चार्टात समुहसंघर्षातून स्त्रीया देणे लागतात का याचा अद्याप उल्लेख नसावा तसेही To owe आणि To own यातला फरक न समजणार्‍यांसाठी कुणीतरी तो चार्ट उपरोक्त भारतीय संदर्भांनी मराठीत बनवणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते

स्त्रीयांना स्पर्ष केव्हा स्विकार्य असतात या बद्दल चर्चा करा प्लॅटॉनिक गोष्टींबद्दल प्लॅटॉनिक चर्चा करण्याची भूक अवश्य भागवून घ्या. स्वयंनिर्णय घेण्यास पात्र दोन वयस्क व्यक्ति आपापसात परस्पर अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा आदर करून काय संबंध परस्पर स्थापित करतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्या बद्दल चर्चा करा ना नाही; परंतु हा विशीष्ट धागा लेख काही वेगळेच सुचीत तर करत नाही ना असे वाटल्याने चिकित्सा केली. कदाचित तसे नसेलही. धागा लेखक आणि इतर वाचक हो चु.भू दे.घे.

पैसा's picture

23 Sep 2014 - 10:35 am | पैसा

प्रतिसाद आवडला. आशयाशी संपूर्ण सहमत आहे.

लेखाचे अगदी वेगळे आणि मूलगामी विश्लेषण!! सुरेख!!

गूड वन .... स्त्री हा विषय का वाटतो कोण जाणे ...
सविस्तर प्रतिसाद सावकाश लिहिन ...

अजया's picture

23 Sep 2014 - 9:42 am | अजया

माहितगार, एक स्त्री असूनही एवढा समर्पक प्रतिसाद लिहिता अाला नसता!धन्यवाद!!

सुबोध खरे's picture

23 Sep 2014 - 10:53 am | सुबोध खरे

आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता.
असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती.
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही.
याचे कारण त्या दोघांच्या कामवासनेत असलेला फरक असावा. तिने यासाठी मला आणि माझ्या बायकोला डॉक्टर म्हणून सल्ला सुद्धा विचारला होता. यामुळे वरील वर्णन हे अतिरंजीत आहे असे मला वाटत नाही. मुळात असा फरक (mismatched libido) हा थोड्या फार प्रमाणात १०० टक्के जोडप्यात असतो. आणि याला वाट करून देणे हे तितके सोपे नाही. बरेचसे पुरुष यासाठी पोर्नोग्रफिचा आधार घेतात.काही थोडे बाहेरख्यालीपणा वेश्यागमन इ इ करतात. पण तसा आधार स्त्रियांना सहज उपलब्ध नाही आणि समाजमान्य सुद्धा नाही. मग त्या असा कुठेतरी आधार शोधू पाहतात. अर्थात हि सर्व गृहीतके आहेत प्रत्येक प्रकरणी असेच असेल असेही नाही. स्त्रीला प्रत्येक वेळेस संभोगसुखच हवे असेल असे नाही तर साथीदार हवा असेल मानसिक आधार हवा असेल. आणि त्याचा सार्थ बरेच पुरुष तिला शरीरसुख हवे असा काढतात आणि म्हणून जेंव्हा ती स्त्री एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाण्यास नकार देते तेंव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादी स्त्री त्याचा हात हातात घेते याचा अर्थ ती शेवटपर्यंत जायची इच्छा ठेवते असा असतो.
जात जाता एक किस्सा-- मी लष्कराच्या कोर्स साठी लखनौ ला गेलो असता तेथे आम्हाला एक आठवडा कॅम्प साठी एका माळरानावर पाठविले होते. त्यात एक दिवस पौर्णिमा होती. तेंव्हा माझ्या वर्गातील एका मुलीने मला रात्री फिरायला चल म्हणून विनंती केली. (तिचा प्रेमविवाह झालेला होता आणि तिचा नवरा आम्हाला चार वर्षे वरिष्ठ होता आणि लष्करातच होता.) आम्ही कॅम्प च्या बाजूला फिरायला गेलो असता मी तिला विचारले कि तू मला फिरायला चल असे का म्हणालीस.( आम्ही एम बी बी एस ची साडेचार वर्षे एकत्र होतो त्यामुळे तेवढा मोकळेपणा होता). त्यावर ती मला सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. ( मी मुंबईचा होतो त्यामुळे स्त्रीपुरुशात निकोप मैत्री असू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहेआणि उत्तर भारतिय पुरुषांसारखा संकुचित दृष्टीकोन नाही हे तिला साडेचार वर्षे एकत्र काढल्यामुळे माहित होते).
आम्ही वीस पंचवीस मिनिटे फिरून परत आलो. याची आम्ही वाच्यता केली नाही कि त्याबद्दल कुठेही चर्चा झाली नाही.

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 11:45 am | नानासाहेब नेफळे

स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो ,या माझ्या विधानाला पुष्टी देणारी बरीच उदाहरणे याच धाग्यात आली आहेत. उपरोक्त उदाहरण याच प्रकारची पुष्टी देत आहे.

हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे. परंतु बालपणापासूनच "हे" वाईट असे कानी कपाळी ओरडून सांगितले जाते. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता अशा तर्हेच्या वाक्यांच्या प्रभावामुळे सुद्धा विवाहानंतर त्यांचे मत परिवर्तन होत राहते. अशा सामाजिक दबावामुळे त्यांचे मत सेक्स बद्दल कलुषित होत असते शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.
ज्या समाजात स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य मिळते तेथे स्त्रिया शरीरसंबंधात पुढाकार घेताना दिसतात अर्थात संस्कृती रक्षक याला promiscuous(स्वैराचारी) म्हणतात.
यानंतर विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते.
अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.

संजय क्षीरसागर's picture

23 Sep 2014 - 8:51 pm | संजय क्षीरसागर

या धाग्यावर बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!! या अनुषंगानं भन्नाट चर्चा झाली होती.

आणि नेमका हाच विचार त्यावेळी मी तिथे मांडला होता!

कवितानागेश's picture

23 Sep 2014 - 9:57 pm | कवितानागेश

हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कसा मांडावा हे मला कळत नव्हतं...
शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.>
हा केवळ पूर्वग्रह नसतो, तर तो trauma असतो. अगदी मोठं होउन लग्न झाल्यानन्तरही अश्या पूर्वीच्या भीषण अनुभवातून गेलेल्या स्त्रिया स्त्रीपुरुष संबंधात सुरुवातीला कचरतात.
अजून खोलात जाउन विश्लेषण करायचं झालं तर स्पर्शात 'भोगा'ची भावना असेल तर कचरतात, आपलेपणा असेल, आदर असेल, तर मोकळ्या होण्याची शक्यता असते.
त्याशिवाय chemistry हा भाग आहेच.
असो.

प्रसाद१९७१'s picture

24 Sep 2014 - 2:00 pm | प्रसाद१९७१

हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे.

प्रगल्भतेची व्याख्या ह्या बाबतीत माहीती नाही, पण माझ्या अनुभवा प्रमाणे पुरुष सेक्स चा जवळ जवळ सतत ( More frequently ) करत असतो, पण स्त्रियांना जरी कामवासना असली तरी त्या सतत त्याच्या बद्दल विचार करत नसतात.

तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला अतिशय प्रामाणिक अनुभवावर आधारीत व त्यातील मिसमॅच्ड लिबीडो वर केलेले मत अतिशय मार्मिक आहेत.
मात्र तुम्ही मुंबईचे आहात म्हणुन विशाल द्रुष्टीकोणाचे उत्तर भारतीय पुरुष संकुचित हे सरसकटीकरण धक्कादायक वाटलं, त्यासाठी तुमच्या मैत्रीणीच्या मानसिकतेचा मी निषेध करतो.
मी खर म्हणजे वरील माझ्या लेखात अनेक मुद्दे नाइलाजाने टाळले त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. माझ्या संकोचाचे कारण सेन्सॉर चे भय यामुळे होत काय की फार जपुन जपुन लिहाव लागत आणि त्यामुळे आणि सध्या एक नविन गोष्ट माझ्या ल़क्षात आली ती अशी की माझ्या शैली मुळे देखील गैरसमज होतात.
माझ्या चरीत्रहीन मित्रा बरोबर झालेल्या चर्चा अजुन विस्ताराने मांडण्याचा मानस आहे. बघु या जमत का

विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते.
अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.strong>

डॉकशी परत एकदा पूर्णपणे सहमत !
हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2014 - 12:46 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले !

हायला...काय सुसाट आहे पा.क्रु. (चायला तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?)

सांगा प्लीज. (क्रुपया लिहायची परत बोंब)

शिद's picture

24 Sep 2014 - 2:10 pm | शिद

कृ = k + R + u

कपिलमुनी's picture

24 Sep 2014 - 4:09 pm | कपिलमुनी

पाकृ जबर्‍या !
दंडवत !!

चैदजा's picture

28 Sep 2014 - 7:55 pm | चैदजा

+१०० खरे साहेब.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:25 am | प्रसाद१९७१

खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-)
एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2014 - 9:35 am | टवाळ कार्टा

वरचा प्रतिसाद जर कोपरखळी नसेल तरच माझा हा प्रतिसाद वाचावा (नाहीतर ढुंकूनसुध्धा नका बघू :) )

यातून २ गोष्टी नक्कीच समजतात

१ - डॉ. यांना तिक्ष्ण स्मरणशक्ती आहे
२ - तुम्ही ४०शी पार केली पण अजून निखळ मैत्री काय असू शकते ते माहित नाही

पैसा's picture

1 Oct 2014 - 9:37 am | पैसा

असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:47 am | प्रसाद१९७१

असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!

तेच तर म्हणतो मी. हा प्रसंग डॉकटरांसाठी "खास" बनुन राहीला इतके वर्ष. म्हणुन तर मुद्दाम विचारले.

सुबोध खरे's picture

1 Oct 2014 - 10:04 am | सुबोध खरे

प्रसाद साहेब,
माझ्या मैत्रिणीचा नवरा (अजित) हा आम्हाला मेडिसिन शिकवायला होता.ते आमच्यापेक्षा चार वर्षे वरिष्ठ होते त्या शिकवण्याच्या काळात त्यांचे प्रेम जमले त्यामुळे ते आमच्या गटाकडे "जास्त" लक्ष देत असत .या बद्दल पण आम्ही त्याना चिडवत होतो. त्याना आमच्या ब्याचचा जावई म्हटले जात असे. मुळात तो शिक्षक म्हणून अतिशय चांगला होता आणि अतिशय सज्जन होता. पुढे त्याना ( अजितना ) मेंदूचा ट्युमर झाला. तेंव्हा ते उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे होता. त्यानची शल्यक्रिया झाली त्यातून ते सुधारले. पण काही वर्षांनी ट्युमर परत उपटला आणि त्यात दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. या सर्व कालावधीत मी पुण्यातच पोस्टेड होतो त्यामुळे मी या दुर्दैवी घटनांचा साक्षीदार होतो.
आपण म्हणता तसा मला मैत्रिणीबद्दल "सोफ्ट कॉर्नर" मुळीच नव्हता. शिवाय दुर्दैवाने आमच्या वर्गातील एकही मुलगी मला "तशी" आवडली नव्हती. त्यामुळे उगाचच कोणत्याहि मुलीवर लाईन मारणे हे माझ्या स्वभावात नव्हते.(काही मुलीना मी आवडलो होतो पण उगाच स्टाइल मारण्यासाठी त्यांना मोटारसायकल वर फिरवणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते). त्यामुळे मी "इनोसंट" आहे असा माझ्या वर्गातील मुलींचा माझ्याबद्दल समज होता. गंमत म्हणजे असे त्यातील एका मुलीने माझ्या बायकोला नंतर बोलूनही दाखवले.

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2014 - 10:10 am | टवाळ कार्टा

पुढच्या कट्ट्याला काही नविन किस्से बाहेर येणार बहुतेक :)

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 10:41 am | प्रसाद१९७१

डॉ साहेब, शीताफीने मूळ प्रश्नाला बगल दिलीत. मी विचारले होते की २५ वर्ष जुना असा एक छोटासा प्रसंग ( तो सुद्धा तुम्हाला सॉफ्ट किंवा कसलाच कॉर्नर नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला ) अजुन स्पष्ट आठवतो आहे, ते कसे काय? इतकाच प्रश्न होता.

ट.का. म्हणतोय तशी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे असे मानुन चालू.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Oct 2014 - 1:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही डॉक कडून नेमके काय वदवू पाहताय ?

BTW, अर्णब ने राज ची नुकती घेतलेली मुलाखत आठवली.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 2:55 pm | प्रसाद१९७१

नाही हो, काही नाही.

मी डॉक्टर साहेबांचा फॅन आहे. त्यांचे मिपा वर लिखाण दिसले ( प्रतिसाद सुद्धा ) की लगेच वाचतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास द्यायचा हेतू अजिबात नाही.

मी विचार करत होतो की माणुस काय गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्या का ठेवतो ह्या बद्दल.

सुबोध खरे's picture

1 Oct 2014 - 7:37 pm | सुबोध खरे

प्रसाद साहेब
माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं.
फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत
१) माणसांची नावे
२) माणसांचे चेहेरे
३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.
*pleasantry* *db* :db:

vikramaditya's picture

1 Oct 2014 - 10:24 pm | vikramaditya

आणि स्मरणशक्ती "तीव्र" , भाषेत असे असते का?

चु. भु. द्या. घ्या.

मृत्युन्जय's picture

2 Oct 2014 - 3:13 pm | मृत्युन्जय

तीक्ष्ण म्हणाले ना ते?

एस's picture

3 Oct 2014 - 11:25 am | एस

माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं.
फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत
१) माणसांची नावे
२) माणसांचे चेहेरे
३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.

सेम पिंच डॉक्टर! मलाही नेमक्या कुठल्या तीन गोष्टी आठवत नाहीत हे आठवता आठवता तुमचा हा प्रतिसाद दिसला! म्हटलं विसरायच्या आत नोंद करून ठेऊ. ;-)

चित्रगुप्त's picture

2 Oct 2014 - 8:18 pm | चित्रगुप्त

स्मरणशक्ती बद्दल माझा अनुभव नमूद करू चाहतो:
मला माझ्या बालपणातले आणि तरूणपणातले सर्व व्यवस्थित आठवते, परंतु मी काल काय खाल्ले, काय केले, गेल्या आठवड्यात वा महिन्यात काय काय घडले, वगैरे आठवायला फार त्रास होतो, खरेतर आठवतच नाही. असे काही वर्षांपासून झालेले आहे.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:46 am | प्रसाद१९७१

अहो अनेक प्रसंगातुन ( ज्यात त्यांना वेगवेगळ्या मित्रांनी फिरायला बोलवले असेल ) डॉ साहेबांना हा २५ वर्ष लक्षात राहीला. काहीतरी उजळणी झालीच असेल ना मनात.

बादवे, मला डॉ साहेबांच्या उत्तराची उत्सुकता आहे.

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 11:03 am | खटपट्या

आवड्लं साहेब !!

कवितानागेश's picture

23 Sep 2014 - 11:09 am | कवितानागेश

क्लीयर थिन्किन्गः
सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. >
ही मॅच्युरिटी किंवा आपल्याला नक्की काय हवय हे प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कळतं असं नाही.
त्यातूनच गैरसमज होत रहातात.
EQ चांगला असेल तर १ सेकंदात कळतं, की समोरच्या व्यक्तीला आपण केलीली गोष्ट आवडलेली नाही/ आवडली. मग पुढची complications होत नाहीत. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Oct 2014 - 5:48 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते अनेक माणसांना आपल्या भावना आपल्या ताब्यात आहेत. विशेषतः समाजात आपली प्रतिमा निर्माण करतांना आपल्या लैंगिक भावना ह्या पूर्णपणे आपल्या कह्यात आहेत असे अनेकांना वाटते तसे खरच असते का.

कल्पनेचे तारे वाचून बऱ्यापैकी करमणूक झाली.
..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 1:05 pm | टवाळ कार्टा

..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.

घोर अन्याय...stereotype करण्याचा प्रयत्न...लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

नाही. 'कल्पनेचे तारे ' असे म्हणण्याचे कारण असे की लेखकाने व्यक्त केलेली मते ही घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन नसून लेखकाच्या मतानुसार केलेले विश्लेषण आहे. तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.

मीतर वाचलय की सॉक्रेटीस कुठले तरी पुस्तक ३०-३५ वर्शे लिहीत होता, सुधारणा करत होता. अचानक एकदा त्याच्या घराबाहेर गोंगाट झाला . तो बाहेर आला तर कोणीतरी कोणालातरी गोळी मारली होती आनी ती व्यक्ती ठार झाली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने त्याने बर्याच जनांशी संवाद साधला आनी ईतकी वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली ही तो हैराण झाला. प्रत्यक्ष घटणेचे हे हाल तर मी माझे जीवनभरचे अनुभव्/घटना लिहीतोय त्यात काय तथ्य आहे असे वाटून त्याने ते लिहीलेले कागद जाळून टाकले.

सोर्स: ओशोंचे कुठलेसे पुस्तक.

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 1:57 pm | प्यारे१

गल्ली चुकलं की तुमचं ते!

विलासराव's picture

23 Sep 2014 - 6:20 pm | विलासराव

गल्ली चुकलं की तुमचं ते!

प्यारेकाका सार घ्या त्या कथेतुन. कशाने का मरेना.बाकी तुमची मर्जी.
बाकीच्यांकडुन फार अपेक्षा नाहीतच पण प्यारेकाका तुम्हीसुद्धा????

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 6:49 pm | प्यारे१

मला 'परिपूर्ण एकटेपणा' धाग्यावरचा प्रतिसाद वाटलेला. माझंच गल्ली चुकलेलं दिसतंय.

लोड नका घेऊ. होतंय कंदी कंदी!

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 2:16 pm | प्रसाद१९७१

सॉक्रेटीस च्या काळी बंदुका होत्या का?

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 7:28 pm | नानासाहेब नेफळे

प्रसाद भौ, त्यांनी गोळी मारली असे लिहले आहे, बंदुकीतुनच मारली असा त्यांचा दावा नाही .
ब्रुसलीच्या एका चित्रपटात तो अंगठ्याखाली तर्जनी ठेऊन त्यामधे छर्रा पकडून एका व्हिलनला मारतो व त्याच्या कपाळात छर्रा घुसल्याने तो व्हिलन मरतो. साँक्रटीसच्या काळी एखादा ब्रुसली असेल.

विलासराव's picture

23 Sep 2014 - 7:34 pm | विलासराव

धन्यवाद नानासाहेब.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2014 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघा नानासाहेब, तुमच्या कल्पनाविलासाला विलासरावांनीपण दाद दिली आहे ! =))

तुम्हाला प्लेटो म्हणायचंय का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2014 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

सुबोध खरे's picture

23 Sep 2014 - 7:51 pm | सुबोध खरे

स्नेहांकिता ताई
आपल्याला माझे अनुभव कल्पनेचे तारे वाटले हे पाहून मनाला आल्हाददायक वाटले.

पैसा's picture

23 Sep 2014 - 7:56 pm | पैसा

ती लेखाला म्हणतेय. तुमच्या प्रतिक्रियेला नाही! :D

सुबोध खरे's picture

23 Sep 2014 - 7:58 pm | सुबोध खरे

तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.
या वरून मला असे वाटते

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 7:59 pm | प्यारे१

त्यांच्या (पहा: लेखकांच्या) मित्राने (पहा: चरीत्रहीन मित्र)

पैसा's picture

23 Sep 2014 - 8:00 pm | पैसा

ते पण लेखालाच लागू आहे ना!

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 7:58 pm | प्यारे१

जरा म्हणून आल्हाद वाटू देऊ नका तुम्ही. लगेच्च.... =))

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 8:10 pm | टवाळ कार्टा

मग ते त्यांनाच सांगुदेकी...एका आणाहितेला काही विचारले की ती येते की नाही याऐवजी कोणी दुसरी येतेच...एकीचे बळ अगदी ठसठसून दिसते ;)

पैसा's picture

23 Sep 2014 - 8:43 pm | पैसा

हां गैरसमज तुमच्याबद्दल असता तरी सांगितलं असतं हो! तिला डोक्टरना म्हणायचं असतं तर त्याना उपप्रतीसाद दिला असता नाही का! गैरसमज दूर होणं महत्त्वाचं.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 9:01 pm | टवाळ कार्टा

मी बोर झालेलो म्हणुन फुंकर घालुन बघत होतो हो ;)

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 9:01 pm | प्रभाकर पेठकर

पुरुष करावी तिथे 'एकी' करीत नाही हिच समस्या आहे.

खटपट्या's picture

3 Oct 2014 - 1:29 am | खटपट्या

होना !! तेवढा "फक्त पुरुषांसाठीचा" विभाग कधी काढताय तेवढे सांगा पैसातै !!

स्वप्नांची राणी's picture

3 Oct 2014 - 4:16 am | स्वप्नांची राणी

खर म्हणजे पुरुषच ईथे-तिथे सगळिकडे 'एकी' करु शकतात...हो की नाही? *wink* ;-)

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2014 - 11:21 am | प्रभाकर पेठकर

'भारत स्वच्छता अभियान' चालू आहे.

अलीकडे स्त्रियांसाठीही हे शक्य असल्याची न्यूज वाचली होती बॉ.

मीटिन्गमधे अडकले होते ऑफिसात म्हणून देऊ शकले नाही उत्तर हो टवाळभौ. पण पैतैने दिलेय ना माझ्यावतीने !

सस्नेह's picture

23 Sep 2014 - 9:24 pm | सस्नेह

माझा प्रतिसाद मूळ लेखावरच आहे हो सुबोधजी.
तिरक्या होत गेलेल्या लेवलमुळे तुमच्या प्रतिसादाखाली आला की काय ?

सुबोध खरे's picture

23 Sep 2014 - 8:41 pm | सुबोध खरे

तसं असेल तर आय माय स्वारी

vikramaditya's picture

23 Sep 2014 - 10:21 pm | vikramaditya

अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात किंवा आपल्याला त्याचा कधी अनुभव आलेला नसतो.
(खरं म्हणजे 'सत्य हे आपल्या कल्पनेच्या फार पलिकडे असु शकते' असे म्हणणार होतो. पण परत तो 'सत्याचा' विषय नको.)
त्यामुळे आपल्या माहिती/अनुभव विश्वापलीकडील एखाद्या प्रसंग वा घटनेविषयी 'असे होउच शकत नाही' असा दावा करणे अयोग्य वाटते.
आपल्या लाडक्या मिपाच्या भाषेत ' बाकी चालु द्या.'

माहितगार's picture

24 Sep 2014 - 2:05 pm | माहितगार

स्वॅप्स म्हणालेत कि २०० नक्की होतील.

धडपड्या's picture

24 Sep 2014 - 3:26 pm | धडपड्या

मुस्लिम लोकांमध्ये स्त्रियांची देखिल सुंता केली जाते... याचे कारण हेच तर नसावे??

सर्व मुस्लिम समाजात नव्हे. फक्त काही देशांत, मुख्यतः आफ्रिकन देशांत.

अन ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू आहे.

धडपड्या's picture

24 Sep 2014 - 9:31 pm | धडपड्या

धन्यवाद... आता पर्यंत जे वाचलेलं त्यावरुन एवढंच समजलं होतं...

दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला.
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो

वरील उदाहरणातील -
यात स्खलनातला आनंद कुणाला उपभोगता येतो असे लेखकाला म्हणायचे आहे? मला वाटते "स्त्रीला"!!
तसे जर असेल तर तीला दहा मिनिटांच्या "त्या" स्पर्शात "स्खलन" म्हणजे ओरगैजम सारखे सुख अनुभवता येते.
पण पुरुष बिचारा, त्याचे काय ?? त्याने काही "अनुभवण्या" आधी त्याला माघार घ्यावी लागली.

एनीवे, विषय खूप छान आणि वेगळा आहे. आणखी माझे मत सविस्तर मांडेन. आता वेळ नाही....

टीप: स्खलन म्हणजे ejaculation असा अर्थ मी घेतला आहे. चू. भू. द्या. घ्या.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Sep 2014 - 5:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ दादा, वीर्यस्खलन नाय हो स्खलन. शब्दश: अर्थ, बहुधा पडणे (अध:पतन या अर्थाने)

च्यायला, दहा मिनिटांच्या सूचक स्पर्शाने orgams?? आणि तथाकथित संस्कृतीरक्षक विचारतात, लैंगिक शिक्षणाची गरज काय म्हणून.

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2014 - 7:24 pm | टवाळ कार्टा

फारच उतावळेपणा झाला की हा =))

चैदजा's picture

28 Sep 2014 - 8:24 pm | चैदजा

तिने स्पष्ट सांगितले की स्पर्श मला आवडला नाही. मग तिने स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगला, हे तुम्ही कसे सांगु शकता ?

तुम्ही म्हणता त्यप्रमाणे अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात.
तुम्ही कबुल करता, असे वागणे हा व्याभिचार आहे. काही स्त्रियांना हे १० मिनीटात समजते, काहींना तो १० वर्षांनी बावळटपणावाटतो. (या वाक्याला खरे साहेबांच्या लेखा वरील बाणाला बाण प्रतिसादांचा आधर आहे.)

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 11:23 pm | कवितानागेश

एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात.>> हे गृहितकच फार गमतीदार आहे.
जर का मानसिक पातळीवर असं सगळं अनुभवता येत असेल, तर कुणातरी व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष वेळ कशाला वाया घालवायचा?? सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष एकटेच मजेत रहातील.
तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

कारण अशा स्त्रीयांना मानसिक पातळीवर समाधान मानुन घ्यावे लागते ही त्यांची मजबुरी असते. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणतात असे. सगळच मानसिक पातळीवर अनुभवता येत पण ते पुर्ण आनंद जो केवळ क्रीयेने मिळतो त्याचा पर्याय होउ शकत नाही हे तर उघड सत्यच आहे ते कुठे अमान्य केलय ? पण त्यांना त्या क्रियेपर्यंत जाण्याचे धाडस नसते म्हणुन त्या ही मर्यादीत आनंदाची वाट निवडतात असे म्हटलेले आहे. त्यांनी आवडल नाही हे स्वतःचे मानसिक पातळीवर स्वतःच्या ठरवलेल्या मर्यादेत समाधान झाल्यावर पुढील स्टेप टाळण्यासाठी म्हटल होत त्या अगोदर चा अविरोध हा स्ट्रटेजीक होता. हा कनिंगनेस मात्र स्त्रीयांत असुच शकत नाही सर्व स्त्रीया या ब्रम्हकुमारीच असतात अश्या नसतात च मुळी आदि च डोक्यात घट्ट असतील तर मग मात्र अर्थातच वरील विवेचन अस्वस्थ करु शकते.

तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

"
स्त्रीनी आवडलं नाही म्हटल तरी आवडलेल असत, पुढाकार पुरुषांनी घ्यावयाचा असतो आणि अशा पुढाकार घेण्यात पौरुषत्व आहे, जर लगेच विरोध केला नाही तर नक्कीच हवे होते
" हि एक पसरवल्या जाणार्‍या विचीत्र गृहीतकांची मालिका आहे. या धागा लेखातील सभ्यता-दर्शक तोल सांभाळुन हे शब्द काढून घ्या मग हे अस पसरवले जाणारे अपसमज वेळीच खोडले न गेल्या मुळे (प्रॉपर ऑब्जेक्शन हँडलींग न झाल्याने) समाजात पसरत राहतात आणि अशा स्वरूपाचे अपसमज स्त्रीयांवरील अत्याचारांना कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहीजे असे वाटते.

अशा पुरुषांना १२व्या मजल्यावरून उचलून खाली स्त्रीयांनी उचलून खाली फेकताना ते स्त्रीयांनी उचलून वर धरतानाचा स्पर्ष आणि अनुभव लगेच आवडला नाही म्हणण्यासाठी भितीने तोडातून शब्द बाहेर पडला नाही, तरी तो स्पर्ष आणि वर उचलले जाण्याचा अनुभव त्यांना आवडलेलाच असतो, आणून समजा चुकून तोंडातून शब्द बाहेरपडलाही आणि बाराव्या मजल्यावरून जमीनीवर खाली फेकून देणे आवडत नाहीए असे सांगितले तरी त्यांना ते मनातून आवडतच असते. असा अपसमज स्त्रीयांमध्येही बळावलेला असता रोजी दोनचार पुरुषांवर अत्याचार झाले असते तरीही पुरुषांनी अशा तर्कांचे आणि अपसमजांचे समर्थन केले असते का ? (सर्व उत्तरदायकत्वास नकारः हा केवळ युक्तीवाद आहे असे करण्याचे कुणासही प्रोत्साहन अथवा समर्थन नव्हे.)

अनेक शक्यतांपैकी एकाच शक्यतेकडे निर्देश करणे आणि त्यावरून नियम बनवण्याचा प्रयत्न खरेच तर्कसुसंगत असतो का ? एखादी न आवडणारी गोष्ट अनपेक्षीत पणे घडत असेल तर लक्षात येऊन प्रतिरोध करण्याची नकार देण्याची पद्धत प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात का एकटे आहात, सोबतची व्यक्ती परिचीत आहे का अपरिचीत, लगेच विरोध केला तर अपमान समजून पुन्हा अपमानाचा बदला म्हणून अधिक अत्याचारतर करणार नाहीना अशा प्रकारच्या भिती, किंवा जगातल्या बहुतांश लोकांना स्त्री असो वा पुरुषांना Patience (संयम- इथे समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करून विरोध करणे या अर्थाने) आणि Tolerate (सहन) करणे यातला फरकच मुळी माहीत नसतो. इंग्रजीत Don't tolerate but have patience अशा प्रकारची काही म्हण आहे. कि सहन करू नका पण मनाचा संयम ठेवा पण बहुतांश लोकांचे उलटे होते नको असलेल्या गोष्टी सहन करण्यात काही काळ जातो आणि मग नंतर लक्षात येते आपण विनाकारण सहन करतोय तो पर्यंत राग अनावर होऊन संयम सुटलेला असतो पण या संयम समजून शांतपणे सहन करण्याचा दुसरे लोक दुर्दैवाने वेगळा अर्थ काढत असतात, एखादी व्यक्ती सहन करतीए आणि विरोध नोंदवण्यास विलंब करते म्हणजे तो अत्याचार तिला हवाच असतो असे नव्हे हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

माहीत गार
मी जो प्रसंग लेखात दिलेला आहे तो सत्य प्रसंग आहे व जिवंत व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. मी सेन्सॉर मुळे अनेक डीटेल्स जाणीवपुर्वक टाळतो. कारण मिपावर एक मर्यादा येते व्यक्त होण्यात. आता थोड उलगडुन सांगतो. ज्या स्त्री बरोबर वरील प्रसंग घडला तिच्या मांडीवर दहा मिनिट हात ठेवलेला होता. (तुमच वय व अनुभव स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भात ) मला माहीत नाही. पण नर मादीचे प्रणयाचे आदिम खेळ व त्याचे अलिखीत नियम माहीत नसतील तर सांगतो. की नर व मादी यांच्यात एक केमेस्ट्री क्रीएट होत असते एका विशिष्ट वेळी तिथे स्पर्शाची अत्यंत प्रभावी भाषा नजरेच्या सोबतीने वापरली जात असते. यात नराने मादीला दिलेला संदेश/ आवाहन अत्यंत सुस्पष्ट स्वच्छ असतो. भाषेपेक्षा कैक पट प्रभावी. तुम्ही कुठल्याही स्त्री कडे अगदी चोरटा अगदी निसटता कामुक कटाक्ष जरी टाकला तरी तिला तुमचा हेतु वा नियत अगदी निसंदीग्ध रीत्या कळतेच. आता त्यानंतर पुढील प्रतिसाद कसा द्यावा हा जिचा तिचा प्रश्न असतो. स्वीकार की नकार हा केस वाइज वेगवेगळा असतो. पण असे कधीच होत नाही की स्त्री ला कळलचं नाही की नराचा हेतु काय होता ? यावर अनेक शास्त्रीय संशोधन झालेल आहे पण सोप्या मराठीत सांगायच तर असे कधीच शक्य नाही की हेतुच कळला नाही ( वरील एकांतातील स्पर्श व संवाद (जो मी देउ शकत नाही ) व नजर जी दाखवता येत नाही.
माझा मित्र थेअरीज नुसत्या जाणत नाही तर तो प्रत्यक्ष स्त्री पुरुष संबंधातील अनुभवी माणुस आहे. जे जे स्वेच्छेने संबध स्थापित होत असतात त्या मार्गातला तो आहे. त्याने रेप बळजबरी वा फसवणुक वा लपवाछपवी कधीही केलेली नाही त्या बाबतीत तो अतिशय प्रिन्सीपल्ड म्हणावा असा आहे. आता आपल्याअ नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत की त्यावर काय बोलणार ? आपले तथाकथित ९५ ट्क्के धार्मिक नितीनियम हे केवळ आणि केवळ सेक्स सेंटर्ड आहेत. यामागे अनेक अनेक कारणे आहेत पण एक लेख जरुर तुम्ही वाचावा अशी विनंती त्यावरुन कीमान नैतिकतेचा ढोबळ अर्थ तरी तुम्ही घेणार नाही अशी अपेक्षा
http://www.misalpav.com/node/26124

माहितगार's picture

29 Sep 2014 - 11:23 pm | माहितगार

१) तुम्ही पूर्ण वर्णन लिहा अथवा न लिहा, ते तुमच्या तथाकथीत मित्रानी सांगीतलय म्हणजेच प्रत्यक्षदर्शी वर्णन नाही आहे.
२) संबंधीत स्त्रीचा यात कुठेही जवाब येत नाही आहे
३) चर्चेत सहभागी होणार्‍या कुणालही संबंधीत व्यक्तींची उलटतपासणी घेता येणार नाही आहे.
४) जी काही तथाकथीत माहिती आपण देऊ इच्छिता ती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री होणे शक्य नाही आहे.
५) आपल्या लिहिण्याच्या शैली वरून आपण दुसर्‍या व्यक्तीचे (संबंधीत स्त्रीचे) म्हणण्याची कोणतीही पडताळणी न करता कुणातरी अबकडला स्वतः डोळे झाकून प्रिन्सीपल्डनेसचे सर्टीफिकेट देत आहात आणि त्याच वेळी इतर सर्वांच्या नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत असा आक्षेप घेत आहात; हे जरासे एकतर्फी वाटते आहे.
५) आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा म्हटल तरीही ती अनेक शक्यतांपैकी केवळ एक शक्यता उरते आहे, आणि माझा उपरोक्त प्रतिसादातील आक्षेप एका शक्यतेच्या बळावर सरसकट निष्कर्ष काढण्यावर आणि स्त्रीयांच्या अपेक्षांच्या बाबतीत अपसमजांची मालिका तयार होण्या बद्दल आणि अशा अपसमजाच्या मालिकांमुळे स्त्रीयां वर शक्य आत्याचारांबद्दल आहे.

माझे आक्षेप व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या बाजूने येत आहेत. जिथ पर्यंत माझ्या व्यक्तीगत मतांचा संबंध आहे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल मत या धाग्यावर पुरेसे स्पष्ट केले आहे यात आपल्या शब्दातील तथाकथित 'तकलादु व बेगडी नैतिकतेच्या कल्पनांशी', माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारीत आक्षेपांचे काही एक देणे घेणे नाही, आणि तरीही ते आक्षेप स्वतःचे महत्वपूर्ण स्थान बाळगून असतील, हे सुस्पष्टपणे नमुद करत आहे.

एनीवे स्त्रीयांना काय वाटंत या बद्दल पुरुष मंडळींना स्त्रीयापेक्षा अधिक माहिती असण्याचे दावे एकुण कौतुकास्पद (मनोरंजक) आहेत.

माहीतगार महोदय
काय म्हणताय तुम्ही अहो हे अंतरंग अनुभव आहेत. यात तपासणी जाबजवाब कस शक्य आहे ? अर्थात या निमीत्ताने मात्र एखाद्या अप्रिय अडचणीच्या सत्याकडे आपण कसे बघतो त्याच्यशी कसे डील करतो याचे एक विलक्षण दर्शन मला होत आहे.
मी कुणा अबकडला प्रिन्सीपल्ड आहे असे म्हणत नाहीये माझा १५ वर्ष जुना असलेला मित्र व त्याच्या आयुष्याचा वागणुकीचा अगदी जवळुन अनुभव असलेला मित्र या नात्याने ग्वाही देत आहे. अर्थात तुम्ही ते मान्य करा असा आग्रह नाहीच. मी तर माझे अनुभव शेअर करीत आहे.
पण मुळात असे होउच शकत नाही स्त्रीया असे करतच नाहीत व मी या स्त्री विषयी असे म्हणतोय म्हणजे सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?
आणि यात आश्चर्य ते काय की पुरुष स्त्री ला व स्त्री पुरुषाला अधिक चांगल ओळखु शकते कारण साध आहे अहो डीस्टन्स मेक्स अ डीफ्रंस

माहितगार's picture

30 Sep 2014 - 1:10 am | माहितगार

सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?

जाणता अजाणता जे काही सरसकटीकरण करणारी आपल्या धागालेखातली गृहीतके त्याचे विश्लेषण मागच्या प्रतिसादांतून केलेलेच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2014 - 9:24 am | प्रसाद गोडबोले

अतिषय माहीतीपुर्ण धागा अन प्रतिसाद :)

मज्जा आली वाचुन ... मारु काका तुमच्या मित्राला चरित्रहिन का म्हणताय ?? ...
काकुंनी स्पर्श आवडला नै म्हटल्यावर चरित्रहिन काका गुपचुप बसले होते ना..
मग चरित्रहिन कस्काय झाले ??
कि त्यांचे नावच चरित्रहिन काका आहे ?? काय आहे काय हे प्रकरण ??

अस आहे बघ माझा मित्र हा चरीत्रहीन आहे याचा अर्थ तो पारंपारीक अर्थाने एका पेक्षा अनेक स्त्रीयांशी त्यातील काही विवाहीतांशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो. असा पुरुष जो आपल्या धर्मपत्नी व्यतिरीक्त जिच्याशी त्याचे लग्न झालेले आहे. असे संबंध प्रस्थापित करतो अशा पुरुषाला रुढ प्रचलित भाषेत चरीत्रहीन असे संबोधन वापरतात. माझ्या मित्राचे नाव चरीत्रहीन असे नाही. ते एक विशेषण आहे.
दुसर या केसमध्ये तो गप्प बसला होता कारण त्या संबंधातील त्या स्त्रीचा हेतु केवळ मानसिक व्याभिचारापुरताच आहे ती पुढील कृती करण्यास असमर्थ आहे असे त्याला कळुन चुकलेले होते. म्हणुन समजुतदारपणे त्याने विषय आवरता घेतला कारण त्याला अर्थातच पुढील कृतीत रस होता.
आता त्याला चरीत्रहीन हे संबोधन हे या केस वर आधारीत नव्हते दिलेले. तर या केस आधी आणि या केस नंतर त्याचे विविध स्त्रीयांशी जे संबध प्रस्थापित त्याने केले त्यावरुन हे दिलेले आहे.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली.
उदया मी एका चोराची गोष्ट सांगितली त्यात म्हणालो की अचानक कुत्री भुंकायला लागली म्हणुन तो चोर चोरी न करताच पळुन गेला तर तु काय म्हणशील अहो त्याने चोरी तर केलीच नाही मग तुम्ही त्याला चोर का म्हणालात ?
यावर असे म्हणावे लागेल की अग अग जेने या केस मध्ये जमल नाही त्याला पण तो चोर च आहे.
एनीवे ज्यो जेने याच्यावर लिहीलेले सार्त्र चे लेखन तु वाचलेले आहेस का ? नसल्यास जरुर वाच

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 10:13 am | ऋषिकेश

उत्तम विषय.
डॉ. खरे यांचे प्रतिसादही वाचनीय

फक्त यात स्त्रियांविषयीच नाही तर ए पुरूषांबद्दलही सत्य आहे असे वाटते. "फ्लर्टिंग" या सीमेवरील प्रकारात उत्तम प्रकारचे फ्लर्टिंग करणारे अनेक वीर बघितले आहेत.

चंप्रं देशपांडे यांचे "सेक्स" नावाचे नाटक केवळ याच विषयावरील उहापोहाला वाहिले आहे! (यावरच पुढे बहुदा बुद्धिबळ आणि झब्बु नाटक आले) यातील नायक नायिका फक्त सुचक "बोलुन" आनंद घेतात ;)

माहितगार's picture

30 Sep 2014 - 12:25 pm | माहितगार

डॉ. सुबोध खरे यांचा http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 हा प्रतिसाद बर्‍याच जणांना विशेषतः पुरुष मंडळींना आवडतो आहे असे दिसते. त्यांच्या त्या प्रतिसादातल्या दुसर्‍या ष्टोरी बद्दल फारसे काही म्हणण्यासारखे वाटत नाही. पण पहिल्या ष्टोरीत पूर्वग्रहांचा अल्पसा अंमल आहे असे वाटते.

...असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे)....

ह्या वाक्यात डॉ. सुबोध खरेंना काय म्हणायचय त्याची स्पष्ट कल्पना येत नसल्यामुळे असेल कदाचित, ष्टोरीतला हा भाग जरासा खटकतोय रिएक्झमाईन करण्याची गरज असावी असे वाटते

सुबोध खरे's picture

30 Sep 2014 - 2:18 pm | सुबोध खरे

माहितगार साहेब,
माझ्या वर्गात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली स्त्रिया दिसतात ज्या एकदम मोकळ्या ढाकळ्या असतात. बोलताना एखाद्या पुरुषाला स्पर्श करणे किंवा परीचयातील अथवा नात्यातील असेल तर थाप मारणे हे सहज करताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवते कि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा हेतू "तसा" नाही, या स्त्रिया सर्व पुरुषांशी तसेच मोकळे वागताना आढळतात. मी वर्णन केलेली स्त्री तशा मोकळ्या स्क्भावाची नव्हती. ती काही पुरुषांच्या जास्त जवळ जाते असे आढळत असे यास्तव मी तसे लिहिलेले आहे.

माहितगार's picture

30 Sep 2014 - 5:32 pm | माहितगार

प्रथम तर प्रतिसादासाठी धन्यवाद. ओके तुम्हाला वागण्या बोलण्यातल्या स्वभावतः मोकळेपणा कडे लक्ष वेधायचे होते असे दिसते. आपल्या आधीच्या एका वाक्यात "जास्तच मोक्ळे" एका अर्थाने येऊन गेल्या नंतर "जास्तच मोक्ळी" वेगळ्या अर्थाने येतेय हे सहज लक्षात येत नाही.

तुमच स्पष्टीकरण स्विकारून ष्टोरी क्र १च्या उर्वरीत समीक्षे साठी तुमच्या वतीने वाक्यात जरा बदल करतो आणि अभ्यासतो आहे.

आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता.
असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा स्वभावतः मनमोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. .......

संदर्भ: डो सुबोध खरे यांचा प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154

(प्रतिसादअंश समिक्षणासाठी आयात केला कॉपीराईट डॉ. सुबोध खरे यांचे. उपप्रतिसादाच्या माध्यमातून समीक्षा करेन)

डॉ सुबोध यांच्या चर्चेतील परिच्छेदात ते म्हणतात तसे जरासा बदल केला तरीही जराशी सब्जेक्टीव्हिटी राहते असे प्रथमदर्शनी वाटते आहे. डॉ सुबोध व्यवसायाने डॉ. आहेत सब्जेक्टीव्हिटीच विश्लेषण करायच असल तरी त्यांचा आणि त्यांच्या पेशंट मधला नेमका संवाद विचारणे उचीत ठरत नाही म्हणून बेनीफीट ऑफ डाऊट देऊन डॉक्टरांचा त्या नंतरच्या परिच्छेदातील शक्यतेचा तर्क तात्पुरता स्विकारला असे जरी गृहीत धरले तरीही एक दोन गोष्टींकडे लक्ष वेधावस वाटत.

डॉक्टर साहेबांच्या दुसर्‍या स्टोरीतील डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांच्या शब्दात "तसल जास्तच मोकळी" वागली नसेल संयमाचा बांध असेल पण तिने तिच्या ज्याकाही भावना आहेत त्या मनमोकळे पणाने सांगून टाकल्या, पण इथेही ती सर्वांशी स्वाभाविक मनमोकळे पणाने वावरू शकली नाहीए केवळ डॉक्टर साहेबांशी विश्वासार्ह मित्र या नात्याने मोकळेपणाने बोलते आहे. पहिल्या ष्टोरीत स्त्रीही तीला विश्वासार्ह वाटलेल्या मर्यादीतच व्यक्तींशी (दुसर्‍या ष्टोरीतल्या मैत्रिणीपेक्षा कदाचित थोडे जास्त) मोकळेपणाने वागते आहे. दोन्हीही स्त्रीया मर्यादीत व्यक्तींवरच विश्वास ठेवताहेत पण डॉक्टरांचा दृष्टीकोण अल्पसा सब्जेक्टीव्ह होतो आहे पहिल्या ष्टोरीतली स्त्री म्हणजे तसली आहे आणि दुसर्‍या ष्टोरीतली स्त्री अहंकार सुखावून जाते म्हणून "तशी" नाही ? कदाचित माझे विश्लेषण चूकत असेल पण डॉ साहेब आहेतच सांगण्या साठी

सुबोध खरे's picture

30 Sep 2014 - 9:01 pm | सुबोध खरे

माहितगार साहेब
आपली काहीतरी गल्लत होते आहे. पहिल्या गोष्टीतील स्त्री हि माझ्या मित्राची बायको आहे आणि ती बैचलर अधिकारी राहतात तेथे धावण्यास जात असे ( इतर रस्ते ओस पडलेले असताना). नौदलातील लग्न झालेल्या आणि न झालेल्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने वेगवेगळ्या ठकाणी असतात. शिवाय ती दुकान्दारासारख्या माणसाशी सुद्धा जर जास्तच "मोकळे"पणाने बोलत असे आणि तो जेंव्हा लघळपणा करायला लागला तेंव्हा एकदम त्याच्या अंगावर आली. दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते. तामुळे आमच्यात तेवढा मोकळे पण नक्कीच होता. यात अहंकार सुखावण्याचा कोणताही भाग नाही. जहाजावरील मित्राची बायको आणि वर्गमैत्रीण यात खूप फरक आहे.
यावर छिद्रान्वेषीपणा करून मुळ मुद्द्याला बगल मिळते आहे असे वाटते.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:23 am | प्रसाद१९७१

दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते.

खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-)
एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

माहितगार's picture

1 Oct 2014 - 2:20 pm | माहितगार

ठिक आहे, घटकाभर असं धरू की डॉ सुबोध तटस्थपणे विचार करत आहेत तरी सुद्धा; डॉ.सुबोधांच्या मैत्रिणीने अगदीच सनातन स्त्रीयांपेक्षा लक्ष्मणरेषेच वर्तुळ किचीत मोठ केल, आणि त्यांच्या दुसर्‍या मित्राच्या पत्नीने अधिक बोल्डनेस दाखवतानाही लक्ष्मणरेषेच वर्तुळ ठेवलच पण डॉक्टरांच्या मैत्रिणीपेक्षा ह्या परिघाचा व्यास जरा अधिक मोठा होता. म्हणजे परिघाचा व्यास आणि परिमितीच स्ट्रक्चर बदलल की समाजाच्या दृष्टीकोणाची फुटपट्टी बदलते असे म्हणता येईल का ? डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांसोबत फिरावयास गेली हे ही तिची लक्ष्मणरेषा इंटॅक्ट असूनही सनातनी बुरखा समर्थकांच्या फुटपट्टीत बसणार नाही, डॉक्टरांची फुटपट्टी जरा अधिक लिबरल आहे त्यामुळे त्या फुटपट्टीच्या मापात मैत्रिणीच वागण व्यवस्थीत बसतय, ह्याच मैत्रिणिने लक्ष्मणरेषेचा व्यास वाढवला असता तर ते डॉक्टरांना त्यांच्या फुटपट्टीत बसवण जड गेलं असत. तर मला मुख्य निर्देश करायचा आहे तो या फुटपट्ट्यांच्या वेगवेगळ्या मापांकडे म्हणून मी या फुटपट्ट्यांना सब्जेक्टीव्ह म्हणतो आहे. आणि या सब्जेक्टीव्ह फुटपट्ट्या समाजाने करावयाच्या लेबलींगला कारणीभूत होतात. (इथे अबकड पुरूष स्त्रीयांचे हॉस्टेल असलेल्या रस्त्यावर फिरावयास जात असे आणि अधिकच मोकळा वागत असे या पुरुषाला आणि असेच वागणार्‍या स्त्रीला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावाव्यात की नाही हा लिंगभाव अभ्यासाचा वेगळाच प्रश्न आहे.) पण इथे वैवाहीक जिवनात पुर्ण तृप्ती असलेले/दिलेले विवाहीत पुरूष इतर स्त्रीयांकडे बघतच नाहीत हे केवळ अपवादानेच सिद्ध होत असावे पण अशांच्या तृप्ततेचा अ‍ॅनालिसीस हा ह्या धाग्याचा विषय नाही. (डॉक्टर साहेबांनी छिंद्रान्वेशीपणा ह्या शब्दाची चांगली आठवण दिली आहे.) समाजमात्र स्त्रीच्या तृप्ततेची प्रमाणाबाहेर छिद्रान्वेषीपणे चिकीत्सा करू इच्छितो. हेही ठिक की एक स्त्री जास्तच मोकळेपणाने वागली छिद्रान्वेषी चिकित्सा करून समाजाने तीला अतृप्त आत्मा जाहीर केले तिच्या पतीवर अप्रत्यक्ष कॉमेंट केली.

जर संबंधीत स्त्री बॅचलर्स होस्टेलच्या दिशेने न जाता जास्तच मोकळी वागली असती तर समाजाने त्या स्त्रीबद्दल तेथे बरेच गैरसमज पसरवले नसते असे काही आहे का ? स्त्रीच्या तृप्तीबद्दल उदात्त हेतूने चिकित्सा आणि विश्वासार्ह मदतीचा हात पुढे करणे यात गैर नाही, जो पर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर होतो आहे बाकी समाजाने त्यात हकनाक नाक खुपसून स्त्रीयांबद्दल गैरसमज पसरवणे खरेच किती सयूक्तीक असते ? लेडी माऊंट बॅटन पंडीत नेहरूंशी मोकळेपणाने वागल्या म्हणजे त्यांना माऊंट बॅटन साहेबांनी अतृप्तच ठेवले असले पाहीजे हा कोणता तर्क ? पंडीत नेहरूंनी लेडी माऊंट बॅटन यांच्याशी मोकळेपणाने वागूनही वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल माऊंट बॅटन यांनी त्यांच्या वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत जीवना बद्दलचे समज गैरसमज पसरवण्याचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनात दखलंदाजी करण्याचा समाजाच्या इतर घटकांनी का विचार करावा ? पण दुर्दैवाने सर्व समाज पिढ्यांपिढ्या हे करत राहतात असे आढळून येते.

आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे.

हेच वाक्य जरा शब्द बदलून पहा

एक स्त्री तोकडे कपडे घालून केवळ पुरुष असलेल्या रस्त्यावर सकाळी एकटीच फिरायला जात असे.

इथे दुसर्‍या वाक्यात मी तोकडे कपडे हा शब्द तसाच ठेवलाय, भारतात शंभर वर्षे मागच्या काळात जा तोकडे कपडे हा शब्दही काढून टाका हाती कोणता दृष्टीकोण लागतो ? आजही भारतीय ग्रामीण भागात जा आणि तोकडेच्या एवजी जीन्स करता तंग कपडे हा शब्द ठेऊन पहा हाती काय लागत ? भारतीय पेहराव पाहण्याची सवय नसलेले परकीय पुरूष साडी घातलेल्या भारतीय स्त्रीया बेंबी उघडी दाखवतात अशी टिका करतात तर काहींना नऊवारीतून पायाची उघडझाप दिसते.

पोषाख हा मुद्दाही आत्तापर्यंत असंख्य वेळेस चघळून झाला आहे. स्त्रीयांच्या "त्या बाबतीत" माघार घेण्याबद्दल टिकाकरणारी या धाग्यावरील तथाकथीत सुधारणावादी मंडळीही कशा प्रकारचा दृष्टीकोण ठेवातात आणि कशा पद्धतीने चघळतात (यांच्यात आणि यांच्या टिकेचे लक्ष असलेल्या सनातनी वातावरणात काही खरेच फरक आहे का ?) की स्त्रीयांनी या लोकांना अपेक्षीत पुढाकार आणि मनमोकळेपणा दाखवावयास हवा.

एखाद्या पुरुषांनी भरलेल्या पोलीसस्टेशन मध्ये एखादी स्त्री पोलीस आधीकारी तथाकथीत तंग कपडे घालून काम करत असू शकते किंवा आज डिफेन्स मध्येही स्त्रीयांनी जाण्या बद्दल चर्चा असते ते ही सोडून द्या इतरही अनेक क्षेत्रात स्त्रीया कार्यरत असू शकतात. स्वतःच्या आधाराच्या दृष्टीने असेल किंवा सुरक्षेच्या कारणानेही असेल स्त्रीया आपल्या भोवतालच्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवतानाच काही जणांवर अधीक विश्वास ठेऊ शकतात किंवा हि मंडळी चवीने चघळत असलेली शक्यताही काही केस मध्ये असेल. चवीच्या विषयांवर चर्चा होऊ नये असे नाही पण मला सनातनता ते आधुनिकता पुरुष समाज सोईच्या अपेक्षा तशाच ठेवतो आहे आणि सोईच्या अपेक्षा बदलत आहे असे त्यांनाही मनातून अभिप्रेत नसावे पण एक अल्पशी साशंकता वाटते चर्चा निघालीच आहे तर हा ही मुद्दा नजरेतून सुटणार नाही आणि स्त्रीयांना अधिक विश्वासार्ह वातावरणार श्वास घेण्यात येथील लेखक आणि वाचक मदतच करतील असा विश्वास आहे.

स्वप्नांची राणी's picture

30 Sep 2014 - 8:58 pm | स्वप्नांची राणी

सोडून द्या हो मारवा साहेब.. करायचाय काय असला मित्र?

वैधानिक ईशारा: आपल्या घरी-बिरी घेऊन जात जाऊ नका त्याला.

तसही A man is known by the company he keeps असं काहिसं म्हणतात...

मारवा's picture

2 Oct 2014 - 1:26 pm | मारवा

Dear Child
this discussion is corrupting your innocence. please stay away from it.

पैसा's picture

2 Oct 2014 - 3:39 pm | पैसा

मग

Charity begins at home

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे

वगैरे असं म्हणून मित्राला कध्धी अंतर देऊ नका हो, दादा/भाऊ/ताई/माई/अक्का/काका/काकू/मामा/मामी/आजी/आजोबा/आत्या/मावशी जे कोण असाल ते. नाही म्हणजे मी कोणाशी बोलतेय हे माहित नसल्याने दुसर्‍यांना तुम्ही बाळा, चाइल्ड इ संबोधने वापरताय, तसं मी करणार नाही. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगूनच टाका ना एकदा! म्हणजे आमचा गोंधळ व्हायला नको! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Oct 2014 - 8:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Charity begins at home

हे offensive नाहीये का ? हेच एखाद्या पुरुष आयडी ने म्हटले असते तर काय गदारोळ माजला असता. (Unless I am misinterpreting)

पैसा's picture

2 Oct 2014 - 9:20 pm | पैसा

मारवा यांना चारचौघांसारखे सल्ले दिले तर त्यांना आवडले नाहीत. सल्ले देणार्‍याला ते बाळा, चाइल्ड असली शेलकी विशेषणे लावताहेत. म्हणून मी त्या सल्ल्याच्या उलट बोलले. "Charity begins at home" हे आम्ही इयत्ता ५ वीत सुविचार म्हणून शिकलो. ते कोणाला सांगितले तर त्यात offensive काय?